Solar Eclipse in Marathi Philosophy by Sanjeev books and stories PDF | सूर्यग्रहण

The Author
Featured Books
Categories
Share

सूर्यग्रहण

सूर्यग्रहण :

||श्री स्वामी समर्थ ||

सूर्य ग्रहणात स्वामी महाराजांच्या कृपेने विविध मंत्र, स्तोत्रे जे खालील लिंक वर आहेत त्याची उजळणी करता येण शक्य आहे, त्या आधी मात्र स्वामी समर्थ महाराजांचा १ ३ ७ १ माळ जप करून मग इतर मंत्र व स्तोत्रे सगळ्यांना वाचता येतील साधारण एखादा मंत्र म्हणाय्स किती वेळ लागतो किंवा एखादे स्तोत्र म्हणण्यास कितीवेळ लागतो हे एका कागदावर लिहून आधी आपल्याला काय काय म्हणायचे आहे (ग्रहण वेळेत म्हणजे ग्रहण चालू असताना फक्त ) हे ठरवून घ्यावे, ११ वेळेस २१ वेळेस ,५१ वेळेस किंवा एक माळ असा जप करता येईल तर स्तोत्रे १, ३, ७, ११ ह्या पटीत म्हणता येतील, ग्रहण सुरु होण्याचे आधी अंघोळ करून जपास बसावे व ग्रहण संपल्यावर परत एकदा अंघोळ करून स्वामी नमस्कार करून साधना संपवावी अडचण चालू असल्यास मात्र जप इ० करू नये हि विनंती,

ग्रहणा विषयी माहित calendar वर बघावी किंवा पंचागात बघावी , कारण location प्रमाणे वेळा थोड्या बदलत असतात

लिंक

Shri Swami Samartha Stotra Sangrah, Sanjeev Bhide.
https://play.google.com/store/books/details?id=UrHcDwAAQBAJ

ज्यांना हि लिंक माहित नाही त्यांचे करता देईली आहे, ज्यांना माहिती आहे त्यांच्या साठी नाही

लिंक साठी ९३२५८४६५९७ वर वर स्वत: चा number व नाव whats up करावे म्हणजे लिंक पाठवता येईल

१) ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी Please Ignore this article..

२) ज्यांना संकृत येत नसेल अश्या व्यक्तींनी काहीतरी विपरी घडण्या पेक्षा ह्या भानगडीत पडू नये ग्रहण काळात त्यांनी प्राकृत उद० अवतरणी का , गुरु स्तवन स्तोत्र , कालभैरव वरद, स्तोत्र भीमरुपी , इ० कराव.

३) अडचण चालू असल्यास मात्र जप इ० करू नये हि विनंती,

४) दारू, अंडी मटन मासे कोंबड्या बकरी खेकडे आणि विविध प्रकारचा मांसाहार घरात अथवा बाहेर खाणार्या व्यक्तींनी काहीतरी विपरी घडण्या पेक्षा ह्या भानगडीत पडू नये, दारू व मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक अधिकार व प्रश्न आहे त्या विषयी मला काही interest नाही व माझा काही आक्षेप नाही कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे .

मेदिनी म्हणजे पृथ्वी व मेदिनीय ज्योतिष म्हणजे पृथ्वी त्यावरील संकृती राष्ट्र एखादा समाज, पृथ्वीवरील ऋतू , एकंदर मानवी जीवनावरील परिणाम हे सगळ ह्यात येत पण मेदिनीय ज्योतिष शाश्त्राचा अभ्यास न करता आपल्याला असंख्य video , लिखाण सोशल मिडिया वर बघायला मिळत ज्यात वाटेल ते लिहिलेलं सापडत, जे पूर्णत: बरोबर असत नाही त्यात तृटी किवा उणीवा असतात,

