sher - 3 in Marathi Adventure Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | शेर (भाग 3)

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

शेर (भाग 3)

मागील भागावरून पुढे.......


" मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. " शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई , हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या स्वभावात बसत नव्हते..

" बरं, ठीक आहे... पण लागलेच तर मला सांग मी पण येईन.."

" बाबा मी काही तिथे लग्नाची बोलणी करायला जातं नाही.. तिच्या मनाचा जरा अंदाज घेईन.. मग पुढे बघू..."

" ह्म्म्म..."

त्या नंतर पुढचे काही दिवस असेच गेले.. शनिवारी त्याने तिला फोन केला. उद्या तो येतोय हे कळवण्यासाठी. पण तिचा फोन लागतं नव्हता.. त्याने तीन चार वेळा प्रयत्न केला. पण नाही. फोन लागला नाही...

असे कां व्हावे... तो विचार करू लागला.. तिला फोन लागला नाही तर तिच्या घरी जाणे रद्द करावे लागणार होते. कारण त्याला तिचा पत्ता माहित नव्हता.. हा एक मोठा प्रॉब्लमच झाला होता. विचार करता त्याला तिच्या शॉप वर जायची आयडिया सुचली . तिथे ति आणी तिचा पत्ता नक्की मिळेल हे त्याला माहीत होते.
विचार पक्का होताच त्याने तिच्या शॉप वर जायचे ठरवले. शॉप वर त्या दिवशीची स्त्री होती.

" नमस्कार..." त्याने तिला म्हंटले.

" नमस्कार... आज तुम्ही ईकडे कसे ? आज शॉप बंद आहे." तिने त्याला ओळखले होते.

" बंद आहे ? कां ?"

" थोडे रिनोव्हेशन करायचे होते म्हणून शॉप बंद ठेवले आहे. त्यामुळे सगळ्यांना सुट्टी दिली आहे."

" ओह...मी सुकन्या आहे कां बघायला आलो होतो. खरं तर तिने मला घरी बोलावले होते. पण तिचा फोन लागतं नाही. म्हणून मी ईकडे आलो होतो मला वाटले ती शॉप वर भेटेल.."

" तिचा पत्ता आहे का तुमच्या जवळ ? " क्षणभर थांबून त्याने विचारले.

" आहे, पण तुम्हाला कसा काय देऊ शकते.. ? हां आता जर ती बोलली असती तर गोष्ट वेगळी होती."

तिचे उत्तर ऐकून त्याचा चेहरा उतरला.. काय बोलावे तेच त्याला सुचेना...

" ठीक आहे मी नंतर भेटीनं तिला..." असे म्हणून तो वळून चालू लागला..

" अहो..." तिने मागून आवाज दिला..
" नाराज झालात काय ?" तिने विचारले. आणी तो थांबला.

" सुकन्याचा फोन आला होता. तिचा फोन बिघडला आहे. म्हणून तिला वाटलेच होते कि तुम्ही फोन लागतं नाही म्हंटल्यावर इथे याल म्हणून तिने तिचा पत्ता दयायला सांगितले आहे. " ती मंद हसत म्हणाली. त्याने वळून पाहिले. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव होते.

" थांबा... मी आणूंन देते..." ती पुढे म्हणाली.

एखाद मिनिटात त्या स्त्री ने त्याला तिचा पत्ता दिला.

नाराज होऊ नका मी जरा गंम्मत केली..

" नाही नाराज नाही झालो मी... " शेखर कसबसा हसत म्हणाला.

" असं... ! पण तुमच्या कडे बघून तसे वाटले नाही. " ती डोळे बारीक करत म्हणाली..

" हा..हा.. हा .... बर येऊ... " त्याने तिचा निरोप घेताना विचारले..

" बरं..."

" तुम्ही पुण्याच्या का हो..? " शेखर ने जाता जाता सहज विचारले...

" अय्या... तुम्हाला कसे कळले ? " तीने चकित मुद्रेने विचारले.

त्यावर त्याने आपले खांदे उडवले आणी तो वळून चालू लागला.

त्याने तिचा पत्ता एकदा नजरेखालून काढला.. दुसऱ्या दिवशी त्याला तिच्या घरी जायचे होते..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिच्या भागात रस्त्यावर इस्माईल ने गाडी उभी केली. पत्ता विचारला तर तो खुप आत होता. आणी गाडी काही आत जाऊ शकत नव्हती.. म्हणून त्याने इस्माईल ला घरी जायला सांगितले..

