एक प्रेम कथा अशीही भाग 1
मित्रानो आपण बऱ्याच प्रेम कथा वाचल्या असेल, पहिल्या असेल आणि ऐकल्याही असेल पण ही प्रेम कथा जरा वेगळी आहे. या कथेतील पात्रांसाठी प्रेमाबद्दल असलेले वेगळे रंग, प्रेमाबद्दल असलेल्या वेगळ्या भावना, त्यांचे दृष्टिकोन आणि ध्येय हे या प्रेमकथेला जरा वेगळं बनवत. wait.. wait.., मी तुम्हाला एवढ का बोर करत आहे चला सुरु करूया आपण या प्रेम कथेला.
" शेवटी तुझा निर्णय तरी काय? " हे शब्द अभिमन्यूने फोनवर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे धुके जमा झाले.. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. जीवनात एवढ्या लवकर ही वेळ येईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. कॉफीचा कप घेऊन तो हॉल मध्ये टी. व्ही. पाहत बसला होता. टी. व्ही वर कसलातरी दर्दभरा मूवी सुरु होता. पण छे ! हो त्यांच मन कशातच लागेना आणि त्यांच मन सरळ भूतकाळात गेलं आणि त्याला आठवली कॉलेज मधली पहिली कॉफी.
कॉलेज इंट्रो नुकताच संपलेला होता आणि पाऊस ही बराच पडून गेलेला होता. इंट्रो कॉलेज हॉल मध्ये असल्यामुळे पाऊस काहीही जाणवला नव्हता पण कॅन्टीन मध्ये भलताच पाऊस जाणवत होता. कॅन्टीन समोर सगळीकडे चिखल माखला होता.... रस्त्यावरून शिंपले पाठीवर घेऊन गोगलगायी इकडून - तिकडे जातांनी दिसत होत्या, कुठे- कुठे पाण्याचे तळे साचलेले दिसत होते, चाफ्याच्या पांढऱ्या फुलाच्या झाडावरून थेंब नि थेंब पाऊस पडत होता जणू काही पांढऱ्या पऱ्या भिजत आहे असा भास होत होता. गुलाबी थंडगार वारा त्याच्या शरीराला बोचरा स्पर्श करून जात होता जो कॉफीची चव आणखीनच वाढवत होता. " बघ माझी आठवण येते का? " हे एकच गाणं गारवा अल्बम मधील अभिमन्यू आपल्या मनात गुणगुणत होता. रोम रोम रोमांचित करेल असे वातावरण होते. अभिमन्यू आपल्या विचाररम्य दुनियेत हरवला होता. एक अशी दुनिया जिथे फक्त तोच होता. अभिमन्यू हा देखणा रुबाबदार, रंगाने गोरा, 6 फूट उंच, अतिशय साधी अशी केशरचना, पाणीदार डोळे असा त्याचा अवतार. इतक्यात त्याला काहीतरी जाणिवले कुणीतरी समोरून त्याच्याच कडे येत आहे असे त्याला भासले. समोरून पाच साडेपाच फूट उंचीचा, सावळा, छोटे केस, शिराराने सडपातळ मुलगा अभिमन्यूच्या समोर येऊन उभा राहिला.
" माफ करा मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केल ना? "
" नाही नाही " अभिमन्यू म्हणाला.
" हाय माझं नाव अनिकेत जोशी आणि मी B.Sc Biology च्या प्रथम वर्षाला आहे. आज पहिलाच दिवस आहे म्हणून कोणी ओळखिच भेटते का हे शोधतोय आणि तुम्ही भेटलात."
" तु B.sc Biology च्या प्रथम वर्षाला आहे अरे मी पण तर B.sc biology च्या प्रथम वर्षालाच आहे पण क्लास इंट्रो मध्ये तुला बघितलं नाही ".
" अरे आज मला यायला उशीर झाला आणि खरं सांगू तर मला भीती वाटत होती कि class intro मध्ये सिनियर आपली रॅगिंग तर नाही घेणार म्हणून मी आज क्लास इंट्रो ला नाही आलो".
