Sher - 1 in Marathi Adventure Stories by निलेश गोगरकर books and stories PDF | शेर (भाग 1)

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

शेर (भाग 1)

वाचक मित्रांनो,
जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा म्हणून मग शेरकथा लिहल्या.इथे आता ही कथा प्रकाशित करत आहे. ह्या कथे नंतर मधून मधून शेरकथा लिहीत जाईन. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कथेवर समीक्षा येत नाहीत. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर त्यावर नक्की समीक्षा लिहा. दोन चार मिनिटाची मेहनत तर तुम्ही नक्कीच करू शकता पण त्या मुळे लेखकाला उत्साह येतो. नवीन उर्मी घेऊन तो लिहू लागतो. तर समीक्षा देताना अजिबात हात आखडता घेऊ नका..

आपल्या आलिशान वातानुकूलित केबिन मध्ये शेखर रत्नपारखी बसला होता. समोरच्या फाईल मधून त्याची नजर भरभर फिरत होती.
गोरापान राजबिंडा , साडेसहा फूट हाईट , सिल्की केस, नीट मेंटेन केलेले शरीर , अत्यंत हुशार असा हा शेखर अब्जाधीश होता. बापाचा जगभर पसरलेला हिऱ्याचा व्यापार. व्यापारात सच्चाई आणी दिलेला शब्द पाळण्याची हातोटी त्यामुळे व्यापार वाढतच होता. बापाचा एकच्या एक असलेल्या शेखर अमाप पैसा , बापाचे असलेले सरकारी दरबारी वजन ह्या सगळ्या गोष्टी असून ही कधी वाकड्या रस्त्यावर गेला नाही . त्यासाठी लहानपणी घडलेली एक गोष्ट करणीभूत झाली.

लहानपणी शेखरच्या आईचा अपघात झाला. भरधाव कार चालवणाऱ्या मोठ्या बापाच्या पोराने त्याच्या आईला उडवले. सगळ्या लोकांच्या समोर झालेल्या ह्या अपघातात त्याला त्याच्या आईला गमवावे लागले. त्यानंतर सुरु झाला कोर्टाचा खेळ. तीन वर्ष केस चालू असून त्यात खुप काही त्याला शिकता आले. कसे साक्षीदार फुटतात , पुरावे कसे गायब होतात इथं पासून ते धमक्या , प्रलोभन सगळे सगळे त्यांनी पाहिले. त्यावेळी त्यांची परिस्थिती अशी नव्हती कि ते त्या मोठ्या लोका बरोबर वैर पत्करू शकतील. पर्यायाने तो पोरगा सुटला... पण ही घटना लहानग्या शेखर च्या मनावर आघात करून गेली. त्याचा न्यायव्यवस्थे वरील विश्वासच उडाला. तो विचार करू लागला कि आपल्या सारखे कितीतरी जण असतील त्याना असाच न्याय नाकारण्यात आला आहे . अश्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे. तेव्हा तो लहान होता त्यामुळे त्यावेळी त्याला काय करावे ते सुचले नाही पण जसा जसा तो मोठा होऊ लागला खूप विचार करून वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेऊन त्याने एक संघटना बनवली.

गरीब , सोशीत , न्याय नाकारण्यात आलेल्या लोकांसाठी ही संघटना काम करीत होती. स्वतः शेखर ने आपली वयाची पंचविशी गाठे पर्यंत बऱ्याच कलात महारथ मिळवली होती.
तो एक उत्कृष्ट मार्शल आर्टिस्ट होता. फक्त आपल्या हातानी एका वेळी चार पाच जणांना लोळवणे हे तर त्याच्या साठी डाव्या हाताचा मळ होता. जिथून मिळेल तिथून कला शिकून त्याने स्वतःला तयार केले होते. कोणत्याही प्रकारचे टाळे , तिजोऱ्या उघडणे. चाकू , सुऱ्या पासून कोणतेही अत्याधुनिक शस्त्र चालवणे. अश्या किती तरी कला त्यांनी आत्मसात केल्या होत्या.

