पैसा की माणुसकी....
ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा जीवित या मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही आणि तो आलाच तर तो निवळ योगायोग समजावा...
सकाळचे साधारणतः 10:00 वाजत आले होते.त्यामुळे बँकेत तेवढी गर्दी ही नव्हती,बँकेचा एक एक अधिकारी त्यांच्या वेळेप्रमाणे बँकेत येऊन आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होत होता,आणि आपल्या कामाला सुरुवात करीत होता.काही लोक पैसे भरण्याच्या स्लिप भरत होते तर काही लोक पैसे काढण्याच्या स्लिप भरत होते. सगळे आपापल्या कामात होते. पण एक जण असा होता जो काहीही न करता या सगळ्यांवर नजर ठेवत होता. त्याच नाव होतं अली. तो फक्त दरवाज्याकडे नजर ठेऊन होता,जसा शिकारी आपल्या शिकारची कशी वाट पाहतो त्याप्रमाणेच तो ही दरवाज्यावर नजर रोखून होता,की कधी त्याचा शिकार येईल आणि हा त्याची शिकार करेल.काही वेळच्या प्रतीक्षेनंतर त्याला पाहिजे तसा शिकार येत असताना दिसला.
बँकेच्या काचेच्या असलेल्या दरवाज्याला ढकलत एक मध्यम वयाचा साधारणतः 35 वर्षाचा एक व्यक्ती आत आला.त्याचे विस्कटलेले केस पण थोडे नीटनेटके,तोंडावर पांढरी आणि त्यात कुठे कुठेच काळे केस असलेली दाढी,अंगात व्हाईट शर्ट जे थोडे मळकटलेले,ग्रे कलर ची पॅन्ट, पायात पॅरेगॉन चा पण तेवढा महागडा नसलेला चप्पल असा काहीसा त्याचा पोशाख होता.म्हणजे त्याच्याकडे बघितल्यास अस वाटत होत की तो एका गरीब घरातील होता.त्याच्या चेहऱ्यावर शून्य भाव होते म्हणजे एकदम निर्विकार.
तो आत आला आणि सर्वप्रथम स्लिप काउंटर कढे जाऊन पैसे काढण्याची स्लिप घेतली व थोडं बाजूला जाऊन स्लिप भरू लागला.तेवढ्यात अली उठला व त्या माणसाकडे जाऊ लागला त्याच्या मनात काय चालू होतं ते त्याच त्यालाच माहीत पण तो त्या माणसाजवळ गेला आणि बाजूला थांबून त्या माणसावर लक्ष ठेऊ लागला.त्या माणसाने स्लिप भरली आणि अमाऊंट भरु लागला त्याने स्लिप वर 80,000 रुपये अमाऊंट लिहिले.ते अमाऊंट पाहताच अली च्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटलं,तो मनोमन खूप खुश झाला.
