Kadambari - Jeevalga - 10 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी- जिवलगा ... भाग - १०

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

कादंबरी- जिवलगा ... भाग - १०

कादंबरी - जीवलगा ..भाग--१० वा ले- अरुण वि.देशपांडे

----------------------------------------------------

पूर्वसूत्र -आतापर्यंतच्या भागात आपण वाचलेच असेल ..

नेहाचा हा प्रवास , या प्रवासातील घटना आणि प्रसंग , या सगळ्या गोष्टी तिच्या सध्या सरळ रेषेतील आयुष्याला तसे अनेक धक्के देणारे ठरले होते , नोकरीच्या निमित्ताने सुरक्षित अशा पारिवारिक वातावरणात राहून आलेली नेहा ,

एक अर्थाने या नव्या जगाच्या ..वातावरणात समरस न होणारी अशी तरुणी आहे ",असे मधुरीमा ने तिला बोलून दाखवले होते .

मधुरीमाच्या सहवासात , तिच्याशी झालेल्या मैत्रीने नेहाला खूप शिकायला मिळते आहे , कधी कधी नेहाला तिचा हा खटाटोप ,निरर्थक वाटायला लागतो , अशा वेळी दोलायमान झालेल्या नेहाच्या अस्थिर मनाला मधुरिमा सावरून घेते ....त्यामुळेच ,
स्वतःचा विश्वास स्वतःच बळकट केला पाहिजे " ही जाणीव होऊन नेहा ठरवते..

आता आपणच नव्याने सुरुवात करू या...

--------------------------------

आता पुढे ...त्या दिवशी ..बाहेरून आलेल्या नेहाला मावशीने आवाज देत समोर बसायला सांगितले आणि म्हणल्या .

.नेहा - तुला खूप महत्वाचे असे सांगायचे आहे..लक्षपूर्वक ऐक ,
मावशी काय सांगणार ? कल्पनेने नेहा मनातून घाबरून गेली ,

हे घर सोडून दुसरीकडे जाण्यास तर सांगणार नाहीये ना मावशी आपल्याला ?

ती म्हणाली -मावशी ,एकदम इतके अर्जंट ? काळजीचे कारण नाहीये ना ?
नेहाच्या जवळ बसत मावशी म्हणल्या -

अग ,तसे काळजीचे काही एक कारण नाहीये ,सगळ काही ठीक आहे .पण ..

पण काय मावशी ? अधीर नेहाने विचारले ..
मावशी सांगू लागल्या ..

हे बघ नेहा , तू आल्यापासून ,तुला सोडून आम्ही कधी कुठे गेलो नाहीत , त्यामुळे आमची तुला खूप सवय झाली आहे

,पण, आता पुढच्या महिन्यात ..३ महिन्यांसाठी आम्ही युएस मध्ये जाणार आहोत , तिथे तुझी जयादीदी -आमची मुलगी ,आणि तुझा प्रशांतदादा - आमचा मुलगा ,

हे दोघेजण त्यांच्या फमिलीसह तिकडेच स्थायिक झालेले आहेत, त्यांचे इकडे येणे फार सहजतेने होत नसते ,

मग .आम्हीच वर्षातून दोन वेळा तीन महिने तिकडे जाऊन रहात असतो ,त्यासाठीच म्हणून पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च-एप्रिल -मे, हे तीन महिने तिकडे मुलांच्या सोबत राहून आम्ही जून महिन्यात इकडे परत येउत.तोपर्यंत ...तू ...


काय मावशी ? तोपर्यंत मी काय करायचे आहे ? सांगा पटकन ..
नेहाच्या आवाजात झालेला बदल जाणवून मावशी म्हणाल्या .

.नेहा - आम्ही जाणार आहोत ,नेमक्या त्याच महिन्यात मधुरिमा देखील युके मध्ये जाते आहे ..

पण ती फक्त एक महिन्यासाठी जाणार आहे.कालच तिने याची आम्हाला कल्पना दिली , तुला पण सांगणार आहे ती.


मावशीचे ऐकून काय बोलावे ? नेहाला कळतच नव्हते ..ती मावशीकडे पहात राहिली ..
मावशी तिला म्हणाल्या ..