एक गुप्त पण खतरनाक संघटना तयार करायची हे नक्की केल्यावर त्याने गुपचूप त्या साठी माणसे शोधायला सुरवात केली. सहा महिने निरनिराळी माणसे शोधून त्याने शेवटी वरळी कोळीवाड्यातून सारंग ला आपल्या पंखाखाली घेतले. त्यानंतर विनू त्याचा कॉम्पुटर जिनियस त्याला एका मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीतुन आपल्यात घेतले. इस्माईल आणी गफूर यांना त्याने अंडरवल्ड मधून आपल्यात आणले होते. आणखीन ही काही माणसे होती. पण ही चार माणसे त्याची खास होती.

सगळ्यात आधी त्याने आपल्या आईच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या माणसाला अक्षरशः हाल हाल करून मारले. त्या नंतर सुरवात झाली लोकांना नाडणाऱ्या गुर्मिस्ट लोकांची. हळूहळू व्यंकट दादा आणी सुलेमान ह्या सारख्या प्रकरणामुळे त्यांनां प्रसिद्धी मिळू लागली. पण तो पर्यंत त्यांच्या संघटनेला काही नाव नव्हते.. लोकांनी काही नाव ठेवण्या आधी मग आपणच काही नाव ठेवावे म्हणून त्यांनी त्या संघटनेला नाव शोधायला सुरवात केली. पुढे सर्वानुमते शेर हे नाव ठेवायचे हे नक्की करण्यात आले. शेखर रत्नपारखी ह्या त्याच्या नावाचा आद्याक्षराचा वापर करून शेर हे नाव बनवण्यात आले होते. आणी तसे करणे गरजेचं होते कारण ह्या सगळ्याचा कर्ता, करविता आणी मास्तर माईंड शेखरच तर होता.

हळू हळू शेर चा पसारा आणी पोलिसांची डोकेदुखी वाढतच गेली. आता तर अंडरवल्ड मध्ये पण शेर च्या नावाची दहशत होती. पण ते कोण, किती लोक आहेत , कुठे सापडतील ह्या बद्दल काही खास लोक सोडले तर कोणाला काहीही माहिती नव्हती. त्यांच्या ह्या रहस्यातच त्यांचे यश होते.


" शेखर,.. तो भाटिया बिल्डर ऐकत नाही. " सारंग केबिन चा दरवाजा उघडत आत घुसत म्हणाला.

" काय झाले? "

" त्याला समजावून सांगितले आहे पण ऐकत नाही आणी आता तर चार बॉडीगार्ड घेऊन फिरतो आहे. "

" मग... तु त्यांना घाबरला काय ? " शेखरने विचारले.

" मी आणी घाबरलो...? " सारंग ने हसून विचारले.
अहं... " मी फक्त तुझा स्टॅन्ड काय हे बघायला थांबलो आहे.. "

" छान... मला माहीत आहे.. असाच जरा डोके थंड ठेऊन काम करीत जा... " भाटिया ला मुदत दिली होती. काय झाले ?

" त्याची मुदत काल संपली.. घाबरून तो चार बॉडीगार्ड घेऊन फिरतोय... "

" ह्म्म्म... विनूला पाठव.." विचार करत शेखर म्हणाला.
थोड्याच वेळात सारंग विनू ला घेऊन पुन्हा आला.

" विनू ,भाटिया ला फोन लावायचा आहे. तु तयार आहेस ? "

" एकच मिनिट.. मी आलो.." विनू पटकन त्याचे सामान घेऊन आला. दोनच मिनिटात त्याने सगळी जोडणी केली. ऑल सेट म्हणून त्याने इशारा केला. तसा शेखरने विनू ने पुढे केलेल्या मोबाईल आपल्या हातात घेतला.
रिंग होत होती. काही सेकंदात कॉल उचलला गेला.

" हॅलो..." भाटियाचा आवाज ऐकायला आला.

" भाटिया.. तुला दिलेली मुदत काल संपली आहे. तु काय ठरवले आहेस? "

" कोण बोलताय..." भाटियाच्या आवाजात कंप जाणवत होता.

" शेर.....भाटिया मला वाकड्यात शिरायला लावू नकोस. जर मी ठरवलेच तर तुझी चार माकडे माझे काहीही वाकडे करू शकणार नाहीत. "

" नाही... नाही ... मी करतो काही.... "

" भाटिया जर आज संध्याकाळी मला काही कळले नाही तर उद्या तुझा शेवटचा दिवस आहे हे पक्के ध्यानात ठेव.." शेखर ने आपल्या अतिशय थंड आवाजात त्याला सांगितले. ही शेखरची अजून एक खुबी. कोणाशी कसे बोलावे हे त्याला चांगलेच माहित होते. त्याचा तो आवाज ऐकून भाटियाच्या जीवाचा थरकाप झाला असेल ह्या बद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती.

