Prologue
काही लोक आयुष्यात येतात सगळं बदलायला आणि मग निघून जातात सगळं अपूर्ण ठेवून ही कथा आहे Aaryan आणि Mira ची ज्यांनी प्रेम केलं पण वेळ हरवली आणि एक कॉल
फक्त 50 मिनिटांचा…!
ज्याने त्यांच्या आयुष्याचं सगळं truth उघड केलं.
Chapter 1: पहिली नजर — जी थांबलीच नाही
Office चा तो साधा दिवस होता लोक त्यांच्या कामात busy होते keyboards चा आवाज, phones ringing, meetings Aaryan नेहमीप्रमाणे confident चालत आत आला.त्याचं presence जाणवायचं लोक respect ने बघायचे.पण त्या दिवशी त्याचं लक्ष कुठेच नव्हतं कारण ती होती Mira. ती तिच्या cabin मध्ये बसली होती simple kurta केस हलके बांधलेले काही खास नाही… पण सगळं खास होतं
Aaryan चालत चालत थांबला पहिल्यांदाच,
त्याला कुणाकडे बघून reason सापडत नव्हता
पण नजर हटत नव्हती
“काय बघतोयस…?” त्याचा colleague म्हणाला.
तो लगेच सावरला
“Nothing…”
पण आतून त्याला कळलं होतं…
हे ‘nothing’ नव्हतं…
Chapter 2: Coffee Machine — जिथे प्रेम शांतपणे वाढलं
Office मध्ये एकच जागा होती जिथे दोघं regularly भेटायचे Coffee machine. Aaryan ने routine बदललं तो exact त्याच वेळेला coffee घ्यायला जायचा जेव्हा Mira येते. पहिल्या काही दिवसांत फक्त नजर नंतर हलकं smile…
आणि मग एक दिवस
Aaryan: “Same coffee… right?”
Mira थोडी घाबरली… पण हलकं हसली—
“Hmm…”
ती काही जास्त बोलत नव्हती
पण तिच्या डोळ्यांत खूप काही होतं
दोघं बाजूला उभे राहून coffee पीत होते
काही बोलत नव्हते
पण त्या silence मध्ये awkwardness नव्हती
ती comfort होती
Chapter 3: तो स्पर्श — ज्याने सगळं बदललं
एक दिवस अचानक fire alarm वाजतो
सगळे panic
“Evacuate! Evacuate!”
Mira visibly घाबरली
ती इथे नवीन होती
काय करायचं हे समजत नव्हतं
तेव्हाच Aaryan तिच्या जवळ आला
त्याने हलकं तिचा हात धरला—
“Relax… मी आहे…”
त्या एका वाक्यात एवढी safety होती
की Mira शांत झाली
ते दोघं बाहेर आले
पण Mira चं लक्ष fire वर नव्हतं
तिचं लक्ष त्या हातावर होतं
जो अजूनही तिला सुरक्षित वाटत होता
त्या दिवशी
ती त्याच्यावर पडली
शांतपणे
Chapter 4: जे बोलायचं होतं… पण बोललं गेलं नाही
Farewell day Last day Last chance
Mira आरशासमोर उभी होती
“आज बोलायचं… काहीही झालं तरी…”
ती venue मध्ये आली
Aaryan तिथेच होता
तो तिच्याकडे बघत होता
जणू wait करत होता
ती त्याच्याकडे चालायला लागली
एक… दोन… तीन पावलं
पण…
तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं
“काय बोलणार…? कसं बोलणार…?”
ती थांबली
आणि मागे वळली
Aaryan तसाच उभा राहिला
तो काही बोलला नाही
कारण त्याला वाटलं
“जर तिला सांगायचं असेल… ती सांगेल…”
त्या दिवशी
दोघांनी काहीच नाही केलं
आणि सगळं गमावलं
Chapter 5: पुन्हा सुरुवात — पण उशिरा
तीन वर्षांनी
Aaryan चा phone vibrate झाला
Unknown notification
“Hi… ओळखलं का?”
