rahasyamay stree - part 2 in Marathi Moral Stories by Akash Rewle books and stories PDF | रहस्यमय स्त्री - भाग २

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

रहस्यमय स्त्री - भाग २



२५ मार्च २०१८ ( रविवार )

नावे लिहून अमर अंघोळ करायला गेला . गरम पाणी जेव्हा अंगावर ओतत असताना त्याचे शरीर झोंबु लागले होते , पाठीवर जळजळ होत होती व डाव्या हाताची आग होवू लागली होती , अस का होतंय म्हणून त्याने निरखून पाहिले तर त्याच्या लक्षात आलं की डाव्या हाताच्या मधल्या बोटाचं अर्ध नख तुटलंय !!

कशी बशी अंघोळ करून तो बाहेर आला व बेडरूम च्या दरवाज्याजवळ काहीतरी शोधू लागला , व त्याला हवी असलेली गोष्ट त्याला सापडली होती . मात्र त्याला खूप मोठा धक्का बसला होता !!! त्याला दरवाज्याजवळ डाव्या हाताच्या मधल्या बोटाच तुटलेलं अर्ध नख सापडल ...

त्याला काहीच कळत नव्हत की स्वप्नात तुटलेलं नख इथे कसं सापडल ???

त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते पण रेशमाला आणायला उशीर होत होता म्हणून तो लगेच बाहेर पडला !!!

कारला चावी लावली आणि आत त्याने जे बघितल त्यामुळे त्याच्या पुढे नवीन प्रश्न पडला !!!
कारच्या सीट वर एका पुरुषाच्या पाकिटा प्रमाणे एक पाकीट होत . दुसऱ्यांच्या वस्तूंना बघण बरोबर नाही हे त्याला माहिती होत मात्र काल पासून त्याच्या सोबत घडत असलेल्या गोष्टींमुळे तो त्या पाकिटाला खोलून बघू लागला . आत बाराशे शेचाळीस रुपये होते . व एक व्यक्तीचा फोटो व पॅन कार्ड होता , त्या व्यक्तीच्या बाजूला एक स्त्री उभी होती मात्र फोटो मधली स्त्री काल भेटलेली स्त्री नव्हती . पॅन कार्ड वर नाव होत बहादुर थापा वय - १९ फेब्रुवारी १९८६ . पॅन कार्ड वर फोटो बरोबर दिसत नव्हता म्हणून ओळखता येत नव्हतं की ती व्यक्ती कोण आहे . पण त्या फोटोमधील व्यक्तीचा चेहरा पॅन कार्ड मधील व्यक्तीशी थोडासा अंधुक भाग जुळत असल्याचा दिसला ...

अमरला कळत नव्हत की हे पाकीट इथे आल कसं ??
त्या स्त्री ने आणलं तर या पकिटाचा व त्या स्त्री चा काय संबंध ???
या उलट तो फोटो मधील पुरुष नेपाळी दिसत होता !!!

ते पाकीट खीशात ठेवून रेशमाला आणायला तो निघाला . तो त्याच दफनभूमी जवळून जाऊ लागला होता . दफनभूमी मद्धे कोणीच नव्हत , त्याने काल जिथे ती स्त्री उभी होती त्या कबर जवळ पाहिलं असता त्याला नवल वाटले की गुलाबाची फुले तशीच होती .

तो रेश्माच्या घरी पोहोचला . रेश्माला घेवून तो पुन्हा दफनभूमी मार्गे घरी जाऊ लागला , रेशमाने साडीच्या पदराने आपला चेहरा झाकला होता व तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडू लागली !!!

अमरने तिला विचारले " रेशमा तुला काय होतंय ??? काय झाल अचानक ??"

यावर रेशमा इतकच म्हणाली " लवकर चल इथून  "

अमरने कारचा वेग वाढवला व घरी पोहोचले .

घरी येवुन खूप वेळ झाला होता , रेशमाच्या वागण्यात खूप बदल वाटू लागला होता ...

रेशमाच्या कपाळाला थोडी सूज होती , अमरने तिला विचारले " कपाळाला सूज कशी झाली ???

