Pralay - 9 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - ९

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

प्रलय - ९

प्रलय-०९

         संसाधन राज्ये .  पृथ्वीतलावरती सर्वात मोठ्या प्रमाणात खनिजाचा साठा असलेली ही पाच राज्ये एकमेकाला लागून मोठ्या प्रदेशावर पसरलेली होती .  सुवर्ण नगर हे सोन्यासाठी प्रसिद्ध होत . लोहगड हे राज्य लोह नि त्यासदृश्य धातूंसाठी व रत्न पंचक हे राज्य रत्नासाठी प्रसिद्ध होते .  अग्नी व ज्वाला  ही राज्ये खनिज तेल व कोळशासारख्या पदार्थांसाठी प्रसिद्ध होती..........
      पृथ्वीतलावरील इतर भागातही खनिज संपत्ती विपुल प्रमाणात सापडत होती .  पण ज्या त्या राज्यात सापडणाऱ्या साधनसंपत्तीवर ज्या त्या राज्याचा अधिकार होता .  पण या पाच राज्यातील संपत्तीवरती संपूर्ण पृथ्वीतलाचा अधिकार होता . प्रत्येक राज्याचा हिस्सा ज्या त्या राज्याला पुरवला जाई . प्रत्येक राज्याची त्याठिकाणी भागीदारी होती . प्रत्येक राज्यातील सैनिकांची तुकडी त्या ठिकाणी उपस्थित होती .  प्रत्येक राज्याचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होता . सर्व राज्यांनी मिळून त्या ठिकाणी असलेली मूळ रहिवाशांना ही  संपत्ती खाणायचा  रोजगार दिला होता .  त्याबदल्यात त्यांना अन्न वस्त्र निवारा या  मूलभूत गरजा पुरवल्या जात होत्या .  ज्या त्या स्वतः पुरूवू शकत नव्हते . तेथील मूळ रहिवाशांना मातीतले  लोक असं म्हटलं जाई . 

     पण हे सगळं विद्यार्थीदशेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी होतं . त्या पाच राज्यात मात्र उलटाच कारभार चालत होता .  जोपर्यंत त्या ठिकाणी कोणीही बाहेरचा माणूस गेला नव्हता तोपर्यंत तेथील  जमात सुखाने त्यांचे त्यांचे जीवन जगत होती .  तेथील मूळ रहिवाशांचे जीवन शिकारीवरती असायचं .  त्यांना शेती माहीत नव्हती व ते टोळ्याटोळ्यांनी नेहमी फिरत राहायचे. जेव्हा हे लोक त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन त्या सर्वांना शस्त्रांच्या जोरावर खान काम करायला भाग पाडलं .  सर्वांना जुलूम जबरदस्ती ने कामाला लावले .  कितीतरी शतके ही गुलामगिरीत चालू होती .  त्याला कोणी विरोध केला नव्हता .  सर्व राज्यांनी   त्याला मूक संमती दिली होती . वेळोवेळी मूळ रहिवासी या साऱ्याला विरोध करत होते . उठाव करत होते पण त्यांचा उठाव यशस्वी झाला नव्हता . या साऱ्यांमध्ये हाल होते तेथील सामान्य जनतेचे . तेथील मूळ रहिवाशांचे म्हणजेच मातीतल्या लोकांचे .  मातीतल्या लोकांची संख्या कमी नव्हती . पण ती मागासलेली असल्यामुळे त्यांच्यावरती या सर्व राज्यांनी मिळून गुलामगिरी लादली होती . त्यांना दररोज खाणीत काम करावे लागे . अकरा वर्षाच्या मुलापासून मरेपर्यंत प्रत्येकाला काम करावे लागे .  ज्याला कोणालाही काम होत नसे त्याला एक तर मरावं लागे किंवा आपण दुसऱ्या कोणत्यातरी कामाच्या लायक आहोत हे दाखवून द्यावं लागे . हे सर्व  चालू असताना सर्व राजे चूप होते . पण अकराव्या महाराज कैरवांनी , म्हणजे  आता राज्य करत असलेल्या कैरव महाराजांनी  , त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष या गुलामांना मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी घालवली होती . आज त्यांच्या कृपेमुळेच मातीतल्या लोकांचे कामाचे तास कमी झाले होते .  वृद्धांना काम करण्याची गरज नव्हती . लहान मुलांना खेळण्याची परवानगी होते .  विश्रांती , अन्न-वस्त्र-निवारा  व इतर बऱ्याच सुविधा त्यांच्यामुळे मिळाल्या होत्या .  मातीतल्या लोकांना त्यांचे सण-उत्सव साजरे करायची परवानगी नव्हती , पण कैरव महाराजांनी त्यांना तीही उपलब्ध करून दिली . इतर राज्यांनी मात्र कैरवांना याबाबतीत वेड्यात काढलं होतं . या सर्वांच्या बदल्यात कैरव महाराज आपल्यातील खनिज संपत्तीचा बराच भाग इतर राज्यांना देत होते . पण तरीही ती गुलामगिरी होती .  कैरवांनी कधीच गुलामगिरीची भलावण केली नाही , पण संपूर्ण जगाच्या विरोधात ते जाऊ शकत नव्हते . त्यामुळे बळजबरीने का असेना त्यांनी या व्यवस्थेला मान्यता दिली होती .

