varas - 5 in Marathi Horror Stories by Abhijeet Paithanpagare books and stories PDF | वारस - भाग 5

Featured Books
  • ચતુર

    आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञयासदृशागमः | आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृश...

  • ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 5

    આશા પારેખઃ બોલિવૂડની જ્યુબિલી ગર્લ તો નૂતન અભિનયની મહારાણી૧૯...

  • રાણીની હવેલી - 6

    તે દિવસે મારી જિંદગીમાં પ્રથમ વાર મેં કંઈક આવું વિચિત્ર અને...

  • ચોરોનો ખજાનો - 71

                   જીવડું અને જંગ           રિચાર્ડ અને તેની સાથ...

  • ખજાનો - 88

    "આ બધી સમસ્યાઓનો ઉકેલ તો અંગ્રેજોએ આપણા જહાજ સાથે જ બાળી નાં...

Categories
Share

वारस - भाग 5

5
सर्व जण मग्न असताना अचानक कुणीतरी ग्रंथालयाच्या दरवाज्यात येऊन उभ राहील. एक व्यक्ती होता तो,,पांढरीशी दाढी,मिशी,,डोळ्यांवर चष्मा,,आणि हातात आधार मिळावा म्हणून एक काठी.मुख्यध्यापक होते ते,,
"काय करताय रे पोरानो इथं,,माझ्या परवानगी शिवाय आतमधे घुसलच कसे?",एकदम करारी आवाजात ते ओरडले.

"सर तुम्ही,,अहो आम्ही इथं..म्हणजे...",श्रीधर अडखळत अडखळत बोलू लागला,
"इथं काय इथं,,इतक्या रात्री करताय काय?"

"अहो सर आम्ही त्या वाड्याबद्दल माहिती शोधायला आलो होतो.",कविता एका झटक्यात बोलली.
"कोणता वाडा?"
"तोच जन्गलातला वाडा, ज्यामुळे सरपंच दगावले आहेत,,विजू म्हंटला कि त्या वाड्याबद्दल एक पुस्तक आपल्या ग्रंथालयात आहे,,म्हणून आम्ही वेळ न घालता रात्रीच इथे आलो"

पुस्तकाचं नाव ऐकताच अचानक ते गम्भीर झाले,
"विजय,तुला त्या पुस्तका बद्दल माहिती कुठून मिळाली?"

"माझ्या बाबांनि लहानपणी मला सांगितलं होतं,तेच बोलले होते की वाड्या बद्दलची खडा अन खडा माहिती त्या पुस्तकात आहे,गुरुजी मला वाटत जर का ते पुस्तक आमच्या हाती पडलं तर आम्ही त्याबद्दल काहीतरी करूच शकू,नाही का?"
"अरे हो,तुझ्या बाबांना याबद्दल माहिती असणार,पण तरीही अशी गुपित माहिती सांगणं हे काही बरं नाही, असो,त्या पुस्तकात वाड्याची माहिती तर होतीच पण दुर्दैवाने ते पुस्तक चोरीला गेलंय मुलांनो"
"काय??चोरीला गेलं",सगळेच जण एकदम ओरडले
"होय,खरतर त्यात वाड्याचा सम्पूर्ण इतिहास लिहिलेला होता...आणि ते पुस्तक इतरांपासून मुद्दाम गुपित ठेवलं गेलं होतं."

"त्या खजाण्यामुळं ना?"

"अरे देवा,,विजू तुला खजाना पण माहिती आहे का,,तुझ्या बाबांना गुपित जपता आलं नाही म्हणायचं मग"
"कसलं गुपित?"
"त्या वाड्या बद्दल च गुपित,"
"आणि ते काय आहे?"
"पोरानो तुम्ही नका पडू यात,,फार धोका आहे त्यामधे"
"आम्ही नाही पडायचं तर कोण पडणार?सर विश्वास ठेवा आमच्यावर,,गावातले लोक हळूहळू मरत आहेत,,जर आताच काही उपाय नाही केला ना तर अनर्थ होईल बघा"

"म्हणजे तुम्ही माहिती घेतल्या शिवाय ऐकणारच नाहीये तर,"
.तर ठीक आहे ऐका,
खरतर तो वाडा काही साधासुधा नाहीये"

"साधासुधा नाही म्हणजे?"

