Taxi in Marathi Short Stories by suresh kulkarni books and stories PDF | टॅक्सी !

Featured Books
  • انکہی محبت

    ️ نورِ حیاتحصہ اول: الماس… خاموش محبت کا آئینہکالج کی پہلی ص...

  • شور

    شاعری کا سفر شاعری کے سفر میں شاعر چاند ستاروں سے آگے نکل گی...

  • Murda Khat

    صبح کے پانچ بج رہے تھے۔ سفید دیوار پر لگی گھڑی کی سوئیاں تھک...

  • پاپا کی سیٹی

    پاپا کی سیٹییہ کہانی میں نے اُس لمحے شروع کی تھی،جب ایک ورکش...

  • Khak O Khwab

    خاک و خواب"(خواب جو خاک میں ملے، اور خاک سے جنم لینے والی نئ...

Categories
Share

टॅक्सी !

शंकर मुडकेचा बेचव चहा आणि तिखटजाळ सामोसा खाल्ल्याशिवाय आमच्या ऑफिसात कोणीच कामाला सुरवात करत नाही. तसा तो खाऊन आम्ही रोजच्या प्रमाणे आजही सुरवात केली. पण आज काहीसा वेगळाच दिवस होता.
माझ्या टेबलवरला तो, कावळ्या सारखा काळाकुट्ट फोन केकाटला. हा लँडलाईन सेट सात वर्षा खाली घेतला होता. मालकाला तो लकी म्हणून अजून तसाच आहे.
" नमस्कार,दैनिक दिनकर, बोला " मी यांत्रिकपणे बोलायला सुरवात केली.
"चीफ एडिटर?"
"हा, बोलतोय."
"काहो? मुंबईत म्हणे एक अशी टॅक्सी आहे जी तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते!"
"अहो, अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. अशी टॅक्सी कशी असू शकते का? "
"नाही म्हटलं, तुम्ही पेपरवाले तुम्हाला अश्या बातम्या माहित असत्यात."
"अशी काही अधिकृत बातमी आत्ता पर्यंत तरी आमच्या पर्यंत आलेली नाही. अली तर उद्या पेपरात तुम्हाला नक्की दिसेल. धन्यवाद." मी फोन कट केला. काय एक एक महाभाग असतात? काय तर म्हणे 'तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेत नाही, तर तुम्ही ज्या जागी हवे आहेत तेथे नेते!अशी टॅक्सी!'
पुन्हा फोन वाजला.
"नमस्कार --"
"नक्की अशी टॅक्सी नाहीना?--"माघाचाच आवाज.
हा मुडदा समोर असतातर त्याचा पुन्हा मुडदा पाडला असता. एकदा सांगून काळात का नाही?
"अहो, कितीदा सांगायचं --"
" नाही म्हणजे तो धुमाळ म्हणत होता, --- पण तो खोटे बोलत असेल. "
मी काही सुनवायच्या आत त्यानेच फोन बंद केला. दुसऱ्या क्षणी पुन्हा रिंग वाजली. साला वैताग. मी रागाने रीसिव्हर उचलला.
"अबे,भाड्खाऊ ---"
"तोड सांभाळा कुलकर्णी! मी देवधर बोलतोय!" देवधर माझा बॉस!
"सॉरी सर ,एक फोन मघापसन ---"
"उद्या बेंगलोरला सकाळी नवाला एडिटर्स मिट आहे. आपले सारे फॉरेन करसपोंडडट येणार आहेत तुमी मुंबई रीप्रेझेनट करा. बाय." माझा 'ह्याव अ गुड डे' न ऐकताच बाबाने फोन कट केला. बोंबला म्हणजे आज झोपेचे खोबरे.
लॅपटॉप जवळ ओढला. बेंगलोर फ्लाईट बुक केली. पहाटे चारचा डिपार्चर होता. दोन तास घरा पासून एअर्पोट, तास भर चेकइन साठी आणि अर्धातास बफर. म्हणजे रात्री बारा ते एकच्या दरम्यान घर सोडायला पाहिजे. कॅब बुक केली. पुन्हा फोन किंकाळला. हे दिवसभर चालू असत.
