Yuga ek parivartan in Marathi Magazine by Sadhana v. kaspate books and stories PDF | युगा ... एक परिवर्तन !

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

युगा ... एक परिवर्तन !

युगा ... एक परिवर्तन !

प्रणव पेपर वाचत बसला आहे. त्याची बायको शेफाली आणि १० वर्षाची मुलगी शिखा कम्प्युटर समोर बसुन
काहीतरी करत आहेत.
शिखा - पप्पा मी फेसबुकवर अकाऊंट काढु ?
प्रणव - हो बेटा काढ पण फोटो टाकु नको..
शिखा - का ?
प्रणव - चांगल नसत

शिखा - काँलेज ला असताना , एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणुन तिचे अश्लिल फोटो तुम्ही गुगलवर टाकले होते
, ते चांगल होत का ?
प्रणव - ......,..,..
प्रणव दचकलाच. झटकन मान वळवुन त्याने तिच्याकडे बघितले. अचानक भयाण शांतता पसरली. डोक्यामध्ये वारं
गोंगाव तसे विचार गोंगु लागले . कोणीतरी कानाखाली मारावी तसा चेहरा लालबुंद झाला. डोळे सैरभैर फिरायला
लागले . तो कोणाच्याही नजरेला नजर देवु शकत नव्हता. बायको आणि मुलगी उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे पाहत
होत्या . त्याने उत्तर देणे आणि नजरेला नजर देणे दोन्ही टाळले. आणि उठुन बेडरूममध्ये गेला. आणि ताडकन्
दरवाजा ढकलला. बेडरूममध्ये तो येरजार्या घालु लागला. विचांरांचे , आठवणींचे झुंड त्याला स्वस्थ बसु देत नव्हते.
डोक्यावरच्या केसांना जोरात ओढत..तो गतकाळात शिरला.
प्रणव - आय वाँन्ट इट
मैथिली - शट अप..
प्रणव - बेबी प्लिज
मैथिली - आर यु म्यँड ? डोक ठिकाण्यावर आहे ना ?
प्रणव - यस आय अँम क्रेझी फाँर यु..
मैथिली - मी देणार नाही..
प्रणव - आय लव यु बेबी ... मुझे हक है.
मैथिली - तुझे फिल्मी डायलाँग मारु नको . मी देणार नाही..
प्रणव - म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही..?
मैथिली - प्रश्न विश्वासाचा नाही.. जी गोष्ट मला योग्य वाटत नाही. ती मी करत नाही.
प्रणव - याचाच अर्थ .. तुझा विश्वास नाही माझ्यावर .. ओके..चल..
म्हणत त्याने तिचा हात धरला.
मैथिली - कुठे ?
प्रणव - चल सांगतो..
तो तिला घेवुन त्याच्या घरी जातो. त्याच्या आईला सांगतो , हि मुलगी मला आवडते. आणि मला तिच्याशी लग्न
करायचय. आई ही आनंदाने परवानगी देते. दोघेही खुश होतात. प्रणव तिला पुन्हा फोर्स करायला लागतो. , ' आता
तर घरीही माहीत आहे , प्लिज दे ना.. तुझी आठवण आल्यावर बघेन मी..' तो इतका हट्ट करत होता , की शेवटी
तिला हार मानावी लागली. आणि तिने त्याला तिचे न्युड फोटोज दिले. हळुहळु दिवस पुढे सरकत गेले. प्रणव चा हट्टी
पणा तिला माहीत होता. पण पझेसिवनेस तिला माहीत नव्हता. खुप कमी वेळात , खुप जास्त जवळ आल्यामुळे
त्यांना एकमेकांचा मुळ स्वभाव अजुन कळलाच नव्हता. मैथिली हुशार , बिनधास्त मनमोकळ्या स्वभावाची होती.
प्रणव संशयी , थोडा लिमीटेड विचारांचा , टिपीकल मुलगा होता. हळुहळु त्याचा पझेसिवनेस वाढत होता , संशयी
वृत्ती बळावत होती. तिला यायाला उशीर झाला तर कोणासोबत होतीस ? फोन वेटिंगला लागला तर कोणाशी
बोलत होतीस ? तिचे एसएमएस चेक करणे. अशा गोष्टी तो करु लागला.खटके उडु लागले. दोघांच एक क्षण पटेनास
झाले. आणि शेवटी तो क्षण आला जेव्हा बोलता बोलता प्रणव म्हणाला , ' मी थोडा हट्ट केला तर मला असे फोटो देवु
शकतेस.. म्हणजे कोणालाही देवु शकतेस !' . तिचा संयमाचा बाण सुटला . तिने त्याच्याशी लग्न न करण्याचा निर्णय
घेतला. त्याचा अंहकार दुखावला. एक मुलगी मला रिजेक्ट करते. ति माझी होऊ शकत नाही तर कोणाचीच होऊ

