खूप कठीण होत जातंय आयुष्य… आस वाटतं की आयुष्यच संपवावं, जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, आपले निर्णय चुकतात, कुठल्या तरी वेगळ्या रस्त्याला आपला मन वळत राहतो…. खूप जड होत जातं मन, कुठे तरी मन रडत राहतं, वेदना होतात 🥺🥺….
आपल्याला माहीत नसतं, जो रस्ता आपण निवडला आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे, आपण फक्त चालत राहतो… पुढे, पुढे खूप जवळ जातो, भावनांच्या, काहीच कळत नसतं, अटॅचमेंट होत जातं… काहीच कळत नाही, आपण काय करतोय… अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा काय करावं, काहीच कळत नाही, तेव्हा आपला मन आपल्याला सांगतो की, निर्णय जेव्हा घेशील, तेव्हा खूप विचार करून घे, घाई करू नकोस, वेळ घे, स्वतःसाठी विचार कर, ओळख नीट, लगेच दुसऱ्यांच्या भावनां सोबत व्हायचं नाही… कारण आयुष्याचे निर्णय एकदाच घेतो आणि त्यात गुंतलो की तेच आपलं आयुष्य होऊन जातं…….
आपण आपल्या आयुष्याला चांगल्या दृष्टीने बघायला हवे, कारण आपण कितीही खचलो तरी आपण धीर सोडायचा नाही. आपण त्यातून मार्ग काढायचा आणि सकारात्मक विचार करायचा की काहीतरी चांगले होणार. मन शांत ठेवून विचार करायचे, कारण हे आयुष्य आहे, नेहमी चांगल्या गोष्टी घडत राहणार असं नसतं, कधी कधी वाईट गोष्टी पण घडत राहणार. आणि जसं आपण चांगल्या गोष्टी घडल्यावर आनंदी राहतो, तसाच वाईट गोष्टी घडली की आनंदी राहून मार्ग काढायचा. घाबरायचं नाही आपण, त्या संकटांवर मात केली पाहिजे, कारण आपण घाबरलो, पळालो तर संकट आपल्या मागेच राहणार, ते आपल्याला सोडून जाणार नाही. म्हणून आपण त्यांना घाबरायचं नाही, आपण त्यांच्याशी लडाय्यच.
आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात असते, फक्त आपला विश्वास असायला हवा. जीवनात उगवणारे सूर्य आपल्याला नवचैतन्य देत असतात, तसेच अस्ताला जाणारे सूर्य आपल्याला शांतता आणि समाधान देत असतात. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते, फक्त आपले मन शांत ठेवून त्यांच्याकडून शिकण्याची तयारी असायला हवी. 💫
जीवन म्हणजे एक अनंत सफर आहे, ज्यात आपल्याला अनेक अनुभव मिळतात. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असते, कारण जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य आणि विश्वास असायला हवा. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते, आणि जीवन म्हणजे एक सुंदर चित्र आहे, ज्यात आपल्याला अनेक रंग भरायचे असतात. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद आपल्यात असते, कारण जीवनात काहीही कायमस्वरूपी नसतं, वाईट गोष्टी पण बदलत असतात. जीवन म्हणजे एक अनमोल उपहार आहे, ज्याचा आनंद घ्यायला हवा, आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि विश्वास असायला हवा.
काही लोकांना असं वाटतं की आयुष्यात काही विचित्र घडलं की तिकडेच आयुष्य संपलं, पण असं नसतं. आयुष्य खूप मोठं आहे, ते जागत राहायला हवं, कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते खूप मोलाचं आहे.आयुष्यात, बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टी करू शकता, म्हणून सकारात्मक रहा. हसत रहा, नेहमी सकारात्मक विचार करा आणि पुढे कसा जाता येईल ह्याचा विचार करा. आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार करायचे आणि मागे हटायचे नाही, लढून पुढे जायचे. कारण आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगायची कारणे बदलतात. सर्वच प्रश्न सुटत नाहीत, पण काही प्रश्न सोडले की ते बरोबर सुटतात.
स्वतःसाठी आयुष्य जगता आले पाहिजे कारण आयुष्य हा आपला आहे आणि तो क्षण खूप महत्वाचा असतो आणि ते ओळखता आले पाहिजे. तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित तुमचे वाटणे जगाची आवड बनेल. ह्यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात.
शिकवण:-आजचा निर्णय उद्याचं भविष्य बदलू शकतो.