Divorce in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | डिवोर्स

Featured Books
  • ચતુર

    आकारसदृशप्रज्ञः प्रज्ञयासदृशागमः | आगमैः सदृशारम्भ आरम्भसदृश...

  • ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 5

    આશા પારેખઃ બોલિવૂડની જ્યુબિલી ગર્લ તો નૂતન અભિનયની મહારાણી૧૯...

  • રાણીની હવેલી - 6

    તે દિવસે મારી જિંદગીમાં પ્રથમ વાર મેં કંઈક આવું વિચિત્ર અને...

  • ચોરોનો ખજાનો - 71

                   જીવડું અને જંગ           રિચાર્ડ અને તેની સાથ...

  • ખજાનો - 88

    "આ બધી સમસ્યાઓનો ઉકેલ તો અંગ્રેજોએ આપણા જહાજ સાથે જ બાળી નાં...

Categories
Share

डिवोर्स

आज अनय आणि त्याची छोटी बहीण परी फार दुखी होते. त्याना आपल्या आई वडिलांचा फार तिरस्कार वाटत होता. आपले आई वडील आणि ईतर मुलाचे आई वडील किती वेगळे आहेत ना ? अस त्या दोघांना वाटत होत. आपल्यालाच असे आई वडील का मिळाले..… रे.… दादा...? छोटी परी तिच्या दादाला म्हणाली.....तिच्या दादाने तिच्या कडे फक्त नजर टाकली.तो शांत होता. कारण जे काही घडत होत, ते त्याला कळत होत. आणि आपल्या कुटुंब साठी, निदान छोट्या परी साठी तरी काहीतरी करण गरजेच होत. पण सोळा वर्षच ते पोर करून तरी काय करणार होत. तेवढ्यात दार वाजले. अनय उठला, बघतो तर त्याचे बाबा आलेले. अनय पुढे गेला, त्यानी पहिल की आज ही बाबा एकटाच आला. तेवढ्यात परी धावत आली, तिने बाबाला घट्ट मिठी मारली. तिच्या मिठिने तिचा बाबा ही सुखावला, बाबा आई कुठे आहे ? आता तिच्या बाबा कडे ऊत्तर नव्हते. ' ' अनयला त्याने आवाज दिला, आणि परी ला घेऊन जायला सांगितले.' '

अनय परीला घेऊन रूम मध्ये गेला.सहा वर्षयाच्या परीने तिच्या दादाला अनेक प्रश्न विचारले. पण त्याच्या कडे काहीच ऊत्तर नव्हते.आणि त्याला हे ही कळले होते की, उद्या आई बाबांचा ' ' डिवोर्स ' ' झल्यावर हिचे प्रश्न वाहाडतील, पण आपल्या कडे काहीच ऊत्तर नसेल. काय सांगणार आपण हिला की, आपल्या आई वडिलांच्यात आता प्रेमच राहील नाही, त्यांची सतत भांडण होतात, आणि ही भांडण थम्ब्व्ण्यासाठी, त्यानी एकमेकांपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. एवढ्यात त्याचे लक्ष परीकडे गेले, परी खेळता खेळता शांत जोपली होती. त्याने तिला उचलून बेडवर ठेवले.तिच्या अंगावर पांघरून घातले.तिचा हात हातात घेत तो म्हणला, की आई बाबा जरी आपल्याला सोडून वेगळे जालेना तरी तुजा हा दादा कधीच सोडून नाही जाणार तुला.... त्याचे डोळ्यातील दोन अश्रू परीच्या हातावर पडले. पण शांत जौप्लेल्या परीला ह्याची मात्र जाणीव नव्हती. पण अनयनी मात्र मनाशी पक्क ठरवल होत.आपण आपल्या आई वडिलांना वेगळ होऊ नाही होऊ दयाच.आणि काही मनाशी ठरवून त्यानी त्याच्या वकील काकांना फोन केला. रात्रीचे बारा वाजले होते.पण अनयला आपल्या आयुष्याचे बारा वाजले असे वाटत होते. त्यानी एवढ्या रात्री फोन केलेला त्याच्या वकील काकांनी फोन उचला. अनय काही तरी मनाशी ठरवून ' ' काका मला तुम्हाला भेटायचय ' '. तिकडून आवाज....हो.... अनय....उद्या ऑफीस मध्ये ये..... ईकडून अनयाचा आवाज ' ' चालेल, मग उद्या भेटू.' ' आणि त्यानी फोन ठेवला.