" अरे तु उभा का आहेस बस ना कॉफी घेतोस का? " अभिमन्यूने अनिकेतला विचारले.
" मी कॉफी नाही घेत "
" घेऊन तर बघ खूप मस्त कॉफी आहे कॅन्टीन मधली" असे म्हणत अभिमन्यू आणखी एक कॉफी सांगतो आणि कॉफीचे घोट घेत अभिमन्यू अनिकेतला विचारतो.
" तु मूळचा इथलाच आहे का? "
" नाही मी मूळचा सातारा जिल्ह्यातील सोनगाव मधला आहे. माझे बारावी पर्यंतचे शिक्षण साताऱ्यालाच झाले. तस तर मला बारावी नंतर हॉटेल मॅनेजमेन्ट करायचे होते परंतु वडिलांची इच्छा मी B.sc करावी ही होती म्हणून मी B.sc ला प्रवेश घेतला. "
"ओह्ह अस्स्स आहे तर पण काय योगायोग बघ ना मी पण साताऱ्याचाच आहे म्हणजे मूळचा साताऱ्याचा नाही सातारा जिल्ह्यतील काठेवाडी इथला आहे. माझे महाविद्यालयीन शिक्षण काठेवाडी इथेच झाले " अभिमन्यू मोठ्या उत्साहात म्हणाला.
" हो ना ! नक्कीच "
एवढ्यात अनिकेतच whatss app मेसेज नि खणाणतो आणि तो whatss app पाहण्यात गुंग होतो. whatss app msg पाहताना त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटू लागते.
" काय रे तु तर whatss app मध्ये गुंग झाला यार By the way तुझा व्हाट्स अँप नंबर दे ना " अभिमन्यू म्हणतो.
त्यानंतर अभिमन्यू आणि अनिकेत एकमेकांचे व्हाट्स अँप नंबर घेतात आणि आपल्या कॉलेज चे कॅम्पस पाहायला निघतात.
"शासकीय विज्ञान आणि कला महाविद्यालय नागपूर हे नागपूर मधलं सर्वात प्रशस्त आणि ख्यातीमय कॉलेज आहे असे मी ऐकलंय पण खरं काय कुणाला माहित म्हणून मी इथेच Bsc ला प्रवेश घेतला " अभिमन्यू म्हणाला.
" हो मी पण तेच ऐकलंय माझा मामेभाऊ त्यानेही इथूनच Msc केलय ".
" कॉलेज ब्राऊचर मध्ये लिहलंय कि 170 एकर चा कॉलेज कॅम्पस आहे म्हणून ही जरा अतिशयोक्तीच असेल.... नाही कॉलेज तस भव्य दीव्य आहे आणि निसर्गाच्या सानिग्ध्यातही आहे. कॉलेज मध्ये हिरवळ ही किती आहे राव.
अभिमन्यू आणि अनिकेत कॉलेज च्या कॅम्पस मध्ये फिरण्यात गुंग असतात. अनिकेत आपल्या मोबाईल च्या कॅमेरातुन कॉलेज कॅम्पस चे फोटो घेण्यात दंग असतो. पाऊस पडून गेल्यामुळे गवतावर पाण्याचे थेंब अतिशय चमकत होते जणू काही अतिशय चमकणारे हिरे गवतावर लावून ठेवले आहे असे वाटत होते, गुलमोहराच्या झाडाखाली गुलमोहराच्या लाल फुलांचा सडा पडलेला होता, कॉलेज मधल्या लायब्ररी समोर नारळाच्या झाडाखाली अतिशय छोटी छोटी नारळे पडलेली दिसत होती. एवढ्यात अभिमन्यू आणि अनिकेत ला प्रथम वर्ष्याची बरीच मुले भेटली दीपक, करण, अभिषेक, वरून ही सगळी प्रथम वर्षाला वेगवेगळ्या शाखेतील मुले होती. दीपक हा Bsc कॉम्पुटर सायन्स ला होता, करण हा physics ला होता, अभिषेक हा स्टॅटिस्टिकस ला होता. फक्त वरूण हा एकच biology शाखेतला होता म्हणून त्या तिघांची छान गट्टी जमली होती.
