Love stories - Premveda - 2 in Marathi Love Stories by Hemangi Sawant books and stories PDF | लव्हस्टोरी - प्रेमवेडा - २

Featured Books
Categories
Share

लव्हस्टोरी - प्रेमवेडा - २

२0 फेब्रुवारी , शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा दिवस. मी देखील त्या दिवशी लवकर तय्यारी करून शाळेत निघालो, शाळेत पोहोचताच मित्रांना भेटुन, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात व्यस्थ झालो. सर्वजण छान नटून थटून आलेले. सर्व पटांगण मुला-मुलींनी भरलेलं होत... सहजच म्हणून नजर गेटकडे गेली आणि ती दिसली...ती...

तिने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती, आपल्या सोनेरी केसांचा गोल असा आंबोडा घालून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला होता. पानेरी नयनात काजळाची हलकी लकीर ओढली गेलेली, अनं त्या गुलाबांच्या पाकळी सारख्या ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक अजुन शोभुन दिसत होती.. नाकात नथ घातलेली आणि कपाळावर लावलेली चंद्रकोर अजुनच तिच्या सौंदर्यात भर घालत होती..
अशा तिच्या सौंदर्ययाने मी तिच्याकडे एकटक बघत राहिलो.. अगदी ती डोळ्यासमोरून दिसेनाशी होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मोहित झाल्यागत...आज पहिल्यांदाच कोणी तरी एवढं मनापासून आवडल होत...

तिला बघण्यात मी एवढा गुंतलेलो की शाळेच्या घंटीने माझं ध्यान तुटलं.. आजूबाजूला बघितलं पण कोणीच नव्हतं,मित्र देखील कधीच वर्गात निघून गेलेले. मी एकटाच पटांगणात उभा होतो. शेवटच्या घंटेचा आवाज कानावर पडला आणि मी पळतच वर्गात पोहोचलो आणि आपल्या जागे वर जाऊन बसलो.

बाई वर्गात आल्या आणि त्यांनी सूचना देण्यास सुरुवात केली. माझ्यावर सूत्रसंचालनाचं काम सोपवण्यात आलं होत, माझ्या सोबत माझ्याच वर्गातली मुलगी मला त्यात मदत करणार होती. आम्ही त्याची तय्यारी करण्यात मग्न झालो आणि मी काही वेळासाठी का होईना तिला विसरलो...
पण काहीच वेळासाठी बर का!..कारण ती पुन्हा दिसली ती सभागृहात, तिच्या मैत्रिणी सोबत... ती आणि तिच्या मैत्रिणीं एक नृत्य सादर करणार होत्या,आणि त्याच्याच संदर्भात त्या बोलत होत्या कदाचित,... मी त्यांना दुरुनच बघत उभा राहिलो. तीच हसन,वागणं, बोलण यातच मी हरवुन गेलेलो..

तर हा असा आपला अमु..साधा सरळ मनाचा पण तिला बघून मात्र त्याला काही तरी झालं होतं.. 'ते नाही का चित्रपटात होत ना तसचं काहीस..तसा साधा असला तरी सर्वांशी मिळुन मिसळून राहणाऱ्यातला होता. जरी कमी बोलका असला तरीही एकदा मैत्री केली की, आयुष्यभर सात देणारा असा हा अमु. असो तर त्या कार्यक्रमात अस काय झालं की अमु तिच्या म्हणजेच आपल्या पियूकडे आकर्षित झालेला बघु.....

हळु हळु सगळा सभागृह मुलांनी आणि पालकांनी भरुन गेला. पुढच्या खुर्च्यांवर शिक्षक आणि मागे मुलं व त्यांचे पालक बसलेले. मग मी आणि माझ्या सह-सूत्रसंचालीकीने कार्यक्रमाला सुरुवात केली.. आम्ही वरीष्ठ शिक्षकांना व प्रादयापकांना दिप प्रज्वलित करण्यास स्टेजवर यायचे आमंत्रण दिले. मग दिप लावून गणेशाचं वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली...

मी आणि माझी सह-सूत्रसंचालिकेने सर्वांचे अभिनंदन करून बसण्यासाठी विनंती केली. सर्वजण जागेवर बसले तसे आम्ही पुढील कार्यक्रम सादर करू लागलो. आधी एक नृत्य सादर करण्यात आलं ज्यामध्ये गणेशाची स्तुती करण्यात आली होती... मग एक एक करुन नृत्य, एकांकिका, एकपात्री असे वेगवेगळ्या वर्गातील मुल-मुली सादर करत होते..

मी मात्र आतुर होतो ते तिच्या सादरीकरणासाठी...! ती आणि तिच्या मैत्रिणी स्टेजच्या मागे सराव करत होत्या; त्यातील एकीने तीच नाव घेतलं आणि सर्व सराव करू लागल्या... तेव्हा मला कळलं की तीच नाव प्रिया आहे.

प्रिया... किती गोड नाव नाही!! कोणालाही आवडेल असचं नाव होतं तीच आणि ती देखील. मी तिच्याकडे बघण्यात गुंतलोच होतो की माझ्या सह-सूत्रसंचालिकेने येऊन मला हाक मारली. लगेच भानावर येत मी तिथुन पळतच स्टेज वर गेलो आणि पुढील कार्यक्रम सुरू केला. शेवटचा ग्रुप हा नववीतल्या मुलींचा होता. आम्ही नाव घोषित केलं,आणि त्यांच नृत्य सुरू झालं...

या कार्यक्रमामुळे का होईना मला तिचं नाव आणि वर्ग कळला होता; त्यामुळे मी बाईंचे मनापासून आभार मानले. मला तिला समोरून बघायच होतं आणि तिच नृत्य देखील म्हणून मी खास तिच्यासाठी खाली जाऊन उभा राहिलो. गाण सुरु होताच त्यांनी नाचायला सुरुवात केली, खुप छान सादरीकरण झाल; कदाचित..!!कारण मी तिलाच बघण्यात व्यस्त होतो म्हणून बाकीच्यांना मी बघितलंच नव्हतं..,असो टाळ्यांच्या आवाजावरुन तरी चांगल झालेलं सादरीकरण...

शेवटी निरोप समारंभ आटपून आम्ही घरी जाण्यास निघालो. मी वर्गात जाऊन बॅग घेतली आणि लगेच तिचा वर्ग गाठला; पण ती तर तिच्या वर्गात नव्हतीच. सगळीकडे शोधलं पण ती काही दिसलीच नाही;' माझी स्वप्नसुंदरी'....
असाच हताश नजरेने मी गेट कडे वळलो आणि समोरच्या रस्त्यावर माझी नजर गेली...ती आणि तिच्या मैत्रिणी वडापाव खाताना दिसल्या. तिला बघून तर माझा जीव भांड्यातच पडला. स्वताशीच पुटपुटत मी म्हणालो, नशीब दिसली ही...

नंतर तिच्या मैत्रिणींना बाय करून ती घरी जायला निघाली;मग मी पण तिच्या मागे तिचा पाठलाग करत निघालो. ती स्वतामध्येच गुंग होती आणि मी तिच्यात...आम्ही तिच्या सोसायटी मध्ये आलो, आता बोलालं एकत्र कसे!..एकत्र नाही काही ती पुढे व मी मागे असेच आलो. ती मागे वरून बघणारच की तिच्या आईने तिला हाक मारली व ती तशीच घरात निघून गेली,माझा जरा हिरमूस झाला खर पण, तिच्या आई ला बघुन मी लगेच तिथुन पळ काढला....



घरी जाताना स्वताशीच बोलत निघालो... काय अमु काय चाललंय तुझं..? आज आपण पुर्ण दिवस तिलाच बघत होतो नशीब त्या कार्यक्रमामुळे कोणी काही बोलाल नाही पण जर कोणाला कळलं असत तर खैर नव्हती... पण काही बोला काय सुंदर होती ती अगदी एखाद्या परी सारखीच....पण आपण तिच्या मागे काय करत होतो काही कळलं नाही?? आणि आपली सायकल कुठेय?? अरे देवा म्हणजे सायकल शाळेतच राहिली; म्हणूजे आज आईचा ओरडा खायला तय्यार राहावं लागेल. चलो भागो अभी.....

अस म्हणत हा आपला अमु पळतच त्याच्या सोसायटीच्या दिशेने निघाला. त्याची सोसायटी ही तिच्या सोसायटी पासून ४ ते ५ सोसायट्या सोडून होती.. धावतच तो घरी आला. घरात पाय ठेवतोच की आईच्या प्रश्नाना त्याला समोर जावं लागलं...

आई: काय अमु बाळा, आज उशिर झाला यायला तुला???

अमु: अग ते स्नेहसंमेलन होत ना म्हणुन जरा उशीर झाला. त्यात आपला सागर त्याला बाईंनी थांबवुन घेतलं मग काय मी पण थांबलो जरा वेळ म्हणुन उशीर झाला, आणि त्यात मी माझी सायकल पण विसरलो....

हे असं होत प्रेमात पडलेल्या मुलांचं.. आपला अमु गेला कुठे होता; आणि सांगतोय काय आपल्या आई ला,,...कधी नव्हे ते अमु आईशी खोट बोलत होता.,पण करणार काय, दिल जो दे बैठा था, अपने पियू को।.... प्यार मे सब कुछ जायस होता हें।... असो...

आई: बरं बाळा, उद्या घेऊन ये हा सायकल... मग कसा झाला स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम???

अमु: अगं आई काय मस्त झाला म्हाहितीये का!!? नृत्य, एकांकिका सगच खूपच सुंदर सादर केलं सर्वांनी. खुप मज्जा पण केली आम्ही ...



to be continued....