नुकतेच दुपारचे १२ वाजलेले. उन्हाळ्याचे दिवस सुरु होते. जून महिना आपल्या मध्यात होता. तस पाहिलं तर उन्हाळ्यात सूर्यदेवाचा बराच प्रकोप पाहायला भेटतो.
पण पुणेकरांना सूर्यदेवानी थोडी सूट दिलेली दिसते. म्हणजे वातावरण बऱ्यापैकी नियंत्रणात होत. ४०°c पर्यंत पारा चढला नाही हे नशीबच..!
आता जवळपास दुपारचे एक-दीड वाजले असतील. तेच येरवडा मेट्रो स्टेशनवर मेट्रो मधून एक युवक उतरला.
पाठीवरती black-lather स्कूल बॅग, black-fitted t-shirt आणि plain-blue Jean's आणि पायात white-sneaker असा याचा पहराव. शरीर-यष्टी पाहून याला जिमचा नाद असावा असा अंदाज कोणीही बांधणार.
मात्र त्याच्या चेहऱ्यावर १२ वाजलेले होते. मोठ्या विकट परिस्थितीमध्ये सापडलेला होता जणू... त्याच उदास अवस्थेत तो समोरच्या बेंचवर जाऊन बसला, आणि तिथेच बराच वेळ बसून राहिला.
आपल्या भावाच नाव अवी होत. अविला नेमक काय झाल? हा प्रश्न तर पडला असणारच. तर आज १४ जून. NEET चा निकाल जाहीर झाला होता.
दिवस मावळायला सुरुवात झाली. संध्याकाळचे ४:३० वाजले. दोन मित्र काउंटरकडे गेले. पिंपरी चिंचवड साठी दोन तिकीट घेतली. आणि पायऱ्या चढत मेट्रोकडे जाऊ लागले, कारण लिफ्टमध्ये जरा जास्तच गर्दी झाली होती.
वैभव आणि प्रतिक दोन बलापणचे मित्र. वैभव तब्येतने टकाटक, बऱ्यापैकी शरीर-यष्टी, सावळा रंग, plain grey-colour ची हुडी घातलेली आणि jogar-jeans. असा त्याचा पहारावं..
प्रतिक मध्यम, शरीर-यष्टी साधारण, सावळा रंग, चेहऱ्यावर साधारण शोभणारी दाडी, व्हाईट कलर त्यावर मेहंदी रंगच्या जाड्या लाईन असलेले शर्ट, आणि कॅज्युअल फिट स्किन कलर पॅन्ड असा त्याचा पहराव..
प्रतिकच्या पाठीवरती बॅग होती. त्यामध्ये काही वेळेआधी केलेली शॉपिंग म्हणजे एक-एक शर्ट आणि टी शिर्ट्स होते.
वैभव: मज्जा आली.. हा पत्या.. शॉपिंग पण झाली आणि बरच हिंडलो ना.. आई शप्पथ.. भारी नजारे आहेत. पुण्यात..
प्रतिक: हा.. आले लक्ष्यात तुझे नजारे..!
( मैत्रीपूर्ण ताणा मारताना)
वैभव: अरेरे.. वेड्या याला....
(एका वेगळ्या लयबद्ध प्रवाहात वैभव त्याच वाक्य पूर्ण करणार तोच प्रतिक बोलला.)
प्रतिक: नेत्रसूख म्हणतात हेच ना...
वैभव : सही बोला बाबू मोशाय.. तुला याचा सार नाही कळणार. मजाक करतोय. तुला माहित आहे ना. आपण सज्जन आहे.
प्रतिक: अच्छा.. चांगला भ्रम आहे.
वैभव काही बोलणार तेच त्याला वरती गोंधळ सुरु आहे अस जाणवलं. दोघे पण आता वरती पोहोचले आणि त्यांच्या लक्ष्यात येऊ लागलं कि लिफ्ट गच्च का भरलेली होती? वैभव आणि प्रतिक दोघांच ध्यान समोरच्या गर्दीकडे गेलं.
"पत्या लय कल्ला-हल्ला दिसू राहिला, पक्का काहीतरी कांड झालं." वैभव समोर ताठ नजरेने पाहत बोलला.
वैभव आणि प्रतिक गर्दीकडे जाऊ लागले. मेट्रोच्या एका कडेला बऱ्यापैकी गर्दी जमलेली होती. मेट्रो ट्रॅक ब्रिज वर मेट्रो ब्रिजच्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबावर चक्क... एक मुलगा बसलेला होता. एक पाय ब्रिजच्या खाली आणि एक पाय अलीकडे ठेवून अक्षरशाह आत्महत्येचा प्रयत्न करत होता. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अवी होता.
अविच्या चेहऱ्यावरती आता बऱ्यापैकी घामाचे थेंब दिसत होते. राग, द्वेष आणि निराशा याच सम्मीलीत प्रदर्शन त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसत होत अवीची ही केविलवाणी अवस्था अचंबित करणारी होती.
हे सगळं सुरु असताना तिथे उभी असलेली मंडळी मात्र या सगळ्या प्रकाराला आपल्या स्मार्टफोन मध्ये शूट करण्यात व्यस्त होती. अविची समजूत काढावी या गोष्टीचा पाठपुरावा करणारी मंडळी कमीच होती.
"माणुसकी वेशिवर टांगलेली आहे. " याच जिवंत उदाहरण या मेट्रो स्टेशनवर दिसत होत. मेट्रोवरील काही कर्मचारी गर्दीला आवरण्यात व्यस्त होते. त्यातील एक कर्मचारी अविची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. अर्थातच ही परिस्थिती या कर्मचारीसाठी नवीनच होती म्हणून हा कर्मचारी बऱ्यापैकी घाबरलेला होता.
"दादा ऐका माझं खाली उतरा अस काही करू नका. तुमच्याकडे अख्ख आयुष्य पडलेल आहे. काही प्राब्लेम असेल तर मला सांगा काहीतरी मार्ग काढू आपण."
कर्मचारी स्पष्ट पण चिंतेच्या भरात बोलला.
यावर प्रतिउत्तर म्हणून अवी संतापाच्या भरात उंच आवाजात बोलू लागला
"ये... दाद्या मग हो नाहीतर उडी मारल हा मी...आणि नाही आहे सोलुशन माझ्या प्रॉब्लेमच, कंटाळा आला आहे या फेलिअरचा च्या आईला.. आता हिम्मत नाही राहिली ह्या सगळ्याचा सामना करायची. जाऊदे भावड्या तुला नाही कळणार, कोणालाच नाही कळणार.."
हे सगळं बोलत असताना कर्मचारी थोडा पुढे येण्याचा प्रयत्न करतोय हे दिसताच अवी उंच आवाजात बोलला
"मग हो दाद्या..."
अर्थातच परिस्थिती फारच विकट झाली. अवीच्या मनात आता जगण्याची अशाच दिसत नव्हती. हा सगळा प्रकार तिथ उपस्थित प्रत्येक व्यक्ती ऐकत होती, पण अवीच्या हावभाव आणि शब्दाकडे प्रतिक आणि वैभवच विशेष लक्ष्य होत. जाणूकही अविची ही निराशा, हा असहाय्यपणा त्यांनी आधी ही कुठेतरी पाहिलेला होता. कदाचित स्वतःमध्ये..!
"पत्या असच चालू राहील तर हा पक्का उडी मारणार. " वैभव चिंतेपोटी बोलला.
"काही पण काय.. अरे... डिप्रेस्ड आहे तो, त्याला समजावून सांगाव लागेल."
वैभवला उत्तर देत प्रतिक बोलला.
"तो भाऊ कधीचा प्रयत्न करतोय काही फरक पडला का ?"
वैभवने आपले मत मांडले.
"अरेरे नाही त्याला समजणार अश्या भाषेत समजावून सांगू. तू चाल माझ्यासोबत."
हे बोलत असताना प्रतीकच्या मनात काही तरी विचार सुरुवात होता पण याची नखभर सुद्धा कल्पना वैभवला नव्हती.
वैभव ने आपली शंका प्रतिक समोर मांडली.
"हा.. पण हे कर्मचारी लोक बोलू देतील का ?"
"तू चाल रे माझ्याकडे आहे एक आयडिया."
अस म्हणत प्रतिक वैभवला घेऊन गर्दी बाजूला करत अविकडे जाऊ लागला. थोड जवळ जाताच तिथे उभ्या कर्मचाऱ्याने त्यांना अडवल.
"हो दादा कुठं चालले तुम्ही ?"
हा प्रश्न विचारताच प्रतीक ने त्यांना एक आयडी कार्ड दाखवल, त्यावर इंडियन आर्मी चा लोगो होता, क्षणातच त्याने आयडी कार्ड खिशात ठेवल आणि पुढे बोलला
"आम्ही दोघ (वैभव कडे इशारा करत) इंडियन आर्मी मध्ये काम करतो. आम्हाला नेगोसिएशन शिकवलेले आहे. आम्हाला प्रयत्न करू द्या, कदाचित तो आमचं ऐकणार."
प्रतिक आत्मविश्वाससोबत आयडी कार्ड दाखवून बोलला होता म्हणून कर्मचारीला खात्री पडली कि हे खरं बोलत आहेत.
पुढे कर्मचारी बोलला
", हो... पण सर.."
तेच वैभव बोलला.
