anpekshit - 1 in Marathi Thriller by Saurabh Aphale books and stories PDF | अनपेक्षित - भाग १

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

अनपेक्षित - भाग १

ती होतीच तशी सुंदर ..असं असं वाटायचं की सारख तिच्याकडे बघतच रहावे..... चंद्रमुखी मृगनयनी, खुप सुंदर होती ती.
ती दिसायला खूप सुंदर नाजूक तिच्या हनवटीवर काळा तीळ जणू काही तिला नजर लागू नये अशा पद्धतीने उठून दिसायचा.

त्याला आता तिला बघितल्याशिवाय चैन पडत नसे तो रोज तिची आतुरतेने वाट बघत बसायचा.

एक दिवस ही गोष्ट तिच्या लक्षात आली आता ती सुद्धा त्याला चोरून बघू लागली त्याच्याकडे बघून हळूच हसू लागली.

तिच्याकडे बघण्यातच वर्ष निघून गेल.
एक दिवस तिचा फोन मिळवून तिला फोन केला.. लाईट मेसेज पाठवला
फोन नंबर तिच्या आईचा निघाला ..तिच्या बापाचा फोन आला,
"अरे माझ्या पोरीला फोन करतोय तुझ्यावर फौजदारी करीन"
तो म्हणला "तुमच्या मुलीला काय वाईट तरी मेसेज पाठवला नाही ना मी" त्यावर तिचे वडील म्हणाले "तू भेट सांगतो "

ती त्याच्याकडे बघून गोड हसायची तोही स्माईल देत होता
मग एक दिवस मात्र त्याने धाडस दाखवलं आणि तिला प्रपोज केलं त्याला होकार मिळाला.

त्यानंतर रोज ते एकमेकांना भेटू लागले. तिला क्लास सुटल्यानंतर गाडीवर घेऊन डोंगराकडे फिरायला जाऊ लागला. तीसुद्धा कोणालाही ओळखू येऊ नये म्हणून चेहऱ्याला स्कार्फ बांधून त्याच्या बरोबर जायची. घरामध्ये संशय येऊ नये म्हणून तिने आपला एक ड्रेस तिच्या खास मैत्रिणीकडे ठेवला होता. रोज क्लास सुटल्यावर तिच्या मैत्रिणी कडे जायची आणि तो ड्रेस बदलून ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबायची. रोज तो तिला गाडीवरून घेऊन लाँग ड्राइव्हला जायचा. या दोघांचीही दिवस फार आनंदात होते. दोघेही एकमेकांत गुंतून गेले होते एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते.

त्यांच्या मनात आता लग्नाविषयी ची विचार येऊ लागले होते त्यांनी असा विचार केला होता की तिची परीक्षा झाल्यानंतर आपण तिच्याशी लग्न करायचे पण प्रश्न होता की दोघांच्या घरी ही गोष्ट सांगून त्यांच्याकडून लग्नाविषयी परवानगी कोण घेणार...

दोघांनाही भेटणे शक्य होत नव्हते ती रोज मैत्रिणीकडे म्हणून भेटायला जात होती आणि मैत्रिणीकडून ड्रेस चेंज करून नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर गाडीवरून जात असे.

तिने त्यादिवशी आपला जाण्याचा विचार बदलला आणि तिने फोनवरून त्याला तशी कल्पना दिली तोही लगेचच गाडी घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी आला
त्या मैत्रिणीच्या घरी आज कोणीही नव्हते सर्वजण परगावी लग्नाला गेली होते ती मैत्रिणी घरी एकटीच होती त्यामुळे तिने आपल्या घरीच बोलून घेतले होते.
"अरे येरे ,घरात एवढा का लाजतोयस ? आमच्या घरात बसून एकांतात बोला. घरी कोणी नाहीये,मीही काही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही...

