Mehendichya Panaver - 8 - last part in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा)

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा)

२६ मार्च
गेल्या दोन चार दिवसांत विशेष असे काही घडले नाही. स्टुडीओमध्ये राज दिसतो, पण त्याच्या चेहर्‍यावर मला माझ्यासाठी काळजीच दिसली आणि जी मला आज्जीब्बात आवडली नाही.

मला अशी कोणी किव केलेली आज्जीब्बात आवडत नाही. कदाचीत ’तु नही तो और सही’ नाही म्हणता येणार मला, पण म्हणुन मला इतकं नको रे लाचार करुन टाकुस की आरश्यासमोर उभे राहील्यावर माझ्याच नजरेला मी नजर नाही देऊ शकणार!

२७ मार्च
टळटळीत दुपारी खिडकीतुन खाली बघत बसले होते. निष्पर्ण झालेली झाडं, पानगळतीमुळे कचरामय झालेले रस्ते, तुरळक वाहतुकीत वेगाने जाणार्‍या वाहनांच्या मागोमाग उडणारी धुळ आणि पानांची रांग, जागो जागी दिसणारे उसाच्या रसांची गुर्‍हाळ उन्हाळ्याची चाहुल देत होते. तर आकाश्यात मधुनच एखादा डोकावणारा काळा ढग पाउसाचे अमिष दाखवत होता.

हाताची नखं कुरतडुन संपली, छातीशी कवटाळुन घेतल्याने गुडघ्यांना रग लागली तशी तंद्री भंगली. खिडकीत ठेवलेला मोबाईल व्हायब्रेट मोड्वर असल्याने खुर्र खुर्र करत होता. आशुचा फोन होता. हॅलो म्हणायच्या आधीच मॅडम गरजल्या – ’आधी टि.व्ही लाव, नंतर बोलु’

’क्लासीक राज’ ह्या नविन अल्बमद्वारे ’राज’चे क्लासीकल क्षेत्रात पदार्पण. पंडीत अदीराज आणि राज ह्यांचा क्लासीक संगीतावर आधारीत नविन अल्बमची घोषणा

बातमी ऐकुन क्षणभर आश्चर्य वाटले खरे. राज आणि अचानक क्लासीकल मध्ये म्हणजे.. अर्थात त्याची गायकी आहे तशी, पण आजपर्यंत कधीच नव्हता आणि आज अचानक हा बदल? विचार करतच होते तेवढ्यात आशुचा फोन आला..

’ऐकलीस बातमी??’
’होss मग त्यात काय एवढं. त्याने क्लासीकल करु नये का?’
’अगं बाई. कुठला चॅनल लावला आहेस? काहीतरी पांचट चॅनल बघत असशील, तो दुसरा दाढीवाल्याचा लाव.. बोंबलत असतो ना तो.. त्याच्यावर त्याने निधीची प्रतिक्रिया विचारली होती आणि माहीते ती काय म्हणाली? ती म्हणे फार नाराज आहे ह्या बद्दल राजवर आणि त्यामुळे म्हणे तिची इमेज खराब होते आहे. ’रॉक-स्टार निधी आणि पंडीत राज’ छ्या.. ही काय जोडी आहे का म्हणे..’
’.. मग?..’
’अगं मग काय? देव करो आणि त्यांची जोडी फुटो. दोघं वेग-वेगळे झाले ना, तर तुझा मार्ग मोकळाच की गं..’

तेंव्हा कुठे माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आशु म्हणते ते खरं आहे.. पण त्या न्युज चॅनलवर कित्ती विश्वास ठेवायचा? काय वाट्टेल त्या बातम्या देत असतात. एकदा काय तर म्हणे ’स्वर्गात जायचा रस्ता सापडला’, तर एकदा काय ’यु.एफ.ओ. ने भारतातल्या गाई-म्हशी उचलल्या’

क्षणभर, माझी मलाच लाज वाटली.. कुठल्या थराला गेले आहे मी.. केवळ स्वार्थासाठी राज आणि निधीची एंगेजमेंट तुटावी, दोघं ही वेगळे व्हावेत असं वाटण्याइतपत का मी स्वार्थी झाले आहे???

२ एप्रिल
एखाद्या रोमांचक, धक्कादायक बातम्या जितक्या चविने पहाणार नाही तितक्या आतुरतेने गेले काही दिवस टी.व्ही. पुढे बसुन होते. येणारी प्रत्येक बातमी, मग टी.व्ही वर असो की पेपरमध्ये नजरेखालुन घालत होते. मिडीयाला काय असल्या ब्रेक-अपच्या बातम्या हव्याच असतात त्यामुळे त्यांनीही अगदी पिच्छा पुरवला होता. परंतु ठोस असे काहीच हाती लागले नाही. सगळ्या बातम्या अश्या हवेतल्याच वाटत आहेत.