अनयचे हे काका म्हणजे अनयाच्या वडिलांचे खूप जवळचे मित्र, अनय प्रमाणे ह्यानी ही खूप पर्यंत केलता, अनयच्या आई बाबांचा ' ' डिवोर्स ' ' होऊ नये म्हणून, पण ते ही हरले. ते अनयाच्या आईला पण चांगले ओळखत. त्यांच्या तोंडून ऐकल होत की अनय च्या आई बाबांच लवमेरेज जालेल. आणि अजून खूप किस्से जालेल. ह्या काकांच्या कल्पना पण खूप भन्नाट असतं, हीच त्यांची खासियत होती..... अनय ला मात्र काही जोप येत नव्हती, कधी उद्याचा दिवस येतोय अस जालत. त्याला फक्त वकिल काकांच आपल्याला ह्या प्रकरणात मदत करतील अस वाटत होत. विचार करत करत कधी सकाळ जाली ते अनयला कळलेच नाही.

अनय सकाळी लवकर उरकून निघाला. त्याच्या लाडक्या साइकल वरून, ही साइकल त्याच्या आईने त्याला गिफ्ट केली होती. त्यामुळे ती साइकल जवळ असली की आई ही आसपास आहे अस वाटायच. आणि आज त्याला आईची खूप गरज होती. तो निघाला आणि थेट वकील काकांच्या ऑफीस वर आहे. वकील काका कामात किती बिज़ी असतात हे त्याला महित होत. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांची भेट घेतलेली बरी अस म्हणून अनय लवकर आला होता. मनात खूप विचार येत होते. पण आज त्याच्या चेहऱ्यावर खूप तेज होते.

तेवढ्यात वकील काका आले. अरे, आलास पण तू. अनयला पाहत ते बोले..… हो.... त्यांच्या कडे पाहत अनयला म्हणला. त्याला आपल्या ऑफीस दिशेने नेह्त.वकील काका म्हणले, ....बोल.....बाळा...काय काम काढलंस. .......काका ....खूप महत्वाच काम आहे, आणि ह्यात तुमची खूप मदत लागणार आहे. खूप निरागसतेणे अनय म्हणाला. अरे, सांग तरी....काय लागेल ती मदत करणार तुला, हा काका. वकील काका हसत हसत अनय शी बोलले. अनय पुढे सरसावत ' ' काका मज्याकडे एक कल्पना आहे. ज्यामुळे आपण आई बाबानचा डिवोर्स थम्बवू शकतो. आणि त्याना कायमच एकत्र आणू शकतो. अनय कडे आनंदने पाहत वकील काका म्हणले ' ' तुजी कल्पना लवकर सांग. माज्या मित्रासाठी मी काहीही करू शकतो.' ' अनय पुढे बोलू लागला, आधी तुम्ही मला आई आणि बाबांची सगळी कहाणी सांगा, तरच माजी कल्पना यशस्वी होऊ शकते.' '

