Sher - 2 in Marathi Adventure Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | शेर (भाग 2)

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

शेर (भाग 2)

मागील भागावरून पुढे......



" आज अचानक रविवारी काय काम काढलेस..." दोघांनी आत येत विचारले..

" विनू त्या मुलीचा काही पत्ता लागला कां ? "

" नाही अजून... "

" एक काम कर.. हा फोटो. ही सुजाता आहे. ही पण चार दिवसापासून गायब आहे. तिच्या डिटेल्स मी तुम्हाला दोघांना व्हाट्सअप वर पाठवले आहेत. पटकन तिचा नंबर ट्रेस करा... लास्ट लोकेशन , कधी बंद झाला , परत चालू झाला होता कां वैगरे सगळे शोधून काढा. लगेचच आपल्याला माहिती हवी आहे. "

" ठीक आहे. " विनू म्हणाला आणी उठून गेला..

" सारंग गफूर ला विचारून काश्मिरी लोक आपल्या भागात कुठे उतरलेत त्याचा पत्ता लावायला सांग.. माझ्या अंदाजा प्रमाणे ते मुस्लिम बहुल भागात कुठे तरी असतील.. शोधून काढा... "

" आता कामाला लागतो.. " सारंग पण गेला.

थोडा वेळ विचार करून त्याने एक नंबर लावला..

" बोल आज कशी आठवण झाली ? .. " समोरून आवाज आला..

" एक काम होते... " त्याचा धीरगंभीर आवाज ऐकून समोरील व्यक्तीला त्यातली निकडता कळली..

" बोल ना... "

" तुझे सगळे सोर्स कामाला लाव पण काश्मीर खोऱ्यात काय चालू आहे. म्हणजे नवीन काही मिशन , नवीन काही हालचाली सगळ्याचा रिपोर्ट मला हवा आहे... "

" मिळून जाईल... "

" विश्वास, लवकर हवा आहे. बऱ्याच जणींचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. "

" बऱ्याच जणी ? " विश्वास चमकला...

" हो... तु पाहिले त्या दृष्टीने तपास कर.. मग पुढे मी सांगतो काय करायचे ते... "

" बरं. ठीक आहे...." असे म्हणून विश्वास ने फोन कट केला..

आता काहीसे पुसट चित्र त्याच्या समोर आकार घेत होते. बस काही गोष्टीची खातरजमा झाली कि चित्र स्पष्ट होणार होते. विश्वास बद्दल त्याच्या मनात शंका नव्हती. तो एक धडाडीचा रॉ एजंट होता. पण त्याही पेक्षा शेखर चा खास दोस्त होता. दोघांनी खूप वर्ष एकत्र घालवली होती. कॉलेजच्या जमान्यापासून अन्याय सहन न होणे हा दोघांचा गुण त्यांना एकत्र घेऊन आला होता . कोल्हापूरच्या एका गावातील विश्वास आज एक रॉ एजंट म्हणून कार्यरत होता. शेर बद्दल माहिती असणारा अजून एक माणूस...

दुसऱ्या दिवसापासून त्याला माहिती मिळायला सुरवात झाली. विनू ने सुजाताचा मोबाईल ट्रेस केला. लास्ट लोकेशन मुंबई नाशिक हायवे वर ठाण्याजवळ दाखवत होते. पण नंतर मोबाईल स्विच ऑफ झाल्यावर अजून ऑन झाला नव्हता. गफूर मात्र हात हलवत आला. अंडरवल्ड मध्ये कोणालाही काहीही माहिती नव्हते. गफूर ने खुप खोदून खोदून माहिती काढायचाच प्रयत्न केला पण काहीही माहिती हाती लागली नाही.

" गफूर !.. काहीच कसे हाती लागतं नाही." शेखर ने चकित होऊन विचारले. कारण गफूर ला माहिती मिळत नाही हे जरा कठीणच होते.

" सर, बहुतेक हयात बाहेरची माणसे गुंतली असावीत. इथला एकही माणूस त्यांना सामील नसावा म्हणूनच त्याच्या बद्दल काहीही माहिती हाती लागतं नाही. " गफूर खेदाने म्हणाला. त्यांचे बोलणे चालू होते तो पर्यंत सारंग आला.