आता वरूण, अभिमन्यू आणि अनिकेत कॉलेज कॅम्पसच्या बाहेर फिरू लागतात. बाहेरचे वातावरण कॉलेज कॅम्पसच्या बिलकुल विरुद्ध होते. कॉलेज कॅम्पस मध्ये वातावरण अतिशय शांत, हिरवळ आणि निसर्गरम्य होते. तर बाहेरचे वातावरण अतिशय कर्कश आणि वर्दळीचे होते. बाहेर कारचे, ट्रकचे आणि मोटसायकलीचे हॉर्न जोरदार वाजत होते, सिग्नल वर ट्रॅफिक पुलिस शिट्या वाजवून गाड्या अडवताना दिसत होते, पाऊस थांबल्यामुळे काही कॅफेचे दुकान आता उघडतानी दिसत होते, रस्त्याच्या कडेवर मक्याचे कणीस भाजून देणाऱ्या गाडीवर अतिशय गर्दी दिसत होती, पाऊसामुळे रस्त्याच्या मधातच अतिशय भक्कम झाड जमीनदोस्त झाल्यामुळे तिथे ट्रॅफिक थांबून कानाच्या कानठळ्या बसाव एवढा आवाज होता. एवढ्यात हातात हात धरून लहान शाळकरी मुलगा आणि मुलगी शाळेत जातांनी अभिमन्यू ला दिसली आणि कसल्यातरी विचारात तो गुंग झाला.
" ऐ आपण भुट्टा खाऊया का? " वरुणचे हे शब्द कानावर पडताच अभिमन्यू भानावर आला.
" खाऊया कि "
रस्त्याच्या कडेवर ते भुट्टा खायला जाऊ लागले.
" भैया भुट्टा कैसा दिया? " वरुणने भुट्टेवाल्याला विचारले
" बीस का एक "
" भैया बराबर लगाओ ".
" अरे भैया सब जगह यही रेट शुरु है, लेकिन तुम्हारे लिये 15 का लगाह देता हू बस खुश "
" साला, आमच्या साताऱ्यात तर दहा रुपयातच भेटतो. विदर्भात खूप महाग आहे " अनिकेत वरुण ला म्हणतो आणि अभिमन्यू फक्त होकारार्थी मान डोलावतो.
" पण काहीही म्हणा विदर्भाची भाषा, लोकजीवन आहे एक नंबर. वऱ्हाडी भाषा मला नेहमीच आकर्षित करीत राहिली. " अनिकेत म्हणाला.
" मस्त आहे रे भुट्टा एकदम चविष्ट म्हणजे तिखट, मीठ आणि निंबू एकदम कडक " एवढ्या वेळ पर्यंत शांत असलेला अभिमन्यू बोलतो. वरुण आणि अनिकेत दोघेही सहमत असल्याचे सांगतात.
" तुझ्याबद्दल सांग ना वरुण तु कुठे राहतोस? " अभिमन्यू वरुण ला विचारतो.
" माझ्याबद्दल काय विचारता राव काहीसांगण्यासारखं आहेच नाही तसा मी मुळचा नागपूरचाच म्हणून काही फार मोठे तिर मारले नाही तो हसून सांगू लागतो. अप्पासाहेब बँकेत नोकरी करतात आणि मी त्यांचा सगळा पैसा उधळतो... एकंदरीत तर काय छंदीफंदी मदमौला माणूस मी तुम्हाला काहीही लागलं तरी एक फोन मारायचा आपलं इथंच धरमपेठ मध्ये घर आहे ". सर्वजण हसायला लागतात.
" अरे तु timetable आणि प्रॅक्टिकल हँडबुक ची झेरॉक्स घेतलीय का? " अभिमन्यू अनिकेत ला विचारतो.
