Quotes by Krushna Jagtap in Bitesapp read free

Krushna Jagtap

Krushna Jagtap

@krushnajagtap065631


ध्येय कधी सोडू नको  !!!

काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य

पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य,

नशीबाला शिव्या देत,

प्रयत्नांना मुकरु  नको 

काटेरी मार्ग असेल ,पण ध्येय कधी सोडू नको !!!

 

जागोजागी मिळतील वैरी, नको त्याची भ्रांत 

लक्ष्य ध्यानात ठेव,तू चाल रे निवांत ,

शत्रूना घाबरत,

मान कुठेही झुकवू नको

काटेरी मार्ग असेल ,पण  ध्येय कधी सोडू नको !!!

 

मन आहे चंचल,नाही ते स्थिर 

हरत आहेस तरी,तू नको रे सोडू धीर,

अपयशाला बघून,

लक्ष कधी विसरू नको

काटेरी मार्ग असेल ,पण ध्येय कधी सोडू नको !!!

 
जन्मला आहे तर जग, नको पाहू मागे 

आयुष्याचा  शेवटी बाकी फक्त आठवणींचे धागे

माणूस म्हणून जगला, 

पण सामान्य माणूस  म्हणून मरू नको

काटेरी मार्ग असेल ,पण  ध्येय कधी सोडू नको  !!!


.

Read More

??पोरगी वयात आली तेंव्हा आपल्या आई वडिलांना वाटणारी भीती.
ही पोस्ट फक्त चिंताजनक आई वडिलांसाठी??

पोरगी वयात येत आहे, ओढणी गळ्यात घेत आहे
पाठवू कशी तिला कुठे मी ,काळजी मलाच होत आहे.......
जाहली दुकान आज शाळा ,मंदिरात देव झोपलेला ,
बांधले हरिण दावणीला ,वाचवेल कोण पाडसाला ....
ओळखीतही दगाच होतो ,
पोरगी वयात येत आहे ....
वाढते शरीर फ़क्त आहे ,ती अजूनही लहान आहे,
भाबड्या मनात पाप नाही , ज्ञान ही तिची तहान आहे ....
लोक चांगले कुठेच नाही , हाक कातळास देत आहे,
पोरगी वयात येत आहे .....
पाहतात देह वासनेने, स्पर्शतात काम भावनेने,
छेदती कटाक्ष कापडाला ,अंग झाकणार ती कशाने....
का दया कुणास येत नाही, ही बहिण माय लेक आहे,
पोरगी वयात येत आहे....
लांडगा मनामनात आहे ,माजली पुरुषजात आहे,
कुंपणास दात आज आले, ते स्वतःच शेत खात आहे....
दाद मागते कुणाकडे मी , चालले घराघरात आहे ,
पोरगी वयात येत आहे .....
पोरगी वयात येत आहे ,ओढणी गळ्यात घेत आहे,
पाठवू कशी तिला कुठे मी, काळजी मलाच होत आहे..

Read More