"दादा ही नॉर्मल कंडिशन नाही आहे. जीवन-मरणाचा प्रश्न आहे म्हणून म्हणतोय आम्हाला सांभाळू द्या."
त्या कर्मचाऱ्यांने काही क्षणासाठी विचार केला आणि नंतर त्याला सुद्धा त्यांचं बोलणं योग्य वाटल, तेव्हा कर्मचारी बोलला
" ठीक आहे सर तुम्ही या इकडे."
आता प्रतिक आणि वैभव त्या कर्मचारीकडे गेले, जो आतापर्यंत अविची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.
वैभव त्या कर्मचारीसोबत बोलला.
"दादा आम्ही आर्मी डिपार्टमेंट मधून आलोय. आम्ही बोलतो त्याच्याशी तुम्ही आराम घ्या थोडा."
या सगळ्या प्रकारावर अविच लक्ष्य गेलं, त्याला कळून चुकल होत कि आता कोणीतरी दोन नवीन व्यक्ती येऊन आपली समजूत काढणार आहेत. पण यावर अविने काही प्रतिसाद दिला नाही.
अवी अजूनही आपल्याच धुंदीत होता. जीवन मारणाच्या मध्यात उभा..!
आता प्रतिक आणि वैभव प्लॅटफॉर्मच्या अगदी कडेला जाऊन बसले. समोर अवी होता. प्रतीक ने बोलायला सुरुवात केली.
"'अवी भावा, तू चुकीच करतोय स्वतःच आणि स्वतःच्या फॅमिलीच आयुष्य उध्वस्त करतोय ऐक.'"
प्रतिक ला मधातच अडवून अविने बोलायला सुरुवात केली.
"दादा, प्लीज राहूद्या. बस.. आता हिम्मत नाही राहिली. (भयाण उदासी सोबत) तुमच्याकडे हजार उदाहरण असतील मला सांगण्यासाठी. पण आता ऐकण्यात इंटरेस्ट नाही.. बस जिरली आता. नाही जगायच."
"अच्छा, ठरलंय ना तुझं मग कोणाची वाट पाहतोय मार उडी."
प्रतिक च्या या वाक्याने अक्षरशः तिथे उपस्थित प्रत्येकाला अचंबित केल. तिथे उपस्थित कर्मचारी यावर प्रतिक ला काही बोलतील, त्या आधी वैभव ने हाताने इशारा देत त्यांना अडवल.
कर्मचाऱ्याला हे कळून चुकल कि कदाचित ही त्यांची नेगोसिएशन करण्याची पद्धत असेल म्हणून तोही थांबला.
यावर अविसुद्धा अचंबित झाला आणि याच अचंब्यासोबत त्याच्या तोंडून उदगार निघाला.
" हाँ...."
यावर प्रतिक पुढे बोलला
"हाँ म्हणजे बघ ना आम्ही मोचके लोक सोडून कोण तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? आमचं म्हणणं आहे कि तू जीव नाही द्यावा पण हे माग जी मंडळी तुझ्या परिस्थितीचा व्हिडिओ शूट करत आहेत, त्यांना तुझ्या जीवाची किंमत आहे का? त्यांना सोड तुला स्वतःला स्वतःच्या जीवाची किंमत आहे का? बघ ना जरा कुठं उभा आहेस तू ?"
( प्रतिक च्या प्रश्नांने,, बोलण्याने अविला काही वेळेपूरत विचारामध्ये पाडल )
"खाली बघ तुला फायर ब्रिगेड किंवा रेसक्यू टीम दिसत आहे का? इथं कुठं तुला पोलीस दिसते का ? अवी तुला दिसते का कोणी इथे ?"
गहन विचारात असलेला अवी ज्याप्रमाणे शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर विध्यार्थीने प्रामाणिकपणे उत्तर द्याव, अगदी त्याच त्याच पद्धतीने त्याने उत्तर दिल "नाही"
"पण या सगळयांनी इथे असायला पाहिजे ना हो कि नाही दादा ?"
समोर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याला उद्देशून प्रतिक बोलला.
प्रतिक चा इशारा त्या कर्मचारीला कळून चुकला. प्रतिक ने सांगितलेले काम करण्यासाठी तो कर्मचारी तिथून निघून गेला. प्रतिक च्या कृती वर अवी च लक्ष्य जाण्याआधी वैभव बोलला
"गप रे पत्या, अवी बघ इथे खूप लोकांनी तुझा व्हिडिओ शूट केला. तुला माहिती आहे ना social Media होत्याच नव्हत करण्यात किती पुढे आहे. तुझा व्हिडिओ अपलोड करतील आणि बोलतील कि मुलीच्या प्रेमात आत्महत्या केली, प्रेमात धोका भेटला, फॅमिली प्रेसर, डिप्रेशन यामुळे आत्महत्या केली. आणि हाँ आज NEET चा निकाल लागला ना, मग त्यात कमी मार्क्स मिळाले म्हणून आत्महत्या केली.... अरेरे जो मनात आला तो अंदाज लावतील रे ही लोक..
"आणि हा अवी या सगळ्याचा त्रास तुझ्या फॅमिलीलाच होणार, हे दुःख त्यांनाच झेलाव लागेल, समाजाच्या प्रश्नांना समोर जावं लागेल. "
वैभव ला साथ देत प्रतिक बोलला.
आता मात्र अवी चिढायला लागला, वैभव जे काही बोलला त्याने अवीच्या दुखत आठवणी ताज्या झाल्या कि काय पण त्याच्या रागाचा पारा आता चढला. रागाच्या भरात उच्च स्वरात अविने बोलला.
"बस... खेळ मांडलाय का इथे..., तमाशा सुरु आहे का जे मनात आल ते बोलायला. मला ना घंटा फरक पळत नाही कि हा समाज माझ्याबद्दल काय विचार करणार ते..
तरी सुद्धा तुम्हाला ऐकायची हौस आहे ना मग ऐका..
हाँ मी NEET दिली आणि परत 1-2 मार्क्सने चांगल्या नामंकित कॉलेज मध्ये ऍडमिशन होता होता राहून गेलं. पण यामुळे मी आत्महत्या करतोय अस अजिबात नाही.
( अवि चा स्वर आता थोडा नामला, त्याच्या डोळ्यात दिसणाऱ्या रागाची जागा आता निराशाने घेतली)
तिसरा.. तिसरा attempt होता.. माझा
(त्याने मान खाली घेतली, डोळ्यात येणार पाणी लपवत असेल कदाचित. परत त्या दोघांकडे पाहत बोलला )
तिसरा attempt द्यायला बरीच हिम्मत आणि आत्मविश्वास लागतो, माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास माझ्या आई-बाबाना आहे माझ्यावर..
मी पहिला attempt काही मार्कने फेल झालो तेव्हा माझ्या बुद्धीमत्तेवर, क्षमतेवर प्रश्न केले माझ्या सोसायटी मधील लोकांनी. दुसरा attempt फेल झालो तेव्हा माझ्या character वर प्रश्न आला डिप्रेशन वैगरे आहे का ? मुलीचा लफड वैगरे तर नाही ना ?
( अवी च्या चाहऱ्यावर हलक स्मित हास्य आलं )
नाही काय बोलाव आता यांना..! सोसायटी मधील महिला मंडळी ज्यांचे मुलं-मुली माझ्यासोबत शिकत होते आणि सध्या चांगल्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत आहेत. माझ्या आई समोर हे महिला मंडळ त्यांच्या मुला मुलींची स्तुती करतात. करायला पाहिजे, काही हरकत नाही.
पण मग मध्येच "अवी च जमेल ना यावेळेस कि परत तेच ?" हे विचारायची काय गरज आहे ? त्यांच हे बोलणं माझ्या आईच्या मनाला किती ठेच पोहचवते, याचा विचार येत नाही का त्यांना ?
फेल मी झालो ना... त्यात त्या माऊली ची काय चूक ?
अशीच टोमणे माझ्या बाबांना सुद्धा ऐकायला भेटतात, पण बाबा त्यांना हसत-हसत टाळतात. मस्करी मध्ये घेतात.
यांनी माझ्या लहान भावाला पण नाही सोडलं. एकदा चिडून बसलेला होता सोफ्यावर, मी विचारल काय झालं रे?
"काही नाही दादा.. दादा तू ना यावेळेस चांगला स्कोर कर NEET मध्ये मग दाखवू पणा एका एकाला."
हे बोलत असतांना त्याच्या डोळ्यातील पाणी स्पष्ट दिसलं मला.
आणि हे सगळं कोणासाठी ऐकल माझ्यासाठी...
"प्रयत्नांती परमेश्वर " प्रयत्नांना आपण परमेश्वर मानतो, मग प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला निदान माणुस तरी समजा नाही का.."
यावेळेस सुद्धा 1 मार्कने मी परत हारलो.
(आता अवि चे डोळे नमले, त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागल.)
दुपारी 12 नंतर बाबाचा कॉल आला "अवी बाळा कुठं आहेस? "
(आता मात्र अवी ला त्याचे अश्रू अडवता नाही आले, आपले अश्रू लपवण्यासाठी त्याने डोळे घट्ट मिटले पण अश्रू अडवता आले नाही. त्याने मान खाली घेतली चेहऱ्यावरून हात फिरवला आणि परत त्या दोघांकडे पाहत बोलायला सुरुवात केली.)