" नाही रे तुझ्याकडे आहे का? "
" हो चल आपण झेरॉक्स करू आणि वरुण तु पण झेरॉक्स करून घे ".
वरुण, अभिमन्यू आणि अनिकेत कॉलेज कॅम्पस मधल्या झेरॉक्स सेन्टर वर झेरॉक्स काढायला जातात. झेरॉक्स सेन्टर वर बऱ्यापैकी गर्दी होती. झेरॉक्स सेंटरच्या बाजूला असणारे चमेलीचे फुले सुगंध उधळीत होते. वरुण, अभिमन्यू आणि अनिकेत आपल्या प्रॅक्टिकल विषयी बोलत होते इतक्यात कुणाच्यातरी पैंजणाच्या आवाजाने अभिमन्यूच्या शांततेचा भंग झाला. ती कोण म्हणून त्याने गर्दीत शोधण्याचा प्रयत्न केला तशी एक मुलगी तिचे सोनेरी केस वाऱ्यावर भुरुभुरु उडत होते...... मृगनैनीचे डोळे........ गोबरे गाल...... पिटुकलंस नाक तिचं सौंदर्य खुलवीत होत. अतिशय गोरीपान...... तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते तिची नजर कित्येक मुलांना घायाळ करीत होती.
" Hiiiii मी ऋतुजा... ऋतुजा देशमुख बऱ्याच वेळपासून Bsc Bio च कुणी भेटते का म्हणून शोधत होते एक तर क्लास इंट्रो मिस झाल्यामुळे कुणी भेटत पण नाही ह्या माझ्या काही मैत्रीनि आहे पण सर्व वेगवेगळ्या शाखेतील आहे. तुम्ही पण Bio चेच स्टुडन्ट आहात ना? "
अभिमन्यू तर अजूनही तिच्या पैंजणाच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला होता. शुद्धीवर येऊन त्याने हो म्हटले.
अभिमन्यूकडे पाहून ऋतुजा म्हणाली
" तुमच्याकडे जर टाइम टेबल आणि प्रॅक्टिकल हँडबुक असेल तर मला झेरॉक्स करायला देता का plzzzzz? "
अभिमन्यू तिला टाइम टेबलं आणि प्रॅक्टिस हँडबुक झेरॉक्स करायला देतो. ऋतुजा सर्वासाठी झेरॉक्स काढून आणते आणि स्मितहास्य देऊन Thank you म्हणते. अभिमन्यू ही तिला हलकेच welcome म्हणतो. ऋतुजा तेथून निघून जायला लागते. अभिमन्यू, अनिकेत आणि वरूनही तेथून निघून जायला लागतात. ऋतुजा अजूनही अभिमन्यूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती आणि खुदकन गालातल्या गालात हसत होती. अभिमन्यू ही तिरकस नजरेने तिच्याकडे पाहत होता. हलकेच अभिमन्यू आणि ऋतुजाच्या नजरा परत एकदा भेटल्या दोघांनीही स्मितहास्य देऊन आपल्या भावनांची देवाण घेवाण केली होती. दोघेही आता आपल्या मार्गाकडे वळून सामोरी जाऊ लागले होते. ऋतुजाच्या चेहऱ्यावर एक हास्य खुललं होत आणि एक मनमोहक गाणं तिच्या मनात वाजू लागलं होत
💕💕💕 जरा जरा दिवाणपण
जरा जरा मिठी चुंभन
जरा इशाऱ्याची
जरा शहार्यांची
चाहूल आहे ही
पहिल्याच प्रेमाची
जरा जरा हा.. 💕💕💕💕
( song credit :- प्यार वाली लव्ह स्टोरी )
क्रमक्ष..
आपण जर ही कथा वाचत असाल तर उत्तमच पण या कथेचा भाग 1 कसा वाटला याचा अभिप्राय दिल्यास दुधात साखर 🙏 कृपया आपल्याला हा भाग कसा वाटला हे रेटिंग नि अभिप्रायाने कळवा 🙏