" आता पुढे काय ? " विनू ने विचारले.

" एक काम कर , तु त्याच्या कॉल वर लक्ष ठेव... सारंग आज संध्याकाळ पर्यंत वाट बघ नाहीतर भाटियाला उचल. कसे ते तुला माहीत आहे ...."शेखर ने फायनली निर्णय सांगितला..

" कोई शक...." सारंग आनंदानं म्हणाला.. हे असे मारधाड हे काम म्हणजे त्याच्या आवडीचे होते. बरेच दिवस हाताला काही काम नाही मिळाले तर तो बैचेन व्हायचा...

आणी रात्री भाटियाला त्याच्या घरातून अलगद उचलण्यात आले. त्याचे गार्ड आणी घरातील माणसे सगळ्यांचे लक्ष एका बाजूला वळवून भाटियाला बेशुद्ध करून त्यांनी तडक सोमाणी बंगला गाठला..

भाटिया जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला कळले कि तो एका रूम वर आहे. आजूबाजूला कोणीच नव्हते. त्याचे हात पाय पण बांधले नव्हते. त्याने आपले आकडलेले हात पाय जरा नीट केले. आपल्या घरातून , आपल्या माणसातून ज्या सहजतेने त्यांनी त्याला उचलून आणले होते ते पाहता ही माणसे काय तयारीची आहेत हे त्याच्या लक्षात आले. तेव्हड्यात.....

" काय भाटिया... काही त्रास नाही ना झाला इथे येण्यात.. "शेखर आत येत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक मास्क होता. तो असा काही चपखल त्याच्या चेहऱ्यावर बसवला होता कि कोणालाही कळू नये. एव्हडी सावधानता त्याला बाळगावीच लागे. शेखर काही कोणी लुंग्यासुंग्या नव्हता. मोठ्या मोठ्या मॅगझीन , पेपर ला कायम त्याचा फोटो असायचा त्यामुळे त्याला ओळखणे अगदी सोपे होते. नंतर काहीही प्रॉब्लम नको म्हणून हा सगळा खटाटोप...

" कोण आहेस तु ? " भाटिया ने घाबरत विचारले.

" शेर..... भाटिया.., एव्हढ्यात घाबरण्याचे कारण नाही. जर तु मी बोललेले नाही ऐकलेस तर मग मात्र तुला तुझ्या जन्माला आल्याचा पश्चाताप होईल हे खात्रीने सांगतो.. आणी मी जे बोलतो ते मी करतोच हे आता तुला इथे आणले तेव्हा तुझ्या लक्षात आले असेलच.. " शेखर आपल्या थंडगार आणी स्थिर आवाजात म्हणाला.
त्याचा तो बर्फ़ा सारखा थंडगार आवाज म्हणजे साक्षात मृत्यू असल्याची जाणीव भाटियाला झाली..

" नाही.... नाही... मी सगळ्या लोकांना त्यांच्या हक्काची घरे देतो... "

" भाटिया... तु जागा कुठे ठेवलीस ? आता कुठे जागा देणार त्यांना...? "

" मी दुसरी कडे त्यांना जागा देतो... "

" दुसरी कडे जायला ते तयार आहेत?" शेखर ने विचारले. त्यावर भाटियाने मान हलवली.

" मग.. त्यांना तिथेच जागा दयायला हवीस... जर माझा हिशोब चुकत नसेल तर अट्ठेचाळीस टेनेतना जागा देऊन पण तु काही करोड कमवशील... हो ना... "
भाटियाने होकारात मान हलवली.

" मग आपलं जीव घालवून तु पैसा कमवून काय करणार आहेस ? त्यापेक्षा त्यांना जागा देऊन टाक. चार पैसे तुला ही मिळतीलच कि महत्वाचे म्हणजे अजून पुढे बिल्डिंग बांधायला तु जिवंत राहशील... "

" ठीक आहे. मी दोन दिवसात त्यांना फ्लॅट देतो. कागदपत्र तयार करायला दोन दिवस तरी जातील.. "

" अरे वा... छानच ... मग तर विषयच संपला... मग आता तुला घरी पाठवायला काही हरकत नाही... ह्याला सोडून या.. " शेखर म्हणाला तसे दोन धिप्पाड माणसे पुढे आली.

