Shodh Chandrashekharcha - 18 in Marathi Moral Stories by suresh kulkarni books and stories PDF | शोध चंद्रशेखरचा! - 18

Featured Books
Categories
Share

शोध चंद्रशेखरचा! - 18

शोध चंद्रशेखरचा!

१८---

घड्याळात पाचचा सुमार होता. कस्तुरी बैचैन झाली होती. अनोळखी फोनचा ती मागोवा घेणार होती. पर्स मधले पैश्याच्या ढिगल्यावरले, छोटे पिस्तूल पाहून तिला आधार वाटला. वेळ पाडलीतर बेधडक चाप दाबायचा, हे तिने ठरवून टाकले होते. बगलेत पर्स मारून ती निघाली. भिवंडी पर्यंत पोहचायला साधारण तासभर लागणार होता. पण मुंबईच्या ट्रॅफिकचा भरोसा नव्हता, म्हणून ती थोडेसे लवकरच निघाली होती. समजा, ती भिवंडीत लवकर पोहंचली तर, एखादे सिसिडे गाठून कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला घेण्याचे तिने ठरवले.

तिच्या अपेक्षेप्रमाणे ती सव्वासहाला भिवंडी एरियात पोहंचली. मजूर लोकांची वस्ती होती, तरी तिला एक रस्त्यालगतचे सिसिडे सापडलेच. तेथे अंडरग्राऊंड पार्किंगची सोय होती. ती गाडी पार्क करून, त्या आउटलेट मध्ये घुसली.

"कस्तुरी भिवंडीच्या एका सीसीडीच्या दुकानात बसलीयय!" अर्जुनाने इरावतीला फोनवर निरोप दिला.

"पत्ता?"

अर्जुनाने पत्ता सांगितला.

"तिच्यावर लक्ष ठेव. ती आता आहे तोवर, ठीक. पण बाहेर पडू लागली तर, मात्र आडवून ठेव! मी फक्त दहा मिनिटात पोहंचतेच!"

इरावतीने बाईक रेस केली. सीसीडेंच्या टू व्हीलर पार्किंग जवळ अर्जुना उभीच होती.

"आजून आतच आहे?" तिने अर्जुनाच्या बाईकजवळ,आपली बाईक पार्क केली.

"हो."

"चल, माझ्या सोबत!" इरावती अर्जुनाला म्हणाली.

कोल्ड कॉफी आणि त्यावर खिसलेल्या चॉकलेटचा चुरा आणि आईस्क्रीमचे गोळे असलेला उंच ग्लास कस्तुरी समोर पेश झाला. सोबतच्या चमच्याने तिने आईस्क्रीमचा लफ्फा तोंडात घेतला. अपसुख तिचे डोळे मिटले गेले. आह्ह! कसलं भारी वाटतंय! चंद्रशेखरच्या राज्यात हे असे क्षण कधीच आले नव्हते! तेच तेच, अवघडलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलातील खाण, नुसते चकाचक डिनर सेट, खाण बेचवच!

तिची चांगलीच ब्रम्हानंदी टाळी लागली होती.

"एकटीच खाणार? आम्हाला देणार नाही का?" कस्तुरीचे खाड्कन डोळे उघडले. भूत पाहावे तसे तीने इन्स्पे. इरावती आणि सोबत असलेल्या त्या गटकु पोरीकडे पहिले. या पोरीला, तिने तिच्या घराच्या आसपास एक दोनदा ओझरते पहिले होते.

"इन्स्पे. इरावती, तुम्ही आणि इथे? काय करताय?"

"हाच माझाही प्रश्न आहे? तुम्ही येथे काय करीत आहेत?"

कस्तुरीला आता सर्व सांगणे गरजेचे होते. तिने 'मी माणिक!' वाला फोन आणि इतर सर्व माहिती तिला सांगितली.

"बापरे, केव्हडी रिस्क घेतहोता ठाऊक आहे का?"

