Dudhacha Theb - 1 in Marathi Love Stories by Gajagamini books and stories PDF | दूधाचा थेंब - 1 - वादळ

Featured Books
Categories
Share

दूधाचा थेंब - 1 - वादळ

निवेदक: मीरा 

-

बाहेर रात्रीचं काळाभोर चांदणं पडलय. माझ्या डोळ्यांसमोर मात्र लख्ख उजेड.

माझ्या नशिबाचे टाके....एकामागून एक निखळून पडतायत. आणि मी? मी नुसती उघड्या डोळ्यांनी तो खेळ पाहतेय.

बाजूला रत्नाकर. माझा नवरा. कसा शांत, निवांतपणे झोपलात. त्याचा श्वास कसा लयीत येतोय. त्याची पाठ वर-खाली होतेय... तो आपला त्याच्याच जगात आहे. तिकडे पाळण्यात तो छोटा आयुत. त्याचं ते इवलंसं अस्तित्व. ते सुद्धा झोपलय. 


आणि मी? मी त्याच्या विचारांत सगळं विसरून चाललेय. 

कोणाच्या? श्रीयुतच्या.

नुसतं नाव घेतलं तरी काळजात कसं लख्ख होतं. मी आई आहे, कुणाची तरी बायको आहे—हे सगळं खरं. मग हे मन इतकं बेताल का व्हावं? किती नेटाने संसार केला मी इतके दिवस, पदर परकारात घट्ट खेचून, मग हे विचार कुठून वाट काढत आले?

हे चुकीचं आहे, अगदी शंभर टक्के. ती आग... ती आता लांबून चटका देत नाहीये, ती माझ्या आत गेलीय. मला आतून चटके द्यायला.


बाजारातली ती गर्दी, तो गलका... आणि त्या धुरकट वातावरणात तो उभा होता. श्रीयुत.

तेव्हाच मी श्रीयुतला पहिल्यांदा भेटेले. रत्नाकरपेक्षा उंच होता. भरलेल्या अंगाचा. किती घट्ट शर्ट होता त्याच्या अंगावर! त्याने नुसता श्वास घेतला, तरी ती बटणं आता फुटतील की काय...अशी धाकधूक बघणाऱ्याला लागावी.

दिसायला का मॉडल? का सुबक आणि सुरेख? ज्याच्यावर का मुली भाळतील? नाही. तसा नाही. 

पण राकट. त्याचं ते रांगडं रूप, तो जिवंतपणा...त्याचा चेहरा डोळ्यांसमोर येतो आणि माझे हात थरथरतात. माझी बोटं माझ्या छातीवर, पोटावर, मांड्यांवर फिरू लागतात. माझा हात माझ्या पदराखाली जातो नी ब्लाऊजची बटणं उघडू लागतो. अंगावर घाम सुटतो पण माझ्या आत? आत कसं थंड वाटतं. गार. अगदी बर्फासारखं.


हे काय होतंय मला? 


मी त्यानंतर त्याच्याशी काहीही बोलले नाही... त्याचे ते मेसेजेस, गुड नाईटचे टेक्स्ट— मी वाचलेच नाहीत असं भासवलं. 

एके दिवशी तो घरी आला. रत्नाकर ऑफिसच्या ट्रिपसाठी पुण्याला गेला होता.  हे का त्याला माहीत असावं? मी आयुतला दूध पाजत होते. माझा पदर. तो सारखा निसटत होता. खांद्यावरून पडत होता. तो माझ्या बाजूला बसला नी माझा पदर त्यानं त्याच्या हातात धरून ठेवला. तो काहीच बोलला नाही. मीसुद्धा शांतच होते. 

मी त्याच्याकडे पाहिलं नाही, पण त्याच्या श्वासाचा आवाज मला ऐकू येत होता. किती वेळ? काही सेकंद? की एखादं युग? माहीत नाही. 


दुसऱ्या दिवशी... घरात पुरणपोळीचा बेत होता. मी सारण वाटत होते. पाटा-वरवंटा म्हटला की तो जोर आलाच. कपाळावर घामाचे थेंब साकळले होते, मानेवर एक घामाचा ओघळ रेंगाळत होता. रत्नाकर शेजारच्या खोलीत काहीतरी कामात गुंतलेला. पण श्रीयुत? तो माझ्याच समोर. 

तो जवळ आला. इतका जवळ की त्याच्या शरीराची ती ऊब मला जाणवू लागली. त्याने काही विचारलं नाही, फक्त वाकला... आणि त्याच्या खिशातला तो रुमाल माझ्या कपाळावर टेकवला. अगदी हळुवार. त्याने तो घाम टिपला. 

घाम पुसून तो थांबला नाही. त्याने बोट पुढे केलं. माझ्या कानाच्या पाळीपासून त्याने ते बोट फिरवायला सुरुवात केली. संथपणे. गालाच्या त्या कडेने... हनुवटीपर्यंत.


आणि त्याच्या त्या हाका... प्रत्येक हाकेत एक वेगळाच खेळ दडलेला असतो. कधी कधी वाटतं, हे माणूस आहे की एखादं कोडं?

तसा तो मला 'मीरा' म्हणून फार कमी वेळा साद घालतो. कधी कधी तो 'वहिनी' म्हणतो. पण नुसतं कोरडं वहिनी म्हणून तो थांबत नाहीच मुळी. त्यात एक प्रकारची मिश्किलता, एक खोडकरपणा असतो. 'काय हो आमच्या वहिनी, कसं काय?'—असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा त्या 'आमच्या' शब्दावर असा काही जोर देतो, की मला कळेनासं होतं... मी याची वहिनी आहे की रत्नाकरची?


मे महिना असावा तो... दुपारची ती रखरखती गरमी. घराच्या भिंती जणू तापलेल्या तव्यासारख्या भाजत होत्या. रत्नाकर आणि तो, दोघंही समोरच्या खोलीत टीव्ही बघत बसलेले. मी तिथेच एका कोपऱ्यात माझं शिवणकाम करत बसले होते. 

“च्यायला…काय गरमी भरलिये रे इथे रत्न्या.”

तो रत्नाकरला म्हणाला आणि मग त्याने सहज आपल्या शर्टाची बटणं उघडली. एकामागून एक. त्याचं ते रांगडं शरीर त्या उघड्या शर्टातून डोकावू लागलं. त्याची केसाळ छाती भरलेली होती. खांदे पिळदार होते. समोरच्या टेबलावर त्याने आपले ते पाय पसरले. आणि मागे रेलून बसला. 

आणि मग... त्याने आपल्या हाताने त्या केसाळ छातीवर खाजवायला सुरुवात केली. तो 'खर-खर' आवाज... शांत खोलीत तो आवाज इतका जिवंत वाटत होता.

त्याने त्याचे पाय अशा प्रकारे पसरले की त्यांच्या मधून त्याने माझा चेहरा पाहिला. गुडघे वर हवेत होते. जीन्स पँट पुरती ताणली होती. आणि तसाच तो माझ्याकडे पाहून विचित्रपणे हसला. विचित्र कारण ते ओंगळ व्हतं पण त्याच्या नेहमीसारख्या हसण्यासारखं सुद्धा नाही. 


ह्या शंभर दिवसांत... काय नाही बदललं? 


नाही, मला ठाऊक नव्हतं की मी इतकी बदलू शकेन. किंबहुना, मी तसा प्रयत्न ही केला नव्हता. पण कधी कधी प्रवाह इतका जोरात असतो, की किनारा सोडल्याशिवाय गत्यंतर नसतं. आणि मी किनारा सोडलाय.

पण मी बदलले. ही जाणीव आता लपवून ठेवता येत नाही. 


आणि काल? काल काहीतरी मोठ्ठ घडलय. जे घडलं... त्या एका क्षणाने काळजाची सगळी गणितं पार बदलून टाकलीत. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही घडू शकतं. पण घडलं.

आणि जाताजाता तो म्हणाला, “मी उद्या येईन. आणि तेव्हा तू... तू पहिलीसारखी उरणार नाहीस.”रत्नाकर ऑफिसला जाईल उद्या. आयुत झोपयला हवा…माझ्यासाठी स्वयंपाक करायचा, काय?... माहिती आहे ना मला काय आवडतं? आणि हो, तीच साडी नेस... मला आवडते ती. लाल साडी रुपेरी ठिपक्यांची…उद्याच….”

असं काय होणार होतं उद्या?

काय?

मनातल्या या वादळाला आता कुठल्या किनाऱ्यावर नेऊन ठेवू मी? कोणाला सांगू? 

आणि या “काय” ला कसं शांत करू?


इथेच पहिल्या प्रकरणाचा शेवट.

-

© २०२६ गजगामिनी.

सर्व हक्क सुरक्षित.

प्रताधिकार (Copyright): सर्व हक्क सुरक्षित. या पुस्तकातील कोणत्याही भागाचे लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय पुनरुत्पादन करणे, किंवा तो कोणत्याही स्वरूपात, डिजिटल किंवा प्रिंट, पुनर्प्रकाशित करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.