What exactly does it mean to be successful in life in Marathi Motivational Stories by Dhanashree Satpute books and stories PDF | जीवनात यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय ?

Featured Books
Categories
Share

जीवनात यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय ?

जीवन म्हणजे एक रंगीण प्रवास आहे. त्यामुळे जीवनात चढ उतार तर येणारचं ना ! कधी यश तर कधी अपयश , कधी आनंद तर कधी दुःख... कधी उजेड तर कधी अंधार.......या सर्व छोट्या छोट्या गोष्टीनेच तर आपलं जीवन सजलं आहे....

आपण नेहमी म्हणतो मला न जीवनात खूप मोठ व्हायचंय.... खूप यशस्वी व्हायचंय.....! पण मला सांगा.....जीवनात खूप मोठं व्हायचंय, यशस्वी व्हायचंय म्हणजे नेमकं काय? 

जीवनात यशस्वी व्हायचं आहे म्हटल्याने जर व्यक्ती यशस्वी झाला असता ....तर जे मेहनतीने मिळतेय त्याच काही मौल्य च राहील नसत..... जे मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र परिश्रम घेतो ,त्याला तर काही महत्वचं उरल नसत......

मनुष्य हा खूप चपळ आणि हुशार प्राणी आहे . मनुष्याला जीवनात प्रत्येक गोष्ट हवीहवीशी  वाटते . पण...... हे जीवन आहे , स्वप्न नाही ना.... या जीवनात प्रत्येक गोष्ट सहजासहजी मिळते का? तर नाही. जर आज प्रत्येक गोष्ट मनात आणल्या बरोबर आयुष्यात मिळाली असती,तर........ मनुष्याला कठीण परिश्रम घेणं समजल च नसत ."कष्टाचे फळ गोड असते" या म्हणीचा अर्थच समजलाच नसता . आणि कष्टाने मिळालेल्या गोष्टी ची किंवा वस्तूची जराही किंमतच उरली नसती. 

आजच्या युगात बघितल तर प्रत्येक मनुष्य, युवक कोणत्या ना कोणत्या गोष्टी साठी,........ कोणत्या ना कोणत्या वस्तू साठी धडपड करताना दिसतो. काय तर म्हणे, मला हे गोष्ट मिळाली की मी माझ्या आयुष्यात यशस्वी होणार....... पण इथेच खर चुकते.....कारण, आपण त्या एक दिवसाच्या आनंदासाठी वर्षभर आणि जीवनभर ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करतो. ती गोष्ट तर मिळते आपल्याला पण, ती गोष्ट मिळवण्याच्या नादा मध्ये आपण रोजचा आपल्या समोर आलेला आनंद आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारे यश विसरतो.... त्याला आपण नजरअंदाज करतो..... रोज आपल्या समोर लहान का होईना यश येते ...पण आपण मोठ यश मिळवण्या साठी त्याच्या कडे बघत पण नाही. त्याचा विचारही करत नाही .............

यश म्हणजे फक्त खूप कष्ट केले आणि मिळालं असं नाही ना राहत..... जर तुम्हाला यश मिळालं आणि तुम्ही त्या मध्ये समाधानीच नाही ,आनंदीच नाही तर त्या मिळालेल्या यशाचा काय फायदा.......?

मला असं वाटते , की यश आपल्या अवतीभोवती च असते...... पण ते कुठे आणि कस मिळते ते सांगता नाही ना येत . नेहमीच  घरच उदाहरण जर घेतलं . तर , आपल्या आजी आजोबाच च बघा ना .........आपण कोणतही छोटं मोठ त्यांचं काम ऐकलं की आपल्याला शाबासकी देते ..... आपल्याला खूप लाड करते . ....... मला सांगा आपण एवढे प्रयत्न तर एका शाबासकी साठी च तर करतो ना........?  मग या गोष्टी मध्ये आपण यशस्वी झालोच ना .......?  आणखी बघितल तर आपण कोणाला मदत केली, कोणाच्या वाईट वेळेत त्याचा आधार बनलो . तर तुम्ही त्यात नाही का खूश होणार ........?

यश हे अशी वस्तू आहे की , जे मागितल्याने आणि हिसकावल्या ने मिळत नाही ती कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला मिळतेच........ कधी छोट्या तर कधी मोठ्या गोष्टीतून........... म्हणून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत यश समजा.......... आणि  त्या वर्षभराच्या मिळण्याच्या यशावर अवलंबून न राहता छोट्या छोट्या गोष्टीतुन आनंद घ्यायला शिका. कारण वर्षभराच यश एकदिवसाचा आनंद आणि खुशी देऊन जातो पण आपण त्या साठी किती आशा आणि आकांक्षा लावून बसतो . आणि जे काही न करता मिळते त्याची कदर करत नाही म्हणून प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत रहा कारण जीवन हे आज आहे तर उद्या नाही. आणि आज गेलेली वेळ परत वापस येणार नाही. वेळ निघून गेल्यावर फक्त पश्याताप करून घेण्यापेक्षा आहे त्या वेळेतच जगून घ्या.



                       धन्यवाद.........!