Quotes by श्रीराम विनायक काळे in Bitesapp read free

श्रीराम विनायक काळे

श्रीराम विनायक काळे Matrubharti Verified

@ysnyrsno2175.mb
(135)

सहा मार्चपासून मातृभारती वेब पोर्टलवर माझी बी एड फिजिकल कॉलेज, कांदिवली ही मालिका सुरू झाली सदर मालिकेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आज अखेर मालिकेचे आठ भाग प्रकाशित झाले असून आठ दिवसात३००० वाचक संख्या गाठलेली आहे.अजून दहा भाग क्रमशः प्रकाशित होतील. मला प्रेरणा प्रोत्साहन देणाऱ्या रसिक वाचकांचे मी मनापासून आभार मानतो हे प्रेम आणि जिव्हाळा असाच राहू दे. ‌

Read More

२९डिसेंबर२०२४ला आठ लघुकथा असलेला माझा कथासंग्रह "वसतीची गाडी" ई साहित्य प्रतिष्ठान वर प्रसिध्द झाला.

ई साहित्यवर आज बॅड कमांड हा प्रा. श्रीराम काळे लिखित कथासंग्रह प्रकाशित होत आहे. देवगड येथील काळेंच्या कथांना बहुतांशी कोकणची ग्रामीण पार्श्वभूमी लाभलेली असते. त्या पार्श्वभूमीमधे कोकणचे निसर्ग सौंदर्य तर असतेच पण तिथल्या लोकांचा निर्भीड, स्पष्टवक्ता स्वभाव आणि त्याला हापूसचा गोडवा याचीही साथ असते.
बॅड कमांड हा काहीशा बोल्ड कथांचा संग्रह आहे. माणसांच्या परस्परसंबंधांतील न बोलल्या जाणार्‍या पण कायम तरळत असणार्‍या वासनांचा या कथांवर प्रभाव आहे. समाजातील व्यंग अचूक पकडून त्यावर प्रकाश टाकणाऱ्या चटकदार कथा या संग्रहात आहेत.
- सुनीळ सामंत, ई साहित्य प्रतिष्ठान

www. e sahitya .com वरून मोफत डाऊन लोड करा.

Read More