Devi - 1 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | देवी (कादंबरी) भाग 1

Featured Books
  • अधुरी डायरी

    अधूरी डायरी: हमेशा का वादाभाग 1: पहली मुलाकातदिल्ली की उस पु...

  • ઓધવ રામ બાપા નો ઇતીહાશ

    ઓધવ રામ બાપા ગુજરાતના પ્રખ્યાત સંત અને આધ્યાત્મિક વ્યક્તિત્વ...

  • अन्तर्निहित - 28

    [28]“तो अब आप पदयात्रा पर जाना चाहते हो श्रीमान शैल?” अधिकार...

  • NIKOLA TESLA

    निकोला टेस्ला की जवानी – एक सपने देखने वाले की कहानीयूरोप के...

  • The Book of the Secrets of Enoch.... - 8

    अध्याय 40, XL1 और अब, हे मेरे बच्चों, मैं सब कुछ जानता हूं,...

Categories
Share

देवी (कादंबरी) भाग 1

देवी या पुस्तकाविषयी          देवी....... अर्थात ती देवी नाही की जी चमत्कार करते. ती देवी नाही की जी शस्र बाळगते. देवी आपण तिलाच म्हणतो की जी देवी परीवर्तन करते माणसाच्या जीवनात. कोणती देवी शस्रानं परीवर्तन करते तर कोणती देवी चमत्कारानं परीवर्तन करीत असते.          देवी ही माझी इतर साहित्यासारखी महत्वपुर्ण पुस्तक. सम्राट अशोकांचं नाव आपण ऐकलं असेलच. ज्यांचा इतिहास आज बर्‍याच प्रमाणात प्रसिद्ध आहे. म्हटलं जातं की सम्राट अशोकांच्या जीवनात कलिंग युद्धानं परीवर्तन झालं. परंतु कोणत्याही स्वरुपाचं परीवर्तन व्हायला काही आधारबिंदू लागतो. त्यात तसा आधार द्यायला कधी कोणी मित्र मिळतात की जे चांगले विचार सांगतात. त्यांच्या चांगल्या मार्गदर्शनानं आपल्यात बदल होत असतो.          विवाह........ म्हणतात की अमूक अमूक व्यक्ती विवाहापुर्वी चांगला होता. तो विवाहानंतर संपुर्ण बदलला. असं का होतं? त्याचं कारण असतं. त्यांच्या जीवनात विवाहानंतर आलेली त्यांची पत्नी. तीच बदल करीत असते. कसं वागावं? कसं नाही? हे तीच ठरवत असते. ती  प्रत्यक्ष देवीच असते, आपल्या जीवनात आलेली. तसं पाहिल्यास विवाहानंतर पती पत्नीचं जीवन बदलतं. परंतु हा बदल काही एका क्षणात होत नाही. लावली जीभ टाळूला व बदल झाला. असं कधीच घडत नाही. तो बदल प्रत्येक माणसांच्या जीवनात हळूहळू होतो. तसं पाहिल्यास महिला सांगत असतात की माझ्यात अमूक अमूक बदल माझ्या पतीनं केला. परंतु पुरुष कधीच सांगत नाही की माझ्यात झालेला बदल हा माझ्या पत्नीनं केला. कारण तसं सांगणं म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो. वाटतं की मी पुरुष आणि तेवढाच सक्षम. मी लोकांसमोर कसा काय कमीपणा घेवू?          सम्राट अशोकाबद्दल सांगायचं झाल्यास म्हणतात की  सम्राट अशोक हे आधी क्रूर स्वरुपाचे राजे होते. परंतु कलिंग युद्धानंतर त्यांच्यात बदल झाला. परंतु जसा कोणताच  बदल हा एकाएकी होत नाही. तसंच झालं सम्राट अशोकांच्या जीवनातही. मात्र तो बदल कोणी केला. हा एक संशोधनाचा विषय आहे. तोच धागा पकडून मी लिहायचं ठरवलं व कल्पना केली की सम्राट अशोकांच्या जीवनातील परीवर्तन हे केवळ कलिंग युद्धामूळं झालेलं नाही. त्यांच्यात बदल व्हायला काहीतरी माध्यम अवश्य लाभलं असेल. शेवटी तसा विचार करीत असतांना मला गवसली, त्यांच्या जीवनात आलेली व बौद्ध विचार असलेल्या त्यांच्या जीवनातील देवी. मग धागा सापडला व सूर गवसला. त्यानंतर मी कथानक तयार केलं. त्यातच काही काल्पनिक तर काही वास्तविक गोष्टीची यात भर टाकली व ही पुस्तक तयार केली. आता ती देवी कोणती? हे पाहण्यासाठी पुस्तक वाचावं लागेल आणि त्या देवीनं कसा बदल केला? हे माहीत करुन घ्यावं लागेल. त्याशिवाय आपल्याला त्या देवीची महती माहीत होणार नाही.         ही पुस्तक थोडीफार काल्पनीक जरी असली तरी फारच वाचनीय झालेली आहे. पुढं काय घडतं, याची उत्कंठा लागून राहते. आपल्याला जो सम्राट अशोकांचा इतिहास माहीत नसेल, तो इतिहास माहीत होतो आणि आपण जर भारतात राहात असेल तर आपल्याला आपला भारतीय शासक अशोकांचा माहीत नसलेला इतिहास माहीतच असायला हवा. जे चक्रवर्ती सम्राट होते.           या पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या पुस्तकाच्या रुपानं माझ्या एकशे पंधरा पुस्तका झालेल्या असून प्रत्येक पुस्तक या गुगलवर उघडतात. त्यासाठी ही पुस्तक विकत घेण्याची गरज नाही. मी माझ्या पुस्तकाबाबत माझी स्तुती करीत नाही. परंतु एक वैशिष्ट्य सांगू इच्छितो की माझ्या पुस्तकाबाबतीत अनेक प्रसंग माझ्या जीवनात घडले. एक प्रसंग म्हणजे कोरोनात औरंगाबादवरुन आलेला एका व्यक्तीचा फोन. ज्यानं म्हटलं होतं की तुमचं लेखन वाचून माझा कोरोना सुधरलाय. दुसरा प्रसंग पुण्यावरुन आलेला एका व्यक्तीचा फोन की ज्यानं म्हटलं होतं, साहेब, मी खुनातील आरोपी. तुरुंगात होतो. आपल्या ई साहित्य रुपातील पुस्तका तुरुंगात उपलब्ध झाल्यानं मी त्या वाचल्या. त्यात बरेच बोध आहेत. ते वाचून मी सुधारलो. त्यातच माझी शिक्षाही कमी झाली. कालच सुटलो व ज्यांनी बदल केलाय माझ्या जीवनात. अशा व्यक्तीला आज फोन लावला. तुमची पुस्तके खरंच छान आहेत. तसा तिसरा प्रसंग. एकदा पुण्याला एक भगिनी भेटली. त्या भगिनीनं नाव विचारलं. मी त्यांना माझं नाव सांगीतलं. तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नव्हता. चर्चा झाली. मग मी त्यांना माझी पुस्तक दाखवताच विश्वास बसला. ते हेच लेखक आहेत की ज्यांची आपण पुस्तकं वाचतो. त्यानंतर त्यांनी आपल्या बहिणीला फोन करुन माझ्याबद्दल सांगीतलं की त्या, त्या लेखकाला भेटलेल्या आहेत की ज्या लेखकाची पुस्तकं आपण गुगलवर डाऊनलोड करुन वाचतोय. तेव्हा ती म्हणाली की खरंच तू नशीबवान आहेस की तुला त्या लेखकाच्या भेटण्याचा योग आलाय आणि मी अभागी की मी त्यांचं साहित्य वाचतेय. परंतु भेटू शकत नाही.         महत्वाचं म्हणजे माझं साहित्य हे चांगलं आहे की नाही. हे मला माहीत नाही. तसं पाहिल्यास माझ्या पुस्तका कागदस्वरुपात जास्त करुन उपलब्ध नाहीत व मी तसा गाजावाजाही करीत नाही व मला ते आवडतही नाही. ना मला पुरस्कार आहेत. ना माझ्या साहित्यकृतीला पुरस्कार आहेत. ना मी पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, ना मी पुस्तक विक्री रुपानं बोलत आहे. परंतु वाचकवर्ग चांगला आहे की ज्यामुळं मी विधात्यांचे आभार मानतो.          शेवटी मी विनंती करेल. विनंतीमध्ये काही मी आपल्याला पुरस्कार मागत नाही. इतर लेखकांसारखं पुस्तक घ्या देखील म्हणत नाही. तशी माझी पुस्तकं घ्यायचीही गरज नाही. फक्त पुस्तक वाचा म्हणतो. माझी पुस्तक लिहून झाली की ती मी गुगलवर टाकतो. तिथं आपण निःशुल्क डाऊनलोड करु शकता, माझं इंग्रजी मराठीत नाव टाकून वा पुस्तकाचं नाव टाकून. जी पुस्तक पाहिजे असेल, ती उघडतात. ती वाचा आणि वाचून झाली की मला एक फक्त फोन करा. कारण आपला एक फोन मला आणखी लेखन करायला प्रेरणा देत असतं.         विशेष म्हणजे ही माझी पुस्तक वास्तविकतेवर आधारलेली असली तरी यात काल्पनीकता भरपूर आहे की ज्यातून आपल्या मनाची चलबिचल होते. तशी कोणीही आपली चलबिचल करुन घेवू नका म्हणजे झालं.         आपला नम्र         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०देवी (कादंबरी)                 अंकुश शिंगाडे           *********************१*****************           ती लहानाची मोठी होत होती. तिला चिडचिडपणा आवडत नव्हता. त्याचं कारण काय होतं ते तिलाही माहीत नव्हतं. रक्तपात तर तिला अजिबात आवडत नव्हता.          ते तिचं बालपण थाटामाटात जात होतं. तसं पाहिल्यास तिचा जन्मच मुळात राजाघरी झालेला नव्हता. परंतु लहानपणापासूनच ती अहिंसा तत्वानं जगत होती.          तिचं वय लहान होतं. तेव्हापासूनच तिच्यावर संस्कार होत होते. अनेक मंडळी तिच्या घरी येत असत व तिच्या आईवडीलांशी भेटून जात असत. त्यात चर्चाही व्हायच्या व चर्चेत विषय निघायचे. जे विषय तिही नित्यनेमानं ऐकत असे. त्यातच तिच्यावर बदल होत गेला. तिचं तिच्या आईवडीलांच्या घरी नाव होतं, राणी. ती सम्राट अशोकाच्या घरी आल्यावर तिचं नाव देवी ठेवण्यात आलं होतं. देवी विदिशा राज्याची रहिवाशी होती.           विदिशा राज्य....... वाल्मीकी रामायणात विदिशा प्रांताचा उल्लेख मिळतो. शत्रुघ्नाचा मुलगा शत्रुघाती हा विदिशाचा पुरातन काळात राजा होता. त्याला विदिशा प्रांत दिल्या गेला होता.          विदिशाचं पुर्वीचं नाव विश्वानगर. कधी त्या प्रांताला बैसनगरही म्हटलं जात होतं. वैदिक धर्मात म्हटलं जातं  की रावणाच्या वडीलांच्या नावावरुन विश्वानगर हे नाव पडलं. रावणाच्या वडीलांचं नाव केशरवा होतं. पुढं याचा अपभ्रंश होवून विदिशा नाव प्रचलीत झालं. ज्याचे पुरावे विदिशा शहरापासून चाळीस किमी अंतरावर गाव असलेल्या गावात मिळतात. ज्या गावात रावणाचीच पुजा होते व रावणालाच तिथं मनातून मानलं जातं.          जैन धर्मानुसार जैन धर्मीय राजा रुकमान्दघाह याने अप्सरांसाठी आपली पत्नी विस्वाचा त्याग केल्यानंतर लोकांनी विस्वाबद्दल सहानुभूती बाळगली व तिच्याच नावावरुन विश्वानगर हे नाव पडलं. पुढं त्याचा अपभ्रंश होवून विदिशा हे नाव प्रचलीत झालं. ब्रमपुराणात या विदिशा नगरीचं वर्णन वेगळ्याच स्वरुपात मिळतं. त्या पुराणानुसार या ठिकाणाचं नाव भद्रावती असून इथे यवनांचं राज्य होतं व याच यवनांनी युधीष्ठीराला अश्वमेघ यज्ञासाठी घोडा दान दिला होता असे म्हटले जाते.           ते विदिशा राज्य व त्या राज्यात एका साहूकाराच्या घरी राहणारी देवी नावाची त्यांची मुलगी. ती आज तरुण झाली होती व त्यातच सम्राट अशोकही तरुण झाले होतेच. ते वीस वर्षाचे झाले होते.           राजा बिंदूसारला असलेली धर्मा राणी. तशा त्यांना अनेक राण्या होत्या की ज्या राण्यांपासून त्यांना एकशे एक मुले झाली होती. जी मुलं सम्राट अशोकाचा द्वेष करीत होती. त्याचं कारण होतं त्यांची शुरता. लहानपणापासूनच सम्राट अशोक हे शूर होते व राज्यात कलह अर्थात विद्रोह झालाच तर त्यावर मात करुन तो कसा मोडायचा. याचं तंत्र त्यांना गवसलं होतं.           राजा बिंदूसारला असलेली एकशे एक मुलं. त्यातील तीन मुलं अतिशय शूरवीर होती. त्यात मोठा असलेला सुशीम. त्याचेवर सम्राट बिंदूसारचं अतिशय प्रेम होतं. त्यातच बिंदूसारनं सुशीमला तक्षशिलेचा सुभेदार बनवलं होतं. परंतु तो विलासी स्वभावाचा असल्यानं तिथं असलेल्या लोकांना त्याचं सुभेदार पद रुचलं नाही व त्यांनी बंड केलं. तेव्हा राजा बिंदूसारनं लोकांनी केलेला विद्रोह मोडण्यासाठी अशोकाला तिथं पाठवलं.           सम्राट अशोक त्यावेळेस लहानच होते. तरीही ते तिथे गेल्यानंतर लोकांनी विद्रोह करणं बंद केलं. त्याचं कारण होतं सम्राट अशोकाची लोकप्रियता. सम्राट अशोकाबद्दल तेथील लोकांनी ऐकलं होतं की ते एक न्यायी राजे आहेत व त्यांचा राज्यकारभार करणं व्यवस्थित आहे.           सम्राट अशोक तक्षशिला इथे राहू लागले. ते प्रजेचे न्यायनिवाडे सोडवू लागले. त्यातच त्यांच्या योग्य न्यायनीतीनं  व सुप्रशासनानं लोकंही त्यांच्याकडे आकृष्ट होवू लागले. तशी त्यांची लोकप्रियता वाढू लागली. ते पाहून सुशीमच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होवू लागला. वाटू लागलं की हे असंच जर सुरु राहिलं तर उद्या आपले तक्षशिलेतील महत्व कमी होईल व सम्राट अशोकांचंच नाव तक्षशिलेत निर्माण होवून त्याचंच वर्चस्व या तक्षशिलेतही निर्माण होईल. तसं पाहिल्यास सुशीम राजा बिंदूसारचा लाडका मुलगा असल्यानं त्यानं परत आपले वडील बिंदूसारकडे सम्राट अशोकाची कुरघोडी केली व आपल्या वडीलांच्या कानाला लागून त्यानं सम्राट अशोकाची रवानगी निर्वासच्या प्रांतात केली. जो प्रांत विचित्र असा प्रांत होता.           निर्वासला झालेली सम्राट अशोकाची रवानगी. परंतु जसा हिरा, हा हिराच असतो. तेच घडलं अशोकाच्या बाबतीत व पुढे उज्जैनला पुन्हा लोकांनी विद्रोह केला. ज्यात परत एकदा राजा बिंदूसारनं सम्राट अशोकाकडे लक्ष केंद्रित केलं. त्यातच त्यांना पाटलीपुत्रला बोलावून घेतलं. ज्यातून राजा बिंदूसार सम्राट अशोकाला घेवून पाटलीपुत्रवरुन उज्जैनला रवाना झाले.           तो पाटलीपुत्र ते उज्जैनचा रस्ता. तो रस्ता काही जवळ नव्हता. त्यातच राजा बिंदूसार मुक्काम करीत करीत उज्जैनला येत होते. अशातच त्यांनी त्याचवेळेस रस्त्यातच पडत असलेल्या विदिशा राज्यात मुक्काम ठोकला. तेही एका धनीक माणसाच्या घरी. जो धनीक त्या भागाचा साहूकार होता. तो श्रीमंत होता व त्याचेकडे बरेचसे राजे अधिवास करीत असत.          तो श्रीमंत साहूकार. त्यांना एक कन्या होती. देवी तिचं नाव होतं व तिही उपवर झाली होतीच. तशी ती उपवर अवस्थेत फारच सुंदर दिसत होती.            सम्राट अशोकही त्यावेळेस वीस वर्षाचे होते व तेही विवाहयोग्य झालेच होते. अशातच त्यांची भेट देवीशी झाली. तशी देवी त्याच्या मनात भरली. मग काय त्यांच्यात प्रेम निर्माण झालं. परंतु ती भेट काही जास्त काळ टिकली नाही. कारण लगेच त्यांना उज्जैनला निघायचे होते.           राजा बिंदसारनं साहुकाराचं आदरातिथ्य स्विकारलं व ते एकच रात्र तिथं थांबून दुसर्‍याच दिवशी तेथून निघाले. त्यानंतर ते उज्जैनला पोहोचले व सम्राट अशोकाला त्यांचे वडील बिंदूसार यांनी त्यांना उज्जैन राज्य सांभाळायला दिलं होतं आणि जेव्हा ते उज्जैनवरुन पाटलीपुत्रला जात होते. तेव्हा त्यांना परत साहुकाराची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यातच ते साहूकारची मुलगी देवीलाही भेटले. जी अनुपम सौंद्याची उपभोक्ती होती. जी शाक्य कुलातील होती. परंतु त्यांनी आपल्या मुलासाठी तिला मागणी घालायचा विचार केला नव्हता. त्यांच्यामते सम्राट अशोकानं एखाद्या राजकुळातील मुलीशी विवाह करावा असं होतं.           सम्राट अशोक उज्जैनला पोहोचताच त्यांनी उज्जैनमध्ये निर्माण झालेला विद्रोह शांत केला. परंतु मनातील विद्रोह. त्याला कसं शांत करावं. तसं पाहिल्यास विदिशाचा साहूकार हा राजा बिंदूसारचा मित्रच होता. त्यातच त्यांना भेटण्यानिमित्यानं व काही राज्यकारभार विषयक सल्ले विचारण्याच्या निमित्यानं सम्राट अशोक साहुकाराकडे जातच राहिले. ते कारण निमित्तमात्र होतं. खरं कारण होतं देवीला भेटणं. तिच्याशी गप्पा मारणं.           ती देवीची तत्कालीन काळात झालेली भेट. ती भेट आज अशोकाला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच त्या भेटीनं त्यांच्या मनात मनाची चलबिचल सुरु झाली होती. नेहमी वाटायचं की तिला भेटायला जावं. त्यातच एक दिवस अगदी वैतागात जात होता त्याचा.            ती सुंदरता त्यांना बेचैन करीत होती. सारखा त्यांना तिचाच चेहरा आठवायचा. वाटायचं की तिच्याशी विवाह करुन मोकळं व्सावं. परंतु कसं होणार. तिची संमती हवी ना.           सम्राट अशोक तिला भेटायला जायचा. मात्र भेटायला मार्गच मिळायचा नाही. तसं पाहिल्यास ते उज्जैनवरुन जेव्हा निघायचे. तेव्हा त्यांच्या मनात विचार असायचाच की आपण तिला भेटायला हवं. परंतु तसा विचार जरी त्याच्या मनात असला तरी तिला कधीकधी भेटणं ही सहज शक्य होणारी गोष्ट नव्हती. तशी तिची एक झलक दिसताच त्यांचं मन आनंदीत व्हायचं व ते परत आपल्या राज्यात यायचे.         सम्राट अशोकात निर्माण झालेलं प्रेम. ते प्रेम पाहण्यासारखं होतं. राज्यकारभाराच्या कामानिमित्त गेलेले अशोक. शेवटी राज्यकारभाराचा सल्ला घेवूनच परत यायचे. तसे ते प्रेमासाठी जायचे. परंतु तिला त्यांचं भेटणं होत नसल्यानं त्यांचा प्रेमाचा बेत तडीस जात नव्हता.            ज्याप्रमाणे सम्राट अशोकाला तिला भेटणं आवडायचं. त्याप्रमाणे देवीलाही त्यांना भेटणं आवडायचं. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत बोलणंही आवडायचं. त्यातच ते घरी आल्यास ती लपूनछपून त्यांना पाहात असायची. हे त्यांनीही हेरलं होतंच. तशी ती त्यांच्या मनात होती. परंतु ते तिच्या मनात आहे काय? हा प्रश्न त्यांना सतावतच असायचा. तसा तो एकदाचा प्रसंग. तो प्रसंग त्यांना आठवत होता.          सम्राट अशोक हे नेहमी काही ना काही कारण सांगून साहूकाराला भेटायला जायचे. उद्देश असायचा तिची झलक पाहाणं. तिची एक झलक दिसली की ते खुश व्हायचे. तसे ते आजही साहूकाराला भेटायला आले होते. परंतु काही कामानिमित्त साहूकार बाहेर गेले होते. फक्त तीच घरी होती आणि तिही एकटीच. अशातच संधी साधून त्यांनी तिला काही प्रश्न विचारले व तिनं उत्तरार्थी त्या प्रश्नांची उत्तरंही दिलीत. त्यावेळेस ती लाजतच त्याच्या समक्ष उत्तरे देवू लागली होती. तोच बोलणं सुरु झालं. अशोक म्हणाले,          "आपलं नाव काय?"          "राणी."          "आपण किती वर्षाच्या आहात?"          "माहीत नाही." तिनं वय लपवत म्हटलं.          "भाऊबहिण किती आहात?"          "एकटीच. एकटीच आहे."          "काय आवडतं?"           "अर्थात?"           "आपल्याला फिरणं वैगेरे आवडतं का?"           "नाही. मी कधीच फिरत नाही व मला तसं फिरणंही आवडत नाही."            तिचं ते उत्तर. तिला वाटत होतं की कदाचीत अशोकानं तिला प्रेमाविषयी विचारावं. विचारावं की तिचं त्यांचेवर प्रेम आहे की नाही. तिला त्यांचेशी विवाह करायचा आहे की नाही. तसं तिही म्हणू शकत होती त्यांना विवाह करण्याबाबत. परंतु ती बोलू शकत नव्हती त्यावर. कारण होतं त्यांचं युवराजपण. ते एका राजाचे पुत्र होते. कदाचीत राग आल्यास आपलीच जीभ छाटली जाईल वा मुंडकं छाटलं जाईल. अशी भीती तिच्या मनात होती. त्यांच्याही मनात तीच भीती होती. वाटत होतं की आपण हिंमत करुन विचारलं तर ही नकार देईल व आपला अपमान करुन आपल्याला हाकलून देईल. त्यानंतर इथं आपल्याला कधीही येता येणार नाही. अशोक तसे सामान्य लोकांसारखे विचार करीत होते.          असाच विचार सुरु होता अशोकांच्या मनात. त्यातच त्यांनी तिला प्रश्न विचारणे सुरु केले होते. शेवटी प्रश्न विचारता विचारता त्यांनी तिला हिंमत करुन ते प्रश्न विचारलेच. जे तिला व त्यांना विचारावेसे वाटत होते. अगदी मनातून त्यांना तशा स्वरुपाच्या प्रश्नांबाबत इच्छा होती.          तो प्रसंग व ती वेळ. ती एक संधीच होती त्यांच्यासाठी चालून आलेली. अशोक पुढे म्हणाले,           "अहो, आपणाला मी एक प्रश्न विचारु का?"          "विचारा."          "राग तर येणार नाही ना आपणाला?"          "नाही येणार."          "अन् आला तरी व्यक्त कराल नको."          "होय तर. आपण प्रश्न करा."          "आपण विवाहयोग्य झालेले दिसता. विवाह करावासा वाटत नाही काय?"           तो त्यांचा प्रश्न. तो प्रश्न ऐकताच ती काही वेळ चूप झाली. तसे सम्राट अशोक म्हणाले,           "काय झालं? आपण असे गप्प का? माझं काही चुकलं का? अन् माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. मी आपणास तसं विचारायला नको होतं राणीसाहेबा."           'राणीसाहेबा' त्यांनी उच्चारलेला शब्द. त्यांनाही बोलतांना आठवलं नाही की आपण तसं बोलू नये. तो शब्द म्हणजे आपली, ती राणी आहे असा त्याचा अर्थ. परंतु तो शब्द तिला उद्देशून होता. तिचं नाव राणी असल्यानं त्यानं तिला 'राणीसाहेबा' हा आदरार्थी शब्द उच्चारला होता.         चूक झाली होती. परंतु ती चूक त्यांना कळली नाही. तिला मात्र कळली. परंतु तिनं त्याचा राग धरला नाही. उलट तो शब्द उच्चारताच तिलाही बरं वाटलं. तशी आपल्याला त्या गोष्टीचा राग आला असं दर्शवून म्हणाली,         "आपण चूक करता आणि क्षमाही मागता."          "चूक....... कोणती चूक झाली माझ्या हातून. ते विचार करीत होते. तसे ते म्हणाले,           "चूक....... चूक, कोणती चूक झाली माझ्या हातून? जरा माझी चूक माझ्या लक्षात आणून द्याल काय? माफी मागायला बरी होईल."           "महाराज, आपण मला राणीसाहेबा म्हटलं."           "त्यात काय झालं? आपण राणीसाहेबच आहात. आपलं नाव राणी आहे ना. मी फक्त त्याला साहेब लावलं. ती काही चूक झाली नाही?"           "महाराज, ती चूकच आहे."           "कशी?"           "महाराज, राणीसाहेबाचा अर्थ एक आपली राणी. कोणतेही महाराज आपल्या राण्यांना राणीसाहेबाच म्हणतात आणि मी काही आपली राणी नाही."           "हो, असा त्याचा अर्थ. माफ करा. मी जाणून बुजून नाही उच्चारला तो शब्द. आपण मला माफ करा."           "त्यात माफी मागण्यासारखं काय आहे. शिवाय आपण महाराज आहात. अन् अनवधानानं झालेली चूक ही काही चूक नसतेच. महाराज, लहान मुल हे आपल्या पायानं वा नकळत अनवधानानं किड्या मुंग्यांना मारतात. ते पाप नसतंच. कारण ते त्यांचं बालवय असतं. त्या काळात त्यांना तेवढं ज्ञान नसतंच. म्हणून ते किड्यामुंग्यांना मारतात त्या काळात. आपल्याही हातून अशीच चूक झालीय. त्यात माफी मागून मला लाजेने भरवू नका."          "अहो, पाप ते पापच. माझ्या हातून जरी किड्या मुंग्या मरत असतील. तरी ते पापच असतं. अगं अनवधानानं एखादा साप रस्त्यावर आडवा आल्यास तेही पापच असतं. अन् मी राज्यकारभार करीत असतांना कधीकधी माणसंही मारावे लागतात. तेही एक पापच असतं. परंतु ते पाप मला माहीत असतांनाही करावं लागतं. कारण राज्याचं रक्षण करणं हे एका राजाचं कर्तव्य आहे. त्यासाठी त्याला असं पाप करावंच लागतं. शेवटी पर्याय उरत नाही. मग एक राजा काय करणार? तो राजा आपल्या कर्तव्यापुढं हतबल होतो. तसा तो माफीही मागू शकत नाही त्यावेळेस. परंतु या प्रकरणात मी आपल्याला माफी मागू शकतो. आपण मला माफ करावं एवढी अपेक्षा करतोय."         "माफ एका अटीनं करणार. आपण या गोष्टीचा राग न मानता नेहमीसारखे इथं येत राहाल तरच मी आपणाला माफ करायला तयार आहे."           "ठीक आहे. मी नेहमीसारखा इथं येतच राहणार. आता तर झालं."           "ठीक आहे. आता मी आपल्याला माफ केलं नाही. माझी आणखी एक अट आहे?"            "आणखी एक अट? कोणती? ताबडतोब सांगा?"            "मला राणीसाहेबाच म्हणायचं. आवडेल मला."            "होय. परंतु?"            "परंतु काय?"             "आपले पिताश्री असतील तर......"             "तर बोलायचंच कशाला?"            "होय तर."             त्या दिवशी सम्राट अशोक निघून आपल्या अधिवासाच्या ठिकाणी उज्जैनस्थळी आले. ते तिचं प्रेम त्यांना आताही समजलं नव्हतंच. जरी तिनं त्यांना राणीसाहेबा म्हणत जा म्हणून क्लीनचीट दिली होती तरी. राणीसाहेबाच म्हणत जा याचा अर्थ होता की ती त्यांचेवर प्रेम करीत होती.            तो प्रसंग त्यांना आठवत होता व एक दिवस विचार करता करता त्यांना आठवलं तिनं म्हटलेले शब्द. राणीसाहेबाच म्हणत जा मला.             सम्राट अशोक विचार करु लागले. कदाचीत तिचं प्रेम तर नाही आपल्यावर. तसं प्रेम असेल, म्हणूनच तिनं तसं म्हटलं असावं आपल्याला. राणीसाहेबा याचा अर्थ राणी. या सम्राट अशोकाची राणी. कदाचीत तिला माझी राणी तर बनून राहावसं वाटत नसेल.             तो त्यांचा विचार. तोच त्या निर्माण झालेल्या संभ्रमावर विचार करीत असतांना त्यांचे मनात तिला परत  भेटण्याबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. आता ते तिला भेटणार होते व तिला, तिचं त्यांचेवर प्रेम आहे की नाही हे विचारणार होते. मात्र तशी ना संधी त्यांना चालून येत होती ना तसे ते तिला विचारु शकत होते.           असाच तो एक दिवस. जो दिवस सम्राट अशोकाच्या जीवनात उजळला. तसं पाहिल्यास उज्जैन  शहर हे विदिशा शहरापासून काही जास्त दूर नव्हतं. विदिशा शहराला त्यावेळेस विदिशा नाव नव्हतं. त्या शहराला बैसनगर म्हणत असत. शिवाय उज्जैन शहर हे आधीपासूनच महाकाल ज्योतीर्लिंगासाठी प्रसिद्ध होतं. दरवर्षी तिथं नागपंचमीच्या दिवशी यात्रा भरत असे व त्या यात्रेत दूरदूरची मंडळी येत. त्यातच ते ज्योतीर्लिंगाचं दर्शन घेवून चिंतेपासून मदमुक्त होवून निघून जात. आख्यायिका होती की नागपंचमीच्या दिवशी गर्भगृहात नाग निघतो. त्याचं दर्शन होताच संबंध वर्ष अतिशय चांगलं जात असतं. उज्जैन शहरात तसं पाहिल्यास पुरातन काळापासून भरपूर पाहण्यासारखं होतं. त्यातच पुढं नागपंचमी होती.           पुढं नागपंचमी होती. तसा नागपंचमी उत्सवाला बराच वेळ होता. परंतु सम्राट अशोकाला विदिशा कन्या देवीला भेटायचे होते. ते विचार करीत होते. तोच त्यांना आठवला नागपंचमीचा प्रसंग. ज्या प्रसंगातून त्यांना देवीला भेटता येत होतं.           तो नागपंचमीचा प्रसंग. त्या प्रसंगानं देवीला आपल्या राज्यात बोलावता येईल व तिला भेटताही येईल. परंतु भेटायचं कसं व तिला बोलवायचं कसं? सम्राट अशोकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. परंतु क्षणातच त्यांना उत्तरही मिळालं. उत्तर होतं, त्याच्या राज्यातील एक नर्तिका. जी तिला संदेश द्यायला जावू शकत होती. जी देवीला ओळखत होती. जी देवीला आणू शकत होती नव्हे तर जी देवीची मैत्रीण होती.            ती सम्राट अशोकाच्या उज्जयिनी राज्यातील नर्तिका. ती विदिशातील बैसनगरात एकदा आपल्या नर्तिकेच्या कार्यानिमीत्य गेली होती व तिनं मुक्कामही केला होता देवीच्याच घरी. ती तिला ओळखत होतीच. तिचं नाव मल्लिका होतं व ती तिच्याच समवयस्क वयातील होती. पुढं ती तिची दासी म्हणून तिच्याजवळच राहिली.           सम्राट अशोकाला जेव्हा ती गोष्ट माहीत झाली. तेव्हा त्यानं तिला नागपंचमीच्या उत्सवाचं आमंत्रण घेऊन पाठवलं व सोबत एक गुप्त लखोटाही पाठवला. ज्यात आपण तिला भेटण्यासाठी किती आतूर आहोत. हे लिहिलं होतं. आणखी हेही लिहिलं होतं की त्यांच्या मनात तिची भेट झाल्यापासून एक आणखी प्रश्न उद्भवलाय. त्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना शोधायचं आहेच.         ठरल्याप्रमाणे मल्लिका बैसनगरला गेली. तिनं देवीची भेट घेतली व तिच्या हातात गुप्त रुपात असलेला लखोटा देवून म्हटलं की तिला तिच्याकडे खास अशोकानं पाठवलंय. पुढं नागपंचमीचा उत्सव आहे. तिला यायलाच हवं.         तो अशोकानं पाठविलेला लखोटा. तो वाचन करताच तिला त्यातील प्रयोजन कळलं. तो लखोटा वाचताच तिला फारच आनंद झाला. तसं तिला सम्राट अशोकांना भेटण्यासाठी कारणही सापडलं होतं. तो नागपंचमीचा उत्सव व त्यानिमित्य  उज्जयिनी नगरीत होणार असलेला उत्सव.          ते भेटीचं निमंत्रण. त्या दिवसाची देवी आतूरतेनं वाट पाहात होती. तसा तो दिवस उजळला व त्या दिवशी देवी आवर्जून आपल्या वडीलांची परवानगी घेवून उज्जयिनी नगरीत आली. अन् जेव्हा ती उज्जयिनी नगरीत आली. तेव्हा तिनं आवर्जून अशोकाची भेट घेतली. त्यानंतर तिनं भेटीचं कारण विचारलं.          तो एकांत. तसं पाहिल्यास ते उज्जयिनी राज्य होतं व त्या ठिकाणी सम्राट अशोक हे राज्यपाल होते. त्यांचेच नियम व कायदे त्या राज्यात लागू होते. तसे ते आपल्या राज्यात अगदी मनमोकळेपणानं वागू शकत असे. त्यातच तिनं त्यांना भेटीचं कारण विचारताच त्यांनीच एकांत हा शब्द वापरला. तोच सर्व दरबारातील लोकं त्या दोघांना एकांत लाभावा असा विचार करुन दूर झाले. त्यातच त्यांचं बोलणं सुरु झालं. सम्राट अशोक म्हणाले,            "राणीसाहेबा, मला हे कळलं नाही की आपण राणीसाहेबा का म्हणायला लावलं? हाच प्रश्न मला सदोदीत आजपर्यंत सतावत आहे. सतावत राहिला आहे. मला त्याचं उत्तर सापडलंच नाही अजून आतापर्यंत. कदाचीत आपल्याचजवळ याचं उत्तर असेल असं मला वाटतं. तेव्हा आपणच याचं उत्तर द्यावं. यासाठी हे भेटीचं आमंत्रण होतं."          तो एकांतवास व तो सम्राट अशोकाचा प्रश्न. तसा त्यांनी तो प्रश्न करताच देवी ओशाळली. तिला तिच्या मागील वेळच्या बोलण्याची लाज वाटली. उत्तर द्यावसं वाटत होतं. परंतु तरीही ती चूप होती. कारण तो तिच्या मनाला छिन्नविछिन्न करणारा प्रश्न होता. तसे तेच म्हणाले,           "कदाचीत राणीसाहेबा, आपण......."           "काय आपण." तिनं आपलं मौन सोडलं व ती म्हणाली.             "कदाचीत आपण माझ्यावर प्रेम तर करीत नाही ना?"             प्रेम...... अशोकानं तसा शब्द उच्चारताच ती पुन्हा गप्प झाली. तिनं त्यांच्या डोळ्यात डोळे टाकले. त्यांनीही तिच्या डोळ्यात डोळे टाकले. तशी तिनं आपल्या अधरावर स्मित हास्य झळकवलं. तोच त्यांनी तिची भावना ओळखली व ते म्हणाले,            "राणीसाहेब, कदाचीत आपण माझ्यावर प्रेम करीत आहात असंच वाटतंय. अन् माझं जर खरं असेल तर आपला हात माझ्या हातात द्या. तरंच मी तसं समजेल व मलाही वाटेल की आपला होकार आहे माझ्या बोलण्याला."          तो त्यांचा प्रश्न. तोच ती म्हणाली,          "महाराज, आपल्याला काय वाटतंय."           तिचं ते बोलणं. त्यावर सम्राट अशोकांनी मौन धारण केलं. तोच ती म्हणाली,          "या मौनाचा अर्थ मी काय समजू? जर आपलं प्रेम असेल माझ्यावर तर मीही आपणावर प्रेम करते असंच म्हणेल. घाबरु नका."            ते तिचं बोलणं. त्यावर हिंमत करुन ते म्हणाले,           "राणीसाहेबा, मी हरलोय. मी तक्षशिलेतील बंड मोडलंय. मी उज्जयिनीतील बंड मोडून काढलंय. परंतु आपल्यासमोर हरलोय. आपण मला हरवलंय. मी आपलं प्रेम ओळखूच शकलो नाही. अन् दहावेळा तपासत आहो मी आपलं प्रेम. त्या प्रेमाचीच मी परिक्षा घेत आहो आताही."           असं म्हणत त्यांनी तिचा हात हातात घेतला. त्यावर दुसरा हात ठेवून ते म्हणाले,            "आता हे करा. आपला हात माझ्या हातात द्या. हे मी म्हणणारच नाही. कारण मुली या कधीच स्वतः होवून आपला हात परपुरुषाच्या हातात देत नाहीत. हं, इच्छा मनात असते आणि प्रेमही मनात असतेच. परंतु ते प्रेम त्या सांगून दर्शवीत नाहीत. ते प्रेम त्यांच्या बोलण्यातून समजून घ्यावं लागतं. बरोबर ना माझं? आता तरी सांगा मला. आता तरी बोला."          "होय, राजन. परंतु?"          "परंतु काय राणीसाहेबा?"          "आपली ही कृती कोणी पाहिली तर काय म्हणतील."          "काय म्हणतील? अहो, आपणाला मी त्या विदिशा नगरीतून उचलून आणणार. आपल्या वडीलांनाही नाही घाबरणार. त्यांच्याशिही युद्धच करणार आपल्यासाठी."           "राजन, माझे वडील तसे नाहीत. ते जसे धनीक आहेत. तसेच श्रीमंत विचारांचेही आहेत. त्यांना ही गोष्ट ऐकताच आनंदच वाटेल. परंतु थोडे थांबाल काही दिवस. मी माझ्या वडिलांची सहमती घेईपर्यंत. तोपर्यंत आपणही आपल्या वडीलांची सहमती मिळवावी म्हणजे झालं."           अशोकानं तिचा घेतलेला हात अधिक घट्ट केला व म्हणाले,          "हे बघा राणीसाहेबा, माझं प्रेम आहे आपणावर. माझं प्रेम असं तोडू नका. मी आपल्याशिवाय जगूच शकणार नाही. हा माझ्यासारखा राजबिंडा राजकुमार आपल्याला कदाचीत भविष्यात मिळेलही. परंतु माझी सर त्याला येणार नाही. सांगा, आपण विवाह कराल काय माझ्याशी? तसं वचन मला द्या. नाहीतर मी आपला हातच सोडणार नाही."           "होय आणि होय. आता तर खात्री पटली ना. परंतु माझ्या वडीलांनी परवानगी दिली तर?"           "ठीक आहे. परंतु समजा परवानगी नाहीच दिली तर...... तर आपण मला भेटण्याचं नाकाराल काय परवानगी मिळेपर्यंत?"             अशोकानं तिला प्रश्न करुन ती गोष्ट आधीच विचारुन घेतली. तसा तिनं होकार दर्शवताच त्यांनी तिचा हात सोडला. तशी ती त्याच्या हातपाशातून मोकळी झाली.            देवी आपल्या नगरीत परत आली होती. आज तिलाही सम्राटावर प्रेम निर्माण झालं होतं व त्यालाही तिच्यावर प्रेम निर्माण झालं होतं. दोघंही चिठ्ठ्यातून भेटत होते एकमेकांशी. ज्याची कल्पना दोघांच्याही आईवडीलांना नव्हती. तसं विदिशा व उज्जयिनी जवळपास असल्यानं महिन्यातून एकदा तरी तिची भेट होतच होती. त्यातच दोनचार प्रेमाच्याही गोष्टी घडतच होत्या.             