" सर... मी थांबतो ना..." त्याच्या स्वरात काळजी होती. इतक्या मोठ्या माणसाला एकटे सोडण्याची त्याची तयारी नव्हती.

" इस्माईल ,.... मला कदाचित वेळ लागणार आहे. तु कशाला उगाचच थांबत बसतोस. त्या पेक्षा घरी जा ...संडे आहे शबाना आणी मुलांना घेऊन फिरायला जा... गाडी घेऊन जा.. हवे तर..."

" पण..." त्याने बोलायचा प्रयत्न केला..

" अहं... जा... आणी हे पण घेऊन जा.. " आपल्या खिशातील ऑटोमॅटिक , फॉरेन मेड पिस्तूल त्याच्या समोर धरत शेखर म्हणाला.

त्यावर नाईलाज झाल्याने इस्माईल ने ते पिस्तूल डॅशबोर्ड मध्ये व्यवस्थित लपवून ठेवले.. आणी तो गाडी घेऊन तो परत फिरला.. शेखर आता तिचा पत्ता घेऊन त्या वस्तीत शिरला... काहीवेळ शोधाशोध करून तो शेवटी तिच्या दारासमोर उभा होता.

" अय्या... तुम्ही... मला वाटले कि तुम्ही दुपारी याल.. " त्याला बघून सुकन्या आनंदाने म्हणाली..

" खरं तर दुपारीच येणार होतो.. पण काही कामामुळे जमले नाही... म्हणून मग.... मी आत येऊ कि ?...." त्याने विचारले..

" ओह सॉरी... मी विसरलीच... यां ना ... आत या..."

" आई... ! शेखर सर आलेत...." तिने तिथूनच आई ला हाक मारली... ते ऐकून तिची आई बाहेर आली. नमस्कार वैगरे झाल्यावर..

" तुम्ही दोघे बसा गप्पा मारत मी पटकन जेवणाचे बघते..."

"'आहो.... नको... त्यापेक्षा तुम्ही पण बसा इथे गप्पा मारू.."
शेखर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.

" काही नाही... पटकन होईल.. आज पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. असेच कसे जाणार.. सुकन्या तु गप्पा मारत बस त्यांच्या जवळ.म्हणजे ते बोर होणार नाहीत.. " आईने सांगितले आणी आत किचन मध्ये निघून गेली.

" सुजाता दिसत नाही...?"

" ती तिच्या एका मैत्रिणीला भेटायला गेली आहे. हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून..."

" सुजाता सांगत होती... तुमच्या मित्राने त्या दिवशी दोन जणांना गोळ्या घातल्या.."

" माझ्या मित्राने? " अचानक शेखर बोलून गेला.. आणी मग त्याच्या लक्षात आले कि त्या दिवशी गोडाऊन मधून तो सुकन्याशी शेखरचा मित्र म्हणून बोलला होता..

" आच्छा... ते होय... काही नाही. कधी कधी असे करावे लागते. त्यांना मारले नसते तर त्यांच्या जागी माझा मित्र मारला गेला असता.. स्वतःचा जीव वाचवणे सगळ्यात महत्वाचे...." तो सावरत तिला सांगू लागला..

नंतर दोघात खूप अवांतर गप्पा झाल्या मध्ये मध्ये आई येऊन त्याच्या गप्पात भाग घ्यायची... तिच्याशी बोलल्यावर तर शेखर अजूनच तिच्या प्रेमात पडला...

काही वेळानी सुजाता आली . तीने शेखर ला पाहिले आणी कोण असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर पडला. ती आधी शेखर ला भेटली होती. पण तेव्हा शेखरच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यामुळे आता त्याला ओळखणे तिला शक्यच नव्हते..

" शेखर सर ," सुकन्यांनी ओळख करून दिली.

" नमस्कार सर " त्याचे नाव ऐकताच ती खुश झाली. त्याच्या मुळे आज ती आपल्या परिवारात सुरक्षित परत आली होती ह्याची तिला जाणीव होती.

" कुठे गेली होतीस? म्हणजे आताच हे प्रकरण झाल्यामुळे तुझे असे एकटे फिरणे धोक्याचे आहे म्हणून बोललॊ... " शेखर म्हणाला.