"त्यात काय रिस्क? सोबत पैसे आणलेत! वेळप्रसंगी वापरायला पिस्तूल आहे!"

"बाई! यान काय डोम्बल होतंय? त्याला इरा मॅडम सारखं डेरिंग लागत! तुमच्या सारख्या सुंदर बाईला तर अजून जपायला हवं!" अर्जुना म्हणाली. आपल्याला सुंदर म्हटल्या मुळे, कस्तुरीचे त्या गटकु पोरीबद्दल चांगले मत झाले.

इरावतीच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन घोळत होता.

"कस्तुरी, तुम्हाला कधी त्या माणिकने पहिले आहे का?"

"नाही! प्रत्यक्ष कधीच भेटला नाही. मला त्याने दुरून पहिले असेल तर माहित नाही!" मुळात हा प्रश्नच गावंढळ होता. रिस्क होती, तरी इरावतीने आपला प्लॅन अमलात आणण्याचे ठरवले! तिने एकदा अर्जुनाकडे आणि एकदा कस्तुरीकडे पहिले.

"कस्तुरी, जरा माझ्या सोबत येता!" इरावती कस्तुरीला घेऊन रेस्ट रूम मध्ये आली. तिने आत दोघीच असल्याची खात्री करून घेतली.

"कस्तुरी कपडे काढा!" आपल्या ड्रेसच्या शर्टाचे बटन काढत ती कस्तुरीला म्हणाली!

दहा मिनिटात दोघी बाहेर आल्या. तेव्हा कस्तुरी खाकी वर्दीत होती, आणि इरावती जीन्स आणि टी शर्टात!

"माय गॉड! तुम्ही दोघी कसल्या क्युट दिसतंय महित्यय?" अर्जुना उस्फुर्तपणे म्हणाली.

"ते राहू दे! मी काय म्हणते तुम्ही दोघी लक्षपूर्वक ऐका! मी कस्तुरी म्हणून त्या 'माणिकला' भेटणार आहे! अर्जुना, तू कस्तुरीच्या सोबत त्यांच्या घरी जा! कस्तुरी हि अर्जुना, तुम्हाला सोबत आणि सौरक्षण देईल!"

इरावतीने सांगितले नसले तरी, अर्जुना आपल्यावर लक्ष ठेवण्यासाठी येत आहे हे कस्तुरीला कळले.

दोघी निघाल्या.

"कस्तुरी, तुमची ती पर्स! आणि मोबाईल माझ्या कडे देऊन जा! माणिकचा फोन त्यावरच येईल ना?"

कस्तुरीने बगलेत मारलेली पर्स आणि मोबाईल इरावतीच्या हवाली केला. कस्तुरी आणि अर्जुनाने सिसिडे बाहेर पाऊल टाकले. आणि इरावतीचा फोन वाजला! अपेक्षा कस्तुरीच्या फोनच्या रिंगची होती!

"मॅडम! बक्षी भिवंडीच्या आसपास आहे!"

इरावती हादरली. बक्षीची मुंबईत आल्या पासूनचे मार्गक्रमाने, प्रथम मोहमद अली रोडवरील एका हॉटेलात-ग्लॅलक्सि जवळ-विकीच्या घरात-पोलीस स्टेशनात (गोळीबार करणारा हाच असावा,अशी शंका होती.)- आणि आता भिवंडीत! काय गौड बंगाल आहे?

०००

कस्तुरी आणि अर्जुना कॉफी हाऊस मधून बाहेर पडल्या. कस्तुरीला एकदम हलके वाटत होते. त्या 'माणिक'ला भेटण्याचे नाही म्हटले तरी टेन्शन आलेच होते.

"कस्तुरीजी, माझी बाईक आहे. ती येथेच ठेवू. तुमच्या गाडीतून तुमच्या घरी जाऊत."

"कोणती बाईक आहे तुझी?"

"सीबीझेड! स्पोर्ट्स मॉडेल!"