कुठं नाही बाबा, मित्रांसोबत बाहेर आलो. ते तुम्हाला सांगितल होत ना document च काम पेंडिंग आहे, बस तेच करायला आलो. मला घरी यायला उशीर होईल संध्याकाळ पण होऊ शकते.
त्यावर बाबा बोलले, "ठीक आहे करून घे तुझं काम. अच्छा, आज निकाल लागला ना तुझा?
(आता अवी भावुक झाला. नाकाने फुसकारे घेत, चेहऱ्यावर हृदयस्पर्शी भाव आणि डोळ्यातील अश्रू लपवत अवी बोलला)
त्यांना खरं सांगायची हिम्मत च नव्हती ना. बाबा आपण घरी आल्यावर बोलू ना. सध्या मी एवढ काम आटपून घेतो.
"ठीक आहे बाळा, आम्हाला खात्री यावेळेस तुझं जमलंच समझ. असो जे होईल ते होईल तू काळजी करू नको, सावकाश ये. ठेवतो बाळा.₹
गेली 3-4 तास त्या बेंच वर बसून आहे. पाय जाम झाले होते. घरी जायची ही.....
(आता अवी ला अश्रू थांबवन शक्य झालं नाही. डोळ्यातून 3-4 अश्रू खाली पडले. अवी चा तो असाहाय्य चेहरा, तो क्षण तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणला भिडणारा होता. खरंच किती हताश झालेला होता अवी! अगदी टोकाचा निर्णय घेतला त्याने.
क्षणातच अविने चेहऱ्यावरून हाथ फिरवत, आपल्या भावनांना आवर घातला आणि पुढे बोलला. )
ही.. हिम्मतच नाही झाली माझी घरी जायची. मला आई बाबानी सगळं दिल, त्यांना काय हव होत बस एक गोष्ट.. नाही का ? मी ती सुद्धा पूर्ण नाही करू शकलो. मग सांग ना माझ्या जगण्याचा काय अर्थ ?
हे फेलिअर आहे ना, हे दडपण यात ना एक प्रकारच खालिपण जाणवते आतमध्ये. यात ना दम घुटतो माझा. सहन होत नाही आता,
(दोन्ही हाथानी डोकं पकडत अवी पुढे बोलला )
या फीलिन्ग सोबत ना जगन मुश्किल झालं भाई, म्हणून इथं उभा आहे. सोड ना तुम्हाला नाही कळणार माझी परिस्थिती. आणि कोणाला समजणार अशी अपेक्षा सुद्धा नाहीये. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर भेटली ना..!"
अवी जे काही बोलून गेला ना ते ऐकून तिथं उपस्थित प्रत्येक व्यक्ती निःशब्द झालेला होता. एकाप्रकारची शांतता पसरलेली होती या शांती ला भंग करत प्रतिक पुढे बोलला.
बरोबर भाई आम्हाला काय कळणार हे..., काहीतरी महत्वाचं गमावण काय असते? डिप्रेशन, ट्रॉमा, फेलियर...
(वैभव कडे पाहत)
छे... आमचे थोडी असे घोडे लागले, हाय ना वैभ्या..
अवी हा वैभ्या 16 वर्षाचा होता, याच्या बाबाला ब्लड प्रेसर चा प्रॉब्लेम होता, 10वी चा रिजल्ट लागला, त्याच्या काही महिन्याने याचे बाबा अचानक मरण पावले. एका क्षणात याच जग संपल...
(हे ऐकत असतांना काही क्षणासाठी वैभव च्या चाहऱ्यावर ती निराशा जाणवली.)
मी 17 वर्षाचा होतो, माझ्या बाबांना किडनी चा प्रॉब्लेम होता. ट्रीटमेंट सुरु होती, सगळ सेट होत. एका रात्री बाबांना अचानक त्रास सुरु झाला. अर्जेन्ट ट्रीटमेंट साठी बाबांना हॉस्पिटल ला घेऊन गेले.... पण कधी परतच नाही आले.
(काही क्षणासाठी प्रतिक थांबून गेला.)
सोड ना मी पण काय सांगत बसलो..!
हे सगळं ऐकल्यावर अवी ला खराब वाटल. कोणालाही वाटेल. आपली दिलगिरी व्यक्त करत अवी बोलला.
"सॉरी भाई.. मला खरंच माहिती नव्हत कि तुमचे वडील नाही आहेत म्हणून..."
प्रतिक आता शांत झालेला, पुढे वैभव धुरा सांभाळत बोलला.
"काही विषय नाही रे अवी. ही गोष्ट कुठं आपण प्रत्येकाला सांगत फिरतो. तुला हे सांगून तुझी सिम्पथी मिळवण हा आमचा उद्देश नाही बर का. अवी जेव्हा फॅमिली मधील एखादा मेम्बर जीव गमावतो तेव्हा अख्खी फॅमिली ट्रॉमात जाते. पुढे चालून सुखादुःखाच्या वेळेस त्या मेम्बर ची आठवण ना भाई जीव जाळते. महिने लागतात फॅमिलीला या ट्रॉमा मधून बाहेर निघण्यासाठी.
आणि त्यात जर का घरचा कमावता जबाबदार मेम्बर जीव गमावतो तेव्हा त्याची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. या गोष्टीची आम्हाला खूप चांगली जाणीव आहे. हा दुःखाचा काळ जगलोय आम्ही अवी. यानंतर आमची हीच मागणी राहली कि अशी परिस्थिती आमच्या दुस्मानावर ही येऊ नये."
वैभव ला पाठपुरावा करत पुढे प्रतिक बोलला.
"हेच कारण आहे अवी कि जेव्हा तुला इथं पाहिलं, तेव्हा लगेच तुझ्याशी बोलायला इथंपर्यंत आलो. तू हे जे काही करतोय ना त्यामुळे तू तुझ्या फॅमिली ला किती मोठ्या दुःखात टाकतोय याचा तुला अंदाजा नाही आहे रे अवी.....
प्रत्येक आईबाबांना वाटते रे कि आमचे मुल-मुली सक्सेसफुल व्हावे. पण या सक्सेस च्या नादात जर फेलियर आल तर मग सरळ जीव द्यायचा का ? आणि मग पुढे काय ? तुझ्या आईबाबांनी कस जगायचं ? कोणासाठी जगायच सांग ना ?
अवी तू स्वतःच नाही तरी तुझ्या आई बाबांच सुद्धा आयुष्य संपवतोय.. हे कळतंय का तुला!
आता अविची द्विधा मनस्थिती कुठेतरी कमी होत चालली होती. अवीच्या मानत "मी जीव देतो" हा विचार घर करून बसला होता त्यावर आता प्रश्नचिन्ह उभी होत होती. अवी ला आता त्याचा निर्णय चुकीचा आहे याची जाणीव होऊ लागली
पुढे वैभव बोलला.
तुझ्या मनात एक वेगळंच वादळ सुरु आहे. याची आयडिया आहे आम्हाला, इथे तुला समजावून सांगणाऱ्याची गरज नाही तर तुझं ऐकून घेणाऱ्याची गरज आहे आणि अस असेल तर आम्ही आहोत तुझं सगळं ऐकून घेऊ कोणतीही जजमेंट न करता.
तरी सुद्धा तुला हेच करायच असेल तर फक्त एवढ सांग कि तुझ्या आईबाबांना आम्ही काय उत्तर द्यायच? म्हणजे बघ ना तू जर हे करशील तर तुझे आईबाबा हमखास आम्हाला प्रश्न विचारतीलच ?
तुझी आई आमच्या समोर ढसा ढसा रडणार. काय करत होते तुम्ही दोघ? का अडवल नाही माझ्या अविला? माझं बाळ त्याला अस का करू दिल तुम्ही?
अस म्हणत म्हणत तुझी आई जमिनीवर पडणार. तेव्हा तिची समजूत कशी काढू? काय सांगू तिला?
तुझे बाबा सुद्धा हाच प्रश्न विचारतील कि तुम्हाला नेगोशिएशन जमत ना मग का नाही समजावून सांगता आल तुम्हाला कि परीक्षेत नापास झाल्याने, टेन्शन डिप्रेशन मध्ये जाऊन आयुष्य संपवत नसतात. आता आम्ही कस जगायच?.... त्यावेळी आम्ही तुझ्या आईबाबांना काय उत्तर द्यायच. सांग ना अवी..
आता अवी चांगलाच भावुक झाला. त्याचे डोळे भरून आले. आपल्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत त्याने आपल्या भावनेला आवर घातला. यादरम्यान त्याचा तोल थोडा खाली गेला त्याने लवकरच स्वतःला सांभाळून घेतल. हा 5 सेकंडचा क्षण असेल पण हे पाहत असताना तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचा जणू श्वास अटकला. एकासुरात एक आवाज आला "अवी सांभाळून"
अविने हा आवाज ऐकला. लोकांच्या डोळ्यात स्वतःबद्दल काळजी पाहून अविला खरच खूप आनंद झाला. त्या क्षणामध्ये त्याला त्याच्या जीवाची किंमत कळली असावी. पुढे अविने बोलायला सुरुवात केली.
बरोबर बोलला तू दाद्या, मी चुकलो पण काय करणार ना, भाई दोन वेळा फेल झालो. 1-2 मार्क्सने सिलेक्शन राहून गेल. खूप त्रास होत या सगळ्याचा..