तो माणूस म्हणजे सखाराम.सखाराम भरलेली स्लिप घेऊन कॅश काउंटर कडे गेला पण अली हा बँकेच्या बाहेर गेला,मघापासून त्याला पाहिजे तसा माणूस भेटत नव्हता आणि भेटला तर हा बाहेर जातोय..पण बाहेर तर त्याच खर काम होत,तो बाहेर गेला आणि त्याच्या साथीदाराला डोळ्यानेच इशारा केला आणि तो एका रिक्षात जाऊन बसला.काही वेळानंतर सखाराम आपले पैसे घेऊन बाहेर आला व ते बरोबर आहेत का ते चेक करून खिशात ठेवणारच होता की त्याला एक जोरदार धक्का बसला व ते इतक्या वेगाने झाले की सखारामला काय झाले तेच कळेना,पण जसे त्याचे लक्ष त्याच्या हाताकडे गेलं तर काय त्याच्या हातातील पैश्याच पाकीट समोर एक माणूस घेऊन पळत होता.सखाराम ने मग आपल्या अंगात आहे तेवढा जोर लावून त्याचा पाठलाग सुरू केला पण तो चोर 27-28 वर्षाचा आणि हा सखाराम 35-40 वर्षाचा त्याच्यासमोर याचा काय निभाव लागणार होता तरी पण हा जिवाच्या आकांताने त्याला ओरडत त्याचा पाठलाग करीत होता.त्याच्या डोळ्यात आपसूकच पाणी आले,कारण ते पैसे फक्त पैसे नव्हते तर त्यात एकाचा जीव अडकला होता.त्या पैशामुळे सखाराम च्या आयुष्यातील सगळ्यात जवळची म्हणजे त्याची मुलगी मीरा हीच ऑपरेशन होणार होत.सखाराम हा सगळा विचार करत त्याचा पाठलाग करत होता,पण तेवढ्यात वेगाने एक रिक्षा त्या चोराजवळ गेली आणि तो चोर त्या रिक्षात बसून तेथून फरार झाला.सखाराम फक्त त्या रिक्षाकडे पाहतच राहिला कारण तो काही करू ही शकत नव्हता.त्याला काहीच समजत नव्हतं कारण त्याच्या पोरीचं ऑपरेशन होत आणि ऑपरेशन साठी आणलेले पैसे आता त्याच्याजवळ नव्हते.तो तसाच हतबल होऊन रस्त्याच्या कडेला बसला.त्याला आता काय करावं काहीच समजत नव्हतं.तो तसाच हताश होऊन बसला होता,विचार करत करत तो त्याच्या भूतकाळात हरवून गेला.
सखाराम हा गरीब घरातील होता.त्याच्या घरात त्याची बायको आणि 12 वर्षाची मुलगी मीरा एवढंच जेमतेम 3 लोकांचं त्याच परिवार होत.सुनीताच तर या जगात सखाराम आणि मीरा शिवाय कोणीच नव्हतं. सखाराम हा मजुरी करायचा.एकदम सुखी संसार चालला होता त्यांचा पण नियतीला काही वेगळंच मंजूर होत. जसा दुधात मिठाचा खडा पडावा तशी त्यांच्या संसाराला ही दृष्ट लागली.मीराच्या पोटात गाठ आली होती.खूप दवाखाने केले तरी तिच्या पोटातील गाठ काही कमी होईना आणि तिचा त्रास जास्तच वाढत चालला ती रात्रभर तरमळायची, तिला असह्य वेदना होत होत्या.तीच जेवण तर जवळजवळ बंदच झालं होतं.ती काही खातपीत नव्हती सतत त्रास सहन करत बसायची.त्यामुळे मग डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऑपरेशन करायचं ठरवलच,पण ऑपरेशन म्हणल्यास पैसा ही तेवढ्याच प्रमाणात लागत होता.सखारामची तर तेवढी परिस्थिती नव्हती,पण ऑपरेशन करणं ही तेवढंच गरजेचं होतं.शेवटी त्यांनी नाईलाजाने घर गहाण ठेवलं आणि ऑपरेशनसाठी पैसे मिळवले होते.कालच त्याने मीराला ऍडमिट करून बँकेत चेक लावला होता आणि आज पैसे आणतो म्हणून बँकेत गेला होता,पण येथेही त्याच नशीब त्याची साथ देत नव्हत.खूप आशेने तो बँकेत गेला होता की आता त्याची मुलगी पहिल्यासारखी हसत खेळत त्यांच्यासोबत राहील,त्याच परिवार पुन्हा सुखानं राहील,पण म्हणतात ना जे आपल्याला हवे असते तेच आपल्याला भेटत नाही असच काही सखाराम सोबत झालं होतं.तो तसाच हताश होऊन किती तरी वेळ तसाच बसून होता पण असं बसून चालणार नाही हा विचार त्याच्या मनात आला आणि मनावर दगड ठेऊन डोळ्यातील पाणी पुसून तो दवाखान्याच्या दिशेने जाऊ लागला.
