Koun? 36 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 36

Featured Books
  • నీ జీవితం నీ ఇష్టం

    అందరి జీవితం ఒకేలా ఉండదు.అందరి జీవితం ఒకటికాదుబాధ అనేది జీవి...

  • ధర్మ-X - 4

    న్యూ అమరావతి వీధుల్లోని చీకటి అనేది కేవలం వెలుగు లేకపోవడం కా...

  • స్వచ్చత

    హైదరాబాద్ శివార్లలోని అత్యంత విలాసవంతమైన ఒక కొత్త గేటెడ్ కమ్...

  • వేద - 17

    మేనార్‌లోని ఆ పాత గదుల్లో నిశ్శబ్దం గూడు కట్టుకుంది. అర్జున్...

  • ధర్మ-X - 3

    అద్వైత్ కిటికీ గాజుపై మెరుస్తూ కనబడుతున్న ఆ పచ్చటి అక్షరాలు....

Categories
Share

कोण? - 36

आता मात्र सावलीचा राग शांत झालेला होता मग तीने म्हटले, "चुकीचा म्हणजे?." मग शीना ने म्हटले, "मी इकडे आपल्या अभ्यासात व्यस्त असताना मला एक बातमी कळली की माझ्या पालकांचा एका अपघातात मृत्यु झालेला आहे. तेव्हा मी तत्काल माझ्या घरी परत गेले होते आणि तेथे जाऊन मी माझ्या स्वतःचा हाताने त्यांची सदगद केली. त्या दोघांचा गेल्यावर माझ तेथे कुणीच न्हवत आणि देवाने सुद्धा मला वेळेचा आधीच मोठ करून दिलेल होत. तेव्हा मग मी माझ्या स्वतःशीच वीचार केला की तेथे बसून उपाशी मरण्यापेक्षा इथे येउन आधी शिक्षण पूर्ण करायच आणि मग काम करून स्वतःच पोट पोसायच म्हणून मग मी शिक्षण झाल्यानंतर इथेच राहिली परंतु कुणाही वीन माय बापाचा मुलीला या समाजात एकटे रहता येत नाही. त्यांचा सोबत एकतर पिता किंवा भाऊ म्हणून असा कुणी पुरूष हवा असतो त्यामुळे कुणीही त्यांचाकडे वेगळ्या दृष्टीने बघणार नाही. परंतु तुला तर माहीत आहे की ज्या मुलीच पाठीमागे असा कुठलाही आधार नाही आहे त्या मुलीला सगळे एका भुखेल्या कुत्र्यासारखे बघतात. म्हणून मी एका मुलाला आपला बॉयफ्रेंड म्हणून केले आहे. जेणेकरून तो माझी रक्षा या समाजातील पुरुषांपासून करेल.” मग सावली ने म्हटले, “ठीक आहे तू हा पाऊल उचललास मान्य आहे. परंतु तो तुझी रक्षाच करेल आणि तुझा गैर फायदा करणार नाही याची शाश्वती काय. तो मुलगा कसा आणि काय आहे हे तुला माहीत आहे काय." तेव्हा शीना ने म्हटले, "हे बघ सावली आपल्या स्त्रीचे आयुष्य असे आहे की तीला लग्नाचा आधी आणि लग्नाचा नंतर सुद्धा कुणावर विश्वास हा करावाच लागतो. जरी तीचा पालकांनी तीचे लग्न लावून दिले असेल तेव्हा तीला स्वतःला त्या मुलाचा स्वाधीन करावे लागते आणि जर लग्नाचा आधी तीने एखाद्या मुलाचा संगे प्रेम प्रकरण केले असेल तरीही तीला त्याचावर वीश्वास करून स्वतःला त्याचा स्वाधीन करावे लागते.” “याचा अर्थ तू . ......" अशी सावली मध्येच बोलायला गेली तेव्हा शीना ने म्हटले, "होय, सावली तू बरोबर समजली आहेस. मी आज दोन वर्षांपासून त्याचा सोबत रिलेशन मध्ये आहे. त्या दरम्यान आमचे संबंध हे कित्येक वेळा झालेले आहेत. तो माझ्या द्वारे आपली शारीरिक भूख क्षमवीतो आणि त्याचा द्वारे मी सुद्धा तेच करते."

    मग सावली ने म्हटले, “तर मग तुझा काम धंदा आणि पुढचा आयुष्याचे प्लानिंग काय आहे." शीना ने म्हटले, "माझ्या बॉयफ्रेंडने मला त्याचा कार्यालयात नौकरी शोधून दिलेली आहे. पुढील आयुष्याचे म्हटले तर मी आता प्रतीक्षा करती आहे. परंतु माझा पक्का निर्णय आहे की मी त्याचा संगे आपला संसार थाटणार." सावली आणि शीना आता ही त्या चौकात उभ्या राहून बोलत होत्या तेव्हा एक गाड़ी त्या दिशेने येऊ लागली. त्या गाडीला बघून सावली म्हणाली, “एक गाड़ी येत आहे तर सावधान रहा कारण की त्यात सभ्य पुरुष असेल तर बरे आहे आणि जर नसेल तर आपल्यासाठी एक संकट असे समझ.” तेवढ्यात ती गाड़ी त्यांचा जवळ येउन उभी राहिली आणि मग त्या गाड़ीतुन एक व्यक्ति बाहेर नीघाला. तो व्यक्ती सरळ त्या दोघींचा दिशेने आला आणि म्हणाला, “ऐ मुलीनो तुम्ही इतक्या रात्री येथे काय करून राहिल्या आहात.” मग त्या व्यक्तीला दोघीनी ही बघीतले. शीना तर सावलीचा म्हणन्यानुसार त्या व्यक्तीकडे शंकेचा दृष्टीने बघत होती. परन्तु सावलीने थेट म्हटले, “सर आपण यावेळेस इथे." सावलीचा आवाज ऐकल्यावर त्या व्यक्तीने सावलीकडे नीरखुन बघीतले. मग त्यांनी म्हटले, “अरे सावली तू इथे इतक्या रात्री काय करती आहेस." मग त्यांनी शीनाकड़े बघीतले आणि म्हणाले, “ही कोण आहे तुझ्या सोबत या आधी कधी नाही पाहिले हिला." मग सावलीने म्हटले, “सर ही माझी मैत्रीण शीना आम्ही मार्केट मध्ये भेटलो होतो. मग." अशा प्रकारे सावलीने घडलेला प्रकार सावंत साहेबाना सांगीतला. मग सावंत साहेबांनी म्हटले, “सावली तुला तर माहीत आहे की आजची वेळ किती निर्दयी आहे तरीही अशी तू रात्री बेरात्री घराचा बाहेर नीघते. अच्छा चल मी शीनाला सोडून येतो तू आता घरी जा लवकर." मग शीना ने प्रश्न केला, "माफ़ करा सर परंतु मी तुम्हाला ओळखले नाही.” तेव्हा सावलीने म्हटले, "अग शीना हे सावंत साहेब आपल्या परीसरातील जे पोलीस स्टेशन आहे तेथे मुख्य अधीकारी आहेत. सरांचा जवळ मोठी गाड़ी आहे आणि ते तुला सोडून येतील, तू जाऊ शकतेस यांचा बरोबर.”

    मग शीना ने म्हटले, “तर ठीक आहे मी सरांचा सोबत जाते तू सुद्धा आता तुझ्या घरी जा." असे म्हणून ती सावंत साहेबांचा गाडीत जाऊन बसली. अचानक मग ती गाडीतून बाहेर आली आणि धावत सावली जवळ गेली. सावलीने तीला विचारले, “आता काय झाले तू अशी का बर गाडीतून बाहेर आलीस.” तेव्हा शीना ने म्हटले, "अग एक महत्वाच काम राहून गेल होत." मग सावलीने म्हटले, “आता कसले तुझे महत्वाचे काम राहून गेले." मग शीना ने म्हटले, “अग आपण भेटलो, इतक्या छान छान गप्पा केल्या. परंतु आपण दोघीनी एकमेकांचे फोन नंबर तर घेतलेच नाहीत. यानंतर आपल्याला जर भेटायचे असेल किंवा बोलायचे असेल तर आपण दोघी एकमेकांशी संपर्क कसा करायचा." आता मात्र सावलीला सुद्धा वाटले की ती बरोबर बोलती आहे. मग सावलीने आपला नंबर तीला दिला आणि तीचा नंबर हा आपल्या फोन मध्ये सेव करून घेतला. आता मात्र त्या दोघीही एकमेकांचा नीरोप घेउन आपापल्या मार्गाने घरी जाण्यासाठी नीघाल्या होत्या. सावली आता घरी येउन पोहोचली होती. तीने आपल्या फ्लैटचे दार उघडले आणि ती आत गेली मग तीने दार आतून लावून दिले. आता ती शीनाचा बद्दल वीचार करत होती. तेव्हाच सावलीला आठवले की तीचा सहाव्या इंद्री ने काही संकेत दिले होते. तीने तर त्यांचाकड़े दुर्लक्षच केले होते. मग सावलीला जाणवले की तीला ते संकेत आता सुद्धा जाणवत होते. सावली आता विचार करू लागली की, “कशाबद्दल असावेत हे संकेत, माझी सहावी इंद्री मला संकेत करेल आणि काही अनीष्ट घडणार नाही असे होऊ शकत नाही. परंतु काय अनीष्ट घडणार आहे की घडणार होते." मग सावलीने नेहमीप्रमाणे आता पर्यंत घडलेल्या प्रकाराची उलट पळताळणी केली. तीने घरातून गेल्यापासून तर आता घरी पोहोचण्यापर्यंत प्रत्येक क्षणात काय काय आणि कसे घडले त्याबद्दल विचार केला.

  त्यात तीला फक्त एक क्षण असा आढ़ळला की शीना जेव्हा तीला भेटली तेव्हा तीला शीनावर संशय होऊन ती सावलीला प्रथम तीची शत्रु म्हणून भासली होती. परन्तु त्यानंतर जवळजवळ दोन तास ती सावली बरोबर राहिली तेव्हा ती सावलीला एखाद्या मैत्रीणी सारखी भासली. सावली आपल्या आतापर्यंतचा आयुष्यात पहिल्यांन्दा कुणाचा इतक्या जवळ इतक्या कमी वेळेत गेलेली होती. आता मात्र सावलीची सहावी इंद्री ही आणखीच जोराने संकेत देऊ लागली होती. ती जसजसे शीनाचे नाव घेत होती तसतसे सावलीची सहावी इंद्री आणखी जोमाने संकेत देत होती. त्यामुळे सावली आता चकारावुन गेलेली होती. इकडे सावली शीनाला शत्रु मानु शकत नव्हती आणि तीकडे ती तीचा सहाव्या इंद्रीचा संकेताकड़े दुर्लक्ष सुद्धा करू शकत नव्हती. सावली आज कार्यालयात काम करून आलेली होती आणि आता वीनाकारणची ती रात्रीचा एक वाजेपर्यंत जागे होती. म्हणून तीला कशी काय झोप लागली तीला कळलेच नाही आणि ती सहजच झोपुन गेली. ती उठली ती एकदम सकाळी जेव्हा तीचा घडीचा गजर हा मोठ्याने वाजू लागला. सावली झोपेतून उठली आणि बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली. मग तीने चहापानी केले आणि आंघोळ करून ती कार्यालयात जाण्यासाठी नीघाली होती. तेवढ्यात एक दूधवाला तीचा समोर आला तीने त्याचाकडे बघीतले आणि तरीही ती आपल्या मार्गी लागली होती. मग त्या दूध वाल्याने तीला आवाज दिला आणि म्हटले, “बाईसाहेब दूध घेउन घ्या." मग सावलीने म्हटले, “दूध कसले दूध, मी कधी तुमचाकडून दूध घेतले आहे.” मग त्याने म्हटले, "तुम्ही ज्या दूधवाल्याकडून दूध घेता त्यांनी मला पाठवले आहे." मग सावलीने त्याचाकडे नीरखुन पाहिले तर त्याचा चेहरा थोड़ासा बघीतल्या सारखा तीला वाटला. मग तीने म्हटले, "तुला कुठेतरी पाहिले आहे मी." तेव्हा त्याने म्हटले, "बघीतले असेल बाईसाहेब मी पुष्कळ ठिकाणी दूध वाटतो तर कुठे बघीतले असेल. मला उशीर होतो आहे जरा लवकर दूध घ्या." मग सावलीने दार उघडून दूध घेतले आणि तो गंज ओट्यावर ठेउन ती कामावर नीघून गेली.

   शेष पुढील भागात....... ३६