"'एका मैत्रिणीला बघायला हॉस्पिटल ला गेली होती. खूप वाईट अवस्था आहे.."

" काय झालेय तिला...?"

" काही नाही... मादक पदार्थ आणी काय ?"

"'काय ?"

" हो.. आमच्या कॉलेज ला त्याचा खुप सुळसुळाट आहे. कोणी आवाज उठवला तर त्याला मारतात.. प्रिन्सिपल ने त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा अपघात घडवून आणला.. चार महिने हॉस्पिटल ला होते.."

" असं... कोणते कॉलेज ?"

" सेंट.थॉमस कॉलेज... दादर..."

" ह्म्म्म...." शेखरच्या डोक्यात नवीन प्रकरण पिंगा घालत होते.
" पण तु काळजी घे... उशिरा प्रयन्त बाहेर राहू नकोस..प्रत्येक वेळी दैव साथ देईल असे काही नाही.." तो तिला समजावत म्हणाला..

"'त्या दिवशी आम्ही चालत आलो म्हणून हे घडले.. पैसे वाचवायला गेले आणी ..."

" तुमचे मुलींचे असेच असते.. नको तिथे पैसे वाचवायला जाता आणी मग हे असं होऊन बसते..." त्याच्या बोलण्याने सुजाताचे डोळे पाणावले.. कोणत्याही क्षणी ती रडायला सुरवात करेल अशी वेळ होती..

" शेखर सर , तिने असे मुद्दाम केले नाही... आमची परिस्थिती सध्या काही ठीक नाही.. बाबा गेल्या पासून माझ्या एकटीच्या पगारावर घर चालते आहे.. त्यात हिचे शिक्षण , आईची औषधे , घरचा खर्च... सगळे एका पगारात बघायचे म्हणजे तारेवरची कसरत... म्हणून शक्य असेल तिथे आम्ही पैसे वाचवतो ते नंतर गरजेच्या वेळी कामाला येतात.. " सुकन्या हळू आवाजात स्पष्टीकरण देत म्हणाली.

" ओह... सॉरी... मिस. सुकन्या..."

" प्लिज मला मिस बोलू नका.. नुसते सुकन्या म्हणालात तरी चालेल..."

" मग तुम्ही मला सर.. सर म्हणताय ते..."

" अहो मी तुम्हाला कसे असे.. अरे तुरे करू शकते... ते मला शक्यच नाही..."

" बरं सुकन्या... एक काम करा तुम्हाला मी नवीन जॉब ऑफर करतो.. चांगला पगार मिळेल शिवाय राहण्यास घर पण मिळेल..."

" नाही त्याची काही गरज नाही... मला जॉब आहे ना..."

" अग...पण... त्यात तुमची खुप ओढाताण होतेय. त्यापेक्षा मी ऑफर करत असलेल्या जॉब मध्ये सगळ्या फेसिलीटीज आहेत."

" बघते आईला विचारून..."

" बरं... हे माझे कार्ड... ह्या पत्त्यावर जाऊन फक्त हे कार्ड दाखव आणी माझे नाव सांग... तुला जॉब मिळून जाईल.."

" बरं..." त्यानंतर आईने जेवण झाले असल्याची घोषणा केली.. आणी सगळे जेवायला बसले.साधे शाकाहारी जेवण होते पण अतिशय रुचकर खूप दिवसांनी तो असे जेवण जेवत होता. हसत खेळत त्यांची जेवणे चालू होती.

" भाजी कशी झाली आहे... " आईने विचारले.

" छानच झालीय.."

" सुकन्याने केलीय.. तिला कारले खुप आवडते.."

" अरे वा... खूपच छान झालीय... खूप दिवसांनी असे साधे , रुचकर जेवण जेवतोय.. " तो खरं खरं म्हणाला.

मध्येच वरणाचा टोप घेताना वरण हिंडकळले आणी काही त्याच्या भारी वाल्या शर्टावर उडाले..

" अग बाई... डाग पडला... जेवल्यावर शर्ट दया मी पटकन धुवून देते.. नाहीतर डाग जाणार नाही." आई कळवळून म्हणाली.

" असू दया ओ... काही नाही.. " असे किती तरी शर्ट आहेत के जे मी सहा सहा महिने घालत नाही असे बोलणे त्याच्या तोंडावर आले होते पण ते त्याने गिळून टाकले.