तो साक्षीच्या घरी गेला.....
( तो:विकी , ती: पूजा, मैत्रीण: साक्षी)

तिथे पूजा त्याची वाट बघत होती विकी तिथे जाऊन पूजा च्या समोर बसला
साक्षी चहा करायला म्हणून किचन मध्ये गेली त्यानंतर पूजाने लग्नाचा विषय काढला

"विकी, लग्नाविषयी काय ठरवल आहेस ?"
विकी "माझे स्पष्ट मत आहे की घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं नाही."
"तू घरच्यांची परमिशन कधी घेणार आहेस?" पूजा म्हणाली " आता मला कंटाळा आलेला आहे सारख सारख चोरून भेटण्याचा. माझ्या घरचे आता माझ्या लग्नाची बोलणी करत आहेत. त्यांनी कुठला तरी जापनीज मुलगा निवडलाय माझ्यासाठी"

"तुझे सगळे बरोबर आहे. आज मी तुला त्याविषयी सांगणार होतो मी आता जपानला निघालो आहे. तिथे जापनीस ट्रान्सलेटर म्हणून कंपनीतर्फे मला जॉब मिळाला आहे. आता मला लवकर जावे लागेल, त्याआधी मी तुझ्या घरी येऊन तुझ्या वडिलांची परवानगी घेईन." विकी म्हणाला

साक्षी चहा घेऊन आली ,साक्षी "मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केल?"

"नाही ग ,आम्ही गप्पा मारत बसलेलो."

"मी पुजाला सांगत होतो की मला जपानला जॉब लागला आहे आणि मला काही दिवसातच जपानला जावे लागणार आहे त्याआधी मी तुझ्या वडिलांशी पण बोलून घेतो" विकी

"विकी ,नुसतं नुसतं सांगतोयस पार्टी वगैरे दे .." साक्षी

"देतो ना बाहेर जेवायला तुमच्या दोघांना पण घेऊन जातो याला का तुम्ही बघा नेईल तिकडे यावं लागेल तुम्हाला." विकी

यावेळी साक्षी त्या दोघांना घरात ठेवून घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेली. पूजाला खूप रडू येत होते. विकी तिच्यापासून दूर जाणार होता व तो तिच्या वडीलांनाही भेटू शकला नव्हता त्यामुळे ती खूप चिडली होती.

विकीने तिला हळूच जवळ घेतले व तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तिला म्हणाला "मी काही कायमचा निघालेलो नाहीये,
मी तीन महिन्यातच परत येणारे कारण माझा प्रोजेक्ट फक्त तीन महिन्याचा आहे आणि कंपनी मला फक्त तीन महिन्यासाठी जपानला पाठवणार आहे."
"पण हे पुढे तीन महिने माझ्यासाठी खूप कठीण जाणार आहेत मी तुझ्याशिवाय जगु नाही शकत ."असे म्हणून पूजा हमसून हमसून रडू लागली.

तेवढ्यात साक्षी कुलुप उघडून आत आली. "सॉरी, मी लगेच आले. पण माझा नाईलाज होता. शेजारच्या काकूंनी आईला सांगितले की घराला कुलूप आहे म्हणून.आईचा मला फोन आला होता की शेजारच्या काकू येणार होत्या पण घराला कुलूप आहे. म्हणून सांगत आहेत. त्यामुळे मी लगेचच पळत घरी आली आणि त्यांना दारातूनच कटवले. अगं ,यांचा मुलगा समीर तो आलाय परदेशातून त्याला मला भेटायचंय म्हणून त्या मला सांगायला आल्या होत्या आता येईल तो दहा मिनिटात."

"चला तर मग आम्ही निघतो, तु भेट त्याला निवांत." विकी

"अरे थांब रे तुमची पण मी त्यांच्याशी ओळख करून देते खूप हंड्सम आहे तो".साक्षी

""हो ,हो ,हो तरीच लगेच घरी आलीस" असं पूजाने म्हटल्याबरोबर साक्षी एकदम लाजते तेवढ्यात दारातून एक उंच हँडसम तरुण घरामध्ये प्रवेश करतो साक्षी त्याची ओळख करून देते

"हा माझा होणारा नवरा, "

विकी आणि पूजा एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतात.

"हाय, एव्हरीबडी माय सेल्फ समीर"

"हाय, माय सेल्फ विकी आणि ही माझी होणारी बायको, पूजा."
विकी स्वतःची ओळख करून देतो.

होणारी बायको म्हणल्यावर पूजा विकीकडे आश्चर्याने बघायला लागते.
साक्षी पूजाकडे बघून हसायला लागते.
पूजा विचार करत असते ह्याला माझ्या वडिलांशी लग्नाविषयी चर्चा करता आली नाही आणि गावाला होणारी माझी बायको म्हणून ओळख करून देतोय.

क्रमशः