त्यात आई बाबांची तळमळ, विश्वास आहेच माझ्यावर तरीसुद्धा मी काहीच करू शकलो नाही. वरून हे लोकांचे टोमणे डोक्याला वेगळाच ताप.
त्यात तिसऱ्यांदा पण फेल झालो. खूप राग आणि संताप आला मला माझ्यावरच. माझी ना जगायची लायकी नाही...
मला जगायचंच नाही.. म्हणून जीव द्यायला आलो होतो इथे.
पण थँक्स हा भाई तुम्ही मला माझी चूक लक्षात आणून दिली. पण एक बोलू का? आधीच तीन वेळा फेल होऊन बसलो, त्यात आता आत्महत्येचा प्रयत्न केला या सगळ्याचा त्रासच होईल माझ्या फॅमिलीला. लोक नाव ठेवतील. या सगळ्यामुळे आई-बाबाचा अपमान च होईल ना भाई...
( हे शब्द बोलत असतांना अवीची असहाय्य स्थिती दिसत होती)
आता प्रतिक चा पारा चढला. उच्च स्वरात त्याने बोलायला सुरुवात केली.
"खड्डयात गेली ही चार लोक, हा समाज.यांनी तुला खाऊ पिऊ घातल? यांनी तुला शिकवल? मोठ केल?
नाही ना... मग काय गरज यांचा विचार करण्याची. दहा लोक शंभर तोंड रीत आहे या जगाची.
तुझ्या आईने नऊ महिने तुला पोटात ठेवल, जीवघेणा त्रास सहन केला, तुला जन्म देण्यासाठी. आई बाबांनी तुला लहाणाच मोठं केल. त्यांनी तुझ्यासाठी सगळं केल ना, मग आता त्यांच्यासाठी कोण करणार? तूच ना. त्यांच्यासाठी स्वतःसाठी जग ना. आयुष्यात काही तरी चांगल कर.
आणि अपमानाचा विषय कुठून आला रे. तू काही गुन्हा केला? कोणाची फसवणूक केली? नाही ना.. स्वतःच्या फेलियर ला कंटाळून जीव देणार होता पण वेळेत अक्कल आली तुला...
आणि हा अपमान नाही तर आदर्श ठरशील तू त्या प्रत्येक NEET देणाऱ्या मुला-मुलींसाठी जे NEET ची परीक्षा फेल झाले म्हणून टेन्शन डिप्रेशन मध्ये जीव देण्याचा प्रयत्न करतील. काय रे वैभ्या...
( आता प्रतिक ने विराम घेतला रागाच्या भरात तो बरंच काही तथ्य बोलून गेला.)
"100% अवी NEET च्या हजारा पेक्षा जास्त मुलींमुलांनी आत्महत्या केली असणार. आकडा लहान नाही आहे खूप मोठा आहे. तरीसुद्धा काय केल सरकार, कॉलेज, एज्युकेशन सिस्टिम काय केल. काहीच खास केल नाही.
पण एक नेगेटिव्ह ट्रेंड बनून गेला आत्महत्या करण्याचा.
फेलियर मान्य करण्यापेक्षा, जीव देण निवडल त्यांनी.
तू पण तेच करायला चालला होता. पण आज जर तू तिथून खाली उतरला, तर तू इतिहासातला पहिला असा मुलगा असणार ज्याने आत्महत्येचा प्रयत्न तर केला पण आत्महत्या केली नाही.
तू आदर्श बनशील डिप्रेशन मध्ये असणाऱ्या प्रत्येक NEET स्टुडन्टसाठी. आणि हे सम्मानाची गोष्ट असणार तुझ्या आई-बाबासाठी."
वैभव च्या शब्दाने गर्दीतील उत्साह वाढला. गर्दीतील काही तरुण मंडळी म्हणू लागली कि...
"अवी आम्हाला अभिमान आहे तुझा, तू योग्य निर्णय घेतला. "
"अवी परत NEET दे यावेळेस सक्सेस मिळणार तुला.
आणि मग सोसायटी मधील सगळ्यांचे तोंड बंद होतील. "
हे आणि अशेच प्रेरणात्मक वाक्य गर्दीतील मंडळी बोलू लागली. या सगळ्याने अवीचा उत्साह वाढला. त्याची जगण्याची इच्छा वाढली.
अवी एकंदरीत एकटक हे सगळ काही पाहत होता. मनातून याबद्दल तो खूप कृतज्ञ आणि आंनदी होता. चाहऱ्यावर स्मित हास्य होत. पण अवी निशब्द उभा होता. काही बोललाच नाही.
"अवी आता बोलण्यासारखं काही उरल नाही. पुढे बोलत राहिलो तर भाषण देतो आहे अस होईल, जे मला नको आहे. आमच्या सोबत चाल. मस्तपैकी गरमा-गरम चहा घेऊ. तुझ्या मनात हे काही तू दाबून ठेवल ना भाई अख्ख आमच्या समोर बोलून टाकू शकतो. आम्ही निवांत बसून तुझं सगळं ऐकतो. काय बोलतो... चाल मग निघूया.
प्रतिक अवी ला उद्देशून बोलला.
हे सगळं ऐकल्यावर अवी मान खाली करून काही तरी विचार करू लागला. हे पाहून तिथे उपस्थित मंडळी अचंब्यात पडली. थोड्यावेळ आधी अस वाटल कि अविने त्याचा निर्णय बदलला. पण आता परत तो कशाचा विचार करतोय? आता काय झाल?
अविने खाली पाहिल तर ट्रॅफिक क्लिअर करण सुरु होत. 5 मिनिटाच्या अंतरावर रेस्क्यू टीम/फायरब्रिगेड होती. प्लॅटफॉर्म वर पोलीस अधिकारी पण आलेले होते. थोडक्यात अवी ला वाचवण्याची पूर्ण तयारी झाली होती.
"चाल रे वैभ्या.. याला अजूनही डाउट आहेत.."
अस म्हणून प्रतिक आणि वैभव तिथून निघू लागले.
अवी कडे पाठ करत त्यांनी एक दोन पाऊलेच पुढे टाकले असतील. तेच समोर उभ्या लोकांच्या चेहऱ्यावर त्यांना एक हास्य दिसल.
मागून आवाज आला.
"कुठ चालले दादा मला सोडून, मी पण येतो ना भाई.." अस म्हणत अवी पूल वरून खाली उतरला आणि त्या दोघांकडे जाऊ लागला.
"शाब्बास रे पठ्ठया.."
वैभव आणि प्रतिक एकासुरात अवी ची स्तुती करत बोलले. अवी चालत पुढे आला. दोघांनी अविला हाथ दिला आणि प्लॅटफॉर्म वर घेतल.अवी ने प्लॅटफॉर्म येताच वैभव आणि प्रतिक ला मिठी मारली.
तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आनंदी होता. जणू काही युद्ध च जिंकले कि काय...
सगळे अवी ला अभिनंदन करत होते. अवी ने एक धाडसी निर्णय घेतला. एक उत्तम उदाहरण तयार केल.
तिथं उपस्थित पोलीस अधिकारी तर अविला चांगलंच सुनावणार होते पण तेथील वातावरण पाहता त्यांनी सुद्धा अवी ला अभिनंदन केले. आणि "परत अस काही करू नको" ही सूचना देऊन तिथून रवाना झाले.
अविने तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. तब्बल 10-15 मिनीटांनंतर तिघे जण तिथून रवाना झाले. मेट्रो स्टेशन च्या खाली उतरले. वैभव ने कॅब बुक केलेली होती. तिघे जण कॅब मध्ये बसून अविच्या घराकडे निघाले.
एकदा परत अवी वैभव आणि प्रतिक चे आभार व्यक्त करू लागला तेच प्रतिक बोलला.
"अवी शेठ.. आपण मित्र ना आता मग मैत्री मध्ये नो सॉरी नो थँक्यू.. चालतंय रे...."
अशीच थोडी बोलचाल झाली आणि आता तिघे पण प्रवास करत असताना, अजूनही एक विषय अवी च्या मनात घर करून बसलेला होताच. हा विषय या दोघांना सांगायला अवी मागे-पुढे करत होता.
अवी हा विषय या दोघांना सांगणार का?
थोड्यावेळात अवी मन पक्क करून बोलायला सुरुवात करतो.
"अजून एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहीला. मेट्रो स्टेशन वर सांगण योग्य नाही वाटल."
"काही विषय नाही, आता सांगून टाक. हा विषय आपल्यातच राहील. वैभव बोलला."
मी सातवीत असताना माझी फॅमिली पुण्यामध्ये शिफ्ट झाली. आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे घर घेतल. त्या सोसायटी मध्ये माझा एक जिवलग मित्र बनला, विनय. विन्या, माझ्यासाठी भावासारखाच, सारखेच शिकलो मोठे झालो. खूप मस्ती केली आम्ही...
( हे सांगताना अवी च्या चहऱ्यावर भावपूर्ण हास्य होत. काही क्षणासाठी त्याला जुन्या आठवणी आठवल्या असतील.)
पुढे बारावी साठी दुसऱ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतल. अकरावी बऱ्यापैकी गेली. बारावीत असताना एक मुलगी भेटली.
मुलीच नाव ऐकताच वैभव आणि प्रतिक चे डोळे मोठे आणि भुया वरती झाल्या. त्यांचे हे हावभाव बघताच अवी त्यांच्या विचारांना आवर घालत बोलला.
"हो... दमान घ्या. काही पण विचार करू नका सांगतोय मी."
वैभव आणि प्रतिक ने त्यांचे हावभाव आवरते घेतले. अविने परत बोलायला सुरुवात केली.
त्या मुलीच नाव नाही सांगणार, ठीक आहे.
वैभव आणि प्रतिक ने कोणताही प्रश्न न विचारता होकार मध्ये मान हलवली.
"ती दिसायला सुंदर आहेच, यात शंका नाही. मला वाटल भाई आकर्षण असेल म्हणून एवढ लक्ष्य दिल नाही. मी आणि विन्या पहिल्यांदा NEET देत होतो, म्हणून थोडी नर्वसनेस होतीच.
हळू-हळू तिच्याबद्दल एक प्रकारचा लगाव होत गेला , मग थोडी बोल-चाल व्हायची. नॉर्मल फ्रेण्डशिप झाली.
आता NEET चा रिजल्ट लागला आणि आम्ही तिघपण फेल झालो. मी विन्या आणि ती...
आता योगायोग म्हणा कि ती आमच्या जवळच्या सोसायटीत राहायची. आम्ही तिघांनी ग्रुप-स्टडी सुरु केली. कारण तेव्हा बऱ्यापैकी मैत्री झाली होती.
आता आम्ही तिघ बराच वेळ सोबत राहू लागलो अभ्यासासाठी बर का.. या सगळ्यात मला तिचा स्वभाव तीच वागण जवळून पाहायला भेटल.
तुम्हाला माहित आहे माझे बाबा म्हणतात कि "प्रेम जरी चेहऱ्याच्या सौंदर्य वरून सुरु होत असल तरी खरं प्रेम मनाच्या सौंदर्य वर येऊन थांबते बाळा. "
असच काही माझ्या सोबत झालं. मला तिच्या स्वभावावर प्रेम झाल. आणि हा भाई.. मला आकर्षण आणि प्रेमामधील फरक समजते. माझं अभ्यासात लक्ष्य होतच.
आता मी क्लिअर होतो कि मला तिच्यावर प्रेम आहे.
एकदा NEET ची परीक्षा झाली कि मी तिला सांगणार.
मी विन्या ला सुद्धा सांगितलं कि मी अस अस बोलणार तिला.
NEET ची परीक्षा झाली. रिजल्टच्या एका दिवसाआधी मी तिला भेटायला बोलावल. आणि सरळ सरळ प्रपोस केल.
(अचानक अवी हसू लागला.)
"काय झाल ?"
प्रतिक ने प्रश्न विचारला.
"काही नाही रे, माल वाटल ती एकतर हो बोलेल किंवा थोडा वेळ मांगणार, पण ती सरळ नाही बोलली राव...
अवी हे सगळं सोड, आणि अभ्यासाकडे लक्ष्य दे बर का. हे नंतर ही करता येईल. उद्या रिजल्ट आहे आपला, त्यावर लक्ष्य दे. आपण चांगले मित्र आहोत, आणि चांगले मित्र राहूया. ठीक आहे ना..
एवढ बोलून ती तिथून निघून गेली.
मी तिला पाहतच राहिलो. आता तिला कोण सांगणार कि, प्रत्येक मुलींसाठी नसतात या फीलिंग. माझ्याबतीत तरी नाही, मला एकदाच प्रेम झाल. मन लय दुःखल भाई. पण काही विषय नाही. या गोष्टीच समाधान होत कि तिला हे सांगितल.
दुसऱ्या दिवशी रिजल्ट लागला. च्याआईला मी आणि विन्या परत फेल... पण ती सिलेक्ट झाली याचा आनंद होता.
दुसरा attempt ही फेल झालो कि मग आत्मविश्वास खचतेच. आता परत attepmt दिऊ कि नाही दिऊ हा मोठा प्रश्न.
आईबाबा खंबीर होते, त्यांनी हिम्मत दिली. बोलले परत एक attempt दे. हार नाही मानायची, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.
मग काही विषय आहे का! मी आणि विन्या परत अभ्यासाला लागलो. ती सुद्धा जसा वेळ भेटेल तसा अधून-मधून आम्हाला अभ्यासात मदद करायची. हे पाहून तिच्या बद्दल मनात अधिक रिस्पेक्ट वाढली.
मनात तिचे विचार यायचेच, पण मी अभ्यासावर फोकस ठेवला. मनात ठरवल होतच कि एकदा 3rd attempt चा रिजल्ट लागला कि परत एकदा तिला प्रपोस करायच. पण हे शेवटच... हो तर हो, नाही तर नाही. जमल तर खूपच छान नाही तर परत तिला कधी त्रास द्यायचा नाही. नाही का.. या GEN-Z सारख fast dating culture मध्ये मला इंटरेस्ट नाही. "ही गेली कि ती" हे येडेचाळे नकोच भाई.
वैभव आणि प्रतिक ध्यान देऊन अवि ला ऐकत होते.
त्यांना एवढं तर समजल कि अवी बऱ्यापैकी समजदार आहे.
"तुला एवढी क्लीयॅरिटी आहे. बऱ्यापैकी समजदार आहेस तू. तरी सुद्धा तू जीव द्यायला गेलाच कसा ?" वैभव ने प्रश्न विचारला.
"पुढे ऐक ना समजून जाईल तुला."
अवी ने उत्तर दिले.
अच्छा ठीक आहे. पुढे काय झालं ?
प्रतिक ने विचारल.
अविने सांगायला सुरुवात केली.
आज 12 वाजता रिजल्ट लागणार होता. मी आणि विन्याने आपला 100% दिला परीक्षेत. आता बस रिजल्ट यायचा बाकी होता. सोसायटी पासून 5-6 किलोमीटर पुढे एक कॅफे आहे आम्ही तिघ नॉर्मली तिथे जायचो. आज पण तिथेच बसून रिजल्ट पाहायच ठरल होत.
सकाळी मला थोडं काम होत म्हणून मग मी सकाळीच घराबाहेर निघालो. बरच केल नाही तर सोसायटीतले लोक काय रिजल्ट लागला विचारू-विचारू डोक उठवतात.
मी विन्याला आधीच सांगितल कि, मी सरळ कॅफेमध्ये भेटतो. मला थोडा उशीर होईल.
12, 12:15 झाले असतील मी कॅफे जवळ होतो. पोहचणारच होतो. त्याआधी मनात आल कि एकदा रिजल्ट चेक करूनच घेऊ. वाटल या वेळेस तरी चांगला स्कोर आला असेल माझा. पण रिजल्ट पाहिला... च्याआईला परत तेच 1-2 मार्क्सने फेल... नाही म्हणजे काय बोलायचं ना भाई, आता काय करू? घरी कस सांगू? जाम डोक ब्लॉक झाल, काही सुचतच नव्हत. मग म्हटल कॅफेमध्ये जाऊन विन्या ला भेटू मग बघू काय करायच ते...
मी तिथे जाऊन बघतो तर काय. विन्या आणि ती तिथे उभे होते. तिने विन्याला घट्ट मिठी मारलेली आणि त्या दोघांनी एका रोमँटिक कपलसारखी गिरकी घेतली. दोघ खूप खुश होते.
हे सांगत असताना अवीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होत. इकडे वैभव आणि प्रतिक ला झटका बसला. म्हणजे हे एकदम से "वक्त बदल गया, जजबात बदल गये" वाला विषय होता. एकदम ट्विस्ट आला आणि दोघांनी विचारल
"म्हणजे? "
अवी शांत स्वरात बोलला
म्हणजे ती आणि विन्या एकमेकांवर प्रेम करतात. बस.. हे मला माहिती नव्हत.
पुढे अवी घडलेला किस्सा सांगतो.
विनय आणि ती गिरकी मारत असताना तीच लक्ष्य अवीकडे जाते. ती ईशाऱ्याने विनयला थांबवते. आता दोघांच लक्ष्य अवी कडे गेल. त्याला पाहून दोघ टेन्शन मध्ये आले. आता अविला नेमकं काय सांगायच हाच विचार त्यांच्या मनात सुरु असेल.
अवी त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. विनयला काही बोलता नाही आल. म्हणून ती पुढाकार घेऊन बोलण्याचा प्रयत्न करते. पण अवी तिला मधातच थांबवून बोलतो.
बघ मी जो विचार करतोय तो चुकीचा आहे अस म्हणू नकोस, तुम्ही एकमेकांवर प्रेम करता आणि हे दिसतंय.
अवी विनय कडे एकटक नजरेने पाहत विचारतो.
"हे खरं आहे ना विन्या?"
यावर ती विनय ची बाजू घेत बोलण्याचा प्रयत्न करते,
अवी ऐकून तर.....
अवी तिला मधातच अडवत बोलतो.
"प्लीज मी तुला नाही याला विचारतोय. विन्या सांग ना रे.."
विनय तुटक नजरेने अवी कडे पाहत बोलतो.
विनयची हिम्मत होत नव्हती, अवी ला खरं सांगायची. शेवटी विनय हो बोलला..
हे ऐकताच अविने त्याच्या डाव्या हाथाची घट्ट मूठ्ठी बनवली. जाणू काही त्या मुठ्ठीत तो स्वतःचा राग दाबतोय.
कधी पासून सुरु आहे हे? अविचा पुढचा प्रश्न.
यावर विनय दबक्या स्वरात बोलतो.
2nd attempt च्या आधीपासून.
"कधी सांगणार होता मला? "
अवी गंभीर स्वरात विचारतो.
आता तिने खंबीरपणे अविची बाजू घेतली आणि बोलायला सुरुवात केली.
"मीच म्हटल होत कि सांगू नको. त्याला सांगायच होत पण 2nd attempt नंतर तू मला प्रपोस केल. तेव्हा तुला सांगण योग्य वाटल नाही. त्यानंतर तुम्ही दोघे पण NEET मध्ये फवलं झाले. तेव्हा जर आम्ही तुला हे सांगितल असत तर याचा वाईट परिणाम तुमच्या मैत्रीवर आणि अभ्यासावर पडला असता, माझ्यामुळे. जे मला नको होत. तुला त्रास द्यायचा नव्हता. 3rd attempt नंतर सांगणार होतो तुला."
यावर प्रतिउत्तर देतो अविने विचारल.
"अच्छा, मग कधी सांगणार होते? आज तर रिजल्ट चा दिवस आहे ना."
आता मात्र यावर विनय बोलतो कि,
अव्या तुझा रिजल्ट पाहू ना, ते इम्पॉर्टन्ट आहे थांब तुझा रिजल्ट पाहतो. यावेळेस पक्का तुझा पण चांगला स्कोर आला आहे भाई..
विनय खिशातून फोन काढतो.
अवी यावर तिखट स्वरात उत्तर देतो बोलला.
फेल झालो मी, परत 1-2मार्क्सने राहून गेल. हाच रिजल्ट आहे माझा. थोड्या वेळ आधीच पाहिला.
हे ऐकल्यावर ती आणि विनय दोघे पण निःशब्द झाले. आता काय बोलाव त्यांना काही सुचत नव्हत.
अवी भावुक होऊन पुढे बोलू लागला.
जाऊ दे ना... तुझा स्कोर चांगला आला. तुझ सिलेक्शन झालंच समज. बरोबर ना.
विनय दबक्या स्वरात बोलला. "हो"
शाब्बास जिंकलास भावा, NEET मध्ये आणि प्रेमात सुद्धा.. सेलिब्रेट करा तुम्ही. मी निघतो.
भावुक अवी मागे वळून एकदोन पाऊल चालतो.
विनय च मात्र मन दुःखल आणि त्याने अविला थांबवण्याचा प्रयत्न करत
अव्या.. अव्या... थांब ऐक ना...
अस म्हणत अविच्या खांद्यावर हाथ ठेवला.
विनय चा हाथ खांद्यावर पडताच अविने त्याचा हाथ बाजूला करत त्याच्याकडे रागाने पाहत बोलला.
"विन्या तमाशा नको मला. बोललो ना तू सेलिब्रेट कर. मला एकट सोड. तू जर माझ्या माग दिसला ना भाई.. तर मी विसरून जाईल आपली मैत्री. लय मारणार...."
अविने मागे वळून चालायला सुरुवात केली. अविचे डोळे भरून आले. अविच्या मनात राग आणि दुःख दोन्ही एकाच वेळेस तांडव करत होते.
विनय ची परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. डोळे भरून आलेले, मन दुःखी, त्याला स्वतःचा राग येत होता. कारण त्याने आज अविसारखा भाऊ गमावला.
ती पण तेवढीच दुःखी, होती, तिला ज्या गोष्टीची भीती होती, आज नेमक तेच झाल. विनय च्या पाठीवरून हाथ फिरवत, त्याच्या डाव्या हाताला आलिंगन घालून ती विनयला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती.
इकडे अवी रागाच्या भरात कुठे निघून गेला याची कल्पना तिला आणि विनय ला नव्हती. अविने दोघांचा नंबर ब्लॉक केला. फोन सायलेंट मोड वर ठेवला. आणि सरळ येरवडा मेट्रो स्टेशनवर जाऊन बसला. कारण इथे विनय ची यायची शक्यता कमी होती.
घडलेला सगळा प्रकार सांगून झाल्यावर अविने एक दीर्घश्वास घेतला आणि पुढे बोलला.
" हे सगळ झाल. फेल झालो, हिम्मत तुटली. विन्या जवळ गेलो म्हटल त्याच्याजवळ थोडं बर वाटेल. भाई विन्या ने तर लय मोठा झटका दिला. तळ पायाची मस्तकात गेली. लय राग, संताप आला. माझं च मला काही सुचत नव्हत. त्या रागारागात लय वेळेपर्यंत मेट्रो स्टेशनवर बसून राहिलो.
म्हणजे बघ ना आईबाबांनी एवढा सपोर्ट केला. पण मी काय दिवे लावले? काहीच नाही. विन्या ने एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली. आता काय बोलू ना अस वाटल कि काही राहीलच नाही यार...!
या सगळ्याचा एवढा त्रास होत होता ना कि तो सहनच नाही झाला. काय करू? काय करू? समोर ब्रिज दिसला आणि ठरवल कि आता जीव देतो. आणि जाऊन उभा राहिलो ब्रिज वर..
ते तरी बर तुम्ही दोघ देवासारखे आले. वेळेत अक्कल शिकवली मला आणि जीव वाचवला माझा...
काही मिनिट तिघेपण शांत होते.
" एकाच दिवसात दोन-दोन झटके बसले तुला. सोपी नसेल गेल तुला. अच्छा तुला विनय कुठं दिसला का? त्याने तुला शोधण्याचा प्रयत्न तर केला असेलच..."
वैभव ने विचारले.
"विन्या आला होता. मेट्रो स्टेशन वरून खाली येतांना दिसला, जवळ येणार होता. पण मीच त्याला ईशाऱ्याने अडवल. सध्या आपल्या माग येत असेल बाईक घेऊन."
(विनय ला अवी कुठं आहे? हे सोशल मीडिया च्या माध्यमातून कळल. आज घडलेला सगळा प्रकार, अविचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, अविच्या मनातील आक्रोश, वैभव आणि प्रतिक ने अविची काढलेली समजूत. तो सगळा संवाद, अविच मनपरिवर्तन होणं, शेवटी तिथे झालेला जल्लोष, या सगळ्या प्रकाराचे शूट केलेले क्लिप्स रील, शॉर्ट्स च्या स्वरूपात इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब ई. सोशल मीडिया च्या माध्यमातून पुण्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पसरत होते. एक सकारात्मक संदेश लोकांपर्यंत पोहचू लागला कि जीवाची किंमत आहे. जगण्याला महत्व आहे. आयुष्यात खूप मोठे चढ-उतार येतील, पण त्यावर तुम्ही मार्ग काढू शकता, पुढे जाऊ शकता, हे मात्र नक्की.)
प्रतिक च्या मनात काही प्रश्न होते.
अवी तुला एक विचारू का?
अस म्हणत त्याने अविला प्रश्न केला.
"हा.. विचार ना."
अवी ने होकार दिला .
"मला सांग तुला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग आला? आणि आता त्याबद्दल तुझा काय विचार आहे."
अवी च्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आल.
माल या गोष्टीचा राग नाही कि विन्या ने माझ प्रेम हिसकावून घेतल. तिने कधी माझ्यावर प्रेम केलच नाही तर हिसकावून घेण्याचा प्रश्नच उठत नाही. मी आधीच बोललो कि मी एकदा शेवटच तिला प्रपोज करणार. मग हो तर खूप छान नाही तर परत तिला त्रास नाही द्यायचा. शेवटी तिची इच्छा महत्वाची..
पण विन्या माझ्यासाठी भावासारखा आहे. मी त्याला सगळं काही सांगतो, म्हणजे सगळ काही. विन्या माझ्यापासून काही लवपणार नाही याची मला गॅरंटी होती.
मला तिच्यावर प्रेम आहे हे तिला सांगण्याआधी मी विन्या ला सांगितल. पण ते दोघ एकमेकांवर प्रेम करतात, हे गोष्ट विन्याने लपवली.
खोट बोलला, आणि या गोष्टीचा लय.. लय राग आला मला. त्यांनी स्वतःहून सांगितल असत तरी सुद्धा झटका बसलाच असता. पण राग आला नसता. शेवटी ते दोघ एकमेकांवर प्रेम करतात, मग मी कोण मधात येणारा.
पण ज्या परिस्थितीमध्ये मला हे सगळं माहित पडल. त्यामुळे लय दुःख झाल.
अविच उत्तर समाधानकारक होत.
यावर प्रतिक ने परत एक प्रश्न विचारला.
"मग आता काय करणार तू? विनयवर अजूनही राग आहे ?"
त्याच्याशी बोलणार कि नाही ?
"आता सध्या डोकं शांत आहे माझं. माझ्यापासून विन्याने ही गोष्ट लपवन चुकीच होत. पण ते दोघ एकमेकांवर प्रेम करतात आणि हे सत्य आहे. माझ्या रागामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर फरक नाही पडला पाहिजे. आता विन्या भेटणारच आपल्याला, तेव्हा सांगतो त्याला कि माझ्या रागामुळे तुझ रिलेशनशिप खराब नको करू. किती हरामखोर असला तरी भावासारखा आहे विन्या.."
"हे सगळ तू मान्य करशील? प्रतिकचा पुढचा प्रश्न.
"सत्य आहे तर मान्य करायलच पाहिजे. जबरदस्तीने प्रेम तर भेटत नाही ना."
हे बोलत असताना अवीच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक हास्य होत. हे हास्य तेव्हा येते जेव्हा आपण एखादी गोष्ट रागाच्या भावनेने नाही तर अंतर-मनापासून मान्य करतो. आणि मग पुढे जातांना आपल्या मनात द्वेष नसतो, समाधान असते आणि पुढे काही तरी चांगल करण्याची जिद्द आणि धैर्य..
प्रतिक ला त्याच्या प्रश्नांची उत्तरे भेटली. आता त्याच्याकडे प्रश्न उरले नाहीत.
वैभव अवीच्या खांद्यावर हात ठेऊन बोलला.
"बरीच समजदारी आहे तुझ्यात. प्रत्येक मुलगा तुझ्यासारखा विचार करत नाही.अशा वेळेला त्यांचा इगो मधात येते. आणि मग सत्यानाश होते. प्रत्येकाने तुझ्यासारखा विचार केला ना तर समाजात खूप चांगले बदल होतील. असो तू योग्य निर्णय घेतला अवी.."
थोड्या वेळेनंतर कॅब अविच्या सोसायटी जवळ पोहचली अविने तिथेच कॅब थांबवली तिघेजण खाली उतरले., मागून विनय बाईक घेऊन आला. त्या तिघांना उभ पाहून विनय ने बाईक उभी केली आणि अवी कडे जाऊन उभा राहिला.
आता विनय आणि अवी समोरासमोर होते.
1-2 मिनिट दोघ पण काही बोलले नाही.
मग अचानक अविने एक जोरदार चापड विनयच्या कानाखाली वाजवली.
हे पाहताच वैभव अविला अडवण्याच्या उद्देशाने पुढे जाणारच होता पण प्रतिक ने त्याचा हात पकडून त्याला अडवल.
"त्या दोघांचा मॅटर आहे, त्यांना सॉल्व करू दे."
प्रतिक बोलला..
काय रे भाडखाऊ, भाऊ आहोत ना आपण, एक न एक गोष्ट एकमेकांला सांगतो. काहीच लपवत नाही मग तू तिच्या वर प्रेम करत, एवढी मोठी गोष्ट का लपवली रे. अरेरे.. जेव्हा मी तुला सांगितल कि मला तिच्यावर प्रेम आहे तेव्हा तरी सांगायच होत. विन्या मला या गोष्टीचा राग नाही कि तुम्ही एकमेकांवर प्रेम करता, पण या गोष्टीचा राग आहे कि तुम्ही खरं नाही सांगितल.
माझा राग अजून शांत नाही झाला पण माझ्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये फरक नाही पडला पाहिजे. चांगली मुलगी आहे रे ती, नशिबवान आहे भाड्या तू.. ती भेटली तुला..
तू पण चांगला मुलगा आहेस. आयुष्यभर तिची साथ देशील खात्री आहे मला. खुश राहा तुम्ही. आणि मला थोडा वेळ द्या. चाल जा आता....
अवी पुढे काही बोलणार त्या आधी विनय ने अविला घट्ट मिठी मारली.
"अव्या सॉरी रेरे... तुला माहित आहे ज्यादिवशी तू मला सांगितल कि तुला तिच्यावर प्रेम आहे नेमकं त्याच दिवशी मी तुला आमच्या प्रेमाबद्दल सांगणार होतो. तू खूष होता रे आणि सिरीयस होता. कस सांगणार ना तुला, काही कळतच नव्हत. हिम्मत च नव्हती होत. तुला दुखवायच नव्हत रे. आणि नेमकं तेच केल मी. मी खूप मोठी चूक केली.
त्या व्हिडिओ मध्ये जेव्हा तुला ब्रिजवर उभ पाहिलं, तेव्हा जीव हातात आला माझा. लय राग आला... लाज वाटली मला माझी कि, माझ्यामुळे माझ्या भावाला जीव द्यायची पाडी आली. ती जरी प्रेम असल ना तरी तू भाऊ आहेस माझा तुझी जागा कोणी नाही घेऊ शकत. तू एक नाही दोन कानफाडीत ठेऊन दे, हव तर हातपाय तोड माझे पण परत अस काही करू नको अव्या."
आता विनय आणि अवी दोघ पण भारावून गेले. दोघांच्या डोळ्यातून असवाच्या धारा लागल्या.
तब्बल 1-2 मिनिटनंतर त्यांनी आवरत घेतल.
"हा चाल लय झालं मस्का मारण.. माफ केल तुला जा.. पण राग शांत नाही झाला. चाल सोड आता..."
(विनय ने अविला सोडल, दोघांनी त्यांचे अश्रू पुसले)
"जा.. आता तीला पण भेटून ये. टेन्शन मध्ये असेल ती. मला पण घरी जायचं आहे आईबाबा वाट पाहत आहेत. चाल जा आता."
अवी बोलला.
"हा.. मी सांगतो तिला."
अस म्हणून विनय मागे वळून जायला सुरुवात करतो.
पण परत एकदा अविला घट्ट मिठी मारत "थँक यु सो मॅच अव्या" मला समजून घेण्या बद्दल., "
एवढ बोलून आता विनय त्याची बाईक घेऊन तिथून निघून जातो.
दोघेही सुटकेचा श्वास घेतात. ते म्हणतात ना "अंत भला तो सब भला "
अवी आणि विनय ची ही मैत्री पाहून वैभव मस्करी मध्ये प्रतिक ला म्हणतो.
"बर आहे पत्या, आपल्या आयुष्यात कोणती कॉमन मुलगी नाही."
" सही बोला."
प्रतिक उत्तर देतो.
दोघ पण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन हसतात.
इकडे अवी विनय ला जातांना पाहत होता. तेवढ्यात
"तुमचा भरतमिलाप झाला असेल तर निघायच आपण. घरी तुझे आईबाबा वाट पाहत असतील आपली."
( या सगळ्या गडबडीत एक भाग सांगायचा राहून गेला, जेव्हा अवी घडलेला सगळा प्रकार वैभव आणि प्रतिक ला सांगत होता त्या दरम्यान अविला त्याच्या आईचा कॉल आला, मेट्रो स्टेशनवर घडलेला सगळा प्रकार अविच्या फॅमिली आणि सोसायटीला माहित पडला. सोशल मीडियाच्या कृपेने..
अविने आईला 'मी सुखरूप आहे आणि वैभव प्रतिक सोबत घरी येतोय' आहे सांगितल. यानंतर आईने अविला कोणताही प्रश्न न विचारता 'तू लवकर घरी ये, मी वाट पाहतोय.' अस म्हणून आईने कॉल ठेवला.)
इकडे अवी ने प्रतिक कडे मागे वळून पाहिल आणि
"हा.. चाल जाऊया.."
तिघे पण आता सोसायटी कंपाउंड मध्ये आले.
तिसऱ्या मजल्यावर अविच घर होत. तिघेजण पायऱ्याने वर चढू लागले. घरी जातांना सोसायटी मधील लोकांच्या नजरा अवीकडे होत्या. पण आज त्यांच्या पाहण्यात थोडा बदल होता. घडलेला प्रकार प्रत्येकाला माहित झाला होता. मग कदाचित त्यामुळेच आज त्यांच्या पाहण्यात अविला मैत्री आणि बंधुभाव दिसत होता. हे पाहून कुठेतरी अवीच मन
सुखावल.
तिघे आता घराच्या दाराजवळ पोहचले. अविने बेल वाजवली. तेच अविच्या लहान भावाने दार उघडल.
अविला पाहताच त्याने त्याला घट्ट मिठी मारली आणि पुढे बोलला.
"आई दादा आला बघ. "
क्षणातच अविचे आईबाबा दाराजवळ आले. खरं तर ते अविचीच वाट पाहत होते. अविला पाहताच त्याच्या आईने अवीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, त्याचा गालगुसा घेतला. त्या माउलीचे डोळे भरून आले.
वास्तविक पाहता अवीच्या आईबाबा च्या मनात खूप प्रश्न असतील पण त्यांनी एकही प्रश्न न विचारता.
"खूप दमल माझ बाळ, एक काम कर तू हातपाय धुऊन घे. गरमा-गरम जेवण तयार आहे, आधी जेवण करून घे चाल."
अविची आई बोलली.
त्यांचा पाठपुरावा करत अविचे बाबा बोलले.
"हा बेटा तू फ्रेश होऊन घे. जेवण करू बाकीच नंतर बोलू."
अवीने होकारार्थी मान हलवली आणि पुढे बोलला.
ठीक आहे. आईबाबा हे माझे मित्र वैभव आणि प्रतीक
दोघाकडे इशारा करत अविने आपल्या आईबाबांना त्याचा परिचय करून दिला.
"आम्ही ओळखल बेटा यांना, तू जा फ्रेश हो. आम्हाला यांच्याशी 1-2 मिनिट बोलायच आहे."
अविचे बाबा बोलले.
बाबाच्या बोलण्याप्रमाणे अवी बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला. अवी आतमध्ये जाताच.
अवि च्या आईबाबांनी वैभव आणि प्रतिक समोर हात जोडले.
" बेटा... तुमचे खूप-खूप आभार..."
अविचे बाबा बोलायला लागले.
ते पुढे काही बोलतील त्याआधीच वैभव आणि प्रतिक ने त्यांचे हात पकडून खाली घेतले. आणि
"अरेरे.. काका-काकू काय करताय तुम्ही? तुम्ही मोठे आहात. अस हात नका जोडू हो... आणि आम्ही जे काही केल ते माणुसकीच्या नात्याने केल."
प्रतिक अवीच्या आईबाबांना थांबवून बोलला.
"तुम्ही जे केल, ते सध्याच्या काळात प्रत्येकजण नाही करत बाळा. अशा वेळेला लोक बस व्हिडिओ काढतात. माणुसकी तर फार कमी पाहायला भेटते."
अविच्या बाबांनी उत्तर दिल.
"तुमच्या आईबाबांनी लय चांगले संस्कार दिले तुम्हाला.."
अविची आई बोलली.
"धन्यवाद, काकू आम्ही जे काही आहोत ही त्यांचीच पुण्याई आहे."
वैभव बोलला.
"अहो, आपण पण ना... मुल कधीची दारात उभी आहेत. चला तुम्ही दोघ लवकर हातपाय धुऊन घ्या. जेवायला बसा चला."
अविची आई बोलली.
वैभव आणि प्रतिक आत मध्ये येताना वैभव बोलला.
"अहो.. काकु पण.."
वैभव त्याच वाक्य पूर्ण करणार त्या आधीच अविची आई बोलते.
"पण-वण काही नाही. गुपचूप जायच, हातपाय धुऊन जेवायला बसायच, ठीक आहे. चला आता."
एवढ बोलून अविची आई स्वयंपाक घराकडे गेली.
यावर अविचे बाबा हास्य स्वरात बोलले.
"आता मुख्यमंत्री साहिबा बोलल्या, तुम्हाला ऐकावच लागणार."
"आता त्यांच म्हणण टाळता येईल का? तुम्ही बसा, आम्ही आलोच हातपाय धुऊन."
प्रतिक बोलला.
ठीक आहे, लवकर या.
अविचे बाबा सोफ्यावर बसताना बोलले.
वैभव आणि प्रतिक बाथरूमकडे गेले. अवी नुकताच बाहेर आला.
"आतमध्ये टॉवेल आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या."
अवी बोलला.
"ठीक आहे. तू बस आम्ही आलोच पाच मिनिटात."
अवी त्याचे आईबाबा आणि भावाजवळ जाऊन बसला.
इकडे वैभव आणि प्रतिक बाथरूममध्ये हातपाय धूत होते.
हायपाय धुऊन झाल्यावर वैभव प्रतिकला म्हणतो.
"पत्या, परिस्थिती किती तोडते माणसाला, एवढ कि माणुस जीव द्यायला जाते.
बहुतेक लोकांसोबत असच होत असेल, पण हा त्यांनी स्वतःला वेळेवर सांभाळून घेतलं त्यांना समज आली तर सगळ सुरळीत होते रे . अवीच च उदाहरण घे."
"मग कशासाठी जगायच? याच उत्तर काय असेल त्यांच्यासाठी जे जीव द्यायला निघतात?"
वैभव प्रश्न विचारतो.
"स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी जगायच. जगण्याच निम्मित आणि अर्थ लक्षात आला कि झाल मग व्यक्ती जगतो. कोणालाही जीव द्यायची इच्छा नसते रे, परिस्थिती मुळे माणसाचे हात टेकतात. त्यावेळेस त्यांना साथ दिली कि मग सगळ सुरळीत होते.
मग त्याना खऱ्या अर्थाने जगायची किंमत कळते."
प्रतिक ने उत्तर दिले.
"वाह गुरुजी, क्या बात हैं...! चाल आता बाहेर आपली वाट पाहण सुरु असेल."
वैभव बोलला.
"चला सेठ.."
थोड्या वेळात सगळी मंडळी जेवण करायला बसली. त्यानंतर त्यांचा चर्चा सत्र सुरु झाला.
अविने जे काही केल ते कशासाठी? आणि का? हा प्रश्न कोणी विचारलाच नाही. याउलट त्यांच्या गप्पा-गोष्टी सुरु झाल्या. अविच्या आईबाबांनी त्यांच काही आगळे-वेगळे किस्से सांगितले, त्यांनाच साथ देत अवी प्रतिक आणि वैभव ने सुद्धा आपआपले किस्से सांगायला सुरुवात केली.
जणू काही इथे किस्यांची मैफिल च रंगली. ही मैफिल बराच काळ चालली. अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत....
आज अवी त्याच्या आयुष्यातील एक मोठा धडा शिकला.
शिवाय अविच्या आईबाबांनी त्याला कोणतेही 100 प्रश्न न विचारता, त्याला साथ दिली.
आज अविच्या कथेचा शेवट हा सुखरूप आणि समाधानकारक झाला...
"पण प्रत्येक NEET स्टुडन्ट च्या कथेचा शेवट असाच होते का?"
उत्तर आहे "नाही". NEET परीक्षेची ही जीवघेणी स्पर्धा, आणि मेडिकल कॉलेज मध्ये असलेले मर्यादित सीट्स, त्याहूनही अधिक अपयशामुळे आलेलं सामाजिक दडपण..त्यामुळे मानसिक तणावामध्ये अविसारखेच कित्येक मुलं-मुली अगदी टोकाचा निर्णय घेतात तो म्हणजे आत्महत्या..
कदाचित प्रत्येकाची परिस्थिती अविसारखी नसणार पण या तीव्र मानसिक तणावामुळे त्यांचा अंतिम निर्णय एकच असतो.
एकीकडे जिथे AIMS सारख्या नामंकित आरोग्य संस्था मध्ये जवळपास 30% स्टाफची कमतरता आहे त्याच देशात दुसरीकडे NEET सारख्या नामांकित परीक्षेत नापास झाल्यामुळे कितीतरी मुलं-मुलीनी आपल्या जिवाच बलिदान दिल. एकीकडे आपण प्रत्येक कामाला एक लेबल लावल, पण या सगळ्या गोष्टीची माहिती, जागरूकता आपण आपल्या युवा पिढीला करून दिली तर AIMS आणि अश्याच संस्थेमधील स्टाफची कमतरता रोजगाराची संधी बनेल नाही का?..
पण खरं बोलायच झालं तर.. एवढी जागरूकता नाही आहे.. हल्ली एक बातमी आपल्या कानावर आली असेल, काश्मीर मध्ये श्री माता वैष्णव देवी मेडिकल कॉलेज ची पात्रता रद्द करण्यात आली. याला कारणीभूत होत एका धार्मिक संघटनेचे आंदोलन...
कारण त्या कॉलेज मध्ये यावर्षी जास्त विद्यार्थी मुस्लिम गटातील होते. खरंच या गोष्टीला काही तथ्य आहे का? आपण इथे धर्माबद्दल नाही तर NEET च्या स्टुडन्ट बद्दल बोलतोय त्यांनी किती मेहनत करून त्या कॉलेज मध्ये सीट मिळवली, एका विशिष्ट समूहाबद्दल असणाऱ्या द्वेष्यामुळे युवा पिढीच्या भवितव्याला का म्हणून वेशिवर टांगायच?
खरी परिस्थिती सांगायची झाली तर आज भारतात डॉक्टर आणि मेडिकल स्टाफची कमतरता आहे, आणि ही कमतरता भरून काढण काळाची गरज आहे.
आणि दुसरीकडे एक बातमी कानावर आली कि एका सुशिक्षित शिक्षकाने त्यांची मुलगी NEET मध्ये नापास झाली म्हणून तिला एवढी मारहाण केली कि अक्षरशः तिचा जीव हिसकावून घेतला. खरच किती क्रूर आणि लज्जास्पद आहे हे कृत्य!....
मे महिन्यात जेव्हा NEET ची परीक्षा असते तेव्हा प्रत्येक वर्तमानपत्राच एक अखंड पण NEET ची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्ध्याला शुभेच्छा देण्यासाठी राखीव असते.
आणि यतीलच काही विद्यार्थी जेव्हा ही परीक्षा नापास होतात तेव्हा त्याना धीर द्यायला, त्यांची मन पक्की करायला आपण पाहिजे तसा पुढाकार का घेत नाही?
कित्येक मुल-मुलींनी आत्महत्या केली, तरी सुद्धा यावर उपायकरक स्वातंत्र अशी कार्यप्रणाली किंवा संस्था का म्हणून नेमण्यात नाही आली?
सद्या सत्तेत असलेली आपली सरकार देवस्थान बांधायला अग्रेसर असते, तीच सरकार देवा घरची फुले मानली जाणाऱ्या, भारताचे भविष्य असणाऱ्या युवापिढीला, या मुलामुलींना मृत्युंमुखी का जाऊ देते?..
बरेच प्रश्न मी इथे मांडले. माझ्या या प्रश्नाचा हेतू समाजावर , एखाद्या विशिष्ट पक्षावर किंवा समूहावर टीका करने नाही तर या विषयाच्या गंभीरतेवर प्रकाश टाकून आपल्या सगळ्यांना समाजाला, सरकारला या जबाबदारी बद्दल जागृत करने आहे...