जेवल्यावर त्या तिघी समोर त्याचे काही एक चालले नाही त्याला शर्ट काढून द्यावा लागला.. आणी शर्ट काढल्यावर पुढे काय घडणार आहे ते त्या बिचाऱ्याला अजिबात माहित नव्हते.. त्याने शर्ट काढताच सुजाताच्या डोळ्यात एकदम चकित भाव आले. पण शेखरचे तिकडे लक्षच नव्हते. सुकन्या त्याच्या कमावलेल्या शरीराकडे मधूनच एक चोरटा कटाक्ष टाकायची ते बघून त्याला अगदी मेल्या सारखे झाले.. काही वेळातच त्याचा शर्ट धुवून इस्त्री करून त्याच्या समोर आला.. त्याने तो पटकन अंगावर चढवला. डाग गेला कि नाही हे पण त्याने बघितले नाही...

काही वेळ गप्पा मारून त्याने तिघीचा निरोप घेतला.

" एक विनंती आहे... " त्याने दरवाज्यातून बाहेर पडल्यावर आईला सांगितले...

" हा... बोला ना..."

" मला आता इथून बाहेर जाण्याचे समजणार नाही. अंधार पण झालाय..."

" ओह... सुकन्या ह्यांना रस्त्यापर्यंत सोडून ये बाळ... " आईला त्याची अडचण समजली होती. त्याच्या सारखा मोठा माणूस कदाचित पहिल्यांदाच अश्या गल्या गल्या पार करत त्यांच्या घरी आला होता.

" चला " सुकन्या पायात चप्पल चढवत म्हणाली.. आणी दोघे चालू लागले.

गप्पा मारत दोघे हळू हळू चालत रस्त्यावर आले.

" आज तुम्ही कार नाही आणलीत ? " इकडे तिकडे बघत तिने विचारले.

" आणली होती. पण उशीर होईल म्हणून परत पाठवून दिली. आज संडे पण आहे ना... ड्राइव्हर ला पण घरच्यांन बरोबर वेळ घालवायला नको कां? म्हणून..."
ती त्याच्या त्या कृतीने अजून भारावली. नाहीतर जास्त करून पैशेवाल्याना खुप माज असतो. पण हा तर ड्राइव्हर चा पण विचार करत होता.

" टॅक्सी.. " त्यांने हात केला. तशी एक टॅक्सी घेऊन एक सरदार त्यांच्या जवळ उभा राहिला..

" बरं.. येऊ..?"

" ह्म्म्म..."

" मी काय ऑफर दिली आहे त्यावर नक्की विचार कर.. आणी जेव्हा पण तुला वाटेल तेव्हा ये... मी असलो नसलो तरी काहीही फरक पडत नाही. फक्त कार्ड दाखव तुझा जॉब पक्का .."

" असे बोलू नका... देव करो तुम्हाला खुप आयुष्य लाभो..." ती पटकन म्हणाली.. त्याचे असे बोलणे तिला पसंद पडले नव्हते.

" साब चलें क्या ?"

" ओय.. सरदारजी.. रुक ओये..."

" हवं तर मी बोलू कां आई शी ?"

" नको.. मी बोलते."

" बघ.. जमले तर एकदा येऊन जा ऑफिस ला बघ तिथे कसे वातावरण आहे. मग हवेतर निर्णय घे..."

" बघते.. फोन करीन मी आधी..."

" ठीक आहे..." तो टॅक्सीत बसला.

" नेपन्सी रोड.... चलो.." त्याने सरदारजी ला इशारा केला..

त्याच्या बंगल्यासमोर येई पर्यंत शेखर सुकन्याचाच विचार करत होता.

" साब.. कहा पे...?" सरदार ने विचारले तसा तो भानावर आला.

" हा.. वो आखरी वाला.." शेखरने त्याला सांगितले.

बंगल्या जवळ उतरून त्याने मिटर न बघता पाचशे रुपये काढून सरदार ला दिले.

" कीप द चेंज... " म्हणून तो डुलत डुलत बंगल्यात शिरला.. सरदार त्याच्या कडे डोळे फाडून पाहत होता. दीडएकशे रुपयाच्या बिल च्या बदल्यात साडे तीनशे टीप... !

बाळु ने त्याला पाहिले आणी जेवायला वाढायला सुरवात केली.