यावर रेशमा म्हणाली " काही नाही काल रात्री साडे तीन च्या आस - पास अचानक बेड वरून खाली पडले आणि थोडी सूज आली आहे कपाळावर...

आज रविवार होता कामवाली ' रमा ' आज आली नव्हती . म्हणून रेशमाच सर्व घरचं काम करत होती ..

रेश्माला अशक्तपणा जाणवत होता . पण रात्री २ पर्यंत आईशी गप्पा मारल्या होत्या व झोप पूर्ण झाली नसल्याने अस होत असेल अस तिला वाटल . म्हणून तिने अमरला काहीच सांगितले नाही .
व रेशमा जेवण बनवू लागली ..!!!

अमर आपल्या लॅपटॉप मद्धे बहादुर थापा बद्दल काही मिळत का म्हणून गूगल सर्च करत होता तोवर धापकन असा आवाज झाला ...
        अमर धावत किचन मध्ये पोहोचला व बघतो तर काय रेशमा जमिनीवर पडली होती  !!

अमरला काय करावे अन् काय करू नये काहीच कळत नव्हत त्याने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले पण तिला जाग येतच नव्हती , त्याने पूर्ण मग भर पाणी तिच्यावर ओतलं पण परिणाम एकच !!!

शेवटी त्याने तिला उचलले व आपल्या कार मधून इस्पितळात घेवून जाऊ लागला ... इस्पितळाचा रस्ता त्याच दफन भूमीच्या बाजूने जात होता .
तेव्हा त्याने तिथे बघितल असता त्याला सकाळी पाकिटामध्ये दिसलेली नेपाळी व्यक्ती म्हणजे बहादुर थापा त्याच कबर जवळ दिसला . त्या व्यक्ती बद्दल जाणण्याची उत्सुकता अमरला होतीच पण

रेश्माला इस्पितळात पोहचवणे त्याला जास्त गरजेचे वाटले .
इस्पितळात पोहचल्यावर रेशमाच्या आई-वडिलांना अमरने फोन केला व रेशमा बद्दल कळवले .
रेशमाचे आई वडील सुद्धा तेथे पोहोचले .

रेशमाचे बेशुद्ध पडण्याचे कारण डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हते ... डॉक्टर आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत होते मात्र परिणाम एकच ...
डॉक्टर ने रेशमाला आपल्या निरिक्षण ( observation) करिता इस्पितळात ठेवायला सांगितले !!
इस्पितळात पेशंट जवळ कोणती ही एक किव्वा दोन व्यक्ती राहू शकत होती म्हणून अमरने स्वतःच रेशमा जवळ थांबायचे ठरवले .

रात्री १२ वाजता रुटीन चेक करण्यासाठी डॉक्टर आले व निघून गेले .
अमर रेशमाच्या अश्या अवस्थेला बघून गहिवरला होता . त्याच्या डोळ्यात अश्रू होते . तो तिलाच एक टक बघत होता . बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही .

रात्री ३.३३ मिनिटाला कसल्यातरी आवाजाने अमर उठला ... बघतो तर काय रेशमा आपल्या जागेवर नव्हती , त्याने संपूर्ण इस्पितळ शोधून काढलं पण रेशमा मात्र कुठेच दिसली नाही ...

शेवटी निराश होऊन इस्पितळाच्या वॉचमेन ला त्याने विचारले तेव्हा त्याने सांगितल की
" एक स्त्री बाहेर गेली होती मी तिला खूप थांबवायचा प्रयत्न केला पण ती मलाच धक्का बुक्की करत होती , तिला अशोक नगरला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने जाताना पाहिलं होत ..