" बोल काय खबर..? "

" काही काश्मिरी लोक ठाण्यातील हाजूरी भागात राहिले आले आहेत. साधारण बारा एक जण आहेत. "

" ह्म्म्म.... एक काम कर आपली सगळ्यात चांगली माणसे त्यांच्या मागे लाव. अजिबात हयगय नको... "

" ठीक आहे..." सारंग म्हणाला आणी तो दिवस आणखीन काही न घडता निघून गेला. दुसऱ्या दिवशी विश्वास चा फोन आला.

" हा.. बोल काही खबर मिळाली कां? "

" शेखर.. जैस -ए -मोहम्मद चा एक ग्रुप काही खास कामा साठी बाहेर पडला आहे. कुठे गेला आहे ते काही खास लोकांशिवाय कोणालाच माहिती नाही. पण मी आणखीन खोलात जाऊन तपास केला तर असे लक्षात आले कि ते मुंबई परिसरात असण्याची शक्यता आहे. "

" आले माझ्या लक्षात... विश्वास थँक्स यार... "

" बस काय... आता तु मला थँक्स बोलणार कां ? चल ठेऊ? "

" ह्म्म्म... "

शेखरचे विचार चक्र जोरात धावू लागले. सर्व शक्यता , अंदाज सगळ्याचा विचार तो करत होता. विचारात तो कधी ऑफिस ला पोचला ते कळलेच नाही...

" सर , " इस्माईल ने त्याला हाक मारली..

" अहं... " त्याने एकदा इस्माईल आणी एकदा बाहेर पाहिले.

" हो.. " असे म्हणून तो कार मधून खाली उतरला..

" सदा...! सगळे आले कि माझ्या केबिन ला पाठव... अर्जंट आहे म्हणून सांग... " शेखर केबिन ला निघून गेला.

थोड्याच वेळात सगळे एकेक करून त्याच्या केबिन ला आले.

" आले ना सगळे...? " शेखर ने एक नजर सगळ्यावर टाकत विचारले. सगळ्यांनीच माना डोलावल्या..

" हे प्रकरण माझ्या थोडे थोडे लक्षात येते आहे.. काश्मीर मधून एक अतिरेकी गट मुंबई कडे आल्याची खबर विश्वास ने मिळवली आहे. त्याच प्रमाणे सारंग च्या माहिती प्रमाणे हाजूरी मध्ये काही काश्मिरी आल्याचे सारंग ने शोधून काढले आहे. शबानाच्या माहिती नुसार काही काश्मिरी काही महिन्यापूर्वी गरीब घरातल्या मुलीचा उद्धार करायला शोधत होते.... " शेखर क्षणभर थांबला..

" ह्या सगळ्यातून काय लक्षात येते ?" त्याने एक नजर सगळ्यावर फिरवत विचारले.

" बहुतेक हेच लोक ह्या सगळ्या मागे असावेत.. " विनू म्हणाला.

" बरोबर... त्यांना मुली हव्या होत्या... त्या सध्या सरळ मार्गानी मिळाल्या नाही म्हणून मग बहुतेक त्यांनी हा मार्ग निवडला असावा... "

" पण असे करण्याचे कारण काय ? " सारंग ने डोके खाजवत विचारले.

" तेच तर आपल्याला शोधून काढायचे आहे. जो पर्यंत ते आपल्या हाती सापडत नाहीत तो पर्यंत हे काय गौडबंगाल आहे ते आपल्याला काही कळणार नाही. "

" मग आपण सरळ हाजुरीत घूसूया... सगळ्यांना उचलू चार फटके पडले कि सगळे बाहेर येईल... " सारंग लगेच म्हणाला.

" वेडा आहेस कां ? ते काही साधेसुधे गुंड वाटले कां ? अरे.. ते ट्रेंड टेररिस्ट आहेत.. त्यांच्या कडे अत्याधुनिक शस्त्रे असतील. शिवाय जर हेच लोक मुली किडनेप करण्या मागे असतील तर मुलीनां कुठे ठेवले आहे ते आधी शोधावे लागेल. "

" ऐक रे रेड्या.... प्रत्येक वेळी तुझे चार फटके कामाला येणार नाही समजले... " विनू सारंग ला भडकवत म्हणाला...

" ए... काय म्हणाला... " रेड्या म्हणाल्या मुळे सारंग चिडला होता. सारंग चे असेच होते. त्याचा कायम विश्वास आपल्या ताकतीवर होता. बुद्धीचा वापर करायला शेखर , विनू होतेच कि , मग आपण कशाला आपला मेंदू कामाला लावायचा असे त्याचे प्रामाणिक मत..