देवी सुशील व सात्वीक स्वभावाची होती. तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. त्यातच असं प्रेम निर्माण झाल्यानं सम्राट अशोकाला राहवत नव्हतं. सम्राट अशोक तिला भेटायला जात असे व तिही त्याला भेटतच असे. अशातच एक दिवस सम्राट अशोक तिला म्हणाले,           "देवी, हे असं वारंवार भेटणं बरोबर नाही. कदाचित लोकांच्या नजरा आपल्यावर पडतील व लोकं आपल्याला बदनाम करतील. त्यापेक्षा आपण विवाह केलेला बरा. माझा तर प्रस्ताव तुला स्विकार असेल तर हो म्हण. तुला जबरदस्ती नाही."           ते अशोकानं तिला म्हटलेले बोल. त्यावर देवी मनोमन खुश झाली. तशी ती म्हणाली,           "माझीही एक अट आहे. मी ती बोलते. ती स्विकार असेल तर नंतर आपल्या विवाहाची बोलणी."           "अट ! अशी अट कोणती आहे?"            सम्राट विचार करु लागले. तसे ते म्हणाले,           "बोल प्रिये, लवकर बोल. तुझ्यासाठी तर मी चंद्र, सुर्यही या पृथ्वीतलावर आणून उभे करील."             "राजन, तेवढं करायचं कारण नाही."            "मग कोणती अट आहे अशी?"             "राजन, मी तुमच्यासोबत पाटलीपुत्रला येणार नाही वा कुठेच येणार नाही.  माझा जीव घुटमळेल. शिवाय मी माझ्या वडीलांची एकुलती एक कन्या. मला माझ्या वडीलांना आधार द्यायचाय. शिवाय मला राज्यकारभारात रुची नाही. ना ही आपल्या साम्राज्याचा लोभ आहे मला. मी इथेच बरी."            "जीवनभरच इथं राहशील काय?"            "होय, जीवनभरच."             "अन् मी नकार  दिला तरीही."             "चालेल मला. जशी आपली इच्छा." तिनं आपल्या मनातील बेत सांगून टाकला.              देवी बोलून गेली. तसे सम्राट अशोक आपल्या उज्जैन स्थळी परत गेले. ते दिवसभर राज्यकारभारात लक्ष देत असत व रात्री त्याच प्रकरणावर विचार करीत असत. आता त्यांना रात्रभर झोपही येत नव्हती. सारखी तिचीच आठवण यायची व आठवायची ती. अन् तिच्यासोबत गतकाळातील घडलेले प्रसंग. ज्यानं त्यांची झोप तर उडालीच होती. व्यतिरिक्त त्यांचं राज्यकारभारातही लक्ष लागत नव्हतं.           देवीच्याही मनात होते सम्राट अशोक.  देवीचंही प्रेम होतं त्यांचेवर. तिलाही त्यांचेशी विवाह करावासा वाटत होता. परंतु ज्याप्रमाणे तिला त्यांचेशी विवाह करावासा वाटत होता. तशी तिला आपल्या आईवडीलांचीही परवानगी आवश्यक वाटत होती. ती एक स्री होती व ती स्री असल्यानं तिला आपल्या वडीलांच्या मनाच्या विरुद्ध पाऊल उचलणं अशक्यप्राय गोष्ट वाटत होती.          सम्राट अशोकाच्या मनात किंतू परंतु नव्हतंच. तसे सम्राट शुर होते व त्यांना शाश्वती होती की ते विदिशाच्या राज्यांना विश्वासात घेऊन देवीला उचलूनही आणू शकतील. परंतु देवीला तसा विचार करणं शक्य नव्हतं. तसं एक बंधनही होतं, ते बंधन होतं, राजा आणि साहूकाराचं. तसं पाहिल्यास विवाह हे त्या काळातही सजातीय जातींशीच होत असत. सजातीय जात याचा अर्थ राजे राजे. त्या विवाह सोहळ्यात सामान्य जनतेला वाव नव्हताच. असं असलं तरी एखाद्यावेळेस सामान्य जनतेतील एखादी सुंदर असलेली स्री राजाला आवडलीच तर तो तिच्याशी विवाह करीत असे. तेच घडत होतं देवीच्याही बाबतीत. कारण तिचे वडील हे साहूकार वा धनीक असले तरी ते राजे नव्हते. तसेच ते श्रीमंत असले तरी त्यांच्याकडे राजपद नव्हतं. परंतु तिच्या मनात तो विचार होता आणि ते तिचं प्रेम भिंत बनून तिच्यासमोर उभं होतं.         *******************२*******************           प्रेम....... म्हणतात की प्रेमानं जग जिंकता येतं. प्रेमानं अमूक अमूक करता येतं, तमूक तमूक करता येतं. खरं सांगायचं झाल्यास प्रेमानं प्रेयसीलाच नाही तर मृत्यू आणि जीवनालाही जिंकता येतं.          प्रेम...... प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीनं आपापल्यापरीनं वेगवेगळी केलेली आहे. कोणी म्हणतात की प्रेम हे फक्त पत्नीवरचंच खरं असतं तर कोणी म्हणतात की प्रेम हे आपल्या मायबापावरचं खरं असतं. कोणी म्हणतात प्रेम हे आपल्या लेकरावरचं खरं असतं तर कोणी प्रेयसीवरच्या प्रेमाला खरं मानतात. अन् सध्याचा काळही अगदी तशाच स्वरुपाचा आहे.           सध्याच्या काळात मुलं जन्माला आली की ती आपल्या आईवर प्रेम करु लागतात. कारण त्या वयात त्यांना फक्त त्यांची आईच दूध पाजत असल्यानं तीच महत्वाची वाटते. परंतु जेव्हा समज येते व त्या मुलाला त्याचे वडील कळायला लागतात. तेव्हा तो आईपेक्षा जास्त वडीलांवर प्रेम करु लागतो. त्यानंतर तो थोडा मोठा झाल्यावर आप्तांवर प्रेम करु लागतो. तो आणखी थोडा मोठा झाला की त्याला शिक्षक जवळचे वाटतात. त्यातच ते शिक्षकांवर प्रेम करु लागतात. मग ते तरुण होतात. तेव्हा त्यांना प्रेयसी म्हणजे काय? ते कळायला लागतं व ते एखादी प्रेयसी पकडून ते आपल्या प्रेयसीवर प्रेम करु लागतात. त्यातच त्यांना ती प्रेयसीच खरं प्रेम करणारी वाटते. त्याला त्यानंतर त्याचेवर इकडलं तिकडलं प्रेम करणारं कोणीच दिसत नाही. तसं ते वयच त्या स्वरुपाचं असतं. त्यातच त्यानंतर तीच मुलं विवाह करुन तिला घरी आणतात, आईवडीलांची मर्जी नसली तरी. परंतु जसे त्यांच्या विवाहाला दोन चार वर्ष होतात. तेव्हा ती घरात पत्नी म्हणून आणलेली व तिच्यासाठी आणाभाका घेतलेली प्रेयसी आपल्याला डोईजड वाटायला लागते. त्यानंतर तेच तरुण आपल्या प्रेयसी बनून आलेल्या पत्नीला सोडून इतर मुली शोधत असतात. त्यातच ती मुलं गतकाळात घरात आणलेली प्रेयसी आपली पत्नी जरी असली तरी आपल्या पत्नीशी कमी व इतर मुलींशी जास्त बोलत असतात. त्याच त्यांना हव्याहव्याशा वाटायला लागतात. कारण असतं, प्रेमातून नवीन मिळविण्याची सवय. तसं बोलणं त्यांना आवडतं.           आपण पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीची पत्नी स्वभावानं सुंदर जरी असली वा दिसायलाही सुंदर जरी असली तरी ते एखाद्या बाहेरच्या बंदर मुलींशी बोलणं मंजूर करतात. त्याच बाहेरच्या मुलींशी बोलू लागतात. सध्या व्हाट्सअपचा काळ असल्यानं त्याचं सतत व्हाट्सअपवर टिचूक टिचूक चाललेलं असतं. यात अगदी आबालवृद्धही असतात. आज व्हाट्सअपचा काळ असल्यानं अगदी आबालवृद्धांनाही ते जमतं. शिवाय अगदी म्हातारेही म्हातारपणात एखाद्या त्यांच्याच तरुण नातीनच्या वयातील मुलींसोबत चॅटींग करीत असतात. अन् तिनं जर एखादा फोटो पाठवा म्हटलं तर हीच म्हातारी मंडळी तिला आपल्या तरुणाईतील तरुणपणाचा एखादा फोटो पाठवतात. त्यानंतर ते बोलता बोलता गुरफटत जातात व फसतात. तद्वतच आपण बदनाम होवू नये म्हणून काही म्हातारी मंडळी आत्महत्याही करीत असतात. हीच वास्तविकता आहे.          ही झाली पुरुषांची गोष्ट. याबाबतीत स्रियाही काही कमी नाहीत. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. एका कार्यक्रमातील एक वयोवृद्ध पुरुष त्याच कार्यक्रमातील एका तरुण स्रिला आवडला. कारण त्याचं मंत्रालयात परीचय असल्यानं ती त्याच्याकडे आकर्षीत झाली. तसंच त्यानंही सांगीतलं की तो तिला ती बरीच पुढे जाण्यास मदत करेल. मात्र तिनं संपर्कात राहावं. त्यानंतर कार्यक्रम संपला व ती त्यांच्या संपर्कात राहिली. तिला तो आवडू लागला. कारण तिला बरेच पुढे जायचे होते. तशीच त्याला ती आवडू लागली. कारण त्याला त्याची हवस पुर्ण करायची होती. शेवटी तिनं पुढं जाण्यासाठी आपला पती व मुलंही सोडली. त्यातच त्यानं आपली हवस पुर्ण केली व तिलाही पुढं जाता आलं.          हीच कहाणी घडत असते आज बर्‍याच घरात आणि बऱ्याच प्रमाणात. लोकं आपल्या हवसेच्या नादात आपलं वय पाहात नाहीत व बदनामही होतात आणि स्रिया आपल्या पुढे जाण्याच्या नादात व आपले शौक पुर्ण करण्याच्या नादात आपला चांगला पती व मुलंही सोडतात. काहीजण वयात येताच आपले लहानाचे मोठे करणारे मायबाप सोडतात. कारण प्रेम हे महत्वाचं ठरतं त्यांच्यासाठी. अन् ती मंडळी वासनेलाच प्रेम समजतात. जी वासना म्हणजे प्रेम नसतंच.          पुर्वी असं नव्हतंच. याचा अर्थ पुर्वी लोकं प्रेम करीत नव्हते असं नाही. परंतु ते ज्या स्रीवर प्रेम करायचे. ते प्रेम निभवायचेही. त्यांना ते पत्नी बनवायचे व तिही पत्नी बनायला तयार व्हायची. उदाहरण द्यायचं झाल्यास सम्राट अशोकांचं देता येईल. त्यांना पाच राण्या होत्या व त्यांनी ज्या ज्या राण्यांवर त्यांच्या विवाहापुर्वी प्रेम केलं. त्यातून त्यांनी ते प्रेम पाळलं देखील. त्या राण्यांना त्यांनी शेवटपर्यंत अंतरही दिलं नाही. त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आदर केला. तसं पाहिल्यास त्यांनीही आपलं प्रेम जोपासत असतांना आपल्या वडीलांच्या मर्जीच्या विरोधात जावून प्रेम करावं लागलं होतं.            प्रेम हे प्रेम असतं. ते कधीकधी एखाद्या दुर्धर आजारावरील औषध ठरतं. एखादा गंभीर आजारही या प्रेमानं दूर होवून जातो. एवढंच नाही तर प्रेमानं आपलं आयुर्मानही वाढतं. म्हातारा व्यक्तीही तरुण होवू शकतो. परंतु हे जरी बरोबर असलं तरी आजची काही मंडळी ही वासनेलाच प्रेम समजतात. प्रत्येक स्रीकडे पाहतांना वासनामय नजरेतून पाहतात. परंतु वासना म्हणजे प्रेम नाही. अन् प्रेम म्हणजे वासना नाही. दोघात जमीन आसमानचा फरक आहे. मात्र आजची मंडळी ही वासनेलाच प्रेम समजून त्यातच गुरफटत जातात व तद्नंतर फसतात. कारण वासना ही प्रेम नाही. ती एक मनाला थोडासा आधार देणारी अभिव्यक्ती आहे. जिचा परिणाम हा वाईट स्वरुपाचा होतो. ज्यातून संबंध तुटू शकतात. तसं पाहिल्यास माणूस कितीही वयाचा असला आणि त्याचं जर एखाद्या तरुण मुलीवर प्रेम झालंच तर त्याचं वय हे कितीतरी लहान झालेलं भासतं. जरी त्याचं वय हे साठी पार केलेलं असलं तरी तरी तो अठराच वर्ष वयाचा असल्यासारखा वागतो.         प्रेमाचा परिणाम सम्राट अशोकांच्या बाबतीतही घडला. तेही देवीच्या प्रेमातून प्रभावीत झाले व कलिंग युद्धानंतर पुढं त्यांनी शांतीचा प्रसारक असलेला बौद्ध धम्म स्विकारला. त्यांनी एवढंच केलं नाही तर त्यांनी त्याच बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी कार्य केले.           महत्वपुर्ण बाब ही लक्षात घेण्यासारखी आहे की प्रेमानं जग जिंकता येतं. अन् प्रेमानं तरुणही होता येतं. आपलं वयही कमी करता येतं. हे जरी खरं असलं तरी प्रेम म्हणजे वासना नाही. अन् तसं कोणीही समजू नये. कारण तसं जर कोणी समजलं तर त्यांच्यासारखा जगात कोणी मुर्ख नाही. हं, प्रेमानं सर्व करता येतं. स्वस्थ राहता येतं. आपलं वयही कमी करता येतं. जर त्या प्रेमाकडे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असेल तर....... जर तो दृष्टिकोन चांगला नसेल तर तेच प्रेम आपल्यासाठी चिंताजनक ठरते. त्यानंतर जे काही घडतं. ते शब्दात मांडणं कठीण आहे. त्या प्रेमानं आपलीच फसगत होते. अधोगतीही होते. माणसाचं मन हवालदिल होतं. त्यातच चिंतेनं आयुष्य घटतं. हळूहळू माणूस जीवनातून तुटतो व एक वेळ अशी येते की माणसाच्या मनाला कॅन्सर होवून माणूस एकतर आत्महत्या करतो किंवा एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होवून हळूहळू तडपत तडपत मरण पावतो.   म्हणूनच माणसानं प्रेम करु नये असं नाही. प्रेम करावंच. आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर स्रियांशीही बोलावं. बोलायला मनाई नाही. तसंच प्रेमही करावं. प्रेम करायला मनाई नाही. परंतु आपलं प्रेम हे वासनामय नसावं की ज्यातून आपलेच नुकसान होईल. आपल्याला दुर्धर आजार जडतील. आपलीच अधोगती होईल नव्हे तर आपल्यालाच त्यातून मृत्यू येईल. आपलं प्रेम हे दुधासारखं स्वच्छ, पाण्यासारखं निर्मळ, वृक्षांसारखं हिरवंकंच, फुलासारखं देखणं आणि पशुपक्षांसारखं निःष्कपटी असावं. जेणेकरुन आपलं प्रेम जगात टिकेल आणि त्यानं आपली किर्ती जगात अजरामर होईल. यात शंका नाही.          जोडीदार निवडतांना महिलांबाबत ती कशा स्वभावाची आहे? तिचं राहणीमान कसं आहे? तिचं वागणं कसं आहे? ती फॅशनेबल आहे का? याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच पुरुषांबाबत तो फॅशन पाहणारा आहे का? तो व्यसनी आहे का? हे पाहणे आवश्यक आहे. परंतु अलिकडील काळात तसं न पाहता लोकं महिलांबाबत विचार करतांना ती फॅशनेबल आहे का? हे पाहतात. ज्यातून ती फॅशनेबल असल्यानं घरात जेवढा पैसा येतो. तो पैसा खायला पुरत नाही. अशावेळेस संसाराची राखरांगोळी होते व व्याभीचार वाढतो व हीच बाब पुढं निदर्शनास आली की घटस्फोट होतात. तशीच असतात मुलंही. मुलांबद्दलही विचार करतांना त्याचं घरदार आहे का हे पाहतात. त्याला असलेली व्यसनं पाहात नाहीत. मुलगा तसा मिळतोही. परंतु जे घर असतं. ते घर त्याच्या आईवडीलांचं असतं. अन् तेच घर मुलगा होतकरु न निघाल्यास वा व्यसनाधीन निघाल्यास असलेलं घर हातातून जातं. ज्यातून घटस्फोटासारखे निर्णय घ्यावे लागतात. त्यानंही संसाराची राखरांगोळी होत असते.            जोडीदार........ जोडीदार हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यातच जोडीदारावर आपलं उज्जवल भविष्य अवलंबून असतं. जोडीदार हा जर चांगला असेल तर संसाराची चांदी होत असते आणि तो जर योग्य नसेल तर संसाराची दुर्गती होते. हे तेवढंच खरं.        संसारचक्रात जोडीदार जसा महत्वाचा, तसं जोडीदार निवडीलाही स्वातंत्र्य असायला हवं. पुर्वी असं स्वातंत्र्य असायचं. त्या काळात स्रिया आपल्या स्वतःचा स्वयंवर आयोजीत करायच्या. त्यातच जे व्यक्ती त्या स्वयंवरात भाग घेत असत. ते त्या  मुलींना त्या स्वयंवरात जिंकत असत. ज्यातून मनालायक जोडीदार मिळत असे. परंतु मध्यंतरीच्या काळात जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य हिरावलं गेलं. स्रियांना गुलाम केलं गेलं. त्यातच त्या स्त्रियांवर आपले विचार लादण्यात आले. त्यानंतर तिच्या जोडीदार निवडीवर बंधनं आलीत. त्यानंतर ना तिचं स्वयंवर होवू लागलं. ना ती आपल्या स्वतःसाठी जोडीदार निवडू लागली.         जोडीदार....... निसर्गातील पशुपक्षीही आपल्यासाठी स्वतःच्या विचारानं जोडीदार निवडतात. सुगरण पक्षात जोडीदार निवडतांना आधी घराचा विचार केला जातो. ज्यात सुगरण पक्षातील नर हे आपले घरटं बांधणं सुरु करतात. तेव्हा त्या घरट्यांना त्यांच्या माद्या पाहात असतात. ज्या त्यांच्या कला न्याहाळत असतात. त्यातच ज्या सुगरण पक्षाच्या नराची कला सुगरण पक्षाच्या मादीला भावते. तीच मादी त्या नराकडे आकर्षीत होते. त्यानंतर तिही त्याला घरटं बांधण्यास मदत करीत असते. हेच घडतं गरुडाच्या जातीत. गरुडाची मादी नरापेक्षा उंच उडत असते व ती प्रत्येक वेळेस एक तुटकी काठी आपल्या चोचीतून खाली सोडत असते. जर ती फांदी त्या नरानं झेलली तर त्या नराला ती मादी पसंत करीत असते. उद्देश असतो. त्या नरानं केलेली कामगीरी. कारण त्या पक्षाच्या जातीत अतिशय उंच घरटं बांधलं जातं. अशावेळेस त्या घरट्यातून आपलं एखादं पिल्लं जर पडलं तर त्या पिल्लाला अलगद वरच्या वरच्या झेलून पकडण्याची क्षमता ही नरात असायला हवी. ही मादीची भावना असते. तसंच झालं आहे, आपल्या मानवजातीतही. पुर्वी झाडावर राहणारा मानव आज खाली जमीनीवर राहायला आला. त्या माणसानं जोडीदार निवडतांना स्वयंवर तपासलं. त्यानंतर मुलीचा विवाह हा तिच्या मायबापाच्याही मनानं घडवला. अन् त्याही काळाला आज मागं टाकत आता पशुपक्षाची जोडीदार निवडीची पद्धती आलेली आहे. आज जोडीदार निवडतांना प्रेम आणि खरंच तो आपल्या लायक आहे की नाही हे तपासण्यासाठी पशुपक्षांची पद्धत वापरली जाते. त्यातच आज त्या मुलाचं घर आहे का आणि आहे तर कसं? त्या मुलाची शेती आहे का? आहे तर किती?          