अमरने मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही व वेळ न घालवता आपली कार काढली आणि अशोक नगरच्या दिशेने निघाला . वाटेत तीच दफनभूमी लागत होती . त्याने एक नजर दफनभूमी जवळ फिरवली असता त्याला धक्का बसला . दफनभूमी मद्धे खूप गर्दी जमली होती ... सर्व अनोळखे चेहरे तेथे उभे होते . !!!
सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं होतं .... त्या रात्री त्या स्त्री ने ज्या कबर जवळ फूल ठेवली होती तीच कबर रिकामी आहे ...
अमरने बाजूला बघितले तर तो सुन्न झाला . तो खाली गुडघ्यावर बसून रडु लागला होता . कारण बाजूला रेशमाचे मृत शरीर ठेवले होते ....

काही क्षणात सर्व घाबरले व कबर पासून दूर दूर जाऊ लागले होते , .... आजू बाजूला असलेल्या सर्व व्यक्ती आप आपल्या कबर मद्धे पुन्हा जाऊ लागले होते .
काय होतंय हे अमरला काहीच कळत नव्हत !! ... फक्त त्याच्या डोळ्यात अश्रू होते .!!!

रेशमा हवेत उभी होती ती जोरात किंचाळली व म्हणाली " जर तू त्या पाच व्यक्तींना नाही मारलस किव्वा त्यातला एकही व्यक्ती जिवंत राहिला तर तू तुझ्या प्रेमाला गमावून बसशील , तुझ्या कडे तुझ्या प्रेमाला वाचवायचे शेवटचे सात दिवस आहेत ... हे अश्रू  जपून ठेव कामाला येतील " ... अस म्हणून रेशमाचे शरीर कबर मद्धे आपोआप पडले ...  बाजूला असलेली माती तिच्या शरीरावर पडू लागली होती व बघता बघता रेशमाचे शरीर मातीच्या खाली नाहीसे होत होते ... रेशमाचे शरीर त्या कबर मद्धे हळू हळू कैद होत होते .
अमर आपली सर्व शक्ती एकवटून दोन्ही हातांनी कबर वरची माती बाजूला सारत होता . सारता सारता त्याचा हात कशाला तरी लागला ....

इस्पितळात पाण्यासाठी ठेवलेल्या ग्लासला त्याचा हात लागला .... ग्लास खाली पडल्याने अमर झोपेतून जागा झाला  !!!
त्याने सर्वात पाहिले रेशमा कडे पाहिले व त्याच्या जीवात जीव आला , रेशमा बेडवर होती ..
घड्याळात वेळ होत होती ६.४५ मिनिटे ...( दिनांक २६ मार्च २०१८)

सकाळी ७.३० ला रेशमाची आई इस्पितळात आली .
अमरने तिला रेशमाजवळ थांबायला सांगितले व अमर इस्पितळाच्या बाहेर पडू लागला तेव्हा त्याने जे बघितले त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता . स्वप्नात पाहिलेला वॉचमेन इस्पितळाच्या बाहेर उभा होता .
अमरने आपले हात बघितले तर त्याच्या नखा मद्धे लाल मातीचे बारीक कण दिसत होते !!!

अमर आता पूर्ण पणे गोंधळला होता , त्याला कसलाच मार्ग सापडत नव्हता . म्हणतात ना जेव्हा कसलाच मार्ग सापडत नाही तेव्हा फक्त देवच आठवतो !!!
अमरला सुद्धा आज देवच आठवत होते . जवळ काली मातेचे मंदिर होते , तेथे असलेल्या पुजाऱ्या जवळ अमर पोहोचला .
पुजारी डोळे बंद करून ध्यान अवस्थेत होते , डोळे उघडून त्यांनी अमरला पाहिले व पाहताच क्षणी म्हणाले " मी तर काय कोणीच तुझी मदत करू शकत नाही , तुझ्या एका लहान चुकीची शिक्षा तुझी बायको भोगत आहे . तुझ्या वाटेला आलेलं काम तुलाच कराव लागणार !!!! "

अमरला कळलं होत , पुजाऱ्याला नेमका काय म्हणायचं होत ते !! अमरने त्यांना हात जोडून नमस्कार केला व मनात ल्या मनात बोलू लागला , " मी माझ्या प्रेमाला वाचायला कोणाचाही जीव घेवू शकतो किव्वा स्वतःचा देवू ही शकतो "!!!!

---------- पुढील भाग लवकरच ----------