" भाटिया.... जे बोलला आहेस तसे झाले नाही तर मी तुझ्या शरीरातील एकेक अवयव काढून बाजारात विकीन... आणी मी जे बोलतो ते मी करतो ह्या बद्दल तुला खात्री देतो.. "
शेखर अश्या काही आवाजात म्हणाला कि भाटियांचा प्राण डोळयांत आला. भाटियाच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला कार मध्ये बसवण्यात आले. आणी सुखरूप घरी सोडण्यात आले.

" तु त्याला कशाला सोडलास ? " शेखर आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढत असताना सारंग ने आत येत विचारले.

" जर सरळ सरळ काम होतेय तर कशाला वाकड्यात शिरा ? "

" आणी तो नाही ऐकला आणी त्याने उद्या पलटी मारली तर...? "

" अहं... तो तसे करणार नाही... मी त्याच्या डोळ्यात जी भीती बघितली ते पाहता तो एव्हडी हिम्मत करणार नाही. "
शेखर ने सारंग ला समजावून सांगितले..
तो पर्यंत इस्माईल आत आला..

" सर गाडी काढू का ? "

" ह्म्म्म... " शेखर ने इशारा केला तसा इस्माईल बाहेर निघून गेला.. थोड्याच वेळात शेखर बाहेर आला. त्याला बघून इस्माईल कार चा दरवाजा उघडायला धावला. पण त्याच्या आधीच शेखर कार मध्ये बसला होता. इस्माईल ला असे त्याला पूर्ण आदराने गाडीत बसवायला आवडायचे. त्याच्या पडत्या काळात शेखर ने त्याला खुप मदत केली होती. अंडरवल्ड मधील नामाकिंत गुंड असलेला इस्माईल हॉस्पिटलला पडला तेव्हा त्याच्या कडे बघणारे कोणीच नव्हते. त्या वेळी शेखर ने त्याला साथ दिली. त्याचा हॉस्पिटलचा सगळा खर्च , बरा होऊन घरी जाई पर्यंत एक ठराविक रक्कम त्याच्या घरी व्यवस्थित पोचती करत होता. बरा झाल्यावर इस्माईल ने अंडरवल्ड सोडून शेर जॉईन केले होते. चांगला पगार , पोलिसांचा काही ताप नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्या माणसाला सोडायचे नाही अशी तत्वे असणाऱ्या शेर मध्ये तो लवकरच शेरचाच एक भाग होऊन गेला. शेखरची आलिशान कार चालवणे आणी वेळेप्रसंगी त्याचा बचाव करणे ही दोन प्रमुख कामे तो करत होता. त्याची बायको शबाना तर शेखर वर जाम खुश होती . तिचा नवरा त्याच्यामुळे माणसात आला होता . चांगला पगार मिळत होता. मुले चांगल्या शाळेत शिकत होती. पोलिसांचा काही ताप, भानगडी नव्हत्या अजून काय पाहिजे होते तिला. ती शेखरला आपला भाऊच मानत होती आणी शेखर पण तिला आपली बहीणच मानत होता. त्यांच्यात नेहमी रुसवे फुगवे चालूच असायचे.

" क्या इस्माईल मिया , काय म्हणतेय आमची बहीण ? "

" काही नाही नेहमी सारखी तुमच्यावर चिडलीय.. "

" का बरे..? "

" विसरलात ना... आज अमन चा वाढदिवस होता.. "

" अरे यार.... म्हणजे तु पण नाही गेलास कि काय ? "

" नाही मी जाऊन आलो.... जाम भडकली आहे तुमच्यावर... "

" थोडक्यात काय तर माझ्या शिव्या तु खाऊन आलास तर... " शेखर ने मंद हसत विचारले. त्यावर इस्माईल ने रिअर व्ह्यू मिरर मध्ये बघत मान हलवली. शेखरने थोडा विचार करत मोबाईल काढला.

" हॅलो..." पलीकडून आवाज आला. त्यातला राग ओळखता येत होता.

" अरे बाबा सॉरी ना.... नाही ना माझ्या लक्षात राहिले... बरं तुझा नवरा पण असा हुशार कि मला काहीही न सांगता घरी जाऊन आला..." शेखरने हुशारीने सगळे इस्माईल वर ढकलले.. त्याचे ते बोलणे ऐकून इस्माईल सीट वरून उडालाच..