प्रत्येक माणसाची जन्म पत्री हि सारखे नसते त्या मुळे ग्रहण हे त्या माणसाच्या पत्रिकेत नक्की कुठे आहे व एकूणच त्याचा जन्म पत्रिकेचा दर्जा कसा आहे, जन्मस्थ ग्रहांची स्थिती कशी आहे, कुठली दशा, अंतर्दशा चालू आहे ह्या वर त्याचा संभाव्य परिणामा विषयी व्यक्ती सापेक्श भाकीत करता येईल, पण एकादि व्यक्ती साक्षात्कार झालेला महात्मा असेल , एकादयाची उत्तम साधना असेल तर हि भाकीत त्याला फारशी applicable होणार नाहीत, पण

अवघ्या १२ राशीत ७५० कोटी माणसाचं भविष्य ग्रहाणा वरून मांडण म्हणजे सब घोडे बारा टक्के असा प्रयत्न होईल तो बरोबर नाही,ग्रहण रोज होत नाही ठराविक वेळेस होते ते पुढे दिल आहेच, नोर्मल आपल्या सृष्टी चक्रात अचानक दिवसा चंद्र सूर्य व पृथ्वीच्या मध्ये असल्याने सूर्यग्रहण होते हे सृष्टीच्या नैसर्गिक क्रमात बसत नाही म्हणून त्याचे लौकिक जीवनात नकारात्म तर अध्यात्मिक जीवनात सकारात्मक परिणाम दिसातत.
अमावस्या संपून येणारा शुक्ल पक्ष किंवा From new moon and its waxing period हि नवीन गोष्टींची सुरुवात म्हणून बघितल जात तर पौर्णिमे पासून i.e. From Full moon and its waning cycle म्हणजे काही गोष्टींची परिपूर्णता होत आली आहे अस मेदिनीय ज्योतिषात बघीतल जात
म्हणजे एका वर्षात १२ पौर्णिमा आणि १२ अमावस्या माणसाच्या जीवनात कुठल्या तरी वेगळ्या राशीत येउन जातात व त्याचे परिणाम मानवी जीवनावर घडत राहतात, त्यामुळे या वेळेची अमावस्या व चंद्र कुठल्या राशीत आहे व ती राशी आपल्या पत्रिकेत लग्नस्थानी आहे कि लाभस्थान आहे कि व्यय आहे हे बघून व इतर ग्रहाची स्थिती बघून च काही तरी सांगता येईल प्रत्यक्षात असे घडत नाही हे दुर्दैव
ग्रहण काळांत माणसाच्या जाणीवेत बदल घडतो जस पौर्णिमा अमावस्येला माणसावर चंद्राचा परिणाम होतो मनोरुग्ण जास्त हिंसक होतात , ज्यांच्या पत्रिकेत चंद्र मृत असतो ,चंद्र बळ नसते त्याचा त्यांना त्रास होतो पण सध्याच्या युगात ह्या गोष्टीवर विश्वास ठेवलं जात नाही. पौर्णिमा अमावस्या ह्याला नियमित ध्यान करणार्यांचे उच्च ध्यान लागेल तर सज्जन अधिक सज्जन पणे वागतील, जे दुष्ट प्रवृत्तीचे असतात त्यांच्या प्रवृत्त्ती जास्त हिंसक होतील ग्रहणात ह्या गोष्टी जास्त तीव्र पाणे घडत असतात. विविध ग्रह त्यांचे एकमेकावरील गृरुत्वीय आकर्षण (Gravitational Forces) ह्या मुळे हे सगळ घडत असत आता ज्याला हे समजेल तो निश्चितच त्यातून स्वत: चा लाभ करून घेईल ज्याला समाजणार नाही किंवा समजून घेण्यास तयार नाही किवा विरोध करायचं म्हणून विरोध त्यंनी हे article करमणूक म्हणून वाचून सोडून द्यावे
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र व सूर्य यांची युती (किंवा अमावस्या) असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. अशा परिस्थितीत चंद्राच्या प्रच्छायेत किंवा गडद छायेत पृथ्वीच्या सूर्यासमोरील गोलार्धापैकी काही क्षेत्र येते. या क्षेत्रावर सूर्यकिरण पोहचत नाहीत व या भागातील लोकांना सूर्यग्रहण दिसते. चंद्रकक्षा व क्रांतीवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीमार्ग) ही एकाच पातळीत नाहीत. त्यांची प्रतले (पातळ्या) एकमेकांस छेदतात व त्यांमध्ये ५ अंश ९ मिनिटे एवढा कोन आहे. त्यांच्या छेदनबिंदूंना आरोही पात तो राहू व अवरोही पात तो केतू . अमावास्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू यांना विलोमगती (उलट गती) आहे. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही. याला भारतीय अध्यात्मात राहू किंवा केतु ने सूर्य गिळून टाकला अस संकेतीक भाषेत म्हणतात ,खर तर चंद्र पृथ्वी भोवती फिरतो ज्या ठिकाणी Chandra कक्षा पृथ्वी ला छेदते ते दोन बिंदू म्हणजे राहू व केतु
(Astronomical Info)
Rahu is the ल्युनर (चंद्राची) North Node of the Moon. Ketu is the ल्युनर South Node of the Moon. They are always opposite each other in the heavens. Astronomically, the Nodes are the intersection points in space of the apparent orbits of the Sun and the Moon around the Earth
पंचांगांतून ग्रहणाचा स्पर्शकाल, मध्यकाल व मोक्षकाल दिलेला असतो. ग्रहण लागल्यापासून ते सुटेपर्यंतच्या काळात पर्वकाल अथवा पुण्यकाल म्हणतात. सूर्यग्रहणाचा वेध ग्रहणप्रहराच्या आधी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाचा वेध आधी तीन प्रहर असल्याचे मानतात. वेधकालात भोजन करू नये, उपवास करावा. ग्रहणस्पर्श होताच स्नान, देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम ही कर्मे करावी. ग्रहण सुटावयाच्या वेळी दानधर्म करावा. ग्रहण सुटल्यावर म्हणजे चंद्राचे अथवा सूर्याचे बिंब शुद्ध झाल्यावर मोक्षस्नान करावे; स्नान केल्याशिवाय राहू दर्शनाचे सुतक नाहीसे होत नाही. ग्रहणात सर्व वस्त्रांसह स्नान करावे. सुवासिनी स्त्रियांनी गळ्याखालून स्नान करावे; डोक्यावरूनही स्नान करण्याची पद्धती आहे.
ग्रहणकालात सर्व उदक गंगेसमान असते; तथापि वाहते पाणी, सरोवरे, नद्या, महानद्या आणि समुद्र यांचे जल क्रमाने अधिकाधिक पुण्यकारक असते. ग्रहण-पर्वकालात पुण्यक्षेत्री किंवा समुद्रावर स्नानासाठी जातात. ग्रहणकालात दानधर्म केला असता फार पुण्य मिळते. म्हणून सुवर्ण, भूमी, अश्व, गाय, वस्त्र, द्रव्य इ. दाने द्यावीत . ग्रहणात तुला दानादिक करावे. ग्रहणकालात गाय प्रसूत होत असता तिला प्रदक्षिणा केल्याने पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते.ग्रहणकालात नवीन मंत्र ग्रहण करतात. मंत्रग्रहणास सूर्यग्रहण हा मुख्य काल सांगितला आहे. मंत्रग्रहणास सूर्यग्रहणासारखे दुसरे पर्व नाही. पूर्वी घेतलेल्या मंत्राचा ग्रहणकाळात जप न केल्यास तो मंत्र मलिन होतो. गुरूने सांगितलेल्या मंत्राचा (गुरु असल्यास) , इष्टदेवतेच्या मंत्राचा आणि व विविध मंत्राचा जप ग्रहणकालात अवश्य करावा. ग्रहणात पाण्यात उभे राहून मंत्राचा जप केला असता, मंत्र सिद्ध होतो. मंदिरात शक्य असेल तर भगवान शंकर, विष्णू, मारुती, ,स्वामींच्या मठात आग्रा केंद्रात, जगदंबेच्या मंदिरात थोडक्यात कुठल्या हि पवित्र ठिकाणी जप करता येईल , स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .,ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये याचे अल्प विवरण,