पशुपक्षी हे आपले जोडीदार निवडतांना जशी आपली अक्कल वापरतात. तीच अक्कल आज वापरण्यात येत असलेली दिसून येत आहे.         काळ बदलला आहे व बदलत्या काळानुसार जोडीदार निवडीचीही पद्धत बदलली असून लोकांनी आपआपल्या मतानुसार जोडीदार निवडीची पद्धत बदलवलेली आहे. आता मुली त्या मुलाचं घरच नाही तर शेतीही आहे का हेही तपासतात आहे. मुलगा साधा असला की तो विवाहाला चालतच नाही.             आज लोकांना विवाह करण्यासाठी साध्या भोळ्या मुलामुलींची गरज नाही. गरज वाटते, एखाद्या मादक मुलांची, जो मुलगा व्यसन करतो. दारु, अफीम, गांजा पितो आणि पाजतो. त्यातच अशा मुलांना चित्रपट बघण्याचा शौक आहे काय? त्यातच अशा मुलांना रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा शौक आहे काय? तसेच अशी मुलं ही डॉन्सबारमध्ये जातात का? हेही आजच्या काळात पाहिलं जात आहे. मात्र अशा मुलाजवळ घर असेल आणि तेही चांगलं असेल तर उत्तमच. परंतु तो मुलगा होतकरु आहे किंवा नाही? हे पाहिलं जात नाही. हीच वास्तविकता बऱ्याच घरात आज अनुभावयास मिळते. याबाबतीत मुलंही काही मागे नाहीत. त्यांनाही मुली या फॅशनेबल हव्यात. मग त्या मुलींचे बाहेर प्रेमचक्कर असले तरी त्यांना चालते. तू काहीही कर. फक्त पैसे कमवून आण. ही फॅशन आज जोर धरु लागलेली आहे. आजच्या मुली जोडीदार निवडतांना कधीही स्वयंवर पद्धतीनं वागत नाहीत वा परीक्षा घेत नाहीत आणि मुलंही कधी त्या परीक्षेत उतरत नाहीत. मात्र पक्षी ज्याप्रमाणे आपला जोडीदार निवडतात. तशाच आजच्या मुलीही आपला जोडीदार निवडतात. परंतु पक्षी जोडीदार निवडतांना तो आपल्या किती कामाचा? याचा रास्त दृष्टीकोनातून विचार करतात. ज्यात लेकरांचं संगोपन हा भाग येतो आणि आजच्या मुली हा दृष्टीकोन बाजूला ठेवून केवळ मनोरंजन म्हणून जोडीदार निवडत असतात.         महत्वाचं म्हणजे जोडीदार निवडतांना ज्या प्रमाणे पशुपक्षी हे आपला जोडीदार आपली मुलं झाल्यावर आपल्या मुलांप्रती किती उपयोगाची ठरतील, हा विषय घेवून जोडीदार निवडतात. त्याप्रमाणे आजच्या मुलींनीही तसाच विषय अंगीकारावा. त्यांनी जोडीदार निवडतांना तेच मुल्य जोपासावं. मग तो मुलगा फॅशनेबल नसला तरी चालेल. तो मुलगा घेवून चालणारा असावा. त्यातच तो निर्वसनी असावा. त्याचं घर नसलं तरी चालेल. त्याच्या घरादाराचा विचार करु नये. कारण व्यसनं जर नसतील तर असे व्यक्ती संसारात रमल्यावर कितीतरी घरं घेवून टाकतात. अन् व्यसनं जर असतील तर अशा व्यक्तीची पिढीजात घरं कितीही असली तरी ती नेस्तनाबूत होत असतात. तशाच मुलीही. मुलीही फॅशनच्या आहारी गेलेल्या असल्या तर बसल्या संसाराची धुळधानी होते. कारण फॅशन करण्यासाठी पैसा लागतो. अधिकच पैसा लागतो. तेवढा पैसा पतीजवळ नसल्यानं आणि आपल्याजवळही नसल्यानं वा जवळ असलेला पैसा फॅशनला पूरत नसल्यानं, पैसा कमवायचा असेल तर व्याभिचारी बनावंच लागतो. ज्यातून तसा अट्टाहास सहन न झाल्यानं घटस्फोट होतो. जो संसारासाठी अतिशय घातक असतो. म्हणूनच फॅशनेबल मुलीही संसारासाठी चालत नाहीत.           विशेष म्हणजे मुलांमुलींनी जोडीदार निवडावा. परंतु त्यात केवळ वासनापुर्ती, फॅशनेबलपणा, व्यसनाधीनता हाच उद्देश ठेवू नये. उद्देश ठेवावा, संसार करणे. अन् तोही चांगला संसार करणे. जर असे जोडीदाराला करता येत नसेल तर त्यांनी विवाहच करु नये. कारण अशा लोकांनी विवाह करणे म्हणजे त्यांच्याच नाही तर त्यांचे आईवडील व त्यांचे आप्तमित्र यांच्या डोक्यालाच ताप असतो. यात शंका नाही.           पुर्वी मात्र असे विवाह होत नसत. लोकं ती फॅशनेबल आहे असा विचार करुन विवाह करीत नसत. तर ते विवाह करतांना पशुपक्षांसारखी ती आपल्या किती फायद्याची आहे? आपल्या संसारात ती मदत करेल काय? याचा विचार करुन विवाह होत असे.            देवी व सम्राट अशोकांमध्ये झालेला त्यांचा विवाह याच स्वरुपाचा होता. त्यांचं ना स्वयंवर झालं होतं, ना त्यांनी फॅशनेबलपणा पाहिला होता विवाह करतांना. तसा त्यांचा विवाह हा यशस्वीच झाला होता. त्याचं कारण होतं, त्यांनी समजदारीनं केलेला त्यांचा विवाह. ज्यातून त्यांच्या त्या विवाहाला यशस्वी होता आलं होतं.         *******************३****************                   वसंत ऋतू नुकताच लागला होता. झाडाला फांद्या येवू घातल्या होत्या. या त्या झाडावर पक्षी दिसू लागले होते. राघू, मैना नित्यनेमानं या त्या आंब्याच्या झाडावर बसू लागले होते. अशातच देवी आपल्या घराच्या परसबागेत उभी होती. विचार होता तिच्या मनात सम्राट अशोकाच्या प्रेमाचा. तिला आठवत होतं तिचं ते प्रेम. तसं तिचं ते पहिलं प्रेम होतं आणि त्यांचंही तिच्यावर असलेलं पहिलंच प्रेम.             देवी विचार करीत होती. विचार होता तो तिच्या विवाहाचा. काश! आपण त्यांचेशी विवाह केल्यानंतर ते पाटलीपुत्रला नेतील. एक दोन पुत्रही होतील आपणाला. त्यानंतर मन भरेल व मन भरलं की ते आपल्याला सोडून दुसरीच एखादी पट्टराणी बनवतील. त्यापेक्षा आपण विवाह करुन इथंच राहिलं तर...... तर योग्य होईल. परंतु असं कधीच घडत नाही. आज प्रत्येक मुलगी विवाह झाल्यानंतर आपल्या पतीच्याच घरी नांदायला जाते. ती आपल्या माहेरी कधीच राहात नाही. कसं करावं? आपलं प्रेम आहे राजपुत्रावर एवढं ठीक आहे. राजपुत्राचंही आपल्यावर प्रेम आहे, एवढं ठीक आहे. परंतु विवाह? अन् विवाहानंतर आपण आपल्या वडीलांची लाडाची कन्या असूनही इथं राहाणं ठीक होणार नाही. परंतु राहायचं आहे मला. काय करावं?            ती विचारच करीत होती. तसं तिला आठवलं आपण वचनात गुंफववावं. जर सम्राट तयार झालेत तर विवाह करु. नाहीतर नाही.           तिचा तो विचार.  लागलीच जेव्हा तिची मुलाखत सम्राटाशी झाली. तेव्हा तिनं त्याला विचारुनच घेतलं नव्हे तर तिनं त्यातून वचनही घेतलं होतं की ती विदिशातच राहणार. पाटलीपुत्रला येणार नाही.           देवीच्या मनात विचारच चालला होता. तोच विचार सुरु असतांना अचानक तिच्या वडीलांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तसे ते म्हणाले,           "बेटा, काय करतेय?"           "पिताश्री, काही नाही. बागेत फिरते आहे."  तिनं उत्तर दिलं.             देवीनं त्यांना उत्तर दिलं खरं. परंतु समाधान न झाल्यानं देवीला ते म्हणाले,            "बाळ, बऱ्याच दिवसांपासून पाहतो आहे की तू उदास आहे. काय कारण आहे, जरा सांगशील मला. कळेल का कारण मला?"            तो तिच्या वडीलांचा प्रश्न. तशी ती म्हणाली,            "पिताश्री, आपण रागवणार नाही तर सांगतेय."            "नाही रागवणार. सांग मला. काही उपाय काढू त्याचेवर."            "पिताश्री, मला विवाह करायचाय. मी उपवर झालीय आणि प्रत्येक उपवर झालेल्या मुलीला विवाह हा करावाच लागतो. मलाही करायचा आहेच तर."           "त्यात काय एवढं? विवाह करायचा आहे तर, ठीकच आहे. एखादा राजबिंडा युवक गवसला की करुन टाकू तुझा विवाह. आता तर झालं."             "नाही पिताश्री."            "आणखी कशाची कमी आहे. काय हवं आणखी तुला?"             "मला आपल्या घरातून जायचंच नाही कधी. जो कोणी इथं येवून माझ्यासोबत राहायला तयार आहे वा मला इथं राहू द्यायला तयार आहे, मी त्याचेशीच विवाह करणार."            "पण बेटा, असा कोणी युवक मला गवसेल तरी का तुझ्याशी विवाह करायला. प्रत्येक मुलीला जावंच लागतं मायबापाच्या घरुन. मुलीचं जीवनच त्यासाठी असतं. अन् आजपर्यंतचा इतिहास तरी माझ्या लक्षात नाही की मुलगी कधीच सासरी गेली नाही."           "आपण तो इतिहास बदलू. बदलवून टाकू आपण असा असलेला इतिहास. मी तसं वचन घेईल तशा व्यक्तीकडून."            "परंतु बेटा, जिद करु नकोस. असा राजकुमार कधीच सापडणार नाही आपल्याला."             "पिताश्री,  एक सांगू. मला तसा राजपुत्र सापडला देखील."             "राजपुत्र ! सापडला असा राजपुत्र. जरा लवकर सांग. जरा आम्हालाही कळू दे तर."             "त्या राजपुत्राचं नाव आहे अशोक."             "अशोक ?  कोण अशोक?"             "महाराज बिंदूसारचा मुलगा अशोक. माझं प्रेम आहे त्यांचेवर."            "पुत्री, काय बोलतेयस तू. असं वात्रट बोलू नकोस. अन् असं प्रेमाबिमाचं सांगू नकोस मला. तुला माहीत नाही. जर हे महाराज बिंदूसारला माहीत झालं तर आपल्या दोघांनाही तोफेच्या तोंडी देतील. बाळ, हा नाद सोडून दे तू."           "नाही पिताश्री, मी वचन दिलं त्यांना. म्हटलं की मी विवाह करणार त्यांच्याशी. फक्त माझी एक अट आहे. अट आहे, फक्त मी पाटलीपुत्रला येणार नाही. मी इथेच राहील."            "हो. परंतु?"            "आता परंतु वैगेरे काही नाही. आता ठरलं ते ठरलं. आता फक्त हो म्हणा आपण."           देवीच्या वडीलांनी होकार दर्शवला व ती सम्राट अशोकाशी विवाह करायला तयार झाली. मात्र आता सहमती राजा बिंदूसारची हवी होती. ती मिळणं तेवढं बाकी होतं.             पावसाळा सुरु झाला होता. पावसाचा जोर सुरुच होता. तशी राजा बिंदूसारची स्वारी उज्जैनकडे रवाना झाली होती. राज्यकारभार कसा सुरु आहे हे पाहण्यासाठी राजा बिंदूसार उज्जैनला चालले होते. त्यातच त्यांची स्वारी त्याच ठिकाणी थांबली. जे साहूकाराचं घर होतं. त्यांचं  साहूकाराच्या मुलीकडे यावेळेस लक्ष गेलं. तशी ती त्यांना आवडलीही नाही. तीच आपली राजवधू बनावी असंही वाटलं नाही. तसाच तोंडातून त्यांना ब्र देखील काढता आला नाही. तसा दुसरा दिवस उजळला व दुसर्‍या दिवशी ते उज्जैनला रवाना झाले.           ते उज्जयिनी राज्य. त्या ठिकाणी सुसंपन्नता होती. परंतु आता तिथं कलह नव्हता. सर्वत्र शांतता होती. त्याच शांततेत जगता जगता राजा बिंदूसारला अतिशय धन्यता वाटत होती. प्रजाजनही खुशच होते. ते पाहून राजा बिंदूसारही आनंदी होता. मात्र त्यांनी आपल्या चाणाक्ष नजरेनं सम्राट अशोकाचं दुःख टिपलं. जे दुःख सम्राट अशोकांना होतं. तसे राजे असलेले बिंदूसार बुचकळ्यात पडले. काही क्षण वाटलं की एवढी राज्यात सुसंपन्नता असतांना आपला मुलगा चिंतेत दिसतो. ही चिंता कशाची असावी?           तसा तो एक दिवस उजळला. त्या दिवशी त्यांनी अशोकाला असलेलं व राजा बिंदूसारनं पाहून टिपलेलं तीव्र दुःख सहन न झाल्यानं त्यांनीच अशोकाला त्याबद्दल विचारायचं धाडस केलं. म्हटलं,          "बाळ, बऱ्याच दिवसांपासून मी पाहतो आहे की तुला बरंच दुःख आहे. प्रजाजण सुखी आहे. परंतु तू मात्र दुःखी आहेस. कारण कळेल का मला?"             तो राजा बिंदूसारचा प्रश्न. त्यावर उत्तर देत सम्राट म्हणाले की त्यांना कोणत्याही स्वरुपाची समस्या नाही. परंतु तरीही त्या गोष्टीला स्थान न देता बिंदूसार असे खोचक बोलले की सम्राट अशोकांनी ठामपणे आपल्या दुःखाची जाण राजा बिंदूसारला दिली व ते म्हणाले,          "पिताश्री, माझं शेजारच्या राज्यातील देवीवर प्रेम आहे व मला तिच्याशी विवाह करायचा आहे. आपण त्याला मंजूरी द्यावी."           बाळाचा तो प्रश्न. त्या प्रश्नावर नकार दिला राजा बिंदूसारनं. ज्यातून राजा बिंदूसार स्वतः मुलीला मागणी घालायला विदिशा राज्यात जातील असं सम्राटाला वाटत होतं. परंतु उलट घडलं व त्यांनी देवीला प्रत्यक्ष मागणी घालून सम्राट अशोकाचा विवाह सोहळा संपन्न करण्यास मनाई केली.              तो सम्राट अशोकाचा विवाह. ते त्याचं प्रेम.  त्यातच विवाहाला असलेला पित्याचा विरोध. त्यातच त्यांना आठवलं कारुवाकीचं प्रेम. जे प्रेम कलिंगवरुन येतांना तोडावं लागलं होतं. परंतु हे प्रेम तोडायचं नाही. सम्राट अशोकांनी विचार केला. शेवटी बिंदूसार पाटलीपुत्रला परत गेल्यानंतर सम्राट अशोकानं देवीशी विवाह केला. मात्र ते बिंदूसारला माहीत होताच त्यांनी सम्राट अशोकाला पाटलीपुत्रला ठणकावून सांगीतलं की त्यांनी पाटलीपुत्रला येवू नये. मात्र असं झालं तरी सम्राट अशोक हे आपल्या विवाह प्रसंगाने अतिशय आनंदीत झाले होते. आता ते उज्जयिनीचा राज्यकारभार करायचे आणि संसार विदिशा नगरीतील आपली महाराणी देवीशी करायचे. जी त्याची पट्टराणी बनली होती. जी ना उज्जयिनीला येवून राहू शकत  होती. ना ती पाटलीपुत्रला जावून राहू शकत होती. ती अशोकाला घालून दिलेल्या अटीनुसार विदिशातच राहात होती.          म्हणतात की देवीनं सम्राट अशोकांना अट टाकली होती की ती पाटलीपुत्रला विवाहानंतर येणार नाही. परंतु तशी अट जरी असली तरी तो विवाह राजा बिंदूसारला मान्य नव्हता. हेही विदिशा अधिवाशी देवीला पाटलीपुत्रला जाण्यास थांबविणारी गोष्ट होती. त्यामुळंही ती कदाचीत पाटलीपुत्रला गेली नसेलच. हे नाकारता येत नाही.            ते सम्राट अशोकाचं प्रेम होतं. आता उज्जयिनी व विदिशा जवळपास असल्यानं त्यांची नेहमीच भेट व्हायची. तसं प्रेमही वाढत चाललं होतं. ज्यातून तिला महेंद्र व संघमित्रा झाली. तशी देवी ही बौद्धधर्मीय होती व तिच्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव पडला होता. त्यातच घरात बुद्धांच्याच विचारावर चर्चाही चालायच्या.            देवी...... तिचं ते लहानपण व त्याच लहानपणापासून असलेली अहिंसेची आसक्ती. घरातील वातावरणही तिचं बुद्धमयच होतं. कारण तिच्या घरी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांचा प्रभाव होता. ज्यातून तिच्यावरही तथागत भगवान बुद्धांच्याच विचारांचे संस्कार होत होते. काही लोकं येत असत तिच्या घरी. जे बुद्ध विचाराचे असायचे. ते वार्तालाप करायचे. त्याही गोष्टी देवी ऐकायची व तिच्या मनात तेच विचार भरायचे.            सम्राट अशोकाला एकशे एक भाऊ. त्यातच सुशीम हा सर्वात मोठा होता. तो तक्षशिलेचा राज्यपाल होता. तो सम्राट अशोकाचा द्वेष करीत असतांना आपल्या वडीलांना सतत त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने त्याला अज्ञातवासात टाकण्याविषयी बोलत असे. अशातच त्यांचे वडील बिंदूसार त्यांना अज्ञातवासात टाकत असत आणि असे अज्ञातवासात टाकत असतांना सम्राट अशोकांना कलिंगला जावे लागत असे.           सम्राट अशोक हे लहानपणापासून उदंड स्वभावाचे होते. चंद्रगुप्त मौर्य हे त्याचे तातश्री होते. ज्यावेळेस अशोक लहान होते व त्यांच्या दुधाचेही ओठ सुकले नव्हते. त्यावेळेस त्याचे तातश्री अर्थात चंद्रगुप्त म्हातारे झाले होते. तेव्हा त्यांना युद्धाचा वैताग आल्यानं त्यांनी आपली तलवार फेकून दिली होती. त्यानंतर त्यांनी जैन धर्म स्विकारला होता. त्यातच ती फेकून दिलेली तलवार सम्राट अशोकांनी उचलली व ते त्याच तलवारीनं युद्धसरावही अगदी लहानपणापासूनच करु लागले होते. लवकरच त्यांच्यात युद्धाचे महत्वपुर्ण गुण आले होते. ज्या आधारावर ते आपल्या वडीलांनी सोपविलेल्या मोहिमेत नेहमीच यशस्वी होत गेले.           सम्राट अशोकांचं देवीशी विवाह करणे काही राजा बिंदूसारला आवडले नाही. त्याचे कारण होते, त्यांचा असलेला जैन धर्म. चंद्रगुप्त जैन धर्मीय झाल्याने बिंदूसारही जैन धर्मीय ठरले. त्यातच ते जैन धर्मीय असल्यानं त्यांना अशोकाचं देवीवर निर्माण झालेलं प्रेम आणि त्यांच्या विवाहाची गोष्ट राजा बिंदूसारला आवडली नाही. तो परधर्मीय विवाह वाटला. म्हणूनच राजा बिंदूसारचा सम्राट अशोकाच्या विवाहाला विरोध होता.            वडील बिंदूसारचा सुशीम हा लाडका मुलगा. तो जसजसं सांगत असे आपल्या वडीलांना सम्राट अशोकाबद्दल. तसतसे बिंदूसार वागत होते. पुढे ज्या तक्षशिलेचा सुशीम राज्यपाल होता. त्याच तक्षशिलेचं बंड मोडण्यासाठी राजा बिंदूसारनं सम्राट अशोकांना पाठवलं. तेही बंड सम्राट अशोकांनी मोडलं. अवंतीमध्ये निर्माण झालेलं बंडही सम्राट अशोकांनी मोडलं. त्यातच त्यांची झालेली वाहवा सहन न झाल्यानं त्यांना अज्ञातवासात पाठविण्याची कुरघोडी सुशीमनं आपल्या वडीलांजवळ केली. तिही गोष्ट बिंदूसारनं पार पाडली व उज्जयिनीला पाठविण्यापुर्वी सम्राट अशोकाला त्यापुर्वी एकदा कलिंगला पाठवलं. जे कलिंग एक स्वतंत्र राज्य होतं.           