Made for each other - 3 in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | मेड फॉर इच अदर - ३

Featured Books
Categories
Share

मेड फॉर इच अदर - ३

कसे बसे स्वतः कडच पाणी पुरवत शेवटी गडावर पोहोचले. तिथल्या काही लोकांनी वर पाण्याची टाकी आहे असं सांगितल. मग काय स्वारी निघाली टाकी शोधायला. चालून चालून पाय चांगलेच थकले होते आणि आता जवळचं पाणीही संपत आलेल. इकडे तिकडे शोधल्यावर त्यांना एका ठिकाणी टाकी दिसली पण आजु बाजुचा परिसर अस्वच्छ दिसत होता. गाईज टाकी तर आहे पण आजु-बाजूचा परिसर किती अस्वच्छ आहे." मनस्वी आजूबाजूला बघत बोलली.




पण जवळच पाणी संपल्याने त्यांच्याकडे दुसरा ऑपशन ही नव्हता.. मग काय आमिर आणि मानस त्या टाकीच्या जवळ जाऊन पाणी आपल्या बॉटल मध्ये भरू लागले. मग वर येऊन तिघांनी पाणी पिल. पण पाणी स्वच्छ आणि गोड होत, त्यांना वर आल्याचा फायदा झाला. ऊन उतरायला लागल्यावर निघु अस ठरवुन ते तिथेच बसले. काही वेळाने आजूबाजूचं निसर्ग बघत तिघे निघाले परतीच्या प्रवासाला. खाली येऊन ट्रेन पकडुन ठाण्याला पोहोचले. ठाण्यावरून एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही आपापल्या घरी परतले.



दुसरा दिवस रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस कालच्या प्रवासाने तिघेही आज मनसोक्त आराम करत होते. आज मनस्वीच्या घरी कछान बेत होता. दुपारची झोप घेऊन संध्याकाळी ती घरच्यांसोबत गप्पा गोष्टी करून झोपायच्या तय्यारीला लागली. कारण सुट्टीचा दिवस संपला होता. निद्रेच्या स्वाधीन होऊन ती दुसऱ्या दिवशी भेटण्यासाठी सज्ज झाली..


आज मनस्वी आणि आमिर लवकर आलेले.., पण अजून मानस काही आला नव्हता. मनस्वीला कस तरी वाटल काही तरी राहिल्यासारख. काम करत असतानाच तिचा लक्ष नकळत मेन डोअरकडे गेला आणि ती बघतच राहिली.

मेन डोअरमधून मानस ने एन्ट्री घेतली होती. आज तो हाफडे ने आला होता.
मानस आज कमालीचा हँडसम दिसत होता. लाईट ऑरेंग कलरचा प्रिंटेड शर्ट, खाली ब्लॅक ट्राउजर. क्लीन शेव केलेली दाढी. चेहऱ्यावर आलेला ग्लोव. मनस्वी बघतच राहिली त्याला एकदाही नजर न हलवता. तो आपल्या जागेवर जाईपर्यंत. त्यालाही ते जाणवल तसा तो गालात हसत, पण शांतपणे आपल्या जागेवर जाऊन बसला. सगळे आज त्याला चिडवत होते. "आज काही खास आहे का..?? मुलगी वैगेरे बघायला जातो आहेस की काय..??" हसतच प्राची मॅमनी विचारलं. सगळे मिळून आज त्याची खेचत होते. नेहमी तो खेचत असतो आज सर्वांना चांगलाच चान्स मिळालेला. लंच टाइम मध्ये मनस्वी ने खुणेनेच छान दिसतो आहेस अस सांगितल. त्यानेही नजरेनेच थँक्स यु म्हटलं. ही नजरेची भाषच वेगळी असते नाही. न बोलता कळते समोरच्याला.



असेच गप्पा गोष्टी करत दिवस जात होते.. पावसाळा जवळ येत होता. पावसाळा आला की निघतात त्या पावसाळी ट्रिप्स. सर्व कुठे जायचं यांचे प्लान करू लागले. प्राची मॅम ने मुंबा देवीला जाऊ अस सुचवलं सर्वांनी होकर कळवला. दुसऱ्या दिवशी प्राची मॅम त्यांचे मिस्टर, मनस्वी, मानस, ऐवढेच तय्यारी करून आलेले बाकीच्यांनी मात्र टांग दिली होती. मग काय चौघेजण निघाले. खुप दिवसापासून मनस्वीला मानसला काही तरी सांगायचे होते.., पण मन काही तय्यार होईना. आपल्या अशा बोलण्याने तो आपला मित्र ही नाही राहिला तर.., याची तिला राहून राहुन भीती वाटत होती. पण नाही सांगितल तर मनातच राहुन जाईल असही तिला वाटत होत. शेवटी तिने मुंबा देवीचं दर्शन झाल्या वर सगळं सांगायच ठरवल. देवीचं दर्शन पार पाडून चौघेजण कड्यावरून खालील निसर्ग न्याहाळत बसले होते.


मनात काही ठरवुन मनस्वीने मानसला हाक मारली. "मानस ऐक ना.., मला तुझ्याशी बोलायच आहे जरा. आपण बाजूला जाऊया का....??" अस बोलत तिने विषय काढला. "हा चल. प्राची मॅम आम्ही आलोच हा बोलुन.." "बोला मॅडम काय काम काढलं..??" आणि हो परवानगी काय घेतेस बोल बिनधास्त.." "तस नाही रे जरा खाजगी बोलायच आहे म्हणून विचाराल." "अच्छा बोल.., काय खाजगी बोलायच आहे तुला.

To be continued