ज्यांना नौकरी, कामधंदा, रोजचे पोट आहे त्यांनी यथा शक्ती हे नियम पाळावेत, किंवा मनात श्री स्वामी समर्थ जप काम करताना ग्रहण काळात करावा
१)ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करू नये.
४)गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.
५)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा,ध्यान करा,गप्प बसा
६)ग्रहणकाळात झोपू नये
७)ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,शौच आदी करू नये पणे अगदीच शक्य झाल नाही जन गरजेचे असेल तर जाऊन परत हातपाय स्वछ धुवावेत
८)ग्रहणकाळात संभोग करु नये
९)ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नये
१०)ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नये
११)ग्रहणकाळात भोजन,अंगाला तेल लावणे आदी करु नका,नाहीतर अनेक रोग व्याधी शक्य असतात.
१२)ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे फल अनंत पटीने आहे.
१३)अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल शक्यतो घेऊ नये.
१४)नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वैयपाक करु नये.धुण धुणे पाणी भरणे

१५)ग्रहण काळात ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ जप करावा ,ज्यांना संकृत येत असेल त्यांनी मंत्र जप तर ज्यांना संकृत येत नसेल त्यांनी नवनाथ ४० व अध्याय , गुरु चरित्र अवतरणीका , शंकर गीता शेवटचा अध्याय साई ,गाजणा महाराज शेवटचा अध्याय थोडक्यात ज्याच जे आवडत दैवत असेल त्याच जमेल तितका जप करावा

ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती दिली आहे.ही लक्षात ठेवावी.
ग्रहणाबाबत जगातील विविध धर्मांत तसेच जातीजमातींत काही विशिष्ट समजुती चालत आल्याचे दिसते. सर्वसामान्यपणे चंद्राचे वा सूर्याचे ग्रहण सर्वत्र अशुभ, अरिष्ट तसेच आपत्ती, रोगराई, युद्धादींचे सूचक म्हणून मानले जाते आणि ह्या अशुभाच्या परिहारार्थ विशिष्ट प्रकारचे कर्मकांड व विधिनिषेध पाळले जातात. ग्रहण लवकर सुटून चंद्र वा सूर्याचे पूर्ववत बिंब दिसावे म्हणून वेगवेगळे उपाय सर्वत्र अवलंबिले जातात.
विविध धर्म , ग्रहणे ,व त्या नुसार माहिती
ख्रिस्ती धर्मात बायबल मध्ये सुर्यग्रहणाचा उल्लेख सापडतो
खाल्डियन लोकांत चंद्रग्रहण दिसणे हे चंद्रदेवतेच्या कोपाचे लक्षण मानत. त्यामुळे महामारीवा प्राणघातक साथींचे रोग, दुष्काळ, युद्धे, भूकंपादी आपत्ती येतात, अशी त्यांची समजूत होती.

ग्रीक लोकांतही ग्रहण अशुभसूचक मानले जाई. चंद्र वा सूर्यदेवतेने आपले तोंड फिरवले म्हणजे ग्रहण लागते, अशी त्यांची समजूतहोती. मोहिमेवर असताना ग्रहण दिसले, तर ते अशुभसूचक समजून ग्रीक लोकांनी माघार घेतल्याचे वा तह केल्याचे उल्लेख आढळतात.

रोमन इतिहासकार लिव्ही (इ. स. पू. ५९–इ. स. १७) याने चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राला ग्रासणाऱ्या पशूंना हुसकून लावण्यासाठी गोंगाट वा आरडाओरड करण्याच्या तत्कालीन प्रथेचा उल्लेख केला आहे. ढोल वा झांजा किंवा इतर कर्कश वाद्यांचा गजर केल्याने ग्रहण सुटते, या प्रथेचा टॅसिटस (इ. स. सु.५५–सु. ११७) या रोमन इतिहासकारानेही उल्लेख केला आहे.

प्राचीन तूरिन विभागातील लोकही ग्रहण सुटावे म्हणून वाद्यांचा गजर करीत.