शकत नाही. तिने माझ प्रेम पाहीलय आता तिरस्कार दाखवतो, म्हणत त्याने तिचे न्युड फोटोज , गुगलवर एक
वेबसाईट क्रिएट करुन टाकले. त्याखाली तिचे घाण शब्दात वर्णनही केले. आणि ती लिंक काँलेजच्या एका मुलाला
पाठवली. पुढील ५ मिनीटात तिचे ते फोटो काँलेजच्या प्रत्येक मुलाच्या, सरांच्या , प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये होते.
क्षणात तिचे आयुष्य उध्वस्त झाले होते. वार्यासारखी ही बातमी सर्वञ पसरली. तिला तोंड दाखवायला कुठेच जागा
राहीली नव्हती. काँलेज च्या भिंती , बोर्डवर तिचे चिञ काढले गेले, त्यावर घाण कमेंट लिहील्या गेल्या. सर्वजण
तिलाच दोषी मानत होते. कुठलीही मुलगी अशावेळी काय करेल ? आत्महत्या.... आणि ती ही चढली ५ व्या
मजल्यावर , जीव देण्यासाठी. तिच्या इज्जतीच्या चिंधड्या उडाल्या होत्या. प्रतिमा मलीन झाली होती. मरताना एक
क्षण थांबुन तिला विचार करावासा वाटला. तिच मन तिला प्रश्न विचारत होत.
" खरच माझी चुक आहे का ? प्रेम म्हणजे काय ? रिलेशनशिप भध्ये प्रेमापेक्षाही दोन गोष्टी महत्त्वाच्या
असतात..एकमेकांबद्दल विश्वास आणि आदर. माझ हेच चुकल का? की मी त्याच्यावर पुर्ण विश्वास ठेवला. पण
त्याचवेळी , ही मुलगी स्वतः चे सर्वकाही एवढ्या विश्वासाने आपल्याकडे सोपवतेय तर तीचा विश्वास शेवटपर्यंत
टिकवण ही त्याची जबाबदारीची नव्हती का ? एक व्यक्ती म्हणुन माझ्याबद्दल त्याच्या मनात आदर नव्हता का ? मि
मेले तर काय होईल ? आधीच मलीन झालेली प्रतिमा , कदाचित अजुन दोन - चार नविन गोष्टी जोडुन डागाळली
जाईल. माझ्या चारिञ्यावर शिंतोडे उडवले जातील. माझ्या खानदानाचा उद्धार केला जाईल. माझ्या मृत्युलाही गुढ
मृत्यू बनवल जाईल. वेगवेगळ्या न्युज बनवल्या जातील. मी तर मरुन जाईल पण माझी आई जगु शकेल का या
दुःखासोबत ? माझ्या एकटीमुळे सर्व मुलींवर बोट ठेवल जाईल, बघा आजकालच्या मुली अशा असतात. समाज सर्व
मुलींना एकाच तराजुत तोलेल. आज जर मी माघार घेतली , तर कदाचित उद्या असंख्य मुलींसोबत अस घडेल. हे
थांबवायला हवं. आज जरी ९९% लोक मला चुक मानत असले तरी १% लोकतरी माझी बाजु समजुन घेतील. मला
सपोर्ट करतील. त्या १% चे १००% मध्ये रुपांतर करण्यासाठी मी जगायला हवं... आणि बदल हाच जगाचा नियम
आहे. याच बदलाचा भाग मला व्हायलाच हवं...असा विचार करुन ती वापस फिरली........
प्रणवच्या बेडरुमचा दरवाजा ढकलून शेफाली आणि शिखा आत गेल्या. प्रणव गुडघ्यात डोक लपवुन बसला
होता. दोघीही त्याच्या बाजुला बसल्या .
शिखा - पप्पा..
तशी प्रणव ने मान वर केली. अश्रुंनी डोळे न्हाले होते.
शेफाली - मला जर ही गोष्ट लग्नाआधी कळाली असती तर मी कधीच तुझ्याशी लग्न केल नसत. असो.. तुला
पश्चात्ताप होतोय यातच मी खुश आहे. तरी मला वाटतय तु भेटुन तीची माफी मागावीस..
प्रणव - पण ती कुठे आहे ? काय करते ? आहे की नाही, मला काहीच माहीत नाही.
शेफाली - डोन्ट वरी आम्हाला माहीत आहे ती कुठे आहे..
प्रणव तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहीला.

