It's raining in Marathi Love Stories by Bunty Ohol books and stories PDF | हा पाऊस

Featured Books
  • The Subscriber

    The subscriberरात के ठीक बारह बजे थे।मोबाइल की स्क्रीन पर सि...

  • नेहरू फाइल्स - भूल-98-99

    भूल-98 ‘लोकतंत्र’ नेहरू की देन?—असत्य है आपको यदा-कदा ही ऐसे...

  • वो शहर, वो लड़की

    की वो भागती-दौड़ती शामें।ट्रैफिक की लंबी कतारें, हॉर्न की आव...

  • समर्पण से आंगे - 7

    ‎‎भाग – 7‎जब बदनामी ने दरवाज़ा खटखटाया‎समाज जब हारने लगता है...

  • काल का रहस्य

    रात के करीब दो बज रहे थे. पूरा मोहल्ला गहरी नींद में सोया था...

Categories
Share

हा पाऊस

आज पाऊस झाला मातीतून सुगंध पुन्हा दरवळला आणि पुन्हा तिची आठवण देऊन गेला. तिच्या त्या बालिश पणाचे, तिच्या रूसण्या चे. मग रूसल्या वर ते नाक वाकड करण . माहीत नव्हत तू आशी माझ्या जीवनात येईल खरच तू माझी बच्चू होतीस. तस तर तू माझ्या साठी सर्व काही होतीस. मला ही माहीत नव्हत की तू माझ्या सोबत कमी दिवस सोबत राहणार होती. आणखी खूप जगायच होत तुझ्या सोबत पण जाऊदे जे नशिबात होते तसे झाले पण जे काही क्षण जगलो तुझ्या सोबत ते खरच माझ्या साठी खास होते.

तुझ्या सोबत बसने प्रवास करताना असे वाटत होते की आयुष्या प्रवास देखील तुझ्या सोबत करावा. तुला कदाचित माहीत नसेल पण मला तू कुठे पण लगेच दिसायची तुझ्या अवती भवति किती पण गर्दी असो पण माझी नजर बरोबर तुझ्या वर येऊन थांबत होती. ते मला ही माहीत नाही पण तू मला लगेच दिसायची. तू बोलताना नुसते तुझे शब्द ऐकावे असे वाटत.

रोज सकाळी तुझ्या चेहरा पाहून उठाव म्हणून मोबाइल सोबत घेऊन झोपायचो. आणि तुला पहिले की दिवस खूप छान जायचा तू बोलीस म्हणून तुझ्या हळदी ला पण आलो पण लग्नाला नाही येऊ शकलो. माहीत नाही ग पण खूप त्रास झाला मला. मी नाही तुला कोणाची होताना पाहू शकत.

मित्र म्हणत होते तू मला धोका दिला.. पण तुला लग्न करायला मीच संगितले होते. तू तर माझ्या सोबत पळून जायला पण तयार होती. पण मला ते योग्य नव्हत वाटत. कारण तुझ्या आई वाडिलांना त्रास झाला असता. आणि माझ्या पण, मला माहीत आहे खूप लोक जातात पण मी नाही करू शकलो. तू मला विचारल पण होत की आपण जाऊया पळून मी नाही म्हंटलो तेव्हा तू बोलीस खर प्रेम करतो न माझ्या वर .. मग का नाही येत आहेस.

आता तुझ्या मनात विचार येणे साजीक होते . कारण एवढ मी तुझ्या वर प्रेम करतोय मग का नाही ? इथे माझी गरीब आणि समाजाने बांधलेलीं जात नावाची भिंत आडवी आली.... मी माझे शिक्षण पण काम करून पूर्ण केले.

तू मला समजून घेतले आणि लग्न केले. आज तू तुझ्या संसारात खुश आहे. आज मी कलेक्टर आहे, चांगला पगार पण आहे. पण तू नाही आहेस. तुला पाच वर्ष मी थांबू नाही शकलो. आणी ते शक्य पण न्वहत आणि ते समजला पण आवडलं नसतं

पण मला नेहमी वाढदिवसाला फोन करते तेव्हा खरच छान वाटते.

पण तुला असे वाटत असेल की हा शुभेच्या घेतो आणि फोन लगेच ठेवतो. मला तुला पूर्वी ची कोणती आठवण करून नाही दयची. आपण जो काही त्याग केला तो पूर्ण व्यर्थ जाईल. नेहमी तू मला म्हणतेस की माझी बायको माझ्या पेक्षा छान आहे. पण तुला सांगतो. की ती आहे आणि तू तू आहेस. या कारणाने मी माझ्या जूना नंबर ही बदला नाही फक्त तुझ्या साठी तो ठेवला आहे.

पण तुला खर सांगतो मी खूप प्रेम करतो तुझ्या वर, आणि करत राहणार. तू जिथे असेल तिथे खुश आनंदी रहा. कधी ही माझी आठवण किंवा काही मदत लागली तर नक्की सांग. आणि मी आभारी आहे तुझा तू मला समजून घेतले , माझ्या प्रेमाला समजून घेतले, मला माहीत आहे जेव्हडा त्रास तुला झाला आहे तेव्हडा मला पण झाला. पण एवढ म्हणेल खूश राहा. नसत एवढं सोप्पं पहिल प्रेम विसरण. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो नकळत का होयना तुझी आठवण करून जातो.