आर्मेनियन लोकांत पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये एखादा कृष्णग्रह आला, तर ग्रहण लागते अशी समजूत होती. काही एस्किमो लोकांत ग्रहणामुळे पृथ्वीवर दूषित प्रभाव पडत असतो आणि ग्रहणकालात जर खाद्यपेयाची भांडी पालथी ठेवली नाहीत, तर त्यामुळे रोगराई पसरते अशी समजूत आहे. म्हणूनच ग्रहणकालात एस्किमो स्त्रिया सर्व भांडी पालथी करून ठेवतात.

चिनी लोकांत कुत्र्याने वा इतर हिंस्र प्राण्याने चंद्राचा वा सूर्याचा ग्रास केला म्हणजेच ग्रहण लागते, अशी चिनी लोकांत समजूत होती. चंद्रसूर्याचा ग्रास करणाऱ्या प्राण्याला पळवून लावण्यासाठी ते कर्कश घंटानाद करीत. सूर्यग्रहण हे एखाद्या भयंकर घटनेचे सूचक समजून त्याच्या परिहारार्थ ते ग्रहणकालात उपवास करीत.

प्राचीन ईजिप्तमध्ये राजा हा सूर्यदेवतेचा अंश वा प्रतिनिधी मानला जाई. सूर्यग्रहणाच्या वेळी राजा ग्रहण सुटेपर्यंत देवतेच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असे. सूर्याने आपला आकाशातील प्रवास अखंडपणे आणि निर्वेधपणे चालू ठेवावा, अशी कल्पना ह्या प्रदक्षिणांमागे दिसते.
शिंतो धर्मात सूर्यग्रहणसमयी गळ्यातील विशिष्ट खड्यांचे ताईत पवित्र मानल्या गेलेल्या क्लेयेरा नावाच्या वृक्षाच्या फांद्यांवर टांगून ठेवण्याची चाल होती. ह्या खड्यांची चकाकी ही सूर्यप्रकाशाचे प्रतीक असून त्याद्वारे सूर्यप्रकाश पुन्हा पूर्ववत प्राप्त व्हावा, अशी कल्पना दिसते. ग्रहणकालात शेकोट्या पेटविण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. यामागेही शेकोटीचा प्रकाश हे सूर्यप्रकाशाचेच प्रतीक असून त्यामुळे ग्रहण सुटते, अशी समजूत दिसते. कुराणातही शेवटून दुसऱ्या सूरेत ग्रहणाच्या अशुभ परिणामांचे व त्यांच्या परिहारार्थ करावयाच्या काही कर्मकांडाचे निर्देश आहेत. चंद्रावर एक ससा असून तो सापाने भक्षण केला म्हणजे चंद्रग्रहण लागते, अशी तोडा लोकांत समजूत आहे. ग्रहणकालात ह्या सापाला भिवविण्यासाठी ते प्रचंड आवाज व आरडाओरडा करतात. त्यामुळे साप निघून जातो व ग्रहण सुटते, अशी त्यांची समजूत आहे. ग्रहणकालात तोडा लोकही उपवास करतात.

आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील रहिवाशांत चंद्राचा सदैव पाठलाग करणाऱ्या सूर्याच्या छायेमुळे चंद्रग्रहण लागते, अशी समजूत असून ग्रहणकालात ते लोक रस्त्यावर एकत्र जमून जोराने ओरडतात आणि ‘त्याला सोड’, ‘दूर हो’, ‘निघून जा’ अशा अर्थाची वाक्ये ओरडून उच्चारतात.

माओरी लोकांत चंद्रग्रहण हे शत्रूचा किल्ला पडण्याचे वा शत्रुवरील विजयाचे सूचक मानतात. ताहिती लोक चंद्रग्रहण भय अथवा पीडासूचक मानतात. दुष्टात्म्यांच्या प्रभावाने ग्रहण लागते, अशा समजुतीतून ते प्रार्थनास्थानी जमून चंद्राची ग्रहणापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करतात.