८ एप्रिल
’स्टोन क्लब’ मध्ये संध्याकाळी पार्टी आहे, तुझी वाट बघतोय नक्की ये, अगदी मोघम असा राजचा एस.एम.एस मोबाईलवर सकाळी झळकला. खरं तर जायची इच्छाच नव्हती पण घडत असलेल्या प्रकारांबद्दल माहीती काढण्यासाठी तरी निदान जावं असा विचार करुन जायचा बेत पक्का केला आहे, बघु काय होते आहे ते..

२९ एप्रिल
डीअर डायरी,

मिस्ड यु सोsss मच. इतक्या कल्पनेपलीकडच्या घटना घडल्या मध्ये की खरं तर अजुनही मी जमीनीवर नाहीच आले बघ. पण तुला सांगावेच लागेल आता आणि कदाचीत ह्यानंतर आपली भेट कधी होईल.. कुणास ठाऊक. तु मला खरंच खुप जवळची होतीस, आहेस.. पण आता त्याहुनही जवळंच मला कोणी तरी भेटलं आहे आणि त्यासाठी सर्व वेळ दिल्यावर तुझ्यासाठी किती आणि केंव्हा वेळ देऊ शकेन खरंच सांगता येणार नाही.

असो, ८ एप्रिल, ’स्टोन क्लब’ मध्ये मी गेले. पार्टी बरीच मोठी होती. अर्थात का होती, कश्यासाठी होती, असल्या फंदात मी सहसा पडत नाही, आणि ह्यावेळेसही पडले नाही. आमच्या क्षेत्रात पार्ट्यांना कारणं लागत नाही हेच खरं नाही का?

माझा पांढरा रंगाचा तो गाऊन घातला होता. आरश्यात जेंव्हा मी स्वतःला पाहीले ना, खरंच सांगते माझा मलाच हेवा वाटला!! किती क्युट दिसत होते मी, पण त्याच वेळेस वाटलं, राज जर नाही झाला माझा तर उपयोग काय ह्या सौदर्याचा!

पार्टीला गेले.. जरा उशीरानेच. ’स्टोन क्लब’ विवीध रंगांच्या लहान-मोठ्या दिव्यांच्या मंद प्रकाशांनी न्हाऊन निघाला होता. पार्टी-थिम स्ट्रेंजर्स मास्क ची होती त्यामुळे जबरदस्तीनेच खरं तर मला तो विचीत्र मास्क घेऊन जावा लागला. ऑरेंज ज्युस विथ अ स्मॉल शॉट ऑफ टकीला घेउन कोपर्‍यात बसले होते तेवढ्यात एक उंच उमदा मास्क घातलेला तरूण समोर येउन उभा राहीला

’मिस्स.. डान्स करणार माझ्या बरोबर?’ आपला हात पुढे धरत म्हणाला..
मला खरं तर डान्स वगैरे म्हणजे.. जरा अहम्म अहम्म.. पण त्याच्या आवाजातला तो आकर्षुन घेणारा आवाज मला थांबवु शकला नाही आणि मी नकळत माझा हात पुढे केला.

खुप्पच छानसे एक इन्स्ट्रुमेंटल संगीत वाजत होते. संध्याकाळच्या त्या रम्य वातावरणात हवेतील गारवा आपले काम चोख बजावत होता. टकीला शॉट डोक्यात हलकेपणा आणत होता. नकळत माझी पावलं त्या तरूणाबरोबर थिरकत होती. त्याने हलकेच त्याचा हात माझ्या कमरेभोवती विणला आणि मला जवळं ओढले..

’राज?.. मी त्याच्याकडे बघत पुटपुटले..’
त्याच्या चेहर्‍यावर एक खट्याळ हास्य फुलले…

मी दचकुन इकडे तिकडे पाहीले. त्याने एक बोट त्याच्या ओठांवर ठेवुन मला जवळ ओढले. तो ’टकीला शॉट’ खाडकन उतरला होता.

’आय लव्ह यु…’, हलकेच तो पुटपुटला
मला हलकेच ते शब्द ऐकु आले..कदाचीत नसते सुध्दा ऐकले जर माझं त्याच्याकडे लक्ष नसते तरं.. पण त्याच्या ओठांच्या हालचालीवर कदाचीत तो हेच बोलला असावा असा मी अंदाज बांधला..