कलिंगमध्ये अज्ञातवासात राहतांना त्याची भेट एका कोळी समुदायातील कारुवाकीशी झाली. कोणी म्हणतात की कारुवाकी कोळ्याची पुत्री नसून राजकन्या होती. तिही सौंदर्यवतीच होती. तिच्यावर अशोकाचं प्रेम निर्माण झालं होतं. तसा तो तिच्यावरच प्रेम करु लागला होता. परंतु ते प्रेम काही क्षणच टिकलं. तद्नंतर उज्जयिनीला जे बंड झाले. ते बंड मोडण्यासाठी सम्राट अशोकाला कलिंगमधून राजा बिंदूसारनं बोलावणं पाठवलं होतं. अन् सम्राट अशोकांनी आपल्या चातुर्यानं उज्जयिनीचं बंड मोडून टाकलं. त्यानंतर सम्राट अशोकानं देवीशी विवाह केल्यानंतर त्यांना पाटलीपुत्रला येण्यास रोक लावली. ज्यातून सम्राट अशोक हे उज्जयिनीतच स्थायीक झाले.          कोणी म्हणतात की देवीशी सम्राटाचं झालेलं प्रेम हे त्याचं पहिलं प्रेम होतं. परंतु ते पहिलं प्रेम नसून त्यांचं पहिलं प्रेम हे कारुवाकीशी झालं होतं. जेव्हा उज्जैनला येण्यापुर्वी त्यांना कलिंगला अज्ञातवास भोगण्यासाठी पाठवलं होतं. परंतु त्यावेळेस सम्राट अशोकाचं जरी कारुवाकीवर प्रेम झालं असलं तरी तो तिच्याशी विवाह करु शकला नाही. त्याच्या विवाहाची इच्छा तिथंच खुंटली होती.          सम्राट अशोकाचा देवीशी जो विवाह झाला. तो विवाह त्याच्या जीवनातील पहिला विवाह होता. त्यानंतर बरेच दिवस ते उज्जयिनीतच राहिले. त्यातच मगध साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र ठरली तर सम्राट अशोकानं उज्जयिनीला आपली राजधानी बनवून मगधच्या उपराजधानीचा दर्जा दिला. पुढं कलिंगमध्ये जेव्हा बंड झाले. तेव्हा तोही बंड मोडण्यासाठी राजा बिंदूसारनं सम्राट अशोकाशी बोलत नसतांनाही कलिंगला पाठवलं. ज्यात कलिंगला जाताच त्यांचं कारुवाकीवर गतकाळात निर्माण झालेलं प्रेम उफाळून आलं. आता त्यांना तिच्याशिवाय क्षणभरही दूर राहावसं वाटत नव्हतं. तिची केव्हा केव्हा भेट घेतो व केव्हा केव्हा नाही. असं त्यांना होवून गेलं होतं. ज्यातून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारुवाकीची भेट घेतली.          ती सागरकिनाऱ्यावरील भेट. तशा भेटी आधीही बऱ्याच झाल्या होत्या अशोकाशी कारुवाकीच्या. तशा त्या भेटी त्यांना आठवत होत्याच. परंतु आता ही भेट त्याच भेटींवर मुलामा चढविणारी होती. बऱ्याच दिवसांनंतर कारुवाकीची भेट झाल्यानंतर त्यांच्या प्रेमात सुवास निर्माण झाला होता. तशातच ते देवीला विसरले काही क्षण व ते कारुवाकीला म्हणाले,          "कशी आहेस?"          "ठीक आहे."          "आमची आठवण येत होती काय?"          "होय. तुमच्याविणा आमचा दिवसही चांगला जात नव्हता."          "आणि माझाही दिवस तसाच जात होता."          "परंतु आपण माझा विश्वास तोडून निघून गेले. त्याचं वाईट वाटलं मला. कुठं गेले होते?"           "आम्ही राजपरीवारातील. आम्हाला कुठंही जावं लागतं काही कार्यानिमीत्य. वेळेवर ठरलेले बेत आम्ही कुणालाही सांगू शकत नाही. सांगताच येत नाही. विश्वासही करता येत नाही. तसंच जावं लागलं आम्हाला एकाकी सोडून, न सांगता अन् पुर्वसुचना न देताही."           "कुठं गेले होते?"           "उज्जयिनीत बंड उठलं होतं. त्याच बंडाचा बिमोड करण्यासाठी जावं लागलं होतं आम्हाला."           "होय का."           "होय. परंतु आता आपणाला सोडून नाही जाणार आम्ही. आता आपल्याला राणी बनवून पाटलीपुत्रलाच घेवून जाणार थेट."          ते कारुवाकीसोबत सम्राट अशोकाचं बोलणं. त्या बोलण्यातून त्याच्या मनातील प्रेम झळकत होतं. तसं त्यांचं ते दुसरं लग्न होणार होतं तिच्यासोबत. तशी त्यांना एक पत्नी होती. दोन मुलंही होती. परंतु त्या गोष्टीवर पडदा टाकून ते कारुवाकीबरोबर प्रेम करु लागले होते.                       ******************४************************          दिवसामागून दिवस जात राहिले. कारुवाकीचं प्रेम वृद्धींगत होत गेलं. त्यातच त्याच प्रेमातून त्यांनी आपला विवाहही साजरा केला. तद्नंतर कलिंगमध्येच असतांना त्यांना कळलं की त्यांचे वडील राजे बिंदूसार मरण पावले. त्यानंतर मरण धोरण साजरे करुन सम्राट अशोक कलिंगला परत गेले.           पित्याचा मृत्यू. त्यांचा अंत्यविधी पार पाडून सम्राट अशोक कलिंगला आपली पत्नी कारुवाकीसोबत राहू लागले होते. तसे काही दिवस गेले. काही दिवसानंतर त्यांना कळलं की त्याची आई धर्मा, जी पाटलीपुत्रला राहात होती. तिची त्याच्याच सावत्रभावानं द्वेषातून हत्या केली.            ती आई. ज्या आईनं सम्राट अशोकाला जन्म दिला. त्या आईची केलेली सावत्र भावांनी हत्या. ती हत्या सम्राट अशोकांना खलत होती. वाटत होतं की आपण आपल्या आईच्या हत्येचा बदला घ्यावा. मन काही स्वस्थ बसू देत नव्हतं. अशातच त्यांनी ठरवलं. ठरवलं की आपणही आपल्या संपुर्ण सावत्र भावाची हत्या करावी व संपुर्ण मगधची सत्ता ताब्यात घ्यावी.           धर्मा....... सम्राट अशोकाची आई. त्या आईचा त्यांच्यात सावत्र भावांनी द्वेषभावनेतून केलेली हत्या. अन् नुकताच सम्राटाच्या मनात आलेला त्यांच्या आपल्या आईच्या हत्येचा बदला. शेवटी त्या गोष्टीच्या संधीची ते वाट पाहात होते. अशातच सावत्र भावाच्या हत्येची संधी त्यांना चालून आली व तशी संधी त्यांना चालून येताच ते पाटलीपुत्रला पोहोचले व त्यांनी आपल्या सर्वच सावत्रभावाची हत्या करुन मगधचं राज्य हातात घेतलं. आता सम्राट अशोकच मगधचे राजे म्हणून उदयाला आले होते.         सम्राट अशोक मगधच्या राजगादीवर बसताच त्यांनी साम्राज्य विस्ताराचं धोरण अवलंबलं. त्यांनी पाटलीपुत्रलाच आपली राजधानी बनवली. त्यानंतर तिथं ते आपली प्रिय पत्नी कारुवाकीला घेवून आले. त्यातच कारुवाकीला पाटलीपुत्रला ठेवून सम्राट अशोक दिग्विजयासाठी मगधच्या बाहेर पडले. त्यांनी नेपाळ, अफगाणिस्तानच नाही तर भारताच्या बाहेरील भागही आपल्या ताब्यात घेतला. त्यातच त्यांनी स्वतःचं राज्यभिषेक करण्याचं ठरवलं. परंतु राज्याभिषेक करीत असतांना त्यांच्या मनात एक प्रश्न खटावत होता. तो प्रश्न होता कलिंगचा. कलिंगचं राज्य आजही स्वतंत्र होतं व त्या कलिंगला कोणीही जिंकलं नव्हतं. तसंच ते राज्य अतिशय महत्वाचं राज्य होतं.            तो दिग्विजयाचा विषय. तसा तो जैनधर्मीय राजा. त्यांना कलिंग राज्य जिंकायचंच होतं. त्याशिवाय सम्राटांचा सम्राट, हे राजपद मिळणार नव्हतं. तशी महत्वाकांक्षाही सम्राटाच्या मनात होती.           ते कलिंग राज्य. ते कलिंग राज्य हे खनिज संपत्तीनं विपूल होतं. त्या कलिंग राज्यात संपन्नता होती. तशाच तेथील सीमा सागराला लागून होत्या. ज्यातून सागरी व्यापार  चालू शकत होता.           ते कलिंग राज्य. त्या कलिंगचं युद्ध हे इसवी सन पुर्व २६१ ला लढलं गेलं. ते युद्ध मौर्य साम्राज्य व कलिंग यांच्यामध्ये लढलं गेलं. म्हणतात की कलिंगचं युद्ध हे खनिज संपत्तीसाठी वा व्यापारासाठी लढलं गेलं. परंतु कलिंगचं युद्ध हे जुन्या वैमनस्यातून लढलं गेलं. अर्थातच कलिंग आणि मौर्य यांच्यात जुनं वैमनस्य होतं.        कलिंगवर जुन्या काळात चंद्रगुप्त मौर्य याने युद्ध केलं होतं. ज्यात चंद्रगुप्त मौर्यांना पराभव पत्करावा लागला होता. शिवाय कलिंग साम्राज्य त्या काळात मगधएवढंच महान साम्राज्य होतं. त्या साम्राज्याला सहजासहजी जिंकणं म्हणजे तारेवरची कसरतच होती. त्यातच असं साम्राज्य मगधच्या जवळपास असणं काही बरोबर नव्हतं. कधीकाळी कलिंग मगधलाच घशात टाकेल. ही भीती नाकारता येत नव्हती. शिवाय सागरी मार्गावर जात असतांना कलिंग हे रस्त्यातील ठिकाण होतं. त्यातच त्यांचीच परवानगी घ्यावी लागत असे.           सम्राट अशोकांनी कलिंगवर युद्ध करतांना तेथील परिस्थितीचा अभ्यास होता. कारण त्यांना त्यांच्या वडीलांनी गतकाळात जो अज्ञातवास दिला होता. त्या अज्ञातवासात राहात असतांना ते वेषांतर करुन कलिंगलाच राहिला होते. ज्यातून ते  कुठे राहात आहे. हे सुशीमलाही माहीत झालं नव्हतं. याच काळात सम्राट अशोकांनी कलिंगचा अभ्यास केला. त्यातच त्यांना तेथील रहिवाशी असलेली त्यांची पत्नी जी मिळाली होती. तिचा जन्मच मुळात कलिंगचा असल्यानं आपण ते युद्ध जिंकूच ही अपेक्षा होती. शिवाय प्रत्यक्ष युद्ध करतांना सम्राट अशोकांनी सर्वप्रथम तेथील राजाला एक पत्र पाठवलं व त्यात समजुतीनं कलिंग आम्हाला द्या. नाहीतर आम्ही कलिंग जबरदस्तीनं घेवू असंही लिहिलं होतं.         कलिंग हे स्वतंत्र राज्य होतं व ते त्याच काळात भरभराटीस आलेलं एक अतिभव्य राज्य होतं. त्या राज्याचा राजा हा पद्यनाभन होता.         कलिंग जिंकण्याची सम्राट अशोकाची इच्छा. त्यातच त्यांनी कलिंग जिंकण्यासाठी रणनीती आखली व तेथील विद्यमान राजा पद्यनाभनला एक संदेश पाठवला. परंतु पद्यनाभननं तो प्रस्ताव नाकारला.          कलिंगवरुन आलेला नकार. सर्व राजांनी मगधचं मांडलिकत्व स्विकार केलं होतं. परंतु कलिंगनं तसं मगधचं मांडलिकत्व स्विकारण्यास नकार दिला होता. त्यातच कलिंगही स्वतःला कमजोर समजत नव्हतं. शेवटी युद्ध थोपलं गेलं व कलिंग आणि मगधची सेना धौली गंगा नदीदरम्यान एकमेकांसमोर उभी राहिली. तसं युद्ध सुरु झालं.         ते युद्ध व त्या युद्धात मगधचे लाखो सैनिक होते. त्यातच कलिंगही काही कमजोर राज्य नव्हतं. त्यांचेही लाखो सैनिक होते.          सम्राट अशोकाचे सैन्य लढत होते कलिंगच्या सैन्यांशी. ज्यात कलिंगच्या सैन्याची ताकद कमी पडू लागली होती. त्यातच सम्राट अशोकांच्या सैन्यात पायदळ, घोडदळ आणि हत्तीदळाचेही सैनिक होते. ते निष्णांत होते युद्ध जिंकण्यात. ज्यातून कलिंग युद्ध हारलं. तो नरसंहार व त्या नरसंहारानं रक्तपात झाला. ज्या रक्तपातानं धौली गंगा नदीही लाल रंगानं वाहू लागली होती.            ते कलिंग युद्ध व त्या कलिंग युद्धात झालेला नरसंहार. तसा नरसंहार बरेच वेळेस सम्राट अशोकानं पाहिला होता. परंतु आतापर्यंतच्या काळात कधीच तो व्यथीत झाला नव्हता. परंतु आज त्यांना थकल्याथकल्यासारखं वाटत होतं. वाटत होतं की आपल्याला लोकांना जीवन देता येत नाही तर मरण देणे सुद्धा योग्य नाही.           ते युद्ध व त्या युद्धात लाखो लोकं मरण पावलेले. सम्राट अशोकांचं मन व्यथीत झालं होतं. तसं त्यांचं मन त्या हिंसेनं परीवर्तीत होत चाललं होतं. वाटत होतं की आता युद्ध सोडावं व अहिंसेचा मार्ग अनुसरावा.            ते कलिंग युद्ध. त्या युद्धात सम्राट अशोकांना विजय मिळाला होता. त्यातच समुद्रात व्यापार करण्याची संधीही बऱ्या बोलानं मिळाली होती. परंतु तो मनातून हरला होता.           सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील तिसरे शासक. ते चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखले जातात. त्यांनी इसवी सन पुर्व २७२ ते इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखलं जातं. सम्राट अशोकांना भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचे लोककल्याणकारी राजे म्हणतात. ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत शासनकाळात त्यांनी पश्चिमेकडे  अफगाणिस्तान व इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.          सम्राट अशोकाचं राज्य भारत, अलिकडील पाकिस्तान,  नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान पर्यंत पसरले होते. सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमाणसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले, अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात. चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होवून गेले. ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत. परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या रांगेतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले की त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा  पाकिस्तान, अफगाणिस्तान  पूर्वेकडे  बांग्लादेश  ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण,  ताजिकिस्तान आणि  तुर्कमेनिस्तान  या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.  अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर  कलिंग काबीज झाला. जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. शिवाय त्यांचे तातश्री चंद्रगुप्त मौर्यही कलिंगची एक लढाई हारले होते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात, तो मगध होता व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्विकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतः बौद्ध धम्म स्विकारुन स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारात समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात नव्हे तर इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात. त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणाली यांचे खंदे पुरस्कर्ते होते. म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकांनी आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकांचे शिलालेख हे मौर्य इतिहासातील अतिशय महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जातात. त्यांचे शिलालेख सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले. त्यांना सम्राट अशोकाचे शिलालेख सन १८३७ मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. सम्राट अशोकाचे शिलालेख  हे ब्राह्मी, खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्याविषयीची माहिती ही अभ्यासकांना मिळालेली आहे. अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवनाम प्रिय' असे संबोधले आहे.            ते कलिंग युद्ध व त्या कलिंग युद्धानंतर त्यांचे झालेले मनपरिवर्तन, त्यांनी स्विकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हे त्या काळातील भारतातील पहिले चक्रवर्ती राजे होय. सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय.          सम्राट अशोकांनी प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले. आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली. प्रजा कल्याणाच्या हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे  मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आला. विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट अशोक यांनीच केला. त्यातच चंद्रगुप्तानंतर सम्राट अशोक यांनी केलेलं कार्य महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली. शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्यांनी चालना दिली.  त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले.  स्वतःच्या मुलांना त्यांनी धर्म प्रसारासाठी श्रीलंकेत पाठवले.           धम्मचक्र परिवर्तन करणारे अशोक हे प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक आहेत. इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल. मानवी कल्याणासाठी अथक प्रयत्न करणारा प्रजा हीत दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी त्यांचा गौरव केला आहे. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्यांना मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकांनी कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे ते पुढे गौतम बुद्धांच्या रांगेत बसतात.          