तो message पाहून थांबला
एक छोटंसं smile आलं
“कसं विसरेन…”
त्या एका reply ने
सगळं पुन्हा सुरू झालं
त्यांचे calls सुरू झाले पहिले 10 minutes मग 1 hour…मग full रात्री
कोणताही topic नसताना पण conversation संपत नव्हतं
Mira:
“तू इतका शांत का असतोस…?”
Aaryan:
“कारण तू बोलतेस ते ऐकायला आवडतं…”
ती हसायची
Aaryan ला तिच्या आवाजावरून कळायचं
ती happy आहे की sad
एक दिवस Mira call उचलत नाही
Aaryan पुन्हा पुन्हा call करतो
नंतर ती उचलते
“Sorry… mood नव्हता…”
Aaryan:
“मला कळलं होतं…”
ती थांबते
“कसं…?”
तो हसतो
“तू ‘hello’ वेगळ्या tone मध्ये म्हणालीस…”
ती शांत होते
कारण
कोणीही तिला इतकं समजलं नव्हतं
Chapter 7: पावसातलं प्रेम
पहिली भेट पाऊस दोघं एका छत्रीत थोडं अंतर पण खूप जवळ…
Mira:
“आपण आधी का नाही भेटलो…?”
Aaryan:
“कदाचित आता जास्त value कळतेय…”
ती त्याच्याकडे बघते
आणि त्या पावसात
दोघं officially काही बोलत नाहीत
पण
दोघांनाही माहित होतं—
हे प्रेम आहे
Love deep होतं म्हणून expectations वाढल्या
Mira चा dialogue—
“सगळं मीच करते पहिला call, पहिला msg…”
Aaryan शांत
कारण तो ego ने नाही समजून घेत होता तो reply देतो
“तू करतेस… कारण तुला काळजी आहे…”
ती रागात
“आणि तुला नाही…?”
तो हळूच
“मला दाखवता येत नाही… पण आहे…”
ती शांत होते…
Chapter 9: तो कॉल — ज्याने सगळं संपवलं
एक दिवस Mira चा call…
आवाज थरथरत होता…
“घरी लग्नासाठी pressure आहे…”
Aaryan काही बोलत नाही तो फक्त ऐकतो
“तुला काय हवंय…?” तो विचारतो
ती थोडा वेळ शांत…
“मी… मुलगा बघते…”
त्या क्षणी
Aaryan आतून पूर्ण तुटतो
पण आवाज calm ठेवतो “As you wish…”
त्या एका वाक्यात त्याने तिच्यावरचं प्रेम दाबलं…
आणि तिला सोडलं
Chapter 10: कॉल नंतरची शांतता
Call संपतो Room शांत Phone हातात Screen बंद
पण आठवणी चालू Aaryan रडत नाही कारण काही दुःख डोळ्यांतून नाही आतून वाहतं…
वर्षं जातात Aaryan successful होतो लोक त्याच्याकडे पाहून inspire होतात पण त्याच्या आयुष्यात एक जागा कायम रिकामी राहते
Mira कधी कधी त्याचा profile बघते पण call करत नाही.
00:00 — Ring
(रात्री उशिरा… room मध्ये फक्त dim light… phone vibrate…)
Aaryan स्क्रीनकडे बघतो… unknown number
तो दोन सेकंद बघत राहतो
उचलावा का नाही…?
तो call accept करतो
Aaryan: “Hello…?”
(शांतता…)
फक्त हलका… तुटक श्वास
तो पुन्हा
Aaryan: “Hello… कोण बोलतंय…?”
(हलका आवाज… जणू खूप धैर्य गोळा करून…)
Mira: “…ओळखलंस…?”
(Aaryan चं हृदय literally skip होतं…)
तो काही सेकंद काही बोलत नाही…
Aaryan (हळू): “…Mira…?”
(दोघंही काही बोलत नाहीत…)
पण त्या शांततेत
जुने calls
night talks
missed chances
सगळं परत जिवंत होतं
Aaryan: “कशी आहेस…?”
Mira: “हम्म… ठीक…”
(ती लगेच विषय बदलते)
“तू…?”