’राज.. हे बघ..’
’आय.. लव्ह.. यु…’ तो अलगद माझ्या कानांच्या जवळ आला आणि जणु शब्द नव्हे तर हलकीशी हवा हे शब्द माझ्या कानात फुंकुन गेली
’राज.. निधी…’
त्याने मला एक गिरकी घेऊन गोल फिरवले आणि नकळत एक बोट नाचत असलेल्या गर्दीतील एका जोडप्याकडे केले..

निळा गाऊन घातलेली एक तरूणी आणि तिच्याबरोबर तिच्या अंगाला खिळुन नाचणारा पांढर्‍या वेशातील एक तरूण

’तिला तिचा जोडीदार मिळाला आहे डीअर, एका क्लासीकल पंडीतजीबरोबर राहुन ती तिची इमेज खराब करु इच्छीत नाही..’ राज कुजबुजला..

’राज कदाचीत ते एक आकर्षण असेल, ती पुन्हा तुझ्याकडे कश्यावरुन येणार नाही?’

’नाही येणार, क्लासीकल एक कारणं आहे निधीसाठी..मी निर्माण केलेले, खरं तर ती त्या आधीच माझ्यापासुन दुर गेली होती..’

’ओह आय एम सॉरी..’

’आय एम नॉट..’ राज हसत म्हणाला..

’पण आहे कोण तो?..’

’राजने आपला हात हलकेच हवेत हलवुन त्या तरूणाला इशारा केला’

’करण???’ मी जवळ जवळ ओरडलेच..

’श्शु..ssss हळु.. आपण त्याला आज्जीब्बात ओळखत नाही बरं..’ राज हलकेच हसत हसत म्हणाला.. त्याच्या प्रत्येक वाक्यागणीक त्याची माझ्याभोवतालची पकड अधीक मजबुत होत होती. मी त्याच्या जवळ.. अजुन जवळं ओढले जात होते..

’म्हणजे..??’ मला तर काहीच कळत नव्हतं काय चालले आहे ते.

’करण.. करण मित्तल.. कोट्याधीशाचा पोरगा.. आठवते आपल्याला तो काय म्हणाला होता? तो कुठल्याही पोरीला पटवु शकतो. बरोबर???’

’बरोबर..’ गोंधळलेली मी म्हणाले..

’बस्स.. तेच त्याने केले..निधीला पटवुन.. निधीला त्याने अशी काही मोहीनी घातली आहे की निधी माझ्यापासुन कधी दुर जाऊन त्याच्यात अडकली तिचे तिलाच कळाले नाही. आणि त्यात मी निर्माण केलेले हे कारण.. बस्स.. सगळे जिग-सॉ पझल्स.. बरोब्बर जागेवर बसले.. तुला आठवतं मध्ये मी गायब झालो होतो? मी तेंव्हा करणलाच शोधत होतो आणि त्याच्या मदतीनेच तर हे सर्व रचले आहे.’

’पण, निधी त्याला आवडली आहे का?’

’काय फरक पडतो? काही दिवस आणि नंतर तो देईल तिला सोडुन’

’आणि मग?’

’..मग काय? तो पर्यंत फार उशीर झाला असेल..’

’उशीर? कसला उशीर??’

’.. तो पर्यंत आपले लग्न झालं असेल स्ट्युपीड!!’

लग्न??? माझ आणि राजचं लग्न? स्वतःशीच, स्वप्नात मी हे कित्तीवेळा पाहीले असेल, त्यावर विचार केला असेल, पण हे सर्व सत्यात उतरत असताना मात्र त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता.

मी स्वतःशीच हसत होते, नकळत राजला घट्ट बिलगत होते..’लग्न!! माझं आणि राजचं लग्न..’ नकळत स्वतःशीच बडबडत होते..

’ओ वेडाबाई, जागे व्हा आता, बास झाली स्वप्न. स्वप्न आता सत्यात उतरत आहेत…’ राज मला कवेत घेत म्हणाला होता.

डायरी, आज माझ्याकडुन तुला ही भेटवस्तु. ही मेहेंदीची पान! ज्या पानांवर माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक आणि रोमांटिक गोष्टीं लिहीलेल्या, ठसलेल्या आहेत. हीच मेहेंदीची पान डायरीमधील पानांना ताजं ठेवतील, सुगंधीत ठेवतील..

गुड बाय..आणि सी.यु.. नॉट सो सुsssन!!

[समाप्त]