" अरे !.. ह्याला काय अर्थ आहे...? तुम्हा दोघां..." इस्माईल पुढे बोलणार होता पण शेखर ने त्याला इशाऱ्याने चूप केले. बिचारा दोघां बहिणी भावात तो भरडणार होता..

" ते मला काही माहीत नाही... माझा राग काही जाणार नाही. "
ती ठाम म्हणाली.

" बरं तुझा राग जायला काय करू मी... "

" रविवारी आमच्याकडे जेवायला ये... "

" बरं... पण मी शनिवारी नक्की काय ते सांगतो... ठीक आहे.. काय करणार आहेस ? "

" बिर्याणी बनवीन आणी तुला आवडते तसे पाया सूप बनवते.. "

" बरं... इस्माईल मिया येतील आता अर्ध्या तासात घरी... आणी त्याला काय बोलू नकोस नाहीतर माझा राग त्याच्यावर काढशील..." तो हसतच पुढे म्हणाला...

" बरं ठेऊ... "

" हा.... "

इस्माईल ने सुटकेचा निश्वास सोडला ते शेखरला मागे पण ऐकू आले. काय आहे ना .. एव्हडा मोठा गुंड असलेला इस्माईल पण बायको समोर मांजर बनत होता.. सगळ्याच माणसाचे असे होते कां ? शेखर विचार करत होता. बरं झाले त्याच्या मनात कोणी नव्हती. नाहीतर आपली पण हालत थोड्या फार फरकाने अशीच झाली असती. तो मनातल्या मनात हसला..

त्याला बंगल्यावर सोडून इस्माईल निघून गेला.. आणी बाळू ने त्याला बघून जेवण लावायला घेतले.

दुसऱ्या दिवशी शेखर म्हणाला तसेच झाले. भाटियाने कागदपत्र बनवायला घेतले. सगळ्या भाडेकरूंना त्याबद्दल माहिती देण्यात आली. सगळे खुश होते. आणी एक प्रकरण अजिबात रक्तपात न होता पार पडले हे बघून शेखर पण खुश होता. पण आता एक नवीन प्रकरण चालू झाले होते. मुंबईत सध्या मुली पळवण्याचे प्रमाण अचानक वाढले होते. त्यावर सारंग आणी विनू लक्ष ठेऊन होते. जवळपास दहा मुली पळवण्यात आल्या होत्या. जंगजंग पछाडून पण पोलिसांच्या हाती काही लागतं नव्हते. शेखर अचानक कसे काय हे चालू झाले ह्यावर विचार करत होता. गफूर अंडरवल्ड मधून खबर काढण्यात गुंतला होता पण अजून तरी काही ठोस माहिती त्यांच्या हाती लागली नव्हती.

शनिवारी इस्माईल ने त्याला उद्याची आठवण करून दिली. तेव्हा त्याला आठवले कि उद्या शबाना नी घरी जेवायला बोलावले आहे . त्याने तिला आपण उद्या येत असल्याचे कळवून टाकले. आणी रविवारी इस्माईलला पण येऊ नको म्हणून सांगितले. तेव्हडीच शबानाला मदत झाली असती.

रविवारी त्याने बाळू ला दुपारी जेवायला नसल्याच्या सूचना दिल्या. आता अमन ला काय गिफ्ट घ्यावे ह्या बद्दल तो विचार करू लागला... त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेवर एक नवीन मोठे टॉय शॉप ओपन झालेले त्याला आठवले. तेथूनच काहीतरी घेऊ म्हणून त्याने विचार केला.
शबाना कडे एक वाजता जायचे होते दुपारी बारा वाजता गिफ्ट शॉप वर जाऊन तेथून सरळ तिच्या घरी जाऊ असा विचार करून तो आपल्या तयारीला लागला.

शेखर त्या मोठ्या आणी महागड्या टॉय शॉप मध्ये शिरला तेव्हा दुपारची वेळ होती म्हणून फारसे कोणी तिथे नव्हते. सावकाश फिरत फिरत तो सगळे न्याहाळत होता.