Aaryan (हलका श्वास सोडत):
“ठीक राहायला शिकलो…”
(ती थांबते… कारण तिला कळतं — तो ठीक नाही…)
Mira:
“तू अजूनही तसाच बोलतोस…”
Aaryan:
“तू अजूनही अचानक गायब होतेस…”
(दोघं हलकं हसतात… पण डोळ्यात पाणी…)
(थोडा pause… मग ती…)
Mira (थरथरत्या आवाजात):
“तू थांबवायला हवं होतंस…”
(Aaryan डोळे बंद करतो
तो ह्या वाक्यासाठी तयार नव्हता…)
Aaryan (खूप शांत):
“तू थांबायला सांगितलं नाहीस…”
Mira:
“मी वाट बघत होते… तू काहीतरी बोलशील…”
Aaryan:
“मी वाट बघत होतो… तू थांबशील…”
(ती अचानक थोडी जोरात बोलते…)
Mira:
“तुला कधी वाटलं नाही का… की मी फक्त ‘ठीक आहे’ म्हणतेय म्हणून ठीक नाहीये…?”
(Aaryan चा आवाज खूप deep होतो…)
Aaryan:
“मला सगळं कळत होतं…
पण… मला वाटलं तू strong आहेस…”
(ती आता थांबत नाही…)
Mira:
“मी strong नव्हते… Aaryan…
मी रोज वाट बघत होते…
तू call करशील… तू म्हणशील ‘थांब’…”
(ती रडायला लागते…)
(Aaryan काही सेकंद काही बोलत नाही…)
मग हळूच
Aaryan:
“मी रोज number dial करायचो
पण last moment ला कट करायचो…”
Mira (हलका हसत, रडत):
“आपण किती stupid होतो ना…?”
Aaryan:
“नाही…
आपण फक्त… उशिरा समजलो…”
(ती deep breath घेते…)
Mira:
“मी… married आहे आता…”
(पूर्ण शांतता…)
Aaryan च्या हातातला phone घट्ट पकडलेला
तो काही सेकंद बोलू शकत नाही
Aaryan (आवाज steady ठेवत):
“कसा आहे तो…?”
Mira:
“चांगला आहे…”
(थोडा pause…)
“पण…”
Aaryan:
“पण…?”
Mira (हळू):
“त्याच्यासोबत शांतता असते
तुझ्यासोबत feeling असायची…”
(Aaryan डोळे बंद करतो…)
Aaryan:
“आपण चुकीचे नव्हतो…
आपण फक्त wrong time ला भेटलो…”
Mira:
“आजही… मी call उचलते तेव्हा वाटतं… तू असशील…”
Aaryan:
“आजही… unknown number येतो तेव्हा
मला वाटतं… तू असशील…”
(दोघंही शांत… फक्त रडत…)
Mira:
“मी खुश आहे… पण complete नाही…”
(Aaryan चा आवाज खूप हलका…)
Aaryan:
“मी complete आहे…”
Mira:
“कसं…?”
Aaryan:
“कारण तू कधी माझी होतीस
आणि ते कोणी बदलू शकत नाही…”
Mira:
“आज call केला
move on व्हायचं होतं…”
Aaryan:
“Move on होत नाही
फक्त सवय होते… तुझ्याशिवाय जगायची…”
(Aaryan deep breath घेतो…)
Aaryan:
“पुन्हा call करू नकोस…”
(ती शांत…)
Aaryan (आवाज तुटतो):
“कारण… मी पुन्हा तुटेन…”
Mira (हळू, almost whisper):
“…Sorry…”
50:00 — End
(Last silence…)
Mira:
“Bye… Aaryan…”
Call disconnect…
Aaryan तसाच बसलेला Phone हातात Screen काळी Room शांत Clock ticking तो डोळे बंद करतो एक अश्रू येतो पण तो पुसत नाही तो फक्त हळूच बोलतो “आपण… almost होतो…”
“काही प्रेम कहाण्या ‘end’ होत नाहीत…
त्या फक्त एका call वर थांबतात…”