"वॉव! मी काय म्हणते? माझी गाडी येथेच ठेवू अन तुझ्या बाईकवर घरी जाऊ!? कसे?" कस्तुरीचे डोळे चमकत होते.

'काय?" अर्जुनाचे डोळे विस्फारले!

कस्तुरीने हेल्मेट डोक्यावर घातले, अर्जुना बॅक सीटवर बसली! कस्तुरीचा कमरेला घट्ट मिठी मारून! सुरवातीला अडखळत चालवणाऱ्या कस्तुरीला बाईकचा अंदाजा आल्यावर, पिसाट वेगाने बाईक दौडत होती! चंद्रशेखर आणि कस्तुरीचा 'वेगाचे पॅशन' हा कॉमन इंटरेस्ट होता!

०००

पीटरचा इनबॉक्स मध्ये एक मोबाईल नंबर झळकला. बक्षी! पीटरने घुमवला.

"बक्षी?"

"कोन हरामखोर बोलता है? ये सुलेमानका नम्बर है!"

"मुझे, बक्षी से बात करनी है!"

शेजारी बसलेल्या बक्षीने सुलेमानच्या हातातून फोन हिसकावून घेतला.

"बक्षी बोलता! क्या काम है?"

"आपुन को वो गॅलॅक्सिवाले चंद्रशेखर के बॉडी का पता है!"

बक्षी पुतळ्या सारखा स्तब्ध झाला. ते पाकीट जर विकीने घेतले नसेल तर, अजूनही चंद्रशेखरच्या बॉडी वरल्या कपड्यांच्या खिशात असणार होते!

"पता बता!"

"इस टीप का क्या देता?"

"तू जो मांगे! पहिले बॉडी देख लुंगा! बाद मे किंमत मिलेगी!"

पीटर घुटमळला. नाहीच पैसे दिले तर? रिस्क होती आणि ती, तो पैशा साठी घेणार होता.

पीटरने आपल्या गोडाऊनचा पत्ता सांगितला. गोडाऊनच्या दारा समोर उभे राहायचे. आधी एक लाख मागायचे आणि, काकू करू लागला तर, किमान पन्नास हजार तरी घ्यायचेच! त्या शिवाय गोडाऊनची किल्ली द्यायची नाही! असा विचार करून त्याने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातला, गोडाऊनची किल्ली नेहमी याच खिशात असायची, ती हाती लागत नव्हती! कोठे गेली? बरोबर सकाळी त्या मणक्याला दिली होती, ती त्याच्या कडेच आहे!

पीटर बराचवेळ माणिकला हुडकत होता. पळाला कि काय? तो कसा भेटणार? तो तर भिवंडीच्या त्या सिसिडे कडे जात होता! 'सात वाजे पर्यंत या, डुलत-डुलत!' हे मोबाईलवर बोलतानाचे वाक्य पीटरचा कानात घुमले. साला सातनंतर येईल! पीटरल फक्त एकच भीती होती कि, बक्षी माणिक नंतर पोहंचला आणि त्या पूर्वी चंद्रशेखरचे प्रेत माणिकने तेथून हटवले तर काय करायचे? त्या साठी त्याला माणिकशी झगडावे लागणार होते! आणि तो त्यासाठी तयार होता!

०००

राजेंच्या अखत्यारीत सौरक्षण खात्याने एक छोटासा सेल उभा केला होता. बक्षी भारतात येणार याची कुणकुण लागलेलीच होती. बक्षीला जिवंत पकडता आले तर, अतिरेक्यांची बरीचशी माहिती समजणार होती. आणि त्याची तयारी म्हणून, 'बक्षी' संदर्भातल्या सर्व मोबाईल फोन्स, इंटरनेटस मेसेजस, इमेजेस या सेलच्या सर्व्हरला फीड होणार होते. २४/७ यावर, तज्ञ लक्ष्य ठेवून होते!

आणि पीटरने बक्षीला केलेला फोन यातून सुटला नव्हता!

*******