" बाळु मी जेऊन आलोय... सॉरी तुला सांगायला विसरलो... तुम्ही जेऊन घ्या आणी झोपा..." त्याच्या जिभेवर अजून कारल्याच्या भाजीची चव रेंगाळत होती ती त्याला घालवायची नव्हती. शेखरने त्याला सांगितले आणी तो वर आपल्या रूम मध्ये निघून गेला..


इकडे सुकन्या आणी सुजाता झोपायची तयारी करत होत्या.

"'दीदी... तु एक गोष्ट नोटीस केलीस ? "आईचा कानोसा घेत सुजाताने हळू आवाजात विचारले. आई आत किचन मध्ये आवराआवर करत होती.

" काय ग..? " सुकन्याने न कळून तिला प्रतिप्रश्न विचारला.

" दीदी त्या दिवशी आम्हाला सोडवायला आलेल्या माणसाच्या दंडावर पण अशीच जखम झाली होती. जशी आज शेखर सरांच्या दंडावर होती."

" म्हणजे ? तुला नक्की काय म्हणायचे आहे ?"

" मला वाटते दीदी तो माणूस आणी शेखर सर एकच असावेत.. काही कारणाने ते आपली ओळख लपवत आहेत."

" चल , असे काही नसेल..."

" अग.. खरंच... मी स्वतः त्यांच्या जखमेवर माझी ओढणी फाडून बांधली होती. मी कशी चूक करीन.." सुजाता हट्टाने आपले बोलणे रेटत म्हणाली.

" काय चालले आहे ?" आईने येत विचारले.

" काही नाही शेखर सरांबद्दल बोलत होतो.."

" जास्त त्यांच्या पुढे पुढे करू नका... मोठी माणसे आहेत ती.. कधी मूड बदलेल सांगता येणार नाही..."

" चल आई !... असे काही मला शेखर सर वाटले नाही.. " सुजाता म्हणाली.

" सुजाता... जास्त बोलू नकोस... मी बोलतेय बस्स तेव्हडे ऐकायचे. मला ह्यावर जास्त चर्चा नकोय...." आईने शेवटचा खिळा ठोकला. आणी विषय संपवून टाकला...



दुसऱ्या दिवशी शेखर ने सगळ्यांना बोलावले आणी त्यांना सेंट. थॉमस कॉलेज बद्दल सांगितले.. आता त्या ड्रॅग माफियांचे काउन्ट डाऊन चालू झाले होते.

" सगळी खबर काढा.."

" संध्याकाळ पर्यंत सगळी खबर काढतो..." गफूर म्हणाला..

"'छान.. सारंग तयार राहा तुला लवकरच हात मोकळे करायला संधी मिळणार आहे.." ते ऐकून सारंग खुश झाला.

संध्याकाळी सर्व माहिती त्याच्या पुढ्यात होती.

" पास्कल नावाचा एक माणूस ह्या सगळ्या मागे आहे. " गफूर माहिती देत होता.

" मूळचा गोव्याचा आहे.. पण काही वर्षापूर्वी मुंबईत आला. खूप साऱ्या कॉलेज मध्ये त्याचे ड्रग्ज जातात.. त्यातून खुप सारा पैसा त्यांनी मिळवला आहे . वर पर्यंत ओळख आहे. त्यामुळे सहसा कोणी त्याच्या नादाला लागतं नाही. ह्या धंद्या बरोबरच तो मुली सप्लाय करण्याचा धंदा पण करतो. ज्या मुलींना ड्रग्ज हवे आहेत पण पैसे नाहीत त्यांना हा कस्टमर कडे पाठवतो त्यात त्या मुलीला आणी ह्याला खूप पैसे मिळतात.."

" ह्म्म्म... मागे प्रिन्सिपल ला पण ह्यांनी अपघात घडवून आणला होता. ते खरे आहे कां ?"

" हो .. खरे आहे. पण वरून दबाव आला म्हणून ती केस अपघात म्हणून नोंद केली गेली आहे पण ते हेतूपुरस्कर करण्यात आले होते ह्यात काही शंका नाही."

"'मग लागा तयारीला उद्या पासून आपण त्यांच्या मागे लागू.. पाहिले आपण कॉलेज ला ऍडमिशन घेऊ.. म्हणजे कोणाला काही शंका नको.. विनू तु त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल ची डिटेल्स काढ आपण त्याला घरी जाऊन भेटू.. त्याला नीट समजावता येईल.."