      या पाच राज्यांसाठी सर्व राज्यांनी मिळून पाच राजे नेमले होते .  ते पाच राजे या ठिकाणी राज्य करत होते व ज्याची त्याची खनिज संपत्ती ज्याच्या त्याच्या कडे पोच करत होते. हे पाच राजे  सुरुवातीला निवडले गेले होते पुढे पिढ्यानपिढ्या तीच  पाच राजघराणी चालत आली होती. या पाच राज्यांची राजसत्ता या संसाधन राज्यावरती होती  .  या पाच राजांकडे स्वतःचं असं सैन्य नव्हतं.  इतर सर्व राज्यांच्या सैन्य व इतर पाठबळ या राज्यांना होतं . त्यांना फक्त एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे गुलामांना वरती नियंत्रण ठेवायचं त्यांच्याकडून खनिज संपत्ती काढून घ्यायची व जिकडेतिकडे पोच करायची  . 

       पण संसाधन राज्यात आता मातीतल्या लोकांची सत्ता होती . मातीतल्या लोकांनी  पाच राजांना तुरुंगात टाकले होते  . मातीतल्या लोकांनी आपला राजा पाच राज्यांच्यासाठी निवडला होता . त्या राजाच्या नेतृत्वाखाली सर्व मातीतल्या लोकांनी मिळून उठाव केला .  सर्व सैनिकी तुकड्या , राजे यांना तुरुंगात बंदी बनवून पाच राज्यांचा कारभार त्यांच्या स्वतःच्या हाती घेतला . सर्व जगाला कळावं म्हणून त्या पाच राजांना मदतीसाठी पत्र पाठवण्याची व्यवस्था करून दिली होती . तेच पत्र घेऊन दूत सर्व राज्यांमध्ये गेला होता . 

     रक्षक राज्यात आलेला दूत मृत्युमुखी पडला होता महाराज विक्रमांनी सर्वांना आदेश दिला . 
" आपल्या राज्यातील सर्व सैन्य गोळा करा जे सैनिक सुट्टीवर ती असतील त्यांनाही बोलून घ्या , सर्व सैन्यांना गोळा करून काळ्या विहिरीपाशी जमा......
जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर . आता काळी भिंत पाडल्या वाचून पर्याय नाही .  हे सर्व शत्रू व दहशतवादी तिकडुनच येत आहेत .  काळी भिंत पाडून आपण त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना जिंकून घेऊ .   नंतर संसाधन राज्यांकडे जाऊन तीही आपल्या ताब्यात घेऊ . सर्व सैनिक गोळा होऊन काळ्या विहिरीपाशी जमा हा आपला युद्ध काळ आहे... साऱ्या जगाला कळले पाहिजे रक्षक राज्याने जेव्हा रक्षण सोडून आक्रमण केलं त्यावेळी संपूर्ण जग त्याच्या पायापाशी झुकलं.......
ज्यांनी ज्यांनी आपला अपमान केला होता त्या साऱ्यांचा प्रतिशोध घेण्याची वेळ आली आहे..... .....

    आणखी बऱ्याच गोष्टींवरती महाराज विक्रमांनी भाषण केलं . या भाषणानंतर मात्र त्यांचा प्रभाव चांगला पडला . सर्व राज्यांमध्ये एक नवा हुरूप साकारला . जो तो लढाईच्या गोष्टी करू लागला , अपमानाचा प्रतिशोध ,  देशद्रोह्यांना शिक्षा , राष्ट्रभक्ती , देशभक्ती या वरती जो तो बोलू लागला.....