सम्राट अशोक हे बिंदुसारचे पुत्र होते. बिंदुसार यांना अनेक पत्‍नी होत्या. त्यातील धर्मा ही अशोकांची आई होती. अशोक हे बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरे होते. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यांच्यावरील द्वेष वाढला होता. चंद्रगुप्त मौर्यांनी जेव्हा जैन धर्म स्विकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्यांनी तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकांनी आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होते. तसेच चांगले शिकारीही होते. त्यांना तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्यांच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्यांना अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्यांनी अगदी सहजपणे पार पाडले. अशोकांच्या आईचे नाव काही ठिकाणी  चंपा असेही नाव घेतले जाते. ती एका राज्याची मुलगी होती.  प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकांना मान्यता मिळालेले आहे.  तत्कालीन अशोकांचे शिलालेख वास्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत.        सम्राट अशोकांच्या काळातील मौर्य साम्राज्याचा  विस्तार अशोक जसजसे सेनानी म्हणून परिपक्व होत गेले. तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील द्वेषही वाढत गेला. अशोकांनी मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. तसेच त्यांच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमू लागली होती. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुशीम हा अशोकांचा नेहमीच द्वेष करण्यात आघाडीवर होता. सुशीमने अशोकांना व्यस्त ठेवण्यासाठी ते अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते नव्हे तर सुशीमनं स्वतः घडवून आणले होते.  त्यानंच वडीलांजवळ कुरघोडी करुन त्यांना, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला. घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुशीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले. या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्यांनी पाळला. या काळात अशोकांनी कलिंगमध्ये जावून वास्तव्य केले. या काळात त्यांची कारुवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी पत्‍नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत. मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेले व एका लढाईत घायाळ झाले. त्या काळात असे मानतात की सुशीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. त्याचवेळेस अशोकची शुश्रूषा करण्यासाठी  बौद्धधर्मी  परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. ज्यात स्वतः देवी एक परिचारिका म्हणून काम करीत होती. म्हणतात की तिचा पहिला परीचय हा परीचारीका म्हणून अशोकशी झाला. तद्नंतर देवी हिच्याशी अशोकाचं प्रेम झालं व त्यानंतर विवाह झाला.            देवी ही विदिशा येथील एका व्यापा‍ऱ्याची मुलगी होती. ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्यांनी अशोकला पाटलीपुत्रमध्ये राहण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करुन टाकले. अशोकची पुढील काही वर्षे शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सन पूर्व २७३ मध्ये निधन झाले व त्यानंतर सुशीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्‍नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग एक असा पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्यांची ओळख तयार होऊ लागली.           राज्यरोहण  झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्यांनी एका साम्राज्याच्या छत्र छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणारा चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो.          कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा  तसेच छत्तीसगढ  व झारखंड मधील काही भाग येतात. कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती. ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण होते, ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले. कारणे अनेक होती. परंतु ती अनेक असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ च्या सुमारास सुरू झाले व २६१ ला संपले. सुशीमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले.          सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जावून अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले. परंतु अशोकाच्या सैन्य ताकदीपुढं व सैनिकी डावपेचापुढे त्यांचे काही चालले नाही. अशोकाने पुढे संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे एक लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले. कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्माचा स्विकार केला व एक नवा विचार स्विकारून त्यांनी  आपली राज्यव्यवस्था अधिक सक्षम आणि दृढ केली.  त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम राज्य व्यवस्थेवर झाला.           ते कलिंग युद्ध. ते करण्यापुर्वी त्यांच्या विचारात थोडं परीवर्तन झालंच होतं. ते परीवर्तन त्यांच्याच पत्नीनं म्हणजे देवीनं केलं होतं. जिच्यावर बौद्ध धम्माचा प्रभाव पडला होता. त्यातच जेव्हा जेव्हा लढाई करुन सम्राट तिला भेटायला येत असे. तेव्हा तेव्हा त्यांना ती समजावीत असे की आपल्याला जीवन देण्याचा अधिकार नाही तर जीव घेण्याचा का अधिकार असावा. एकदाचा प्रसंग. सम्राट अशोक असेच एका राज्यावरील युद्ध जिंकून तिच्याकडे आले होते. त्यांनी आपल्या पराक्रमाची स्तुतीही तिला सांगीतली होती. अन् सांगीतलं होतं की आपण किती कुटनीतीनं युद्ध जिंकतोय. युद्ध जिंकणं ही कलाच आहे व आपल्यात युद्ध जिंकण्याची कला आहे. आता आपण कलिंगशी युद्ध करणार आहोत. अन् जिंकणारही आहोत.           ते युद्ध व त्या युद्धात मिळविलेला विजय सम्राटानं बयाण करताच देवी त्यांना म्हणाली,          "राजन, आता आपण एक राजा नाही तर एक पती झाले आहात आणि त्यातच आपण दोन लेकराचे पिताही. आता आपल्याला असे युद्ध करुन शत्रू वाढवणं परवडणारं नाही. आपण असं विनाकारणचं शत्रुत्व सोडून द्यावं व असं युद्ध वैगेरे करणं सोडून द्यावं."          ते तिचं बोलणं. त्याचा त्यांना भयंकर राग आला होता व त्याच रागाच्या भरात ते म्हणाले,          "युद्ध...... युद्ध करणं हे एका राजाचं कर्तव्य असतं. राजा आणि युद्धाचा फार जवळचा संबंध आहे. युद्ध करणं आणि ते जिंकणं हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे. जर मी राजा म्हणून ते कर्तव्यच पार पाडत नसेल तर कोणीही राजा येईल आणि कोणीही या मगध नगरीला गुलाम करुन जाईल.  देवी, आपल्याला असं मगधला गुलाम झालेलं पाहावसं वाटतं काय?"           "मला तसं वाटत नाही व मी तसा विचारही करणार नाही राजन, परंतु?"          "परंतु ....... परंतु काय? अहो, माणसाची ओळखच आहे की जो व्यक्ती वात्रट स्वभावाचा असतो. त्या व्यक्तीच्या वाट्याला कोणीही जात नाही. आता माझंच पाहा. एक कलिंग राज्य सोडलं तर सर्वच राज्य माझ्या राज्याचे मांडलिक झाले आहेत. अन् मी तुला विश्वास देतो. ते कलिंग राज्यही एक ना एक दिवस माझं मांडलिक झाल्याशिवाय राहणार नाही."         "राजन, आपलं सगळं बरोबर आहे. परंतु त्या कलिंगवर स्वारी नाही केली तर तुम्हाला चक्रवर्ती म्हणणार नाहीत का? आपल्यात कलिंगला जिंकायचंही सामर्थ्य आहेच राजन, परंतु?"          "काय परंतु देवी?"          "राजन, जर कलिंगला जिंकण्याच्या प्रयत्नात......." देवी बोलता बोलता थांबली. ती दुःखी झाली होती. तिला भविष्याचं दुःख वाटत होतं. तोच सम्राट तिला म्हणाले,          "काय झालं देवी? अशा थांबल्या का? बोला, बोला खंत व्यक्त करा."          "महाराज, कलिंग जिंकता जिंकता आपण वीरगतीस प्राप्त झालात तर...... तर माझं आणि आपल्या या लेकराचं कसं होणार? कोण आम्हाला सांभाळून घेणार!"          " प्रिये, मृत्यू हा प्रत्येक राजाच्याच पाचवीला पुजलेला असतो. प्रत्येक राजाचा आयुष्यात मृत्यू येतोच. कोणाच्या नशिबात लवकर येतो आणि कोणाच्या नशिबात उशिरा. मृत्यूनं कोणालाच सोडलेलं नाही. तेव्हा मृत्यूमुळं घाबरु नये राजानं. अन् मी तुला विश्वास देतो की मी कलिंग युद्धातही मरणार नाहीच. कलिंग जिंकणारच. शांततेच्या मार्गानं नाही तर युद्धाच्या मार्गानं जिंकणारच आहे कलिंग. कलिंग जिंकणं हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पुर्ण करणारच."         "परंतु राजन, त्या कलिंगमध्ये असं काय दडलं आहे की ते जिंकावंसं वाटतं आपणास."         "प्रिये, ते कलिंग. त्या कलिंगात माझ्या तातश्रीच्या स्मृती दडलेल्या आहेत. त्यांनी एकदा कलिंगशी युद्ध केलं होतं. परंतु त्यांना अपयश आलं."           "हो, ते सगळं बरोबर आहे आणि हेही बरोबरच आहे की ते हारले म्हणून आपण जिंकणारच. परंतु आपण तिथे जिंकणारच. याची शाश्वती काय? महाराज, आपला नाद हा खुळा आहे. हा नाद सोडून द्या. काही दडलं नाही त्या कलिंगात."         "देवी, तुला माहीत नाही, कलिंगात काय दडलं आहे ते? अहो, त्या सागरी किनाऱ्यावर व्यापार करायचा झाल्यास तो आम्हाला करता येत नाही. अन् त्या सागरावर व्यापार करायचा झाल्यास आम्हाला कलिंगचीच परवानगी घ्यावी लागते. जर कलिंगनं परवानगी दिली नाही तर आम्हाला सागरावर जाताही येत नाही. शिवाय त्या सागर किनाऱ्यावर जो रस्ता जातो ना. तो रस्ता त्या कलिंगमधूनच जातो."          "राजन, ते आपलं सगळं बरोबर आहे. कलिंगनं आपल्याला कधी थांबवलं का व्यापार करण्याविषयी. अहो महाराज, एवढं आपल्या तातश्रीनं त्यांच्याशी युद्ध करुनही बिचारं कलिंग आपल्याला व्यापार करण्याची परवानगी देते. ही किती मोठी गोष्ट आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. अहो, शांततेच्या मार्गानं सगळं होतं. तथागत म्हणतात, प्रेम द्या, प्रेम घ्या. अहो, महाराज,  प्रेमानं सगळंच जिंकता येतं. मीही आपल्याला भेटली ती प्रेमानच ना. आपण जोर जबरदस्तीही केली असती माझ्याशी आणि जोर जबरदस्तीनं मला आपण उचलूनही आणलं असतं. परंतु ते प्रेम राहिलं असतं का माझ्यात. जे आता आहे. अहो, महाराज,  त्यावेळेस माझ्या मनात आपल्याबद्दल घृणाच राहिली असती. बरोबर की नाही. अहो महाराज, जावू द्या कलिंगला जिंकण्याचं. काय ठेवून बसलात. प्रेमानं राहा."           "राणीसाहेबा, ते सगळं बरोबर आहे आपलं. परंतु राणीसाहेबा, कलिंग. हे बलवान राज्य आहे आणि तेही आपल्या लगतचं. असं लगतचं राज्य आपल्या शेजारी असणं बरोबर नाही. जर मी आज कलिंगला जिंकलं नाही तर उद्या कलिंग आम्हाला जिंकेल. जिंकेल की नाही?"           "असो, जेव्हा जिंकेल, तेव्हा पाहायचं ना?"          "देवी, तुझं सगळं बरोबर आहे. परंतु?"           "आता आणखी काय उरलंय परंतुत. सोडा तो आपला निर्णय आणि सोडा ते कलिंग जिंकण्याचं स्वप्न. शांतता पाळा."           "देवी, एक सांगतोय मी. मला चक्रवर्ती सम्राट बनायचं आहे. जर मी कलिंगला जिंकलो नाही तर कदाचीत मी चक्रवर्ती सम्राट बनणार नाही. मला सम्राटांचा सम्राट बनायचं आहे. ते माझं स्वप्न आहे आणि ते मी पुर्ण करणारच. त्या चक्रवर्ती सम्राट पदाच्या पायरीच्या मी फक्त नि फक्त एकच पाऊल मागं आहे. जर मी आता ते पाऊल मागं फेकलं तर कदाचीत इतिहास मला माफ करणार नाही. प्रिये, मी जर कलिंगची लढाई लढलो नाही तर कोणीही मला भगौडा म्हणेल आणि ते मी कधीही सहन करु शकत नाही."           देवी ऐकत होती सम्राट अशोकाचं बोलणं. त्यांना आपल्या परीनं समजवीत होती. परंतु तो काही समजू शकत नव्हता. अशातच देवीनं त्यांना मृत्यूचीही भीती दाखवली होती. कदाचीत आपणाला मृत्यू येईल आणि असा मृत्यू आलाच आणि आपली कलिंग जिंकण्याची अपेक्षा पुर्ण न झाल्यास आपण भूत बनून आम्हाला छळाल. हेही समजावून सांगीतलं होतं. परंतु सम्राट काही आपल्या धैर्यावरुन टस चे मस झाले नव्हते. त्यांचा निर्धार पक्का होता. मृत्युविषयी बोलतांना सम्राट अशोक तिला म्हणाले,           "देवी, मृत्यू आहे, पण भूत नाही. अन् असं जर कोणी म्हटले तर आम्ही त्यावर विश्वास करीत नाही. कारण लोकांच्या मनामध्ये जसा मृत्यू निवास करतो. तसा भूतही निवास करीत असतोच. त्यामूळे तसं मानणं साहजीकच आहे. परंतु मृत्यू हा वास्तविक सत्याचे स्वरुप आहे तर भूत ही एक भ्रामक कल्पना. मात्र आपण दोघांनाही घाबरत असतो, मरेपर्यंत आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही तेच विचार सांगून घाबरवीत असतो. जे आपण करायला नको असतं."         ते सम्राटाचं बोलणं. परंतु त्यावर उत्तर देत ती म्हणाली,            "हो ते सगळं बरोबर आहे महाराज, परंतु मृत्यू....... मृत्यू सत्य आहे व मृत्यूवर प्रेमही तेवढंच करायला हवं. जर आपण मृत्यूवर प्रेम केलं तर येणारा मृत्यू हा आपल्याला गंभीर वाटणार नाही. परंतु असा मृत्यू येवू नये आपणास की ज्यातून आपली प्रतिमा धुळीस मिळेल. लोकं म्हणतील की हाच तो सम्राट, ज्याला कलिंग जिंकण्याची इच्छा होती. जो आता धारातिर्थी पडलाय. कदाचीत स्मशानभुमीही आपलं नाव घेणार नाही."        "देवी, स्मशानभुमीबद्दल काय बोलावे. स्मशानभुमी अशी गोष्ट असते की त्या स्मशानभुमीला टाळून लोकं जात असतात. कोणी स्मशानभुमीत जायलाच पाहात नाहीत. त्यातच नतमस्तकही व्हायला पाहात नाहीत.  परंतु स्मशानभुमी हा असा परीसर असतो की साधारणतः सहज जरी तिथं गेलं आणि त्या स्थळाला नतमस्तक झालो तर जी शांतता मनाला लाभते. ती शांतता शब्दात वर्णन करताच येत नाही. त्या गोष्टीचा ज्यांना अनुभव येतो. त्यांना खरंच जीवनाचा अर्थ कळलेला असतो. मी तर मृत्यूवर व स्मशानभुमीवरही प्रेम करतो. म्हणूनच मी मृत्यूलाही घाबरत नाही. मग स्मशानभुमी माझं नाव घेवो अगर न घेवो. अहो राणीसाहेबा, मरणानंतर लोकं माझ्या शवाचं काय करणार? हे माहीत नाही मला. कदाचीत स्मशानभुमी माझ्या शवाला नशीब होते की नाही. हे कोणं पाहिलं."        "महाराज, बरोबर आहे आपलं म्हणणं. आपण स्मशानभुमीत अशी सहज भेट द्यायला जात नाही. जातो, कोणी मरण पावला असेल तर त्याला अग्नी द्यायला. पशुपक्षात तिही गोष्ट नाही. ते बिचारे मरतात. काही प्राणी जिथे मरण पावतात. तिथंच ते सडत असतात. त्यांना विशिष्ट अशी स्मशानभुमी नसते व त्यांना विशिष्ट अशा स्मशानभुमीत गाडलं जात नाही वा त्यांचा अंत्यसंस्कार केला जात नाही. मात्र मानव हा असा प्राणी आहे की त्याचेसाठी विशिष्ट अशी जागा स्मशानभुमी म्हणून प्राप्त झाली आहे व तो स्मशानभुमीचा अनुभव घेवू शकतो. परंतु त्यासाठी आपलं काही पुण्यकर्म असेल तर...... जो पुण्यवान पुरुष आहे. तोच स्मशानभुमीत जावू शकतो."          "प्रिये, याचा अर्थ ते पशूपक्षी पुण्यवान नसतात काय?"          "असतात, परंतु त्यांच्या नशिबात स्मशानभुमी नसतेच."          "मग आपणच का अपेक्षा करावी स्मशानभुमीची? अहो,  स्मशानभुमीत काही हौसे, नवशे, गवसे येतात. त्यातच ती इतरांची प्रेते जळत असतांना विशिष्ट अशा गोष्टी करतात. जे कधी विवाहाच्या वेळेस येत नाहीत. तेही मरणाच्या वेळेस प्रेताला सार करायला आवर्जून येत असतात. म्हणतात की त्याचा तो अखेरचा चेहरा. तो यानंतर कधीच मनुष्यदेहात दिसणार नाही. अन् त्यांचंही ते खरंच असतं. तसा मनुष्यदेहातील वास्तविक चेहरा पुन्हा कधीच दिसत नाही. शिवाय असा मनुष्यदेहातील चेहरा दिसत नाही असे नाही. तो दिसतो, एखाद्यावेळेस स्वप्नात, कधी वास्तवातही. परंतु तो आपला भ्रम असतो. कारण तो वास्तविक शरीराचा चेहरा नसतोच."         "महाराज, काही लोकं सहज स्मशानभुमीत जात नाहीत. त्याचं कारण असते त्यांचे विचार. ते विचार अंधश्रद्धाळू स्वरुपाचे असतात. जशी तिथं भूतं नाचत असतात असं लोकांचं म्हणणं असतं. म्हणतात की स्मशानभुमीत जावू नये एकटं. कारण तिथं मेलेल्या माणसांची भुतं असून ती आपल्याला छळतात. विचार असा की स्मशानभुमीत कोणतीच भूतं नसतात व ती नसल्यानं कोणालाही छळत नाही. तो एक आभास असतो व तो आभासच आपल्याला छळत असतो असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही."         "देवी, तेच तर तुला समजवतोय मी. स्मशानभुमीत भुतं असतातच. स्मशानभुमीत माणसांची भुतं असतात अशी कल्पना केली तर प्राण्यांचीही भूतं बनत असावीत. या कल्पनेला आकार मिळतो. मग प्राण्यांची ही भूतं त्यांना कापून खाणाऱ्या माणसांना का छळत नसावी? माणूस तर त्यांची हत्याच करतो ना. भूतं जर जगात असती तर माणसानं कोणत्याच प्राण्यांना कापून खाल्लं नसतं. आजही तुझ्या मतानुसार हिंसा अहिंसेचा विचार केला तर कित्येक माणसं आजही मांस खातात. काही प्राणी मांस खातात. वाघ, सिंहाचं अन्नच मांस खाणं असतं. जर आपण आपल्या म्हणण्यानुसार हिंसा हेच पाप आहे, असं मानलं तर मांस खाणाऱ्या  प्राण्यांना तडफडत मरण पत्करावं लागेल. देवी, प्रत्येक राजाचा धर्म आहे युद्ध करणं. राजानं युद्ध करणं सोडलं तर केवळ राजाच मरणार नाही. त्याचबरोबर मरेल त्याची प्रजा. अन् मरतील त्या तमाम सर्व प्रजाजनांच्या भावना. आता मला सांग, कोणत्या राजाला युद्ध करायचा आनंद वाटतोय. कोणत्या राजाला आपण स्वतः लढाई लढून मरण पत्करावसं वाटतंय. कोणत्याही राजाला आपल्या स्वतःचा जीव जाणं आवडत नाही. परंतु प्रजेसाठी व प्रजेच्या भावनेसाठी ते सगळं पाऊल उचलावं लागतं."         "महाराज, माझं म्हणणं तसं नाहीच. माझं म्हणणं आहे, स्मशानभुमीत लोकं जात नाहीत. कारण तेथे छळणारी भूतं व त्यांची भीती माणसांना वाटत असते. त्यातच दुसरा मुद्दा हा उपस्थित होतो, तो म्हणजे जो कोणी व्यक्ती स्मशानभुमीत वारंवार जात असेल वा त्या भुमीला नतमस्तक होत असेल, त्याला महान आत्मा समजलं जात असेल. तर तो वीरच ठरतो. अन् तोही वीर ठरतो. जो प्रजेसाठी लढतो. परंतु माझं मत आहे की युद्ध न करता विजय मिळवता येत असेल कलिंगवर. तर तो मार्ग शोधावा."           "प्रिये, मानलं जात असेल की स्मशानभुमीत जाणारा व्यक्ती हा वीर आहे. अन् हेही लक्षात घे की जो स्मशानभुमीत जातो. माहीत आहे, त्याला लोकं काय समजतात. त्याला समजतात की असा व्यक्ती हा तंत्र मंत्र जाणणारा आहे व तो त्या तंत्रामंत्रानं भूतांना वशमध्ये करु शकतो. ती ताकद त्याचेत असल्यानेच तो केव्हाही स्मशानात जावू शकतो. परंतु असं काही नसतंच. भूत प्रेत ही आपलीच आपण आपल्याच मनाशी केलेली संकल्पना असून त्याचं भय आपण अगदी लहानपणापासून आपल्या मुलांना दाखवत असतो. त्याचं कारण असतं, आपले विचार करणं. आपण ही भुमिका आपल्या लेकराबाबत ठेवत नाही की त्यानं स्मशानभुमीत जावं. तिथं नतमस्तक व्हावं. आपल्या लेकरानंही मृत्यूवर प्रेम करावं. परंतु आपण मृत्यूकडे एका शापीत नजरेनं पाहात असल्यानं आपल्यासोबत असंच घडत असतं. आपण मुलांना लहानपणापासून भूत असतं, हीच भीती दाखवत असल्यानं आपली मुलं लहानपणापासून भुतांना घाबरत असतात यात शंका नाही. याबाबत मी एक घडलेला प्रसंग सांगतो. मी लहान असतांना मलाही घरातून भूतं असतात. याचं बाळकडू मिळालं. त्यानंतर मी भूतं असतात हीच भावना धरुन मोठा होत गेलो. प्रसंगी असं घडत असतांना एक प्रसंग असाही घडला की माझी भुतावरील भीती दूर झाली. मला जेव्हा माझ्या वडीलांनी अज्ञातवासात पाठवलं. तेव्हा काही सवंगडी मिळाले होते मला. आम्ही सवंगडी लहान नव्हतोच. आम्ही लहान मुलं आज वयात आलो होतो. मला तर माझ्या अज्ञातवासात आईवडील दोघंही माझ्या सोबतीला नव्हते. जवळपास साधारणतः पंधरा, सोळा वर्षाचा झालो होतो मी. तो होळीचा दिवस होता व त्या दिवशी आम्ही ठरवलं. रात्र जागवायची आहे. काहीतरी खायला हवं. तसं दरवर्षीप्रमाणेच माझ्या सोबतीला जी मंडळी असायची. त्यांच्या घरची मोठी मंडळी झोपत असत व आम्ही उदंड स्वभावाचे असल्याने होळीच्या दिवशी संबंध रात्र जागत असू. अन् रात्र जागण्यासाठी दरवर्षी रानातील काही वस्तू वा फळं तोडून आणून खात असू. त्या आधारावर आम्हाला संबंध रात्र जागवता येत असे. याहीवेळेस आम्ही तसंच ठरवलं होतं. अशातच आम्ही रानात जाणार. तोच मी मित्रांना म्हटलं की मी घरातून तलवार घेवून येतोय. तुम्ही थोडं थांबा. मी घरी गेलो व लगेच तलवार घेवून आलोय. तशी मी सतत तलवार सोबत बाळगत असे. मला भीती वाटलीच तर तलवार सोबतीला असायचीच. परंतु मी जेव्हा आलोय. तेव्हा तिथं मुलं नव्हती. मुलं प्रसार झाली होती. त्यानंतर मला वाटलं की मुलं रानातच गेली असावी. अन् आपणही रानात जायला हवं. ती रानात फळं आणण्याची माझीच कल्पना. ती कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती. रात्रीचा एक वाजला होताच. तशी कल्पना करुन मी ठरवलं, आपण रानात जायचं. परंतु दुसरा विचार मनात आला. रानात जायचं. परंतु ती भूतं? मी माणसांना घाबरत नव्हतो आणि कधीच घाबरलो नाही. तलवारच होती माझ्या तातश्रीची माझ्याजवळ. परंतु भुतांना घाबरत होतो. मग ती भूतं ती जर आडवी आली तर...... तो विचार माझ्या मनात आला तर आपण घाबरायचं नाही. ती तलवार सोबतीला आहेच. आपणही प्रतिकार करायचा. असा विचार करुन मी एक तलवार सोबतीला घेतली होतीच व ती रानातील वाट चालू लागलो. मला तो रस्ता भयाण वाटत होता. तसा रात्रीचा पौर्णिमेचा चंद्र मला सुखकारकच वाटत होता. त्यानं आपला लख्खं प्रकाश जमीनीवर पाडला होता व ती जमीन उजळून निघाली होती. तसा एक नाला लागला. ज्या नाल्यात काजव्यांनी गर्दी केली होती. अशातच मी तो नाला पार केला. पुढं तेच स्मशान लागलं. ज्याची भीती बालपणापासूनच माझ्या मनात होती. कधी कहाणीमधून मी भूतं असतात हे तातश्रीनं सांगीतलेल्या कथेतून ऐकलं होतं. त्याची पुष्टी खुद्द आईवडील, बहिण, आप्त व मित्रानं केली होती. ज्या गोष्टी भयातून भरवल्या गेल्या होत्या माझ्या मनात. परंतु शिकत असतांना एक गोष्ट नक्कीच मनात भरली होती की हाडं चमकतात व ती चमकणारी वस्तू हाडांमध्ये असते. मग ते माणसांचं हाड का असेना. त्यातच मी थोडा पुढे गेलो. पुढे स्मशान होतं. ते स्मशान. त्या स्मशानाजवळ पोहोचलो. तशी मला भीती वाटायला लागली होती. परंतु त्या भीतीवर मात करुन मी पुढे सरसावलो. समोर पाहात पाहात. तेव्हा दूर पुढे एक झाड दिसलं व त्या झाडावर काहीतरी चमकतांना दिसलं. एक सरळ रेषा चमकत होती व तिचं चमकणं लुप्त होत होतं. अन् ज्या झाडावर ती लांब सरळ रेषा चमकत होती. तिथं एक प्रेत अलिकडील काळातच जळून गेलं होतं. तेव्हा तर फारच भीती वाटली. त्यानंच खाली पाहिलं असता खाली ज्या ठिकाणी प्रेत जाळलं होतं, त्याही भागात चमकत होतंच. ते चमकणं मी जाणून घेतलं होतं की ते हाडाच्या तुकड्याचं चमकणं आहे. परंतु झाडावरील लांब सरळ रेषा. ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी भीती मनात कितीही वाटत असली तरी मी मनात थोडीशी हिंमत भरत पुढची वाट चालू लागलो. आता अगदी प्रेत जाळण्याच्या ठिकाणाजवळ गेलो. तेव्हा कळलं की प्रेताचं एक हाड कोणी भामट्यानं झाडावरही लटकावून ठेवलं आहे. तेच हाड चमकत होतं. आजही मला आठवतो तो दिवस. त्या दिवसापासून माझ्या मनातील भुताची कल्पना निश्चीतच दूर झाली. पुढं मी बरंच ऐकलं भुतांबद्दल. शिवाय मी गतकाळातील राजा हरिश्चंद्राची कथाही ऐकली होतीच. माझ्या तातश्रीनं सांगीतलं होतं की राजा हरिश्चंद्र हा स्मशानभुमीतच राहायचा दिवसरात्र. त्यांना भुतांनी छळलं नाही. त्यांनी तिथंच स्मशानात निवास केला व अन्नही स्मशानात जळत्या प्रेताच्या अग्नीत भाजून खाल्ले. तेव्हा तर माझ्या मनातील राहिलेली भीती पुरेपूर दूर झाली.  भूत प्रेताची भीती. माणसानं जर भूताची कल्पना केली तर ती भीती वाटतेच. परंतु भीतीची कल्पना आपल्या मनात बाळगली नाही तर आपल्या मनातून भीती कायमची कमीच होवून जाते. त्यामूळं स्मशानात भूतं असतात. ते आपल्याला छळतात. असा विचार करणं म्हणजे आपल्याच मनात अंधश्रद्धा बाळगणं होय."         "होय, अशा प्रकारच्या अंधश्रद्धेनं आपलीच अधोगती होते. कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त होत नाही. आजची मंडळी ही कितीही म्हातारी होत असली तरी ती मंडळी अंधश्रद्धा बाळगतात. आजचा काळ पाहता, आजच्या काळातील लोकं बरेच सुधारलेले आहेत. तथागतांनी सुधरवलं सर्वांना, आपल्या विचारांनी सुधरवलं. त्यांचे विचार अहिंसावादी आहेत."          "परंतु एका राजाला शासन करतांना त्या विचारांचा फायदा नसतोच. माहीत आहे, आपण अशा अंधश्रद्धा सोडून द्यायला हव्यात. जर भूत आहे, भूत आहे, तर मेलेला व्यक्ती भूत बनून आपल्याला छळेल. असं जर एका राजानं बाळगलं तर कदाचीत राजा युद्धच करु शकणार नाही. तो विचार करेल की मी ज्या माणसांना मारतोय. तो माणूस भूत बनून मला छळेल. त्यापेक्षा मी कोणाचा जीव न घेतलेला बरा. प्रिये, आपण तथागताचे विचार आत्मसात केलेत. परंतु आपण जरी त्या विचारानं प्रभावीत झाले असले तरी आपल्या मनातून अंधश्रद्धा निघून गेलेल्या नाहीत. विशेष म्हणजे भूतप्रेत जगात आहे किंवा नाही, हे काही मला माहीत नाही व ते काही मी सांगत नाही. परंतु जी वस्तू आपण पाहिलीच नाही. त्या गोष्टीवर विश्वास ठेवून घाबरु नये. घाबरवू नये. आपल्या मुलांनाही तसं सांगू नये. हं, एवढंच मनात बाळगावे की सृष्टीतील जो जीव निर्माण झाला. तो नष्ट होणारच. मग तो दगड का असेना, दगडावरही पाऊस, वारा, थंडी, उष्णता याचा परिणाम होतो व त्याचा क्षय होतो. आपण तर माणसं आहोत. मृत्यू हा वेगवेगळ्या कारणानं येतो. निमित्तमात्र एक क्षण ठरतो. ज्याला पुरावा म्हणता येईल. मग आपण म्हणतो की त्यानं तसं केलं नसतं तर तो मरण पावला नसता. परंतु तसं काही नसतं. मरण हे येणारच असतं. जरी त्यानं तसं केलं नसतं तरी. आपण मृत्यू व भूताला घाबरतो. ज्यामध्ये मृत्यू वास्तविक सत्य आहे व ती चुकणारी वस्तूस्थिती नाही. तशीच भूत कल्पना ही सत्य नाही. मात्र त्या दोघांचाही आपण परस्पर संबंध लावून घाबरतो. हे बरोबर नाही. याचा अर्थ असा नाही की मृत्यूला आपण घाबरु नये. असं न घाबरता जाणूनबुजून एखाद्या हत्तीखाली जावे? असं न घाबरता जाणूनबुजून आपण आत्महत्या करावी? असं कोणीच करु नये. हं, मृत्यूवर प्रेम नक्कीच करावे. सहज येणाऱ्या मृत्यूवर. तरच आपल्याला मरतांनाही भीती वाटणार नाही. कारण मृत्यू ही अशी गोष्ट आहे की जी आपली सर्व प्रकारच्या व्याधी वा दुःखापासून मुक्तता करीत असते. जर ती वस्तू नसती तर आजचं आपलं जीवन हे किती दुःखमय स्वरुपाचं असतं, याची आपण कल्पनाही करु शकत नाही."         "ठीक आहे महाराज. आपण जे कराल, तेच योग्य. आपलं ध्येय ठरलं आहे. जा, विजयी व्हा. मला वाटत होतं की आपण कलिंगशी युद्ध करु नये. कलिंग एक ताकदवर राज्य आहे. त्यासाठी आपल्याला भुतांचीही भीती दाखवली. परंतु आपला निर्णय पक्का आहे. हे आता मला कळलं. आता मी कधीच आपल्या निर्णयाच्या आड येणार नाही."          एक राजा. जो आज जगाचा सम्राट वाटतो. त्या सम्राटानं केलेला महाराणी देवीला उपदेश. तो उपदेश मोलाचा होता. ती सम्राट अशोकाचं ऐकत होती. त्यातच तिनं त्यांना कलिंगच्या युद्धापासून सम्राटानं दूर जावं. कलिंगचं युद्ध करु नये म्हणून बराच प्रयत्न केला होता. तिनं त्यांना भुतांचीही भीती दाखवली होती. परंतु सम्राटानं तिचं काहीएक ऐकलं नाही. आपल्याच मनाचं केलं व कलिंगचं युद्ध केलं.             सम्राट अशोकांनी तेथून प्रस्थान केलं व तो पाटलीपुत्र इथे जावून राहू लागले. कधीकधी ते विदिशातही यायचे. तिच्याशी कलिंग विषयावर चर्चाही करायचे. ती त्यांना बरंच समजवायची. कधी तथागताचे विचार सांगायची. परंतु ते मात्र तिचं काहीच ऐकायचे नाहीत. ते आपल्याच मनाचं करायचे.            तेच ते विचार. ते विचार ऐकून सम्राटांचे कान पकले होते. त्यांना आता आपल्या जगण्यात असुया वाटत होती. वाटत होतं की संन्यास घ्यावा. परंतु कसं घेणार. त्यांची मुलं लहानच होती. ती मुलं राजपद सांभाळण्यायोग्य बनायची होती.          ते पाटलीपुत्रला होते. आपली प्रिय पत्नी कारुवाकीबरोबर. परंतु त्यांना आताही त्याची पत्नी देवी आठवत होती. अन् आठवत होता तो प्रणय काळ. ज्या काळात ते तिच्यासोबत राहिले होते काही काळ.           सम्राटाचं जसं कारुवाकीवर प्रेम होतं. तसंच प्रेम होतं त्यांचं देवीवरही. कारण कलिंगमधून निघून उज्जैनला आल्यावर जी कारुवाकीची त्याला आठवण यायची. ती आठवण देवीनं पुसून काढली होती.           सम्राट अशोकांना आठवत होता तो काळ. ज्या काळात ते उज्जैनला आले होते. त्या काळात त्यांना उज्जैनमध्ये करमत नव्हतंच. कारुवाकीवर प्रेम असल्यानं व उज्जैनला येताच ते तुटल्यानं त्यांना कारुवाकीशिवाय जगणं असह्य झालं होतं. एक एक क्षण जगणं कठीण जात होता. अशातच त्यांना मिळाली देवी. मग देवीचा तो प्रेमळ स्वभाव त्यांना भावला व हळूहळू त्यांच्या जीवनातून कारुवाकीची आठवण कमी झाली होती.          *************५*****************           सम्राट अशोकाला देवीनं बरंच समजावून पाहिलं. परंतु सम्राट अशोक काही समजण्याच्या पलीकडे होते. मात्र तिला वाटत होतं की युद्ध नको, जगाला बुद्ध हवा. कशाला हवं असं राजपद की ज्या राजपदाच्या पल्लूआड युद्ध आणि युद्धाचा थरकाप लपलेला आहे. तो थरकाप की ज्या थरकापानं कितीतरी लोकांची जीवं जातात. कितीतरी लोकं मरण पावतात आणि मरण पावतात, त्यांच्या भावना. ज्या भावना त्यांच्या राज्याशी गुंतल्या जातात. आपल्याला हे होवू द्यायचं नाही. मगधात अमन नांदावं. आपण मगधची महाराणी. थोरली महाराणी. आपलं आद्य कर्तव्य आहे की मगधमध्ये शांती नांदावी यासाठी प्रयत्न करणं. त्यासाठी तयार करणं तेथील वारसदारांना. आपली मुलं ही थोरली मुलं आहेत. आपण आपल्या मुलांना तथागताच्या विचारांशी सुसंगत बनवायचं.           ते तथागतांचे विचार. ते विचार देवीमध्ये कुटकूट भरले होते. तिला वाटत होतं की सम्राट अशोक जरी तथागतांचे विचार मानत नसले, त्यांच्या विचारांचा अंगीकार करीत नसले तरी चालेल. परंतु आपली मुलं तथागतांच्या विचारांची बनावीत. त्यांच्यात पाटलीपुत्रची हवा लागू नये. उद्या पाटलीपुत्रचे वारसदार बनण्यासाठी आपली मुलं ही संघर्षवान होवू नयेत. नको मला माझ्या पुत्रांसाठी राजपद की जे राजपद मिळविण्यासाठी सम्राटांनी आपले एकशे एक भाऊ कापून काढलेत. जे राजाचं कर्तव्य समजून चक्रवर्ती होण्याची स्वप्न पाहतात. ज्यांनी आपल्या ताकदीच्या भरवशावर आपल्या लगतच्या राजांवर विजय मिळवला. एवढंच नाही तर जे उद्या कलिंगशीही लढण्याच्या गोष्टी करतात. आपण आपल्या वारसांना असं लढवू नये आणि लोकांचं विनाकारण रक्तपात होवू देवू नये. आपण आपल्या मुलांना भिख्खू बनवायचं. ते भिख्खू की ज्यांची जगात किर्ती दिगंतर राहिल.          देवीचा तो निर्धार. त्याच निर्धारानं ती तिच्या दोन्ही मुलांना म्हणजेच महेंद्र व संघमित्राला ज्ञान देवू लागली. त्यांना तथागताचे विचार सांगू लागली. त्यांची तथागताच्या विचारांच्या लोकांशी भेट घालून देवू लागली. आज तीच मुलं देवीच्या नेतृत्वात नव्हे तर तिच्या मुसळीत तथागतांचे विचार आत्मसात करु लागली होती.         वर्षामागून वर्ष जात राहिले. तसे सम्राट अशोक तिच्याकडे तिला भेटायला येतच होते. एकदा त्यांनी तिला बराच आग्रह केला. म्हटलं,          "देवी, मी तुम्हाला पाटलीपुत्रला न्यायला आलोय. चला तर. मला तुमची व पुत्राची फारच आठवण येतेय."           