" अहं.... इकडे लक्ष दया.." मध्येच हस्तक्षेप करत शेखर म्हणाला...

" मला वाटते त्यांनी मुलींना जवळपास कुठे तरी ठेवले असेल.. विनू एक काम कर भिवंडी पट्टयात खूप गोडाऊन आहेत. जरा चौकशी कर कोणाचे गोडाऊन नुकतेच भाड्यानी दिलेय कां.. आणी दिलेय तर तिथे काय काम चाललेय... "

" बरं... "

" सारंग तु हाजूरी भागात जा... त्या काश्मिरी लोकांवर नजर ठेव.. त्यांच्या प्रत्येक हालचाली आपल्याला कळायला हव्यात... सोबत गफूर ला घेऊन जा.. आणी तयारीने जा.. कदाचित ते शस्त्रसज्ज असू शकतात... "

" बरं... "

" तो पर्यंत मी बघतो आणखीन काही माहिती मिळते कां ? " शेखरने मोबाइल काढत विश्वास ला फोन केला..

" बोल.. " समोरून विश्वासचा चिरपरिचित आवाज आला.

" विश्वास अजून एक काम होते रे... "

" हा..बोलत राहा साल्या तुझे काम करायचाच मला सरकार पगार देते ना..." विश्वास वैतागत म्हणाला..

" बरं मग जाऊदे... " शेखर आवाज पाडत म्हणाला. त्याला पण माहित होते कि त्याचे काम तर विश्वास करणारच पण जरा भाव खात...

" हां... बोल.. बघतो काय करता येते कां ते... "

" अरे त्या टेररिस्ट लोकांचे काही फोटो तुमच्या रेकॉर्ड ला असतील तर पाठव ना... म्हणजे त्यांना शोधायला सोपे जाईल... "

" बरं... थोड्यावेळात पाठवतो... "

" चालेल... मी वाट बघतोय... "

" आता ठेऊ कि आणखीन काही आहे ? "

" सध्या तरी एव्हडे पुरे... नंतर काही आठवले तर सांगतो.. असे म्हणून शेखर ने हसत कॉल कट केला... " त्याला माहित होते आता विश्वास आपल्या नोकरीला मनापासून शिव्या देणार होता.. खरंतर एक रॉ एजंट ला शेखर घरगड्या सारखा राबवून घेत होता. आता त्यांची मैत्रीचं अशी होती की बिचारा विश्वास नाही पण म्हणू शकत नव्हता..

काही वेळानी त्याला आठ फोटो आले... त्याने लगेच ते फोटो विनू , गफूर , सारंग च्या मोबाईल वर फॉरवर्ड केले.
आता जर ते टेररिस्ट असतील तर ओळखायला सोपे जाणार होते. संध्याकाळी सारंग आणी गफूर परत आले.

" काय नवीन..? "

" निश्चित ह्यातले चार जण त्या हाजुरीतील घरात आहेत. त्यांनी वेषांतर केले आहे. पण आम्हाला खात्री आहे कि तेच लोक आहेत.. " गफूर म्हणाला.

" म्हणजे आपण योग्य मार्गांवर आहोत... विनू ची काय खबर ? "

" येईल एव्हढ्यात... " काही वेळानी विनू पण आला..

" ठाणे आणी भिवंडी मधील पट्ट्यात खूप गोडाऊन आहेत आपल्या माणसानी चेक केले दोन तीन संशयास्पद आहेत. "

"'वाटलेच मला... एक काम कर ज्यांनी कोणी ती भाड्याने घेतली आहेत त्यांची डिटेल्स हाती लागली ? "

" हो बरोबरच आणलीय.. "

" मग त्या कंपनीची किव्हा त्या माणसाची सगळी डिटेल्स बाहेर काढा.. काही ना काही भेटेल... "

विनू आपल्या सायबर झोन मध्ये निघून गेला..

" आम्ही काय करू..? " सारंग ने विचारले.

" तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवा.. कदाचित ते तुम्हाला मुली ठेवलेल्या ठिकाणा पर्यंत घेऊन जातील.. "

" ह्म्म्म... "

दुसऱ्या दिवशी सगळे चित्र स्पष्ट झाले. विनू ने माहिती काढली होती.