"नमस्कार, दैनिक दिनकर. बोला "
"मी डॉ. अभ्यंकर, मला एक थँक्स द्यायकचे आहेत एका अननोन टॅक्सी ड्रॉयव्हरला. "
डॉ अभ्यंकर म्हणजे मुंबईतील बड प्रस्थ! नामवंत न्यूरोसर्जन! अन फोनवर!
"बोला डॉक्टर साहेब. काय झाले?"
"गोष्ट काल रात्रीची आहे. माझी गाडी बिघडली म्हणून मी टॅक्सी बुक केली. घरचा पत्ता ड्रॉयव्हरला सांगून गाडीत बसलो. गाडी थांबली, मी उतरलो पण ते माझे घर नव्हते! माझ्या समोर नुकतीच एक प्रवासी बस अपघात ग्रस्त झाली होती! लोक विव्हळत होते, काही मदतीसाठी टाहो फोडत होते! परिस्थितीची मला जाणीव झाली. मी माझ्या हॉस्पिटल स्टाफ, पोलीस, ऍम्बुलन्सला भराभर फोन केले. काही वेळात सरकारी फौज आली. तोवर जमेल तसा लोकांना मदत आणि धीर देत होतो. फार नाही पण काही जणांचे प्राण वाचवण्यात माझी मदत झाली. माझी नेमकी जेथे गरज आहे, तेथे मला पोहंचवणाऱ्या टॅक्सी ड्रॉयव्हरचे आभार मानायचे आहेत. या गडबडीत त्याचे भाडे पण द्यावयाचे राहून गेले आहे.! प्लिज एखाद्या कोपऱ्यात या माणुसकीच्या बातमीसाठी जागा द्या. आणि हो त्या ड्रॉयव्हरला मला भेटण्याचे अपील करा!"
"जरूर ती मी सोया करतो."
थँक म्हणत डॉक्टरांनी फोन ठेवला. मघाशी त्या बावळट माणसाचा फोन आणि हि डॉक्टर अभ्यंकरांनाची बातमी! सत्य का योगा योग? मी एक छोटी नोट तयार केली.
"आनंद!" माझ्या असिस्टंटला आवाज दिला .
"सर?"
"आनंद, एखादी फिलरसाठी आलेली चारोळी, कविता कमी कर, हि नोट नजरे खालून घाल आणि पेपरला घे. आणि हो मी आता निघतो उद्या बेंगलोरला मिटिंग साठी जायचे आहे. थोडी झोप काढतो. "
"ओके. "
मी टेबलवरला पसारा आवरून घरी निघालो.
०००
"कारे, आज दुपारीच परतलास? बरे नाही का काय?" अंजलीने दार उघडताच विचारणा केली.
"आग, सगळं ठीक आहे. प्रकृती पण मस्त आहे. "
"मग ?"
"उद्या बेंगलोरला मिटिंग आहे. रात्री चारची फ्लाईट आहे. झोपेचं खोबर होणार. म्हणून जमेल तेव्हडी दुपारी झोप काढावी म्हणून लवकर आलो. "
"मला वाटले माझी आठवण ----"
" अंजली, तू माझ्या आत्मा -जीव कि प्राण --जान -जिंदगी --आहेस! तू नेहमीच माझ्या सोबत असतेस! "
"बस,बस नको इतकं प्रेम उतू घालूस! जेवलास का? नसता जेवून घे. ताक केलंय.पी. आणि झोप."
मी बेड रूम कडे मोर्चा वळवला. कपडे बदले. ताक पिले. अन झोपी गेलो.
०००
अंजलीने उठवले तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते. फ्रेश झालो.
"चल, अंजु जेवण करून घेवूत. मग तू झोपी जा. "
"नको, मी आज जेवणार नाही. अरे, दुपार पसन छातीत जळजळतंय. थोडं दूध पिऊन झोपणारय. "
अंजलीच हे नेहमीच आहे. अरबट चरबीत खाते अन मग पित्त होत, डोकं दुखत.
मी जेवण केलं. थोडी मीटिंगची तयारी करायची होती, त्याच्या नादी लागलो.