इकडे दवाखान्यात मीराच्या शेजारी बसून सखारामची बायको सुनीता विचार करत होती,ती थोडी आनंदी ही होती आणि थोडी चिंतीत ही,कारण मुलीच ऑपरेशन झाल्यास ती बरी होईल याचा आनंद,तर ऑपरेशन कस होईल याची चिंता तिला सतावत होती.कारण डॉक्टर च म्हणनं होत की ऑपरेशन मध्ये काहीही होऊ शकत,पण आपल्याला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही कारण तिला त्रासच तसा होत होता त्यामुळेच हे दोघे ऑपरेशन साठी तयार झाले होते.सखारामची बायको तर दिवसभर देवाचाच धावा करत होती,सतत माझी मुलगी बरी होऊदे अशी मागणी करीत होती,पण आपली मागणी मान्य करेल तो देव कसला,तस असत तर आज देशात गरिबीच नसती.पण त्या बिचारीला कोण सांगणार की सध्या डॉक्टरच तिच्यासाठी देव होते कारण त्यांच्याच हातात सगळं होत.असाच काहीसा विचार करत असतानाच तिची नजर समोरच्या बेड वर गेली तिथे एक नवीन पेशंट आलं होतं ती एक स्त्री होती आणि तिच्यासोबत तिचा मुलगा होता.त्या स्त्रीच ही ऑपरेशन असल्यामुळे तिला ऍडमिट केलं होत,कारण तिला कॅन्सर झाला होता त्याचच ऑपरेशन होत.तेवढ्यात तिथे त्या स्त्रीचा मोठा मुलगा तेथे आला.आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून अलीच होता,तोच अली ज्याने सकाळी सखारामला लुटले होते आणि त्याच पैशाने त्याच्या आईच ऑपरेशन करीत होता.पण त्याला हे माहीत नव्हतं की तो एकाच्या जीवावर येऊन दुसऱ्याचा जीव वाचवत आहे.काही वेळानंतर सखाराम दवाखान्यात आला. त्याला तिथे पाहून तर अलीची बोबडीच वळली,सखाराम त्याला ओळखत नव्हता पण तरी हा अचानक तिथे आल्यामुळे अलीला काही समजलच नाही तो तसाच त्याच्याकडे बघू लागला पण सखाराम त्याच्याकडे बघत नाही हे पाहून त्याने सुटकेचा श्वास सोडला.पण सुनीताने त्याचा अवतार आणि डोळ्यातील अश्रूने बरोबर ओळखलं की काहीतरी नक्कीच झालंय, मीराला ही तिच्या बाबाची अशी अवस्था बघवली नाही आणि आपसूकच तिच्याही डोळ्यातून पाणी आलं.सुनीताला ते बघवल नाही तिच्याही डोळ्यात पाणी येत होतं पण ती जर रडली तर नक्कीच मीरा ही रडायला लागेल म्हणून तिने स्वतःला आवरले आणि सखारामला डोळ्यानेच इशारा करून सांगितले.त्यानेही ओळखले व तो तसाच रडत बाहेर गेला.तेवढ्यात तिथे डॉक्टर आले चेकपसाठी त्यामुळे सुनीता तेथून बाहेर आली.