सांगतो.....सगळे सांगतो..पण आता तितका वेळ नाही. संध्याकाळी घरी ये. तुला सगळ सांगतो. वकील काकांचे आभार मानात. ' ' थँक्स काका ' '. या वर वकील काकांची गोड स्माइल त्याला दिसली होती, जी ईतक्या दिवसापासून हरवली होती. काका अजून एक काम आहे., दोन दिवस जाले, आई आजी च्या घरी राहाते, परी ला तिची खूप आठवण येते. तर आई घरी येण्यासाठी पहिली कल्पना, ज्यात मला तुमची मदत हवी. अनय बोलून थम्बला. ' ' हो, सांग मी कसलीहि मदत करायला तयार आहे.' ' वकील काका म्हणले. अनय वकिल काकांनजवळ गेला, त्यानी कानांत त्याच्या काहीतरी सांगितले. यांवर हसत काका म्हणले, लगेच कामाला लागतो. आणि त्यानी जवळचा फ़ोन हातात घेतला. आणि अनय च्या सांगण्यावरून त्याच्या आईला फोन केला, आणि अतिशय दुखी आवाजात, अहो, वहिनी अनय बघा, साइकल वरून पडला, फार जखम जालीये. प्लीज, तुम्ही माज्या ऑफीस मध्ये येताल. तिकडून ' ' हो ' ' असा आवाज आला. आणि काकानी फोन ठेवून दिला. अनय आणि काका हसू लागले. थोड्यावेळानी अनयची आई धावतपळत वकिल काकांच्या ऑफीस मध्ये आली, कुठंय माजा अनय कुठंय ? एवढ्यात अनयचा आवाज आला ' ' आई मी एथे आहे.' ' अनयच्या आईने मागे वळून पहिले तर अनयच्या दोन्ही पायाना पट्ट्या, डोक्याला पट्टी, हात गळ्यात. त्याची जखम बघून आई अनयला म्हणाली, काय रे.… माळ्यावरून पडलास की, साइकल वरून. यांवर वकिल काकांना मात्र फार हसू आले. पण त्यानी ते दाखवल नाही. एवढ्यात आई आणि वकील काकांच्या मदतीने अनय गाडी मध्ये बसला. वकील काकांचे धन्यवाद मानून, अनयच्या आईने गाडी घरी घ्याला सांगितली. अनय खूष होता, की त्याची आई आता त्याच्या घरी येणार, कारण गेली कित्येक दिवस ती तिच्या आईच्या म्हणजे अनयच्या आजी आजोबान कडे राहत होती.पण फ़ाइनली, ती आता अनयच्या बाबांच्या घरी येणार.परी तर केव्हढी खूष होईल.पण जिंकलो, हि भावना अनयच्या मनात यायला आणि अनयची स्वप्नाचा चुराडा व्हायची एक वेळ जाली.अनय त्याच्या आजीच्या घरी आला होता.

गाडी घराजवळ येऊन थम्बली.आता पळवाट काढायला जागाच नव्हती. अनय त्याच्या आईला म्हणला, आई आपण ऐथे कुठे आलो ? ....अरे… ह्या घराला विसरलास काय ? तुजी आई ऐथेच राहते आणि तुम्ही पण ऐथेच राहणार माज्यासोबत, मी ड्राइवरला तुज सामन आणायला सांगितलय, आणि परीला सुध्दा तुम्ही दोघेहि ऐथेच राहणार. अनयची आई एवढ सगळ एका मिनिटात सांगून गेली. आता...काय बिचारा अनय... पहिलाच प्लान त्याचा फ्लॉप जाला. आता काय व्हील चेअर वरून फिरा ईकडे तिकडे. अनय आईच्या मदतीने घरात आला. त्याच्या आईने त्याला बेडवर झोपवले. आणि त्याच्यासाठी पोहे बनवून घेऊन आली. आईच्या हातचे पोहे अनयचे आवडते, तो ते घ्याला पुढे हात करणार, तोच त्याची आई म्हणाली, हात गळ्यात आहे तुजा, कसा खाणार तू ? थाम्ब मी भरवते. अस बोलून आई अनयला भरवू लागली. खूप दिवसांनी अनयची आई आणि अनय ह्याना असा एकत्र वेळ घालवत होते. ईतर वेळी तीच शूटिंग, पार्ट्या, मीटिंग, घरातील काम असायची. आईच्या हातचे पोहे अनय किती दिवसांनी खात होता, त्याला पण आठवत नव्हते. आणि ते पण अस भरवून वेगेरे अस नाही

अनयने काहीतरी विषय काढायचा म्हणून, विषय काढला.आई, आजी आजोबा कुठयेत ? ते मावशीकडे गेलेत.....बर तू आराम कर....मी शूटिंग सोडून... आले, जरा उद्याच्या सीनची तरी तयारी करते. अनयची आई हि पेशाने डॉक्टर पण तिला फार मोठी हिरोईन व्हायाच होत. घरचे सगळे डॉक्टर, त्यामुळे तिला डॉक्टर व्हावे लागले.पण तिने जिद्द न सोडता, हिरोईन बनायचे आपल स्वप्न पूर्ण केल.