" शेखर , अंजूर गावाच्या हद्दीत येणार हे गोडाऊन काहीसे एका बाजूला आहे. आजूबाजूला काहीच वस्ती नाही. ज्या कंपनीने ते भाड्याने घेतले आहे तिची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली आहे असे मला वाटत नाही. तरी ही सहामहिने ऍडव्हान्स भरून गोडाऊन घेण्यात आले आहे. बरं मी गोडाऊन ला बाहेरून पाहिले तर त्यात फार काही सामान किव्हा काही काम होत असलेले दिसलें नाही.. पण तरीही गेट वर दोन मजबूत गार्डस आहेत. "

" ह्म्म्म... आज रात्री आपण त्या गोडाऊन ला भेट देऊन बघूया.. काही हाती लागते आहे कां ? संध्याकाळी सगळे ऑफिसलाच भेटा.. "

त्या संध्याकाळी सगळे त्या गोडाऊन च्या आजूबाजूला दबा धरून बसले. लांबून सगळ्यांचे निरीक्षण चालू होते.. बघता बघता रात्र झाली. शेवटी रात्रीचे अकरा वाजले तसे शेखरने सगळ्यांना आपआपले काम सांगितले. प्रत्येकाने आपले काम चोख करायचे होते.

ठरल्या प्रमाणे गफूर त्या दोन्ही गार्डस कडे गेला. त्यांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तितका वेळ इस्माईल आणी सारंग ला पुष्कळ होता. आपल्या डोक्यावर जोरदार काहीतरी आदळले एव्हडेच त्यांना कळले असेल. डोक्यावर हात ठेवतच त्यांची शुद्ध हरपली. तिघांनी पटकन दोघांना बांधले आणी आता वोचमन केबिन ला टाकून दिले. इस्माईल आणी गफूर त्यांचा ड्रेस घालून पहाऱ्याला उभे राहिले. सारंग दोघांना आतून कव्हर देत होता. आता सगळे झाल्यावर विनू आणी शेखर चेहऱ्याला मास्क लावून गोडाऊन मध्ये शिरले. आता एकदम सन्नाटा होता. पावलाचा बिलकुल आवाज न करता दोघांनी सगळे गोडाऊन शोधले. काही रिकामी ड्रम्स , काही लाकडी खोकी आणी जमिनीवर पडलेल्या फालतू आणी टाकाऊ वस्तू सोडल्या तर तिथे काहीच नव्हते..
आपला अंदाज चुकला कि काय? शेखर विचार करत होता.
पण जर आत काही नाही तर मग बाहेर पहारा कशाला ? इथे चोरण्या सारखे काय आहे ? दोघे शांत एकाच जागी निश्चल उभे राहिले. त्याची नजर चोहीकडे फिरत होती. कान सूक्ष्म आवाज पण टिपायला तयार होते. अशीच काही मिनिटे गेली आणी एक आवाज झाला. तसे दोघे सावध झाले. पत्रा सरकावण्या सारखा आवाज होता तो.. त्याच क्षणी दोघांच्या हातात पिस्तूल आले होते. त्यावर सायलेन्सर आधीच चढवले होते. विनू ने शेखर कडे बघितले. तर शेखर ने आहेस तसाच , त्याच जागी थांब म्हणून त्याला खूण केली. दोघांचे डोळे एव्हाना अंधाराला सरावले होते. त्यांच्या पासून चार हात लांब एक पत्रा बाजूला करीत एक जण वर येत होता. बाहेर गार्डस असल्यामुळे तो पूर्णपणे गाफील होता. तो अर्धा अधिक वर आला आणी त्याचे लक्ष समोर उभ्या असणाऱ्या दोघांकडे गेले. क्षणभर तो गडबडला आणी पुन्हा सावध होत त्याने हातातील AK-46 ची नळी त्यांच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हड्या हालचाली करण्यासाठीच त्याला काय तो वेळ मिळाला तो मिळाला नंतर विनू आणी शेखर ने झाडलेल्या दोन्ही गोळ्या अनुक्रमे त्याच्या छातीत आणी डोक्यात घुसल्या. आणी तो तसाच खाली त्या गुप्त तळघरात कोसळला.. त्याच्या पडल्याचा आवाज आला. काही क्षण थांबून शेखर पुढे निघाला. त्याने विनूला इशाऱ्याने त्याला कव्हर करायला सांगितले.. तळघराचे दार आता उघडेच होते. शेखर ने आत पाहिले. आत भयाण काळोख होता. आपल्या कडील बेटरीने शेखरने एक प्रकाशझोत आत टाकला आणी पुढच्या क्षणाला एक लांब पात्याचा चाकू सर्रर्रर्रर्र... करत त्याच्या दंडाला फाडून गेला. पण त्याची पर्वा न करता शेखरने आवाजाच्या दिशेने दोन गोळ्या चालवल्या.

आह... असा दबका आवाज ऐकू आला. त्या क्षणी पुढचा मागचा विचार न करता शेखर ने सरळ आत उडी घेतली. पुढच्या क्षणात आपल्या शरीराला स्प्रिंग सारखे उडवत त्याने आत जमिनीवर लोळण घेतली पण लोळण घेत असताना पण त्याच्या मेंदू काम करत होता. आत अजून किती जण आहेत? कुठे आहेत? हे तो शोधत होता. पण आत आणखीन कोणी टेररिस्ट नव्हता.. होत्या त्या दहा बारा मुली.. घाबरून थरथर कापणाऱ्या त्या मुली एका कोपऱ्यात बसल्या होत्या... अंगावरचे कपडे मळलेले , चार दिवसात मलूल पडलेला चेहरा. शेखर कपडे झटकत उठला. एकवार त्याने शेवटचे आचके देणाऱ्या माणसाकडे पाहिले... त्याच्या गोळ्यांनी काम चोख केले होते अचूक दोन्ही गोळ्या छातीत शिरल्या होत्या..

त्याने एक हळुवार विशिष्ट अश्या सुरात शीळ मारली. तसा विनू पण आत आला.

" वा.. काम तमाम... " खुश होत विनू म्हणाला..

" ह्म्म्म..." शेखरने एकदा सर्व मुलीवर नजर टाकली. आणी त्याची नजर सुजातावर स्थिर झाली. तिचा फोटो सुकन्या ने त्याला पाठवला होता त्यामुळे तिला बघताच त्याने तिला ओळखले..

" तु.. इकडे ये.. " त्याने सुजाताला इशारा करत म्हंटले.. त्यावर ती घाबरून पुढे यायलाच तयार नव्हती...

" घाबरू नका... आम्ही तुम्हाला सोडवायला आलो आहोत... सुजाता... तुला खरं नसेल वाटत तर सुकन्याशी बोलणार आहेस ? " त्याने विचारले. सुकन्या चे नाव ऐकताच तिचा चेहरा उजळला...

शेखर ने मोबाईल काढून सुकन्या ला फोन लावला..

" हॅलो... "

" सुकन्या कां? "

" होय बोलतेय.. "

" मी शेखर चा मित्र. तुमच्या बहिणीला शोधायचे काम मी करत होतो... ती आम्हाला भेटली आहे... तुम्ही बोलणार कां तिच्याशी... "

"'काय ? हो दया नां प्लिज तिला.. " सुकन्या आनंदाने म्हणाली..

" हम्म... घे..." त्याने मोबाईल सुजाताच्या दिशेने पुढे केला..

" हॅलो... दीदी... "

" सुजाता... ! कशी आहेस तु? ठीक आहेस ना तु ? "

" मी ठीक आहे दीदी... पण कुठे आहे ते मला माहित नाही.. "

" बरं.. घाबरू नको... हा.. मी बोलते त्या माणसाला दे फोन.. "

" हॅलो... "

" थँक्स.... तुम्ही माझ्या बहिणीला शोधून काढले...तुमचे कसे आभार.... "

" राहू दे ओ... त्यात काय एव्हडे. हे आमचे रोजचे काम आहे... "

" तरी ही... आता कोण कोणासाठी एव्हडे करते म्हणून.. "

" काही नाही शेखर सर आमचे खास आहेत त्यांनी सांगितले तर शोधावेच लागेल ना... "

" ठीक आहे... माझी बहीण कधी पर्यंत घरी येईल? "

" असे निश्चित सांगू शकत नाही. पण आता त्यांना बिलकुल धोका नाही. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका... अजून पोलीस यायचे आहेत. "

" पोलीस कशाला ? "

" अहो ! इथे दोन मुडदे पडलेत.. दोघे बेशुद्ध आहेत.. पोलिसांना बोलवावे लागेल नां..? मग पंचनामा , जबाब , सगळे नोंदवून मग पोलीस प्रत्येक मुलीला घरी आणून सोडतील.. म्हणजे आम्ही असूच सोबत त्यामुळे काळजी करू नका.... ठीक आहे ठेऊ आता... "

" बरं ठीक आहे... "

" आता तरी विश्वास बसला..." त्याने सुजाताला विचारले... त्यावर तिने हसून मान डोलावली. चार दिवसात ती पहिल्यांदाच हसली असेल..

