Quotes by Swapnil Dnyaneshwarrao Karhale Patil in Bitesapp read free

Swapnil Dnyaneshwarrao Karhale Patil

Swapnil Dnyaneshwarrao Karhale Patil

@swapnildnyaneshwarraokarhalepatil956503


राष्ट्राची प्रगती की मानवतेची अधोगती

खूप थकलेला दिसतोस रे
माझ्या पंढरीच्या राजा पांडुरंगा
कसा सहन होतोय रे विठ्ठला तुला
अस्तित्वासाठी चाललेला अमानवी दंगा

माझा शेतकरी राजा झालाय
कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे वेडापिसा
पापाच्या पैशामुळे फुगत चाललाय
भ्रष्ट आणि निर्दयी राजकारण्यांचा खिसा

शेतकऱ्याचं ऐकणारा कोणी नसल्याने
करतोय तो अश्रूंची काळजामध्ये साठवण
अशा खडतर प्रसंगावेळी खरंच येते
स्वराज्यसंकल्पक शहाजी महाराजांची आठवण

पाठव ना रे विठ्ठला त्यांना परत
खचून गेली स्वाभिमानाची धरती
नक्कीच आळा बसेल पांडुरंगा
भ्रष्ट हुकुमशाही राजकारणावरती

शेतकरी राजा खूप खचलाय रे
कायम पाठीशी असो तुझा आशिर्वाद
लवकरच मिटवून टाक पांडुरंगा
माणुसकी संपवणारा अस्तित्वाचा वाद

स्वप्निल संगीता ज्ञानेश्वरराव कऱ्हाळे पाटील
लेखक शाश्वत सत्य मराठी काव्यसंग्रह
मो. नं. 9049225717

Read More