Quotes by Prof Purushottam M Patel in Bitesapp read free

Prof Purushottam M Patel

Prof Purushottam M Patel

@puru.mhasawad.in


विठू तुझे नाम ( भक्तीगीत)

विठू तुझे नाम वाटे मज भारी
जगी फक्त चाले देवा तुझी वारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय जय हरी !

विठू नाम घेता टळे जन्म फेरी
तुच मुक्ती दाता त्रिखंडात तारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय जय हरी !

तुझ्या सेवेपायी मिळे मुक्ती चारी
तुच माझा अंतरी तुच रे वैखरी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय जय हरी !

आलो तुझ्या द्वारी भेट दे क्षणभरी
विठू पितांबरधारी जीव तू उद्धारी
भुवरीचा स्वर्ग देवा तुझी पंढरी
जय जय विठ्ठल जय जय हरी !

©® प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल “पुष्प ”

Read More