एवढ्यात अनय तिला म्हणला, आई एकटी कशाला सीनची तयारी करते.मी तुजी मदत करतो. मी लहान असताना, तू कशी प्रक्टिस करायची, त्यावेळी मला काही कळत नव्हत मी नुसत हसायचो. त्याचे वाक्य मध्येच थम्बवत त्याची आई त्याला म्हणाली, हो.....त्यावेळी तू लहान, घर संभालायच. मग कुठे वेळ मिळणार. त्यावेळी मी अशी घराघरात सुध्दा पोहचले नव्हते.दीड वर्ष मेहनत केल्यावर ती मालिका मिळाली होती. आणि मला ती संधी सोडायची नव्हती. आज माय लेकान्चा छान संवाद चालला होता. मधेच आईला अनय म्हणाला, आई तू तो कथ्थक नाच कर ना. आश्चर्यचकित होऊन आई, अनयकडे बघतच राहिली. ' ' हो.....आई ' ' खूप छान होता तो नाच. हसत हसतच अनयची आई अनयला म्हणली. मी.… लहान.. होते. तेव्हा तुज्या आजी पासून चोरून तो कथ्थक चा क्लास लावलेला. आईला वाटायचं की मी फार मोठी डॉक्टर होईल, पण.......आणि जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा मी कथ्थक आमच्या डॉक्टर च्या स्पर्धेत केलता तेव्हा तुज्या बाबांना फार आवडल होत. पण आता..... आता पर्यंत हसत असलेली त्याची आई आता रड्वेलि झाली होती. तीच लक्ष वेधून घेण्यासाठी अनय म्हणला, आई घड्ल्यात किती वाजलेत बघ. चल ना मस्त एखादी फिल्म बघू. अरे.… अनय.… ते सगळ ठीक आहे, पण हा ड्राइवर कसा आला नाही. आणि परी सुध्दा नाही. त्यात तू ऐथे पोरगी, घरी एकटीच. मला काळजी वाटते रे तिची. आईला समजावत, अग..… बाबा.… आहे ना तिथे.तो घेयील तिची काळजी, आणि तिने पण ते शिकून घेतल पहिजे.उद्या तूमचा डिवोर्स जाल्यावर तिची कोण घेणार काळजी ?.....आतपर्यंत हसर असलेल वातावरन एकदम शांत जाल.

तेवढ्यात फोनची रिंग वाजली, अनयच्या आईने फोन ऊचलला, तिकडून कोणी तरी भांडत आहे अस अनयला वाटल. फोन ठेवला गेला. अनयनी विचारल.… काय.… जाल.… आई ? आपल आलेल मन भरून थम्ब्व्त ती म्हणाली, नेहमी प्रमाणे तुज्या बाबांचा फोन होता, तो परीला काही ऐथे पाठवत नाहीये. आणि तो तुला पण ऐथुण घेऊन जाणार आहे.तर तू ठरव.… तुला कोणच्या सोबत राहायचंय. मी बाहेर आहे. तू नीट विचार करून सांग. अस म्हणून त्याची आई बाहेर निघून गेली.

आतापर्यंत खूष असणारा अनय आता मात्र फार दुखी जाला, तो मनाशीच म्हणला, कोणासोबत काय ? मला तुम्हा दोघाणसोबत राहायचंय. पण आता काहीतरी नवीन प्लान कराव लागणार हे अनयनी ठरवल.… पण काय..… अनयला काहीच सुचेना. त्यानी वकिल काकांना फोन केला. .....आणि त्यानी अनयला एक सूपर कल्पना दिली. अनय आता भलताच खूष जाला. ईकडे अनयची आई फारच दुखी होती. आपल्या मुलाना आपल्याला नीट जवळ सुध्दा घेता येत नाही. न त्याना भेटता येत नाही. अस का? आता नीरज आल्यावर तो घेऊन जायील अनयला. मग मी आई असून सुध्दा नाही थम्ब्वू शकत त्याला ?

डिवोर्स ची पुढील कथा वाचण्यासाठी भाग 2 पहा.