इकडे डॉक्टर मीराला तपासत होते तेवढ्यात एका नर्स ची नजर तिच्या चेहऱ्यावर पडते,मीरा रडत होती त्यामुळे तिला ते बघवल नाही आणि तिने आपुलकीने तिला विचारलं काय झालंय बाळा.तेव्हा मीराने जे उत्तर दिलं ते ऐकून नर्सचं नाही तर डॉक्टर आणि आजूबाजूच्या लोकांना ही धक्काच बसला,अलीच्या तर डोळ्यात पाणीच आलं.कारण मीरा म्हणाली की,डॉक्टर अस कोणतं इंजेक्शन आहे का की जे दिल्यानंतर मला झोपेतल्याझोपेतच मरण यावं,तस इंजेक्शन असेल तर ते इंजेक्शन मला द्या ना.माझ्यामुळे माझ्या बाबाची बघा काय अवस्था झालीय,आणि एवढं बोलून ती रडू लागली.तिला तस बघून त्या नर्सच्या ही डोळ्यात पाणी आलं.म्हणजे ही 12 वर्षाची मुलगी जिने अजून ही दुनिया ही बघितली नाही ती आपल्या बाबासाठी मरायला तयार आहे.तेवढ्यात मागून रडण्याचा आवाज आला आणि त्यांनी माघे बघितलं तर सुनीता आपल्या तोंडाला पदर लावून आपलं रडू आवरण्याचा प्रयत्न करीत होती पण त्या प्रयत्नात ती असफल झाली होती आणि तिचा आवाज मीरा ने एकलाच,स्वराला खूप वाईट वाटलं आणि ती आणखीनच रडू लागली.आपण इथे थांबल्यास मीरा अजून रडेल म्हणून सुनीता तशीच बाहेर गेली. आता अलीला त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता.स्वतःची लाज वाटत होती.तो ही बाहेर गेला कारण त्याच्याही डोळ्यात पाणी येत होतं,तो बाहेर आला तेव्हा सुनीता आणि सखाराम रडत थांबले होते,तेव्हा तर अलीला मेल्याहून मेल्यासारख झालं.तो त्यांच्यापासून थोडं दूर थांबून त्यांचं बोलणं ऐकत होता.सखाराम सुनीताला सकाळचा प्रसंग सांगू लागला ते सगळं एकूण तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती एकदम चक्कर आल्यागत खाली बसली आणि रडू लागली,तिला तश्या अवस्थेत पाहून सखाराम ही गळून गेला होता तो ही खुप खचला होता.तो तिला समजावू लागला पण ती काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती ती रडत रडत सारख हेच बोलत होती की आता आपली मीरा वाचेल का नाही ओ,सांगा ना ती बरी होईल ना,आता ऑपरेशन ला कुठून पैसे आणायचे.दोघेही रडत होते सखाराम तर काहीच बोलत नव्हता त्याला काय बोलावे तेच कळत नव्हतं.शेवटी सुनीताच त्याला म्हणाली,आपण आपलं घर गहाण ठेऊन पैसे आणले होते ना तर आता ते घर विका आणि पैसे घेऊन या हो.ते ऐकून सखारामला काय बोलावं तेच कळेना.तो म्हणाला,आग पण घर विकून मग राहायचं कुठे आपण,मीराच ऑपरेशन झाल्यानंतर तिला घेऊन कुठे जायच,तिला आरामाची गरज लागेल मग तिला घेऊन कुठे फिरायचं आपण,आपलं अस जवळचही कोणी नाही ज्याच्या घरी आपण जाऊन राहू.हे सगळं ऐकून सुनीता बोलु लागली,आहो सध्या आपल्याला महत्वाचं मीराच ऑपरेशन आहे,नंतरच नंतर बघू कुठेतरी भाड्याने राहू तुमच्याबरोबर मी ही कामाला येईन पण मला माझी मीरा पाहिजे हो अस बोलून सुनीता अजूनच रडू लागली.शेवटी कोणताही पर्याय नसल्याने सखारामलाही ते पटले व तो घर विकण्यासाठी तयार झाला.तो घर विकण्यासाठी जाऊ लागला तेव्हा सुनीता ने त्याला अडवलं आणि रडत रडतच त्याला म्हणाली आता त्या बँकेच्या कुटाण्यात पडू नका हातातच पैसे घेऊन या.सखाराम हो बोलला आणि म्हणाला 'काय पुण्य केलं होतं की तुझ्यासारखी बायको आणि मीरासारखी मुलगी मिळाली,आणि तुम्ही काय पाप केलं होतं की तुला असला नवरा आणि तिला असला भिकारी बाप भेटला'.एवढं बोलून तो पुन्हा रडू लागला.सुनीताही रडू लागली आणि बोलू लागली,अस काय बोलताय हो सगळं ठीक होईल तुम्ही चिंता करू नका आपली मीरा बरी होईल.ती बोलत होती पण तीलाच माहीत नव्हतं पुढं काय होईल आणि काय नाही.अलीला आता स्वतःचाच राग येत होता.पण त्याने त्याची चूक सुधारायचे ठरवले आणि काहीही करून मीराला वाचवायचे हा निश्चय करून तो तेथून बाहेर पडला.