घाबरून जाऊ नकोस नेहा ..तुला एकटीला या मोठ्या घरात राहावे लागणार नाही, ,तुला लेडीज होस्टेल मध्ये राहता येईल ",

मधुरिमा करेन तुला यासाठी सगळी मदत, तिच्या ओळखीचे आहेत काही होस्टेलवाले .

एक महिन्याचा तर प्रश्न आहे , मधुरिमा युके वरून परत आली की , दोघी मिळून या घरात नेहमीप्रमाणे राहू शकाल , नो प्रोब्लेम.


नेहा म्हणाली - काही हरकत नाही.मावशी - एक महिन्याचा तर प्रश्न आहे, राहीन मी एखाद्या होस्टेलमध्ये,तिथे राहून जॉबसाठी पण प्रयत्न करीन .

आणि तुम्हाला ,मधुरीमाला जाण्यास अजून एक महिना अवकाश आहे ,

मला एकटीला राहायची " , सवय व्हावी म्हणून ,मी मधुरीमाला सांगते की ..मला लगेच एखाद्या होस्टेलमध्ये जागा मिळवून दे ,

तुमच्यासमोर मी रुळले तर ,तुम्हाला पण काळजी उरणार नाही. ठीक आहे ना मावशी हे ?


नेहा - माझ्या मनावरचे खूप मोठे ओझे तू हलके केलेस ग बाई, आता मी निवांतपणे माझ्या मुलाकडे आणि लेकीकडे राहून येते .

तीन महिने तर आहे आमचा मुकाम .तू स्वतःची काळजी घे.


नेहा म्हणाली -हो मावशी - तुम्ही आणि काका अगदी निर्धास्त मनाने जाऊन या , आधीची गोष्ट वेगळी होती ,

पण, आता मी तुमच्याकडे आल्यापासून तुमच्यावर माझी जबाबदारी पडली आहे ,म्हणून पाहिल्यासारखे तुम्हाला बिंधासपणे घर सोडून कुठे जाता येत नाही ",

तुमच्या भावनाची जाणीव आहे मावशी मला .खरेच मी खुप लकी आहे , तुमच्यासारखी माणसे माझ्यापाठीशी आहात.


नेहाचे हे असे भावूक होऊन बोलणे ऐकुन मावशींचे मन भरून आले,

नेहा -बेटा ,आम्ही नेहमीच तुझ्या पाठीशी आहोत.काळजी नको करूस.


एक सुचवू का तुला नेहा ? मावशीनी विचारले ..

नेहा म्हणाली - सांगा न मावशी ,काय सुचवणार आहात तुम्ही ?


नेहा तू गावाकडे जाऊन राहतेस का महिनाभर ?

मधुरिमा आली की तू ये परत ,किंवा सरळ आम्ही येईपर्यंत ..तिकडेच रहातेस का ?तुझ्या घरच्यांना छानच वाटेल तू काही दिवस आल्याने.


नेहा म्हणाली -मावशी -तुमचे सुचवणे अगदी बरोबर आहे , पण, मला वाटते,मी ज्यासाठी गाव सोडून,घर सोडून बाहेर पडले आहे ,त्यातले तर मी अजून काहीच केलेले नाही ,

नुसती तुमच्याकडे राहून खाते-पिते आणि वेळ वाया घालवते आहे, नो -नो मावशी ..मी राहीन इथेच ,थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे .

आणि मधुरिमा आहे ना ,माझे सगळे प्रोब्लेम सोडवायला ...


नेहाच्या या खुलाशावर मावशी अगदी निर्धास्त झाल्या, त्या म्हणाल्या ..हो ग हो -नेहा , अगदी बरोबर आहे,

आणि एक सांगू का ," समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जात,मार्ग काढण्यात आपली परीक्षा असते, "


घाबरू नकोस ..धीराने आणि विश्वासाने पुढे पुढे जा तू ..आमचे आशीर्वाद कायम तुझ्यापाठी आहेतच.


हो मावशी - म्हणून तर मी माझ्या मनाची भीती कमी करू शकते आहे .
मधुरिमा आणि मी ठरवू लवकरच ..या पुढे काय नि कसे करायचे ते ..

.------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी- पुढील भागात ..

भाग -११ वा लवकरच येतो आहे ..

कादंबरी - जीवलगा ...

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------