" मी काही मदत करू कां.. सर ? " अचानक मागून एक मंजुळ आणी गोड आवाज त्याच्या कानात शिरला.. त्याने चमकून मागे वळून पाहिले.
एक केतकी रंगाची साधारण वीस बावीस वर्षाची अतिशय सुंदर, रेखीव चेहऱ्याची मुलगी उभी होती. आपले एका रेषेत मोत्या सारखे सुंदर असणारे दात दाखवत तिने पुन्हा एकदा त्याला तोच प्रश्न विचारला.. पण शेखर तिच्यात एव्हडा गुंतून गेला होता. कि त्याचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. अचानक आपली धडधड वाढली आहे , रक्त जोरात धावू लागले आहे असेच काहीशे त्याला जाणवू लागले.

" सर..... सर....." ती त्याला परत परत विचारत होती.

" ओह सॉरी... मी जरा माझ्याच विचारात होतो.. तुम्ही काही म्हणालात कां ?" शेखर ओशाळत म्हणाला. त्याच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडत होते.

" तुम्ही काय शोधताय ते जर मला सांगितलेत तर मी तुम्हाला शोधायला मदत करू शकते. " ती किंचित हसून म्हणाली. आणी तिच्या गालावर पडलेली खळी बघून त्याला तिच्या चेहऱ्यावरून नजर हलवावी असे बिलकुल वाटत नव्हते.

" अहं.. होय... मी माझ्या भाच्या साठी काही गिफ्ट शोधतोय.." मोठ्या प्रयासाने त्याने आपली नजर तिच्या वरून काढून घेतली आणी म्हणाला...

" बरं... तो किती वर्षाचा आहे.. सर..? "

" साधारण आठ एक वर्षाचा.. "

" मग त्याच्या साठी एक बाईक आहे... बॅटरी ऑपरेटेड , चार्जेबल.. नवीनच आली आहे.. पण जरा महाग आहे.."

" चालेल काही हरकत नाही... "

" मग इकडे या..." असे म्हणून ती पुढे चालू लागली. आणी शेखर तिच्या मागे चालू लागला. तिची लयबद्ध चाल आणी कमरेपर्यंत रुळणारे वेणी घातलेले केस त्याला मोह पाडीत होते.

" ही बघा..." तिने ती बाईक बाहेर काढून दाखवली... छान होती. त्यावर बसून ती चालवता येणार होती.. अमन खुश झाला असता..

" छान आहे.... "

" दहा हजार रुपये..." ती म्हणाली... आणी तो विचार करू लागला.. तिला वाटले कि किंमत ऐकून त्याची वाचा बसली कि काय.

" जरा महागच आहे पण चांगली आणी लवकर खराब होणार नाही... " ती पुढे म्हणाली.

" नाही मी त्याचा विचार करत नाही. अजून एक भाचा आहे त्याच्या साठीही काही घ्यावे असा विचार करतोय.." तो म्हणाला..

" तो किती वर्षाचा आहे... "

" पाच वर्षाचा.. "

" मग त्याच्या साठी व्हिडीओ गेम घ्या.. त्यात गेम , नॉलेज , पझल्स सगळे काही आहे... " ती म्हणाली.

" चालेल... तो ही दया.... "

" ठीक आहे सर तुम्ही काउंटर वर चला मी हे सगळे पॅक करायला सांगून येते. "

" ठीक आहे... " तो काउंटरवर पोचला थोड्यावेळातच ती पण आली. त्याचे अमाऊंट सांगून तिने त्याची रिसीट बनवली.
त्याने आपले इंटरनेशनल कार्ड काढून कॅश काउंटर वर ठेवले. ते कार्ड बघून कॅशकाउंटर वर बसलेली स्त्री चमकली ते डायमंड कार्ड होते ते पण इंटरनेशनल किमान काहीशे करोड रुपये बँक मध्ये असणाऱ्यांना ते देण्यात येत होते. त्यावरून त्याच्या आर्थिक कुवतीची कल्पना करता येणे शक्य होते. पण शेखरचे लक्ष तिच्या कडे नव्हते. त्याचे सगळे लक्ष त्या मुली कडेच होते. तिच्या छातीवर लावलेल्या नेमप्लेट वर तिचे नाव सुकन्या लिहले होते. तेव्हड्यात आणखीन काही लोक आले तशी ती त्यांना अटेंड करायला निघून गेली.

" गोड मुलगी आहे ना...?" त्या स्त्री ने त्याच्या मनातील प्रश्न विचारला..