मुंडा लोकांत चंद्रसूर्य हे राक्षसाकडून कर्ज घेतात आणि ते न फेडल्यामुळे धनको राक्षस त्यांना कोंडून ठेवतो व ग्रहण लागते, अशी समजूत आहे. तांदूळ, धातूची भांडी व लोखंडी हत्यारे ते ग्रहणसमयी अंगणातठेवतात. ह्या वस्तू देऊन चंद्रसूर्याने आपले कर्ज फेडावे व मुक्त व्हावे, अशी कल्पना त्यामागे आहे.

ओजिब्वा लोकांत सूर्यग्रहण लागणे म्हणजे सूर्य विझणे, अशी समजूत आहे. ह्या कल्पनेतूनच ते ग्रहणकाली पेटलेल्या पलित्यांचे बाण सूर्याच्या दिशेने सोडतात. पेटलेल्या बाणांनी सूर्य पुन्हा प्रज्वलित व्हावा, अशी कल्पना त्यामागे असावी.
श्रीलंकेतील आदिवासीही सूर्यग्रहण हे अशुभ व भयंकर घटनेचे सूचक मानून त्या दिवशी उपवास करतात.
जैन धर्मातही ग्रहणांबाबतच्या अशुभ परिणामांचा विचार होऊन त्यांच्या परिहारार्थ काही धार्मिक उपाय व कर्मकांड सांगितले आहे. सर्वसामान्यतः जैन धर्मात चंद्रसूर्याची ग्रहणे ही अरिष्ट व पीडा यांची सूचक मानली जातात. खग्रास सूर्यग्रहणामुळे राजाचा वा उच्चपदस्थ व्यक्तीचा मृत्यू होतो, असे मानले जाते. एकाच महिन्यात चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आल्यास ते निश्चितपणे मोठ्या युद्धासारख्या आपत्तीचे सूचक मानले जाते.

