अघटीत भाग ९ 
 
 नाश्ता टेबलवर नाश्ता करताना क्षिप्राने खुप आनंदी असल्याचा आव आणला होता .
 कारण बाबा बरेच काही बोलत होता ...त्याचे बरेचसे बोलणे तिच्या कानावर फक्त पडत होते .
 मनात मात्र विचारांची गर्दी होती .
 आई दोनतीन वेळ म्हणाली सुद्धा ...”अग नीट खा ना लक्ष कुठाय तुझे ?..
 खोलीत फोन सायलेंट वर ठेवला होता पण त्यावर गौतमचे कॉल असणार ही तिला खात्री होती .
 सर्वांचे आवरल्यावर ड्रायव्हरने सर्वांचे सामान गाडीत नेऊन ठेवले .
 सर्वजण बाहेर पडताना वरदा कुलूप लावायला घेणार इतक्यात क्षिप्रा म्हणाली 
 “आई थांब थांब माझा मोबाईल घरातच राहीला आहे .
 “ये पटकन ....
 बाबा गाडीत जाऊन बसलाय बर का ..
 हो आलेच असे म्हणुन क्षिप्रा खोलीकडे गेली ..
 गौतमचे तब्बल चोवीस मिस्ड कॉल होते त्यावर ..
 तिने पटकन नंबर डायल केला ...थोडा वेळ रिंग वाजत राहिली ..
 नंतर फोन उचलला ..गौतम खुप चिडला होता .
 इतक्या वेळा फोन करून तिने फोन उचलला नव्हता आणि मेसेजला उत्तर पण देत नव्हती .
 क्षिप्राने त्याची मनधरणी केली आणि घडलेला प्रकार सांगितला 
 तो ऐकुन गौतम आणखीन भडकला त्याने आजचे सगळे पर्फेक्ट प्लानिंग केले होते 
 आणि आता हीचा नकार आला होता ..
 “तु माझ्याशी बोलु नकोस आता असे म्हणून त्याने फोन कट केला.
 तेवढ्यात आई आत आली ..”अग  आम्ही बाहेर वाट पाहतोय आणि तु इथे खुशाल फोनवर बोलत थांबली आहेस “आता आई पण रागात होती .
 काहीही उत्तर न देता क्षिप्रा मुकाट्याने बाहेर गाडीत जाऊन बसली .
 आता तिचे डोके दुखायला लागले होते .
 या गौतमची समजुत काढणे हा एक मोठा बिकट प्रश्न झाला होता .
 इकडे तर घरच्या लोकांच्या सोबत असल्याने ती जास्त काही करू शकत नाही .
 प्रवास मस्त चालला होता  ..गाणी ऐकत गप्पा मारत सगळी चालली होती .
 क्षिप्रा फक्त हो नाही इतकेच बोलत होती ...नंतर तिनेच सांगितले की तिचे डोके दुखते आहे .
 आईने दिलेली गोळी घेऊन ती शांतपणे डोळे मिटून पडून राहिली .
 यापेक्षा आता एखादी सिगारेट मिळाली असती तर बरे झाले असते असे तिला वाटले .
 फार थोड्या काळात तिला खरेच सिगारेटचा नाद लागला होता .
 सध्या तरी डोके दुखत चा बहाणा असल्याने फोन वापरता येत नव्हता आणि आई तर शेजारीच बसली होती .
      हॉटेलवर पोचल्यावर मात्र ती आधी खोलीत जाऊन पडली .
 बाबाला भेटायला त्याचे काही मित्र त्यांच्या बायकांच्या सोबत आले होते.
  त्यांचे रात्रीच्या जेवण्याचे प्लान्स चालु होते.
 बराच वेळ गप्पा चालल्या होत्या.
 त्या अवधीत क्षिप्राने गौतमला भरपुर मेसेज केले .
 तो वाचत होता पण रिप्लाय करीत नव्हता .
 शेवटी रात्री तुला व्हीडीओ कॉल करेन असे सांगितल्या वर एकदाचा त्याचा रिप्लाय आला .
 वाट पाहतो.....
  इतकाच ...
 रात्री तिने जेवायला यायला नकार दिला आणि इथेच थोडे खाऊन झोपते असे सांगितले .
 बाबाला थोड वाईट वाटल ती आजारी पडली म्हणुन
 पण ठरलेला बेत तो रद्द करू शकत नव्हता.
 सगळेजण जेवायला बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात क्षिप्राने रूमचे दार बंद केले आणि गौतमला 
 फोन लावला ..
 ताबडतोब गौतमचा रिप्लाय आला ..ये व्हिडीओ कॉल वर ..
 क्षिप्राने व्हिडीओ कॉल सुरु केला ..
 गौतमला बघुन ती खुष झाली पण संकोचली कारण तो अर्धवट कपड्यावर बेडवर झोपला होता .
 तोंडात सिगारेट होतीच ..
 क्षिप्रा थोडीशी संकोचली आणि त्याचे उघडे भरदार शरीर पाहुन थोडी अस्वस्थ झाली .
 परत कधी येणार आहेस आता पुढला प्लान कसा करूया वगैरे ठरवत असताना गौतमचे लक्ष स्लीवलेस नाईटी फ्रॉक घातलेल्या क्षिप्राच्या मादक शरीराकडे गेले .
 आता त्याने फर्माईश केली क्षिप्राला पूर्ण नग्न पहायची .
 हे ऐकुन क्षिप्रा चकित झाली ..”अरे हे काय मागणे तुझे ..काहीतरी नको हं ..”
 आई बाबा केव्हाही यायची शक्यता होती 
 असे म्हणले तरी गौतम ऐकायला तयार नव्हता ..
 मग प्रत्यक्ष भेटीत्त गौतमचे सर्व ऐकले पाहिजे या अटीवर तडजोड झाली .
 मात्र आता निदान हाफ नेकेड तरी तिला पहायची इच्छा गौतमने दर्शवली
 क्षिप्रा नाही म्हणुच शकली नाही आणि तिने आपल्या छातीवरचा निम्मा फ्रॉक खाली काढला .
 तिचे गोरेपण  तजेलदार शरीर आणि सुडौल बाहू ..
 तसेच ब्रा मध्ये घट्ट बसलेले तिचे अर्धवट बाहेर आलेले स्तन पाहताच गौतम बेहोष झाला .
 कधी एकदा हे सारे आपल्या ताब्यात येईल असे त्याला वाटले ..
 क्षिप्रा खुप संकोचली होती ..त्याच्या विरोधाची पर्वा न करता तिने परत आपला फ्रॉक अंगात घातला ..  
  मग गौतमने तिला सांगितले तो काही दिवस बाहेर जातोय .
 आला की तो तिला कळवेल मग मात्र तो जो प्लान करेल तो तिला ऐकायला लागेल .
 याला क्षिप्राने मंजुरी दिली ..आणि फ्लायिंग किसेस देऊन फोन बंद केला .
 नंतर दोन दिवस आई बाबाची नजर चुकवून चाट सिलसिला सुरु होता  .
 अधून मधून गौतम तिला सेक्सी व्हिडीओ पाठवत होता .
 ती पण टौयलेट मध्ये जाऊन ते बघत होती .
 दोन दिवस सगळे भरपूर फिरले बाबाने तिच्यासाठी भरपुर काही काही घेतले .
 क्षिप्राने पण आपली मनस्थिती आई बाबा पासुन लपवायचा प्रयत्न केला .
 आणि ते दोन दिवस पार पडले एकदाचे ...!! 
 
 क्रमशः