दुसऱ्या दिवशी सारंग , विनू , शेखर प्रिन्सिपल लिमयें कडे निघाले. रस्त्यावरच त्यांची बिल्डिंग होती त्यामुळे शोधायला अजिबात त्रास झाला नाही...

सारंग सारखा आडदांड माणूस सोबत घेऊन गेलो तर कदाचित लिमयें दरवाजाच उघडणार नाही अशी भीती शेखर ला होती. म्हणून मग फक्त विनू आणी शेखर दोघेच त्यांच्या घरी गेले . डोर बेल वाजवली.

" कोण हवय ? " एका स्त्रीने दरवाजा उघडला.

" लिमयें सर... आहेत कां ?" अतिशय गोड आवाजात शेखर ने विचारले.

" अहो.... बाहेर बघा कोणी आलय..." त्या बहुतेक सौ. लिमयें असाव्यात. कोण आलाय ते बघायला लिमयें अक्षरशः टॉवेलवरच बाहेर आले. नुकतीच त्यांची अंघोळ झाली होती. त्यांची गोल गरगरीत प्रकृती बघून विनू कसेबसे आपले हसू दाबत होता.

" सर , मी. मला तुमच्याशी ऍडमिशन संदर्भात बोलायचे होते." शेखर सगळी सूत्रे आपल्या हाती घेत म्हणाला..

" कॉलेज ची कामे कॉलेज मध्ये इथे नाही...." लिमयें म्हणाले. पण त्यांचा तो बायकी आवाज आणी त्याच्या विसंगत असलेली शरीरयष्टी बघून आता विनू स्वतःला रोखू शकला नाही. एक हलका हास्याचा फवारा त्याच्या तोंडून बाहेर आलाच.. आणी ते बघून लिमयें भडकले बहुतेक त्यांना ह्या प्रकारची सवय असावी.

" चला चालते व्हा आता... दरवाज्यात आलेल्या सगळ्यांना चहापाणी देण्याची रीत नाही आमची..." लिमयें सॉलिड भडकला होता.

" पण सर माझे ऐकून..... " पण त्याचे वाक्य पूर्ण होण्या आधीच लिमयांनी दरवाजा त्यांच्या तोंडावर बंद केला...

" शीट यार... साल्या तुला जरा वेळ हसू दाबता येत नव्हते... " शेखर विनू वर घसरला...

"'आता मी काय करू... झालेला प्रकारच असा होता कि मला राहवलेच नाही.... त्याला मी काय करू ?"

" चल आता दुसरा काही मार्ग शोधावा लागेल. हा लिमयें काही परत आपल्याला उभा करणार नाही..."

दोघे हसत परत कार जवळ आले.. त्या दोघांना हसताना बघून सारंग ला काय झाले तेच कळेना....

"'काय झाले रे...? " सारंग ने उत्सुखतेने विचारले.

" रेड्या.... तुझा लहान भाऊ होता तिथे... आणी गंमत अशी कि त्याचा आवाज एकदम बायकी होता... हसून हसून मला नको झाले.."

" काय बोलतो... पण ऍडमिशन चे काय झाले ?"

" झाले असते रे... पण हा अगदी नको तिथे हसला ना.... फिस्कटले सगळे... लिमयांनी हाकलून लावले आम्हाला... " शेखर पण हसत म्हणाला..

" मग आता..?"

" आता डाइरेक्ट घुसायचे.... चला .. इस्माईल गाडी दादर सेंट. थॉमस कॉलेज ला घे..."

आणी थोड्यावेळानी तिघे कॉलेज पासून काही अंतरावर उभे होते.

" विनू तु इथे थांब.. मी आणी सारंग जाऊन बघतो.." मास्क लावत शेखर म्हणाला.. त्याचे बघून सारंग ने पण मास्क लावला. कदाचित आज कॉलेज ला धुमश्चक्री उडण्याची शक्यता होती. त्यात आपल्याला कोणी ओळखु नये म्हणून ही खबरदारी घेणे गरजेचे होते.

" बरं..."

अजून कॉलेज भरायला वेळ होता त्यामुळे जास्त कोणी आले नव्हते. दोघे रमत गंमत कॉलेज गेट वरून पुढे निघाले तसा एक चौकीदार समोर हात कमरेवर घेऊन उभा राहिला..

"'कुठे ? " त्याने दोघांना नीट निरखत विचारले

" आत..." सारंग पण बोलला...


"आत काय तमाशा हाय व्हय...."

"'आईला तमाशा बी असतो.. हे तर एकदम झ्याक झाले... "सारंग त्याची नक्कल करत म्हणाला.

" ए.. गपा.... आयकार्ड कुठे आहे ?"

" आयकार्ड..? तेच तर आणायला जातोय ना.."

" अजिबात नाही... असेच सगळे बोलतात... जेव्हा आयकार्ड असेल ना तेव्हा यायचे... चला आता..." त्या दोघांना हाकलत म्हणाला...
" च्यायला आज काय होतेय जो येतो तो आपल्याला हाकलतो आहे." शेखर वैतागला..

" माझे जरा ऐकून तरी घ्या..." शेखर अजीजीच्या सुरात म्हणाला...

" मला काही ऐकायचे नाही. तो बांबू पाहिला ?... तो असाच ठेवला नाही.. वेळ पडल्यास त्याचा उपयोग करतो मी..." तो त्यांना दम देत म्हणाला... सारंग जोरात पादला तर उडेल कि काय असा तो... त्या दोघांना दम देत होता.. गंमत ना !

" अरे बाबा !...बांबू काय दाखवतो हे बघ..." असे म्हणून सारंग ने त्याच्या खांद्यावर आपला हात टाकला आणी त्याला बाजूला नेत कमरेला लावलेले पिस्तूल त्याला दाखवले.. ते पिस्तूल बघताच त्याची चांगलीच फाटली. त्याचा सगळा माज उतरला....

" हे बघितलेस ...?" सारंग ने विचारले.

" अर...र . मग आधी नाही कां सांगायचे...." सारंगचा मजबूत जाडजूड हात आपल्या खांद्यावरून काढत तो म्हणाला.

" मग आता आम्ही जाऊ ?"

"'जा कि , तुम्हाला कोण अडिवणार ? "

तसे दोघे हसत हसत गेट वरून पुढे निघाले..

" आज सगळे असेच भेटणार आहेत वाटते... " सारंग ने विचारले...

" हा.. सुरवात सकाळी लिमयांनी केली..." दोघे पुन्हा हसू लागले .

" त्याला कसे काय शोधायचे ? कोणाला तरी विचारूया कां ? " सारंग ने विचारले.

" वेडा आहेस कां? असं केले तर आपण त्याच्या जवळ पोचण्या आधीच तो नाहीसा होईल.."

" मग..."

" एक काम करू आपण सुजाताला विचारूया.. ती आता कॉलेज ला निघाली असेल."

" हा... ही आयडिया चांगली आहे."

शेखर ने तिला फोन लावला. ती कॉलेज च्या वाटेवरच होती. त्याने तिला कॉलेज मधील काहीश्या एका बाजूला यायला सांगितले..

" ती येते आहे... दहा पंधरा मिनिटात पोचेल.."

पंधरा वीस मिनिटांनी सुजाता त्यांना शोधात आली.

" सुजाता ! " त्याने हाक मारली... ती जागीच थबकली. कारण तिला सोडवायला त्या दिवशी कोणी भलताच आला होता आणी हे दोघे कोणी भलतेच होते . सावधगिरी बाळगत ती त्यांचा अंदाज घेत होती.

ती अचानक गपकन कां थांबली ते शेखर ला कळले नाही. पण काही क्षणानंतर त्याला कळले कि मास्क मुळे तिने त्यांना ओळखले नाही..

" अग... घाबरू नको.. मी तोच आहे त्या दिवशी तुला गोडाऊन मधून सोडवणारा... " शेखर तिच्या दिशेने चालू लागला तशी ती घाबरून चार पावले मागे गेली.

" खरोखर मीच आहे... ही अशी उलटी सुलटी कामे करावी लागतात मग पोलिसांचे ताप डोक्याला नको म्हणून असे मास्क घालावे लागतात..." तो तिला समजावत म्हणाला..

" मग तुमच्या दंडावर ती जखम अजून असेल ना..?"

" हो आहे ना.."

" मग मला दाखवा म्हणजे मला विश्वास वाटेल.."

आता काही रस्ताच नसल्याने शेखरने आजूबाजूला बघत पटकन आपल्या शर्टाचे दोन बटण उघडले आणी तिला आपली जखम दाखवली. ती बघितल्यावर तिचा विश्वास बसला..