बौद्ध धर्मातही हिंदूंप्रमाणेच राहू व केतू चंद्रसूर्यास ग्रासतात म्हणून चंद्रसूर्यग्रहणे लागतात, अशी समजूत आहे.
पीटकादी पाली ग्रंथांत अनेक ठिकाणी राहू व केतू ह्या असुरांनी चंद्रसूर्याला ग्रासले म्हणजे ग्रहण लागते, असे उल्लेख आढळतात.
हिंदू धर्मातील समजूती : वेद, महाभारत, पुराणे यांतून ग्रहण व ग्रहणकालीन धार्मिक कृत्यांचे विवरण आढळते. देवांच्या पंक्तीत बसून राहू अमृत प्राशन करीत असल्याची चहाडी चंद्र आणि सूर्य यांनी केली. त्यामुळे राहूचा शिरच्छेद झाला. तेव्हापासून राहू आणि केतू चंद्रसूर्यांना ग्रासतात अशी कथा भागवतात आहे. भारतीय पंचांगांतून ग्रहणाचा स्पर्शकाल, मध्यकाल व मोक्षकाल दिलेला असतो. ग्रहण लागल्यापासूनते सुटेपर्यंतच्या काळात पर्वकाल अथवा पुण्यकाल म्हणतात. सूर्यग्रहणाचा वेध ग्रहणप्रहराच्या आधी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाचा वेध आधी तीन प्रहर असल्याचे मानतात. वेधकालात भोजन करू नये, उपवास करावा. ग्रहणस्पर्श होताच स्नान, देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम ही कर्मे करावी. ग्रहण सुटावयाच्या वेळी दानधर्म करावा. ग्रहण सुटल्यावर म्हणजे चंद्राचे अथवा सूर्याचे बिंब शुद्ध झाल्यावर मोक्षस्नान करावे स्नान केल्याशिवाय राहूदर्शनाचे सुतक नाहीसे होत नाही. ग्रहणात सर्व वस्त्रांसह स्नान करावे. सुवासिनी स्त्रियांनी गळ्याखालून स्नान करावे डोक्यावरूनही स्नान करण्याची पद्धती आहे.
ग्रहणकालात सर्व उदक गंगेसमान असते तथापि वाहते पाणी, सरोवरे, नद्या, महानद्या आणि समुद्र यांचे जल क्रमाने अधिकाधिक पुण्यकारक असते. भाविक लोक ग्रहण-पर्वकालात पुण्यक्षेत्री किंवा समुद्रावर स्नानासाठी जातात. ग्रहणकालात दानधर्म केला असता फार पुण्य मिळते. म्हणून सुवर्ण, भूमी, अश्व, गाय, वस्त्र, द्रव्य इ. दाने देण्याची पद्धती आहे. श्रीमंताने ग्रहणात तुलादानादिक करावे. ग्रहणकालात गाय प्रसूत होत असता तिला प्रदक्षिणा केल्याने पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते.
ग्रहणश्राद्ध आमान्नाने म्हणजे शिध्याने वा अपक्व अन्नाने अथवा हिरण्याने करावे. ग्रहणश्राद्धाला रात्रीचा निषेध नाही. जननाशौचाच्या किंवा मृताशौचाच्या कालात ग्रहण आले असता, ग्रहणासंबंधी स्नानदानादिक कृत्ये करण्यापुरती शुद्धी सांगितली आहे.
ग्रहणकालात मलमूत्रोत्सर्ग, स्त्रीसमागम, अभ्यंगस्नान इ. कृत्ये करू नयेत. गर्भिणी स्त्री तसेच बाल, वृद्ध आणि रोगी यांनी यथाशक्ती नियम पाळावे. ग्रहणाच्या पूर्वी शिजविलेले अन्न तसेच पाणीही टाकून द्यावे. दूध, दही, घृतपक्व व तैलपक्व पदार्थ, लोणची यांच्या शुद्धीसाठी तुलसीपत्र अथवा दर्भ त्यांवर ठेवावे. गर्भिणी स्त्रीने ग्रहण पाहू नये तसेच तिने सुई, कात्री, चाकू इ. वस्तूंनाही स्पर्श करू नये.
ग्रहणकालामध्ये मांग लोक ‘दे दान, सुटे गिराण’ असे ओरडत गावातून पैसा, धान्य, कपडे मागत हिंडतात. त्या वस्तू दान देताना मुलाबाळांच्या, रोग्याच्या अंगावरून त्या ओवाळून नंतर दान देतात.
ग्रहणकालात नवीन मंत्र ग्रहण करतात. मंत्रग्रहणास सूर्यग्रहण हा मुख्य काल सांगितला आहे. मंत्रग्रहणास सूर्यग्रहणासारखे दुसरे पर्व नाही. पूर्वी घेतलेल्या मंत्राचा ग्रहणकाळात जप न केल्यास तो मंत्र मलिन होतो. गुरूने सांगितलेल्या मंत्राचा, इष्टदेवतेच्या मंत्राचा आणि गायत्रीमंत्राचा जप ग्रहणकालात अवश्य करावा. ग्रहणात पाण्यात उभे राहून मंत्राचा जप केला असता, मंत्र सिद्ध होतो.
ग्रहणकालात स्त्री प्रसृत झाली असता, अनिष्ट परिहाराकरिता शांती करावी असे सांगितले आहे.
ग्रहण सुटण्यापूर्वीच चंद्र अथवा सूर्य अस्तात गेल्यास, अशा ग्रहणाला ‘ग्रस्तास्त’ ग्रहण म्हणतात. ग्रस्तास्त ग्रहण असता, ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावे परंतु पुन्हा चंद्र वा सूर्याचा उदय होऊन शुद्ध बिंब दिसेपर्यंत भोजनाचा निषेध आहे. ‘ग्रस्तोदय’ ग्रहणाबाबतही याप्रमाणेच नियम आहेत. ग्रहणव्रत नावाचे एक काम्यव्रतही आहे. ते मुख्यतः विद्यार्थ्यांनी करावयाचे असून बुद्धीचा विकास व शास्त्रज्ञानाची वृद्धी ही त्यांची फले सांगितली आहेत.
(Ref:Diff Books , Net etc.)

अविनाश

@स्वामी@