संध्याकाळचे 6 वाजत आले होते. सखारामने आधीच घराचे भरपूर पैसे घेतले होते.त्यामुळे आता त्याला त्या घराचे किती पैसे मिळतील ते ही माहीत नव्हतं,त्या पैशात मीराच ऑपरेशन होईल का नाही याचं विचारात सखाराम ज्याच्याकडे घर गहाण ठेवलं होतं त्याच्याकडे आला.पण त्याच घर काय एवढं मोठं नव्हतं की त्याचे चिक्कार पैसे मिळतील.चारजण राहतील असच छोटस पत्र्याच शेड होत त्यांचं घर. अगोदरच त्याने 80,000 रुपये घेतले होते,आणि आता त्या घराचे फक्त 40,000 च येणार होते.आणि आता तो कामाला ही जाऊ शकत नव्हता कारण मुलीच ऑपरेशन असल्यामुळे त्याला तिथेच थांबावं लागत होत.त्यामुळे त्याच्या कामाचे ही पैसे येण आता बंद झालं होतं.त्याने ते घराचे पैसे घेतले आणि आपल्या नशिबाला कोसत तो दवाखान्याच्या रस्त्याने चालत निघाला.
दुसऱ्या दिवशी अली साधारणतः 8:30 वाजता दवाखान्यात आला.त्याने रात्रभर फिरून मीराच्या ऑपरेशनसाठी लागणारे पैसे गोळा केले होते.कारण त्याला आता त्याची चूक सुधारायची होती. तो आला आणि पाहतो तर काय समोर सुनीता आणि सखाराम समोर एकदम मूडद्या प्रमाणे बसले होते,त्यांचे डोळे जर हालचाल करत नसते तर कोणालाही वाटलं असत की ते मेलेले आहेत.त्यांना अशा अवस्थेत पाहून अलीला,काय झाले तेच कळेना.तो त्यांना विचारावं म्हणून त्यांच्या दिशेने जाऊ लागलाच होता की,तो एकदम जागीच स्थिर झाला त्याचे पायच जागचे हलत नव्हते कारण त्याने जे समोर पाहिले होते त्याचं त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता त्याने पाहिले की, सखाराम आणि सुनीता बसले होते तेथे त्याच्या समोर एक स्ट्रेचर येऊन थांबला आणि त्या स्ट्रेचर वर एक मृत अवस्थेत पडलेलं शरीर होत जे पांढऱ्या कपड्याने झाकलं होत.त्या स्ट्रेचर ला पाहताच सुनीता जी इतक्या वेळ शांत बसली होती त्या स्ट्रेचर जवळ जाऊन रडू लागली सखाराम तर अजून कोमात गेलेल्या माणसासारखा शांत बसून होता.सुनीता ने जसे त्या शरीरावरील पांढरा कपडा बाजूला सारला ते पाहून तर अली एकदम चक्कर आल्यासारख झपकन खालीच गूढग्यावर बसला त्याच्या ही डोळ्यातून अश्रू येत होते,कारण समोर स्ट्रेचर वर मृत अवस्थेत असलेलं शरीर दुसरं तिसरं कोणाच नसून मीराच होत.ती आता या जगात नव्हती. इतक्या वेळ शांत बसलेला सखाराम आता मात्र स्वतःला आवरू शकला नाही त्याचाही बांध फुटला आणि तो ही रडू लागला कारण आज त्याचा जीव की प्राण असलेली व्यक्ती त्याला सोडून गेली होती. त्याला त्याचा एवढा प्रचंड धक्का बसला होता की तो त्यातून बाहेरच येत नव्हता. अलीला ही खूप मोठा धक्का बसला होता त्याला तर काय करावं तेच कळत नव्हतं.अलीची नजर तेवढ्यात बाजूला थांबलेल्या त्याच्या भावावर गेली त्याच्या ही डोळ्यात पाणी होत.म्हणजे हा त्यांना ओळखत सुद्धा नव्हता तरीपण त्याच्या डोळ्यात पाणी होत यालाच म्हणतात माणुसकी.त्यासाठी व्यक्ती ही रक्तातलीच असावी असं नसत.अलीच्या भावाला ही स्वरा जाण्याचं खूप वाईट वाटत होतं पण तो तरी करणार काय नियतीच्या पुढे कोणाचं चाललंय की याच चालणार होत.तो तसाच सखाराम आणि सुनीता यांच्याकडे बघत होता त्यांना तशा अवस्थेत पाहून याच्याही डोळ्यातील पाणी थांबण्याच नाव घेत नव्हतं.तेवढ्यात अली त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला त्यामुळे त्यानं आपले डोळे पुसले व अलीकडे पाहू लागला.अली त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारू लागला की हे सगळं कधी आणि कसं झालं.त्याचा भाऊ त्याला सांगू लागला,त्याला तो प्रसंग पुन्हा सांगण्याची इच्छा नव्हती,कारण तो प्रसंग असा होता की कोना दुश्मणावर ही अशी वेळ येऊ नये. तो झालेला प्रसंग सांगू लागला...
रात्री साधारणतः 11,11:30 वाजत आले होते की अचानक मीराला त्रास होऊ लागला तिला काय झालं काय माहीत ती खूपच रडू लागली तिला असह्य वेदना होत होत्या.तिला अस तडफडताना बघून या दोघांनाही काय करावं तेच सूचनां तेवढयात डॉक्टरांना बोलावण्यात आलं.डॉक्टरांनी आल्याबरोबर मीरा ची तपासणी केली आणि ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल हे सांगितलं.ह्या दोघांना तर काय करावं कळणाच झालं, कारण यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते.डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल तुम्ही लवकरात लवकर पैसे भरून घ्या.तेव्हा सखारामने त्यांना विचारलं की किती पैसे लागतील तेव्हा डॉक्टरांनी सांगितल 75,000 सखाराम तर एकदम स्तब्ध झाला तो डॉक्टरांसमोर हात जोडुन विनंती करू लागला की डॉक्टर माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे फक्त 40,000 च आहेत.डॉक्टर सांगून मोकळे झाले की काहीही करा पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही.सुनीता तर डॉक्टरांच्या पाया पडू लागली की काय ही करा डॉक्टर माझ्या मुलीला वाचवा.दोघेही रडत होते . त्यांच्या पाया पडत होते.पण डॉक्टरांना दया येईल तर ना, ते त्यांना समजावू लागले सगळे पैसे भरल्यानंतरच ऑपरेशन होईल.इकडे मीरा मरणयातना सहन करत होती,पण तिची नजर सतत तिच्या आई बाबा कडे जात होती तिला ते सगळं म्हणजे तिच्या आईबाबाच हातपाय जोडणं तिला बघवत नव्हतं.तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते पण ते अश्रू तिच्या त्रासामुळे नाही तर तिच्या आईबाबाला तशा अवस्थेत बघून येत होते.कारण बाप कसला ही असला तरी तो आपल्या लेकरांच्या नजरेत हिरोच असतो.तसाच मीराचे बाबा ही तिच्यासाठी हिरोच होते.ती तशीच आपल्या आईबाबाचा रडका चेहरा बघत होती तिला त्याचाच जास्त त्रास होत होता,की आईबाबांची ही अवस्था माझ्यामुळेच आहे जर मी आजारी पडले नसते तर त्यांना हा दिवस बघावा लागला नसता ती स्वतःलाच दोषी मानत होती.पण तिला कोण सांगणार की आजार हा सांगूण येत नाही.ते म्हणतात ते बरोबर आहे की,दवाखाना आणि कोर्ट कोणाच्याही मागे लागू नये हे आज तिला पटलं होत.इकडे सखाराम आणि सुनीता डॉक्टरांना खूप विनंती करत होते पण डॉक्टरांवर त्याचा काहीएक परिणाम होत नव्हता.शेवटी सखारामला सकाळचं डॉक्टरांच बोलण आठवलं आणि जे मीरा आणि सुनीता सोबत डॉक्टरांना ही अपेक्षित नव्हतं ते सखाराम बोलून बसला.इतक्या वेळ रडणारी सुनीता आ वासून सखाराम कडे बघत होती डॉक्टरांना ही त्याला काय उत्तर द्यावे हेच कळेना.सखाराम बोलला होता की,सकाळी जे पेशंट आलं आहे त्याला किडनीची गरज आहे ना,तर माझी किडनी घ्या आणि त्या पैशात माझ्या मुलीच ऑपरेशन करा.हे ऐकल्यानंतर तर डॉक्टरांच्या ही डोळ्यात आपसूकच पाणी आलं.पण मीराला मात्र ही गोष्ट पचवणं शक्य झालं नाही आणि तिने एकदम टोकाचा निर्णय घेतला.आणि तिच्या आईबाबांकडे पाहू लागली जणू ह्यानंतर ती त्यांना पाहूच शकणार नाही ह्या अविर्भावात ती त्यांच्याकडे पाहू लागली होती,आणि जे करायचं नव्हतं तेच करून बसली.तिने तिच्या हाताला लावलेलं सलाईन उपसून काढलं आणि आपल्या आईबाबांकडे बघत तिने आपलं शरीर बेडवरून खाली टाकून दिल.धप्प असा आवाज झाला.तेवढ्यात बाजूची एक बाई जोरात किंचाळली,सखाराम आणि सुनीताने आवाज झालेल्या दिशेला पाहिले तर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. मीरा पालथी पडली होती आणि तिच्या पोटातून रक्त ओघळत येत होतं,ती पोटावर जोरात आदळल्यामुळे तिच्या पोटातील गाठ फुटली होती आणि त्यातून रक्त येत होतं.आणि मीरा आता या जगात राहिली नव्हती.तिने तिच्या आईबाबांसाठी आपला जीव दिला होता.
हे सगळं ऐकून अली तो ही पुरता गळून गेला आणि आपला तोल सावरू शकला नाही आणि धपकन खाली बसला.त्याला आता वाटू लागले की त्याच्या हातून चूक नाही तर गुन्हा झालाय.त्याच्या एका चुकीमुळे एक जीव गेला होता.तो तसाच सखाराम आणि सुनीताकडे पाहू लागला,त्यांची अवस्था त्याला बघवली नाही आणि त्याच्याही डोळ्यातून पाणी येऊ लागले,पण या वेळी जरा जास्तच...
सखाराम आणि सुनीता मीराला घेऊन जाऊ लागले.पण अलीने मात्र मनात निश्चय केला आणि तो तसाच भरल्या डोळ्यांनी सखाराम आणि सुनीतापुढे येऊन उभा राहिला आणि एका क्षणाचा ही विलंब न करता त्यांच्या पाया पडू लागला आणि रडू लागला.त्या दोघांनाही काहीच कळेना की हा असा का करतोय शेवटी सखारामने त्याला उठवले आणि विचारू लागला की तो अस का करत आहे.तेव्हा अलीने सगळेकाही सांगून टाकले.ते ऐकून ह्या दोघांनाही प्रचंड धक्का बसला कारण याच्यामुळे आपली मुलगी या जगात नाही हा धक्का पचवणे त्यांच्यासाठी खूप अवघड जात होतं. ते तसंच रडत त्याच्याकडे बघत होते,अलिही रडत होता आणि त्यांची माफी मागत होता.शेवटी सखारामने त्याला शांत केलं आणि त्याला बोलु लागला.जाऊद्याहो जे आमच्या नशिबात होत तेच आम्हाला भेटलं,आमचा मीरासोबतचा प्रवास इथपर्यंतचाच होता तिचा प्रवास संपला त्यामुळे ती गेली आमचा प्रवास अजून चालूच आहे बघू आता तो कधी संपतो.अस बोलून तो रडू लागला.सुनीता बोलू लागली,जे झालं ते झालं,आपण काय ते आता बदलू शकत नाही.तुम्ही स्वतःला दोषी मानू नका आम्ही तुम्हाला माफ केलय, कारण तुम्ही 'जिने तुम्हाला जन्म दिला तिच्यासाठी हे करत होता,आणि आम्ही जिला जन्म दिला तिच्यासाठी हे करत होतो'.शेवटी आईचंच पारडं जड झालं आणि ती वाचली.अस बोलून तीही रडू लागली आणि अलीने देत असलेले पैसे ही न घेता ते तेथून निघून गेले.अली विचार करत बसला की कोण इतकं चांगल ही कस असू शकत.तो त्यांचाच विचार करीत किती तरी वेळ तसाच बसून होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी अलीला जाग आली तो खुर्चीवर बसून आपलं डोकं पकडून बसला होता.टीव्हीवर न्युज च चॅनेल चालू होत.न्युज रिपोर्टर एक एक न्यूज सांगत होता,पण एक न्यूज त्याने अशी सांगितली ज्याने अलीच लक्ष विचलित झालं.न्युज रिपोर्टर सांगत होता की 'काल रात्री एका भरधाव धावणाऱ्या ट्रकखाली चिरडून गेले दोन जीव'.त्याने त्यांची फोटो पहिली तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.कारण ते दोघे म्हणजे सखाराम आणि सुनीता....
सखारामला ते दुःख पचवणं अशक्य होतं की तो आपल्या मुलीला वाचवू शकला नाही आणि सुनीताला हे पचवणं अशक्य होतं की तिच्या पोटचा गोळा आज तिच्यासोबत नाही.म्हणून दोघांनीही आपला प्रवास संपवायचा निर्णय घेतला आणि स्वराच्या पाठीमागे ते ही तिला भेटण्यासाठी निघाले.
आज माणुसकी जिंकली होती ज्याच्यामुळे आपली मुलगी गेली त्याला माफ करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.ह्याच माणुसकीचा एक अंश जरी अलीमध्ये असता तर आज मीरा,सखाराम,सुनीता आणि स्वतः आली आज जिवंत असते.हो मी तेच म्हणतोय जे तुम्ही एकताय.अलीही आज या जगात नाहीये,त्याच्यामुळे तीन जीव गेले हे पचवणे त्याला अशक्य होते त्यामुळे त्यानेही आत्महत्या केली.कारण तो ही आता माणूस झाला होता आणि आपल्या चुकीची शिक्षा त्याला याच्यापेक्षा दुसरी कुठलीच वाटली नाही..
म्हणूनच म्हणतो पैसा नाही माणुसकी जपा...
"हीच माझी विनंती आणि हेच माझे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे"....
ही माझी पहिली कथा आहे त्यामुळे काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि कथा आवडली असेल तर प्रतिक्रिया दया.....??????
लेखक
ऋषिकेश भडंगे