" अग काल शेखर म्हणाला कि तुमच्या कॉलेज ला ड्रॅग माफियाचा खूप त्रास आहे म्हणून म्हंटले बघूया तरी.. आता आम्ही त्यांना कोणाला ओळखत नाही. तु आम्हाला लांबून दाखव.. पुढचे आम्ही बघू काय ते... आता तरी बसला विश्वास ?"

" ह्म्म्म... दैव प्रत्येक वेळी साथ देईलच असे नाही." ती सूचक पणे बोलली

" आता मी बोललेले मलाच ऐकवू नकोस हे तर मी काल तुला बोललो होतो..." अचानक बेसावध शेखर बोलून गेला.

" वाटलेच मला... " विजयी स्वरात ती म्हणाली...

" काल तुमची जखम बघितल्यावरच माझ्या मनात शंका आली होती. आज पूर्ण खात्री झाली.. शेखर सर..." ती म्हणाली आणी शेखर तिच्या तोंडाकडे बघत बसला. तिने त्याला अचूक पकडले होते.

" मी दीदी ला पण काल बोलले होते पण दीदी ला विश्वास बसत नव्हता.."

" अग माझे आई तु सुकन्या ला पण सांगितलेस ? "कपाळावर हात मारीत शेखर ने विचारले..

"'सांगितले होते पण तिला काही ते पटले नाही... असे कसे होऊ शकते... " असे तिचे म्हणणे आहे...

शेखर सुन्न झाला...

" अरे कोणी मला सांगेल कि इथे काय चालले आहे ते? आज आपल्याला धुलाई करायचीं आहे कि नाही...?"

"'तु जरा थांब... आजचे काम आपण उद्या करू.. " जरा विचार करत शेखर ने सारंग ला थोपवून ठेवले.

" तुला आज काही महत्वाचे लेक्चर आहेत कां ?"

" नाही कां ?"

" मग चल माझ्या बरोबर... तुला काही गोष्टी दाखवायच्या आहेत..."

"'बरं ठीक आहे..." ती किंचित विचार करत म्हणाली. तिने एका मैत्रिणीला फोन करून ती परस्पर बाहेर जातं असल्याचे कळवले. त्यात सोबत शेखर सर सोबत आहेत हे सांगायला विसरली नाही . दीदी ला सांगण्यात अर्थ नव्हता.. ती नाहीच म्हणाली असती..

" चला.... पण आता वोचमन सोडणार नाही बाहेर..." ते ऐकल्यावर दोघे जोरजोरात हसायला लागले. तिला काहीच कळले नाही...

" तु चल त्या वोचमन चे हा काय ते बघेल... चल.. " तिला घेऊन दोघे पुन्हा गेट वर आले...मागासचा वोचमन आता पण गेट वर होता..

" येऊ कां... गाववाले..?" सारंग ने मुद्दाम त्याला विचारले.

" उद्या पण येणार हैत कां?"

" हा.. मंजी काम झालं नाय म्हणल्यावर यावंच लागल ना."

" मग मी उद्या पासून सुट्टीच टाकावी म्हणतो.." तो पुटपुटला...

" बरं लिमयेला सांग येऊन गेलो म्हणून"

" कोण आलते म्हणून सांगू?"

" सांग सकाळी त्याच्या घरी फिदीफिदी हसून गेलेत नां ते येऊन गेले..." असे म्हणून सारंग आणी शेखर पुन्हा हसायला लागले... हसतच ते सगळे बाहेर पडले. सुजाताला आश्चर्य वाटले. हा वोचमन खूप कडक होता. पण त्याने पण ह्या दोघांना अजिबात अटकाव केला नाही..

" आता हा कोण ?" तिने विनू कडे बघत विचारले...

" तु काय सगळ्यांनाच संशयाच्या चष्म्यातून बघतेस काय ?" वैतागून शेखर ने विचारले.

" आता माझ्या बरोबर आहे म्हणजे माझाच मित्र असणार ना... हाच त्या दिवशी गोडाऊनला माझ्या बरोबर आला होता. पोलिसांना फोन ह्यानेच केला होता. आणी हा.. हा बाहेर उभा राहून आपल्याला कव्हर करत होता. " शेखर ने तिला नीट समजेल अश्या भाषेत सांगितले.

" तुम्ही दोघे ऑफिस वर या... मी पुढे जातोय.."


पुढील भाग लवकरच........


© सर्वाधिकार लेखकाकडे...