शेफाली , शिखा आणि प्रणव ला शिखाच्या शाळेत घेवुन आली. कसला तरी भव्यदिव्य
सांस्कृतिक कार्यक्रम होता. " लव , रिलेशनशिप आणि प्राँब्लेमस " या नावाचे सगळीकडे मोठेमोठे बँनर लावले होते.
मैथिलीने एक संस्था चालु केली होती. एक युनीट तयार केल होत. ति तिच्या टिम सोबत मिळुन , सर्व शाळा ,
काँलेजस , आँफिसेस मध्ये जाऊन लव , रिलेशनशिप , प्राँब्लेमस विषयी सेमिनार देते, मार्गदर्शन करते. आयुष्यात
इतक काहीतरी वाईट घडल्यावर कोणाचाही प्रेमावरील विश्वास उडाला असता. पण ती आजही प्रेमाला सुंदर म्हणते.
स्टेजवर थांबुन हजारो विद्यार्थ्यांना ती मार्गदर्शन करत होती. " प्रेम ही जगातली सर्वात सुंदर अनुभुती आहे. फक्त
त्याला सुंदर बनवण आणि बिघडवण दोन्ही आपल्या हातात आहे. एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापुर्वी शंभरवेळा
विचार करा , पण एकदा विश्वास ठेवल्यावर पुन्हा शंकेला वाव देवु नका..कारण विश्वासाने नातं टिकत आणि शंकेने
तुटतं. समोरच्याने टाकलेला विश्वास शेवटपर्यंत टिकवण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा एकमेकांबद्दल आदर असतो , तेव्हा
विश्वास आपोआप जपला जातो. आणि जिथे विश्वास आणि आदर आहे तिथे प्रेम आपोआप फुलतं.." स्टेजवर

हसतमुखाने विश्वासाने हे विचार मांडणार्या मैथिलीकडे प्रणवची नजर गेली . आणि त्याला स्वतः चीच लाज वाटली.
मैथिलीच्या या कार्यासाठी तिला अनेक पुरस्कार ही मिळाले होते. तिला हे अस पाहुन त्याला तिचे कौतुक आणि
अभिमानही वाटला , पण दुसऱ्याच क्षणी स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. आणि स्वतःच्या चुकीची माफी
मागण्यासाठी त्याचे पाय आपसुकच स्टेजकडे वळाले.
प्रणव ला समोर पाहुन ती एक क्षण शांत थांबली. आणि त्या एका क्षणात आयुष्याचा संपुर्ण चिञपट
डोळ्यासमोरुन तरळुन गेला. त्याला तर काय बोलाव काहीच कळत नव्हत. धीर एकवटुन नजरेला नजर देण्याचा
प्रयत्न करत , आवंढा गिळत , थरथरत तो बोलला
प्रणव - स.. साँरी..
त्यावार एक स्मित हास्य करत तीने उत्तर दिले.
मैथिली - इट्स ओके ... आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच. तुझ्यामुळे माझ्यात असलेल्या एका नवीन
प्रतिभेशी , व्यक्तीमत्वाशी माझी भेट झाली. त्यामुळेच आज हे काम करु शकतेय. विचारांची ही उंची गाठु शकलेय.
आयुष्य खुप बदललय... पुर्वीपेक्षा सुंदर झालय. आता आयुष्य अर्थपुर्ण वाटतय.. आणि यासाठी तु फक्त निमित्त माञ
होतास !. एवढ बोलुन ती स्टेजवरुन खाली उतरली . सर्वांनी उठुन टाळ्यांची सलामी दिली.तो माञ भरल्या
डोळ्यांनी..सर्वकाही गमावुन तिच्या जाणाऱ्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहीला. जे आपल्या सोबत झाले ते
इतरांसोबत घडु नये म्हणुन तिने पुढाकार घेतला. बदल घडवला. आणि परिवर्तनातुन घडली युगा.

- साधना वालचंद कस्पटे