3.मला जगायचे आहे.....🥺
मुक्ताला कळून चुकलं होतं की आता पुढे काय होणार आहे.......
समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात.... रोज कोणी ना कोणी त्याला बळी पडत .पण काय आहे ना जोवर आपल्यावर येतं नाही .तोपर्यंत त्याची झळ लागत नाही ,तोपर्यंत त्याची वेदना आपल्याला समजुच शकत नाही .......
आपल्या समाज्यात कित्तेक मुलीची लग्न त्याच्या मनाविरुद्ध होतात..... त्यात ना तीला बोलायचा अधिकार असतो ना नकार द्यायचा.....
गांधीजी च्या तीन माकडासारखंची सेम अवस्था असते त्यांची ना बघा ना बोला ना ऐका....🙈🙉🙊
तिच्या भावना तिची स्वप्ने तिचं सारं भविष्याच त्या होमकुंडात जळून जात. मागे उरते ती एक सजीव दिसणारी कटपुतली .....😊
आणि त्यातूनही तिने स्वतः साठी जगायचा थोडा जरी प्रयत्न केला तरी लगेचच हया समाज्याच्या भावना दुखावतात......
सगळ करतील भांडणे लावतील, भांडण करतील, धमकी देतील आणि वाळीत टाकतील, नात्यात विष कलवतील नाहीतर मग एक ब्रह्मास्त्र काढतील.....
"तिचं चरित्र"
तहसील कार्यालयात काम करत असल्यासारखे तिच्या चरित्र्याचे दाखले देत फिरतील.......😟
अनोळखी लोक सोडा हो ते तर परकेचं असतात . पण अश्या कामात आपले सख्खे च बाजी मारतात..... विषय आहे का.... शत्रू ला लाजवतील इतके खालची पातळी गाठतात.....
काही हेच घडल मुक्ताच्या बाबतीत........
आणि थेट लग्नाचा दिवशी .....
लग्नाच्या मंडपात ती निर्जीव उभी होती . तिच्या आई बाबा साठी ती तयार तर झाली... पण हा पण .. काही तिला श्वास घेऊ देत नव्हता.
"दादा sss मी काय म्हणते....!" ते नवऱ्या मुलाला आपण..... आत्या पुढे काही बोलणार इतक्यात
"ताई थांब... सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे झालय ना आता अजून काय?" मुक्ता चे बाबा बोलले
अरे दादा रीत आहे ही जावयाचा मानपान नको का.... आणि तस पण सोन्यासारखा जावई आहे तुझा..... आणि ते काय स्वतःसाठी मागतात का आपली मुक्ता च दागिने घालणार ना....... आत्या जरा रागातच बोलल्या .
ताई पण..... इतके पैसे कुठुन आणणार आम्ही. एक तर लग्नाचा सगळा खर्च आम्हीच करतोय. वरून हे दागिने ......🥺 शेत तर आधीच गहाण ठेवलय.... आता कश्याच्या जिवावर पैसे आणायचे..... तिची आई रडतच बोलली
माझ्या लग्नात तर कूठे काय दिलय तूम्ही.... अजून सासरचे लोक बोलतात मला ... निदान स्वतःच्या लेकी ला तरी मोकळ्या हाताने द्या 🤨 आत्या मानेला हिसका देत बोलल्या....
आणि हो नवऱ्याकडेचे म्हणतायत , जोपर्यंत नवऱ्याच्या मानपान होत नाही तोपर्यंत लग्नाचे पुढचे विधी होणारं नाहीत.....
ताई ऐक..... तिचे बाबा बोलतच होते की तोपर्यंत आत्या तिथून रागाने निघुन गेल्या .
तिचे आई बाबा.... एकमेकांकडे हताश पने पाहत होते आणि मुक्ता त्याच्याकडे......जी सध्या नवरीच्या पोशाखात स्टेज वर एकटीच बसली होती.....
तिला तसे पाहूनच तिच्या आईबाबांच्या काळजाचे पाणी झाले....
बहिणीच्या हट्टापायी आणि समाजाच्या भीतीने त्यानी हा लग्नाचा निर्णय तर घेतला होता..... हम्म....
त्याच्यावर थोपला होता......
काही दिवस आधी ,जेव्हा आत्याने स्वतः ला रूम मध्ये बंद केले. तेव्हा त्यांनी खूप मोठा तमाशा केला ... तिचा नवरा सासर कडची सारी मंडळी आणि नातेवाईक शेजापाजारचे लोक ..... ही आत्याने फोन करुन बोलावून घेतले..... आणि सुरू झाला एका लेकीच्या लेक होण्याचा तमाशा ... तिने जन्म घेउन केलेली चूक ते तिचं मुळगी म्हणून जन्माला येणच चूक याचे दाखले मिळू लागले....
लेकीच्या आनंदासाठी आईबापाने सावकाराकडून कर्ज घेतले लग्न तर झाले...... पाठवणी ही झाली..... पण सुरुवात झाली एका अग्नीपरीक्षेला 😟
सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले .... पण नंतर जीव लावणारी आई सासु झाली आणि प्रेम करणारा आधार देणारा नवरा.... हैवान 🥺..... तीच्या मर्जी शिवाय पुरुषी हक्क अधिकार गाजवू लागला खर तर ओरबाडून घेऊ लागला तो...... तिची स्वप्ने कधीचं मरून गेली होती.....
रोजची घरची प्रचंड कामे, टोमण्याचे बोलणे आणि तुच्छ लेखून तीला दिली जाणारी वागणूक....एक टाईमच जेवण अमानुष मारहाण तर दिवस भर उन्हात उभी राहण्याची शिक्षा...... हाताला दिले जाणारे चटके..... भर पाऊसात घरातुन बाहेर काढणे.... तिच्यावर संशय घेणे..... आणि सगळ्यात भयानक तो हक्क आणि गरज भागवण्याचा खेळ.....🥺 हेचं होत आता तिचं आयुष्य......
वर्षभरातच चिकू ने तीला आई होण्याचे सुख दिलं.... तिला जगण्याचे बळ प्राप्त झाले.... पण बाळंतपणातील काळजी तिची कोणी घेतलीच नाही ना तीच्या आईला घेऊ दिली त्याने नातवाचे आणि लेकीचे तोंड पहिले ते सोन्याच्या चेन आणि नातवाच्या दागिन्यांच्या वचनावर..... तिच्या आत्याने हा विषय नशिबावर धकलून स्वतः बाजूला झाल्या.....
एक मात्र चांगल झालं की मुक्ता ला मुलगा झाला.... हो नाहीतर काय नाहीतर जी माणसे आपल्या घरच्या गृहलक्ष्मीला लाथडतात .ते लेकीचा काय सन्मान करणार......🥹
तिचा मुलगा चिकू चा चेहरा लहानपणापासुन त्याच्या वडिलांवर म्हणजेच विकास वर गेला होता . म्हणून ते लेकरु जिवंत होत नाहीतर चरित्रहीन चा टॅग लावून कधीचं मुक्ता आणि तीच बाळ कुठेतरी बेवारस मारून टाकले असते......
अचानक दारावरच्या थापानी तिची तंद्री तुटली..... भीतीने गाळण
उडाली ....🥶 थरथरत्या हातांनी तिने दार उघडले आणि सामोर पाहतच ती जमिनीवर कोसळली......😱🥹🥺🥹🥺🥹🥺🥹🥺
क्रमशः