" हो... काही जास्तच गोड आहे..." ती अचानक बोलून गेला..
" सॉरी.. मला म्हणायचे होते कि छान सगळे सांभाळून घेते.. "

" ह्म्म्म... पण बिचारी... "

" काय झाले? " बिचारी शब्द ऐकून शेखर चे कान टवकारले..

" तिची बहीण चार दिवसापासून बेपत्ता आहे... "

" ओह... कदाचित कोणा मित्रा बरोबर..." त्याने आपले बोलणे अर्धवट सोडले.

" नाही हो... ती तशी मुलगी नाही . मी चांगली ओळखते तिला. "

" मग..? "

" काही कळत नाही.. पोलिसात तक्रार देऊन झाली आहे. पोलीस शोधत आहेत... "

आणी अचानक शेखरला आता चालू असणारे मुलीचे प्रकरण आठवले...

" एक काम कराल ? ... मला तिचे सगळे डिटल्स दया.. मी माझ्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न करतो. "

" तुम्ही कसे शोधणार ? " त्या बाईने डोळे बारीक करत त्याच्या मनाचा कानोसा घेत विचारले.

" अहो...जरी तुमच्या साठी पोलीस ठोकळेबाज उत्तरे देत असतील पण माझ्या साठी त्यांना धावावे लागेल. माझे काही कॉन्टॅक्ट आहेत काळजी करू नका मी माझे पूर्ण प्रयत्न करीन.. "

" मला काय आणी कसे घडले इतके डिटेल मध्ये माहीत नाही. पण मी एक काम करते सुकन्या ला पाठवते ती तुम्हाला व्यवस्थित सांगेल काय झाले ते... "

" ह्म्म्म.. एक काम करा ह्या गिफ्ट घेऊन बाहेर पाठवा. मी माझ्या कार जवळ उभा आहे. तिथे मला तिच्याशी निवांत बोलता येईल.. "

" ठीक आहे... " ती स्त्री म्हणाली आणी ती सुकन्या च्या दिशेने तर शेखर दरवाज्याच्या दिशेने निघाले.

काही वेळ आपल्या कार जवळ उभा राहून शेखर सुकन्याची वाट पाहत होता. थोड्याच वेळात ती आली.
तिच्या बरोबर आलेल्या माणसाने त्याचे गिफ्ट्स त्याच्या कार मध्ये ठेऊन दिले आणी तो परत गेला.

" बोला मिस. सुकन्या.... काहीही, अगदी लहान गोष्ट ही न वगळता सगळे सांगा... "

" खरंतर मला पण जास्त माहीत नाही.. पण तिच्या मैत्रिणीन कडून मला कळले ते असे.... त्या दिवशी म्हणजे चार दिवसापूर्वी सगळ्या मैत्रिणी कॉलेज वरून येत होत्या. त्यांना थोडा उशीरच झाला होता. सगळ्या होत्या म्हणून सगळ्या चालत येत होत्या. मध्येच जसे जसे एक मैत्रिणीचे घर आले तश्या त्या कमी कमी होत गेल्या. शेवटी सुजाता एकटीच उरली. शेवटच्या मैत्रिणीच्या घरा पासून आमचे घर पंधरा एक मिनिटावर आहे.. त्यामुळे ती तिचा निरोप घेऊन घरी येण्यास निघाली. त्या नंतर तिचा पत्ताच लागला नाही. " सुकन्या आता तिच्या आठवणीने रडवेली झाली होती.

" शांत व्हा... काळजी करू नका... मी बघतो . मला तिचा मोबाईल नंबर आणी फोटो असेल तर व्हाट्सअप करा.. "
मोठ्या खुबीने शेखरने तिचा नंबर मिळवला..

" ठीक आहे काही कळले तर मी तुम्हाला सांगतो.... येऊ आता... तसेच नवीन काही कळले तर मला नक्की सांगा माझा नंबर तर आहे तुमच्या जवळ..." शेखर ने तिला सांगितले. त्यावर तिने आपले डोळे पुसत मान डोलावली.

" बरं... येतो... " असे म्हणून शेखर ने आपल्या कार चा दरवाजा उघडला.. ती मागे फिरली तशी त्याने कार पार्किंग मधून बाहेर काढली.

शबानाच्या घरी पोचायला त्याला जरा उशिरच झाला. इस्माईल आणी शबाना दोघे त्याचीच वाट बघत होते..

" किती रे उशीर... मला वाटले खुप दिवसांनी आला आहेस तर लवकर येशील.." शबाना तक्रार करत म्हणाली..