"जर का तो वाडा तुम्ही बघितला असेल तर लगेचच जाणवत कि फार जुन्या काळात बांधला गेला असावा.खरतर या वाड्याला खुप दीर्घ इतिहास लाभला आहे.त्याची नेमकी मालकी कुणाची होती हे तरी सांगता येणार नाही.पण पेशव्यांची जेव्हा उतरण सुरु झाली तेव्हा हा वाडा बांधला गेला होता.एकदम सह्याद्रीच्या कुशीत,दाट वनांनी घेरला गेला असल्याने शत्रूंची नजर पडणं शक्य नाही अशा जागी,
ज्यावेळी पेशव्यांना पडझड लागली होती त्यावेळी इंग्रज अचानक वरचढ होत चालले होते.पेशव्यांकडे असणारी गडगन्ज सम्पत्ती हळूहळू गिळायला सुरुवात झाली होती.पुणे तर सगळ्यात पहिले लुटलं गेलं.मग हळूहळू सर्व किल्ले रिकामे केले जाऊ लागले... अशावेळी त्यांना विरोध करणात सुद्धा कुणी नव्हतं.मग यामुळे बऱ्याच सरदारांनी शक्कल लढवली.त्यांना होईल तेव्हढी सम्पत्ती घेऊन ते फरार झाले,मग जिथं जाता येईल तिथं त्यांनी वाट पकडली... अशाच सरदारां पैकी एक होते राजमाची चे रामेश्वर नाईक. राजमाची म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून च कार्यकालीन कामकाजाचा महत्वाचं ठिकाण,त्यामुळे तिथे असणारी सम्पत्ती करोडोंच्या घरात होती ,रामेश्वर नाईकांना माहिती मिळाली की इंग्रज काहीच दिवसांत राजमाची वर चढाई करणात आहेत,त्यावेळी किल्लेदार होते राजवीर देसाई,,नाईकांनी त्यांना या सम्पत्तीची विल्हेवाट लावण्याची कल्पना सांगितली...पण देसाई पालटले,त्यांनी इंग्रजांची चाकरी करणं योग्य समजल आणि नाईकांना विरोध केला.पण रामेश्वर नाईक नावाला जरी नुसतेच सरदार असले तरी गडावर त्यांचा दबदबा होता.गडावरच्या सैनिकांनी त्यांची साथ दिली.देसाईंना अटक करून मग त्यांनी राजमाची किल्यावर जेव्हढी काही गुप्त सम्पत्ती होती ती घेऊन ते या आपल्या गावात आले...त्यावेळी आपलं गाव म्हणजे एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तांडा मात्र होता...रामेश्वर नाईक आपली काही माणसं आणि स्वतःच कुटुंब घेऊन इथंच स्थायिक झाले....पण ही सम्पत्ती घेऊन गावात राहणं म्हणजे धोकादायक होत.म्हणून नाईकांनी मग आत जन्गलात वाडा बांधला.... त्यांनी काही सम्पत्ती गावाच्या कार्यासाठी सुद्धा वापरली.गावकऱ्यांचं बऱ्यापैकी भलं केलं.त्यामुळे गावकरी सुद्धा त्यांच्याशी प्रामाणिक होते....

काही वर्षे अशीच गेली... रामेश्वर नाईक हे तसे चांगले गृहस्थ ,विशेष म्हणजे लालची नव्हते.त्यांनाही माहित होत की ही सर्व सम्पत्ती काही त्यांच्या मालकीची नव्हती,,ती सर्व सम्पत्ती स्वराज्याची होती.म्हणून त्यांनी स्वतःसाठी तिला वापरणं टाळलं.त्यांना दोन मुलं होती आणि एक मुलगी.... त्यांनी सुद्धा या तिघांना हीच शिकवण दिली होती...त्यांचे तिन्ही मुलं म्हणजे रामेश्वरांची सावली.ज्ञानी,स्वराज्याची आग काळजात जीवन्त ठेवणारे,आणि मनात सहानुभूती ठेवणारे... रामेश्वरांची डोक्यात एक मोठ स्वप्न होत जे पूर्ण करण्यासाठी या तिघांना ते तयार करत होते"

तेव्हढ्यात त्यांचं बोलणं तोडत श्रीधरने विचारलं,
"कोणतं स्वप्न…??"

त्यांनी हलक्याने एक स्मितहास्य केलं आणि बोलले,
"पुन्हा एकदा स्वराज्य... हो रामेश्वर नाईकांना पुन्हा एकदा मराठी स्वराज्य उभारायाच होत.देशात ठिकठिकाणी जे काही मराठा सरदार होते त्या सर्वांना एकत्र करून इंग्रज सत्ता उलथवून लावण्याचा त्यांचा डाव होता... त्यानुसार अनेक मराठा सरदार एकत्र सुद्धा होऊ लागले .तो वाडा म्हणजे एक प्रकारचं अशा चळवळीचं मुख्यालय बनलं होत... अनेक मराठा सरदार वाड्यावर ये जा करायचे.. इंग्रजांना कळूही न देता टिच्चून त्यांच्या नाकाखालीच या कार्यवाही सुरु होत्या.... आपल्या गावात तर एक सैन्य तुकडी तयार झालीच परंतु अशाच अनेक तुकड्या महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी तयार होत होत्या... आणि जमवलेली हि सम्पत्ती या सर्व कामांसाठी वापरली जात होती... हजारोंनी फौज सहज जोपासली जाईल एव्हढी सम्पत्ती होती ती म्हणून रामेश्वर नाईक यांना त्यांची योजना फळास जाईल याची खात्री होती.

पण चांगल्या कामाला अडथळे आल्याशिवाय जमणार कस?,सगळं व्यवस्थित योजनेनुसार चालू असताना अचानक एका व्यक्तीच आगमन तिथं झालं... मकरंद देसाई त्याच नाव होत.किल्लेदार देसाई यांचा सुपूत्र... रामेश्वरांनी राजमाची सोडल्यानन्तर देसाईंना सुळावर दिल गेल होत पण त्यांचा मुलगा मात्र जीवन्त होता,स्वतःच्या वडिलांचा प्रतिशोध घेण्यासाठी मग तो गावात आला ,

मकरंद येऊन सरळ रामेश्वर नाईकांना भेटला,

'या मकरंद,मला माहित आहे तुम्ही इथे का आला आहात ते,मला माहित आहे मी राजीवीर सोबत बरोबर नाही केलं,त्यांना एकट्याला इंग्रजांकडे सोडणं योग्य नव्हतं,,परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता,ते स्वराज्या साठी धोका बनले होते.मला विश्वास आहे तुम्हाला माझी बाजू कळेल,तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही अझूनही आमची मदत करू शकता,,किंवा जर तुमच्या वडिलांचा प्रतिशोध घ्यायचा असेल तर मला क्षमा करा,सध्या तरी मी स्वराज्याच्या कार्यात आहे,,जस हे कार्य पूर्ण होईल तसा मीच स्वतः तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही मला मारू शकता.

'काय म्हणताय नाईक काका.मी आणि तुमच्याशी बदला!!अहो मी इथं तुमच्या सोबत रहायला आलोय,मी बाबांशी कधीच सहमत नव्हतो,एव्हढी सम्पत्ती इंग्रजांना देऊन आपण त्यांचंचाकर बनणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा...मी इथं तुमच्यात सामील होण्यासाठी आलोय,तुमच्या सूख दुःखात वाटेकरी व्हायला,तुमच्या त्या सम्पत्तीत वाटेकरी व्हायला आलोय'

'काय?सम्पत्तीत वाटेकरी व्हायला!!'
हो म्हणजे काय?त्या सम्पत्तीतला तुम्ही अर्धा वाटा मला द्या,मी आनंदात माझ्या कुटुंबासह इथं राहील,बाकी तुम्ही आमच्या पिताश्रींना कैद केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा मला काहीही पस्तावा नाही बघा.'

रामेश्वराना कळालं होत की हा लबाड मकरंद स्वार्थी आहे,सम्पत्ती साठी काहीही करू शकतो,म्हणून त्यांनी त्याला लागलीच नकार दिला आणि गावातून तडीपार केलं.पण याचा प्रभाव पडला उलटाच,जस मकरंद ला तडीपार केलं तसा तो सरळ इंग्रजांकडे गेला आणि त्याने वाड्यात फौज उभारली जात आहे असं सांगितलं, पण मकरंद फारच धूर्त होता,वाड्यात फौज तयार होत आहे हे त्याने जरी सांगितलं तरी सम्पत्तीचा मात्र उल्लेखही केला नाही... इंग्रजांना अस कळताच त्यांनी एक सैन्य तुकडी पाठवली आणि त्या तुकडी चा कॅप्टन केलं मकरंद देसाई ला...
मग काय माकडाच्या हाती कोलीत यावं तसंच झालं.ती आधुनिक शस्त्रांनी रहित फौज घेऊन वाड्यावर हल्ला केला गेला... नाईकांच्या फौजेने निकराचा लढा दिला पण शेवट मात्र अटळ होता... जे व्हायचं तेच झालं,मराठी फौज पुन्हा एकदा फितुरी मुळे हरली.. मकरंद ने नाईक आणि त्यांच्या दोन मुलांना सर्वांसमक्ष सुळावर चढवलं... पण नाईकांची मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यात सफल ठरली आणि तिने तिथून पळ काढला... आता ही छोटी लढाई जिंकल्यानंतर मात्र सगळी सम्पत्ती माझीच या आवेशाने मकरंद हस्तगत करायला निघाला.पण रामेश्वर नाईक हे काही साधे इसम नव्हते.अस कुणाच्याही हाती स्वराज्याचा ठेवा पडू देणार ते नव्हते,ती सगळी सम्पत्ती मंत्र तंत्रानी सुरक्षित केली गेली होती.कोणताही व्यक्ती ज्याला या मंत्रांची जान नाही त्याने या सम्पत्तीला हात जरी लावण म्हणजे आयुष्यभराची कैद,आणि तेच झालं,स्वार्थाने बरबटलेल्या मकरंदने जेव्हा काहीही सुरक्षा न बाळगता सम्पत्तीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला आयुष्यभराची कैद बसली.त्याच शरीर लाकडाचा कोळसा व्हावा तस गळून पडलं,असंख्य वेदनांनी शरीर कळवटून गेलं.तो कायमचा त्या सम्पत्तीचा गुलाम होऊन बसला"

"कैद बसली म्हणजे?म्हणजे नेमकं काय झालं सर?"

"कैद म्हणण्यापेक्षा त्याला वरदान मिळालं जे कोणत्याही शापापेक्षा कमी नव्हतं.वरदान हेच कि ती सर्व सम्पत्ती मकरंद ला मिळणार पण शाप असा की त्या सम्पत्ती पासून सुटका नाही.. आजही त्याची सुटका तिथून झाली नाही असं म्हणतात,दीडशे वर्षाहून अधिक काळ गेला आहे पण अजून सुद्धा तो त्या सम्पत्तीला चिटकून आहे.त्याच्या निरर्थक शरीराने तर कधीच साथ सोडली.पण त्याची आत्मा मात्र अझूनही तिथेच आहे..अनेकांनी त्याला त्या वाड्यात गडगन्ज सोन्यावर बसलेलं बघितलं आहे.मनुष्य किती लालची असावा याची अंतिम मर्यादा म्हणजे मकरंद.
आता तो त्याच सम्पत्तीचा मोह दाखवून त्याने अनेक निर्दोष जीवांना स्वतःच्या बळीचा बकरा बनवलं.
म्हणूनच त्या जंगलात जाण्यास प्रतिबंध आहे जेणेकरून कुणीही त्या सम्पत्तीच्या ओढीने तिथे जाणार नाही आणि त्याच्या जाळ्यात पडणार नाही."

"सर पण अशी कुठली जादू झाली होती जेणेकरून त्याच्यासोबत अस झालं.?"

"जादू तर नाही म्हणता येणार.पण रामेश्वर नाईकांनी त्यांची जी मुलगी होती ना शेवन्ता,, तिच्या अंगठ्यातील रक्ताने ती सगळी सम्पत्ती मंत्र तंत्रानी बांधील केली होती... त्यांना स्वतःपेक्षा शेवन्ता वर खूप जास्त विश्वास होता,त्यांना अघोरी शक्तीचं पण ज्ञान होत त्यांनी अनेक विधी करून एकप्रकारे ती सगळी सम्पत्ती तिच्या नावावरच केली होती .त्यामुळे कोणत्याही परक्या पुरुषाला जर का त्या सम्पत्तीवर अधिकार जमवायचा असल्यास एकतर शेवन्ता सोबत लग्न करावं लागणार ,किंवा पुन्हा एकदा तिच्याच रक्ताने ती सम्पत्ती निमंत्रिक करावी लागणार.
अस म्हणतात की शेवन्ता जेव्हा तिथून निसटली,त्यानंतर काही वर्षांनी ती पुन्हा गावात परतली,पण यावेळी ती विवाहित होती आणि तिला मुलं पण झालं होती,तिने स्वतःची ओळख मात्र कुणालाच होऊ दिली नाही,अस म्हणतात ती स्वतःच नाव बदलून या गावात राहिली,संसार केला आणि या गावातच तिचा मृत्यू झाला,पण तीच कुळ मात्र इथेच वाढलं,अझूनही तिचे अग्रज आपल्या गावात राहतात,पण ते अग्रज कोण हे गावातल्या लोकांना काय साक्षात त्यानाही माहित नाही की तेच शेवंताचे कुळ आहेत म्हणून...तिच्या पिढ्या याच मातीत वाढल्या,तिच्या पिढ्यांच्या धमण्यात पण तीचंच रक्त वाहत आहे... जर का तिच्याच घराण्यातील कोणत्या मुलीच्या रक्ताने जर का ती सम्पत्ती निमंत्रिक केली तर मकरंद कदाचित मुक्त सुद्धा होऊ शकेल अस म्हणतात.... हो पण शेकडो वर्षे बंधीस्त आत्मा आहे ती ,एकदा का मुक्त झाली की मग त्याच्या रागाला मात्र सीमाच उरणार नाही अन त्यानंतर काय होईल याची कल्पनाच फार भयानक वाटते."

क्रमश: