Doctorki-Mann in Marathi Health by Kshama Govardhaneshelar books and stories PDF | डाक्टरकी-मन

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

डाक्टरकी-मन



   मन

हल्लीच्या संवेदनाहीन समाजात डॉक्टर म्हणून संवेदनशील असणं त्रासदायक ठरतं.कारण डॉक्टर म्हणजे फक्त शरीराच्या तक्रारींसाठी असतो असं
नाही .ग्रामीण भागात काम करताना अगदी नवराबायकोची भांडणं सोडवण्यापासून तर सासुसुनेची दिलजमाई करेपर्यंत सगळ्या गोष्टी घरचा सदस्य असल्याप्रमाणे पार पाडाव्या लागतात.
पण जेव्हा खरोखर काही प्रॉब्लेम नसतो फक्त आपलं मन आपलं वैरी होऊन जातं अशावेळी काय समजावायचं? काय बोलायचं ?ह्यावर डॉक्टरांची कसोटी लागते.
हल्ली नैराश्याने घेरलेले खूप रुग्ण येतात.

    अंजना...त्यातलीच एक रुग्ण...
सगळं छान !!! माहेरी आणि सासरीही.नवरा व ती स्वतःही
सर्वसामान्य मुंबईकर नोकरदार.
नवरा जीव लावणारा...गुणी आणि गोंडस छोटासा मुलगा.
ती स्वतःही उच्चशिक्षित, सुंदर , बहूश्रूत अशी.
किरकोळ पोटदुखीची तक्रार घेऊन आली होती.
नवरा काळजीनं सांगत होता.
"Madam !कितीही पैसे लागले तरी चालतील पण हिची पोटदुखी तेवढी बरी करा.मुंबईत बड्या बड्या डॉक्टरांनी तपासलंय.सोनोग्राफी, रक्त वगैरे चेकअप सगळं झालंय. काही कळतच नाही काय झालंय हिला?
एखाद दोन दिवस नीट रहाते आणि तिसऱ्या दिवशी पांघरुण घेऊन झोपूनच रहाते. "

''मुंबईच्या डॉक्टरांचं काय म्हणणं होतं?"

"काही नाही .ते म्हणाले.
शारीरिक काही बिघाड नाहीये. थोडासा मानसिक त्रास वाटतोय.आणि त्यांनी नुसत्याच झोपेच्या गोळ्या दिल्यात.त्याच्यामुळे ती अजूनच झोपून रहाते.आता ही काय वेडी आहे का तिला टेन्शनच्या गोळ्या द्यायला??म्हाताऱ्या माणसासारखं काहीतरी विचार करत बसते आपली"

"घरी काही ताणतणाव आहे का? तुमच्या दोघांचं नातं कसंय?"

"आमचा प्रेमविवाह आहे madam.फुलासारखं जपतो मी तिला.तिच्या घरी, माझ्या घरी सगळ्यांची लाडकी आहे ती.कशाचाच त्रास असा नाही.
ऑफिसचे टेन्शन्स असतात पण तेवढं तर चालतंच.तरी तिला म्हणालो मी, तुला नसेल दगदग सहन होत तर नोकरीपण सोडून दे.जाऊदे.''

"मग त्यावर काय म्हणणं आहे तिचं?"

"काही बोलतच नाही. घाबरल्यासारखं करते आणि पोट दुखतंय म्हणून झोपून घेते.''

"कधीपासून चाललंय असं?"
"चार महिने झालेत madam.सगळं घर डिस्टर्ब झालंय तेव्हापासून"

व्यथित आवाजात तो बोलला.
त्याला खरोखरच तिची खूप काळजी वाटत होती हे सहज ताडता येत होतं.

नंतर तिलाही केबिनमध्ये बोलावलं.
मूळची सुंदर पण निस्तेज वाटत होती.डोळ्याखाली काळी वर्तूळं आलेली .