त्यावर तो हसला.. आणी त्याने गिफ्ट काढून अमन आणी आयुष च्या हातात दिले. ती महागडी गिफ्ट बघून शबाना चिडली.

" तु ना माझ्या मुलांना खुप वाईट सवय लावतोस.. एव्हडे महागडे गिफ्ट्स आणायची काय गरज होती.. "

" असुदे ग... आता त्यांचा मामाच करोडपती आहे तर त्यात त्या बिचाऱ्याची काय चूक...? काय रे..?" त्याने दोघांना विचारले.

" और नही तो क्या मामा... अम्मी को क्या पता है.. " अमन म्हणाला..

" ए... जास्त शहाणपणा करू नको नाहीतर तुला पण बघीन आणी तुझ्या लाडक्या मामाला पण बघीन... " शबाना रागाने म्हणाली.

" जारे तुम्ही खेळा जा... " शेखरने दोघांना बाहेर पाठवले. आणी हे तिघे गप्पा मारत बसले. हे सगळे काय काम करतात हे त्या बिचाऱ्या शबानाला ही माहीत नव्हते. तिला वाटायचे कि इस्माईल त्याच्या कडे ड्राइव्हर आहे आणी आता सरळ मार्गाला लागला आहे. काही अंशी ते खरे असले तरी ते पूर्णपणे खरे नव्हते. तिला जेव्हडी कमी माहिती असेल तेव्हडेच चांगले म्हणून त्या दोघांनी तिला पहिल्या पासून अंधारात ठेवली होती.

" काय झाले भाई... आज खूप टेन्शन मध्ये दिसतोस.. " त्याचे आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही हे बघून तिने विचारले.

" नाही ग.. ही कामाची टेन्शन... बाकी काही नाही...तु बोल !"

" तरीपण तुझ्या मनात काहीतरी खटकते आहे.. तु काही कामाचे टेन्शन घेणारा नाहीस हे मला माहित आहे. "

" अग.. आता टॉय शॉप मध्ये गेलो होतो ना तिथे एक मुलगी काम करते... तिच्या बहिणीला चार दिवसापूर्वी कोणी तरी पळवले आहे.. त्याचाच विचार करतोय.. अचानक मुंबई मध्ये मुली गायब होण्याच्या घटना मध्ये वाढ़ झाली आहे. "

" ह्म्म्म... बरोबर आहे... तरी बरं मला दोन्ही मुलगेच आहेत.. एखादी मुलगी असती तर काय झाले असते मला कल्पनाच करवत नाही.. "

" ह्म्म्म... "

" अरे मुलींना मोठे करूनच जिम्मेदारी संपत नाही. त्यांच्या लग्नानंतर पण त्याचे व्यवस्थित चालू आहे कि नाही ते पण पाहावे लागते.... आता बघ मागेच काही लोक आले होते. गरीबाच्या मुलींना चांगले काम देऊन पुढे त्यांचा निकाह पण लावून देणार होते.. "

" असं... कोणती तरी संस्था असेल..." शेखर म्हणाला.

" नाही रे ! असेच कोणा कोणाच्या ओळखीने आले होते. काश्मिरी वाटत होते... आपल्या मुली कोण एव्हड्या लांब पाठवणार ना... "

" काश्मिरी वाटत होते.. शेखर विचार करत म्हणाला.. अचानक त्याला काही लिंक लागू लागली.. " तो ताडकन उठला...

" शबाना... तु एक काम कर ही बिर्याणी इस्माईल बरोबर ऑफिस ला पाठवून दे... मला अचानक एक काम आठवले आहे.. "

" बघ हे तुझे नेहमीचे आहे... "

" शबाना हट्ट करू नको खुप जरुरी आहे... तु बिर्याणी पाठव ऑफिस ला.. पण जास्तच पाठव तुझा आणखीन एक भुक्कड भाऊ पण तिथे आहे हे लक्षात ठेव.. " तो हसत म्हणाला.. आणी तो विनू बद्दल बोलतोय हे तिला लगेचच कळले.

" बरं... मी पाठवून देते..." ती म्हणाली. तसा शेखर ने तडक ऑफिस गाठले.. वाटेत त्याने सारंग , विनू दोघांनाही फोन करून ऑफिस ला बोलावले.

पुढील भाग लवकरच.......



© सर्वाधिकार लेखकाकडे..