        या राष्ट्रवादाच्या उन्मादात सारेजण काळी भिंत व तिची आख्यायिका विसरून गेले . ती पाडल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा साऱ्यांना विसर पडला .  राष्ट्रभक्तीचा ताप इतका चढला होता की खऱ्या समस्यांचा साऱ्यांना विसर पडला होता   .  काळ्या विहिरीच्या परिसराला सैनिक छावणीचे रूप आलं होतं . पण सगळेच सैनिक त्या ठिकाणी नव्हते  . काहीजणांचं डोकं ठिकाणावर  होतं . ते डोकं ठिकाणावर असलेल्या सैनिकांपैकी अधिरत  होता . 

    सरोज जोपर्यंत माघारी परतून आली होती तोपर्यंत बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या .  तिचा महालाची  अवस्था झाली होती .  जागोजागी झटपटीची चिन्हे दिसत होती .  आधिरथही सुटून गेला होता . तिची एकही मैत्रीण तिला दिसत नव्हते.  तिने काढायचा तो अर्थ काढला .  तिला वाटलं अधिरथ सुटून गेला ,  नंतर सर्व सैनिकांना आणून त्याने तिच्या मैत्रिणींना बंदी बनवून दिले असावे...... ज्या मैत्रिणीसाठी ती भिल्लवाला सोडून आली होती , त्याच मैत्रिणींना बंदी बनवलं तर तिला या ठिकाणी राहून काहीच उपयोग नव्हता ती बाहेर पडायला निघाली . त्याचवेळी मागून आवाज आला...

" तुझ्या मैत्रिणींना तू सोडणार नाहीस का ...? हीच का तुझी मैत्री.....
 तो अधीरताचा आवाज होता . ती लढण्याच्या सावध पवित्र्यात आली....
" तू मैत्रीबद्दल बोलू नको .  भिल्लव तुझा मित्र नव्हता तर काय.....?  त्याच्यावरती तलवार घेऊन धावून आला होतास....
" त्यावेळी माझे डोळे झाकले होते . मला खरच वाटलं होतं तो देशद्रोही आहे , पण आता महाराजांनी जे काही चालवलेलं आहे ,  ते पाहून मला भिल्लवाच म्हणंण योग्य वाटतय ,  त्यासाठीच मला तुझी मदत पाहिजे.....
 
    सरोज वैतागली ,  चिडुन बोलली , "  एक तर माझ्या मैत्रिणींना तू बंदी बनवलं , आणि वरून माझीच मदत मागतोय तुला लाज कशी वाटत नाही.......

" तुला खरंच वाटतं काय मी निष्पाप मुलींना बंदी बनवून तुरुंगात टाकीन . मी त्यांना व्यवस्थित नगराबाहेर सोडलेलं आहे आणि हे  मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नको ......

त्याने अजून कोणाला तरी बाहेर बोलावलं .  ती शालीनी होती .  तिने सरोजला सांगितलं कि अधिरतने त्यांच्या सर्व मैत्रिणींना नगराबाहेर व्यवस्थित पोच करून ,  तिची वाट पाहतो येथे थांबला होता........

" माझ्याकडून कसली मदत हवी आहे तुला.....
" आपल्याला काही कैद्यांना सोडवायचा आहे तुरुंगातून ......
" पुन्हा त्या तुरुंगात जाणार नाही मी , मागच्या वेळेस कशीतरी वाचले.....
" तू भिल्लावाला बरोबर गेली होतीस .  मला तो भुयारी रस्ता माहित नाही ,  म्हणून मी तुझी मदत मागत आहे.... आणि तुरुंगात आहे ते माझे खास मित्र आहेत .  अद्वैत आणि त्याचे साथीदार .  त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत ज्या भिल्लवाला ही माहित असायला पाहिजेत..... तू त्यांना सोडवायला माझी मदत कर मी तुला  भिल्लवापर्यंत पोहोचायला मदत करीन......
    सरोजला आता नगरात राहण्याचे काही प्रयोजन नव्हते . तिच्या सर्व मैत्रिणी सुखरूप होत्या .  तिला आता भिल्लावा बरोबर जायचे होते . त्यामुळे अधिरताला मदत करायला तयार झाली .  दोघांनी अद्वैत व त्याच्या मित्रांना सोडवायची जबाबदारी घेतली.....