कॅबला रात्री बरोबर बारा विसला येण्या साठी बजावले होते आणि बारा विसला कॅब दाराबाहेर थांबली.!
अंजलीचा नुकताच डोळा लागला होता. तिला उठवणे जीवावर आले. जवळच्या चवीने घराचे मेन डोर लॉक करून टॅक्सीत बसलो. आभाळ भरून आलं असावं हवेत उष्मा वाढला होता. टॅक्सिच्या ए सी मध्ये डोळे मिटून मागे टेकलो. गाडीने वेग घेतला. तोच मोबाईल वाजला.
"बोल आनंद!"
" सॉरी, सर. दुपारची अभ्यंकरांची नोट चुकून खिशातच राहिली. आत्ता लक्षात आलं. तरी प्रिंटिंग सेक्शनला गेलो होतो, पण पेपर लोड झाला होता. "
"ठीक आहे. उद्या मात्र आठवणीने टाक. एक अपॉलॉजीचा फोन डॉक्टरांना कर बाकी घे सांभाळून. "
मी पुन्हा डोळे मिटून मागे टेकलो.
साधारण तासाभराने कॅबचा वेग वाढल्याचे जाणवले. डोळे उघडून पाहतो तो स्ट्रीट लाईट बंद. सर्वत्र अंधार. बाहेर पाऊस सुरु झालेला. कोणत्या भागात आहोत हेही कळेना.
"काय झालाय?"मी ड्रॉयव्हरला विचारले .
"बारिश है साब. इसलिये बत्ती गुल हो गयिली होगी. "
"आपण वेळेत पोहांचूना?"
" हा, आप फिकर मत करो. टाइम पर और सही मोके पर पोहचा दूंगा! "
दहा पंधरा मिनिटातच कचकन ब्रेक मारून कॅब थांबली.
समोर 'अपोलो हॉस्पिटल' ची निऑन पाटी चकाकत होती! दवाखान्याच्या इमर्जन्सी डोर वर माझी टॅक्सी पार्क झाली होती!
"आबे, तेरेको एयरपोर्ट बोला था ---"माझे शब्द घशातच राहिले. तेव्हड्यात सफाईदार वळण घेऊन सायरन वाजवत ती छोटी ऍम्ब्युलन्स माझ्याटॅक्सी समोर थांबली. मागचे दार उघडून, आमच्या शेजारचा शेखरने बाहेर उडी मारूनच ऍम्ब्युलन्स मधून उतरला. लगोलग पेशंटला स्ट्रेचर वरून बाहेर घेतले. माझ्या पाय खालची जमीनच खचली. स्ट्रेचरवर अंजली होती! .
०००

अंजलीला आय सी सी यु मध्ये ऍडमिट केले होते . इमर्जन्सी होती. इ सी जि ऍबनॉर्मल होता. पण ती आता डॉक्टरांच्या देखरेखेखाली होती. थोडे स्थिरावल्यावर मी शेखरला विचारले.
"काय झालं होत?"
"तुम्ही गेल्यावर काकूंनी मला आवाज दिला. त्या खूप घाबरल्या होत्या. दम लागला होता. छातीत जाळ होतोय म्हणाल्या . जबडा पण दुखतोय म्हणाल्या. मी तुम्हाला फोन लावला, 'नॉट रिचेबल ' आला. मग ऍम्ब्युलन्स मागवली! पण तुम्ही येथे अगदी वेळेवर कसे? संध्याकाळी तुम्ही बेंगलोरला जाणार म्हणत होत्या काकू!"
"अरे, मी एअरपोर्ट साठी निघालोच होतो ----" काही तरी आठवून मी मोबाईल काढला. त्यावर मी बुक केलेल्या टॅक्सीचा 'गाडी फेल हुवा है ,दुसरा कॅब बुक करो' मेसेज होता!
मग मला घेऊन निघालेली आणि येथे आणणारी कॅब कोणती होती?
मी फोन लावला. मी बराच वेळ बोलत होतो. आणि शेवटी म्हणालो.
"आनंद, त्या चारोळ्या, कविता फिलरलाच राहू दे! आणि ती 'अँन्जिल टॅक्सी' हेड लाईनला घे! डॉक्टर अभ्यंकरानं सोबत माझी घटना पण टाक!"

सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .