अध्याय १०
--------------
नवीन युग
-------------
अवंतिका जोशी यांच्या नियंत्रणाखालील ॲक्सलरेटर मॉड्युल सूर्याच्या गाभ्याकडे प्रचंड वेगाने झेपावत होते. अवंतिका एकटीच त्या लहान कॉकपिटमध्ये होती. सूर्याची प्रखर उष्णता आणि मृत्यूची भीती तिला स्पर्श करत होती, पण तिचे मन शांत होते—मानवतेला वाचवण्यासाठी हे अंतिम बलिदान आवश्यक होते.
दुसरीकडे, अवकाशाच्या गोठवणाऱ्या अंधारात ए.के. आणि इरा यांनी राजच्या शरीरातील जखमा बायोपॉलिमरने सील केल्या होत्या.
"इरा, उशीर झाला आहे! त्याची अंतर्गत प्रणाली निकामी झाली आहे!" ए.के. ओरडला.
"नाही!" इराने जिद्दीने तिच्याकडील स्टेम फ्लुइडचा शेवटचा नमुना राजच्या छातीवर ओतला. "राजच्या शरीरातील 'शुद्धीकरण कोड' नष्ट झाला आहे, पण स्टेम फ्लुइडची मूळ जीवन ऊर्जा अजूनही शिल्लक आहे. मला त्याला पुन्हा प्रोग्राम करायचे आहे!"
इरा आणि ए.के. च्या प्रयत्नांमुळे राजच्या शरीराभोवतीचा निळा प्रकाश मंद झाला. तो आता पुन्हा मानवी दिसू लागला होता, पण तो अद्याप बेशुद्ध होता.
त्याच वेळी कॉपोरेशनच्या अध्यक्षांचा संदेश अवंतिकाच्या कॉकपिटमध्ये घुमला. "डॉ. जोशी, तुमचे बलिदान व्यर्थ आहे! मल्होत्राने ट्रान्सफर केलेला कोड आधीच पृथ्वीवर पोहोचला आहे!"
अवंतिकाने विचारले, "तो कोड कुठे आहे? तुम्ही त्याला नियंत्रित करू शकलात का?"
अध्यक्ष उपहासाने हसले, "नियंत्रण? हा कोड नियंत्रणपलिकडचा आहे. मल्होत्राने तो थेट पृथ्वीच्या सर्वांत मोठ्या जल-स्त्रोतात (Largest Water Reservoir) ट्रान्सफर केला आहे! तो आता बायो-ऊर्जेचा अदृश्य भाग बनला आहे. तो शांत आहे, पण पसरत आहे!"
अवंतिकाला धक्का बसला. मल्होत्राने पृथ्वीवर आधीच एक 'टाइम-बॉम्ब' लावला होता.
"त्याने बायोपॉलिमरने वेढलेला कोड पृथ्वीवर पाठवला आहे. तो निष्क्रीय वाटतोय, पण तो शांतपणे प्रसार करत आहे. डॉ. जोशी तुमच्याकडे एकच मार्ग आहे. क्षेपणास्त्र जहाज सूर्यावर नष्ट करा. यामुळे पृथ्वीवरचा कोड सक्रिय होण्यास विलंब होईल."
अवंतिकाचे जहाज आता सूर्याच्या वातावरणात प्रवेश करत होते. प्रचंड उष्णतेमुळे जहाजाचा बायोपॉलिमर धातू वितळू लागला.
"वेळ संपली आहे." अवंतिकाने स्वतःशीच पुटपुटले.
तिने टार्गेटिंग सिस्टीम पूर्णपणे लॉक केली. क्षेपणास्त्राला सूर्याच्या गाभ्यात धडक मारण्यासाठी फक्त काही सेकंद बाकी होते.
१०... ९... ८... अचानक
इराचा संदेश आला.
"डॉक्टर जोशी! थांबा! मी राजला वाचवले आहे! त्याला एक 'दृष्टी' (Vision) मिळाली आहे! त्या सिग्नलचा खरा अर्थ समजला आहे!"
"तो काय आहे, इरा? लवकर सांग...." अवंतिकाने पटकन विचारले.
७... ६...
"तो सिग्नल.... गणिती शुद्धीकरण नव्हता! ती एक 'निवड' (Choice) होती! आर्किटेक्ट्सना अपूर्णता नाही, तर 'नैतिक क्षमता' (Moral Capacity) तपासायची होती! कोण सत्ता मिळवतो आणि कोण बलिदान देतो, हे त्यांना पाहायचे होते!"
५... ४...
अवंतिकाने टायमर रद्द करण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता.
३... २... १...
धडाम!
अवंतिकाचे जहाज आणि राजने फेकलेला तो कोडेड गाभा सूर्याच्या गाभ्यात आदळले.
अवकाशात एक प्रचंड मोठा स्फोट झाला, डोळे दिपावणाऱ्या प्रकाशात स्टेम फ्लुइडचा कोड वाफेच्या स्वरूपात नष्ट झाला. 'परपूर्णता इंजिन'चा मूळ गाभा कायमचा संपला.
अवंतिकाचे कॉकपिट संरक्षणात्मक क्रायो-फोममध्ये बंद झाले, ज्यामुळे तिला प्रचंड उष्णतेपासून तात्पुरते संरक्षण मिळाले . तिचा कॉकपीटचा भाग जहाजापासून सुटे होऊन अवकाशात फेकले गेले.
काही तासांनंतर, इरा आणि ए.के. ने अवंतिकाचे कॉकपिट शोधून काढले. अवंतिका जिवंत होती, पण गंभीर जखमी आणि बेशुद्ध होती.
राज शांत, पण जिवंत होता. त्याच्या शरीरातून स्टेम फ्लूइड ची ऊर्जा गेली होती. पण त्याच्या डोक्यातील नवीन दृष्टी अजूनही होती.
त्यांनी कॉपोरेशनच्या गुप्त चॅनेलचा वापर करून पृथ्वीवर माघार घेतली.
पृथ्वीवर पोहोचल्यावर कॉपोरेशनने त्यांना बंदी बनवून एका गुप्त लॅबमध्ये ठेवले आणि मल्होत्राला 'वेडा वैज्ञानिक' घोषित करून स्वतःचा बचाव केला.
पण अध्यक्षांचे शब्द सत्य होते—स्टेम फ्लुइडचा कोड पृथ्वीवर पसरला होता.
मात्र, त्याचा परिणाम विनाशकारी नव्हता.
पृथ्वीवर कोणतेही स्फोट झाले नाहीत, पण सूक्ष्म जैविक स्तरावर बदल सुरू झाले:
* रोगमुक्ती: असाध्य रोगांची गती कमी होऊ लागली. मानवी पेशींमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची (Self-repair) क्षमता निर्माण झाली.
* नैतिक बदल: लोक अधिक तार्किक आणि शांतपणे निर्णय घेऊ लागले. 'शुद्धीकरण' भावनेच्या स्तरावर नाही, तर तर्काच्या स्तरावर झाले होते.
* नवीन पिढी: पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या नवीन पिढीमध्ये असामान्य बुद्धिमत्ता दिसू लागली. ही मुले नैसर्गिकरीत्या कोडेड सिग्नल समजू शकत होती.
क्रायोजेनिकस स्लीपमध्ये अवंतिका बेशुद्ध पडली होती, कारण तिचे शरीर सूर्याच्या उष्णतेने गंभीरपणे भाजले होते.
राज तिच्या क्रायोजेनिकस स्लीपसमोर उभा होता. त्याचे डोळे आता मानवी होते, पण त्यात एक गाढ ज्ञान होते.
त्याने ए.के. ला सांगितले, "अवंतिकाला माझा निरोप दे—चाचणी संपलेली नाही, ती तर आता सुरू झाली आहे."
"याचा अर्थ काय राज?" ए.के. ने विचारले.
"आर्किटेक्ट्सना 'परफेक्ट मशीन्स' नको होत्या," राज शांतपणे म्हणाला. "त्यांना एक 'नैतिक वारसदार' हवा होता. अवंतिकाने बलिदान निवडले आणि मल्होत्राने लोभ. कोडने हे सर्व पाहिले. आता आम्ही अपूर्ण राहिलो नाही. आम्हीच या कोडचे वाहक आहोत. आम्हीच 'नवीन आर्किटेक्ट्स' आहोत."
काही दिवसांनी
अवंतिकाच्या जखमा विलक्षण वेगाने बऱ्या झाल्या. तिला जाग आली होती. तिने खिडकीतून बाहेर पाहिले. 'ए.के.' ने तिला सांगीतले की स्टेम फ्लुइडचा कोड आता पृथ्वीवर पसरला आहे, पण त्याचे परीणाम सकारात्मक आणि शांत आहेत.
राज तिथेच उभा होता.
तिने राजकडे पाहिले. "राज, आता काय?"
"राज आता केवळ एक माणूस नव्हता. तो पदार्थ (Matter) आणि ऊर्जा यांच्यामधील दुवा होता. त्याने जेव्हा अवंतिकाचा हात धरला, तेव्हा तिला तो थंड धातू जाणवला नाही, तर एक जिवंत उबदारपणा जाणवला. राजने ठरवले होते—तो या शक्तीचा वापर पृथ्वीला नियंत्रणात ठेवण्यासाठी नाही, तर तिला स्वावलंबी करण्यासाठी करेल. मानवतेची चाचणी संपली नव्हती, तर एका नवीन स्तरावर सुरू झाली होती. Pi(π) चा सिग्नल आता शांत झाला होता, कारण आता पृथ्वी स्वतःचा नवा अध्याय लिहित होती."
राज पूर्ण विश्वासाने सांगू लागला, "अवंतिका, आर्किटेक्ट्सनी हा सिग्नल Pi(π) का ठेवला? कारण Pi(π) हा 'इरेशनल' आहे. मानवी भावनाही तशाच आहेत. तर्क (Logic) 1 किंवा 0 असतो, पण मानव हा 3.14... सारखा आहे—अपूर्ण पण अनंत. ज्या दिवशी आपण परिपूर्ण होऊ, त्या दिवशी आपण यंत्र बनू. आपली अपूर्णताच आपल्याला वाचवते."
आणि त्याने खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले.
पृथ्वीच्या आकाशात अचानक एक निळे अदृश्य, त्रिमीतीय आकृती हळूहळू तयार होत होती. ती एका विशाल, चमकदार Pi(π) (पाय) चिन्हासारखी दिसत होती. त्यातून प्रकाशाचा एक प्रचंड झोत अंतराळाच्या काळोखात फेकला गेला. तो झोत विखुरला नाही, तर त्याने गणितातील Pi(π) या चिन्हाची भव्य आकृती विश्वाच्या नकाशावर रेखाटली. तो मानवतेचा संदेश होता—आम्ही वारसदार आहोत, आम्ही नवीन आर्किटेक्ट्स आहोत!"
त्या चिन्हातून एक नवीन, शक्तिशाली सिग्नल अवकाशात प्रसारित होऊ लागला.
आर्किटेक्ट्सची प्रतीक्षा संपली होती. आता पृथ्वीवरच्या या नवीन पिढीने (अवंतिका, राज आणि ए.के. ) विश्वाला स्वतःचा संदेश पाठवायला सुरुवात केली होती.
हा नवीन संदेश विश्वातील इतर कोपऱ्यांत असलेल्या शक्तींना काय सांगत असेल? मानवतेचा हा नवा प्रवास आता सुरू झाला होता.
"मल्होत्रा आणि राज यांचा तो अंधारातील संघर्ष अंतिम होता की नाही, हे कोणालाच उमगले नाही. काहींच्या मते, राजच्या हातातील अमानवी ऊर्जेने मल्होत्राचा अहंकार आणि शरीर दोन्ही राख केले. तर काहींना वाटते की, शुद्धीकरणाच्या त्या प्रक्रियेत मल्होत्राच्या मनातील 'लोभ' जळून खाक झाला आणि तो स्वतःच्याच चुकांच्या अंधारात कायमचा हरवून गेला. मल्होत्राचा मृत्यू झाला की त्याचे परिवर्तन झाले? याचे उत्तर 'मंथन' ग्रहाच्या त्या शांत झालेल्या ढिगाऱ्याखाली कायमचे दबले गेले."
समाप्त.