Pralay - 29 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - २९

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रलय - २९

क्यमःश-२९

विश्वनाथ भैरव आणि पार्थव काळ्या भिंतीपाशी आले .
" तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..." भैरव म्हणाला
" चिंता नको काही क्षणात ही भिंत कोसळलेली असेल ...." विश्वनाथ म्हणाला . नंतर त्यांनी आणलेल्या गोष्टी मांडायला सुरुवात केली . विचित्र भाषेत कसलेतरी मंत्र तो उच्चारत होता . मधुमोध पेटवलेल्या अग्निकुंडात एकापाठोपाठ एक आहुती देत होता . त्यातूनही चित्रविचित्र आवाज निघत होते . पण भिंत अजून हलली सुद्धा नव्हती .
" काही होत नाही वाटतं . किती वेळ झाला ....." भैरव म्हणाला .
" विक्रमासाठी तुम्ही इतकी वर्षे वाट बघितली , अजून काही क्षण वाट पाहू शकत नाही का तुम्ही....
अजूनही बराच वेळ तो काहीतरी मंत्रोच्चारात राहिला व त्या आगीत काही ना काही टाकत राहिला शेवटी तो उभा राहिला . उजव्या हाताच्या खूप धरत त्याने डावा हाताचा पंजा कापला . ते रक्त अग्निकुंडात पडताच साप फुत्कारल्याप्रमाणे फुस्ससssss असा आवाज होत अग्निकुंडतून लाल धूर निघू लागला. सर्वत्र जळक्या माणसाचा वास सुटला त्या दोराने दोरखंड सारखा आकार धारण करत भैरव पार्थव व विश्वनाथ या तिघांनाही काळा भिंतीवरती काळ्या महलाकडील बाजूला बरोबर मधोमध बांधून टाकले . तिघांनीही सुटण्याची धडपड सुरू केली तसा तसा तो दोरखंड अधिक जाड होत ते लाल मांस त्यांच्या शरीराभोवती सर्वत्र पसरू लागले .

" जास्त हालचाल करू नका , अन्यथा गुदमरून मराल ...." कनिष्क भिंतीवरून बोलला .
" आश्चर्य वाटले ना , भिंत पडली नाही आणि आपलाच विधी आपल्यावरतीच उलटला ....." चैतन्य आबाजीला डिवचत म्हणाला .
" आम्हाला वाटलंच होतं त्या बिया मध्ये काहीतरी घोळ आहे म्हणून . पण आयुष्यमानच्या डोक्यात मोहिनी बसलेली होती . मग आम्ही दोघांनी तपास केला तेव्हा आम्हाला विश्वनाथ उर्फ वेड्या आबाजीचे कारणामे कळाले . .." कनिष्क बोलत होता . " सर्व ज्येष्ठांचे खून घडवून आणले पण मोहिनीचे वडीलही ज्येष्ठ होते हे तू विसरला वाटतं . त्यांच्याकडून सारी माहिती काढली व तुझा डाव तुझ्यावरतीच उलटवला.....

विश्वनाथ मात्र वेड्यासारखा हसत सुटला .
" मला कल्पना होतीच असं काहीतरी होईल म्हणून. म्हणूनच मी पूर्वतयारी केली होती ...." त्यांनी त्याच्या गळ्यातला दोर तोंडाने ओढला . कसलीतरी धूळ उडाली व विश्वनाथ तिथून गायब झाला .

विश्वनाथ गायब झाला होता , पण भैरव आणि पार्थ दोघे तिथेच होते .
" या दोघांचं काय करायचं...." चैतन्य म्हणाला .
" या दोघांनीच तर सारा गोंधळ माजवलाय . प्रलय काय प्रलयकारिका काय ......" कनिष्क भिंतीपलीकडे रागाच्या भरात गेला. त्याने दोघांचेही गुडघ्यापासून पाय व कोपरापासून हात तोडून टाकले. दोघेही गुरासारखे ओरडत होते . पण त्यांना काही करताहेत नव्हतं . कारण दोघेही भिंतीला पुतळ्याप्रमाणे चिटकले होते . जखमांमधून रक्त वाहत होतं . वाहणारं रक्त थांबावं म्हणून कनिष्काने कसलीतरी भुकटी त्या जखमांवरती टाकली .
भैरव हा साऱ्या पृथ्वीतलावरती राज्य करायला निघाला होता . साऱ्या काही गोष्टीचं त्यांनं नियोजन केलं होतं . पण प्रत्येक गोष्ट नियोजन करून करता येते असं नाही . सारंकाही नियोजन केल्याप्रमाणे घडतच असं नाही.....

लोहगड ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा असा उठाव होऊ नये म्हणून अंकितने एक उत्सव ठेवला होता . नाव उत्सवाचे होते खरे पण कारण होते लोक एकत्र यावे . एकमेकांबद्दलचा द्वेषभाव कमी व्हावा . हेवेदावे काही असतील तर ते बाहेर पडावेत . पण हा उत्सव रक्तरंजित होणार होता . कारण प्रलयकारीका तिथे पोहचली होती . भैरवाने सांगितल्याप्रमाणे संसाधन राज्यावरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ती त्या ठिकाणी आली होती . प्रलयकारीकेला अंकितचा शिरच्छेद सहज करता आला असता . सार्‍या संसाधन राज्य सत्ता गाजवण्यासाठी फक्त तिच्या डोळेच भरपूर होते . पण तिच्या डोक्यात एक क्रूर खेळाची कल्पना भरली होती .

ती हवेत उंच उडाली . तिचे डोळे आता पूर्णपणे काळेकुट्ट होते . तिच्या संपूर्ण शरीरावर ती काळसर वलय होते . त्या ठिकाणचा प्रत्येक जण जागेला स्थिर झाला . कोणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे हालचाल करता येईना .
" मी या क्षणी तुम्हा साऱ्यांना जागीच ठार करू शकते . पण त्यात काहीच मज्जा नाही . त्यामुळे तुमच्यातल्या काही लोकांना जगण्याची संधी मी देणार आहे . मला फक्त तुमच्या राजाचे मस्तक हवे आहे . जो कोणी मला ते मस्तक देईल , तो पुढचा राजा असेल . आणि त्याला जे हवे आहेत तेच लोक फक्त जिवंत राहतील .......
आणि तिने साऱ्यांना हालचाल करण्याची मुभा दिली . त्याबरोबर दहा-पंधरा सैनिक शस्त्रांकडे धावले .
" अरे वा इतक्या लवकर तुटली का तुमची ऐकी....... " सैनिकांनी घेतलेले भाले प्रलयकारिकेकडे फेकून मारले . तिने ते सहजपणे चुकवले . " ही मात्र फार मोठी चूक केली .......
असं म्हणत तिने तिच्या त्यांची हालचाल केली . ते पंधरा सैनिक एकमेकांवर धावून गेले . स्वतःची इच्छा नसतानाही त्यांनी स्वतःच्याच मित्रांना जीवे मारले . एकमेकांची मस्तके धडावेगळी केली . बाकीचे लोक अजूनही जागेला स्थिर होते .
" या खेळात काही मज्जा आली नाही . आपण एक नवीन खेळ खेळूया . जर तुमच्या राजाने उजव्या हातातील तलवारीने त्याचा डावा हात कापला नाही तर ही लहान मुले मरतील ...... त्याचवेळी तेथील सैनिकांनी लहान मुलांना उचलून घेतले व त्यांच्या गळ्याला चाकू लावला . त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे शरीर काम करत होते. साऱ्यांच्या शरीरावर तिचे नियंत्रण होते .
" अंकित मला सांग बर तुझा हात महत्वाचा आहे की या लहान मुलांचे आयुष्य .... लवकर ठरव नाहीतर एक एक लहान मूल मरेल बघ ......
अंकितने तलवार घेतली व हात जमिनीवर ठेवला . तो हात तोडण्यासाठी तयार होता . त्याला हात तोडावाच लागणार होता . कारण ती लहान मुलांचा जीव घ्यायला मागेपुढे बघणार नव्हती . त्याने तलवार जोरात उचलली आणि एक किंकाळी घुमली . त्याचा हात मनगटापासून तुटून पडला होता . रक्ताच्या धारा वहात होत्या .
" अरे वा राजाचे खरेच प्रेम आहे म्हणायचे.... " सैनिकांनी त्या लहान मुलांना खाली सोडले . मात्र तिच्या डोक्यात आता वेगळीच युक्ती आली होती . तिने त्या लहान मुलांच्या हातात तलवारी उचलायला लावल्या होत्या . त्या तलवारींनी तिने सैनिकांना मारून टाकले . तिने लहान मुलांच्या हस्ते त्या सैनिकांच्या हत्या घडवल्या होत्या .

संसाधन राज्यात रक्तरंजित खेळ सुरू असतानाच आग्नेय राज्यात त्या तीन बहिणींनी प्रलयकारिकेला थांबवण्यासाठी विधी सुरू केला होता . प्रत्येकीच्या गर्भाशयात एका राजाची बीज होते . तिघांचेही हात एकमेकींच्या हातात होते व तिघीही कोणतातरी मंत्र गुणगुणत होत्या . त्या ठिकाणी काही वेळानंतर अग्नि जल आणि वायूचा एकावेळी तांडव सुरू झाला . प्रत्येकीच्या गर्भातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता . एक तांबडा अग्नीसारखा , एक निळा पाण्यासारखा आणि पांढरट वायुसारखा . तीन रंगाचे तीन धागे एकत्र येत एक मानवी आकृती तयार झाली व हवेत विरून गेली . त्या तिघीही जागीच बेशुद्ध झाल्या .
त्याच अग्नि जल आणि वायू च्या शक्तीपासून बनलेल्या मानवी आकृती ने अंकितची निवड केली होती . तुटलेला हात नीट होत त्याने त्याचे रूप बदलले . तो अधिक उंच धिप्पाड होत गेला . साधारण मानवापेक्षा तीन ते चार पटीने तो उंच धिप्पाड होता . त्याची शक्तीही कितीतरी पटीने अधिक होती . त्याच्यावरती आता प्रलयकारिकेचे नियंत्रण चालत नव्हते . तो सरळ तिच्या वरती धावून गेला . हवेत मध्यंतरी तरंगणाऱ्या प्रलयकारीकेला खाली पाडत त्याने तिला दगडावरती जोरात आपटले . ती पडलेली असताना त्यांनी बाजूला पडलेला एक मोठा दगड घेऊन तिच्यावरती फेकला पण तिने तो दगड चुकवला . तिने तिच्या नियंत्रणाखाली असलेली सामान्य माणसे अंकितवरती पाठवून दिली व ती पळून जाऊ लागली . पण अंकितने उंच उडी मारत हवेतच तिला पकडले . एका हातात तलवार घेऊन तो तिच्यावर ती चालवणार तेव्हाच सुरूकु तिथे आला .

अंकितला तोंडात पकडत त्याने लांब फेकून दिले . तोपर्यंत आयुष्यमान प्रलयकारीकेला घेत सुरूकूवरती बसला व तिघेही तिथून निघून गेले ...
क्रमःश...