" अहो तुमच्या दंडाला तर मोठी जखम झाली आहे. " ती त्याचा दंड बघून म्हणाली.. तिने पटकन आपली ओढणी फाडून त्याच्या जखमेवर घट्ट बांधली..

" तु जा... आणि पोलीस कमिश्नरला फोन लाव. त्याला इथली सगळी माहिती दे आणी लवकर पोलीस पार्टी पाठवायला सांग.. तो पर्यत आपण थांबू इथे..." शक्यतो विनू च्या नावाचा उल्लेख टाळत शेखर म्हणाला..

" बरं... " विनू निघून गेला..

" हे बघा... थोड्या वेळात पोलीस येतील.. तेव्हा घाबरून जायचे नाही.. त्यांना सगळे व्यवस्थित सांगायचे... त्यांनी विचारले कि ह्यांना कोणी मारले तर सांगायचे ते लोक आम्हाला माहित नाहीत. ते मुखवटे घालून आले होते असे सांगायचे... आमच्या बद्दल जेव्हडे कमी सांगाल तेव्हडे तुमच्या साठी चांगलेच आहे... सगळे काही आटोपले कि तुम्ही तुमच्या घरी असाल... काळजी करू नका.... "शेखर मुलींना समजावून सांगत होता.

" हॅलो... कमिश्नर ?" विनू ने विचारले.

" कोण ? कमिश्नर झोपेतच होता.

" शेर.... " ते ऐकताच कमिश्नरची झोप उडाली.

" तु कधीतरी माझ्या हातात भेट.. तुला असा टायर मध्ये घेतो ना.. बघ... "

" तुला वाटते कां कमिश्नर असे कधी घडेल...? " विनू ने त्याला आणखीन भडकवत विचारले..

" घडेल कधी ना कधी असे घडेल... "

" कमिश्नर,... मागील चार कमिश्नर पण हेच बोलत होते.. पण त्यांना काही शक्य झाले नाही. ठीक आहे तु पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. पण आज मी वेगळ्या कामा साठी फोन केला आहे.. "

" काय ? "

"'मुंबई मधील किडन्याप केलेल्या मुलींना मी शोधून काढले आहे...जर पोलिसांना त्यात इंटरेस्ट असेल तर.... "

" आहे... " कमिश्नर पटकन म्हणाला... मागील काही दिवसापासून पोलिसांची ह्यात खूप नाचक्की झाली होती. त्यामुळे आता आपली दुश्मनी विसरून हात मिळवणे त्याला जास्त सोयीस्कर वाटत होते.

" मला वाटलेच..." विनू हसून म्हणाला... पण त्याचे ते हसणे कमिश्नरच्या जिव्हारी लागले..

" बरं ... ठाणे -भिवंडी मार्गांवर अंजूर गाव आहे. त्याच्या हद्दीत एका गोडाऊन मध्ये सगळ्या मुली आहेत. तिथे चार टेररिस्ट आहेत म्हणजे होते.. दोन जन्नत ची सैर करायला गेले आणी दोघांना मी जेरबंद केले आहे. "

" मी लगेच तिथे टीम पाठवतो.. "

" कमिश्नर !..त्यांना नीट सूचना दे.. तुझ्या माणसांना पूर्ण तयारीने यायला सांग... त्यांच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रे आहेत..त्यांचे इतर साथीदार अजून पण बाहेरच आहेत... मुली सुरक्षित आहेत.. त्यांना व्यवस्थित घरी पोचवण्याची व्यवस्था कर... आणी हाजूरी मधील एका घराचा पत्ता sms करतोय.. तिथे उरलेले सगळे टेररिस्ट सापडतील... "

" तु खरे बोलतोस ना..." कमिश्नर ने शंका घेत म्हणाले..

" तुला त्याचे क्रेडिट नको असेल तर जाऊदे... मी मुलींना घरी सोडतो... मग मुली जे काय बोलायच्या त्या न्यूज ला बोलतील... "

" नको... मी लगेच टीम पाठवतो.... "

" ह्म्म्म... " विनू ने मोबाईल ठेवला. त्याचा नंबर ट्रेस होण्याचा प्रश्नच नव्हता.. कारण विनू चा नंबर ट्रेस करणे जगात काहीच लोकांना शक्य होते आणी त्यात मुंबई पोलीस येत नव्हते...

शेखर ने मुलींना सगळे व्यवस्थित समजावले.. आणी शेखर आणी कंपनी पोलीस येण्याची वाट पाहत राहिले.. लांबून पोलीस व्हेन येताना दिसताच सगळ्यांनी तिथून लांब जाऊन अंधारात दडी मारली. पोलिसांनी सगळ्या मुलीची सुटका केली.. दोन इन्स्पेक्टर आले होते. एक जण मोबाईल वर कोणाला तरी माहिती देत होता. बहुतेक तो कमिश्नर लाच माहिती देत असावा... काही वेळातच मुलींना तेथून सुरक्षित हलवण्यात आले होते. एक पोलीस कमांडो ची बारा जनाची टीम तिथेच थांबली कदाचित त्यांचे साथीदार माघारी आले तर त्यांचा समाचार घ्यायला कोणी तरी हवे नां...

पहाटे पहाटे सगळे काम आटपून सगळ्या मुलींना व्यवस्थित त्यांच्या घरी सोडण्यात आले. हाजूरी मधील त्या घरावर पोलिसांनी छापा मारला.. त्यात आणखीन चार टेररिस्ट मारले गेले. आणी तीन जिवंत सापडले.. त्या घरातून अत्याधुनिक शस्त्रसाठा , हॅण्डग्रेनेड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सकाळी पेपर ला बातमी आली. काश्मीर मधील टेररिस्ट ग्रुप ला मुंबई पोलिसांनी केली अटक..
त्यात इत्यंभूत माहिती दिली होती. व्हिक्टरी ची v ची खूण करत असलेला कमिश्नर चा फोटो लक्ष वेढून घेत होता...

अटक केलेल्या टेररिस्ट काढून मिळालेली माहिती अशी.. कि , भारत सरकारच्या सध्याच्या कडक धोरणामुळे त्यांना नवीन टेररिस्ट मिळणे कठीण झाले होते. आखाती देश , पाकिस्तान मधून अमाप पैसा येत होता.. भारताला बरबाद करण्याच्या नवीन नवीन योजना तयार होत होत्या पण त्या पूर्ण करायला त्याच्या जवळ मनुष्यबळ कमी होते. होते ते पण एखाद्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये कमी होण्याची शक्यता होती. म्हणून मग त्यावर ही शक्कल लढवण्यात आली. देशभरातून शंभर सुंदर मुली पळवून आणायच्या आणी त्यांना इथे वेगवेगळ्या कॅम्प वर ठेवायचे... त्यांचे आमिष दाखवत नवीन तरुण मुलांना आपल्या संघटनेत सामील करून घ्यायचे...

सगळ्यात शेरचे नाव कुठेच आले नाही. ते बघून विनू कष्टी झाला. त्याची भावना शेखरच्या लक्षात आली.

" काळजी करू नकोस... ह्या एका कामामुळे आपले पोलिसांशी असणारे समंध खूप चांगले होणार आहेत.. पोलिसांना आता समजेल कि, शेर ही फक्त दुष्टाच्या नायनाटा साठीच आहे... त्याचा आपल्याला पुढे खुप उपयोग होणार आहे.. " शेखर त्याला समजावत म्हणाला... आणी तेव्हड्यात शेखर चा मोबाईल वाजू लागला..

त्याने मोबाईल कडे पाहिले... सुकन्याचा फोटो प्लॅश होत होता..

" एस्क्युज मी ," त्याने सगळ्याकडे बघत म्हंटले... सगळे उठून बाहेर निघाले.. पण जाता जाता विनूने शीळ वाजवलीच..

" हॅलो... "

" शेखर सर , "

" हा बोल... आली ना सुजाता घरी? मला काल रात्रीच माहिती मिळाली पण रात्र झाली होती म्हणून मग मी फोन नाही केला.. "

" थँक्स... शेखर सर,... आज तुमच्यामुळे माझी बहीण सही सलामत आमच्यात परत आली... "

" प्लिज... असे काही नाही.... मला जे शक्य होते तेच मी केले... आता ती ठीक आहे ना? "

" हो आता ती ठीक आहे.. एक रिक्वेस्ट होती... "

" बोला ना... "

" माझी आई , "

" काय झाले त्यांना? "

" नाही... नाही... काही झाले नाही... तिने तुम्हाला एकदा घरी जेवायला बोलावले आहे.. तुमचे आभार मानण्यासाठी... प्लिज तुम्ही येऊ शकता कां ? "

" अहं.... कस आहे ना मिस. सुकन्या, माझे शेडूल्ड खूप बिझी असते. त्यातून वेळ काढणे कठीण असते.." थोडासा भाव खात शेखर म्हणाला..

" मला वाटलेच होते... तरी मी बोलली आई ला कि, ती मोठी माणसे आहेत त्यांना वेळ मिळणे कठीण... असो... कधी इकडे आलात तर या शॉप वर... "

" ऐका... ऐका.... " घाईघाई ने शेखर म्हणाला..

" आता तुमच्या आईची इच्छा आहे तर त्याला नाही कसे म्हणणार ना... मी येईन पण जसा मला वेळ मिळेल तसा येईन.. आणी जेवायला नाही सहज भेटायला येईन..चालेल ? "

" चालेल... तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा आम्हाला आधी कळवा... म्हणजे आम्ही सगळे घरी थांबू... "

" ठीक आहे मी आधी कळवीन.. " तो म्हणाला..

" बरं आता ठेऊ... " तीने विचारले...

" ह्म्म्म... बाय... " असे म्हणून त्याने फोन ठेवला.. तिच्या आठवणीने पुन्हा एकदा त्याच्या मनात फुलपाखरे उडू लागली... तिच्या घरी रविवारी जाऊया असे मनात ठरवून तो आपल्या कामाकडे वळला...

दुसऱ्या दिवशी केबिन चा दरवाजा नॉक करून परेश भाई आत आले. तसे ते फारसे खाली येत नसत.. कारण खाली सगळे शेरचे काम चालत होते. आणी वरच्या पाच माळ्यावर पंचरत्न चे ऑफिस होते.

" अरे परेशभाई , सु बात छे... ? तमने आज खुद नीचे मिळवना माटे नीचे आवानी पडे ? "

" शेखर भाई... वो फॉरेन शी पार्टी वाला संग आज मिटिंग फिक्स थाई गयी छे... वो कधीपण अंया आवी छे.. तो मोठा साहब नी तमने याद करवाने वास्ते.... "

" ओह... कई बात नथी... आप आगे बाधवां "

परेश भाई मान हलवत गेला. त्यानंतर मिटिंग मध्ये दोन तीन तास झाले. पण काही निष्कर्ष निघत नव्हता. शेवटी सगळे लंच ला उठले..

आज तो खूप दिवसांनी बाबान बरोबर त्यांच्या केबिन ला बसला होता...

" आज इथेच जेव... मला थोडे बोलायचे पण आहे तुझ्याशी .. " बाबा म्हणाले.. त्याला माहीत होते बाबा काय बोलणार होते... शेखर काही चुकीचे वागत नव्हता. त्यामुळे त्याला समजुतीच्या चार गोष्टीपण सांगायला त्यांना कधी चान्स मिळत नव्हता. त्यामुळे राहता राहिली एकच गोष्ट... लग्न.... त्या गोष्टी वरून ते त्याला अधूनमधून बोलत असायचे.. आता पण त्यांच्या कोणा मित्राची बहीण नाहीतर मुलगी असेल तिच्या संदर्भात त्यांना बोलायचे असेल असा कयास शेखरने लावलाच होता..

" माझ्या एका मित्राची मुलगी आहे... छान सुंदर आहे., शिकलेली आहे. म्हणून म्हंटल एकदा बघून घे... "

" झाले का तुमचे पुन्हा सुरु....? "

" अरे बघायला काय हरकत आहे... "

" मला हवी आहे तशी मुलगी मी बघितली आहे.... "

" काय म्हणतोस.? " बाबा चकित झाले. कारण तो कधी लग्न करेल ही शक्यताच त्यांना आता वाटत नव्हती .

" मग तिला कधी भेटायला घेऊन येतोस... " आनंदानी त्यांनी पुढे विचारले.

" हो... हो..... एव्हडी घाई नको.... मी अजून तिला विचारले नाही... प्रथम तिला विचारीन मग पुढे ठरवू.. "

" आणी जर ती नाही म्हणाली तर... तशी शक्यता कमीच आहे.. एव्हडा मोठा पैसेवाला मुलगा कोणी नाही म्हणेल... "

" हेच चुकते तुमचे... पैसा बघून लग्न करणारी आयुष्यभर संसार करेल...? "

" ह्म्म्म... " ही गोष्ट तर बाबांना पण पटणारी होती.


पुढील भाग लवकरच.........


© सर्वाधिकार लेखकाकडे....