    तिच्याशी बोलणं झालं.तिची पोटदुखी नंतर पूर्णपणे नाहीशी झालीही.तो माझ्या उपचार पद्धतीचा भाग होता.समूपदेशन आणि काही औषधं.तो विषय वेगळा आहे .पण ह्या केसने खूप सारी प्रश्नचिन्हं मनात पेरली गेली.खरंच आत्ताचं यूग हळव्या ,संवेदनशील माणसाच्या जगण्याच्या लायकीचं नाहीय की काय?
जो माणूस संवेदनशील असतो त्याला सरसकट वेडं ठरवलं जातंय.हे भीषण आहे.आपण सगळे ह्रदय असलेले यंत्रमानव बनण्याकडे वाटचाल करत आहोत का?
ह्या सगळ्या प्रश्नांची भेंडोळी डोक्यात ठेवून होणारी तगमग असह्य होती.शेवटी मदतीला शब्दच धावून आले.

*मन अँप्यूट करता येईल का?*

डॉक्टरांनी विचारलं ,

"काय होतंय?"

हताश आवाजात मी उत्तरले,

"श्वास कोंडतो..
डोळे वाहत रहातात...
खूप भीती वाटते...
हातपाय लुळे पडलेत असं वाटत रहातं.."

"कधीपासून होतोय हा त्रास?"

"सगळ्यात पहिल्यांदा, किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा त्रास जाणवला होता.
तेव्हा काय करावं ?कुणाला सांगावं ?कळालं नाही.
मग कधीतरी आपोआपच त्रास थांबला.
आई म्हणायची खूप विचार नको करत जाऊ बाळा.

नंतरही कोलंबिया कोसळलं तेव्हा कितीतरी वेळ देवासमोर रडत बसले होते.
होस्टेलच्या रूममेट्स म्हणाल्या
'वेडी आहेस की काय तू?
हे सगळं चालणारच.
सोडून द्यायचं.
त्यात काय?"

नंतर वेळोवेळी कारणाकारणानं त्रास होत गेला.
काही कारणं लोकांना पटली...
काही नाही पटली..
मी रडत राहीले...
रात्रीचे प्रहर टक्क डोळ्यांनी पिंजत राहिले..

फिल ह्युज गेला..
माळीण घडलं...
पाकीस्तानात कोवळी पोरं मारली गेली..
शुभम शहीद झाला...

सगळेजण जाती,धर्म,सीमा ह्या गोष्टींच्या आड लपत *क्याल्क्युलेटेड* शोक करत राहिले.
नवरा म्हणाला,
" वेडाबाई कशाचाही त्रास करून घेतेस.''
मी त्याच्या कुशीत अजूनच स्फुंदत राहिले...

मग बातम्या बघणं बंद केलं,
पेपर वाचणं बंद केलं..
तरीही त्रास होतोच हो डॉक्टर..
काय करु?"

डॉक्टर म्हणाले,

"हल्ली असा त्रास होणारे कमी रुग्ण सापडतात.
त्यांना मन नावाचा एक अनावश्यक अवयव असतो.
पूर्वी तो अवयव वापरला जायचा. पण आता माणूस(?) उत्क्रांत (?)
होत चाललाय नं तसा तो अवयवही अपेंडिक्स सारखा व्हेजेटेटिव अवयव झालाय.."

माझे डोळे आशेनं लुकलकले.

"मग आपण अपेंडिक्स काढून टाकता ऑपरेशनने. तसंच मनही काढून टाकता येईल का हो?
फार त्रास होतोय मला."

डॉक्टर खेदानं म्हणाले,

"दुर्दैवानं मन अँप्यूट नाही करता येत आम्हाला. मर्यादा पडतात. कायमस्वरूपी असा काही उपाय नाही त्यावर.."

निराश होऊन घरी आले...आणि *असिफा* तुझ्याबद्दल कळलं गं.

आता परत माझा 
श्वास कोंडतो आहे...
भीती वाटते आहे...
डोळे वाहताहेत...
हातपाय लुळे पडतायत
फार त्रास होतोय..

तुम्हा कुणाच्या ओळखीत
मनाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर असेल तर बघा हो.

मला खरंच खूप त्रास होतोय...

    ©डॉ क्षमा शेलार