      तो सिंह आणि तो रेडा  दोघेही जागेला स्तब्ध झाले होते .  आकाशातून आलेल्या गरुडाने त्या लहान मुलाला व्यवस्थितपणे खाली ठेवलं होतं , आणि तेव्हाच मागून घोडा येत असल्याचा आवाज आला . त्या घोड्यावर तीच होती जिला त्यांनी माघारी पाठवलं होतं . ती कधी माघारी गेलीच नव्हती ,  त्यांच्यामागून येत होती , इतक्या गुपचूपपणे की त्या दोघांनाही समजले नव्हते .....

    घोड्यावरून उतरला ती म्हणाली 
   " म्हणून मी म्हणत होते , मला बरोबर येऊ द्या . माझी गरज आहे तुम्हाला . तुमचा प्रवास सुखाचा झाला असता.....
   आयुष्यमानला तिला पाहून खरंतर आनंद झाला होता .  पण कुठे तरी त्याचा पुरुषी स्वाभिमान दुखावला गेला होता . तो हे सर्व काही करू शकत होता , किंवा नव्हता .  तरीही एका स्त्रीने येऊन त्याला मदत करावी व शब्द सुनाववे हे त्याच्या पुरुषी मनाला न पटणारे होता.....

तो तिच्यावर ती ओरडत म्हणाला 

    " तू इथं काय करतेस .....? आम्ही तुला माघारी जायला सांगितलं होतं . तू आमच्या मागे मागे येऊन नकोस . आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत .  तू तुझी शक्ती तुझ्यापाशी ठेव . आम्हाला त्याची गरज नाही . आम्ही वारसदार आहोत आणि आम्ही आमचं कार्य कोणत्याही शक्ती विना करू शकतो......
    तो हे सर्व खूप मोठ्या आवाजात एका दमात बोलून गेला . पण दुसर्‍या क्षणी त्याला वाटलं की हे सर्व ऐकून तिला वाईट वाटेल ,  म्हणून झालेली चूक सावरत काळजीच्या सुरात तिला म्हणाला....
" मला तुझं नाव नाही माहित नाही .  पण जेव्हा पासून मी तुला पाहिले तेव्हा पासून तु मला मोहित करून घेतले आहेस . आतापर्यंत मी कितीतरी रूपवती पाहिल्या पण मी त्यांच्यावर ती कधीच मोहित झालो नाही  .   कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात एखादिने मला मोहित करावे आणि मी तिला गमावून बसावे हे मला आवडणार नाही .  म्हणून तू घरी जा , जेव्हा मी माघारी परतून येईल व ही सर्व ठीक होईल तेव्हा आपण सुखाने राहू......
" मोहिनी माझं नाव मोहिनी आहे . आणि  मी तुला मोहित केलं नाही , तर तू मला मोहित केला आहे . बाबा बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी बोलत असतात , पण मी सर्व गोष्टी ऐकून कुठेही धावत फिरत  नाही . बाबांनी जेव्हा तुझ्याबद्दल बोललं ,  त्यावेळी मला राहवले नाही म्हणून मी तुझ्या मागे आले . मला वाटलं तुला सांगून कार्यापासून  परावृत्त करावे , मलाही तुला गमवायचं नव्हतं . त्याचासाठीच हा अट्टहास होता . पण तु मला बरोबर येऊ दिलं नाही व माघारी पाठवले . पण मी तुला सोडू शकत नव्हते .  माझं कर्तव्य होतं म्हणून मी तुझ्या मागे मागे येत राहिले......
एवढं बोलल्यानंतर मोहिन्याच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले . ती  रडू लागली .  आयुष्मानने जवळ जात तिला त्याच्या मिठीत घेतले......
बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते .  एकमेकांना अनुभवत होते . 
 " अरे त्या रेड्याला आणि त्या सिंहाला मोकळं करा... किती वेळ झालं ते तिथेच स्तब्ध आहेत....?
 भरत्या म्हणाला .  भरत्याचा आवाज ऐकून मोहिनी आयुष्यमानच्या मिठीतून बाजूला झाली . तिने काही क्षण डोळे झाकून उघडले ,  त्यावेळी तो  सिंह   निघून गेला . रेडा शांत होऊन त्या ठिकाणी उभारला . भरताने जाऊन ते लहान मूल उचलून आणले . तोपर्यंत तो माणूसही शुद्धीवर आला होता.....