Bara jyotilinge - 2 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | बारा जोतीर्लींगे भाग २

Featured Books
  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 8

                     మనసిచ్చి చూడు - 08మీరు టెన్షన్ పడాల్సిన అవస...

Categories
Share

बारा जोतीर्लींगे भाग २

बारा जोतिर्लिंग भाग २

सौराष्ट्रातील सोमनाथ

शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वांत पवित्र तीर्थ मानलं जातं ते सोमनाथ.
सोमनाथचं विधीप्रमाणे प्रथम दर्शन घेऊनच पुढील ज्योतिर्लिंगं पाहावीत असा संकेत आहे.
हे मंदिर १६ वेळा उध्वस्त करण्यात आलं होतं व परत बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं.
गुजरातमध्ये सौराष्ट्रात वेरावळ बंदरावर वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे एक महत्त्वपूर्ण हिंदू मंदिर आहे देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमद् भागवत गीता, शिव पुराणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाचा महिमा वर्णिला आहे.
सर्व ज्योतिर्लिगातून सोमनाथ येथील मंदिराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. सोमनाथ मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध व धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथील मंदिराच्या प्रांगणात दररोज रात्री साडेसात ते साडेआठ या एका तासासाठी साऊंड एंड लाईट शो चालतो. याद्वारे सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचे सचित्र वर्णन पर्यटकांसमोर केले जाते. एका कथेनुसार या ठिकाणीच श्रीकृष्णाने देहत्याग केला होता. यामुळेच या क्षेत्रास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरस्वती नदीच्या काठावर मुळ मंदिराच्या जवळच सरदार पटेल यांनी नवीन मंदिर बांधलेले आहे. जवळच असलेल्या एका तळघरामध्ये मुळ लिंग जतन करून ठेवले आहे.
संस्थान खालसा करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा आदेश दिला. १२ नोव्हेंबर १९४७ रोजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते जीर्णोद्धार संपन्न झाला. ’ सोमनाथ’ हे पहिले ज्योतिर्लिंग. गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रांतात प्रभास पाटण येथे असल्यामुळे सोमनाथ सौराष्ट्र या नावावरुन त्यास सोरटी सोमनाथ हे नाव मिळाले.
एके काळी भारतातील सर्वांत मोठे, अत्यंत पवित्र व फ़ार श्रीमंत देवस्थान अशी याची प्रसिध्दी होती. सोमवती अमावस्या व ग्रहण या वेळी येथे मोठी यात्रा भरते.
सोमनाथ लिंग कसे निर्माण झाले याविषयी कथा...
फ़ार प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होऊन गेला.
त्याला सत्तावीस मुली होत्या.
त्या सर्व मुलींचे चंद्राशी लग्न झाले.
त्या सत्तावीस जणीत जी रोहीणी होती ती चंद्राला फ़ार आवडत असे.
ती त्याची लाडकी होती.चंद्र फ़क्त रोहीणीवरच प्रेम करीत असे.
यामुळे इतर बायका दुःखी झाल्या.चंद्र त्यांच्याशी बोलतसुध्दा नसे.
दक्ष राजाला हे समजले. तो दुःखी झाला.तो चंद्राला म्हणाला ,"चंद्रा, तु थोर कुळात जन्मास आला आहेस. तेव्हा तु तुझ्या सर्व बायकांवर सारखेच प्रेम कर."
दक्ष राजाने असे सांगितले खरे,पण चंद्राने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही.तो आपला फ़क्त रोहीणीवरच प्रेम करु लागला.
आपल्या उपदेशाचा काहीच उपयोग झाला नाही हे पाहून दक्षाला चंद्राचा राग आला.त्याने चंद्राला शाप दिला,

तु माझे ऎकले नाहीस म्हणून तुला क्षय होईल." दक्षाने शाप देताच चंद्राला क्षयरोग झाला.
त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. सगळे देव घाबरले.
आता यावर उपाय काय करायचा हे विचारण्यासाठी सर्वजण ब्रम्हदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रम्हदेव म्हणाले," समुद्रकाठी शंकराची आराधना करा. तेथे शिवलिंगाची स्थापना करा, म्हणजे शंकर प्रसन्न होईल व चंद्राचा रोग जाईल."
सर्व देवांना खूप दिवस तप केल्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले.
चंद्राचा क्षयरोग गेला.त्याला त्याचे तेज मिळाले. जेथे चंद्राने शिवलिंग स्थापन केले होते तेथे त्याने मंदिर बांधण्याचे ठरविले.
ब्रम्हदेवाने त्याला मदत केली. चंद्राने स्थापन केलेल्या ठिकाणी ब्रम्हदेवाने जमीन उकरली. तेथे एक स्वयंभू शिवलिंग दिसले. ते मध व दर्भ यांनी झाकलेले होते.
ब्रम्हदेवाने त्यावर एक शिला बसविली व त्यावर एक मोठे शिवलिंग बसविले. चंद्राने त्याची पूजा केली. हेच सोमनाथ ज्योतिर्लिंग.
सोमाचा म्हणजे चंद्राचा क्षयरोग ज्याने नाहीसा केला ते शिवलिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंग.
श्री सोमनाथाचे हे देवस्थान भारतातील अत्यंत संपन्न आणि वैभवशाली असल्याने मुसलमान राज्यकर्त्यांनी अनेक वेळा स्वा-या केल्या अन् देवस्थानाची लूट तसेच नासधूस केली. मुसलमानी आक्रमणांमध्ये अनेकदा श्री सोमनाथाचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांपैकी बहुतेक आक्रमणे गझनीच्या महंमदाच्या इ.स. १२९८ मधील आक्रमणापर्यंतच्या कालखंडातील आहेत.
तेथील अगणित संपत्ती शत्रूने लुटली होती. शत्रूने अनेकदा स्वार्या करून उद्ध्वस्त केलेले हे मंदिर नंतर परत परत बांधण्यात आले.
इ.स. ७२२ मध्ये सिंधचा सुभेदार जुनायर याने आक्रमण करून येथील संपत्ती लुटली. इ.स. १०२५ मध्ये चुंबकाच्या चमत्कृतीपूर्ण कौशल्यामुळे अधांतरी असलेली श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने फोडून मूर्तीचा विध्वंस करून सुमारे १८ कोटींची लूट केली. इ.स. १२९७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने अलाफखानकरवी या देवस्थानाचा विध्वंस केला.
इ.स. १३९० मध्ये मुजफरशहा याने, इ.स. १४७९ मध्ये महंमद बेगडा याने, इ.स. १५०३ मध्ये दुसरा मुजफफरशहा याने आणि नंतर धर्मवेड्या औरंगजेबाने इ.स. १७०१ मध्ये सर्वत्र नासधूस करून अनेकांची कत्तल केली आणि अलोट संपत्ती लुटून नेली.
१९ व्या शतकात झालेल्या भयानक भूकंपामुळेही मंदिराची अतोनात हानी झाली. जरी धर्मद्रोह्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, तरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता नष्ट झाली नाही.
मुसलमान देशद्रोह्यांनी केलेल्या विध्वंसामुळे ज्योतिर्लिंगाचे अतोनात नुकसान झाले होते. इ.स. १७८३ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी श्री सोमनाथाचे नवीन मंदिर बांधले.

सध्या अस्तित्वात असलेले मंदिर हे भारताचे माजी पंतप्रधान व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाले आहे. सातव्या वेळेले हे मंदिर बांधण्यात आले असून ते कैलास महामेरू प्रसाद शैलीत बनविले गेले आहे. हे मंदिर गर्भगृह, सभामंडप आणि नृत्यमंडप या तीन प्रमुख भागांमध्ये आहे. याच्या शिखरावरील कलशाचे वजन दहा टन आहे. ध्वजाची उंची 27 फूट आहे.

क्रमशः