ते सम्राट अशोकाचं बोलणं. त्यावर ती म्हणाली,           "जर मी व माझी मुलं त्या भुमीत यावं असं जर आपणाला वाटतंय तर आपण युद्ध सोडावं. रक्तपात करणं सोडावं. तरच मी व माझी मुलं पाटलीपुत्रला येतील. मी जरी आलो नाही तरी मुलं तरी नक्कीच येतील."         "ठीक आहे, आपण येत नसाल तर ठीक आहे. निदान लेकरांना तरी पाठवावं."         ते सम्राट अशोकाचं बोल. त्यावरही तिनं नकार दिला. त्यांना लेकरांची आठवण येतेय व तिचीही आठवण येतेय. असंही सांगीतल्यावरही  तिनं त्यावर नकार दिला. म्हटलं की मी माझ्या मुलांना पाटलीपुत्रची हवा लागू देणार नाही. जी भुमी रक्ताळलेली आहे, तिचा स्पर्श होवू देणार नाही. जेव्हा ती भुमी व त्या भुमीतील माणसं सुधारतील. अर्थात ते सुधरतील. तेव्हाच ती त्यांच्याबरोबर तिच्या मुलांना पाठवणार पाटलीपुत्रला. अन्यथा तिची मुलं इथंच राहिलेली बरी. असं तिनं सांगीतलं. ते ऐकताच खजील झालेला जगजेत्ता सम्राट अशोक पुन्हा एकदा पत्नीसमोर पराभव पत्करुन माघारी फिरला होता. मात्र त्यांनी देवीवर केलेलं व असलेलं प्रेम कधीच कमी होवू दिलं नाही. जरी ते पाटलीपुत्रला राहात असले तरी.         सम्राट अशोक आता पाटलीपुत्रलाच होते. कारुवाकीही सोबत होतीच आणि सोबत होत्या त्या त्यांच्या इतर भार्या. तरीही त्यांना देवीची आठवण येतच होती. तीच त्यांना आधार वाटत होती. कधी ती खोचट बोलतही असे. परंतु ती भाषा समजविण्याची असे. तसलं कोणी सम्राट अशोकाला समजविणारं कोणी आतापर्यंत मिळालं नव्हतं.          आज दिवस असा उजळला होता की आज त्याला जी आठवण आली होती. ती काही स्वस्थ बसू देत नव्हती. सम्राट अशोकाला देवीची आठवण येण्याचं कारण होतं तो पावसाळा. त्यांना आठवत होता तो नागपंचमीचा दिवस. त्याच दिवशी देवी सम्राट अशोकांना भेटायला आली होती, यात्रेचे निमित्त साधून. पावसाळा सुरु होता व नागपंचमी जवळच होती.          नागपंचमी जवळच होती. त्यातच सम्राटांनी ठरवलं. ठरवलं की आपण नागपंचमी निमित्त उज्जयिनीला जावून यावं. त्यातच आपण देवीची आणि आपल्या लेकरांची भेट घेवून यावी.         सम्राट अशोकांचा तो विचार. लागलीच सम्राट नागपंचमी यात्रेनिमित्त उज्जयिनीला निघाले. वाटेत ते पुन्हा एकदा विदिशाला थांबले होते.          दिवसभर सम्राट अशोक आपली पत्नी देवीसोबत बागेत फिरले. त्यानंतर ते घरी आले व सांजच्याला त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. देवी म्हणाली,          "महाराज, आज सर्वांनाच आधाराची गरज आहे. साधी तिरडी न्यायची असेल तरी आधार हा लागतोच. निदान प्रेत उचलून नेण्यासाठी तरी आधार हवा असतो. यासाठीच कालची मंडळी खुप सारी मुलं जन्माला घालत होती. त्याचं कारणही तसंच होतं. तसाच मलाही आधार हवा वाटतो आपला. परंतु आपण पाहिले राज्यकारभारात व्यस्त. बरं झालं, मुलं आहेत माझ्याजवळ म्हणून. नाहीतर या जीवनाचा वैतागच आला असता मला."         "होय, तसं या काळात जास्त लेकरं जन्माला घालण्याची बरीच कारणं आहेत. पहिलं कारण आहे रोगराई व त्या रोगराईवर पाहिजे त्या प्रमाणात नसलेली उपाययोजना. आता गावात साथीचे रोग येतात. ज्यात समुहानं घरची मंडळी मरण पावत असतात. काळ बदलत नाही व बदलत्या काळानुसार औषधांचा शोध लागत नाही व मरणयोग वाढलेला आहे. म्हणूनच मला अनेक पत्नी कराव्या लागल्या आणि अनेक मुलं जन्माला घालावी लागत आहेत. माहीत आहे, माझ्या वडीलांनाही भरपूर भार्या होत्या अन् आम्ही त्यांना एकशे एक लेकरं. दुसरं कारण आहे, एखाद्यावेळेस माणूस मरण पावलाच तर त्याच्या मरणाला माणसं मिळणं. कारण नातेवाईक हे दूर अशा ठिकाणी राहतात. शिवाय अशा नातेवाईकांना पायी येण्याशिवाय मार्ग नाही व असा नातेवाईक पोहोचेपर्यंत मयत आटोपवून टाकावी लागते. अशावेळेस साथीच्या रोगांचीही भीतीच आहे. साथीतील काही रोग हे संसर्गजन्य आहेत. ज्यात वस्तीतील लोकंही जास्त करुन येत नाहीत. तेव्हा अशीच वेळ आलीच तर आपल्याच घरातील जन्माला आलेली मुलं आपल्या घरचा हातभार व्हावीत. त्यांचा आपल्याला आधार मिळावा. हाही एक उद्देश आहे, जास्तीत जास्त मुलं जन्माला घालण्याचा."         "महाराज, काळ बदलला आहे व बदलत्या काळानुसार आजारावर औषधांचा शोध लागला आहे. त्यातच काही काही संसर्गजन्य साथीचे आजार कायमस्वरुपानं निघून गेले आहेत. परंतु जसा काळ बदलला आहे. तसा तंत्रज्ञानातही बदल झाला आहे. वैद्याला स्थान आलं आहे. पुर्वी तर असंही नव्हतं. ना वैद्यू होता, ना औषध कोणती हे आपल्याला माहीत होतं. आता माणसं तुटू लागली आहेत. आज एखाद्यावेळेस एखादा व्यक्ती जर मरण पावलाच तर त्यात तो आजार शिवण्याची भीती नाही. मग भीती कशाची आहे?"         "भीती...... भीती तसं पाहिल्यास आज कशाचीच नाही. परंतु वेळ नाही आज कुणाजवळ. असं वाटतं. माणसं एवढी विलासपण कमविण्याच्या नादात गुंतलेली आहेत की त्यातून पुरेसा वेळ काढणंही कठीणच आहे. एवढंच नाही तर आजची माणसं सुख मिळो अगर न मिळो, सुखाच्याच नादात गुंतलेली आहेत. त्यातच एखाद्यावेळेस एखाद्या घरी कोणी मरण जरी पावलं तरी चार लोकं गोळा व्हायला पाहात नाहीत. त्यातच त्यात आणखी एक नवीन कारण जुळलेलं आहे. ते कारण म्हणजे राजकारण. आम्ही आमच्या मुलांना शिकवतो व ती मुलं शिकली वा जास्त शिकली तर ती परराज्यात जावून स्थिर होतात. आपल्या राज्यात राहात नाहीत. आता माझंच पाहा. मी फिरतो की नाही. अशावेळेस केवळ आईबाप घरी राहतात. असे मायबाप की जे म्हातारे असतात व घरातल्या घरात राहणे पसंत करतात. असे म्हातारे मायबाप शेजारीही संपर्क ठेवत नाहीत. त्यातच काही राज्यातच राहणारी काही मंडळी अशी आहे की जी शेजारीही संपर्क ठेवत नाही. बोलत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यांशी. मग लोकं मयतीला कसे येतील? हा प्रश्न निर्माण होतो व त्या प्रश्नांतून काही ठिकाणी पशुपक्षांची पद्धत निर्माण झालेली आहे व त्या पद्धतीत वाढ होणार की काय? अशी चिन्हं निर्माण झालेली आहेत."           "पशुपक्षांची पद्धत. मयतीसाठीही पशुपक्षांची पद्धत?"            "होय, माझ्या एका मित्राशी चर्चा करीत असतांना त्यानं चर्चेत सांगीतलं की एका व्यक्तीनं मरणासाठीही  पशुपक्षाची पद्धत वापरली. त्यानं आपल्या आईला एका विहिरीवर उघड्यावर ठेवलं होतं. ते प्रेत आठ दिवसात खाल्ल होतं पशू पक्षानं. फक्त घरापासून तर स्मशानभुमीपर्यंत त्या प्रेताला न्यावं लागलं. त्यातच राखड वैगेरेचाही विधी नाही."        "महाराज, आजच्या मरणाची आपण सांगीतलेली पद्धती तेवढी काही नवीन नाही. ती पुर्वीपासूनच अस्तित्वात आहे. आपल्याला माहीत आहेच की एवढे लोकं युद्धात मारले जातात. काहींचे चेहरे छिन्नविछिन्न स्वरुपाचे असतात. ओळखता येत नाही. मग त्यांचा अंत्यविधी कसा होतो? त्यांनाही पशुपक्षांनाच खाण्यासाठी सोडलं जातं की नाही. महाराज, आज फक्त त्यात बदलाव झालेला आहे. काल एखादा व्यक्ती मरण पावलाच तर प्रेताच्या ठिकाणी रडायला माणसं मिळत नव्हती. आजही दिसत नाहीत. अन् आप्त दिसायचीही. परंतु ती रडत नव्हती. आजही रडत नाहीत. कारण प्रकृती स्वास्थ बिघडायचं. आजही बिघडतं. त्यासाठी काही श्रीमंत कुटुंबात वा जमीनदारांच्या घरी अशी रडणारी मंडळी खासकरुन बोलावली जायची. आजही बोलवतात. ज्यांना रुदाली म्हणतात. ह्या रुदाली एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर मृतकाच्या घरी जातात व रडत असतात. ज्यातून त्यांना पुरेसं धन मिळत असतं. याचाच अर्थ असा की पुर्वीही काही ठिकाणी तसंच घडत असे. जसं आज घडतं."         "देवी, आजही तसंच घडतं. मात्र आज अशा रडणाऱ्यांना बोलावलं जात नाही तर संबंध प्रेतच दान दिलं जातं. ज्यात त्या व्यक्तीचं मरण होताच पुर्णच मरण्यानंतरचे सोपस्कार एखाद्यालाच दिले जातात. ज्यातून यजमानाला कोणत्याही गोष्टी करण्याची गरज उरत नाही. कारण आज माणसांची वानवा भासत आहे. माणसं युद्धात मरत आहेत. महिलाच जास्त आहेत जिकडेतिकडे."         "होय महाराज, आजच्या काळानुसार चार लोकं जमायला हवीत मरणात. तीच चार माणसं ग्वाही देतात की मेलेल्या संबंधित व्यक्तीचा स्वभाव कसा काय होता? तो मिलनसार होता की नाही. जर अशी चार माणसं जुळत नसतील तर आपल्याजवळ एवढं धन असून काय उपयोग? हो, द्रव्यानं सारं विकत घेता येतं. द्रव्य देवून चार माणसंही बोलावता येतात. परंतु मयत आटोपल्यावर लोकं नावबोटं ठेवतात व म्हणतात की तो व्यक्ती काय, ज्याच्या मरणालाही दोन लोकं उपस्थित नव्हते. तेच बोल वर्षानुवर्ष लांच्छन लावल्यागत चालत असतं. महत्वपुर्ण बाब ही की आजच्या काळात लोकांनी विचार करावा. विचार करावा की आपलं मरण झाल्यावर चार माणसं गोळा व्हावीत. विचार करावा की चार माणसांनी आपली मयत करावी. आपलं मरणही थाटामाटात साजरं व्हावं. त्यासाठी त्याची जीवंत असतांनाच तयारी करुन घ्यावी. आपण जीवंत असतांनाच चार माणसंच जुळवून ठेवावीत. त्यांच्याशी संवाद साधत राहावा. जेणेकरुन आपल्या संवादातून लोकांना भुरळ पडेल व ती मंडळी आपल्या मरणानंतर हळहळतील. ज्यातून आपल्या मरणात ती माणसं गोळा होतील. लोकं दोष देणार नाहीत. अन् जर आपण असं केलं नाही तर उद्या मरणानंतर आपल्याला कुत्रही विचारणार नाही. द्रव्य देवूनही कुणी मरणाची विल्हेवाट लावून घेणार नाही. त्यातच आपलं मृत शरीर आपल्याच घरी कुजत सडत पडलेलं असेल यात शंका नाही. असं होवू नये म्हणून  निदान आपल्या मरणानंतर चार माणसं नाही गोळा झाले तरी चालेल. परंतु कुणीतरी आपल्या प्रेताला घेऊन आपल्या प्रेताला निदान घरापासून तर स्मशानभुमीपर्यंत तरी न्यावं. अशीच व्यवस्था जुळून येण्यासाठी आजच आपण आपला हेका सोडून मिलनसार भुमिका बजवावी म्हणजे झालं. जेणेकरुन आपली अंत्ययात्रा पशुपक्षांना खाणे देण्याच्या पद्धतीनुसार का होईना, व्यवस्थीत आटोपविता येईल. घरात कुजू नये म्हणजे झालं. म्हटलं जातं की कुत्याचं शेपूट हे वाकडं असतं. ते कुठंही टाकलं तरी ते वाकडंच राहातं. ते सरळ होत नाही. तसाच डाग. एखाद्यावेळेस एखाद्याच्या वस्राला डाग लागला की तो कितीही धुतला तरी निघत नाही. तो थोड्या ना थोड्या स्वरुपाचा दिसतोच. माणसाच्या जखमेचाही डाग असाच आहे. जखम बसते, परंतु त्याचे व्रण डागाच्या स्वरुपात आजन्म तेवत असतात. तसाच चारित्र्यावरील डाग. चारित्र्यावरील डाग हाही अति तीव्र स्वरुपाचा असतो. तोही कितीही पुसला तरी पुसला जात नाही. कारण त्याला साक्षीदार असतो समाज. कालांतरानं समाजाला त्याचा विसर पडलाय असं आपल्याला वाटतं. परंतु समाज त्या डागाची गोष्ट कधीच विसरु शकत नाही. तसंच आहे मन. मनाला लागलेला डाग इतर कोणाला दिसत नाही. तो आपल्यालाच दिसतो व गेलेला क्षण हा जेव्हा जेव्हा स्मरणात येतो. तेव्हा तेव्हा मनावरचा डाग हा दिसून अधिक घट्ट होत असतो. विशेष म्हणजे जसा मनावर पडलेला डाग हा विसरता येत नाही. तसाच चारित्र्यावर पडलेला डाग हा विसरता येत नाही. डाग तो डागच असतो. कुत्र्याच्या शेपटीसारखा. मग तो कापडावरील डाग असो वा मानवी मनावरील डाग असो वा चारित्र्यावर पडलेला डाग असो. डाग, डागच असतो. तो पुसता येत नाही. तो पुसता येतो काय? याबाबतीत विचार केल्यास डाग हा कधीच पुसल्या जात नाही. कितीही प्रयत्न केला तरी. हं, त्यावर मुलामा अवश्य लावता येतो. जसा जखमेवर डाग पडल्यास जखमेवर मांडीच्या कातडीची परत काढून त्याला पुर्वअवयवासारखं करता येते. तसंच चारित्र्यावरच्याही डागाचं आहे. चारित्र्यावरील डाग हा आपल्या चांगल्या वागण्यानं पुसता येतो. आपलं चारित्र्य डागाळल्यानंतर  समाजात जर आपलं वागणं आपण चांगलं केलं असेल तर तोही चारित्र्यावरील डाग आपल्याला पुसता येतो. त्यासाठी आपलं मन हे सुसंस्कारीत बनायला हवे. आपलं मन..... आपल्या मनावरील डाग कुणाला दिसत नाही. तो दिसतो आपला आपल्यालाच. त्या डागाला पुर्ण मिटवता येत नाही. परंतु त्यावरही मुलामा चढवता येतो. जर आपण आपलं मन चांगल्या गोष्टीकडे वळवलं तर...... ते जर चांगल्या गोष्टीकडे वळवलं नाही तर...... आपल्याच जीवनाची अधोगती होते.  ज्यांच्यात चांगलं मन निवास करीत असतं बालपणात. परंतु जेव्हा अशा लोकांचे मन हे वाईट मार्गाकडे वळलं तर त्यांच्या जीवनाची अधोगतीच होते नव्हे तर राखरांगोळी. जीवनात सर्व काही असूनही काही लोकं हे आपलं मन चांगल्या गोष्टीकडे न लावता वाईट गोष्टीकडे लावत असतात."         "बरोबर आहे आपलं म्हणणं. परंतु."          "महाराज, डागाबद्दल बोलायचं झाल्यास ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या कापडावरील डाग सहन होत नाही. त्याप्रमाणेच आपल्याला कोणी वाईट म्हटलेलं चालेल काय? तेही चालत नाही. असे असतांना मग आपण वाईट कर्म का करावं की आपल्या चारित्र्यावर डाग लागावा? आपल्याला कोणी वाईटच म्हणावं? याचाच अर्थ असा की आपलं वागणं चांगलं ठेवावं. कारण चांगल्या वर्तनाच्या व्यक्तीला भलीभली मंडळी घाबरत असतात."           "देवी, आपल्या बौद्ध तत्वज्ञानात हेच आहे काय?"           "होय महाराज,  तथागत हेच सांगतात. म्हणतात की डाग धुतल्या जातो. डाग धुतल्या जातो संस्कारानं. आपण लोकांचे चांगले विचार ऐकल्यानं. आपण चांगल्या लोकांचे विचार आत्मसात केल्यानं. चांगल्या लोकांच्या टोकल्यानं. चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यानं. चांगल्या लोकांशी संपर्क ठेवल्यानं व स्वतः सुधारण्याचा प्रयत्न केल्यानं. आपल्याला माहीत आहे की चंदनाचं झाड जिथं असेल, तेथील इतर झाडांनाही चंदनाचाच सुगंध येतो. परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचंही सोनं बनतं. अंगुलीमालचाही अहिंसक बनतो आणि आम्रपालीची आम्रपाली देवी. परंतु आपण चांगले असूनही जर वाईटांच्या संगतीत आपले चांगले गुण सोडले तर त्याची अधोगतीच होते, कावळा व हंसाच्या मैत्रीसारखी. कावळा व हंस चांगले मित्र. एकदा फिरायला जात असतांना मांसाच्या तुकड्यावर कावळ्याची नजर पडली. हंसानं नकार दिला असतांनाही दृष्ट कावळा खाली उतरला. त्यानं मांसाच्या तुकड्यावर ताव मारणं सुरु केलं. मांसावर ताव मारत असतांना अचानक मालक आला. त्यावेळेस कावळा उडून गेला व हंसाचा जीव गेला. ही आहे हंस व कावळ्याची गोष्ट. चांगल्या माणसानं वाईटांशी सोबत केल्यानं असा जीव जातो, त्याचं हे उदाहरण."          "देवी, एवढं ज्ञान आपणाला कुठून आलंय?"          "महाराज, चांगली माणसं ही वाईटांना शक्यतोवर जवळ करीत नाहीत. तसा आपणच त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. जर आपल्याला सुधारायचं असेल तर आणि आपण तसा सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपलंच चांगलं होतं. वाईट होत नाही. अन् आपण चांगले असूनही वाईट बनलोच तर त्याच्यावर काही उपाय नाही. त्याचा परिणाम अधोगतीतच होईल. आपलं राजपद असंच. आपला पेशा चांगला असूनही आपलं कलिंगसोबतचं युद्धाचं कृत्य करणं म्हणजे चांगल्या विचारावर वाईट विचारांचा परिणाम होणे होय. धर्मात्मा कोणीही बनत नाही. जो चांगल्या विचारांचा असेल बालपणात. जो मन लावून सराव करीत असेल, तोच धर्मात्मा बनतो. आपलंच पाहा. आपण योद्धे झालात. कारण आपण लहानपणापासून युद्धसराव केला. तथागतही तसेच बनले. कारण त्याच्यात बालपणात असलेले चांगले गुण वा संस्कार होते.  विशेष सांगायचं झाल्यास डाग हा कधीच मिटत नाही. मग तो कापडावरील डाग का असेना, तो मनावरील वा चारित्र्यावरील डाग का असेना. ज्याप्रमाणे कुत्र्याचं शेपूट असतं, नळीतही टाकून वर्षोगणती ठेवलं सरळ होण्यासाठी. तरीही ते सरळ होत नाही. तसेच चांगले संस्कार एखाद्यावर कितीही केले आणि तो कितीही चांगला बनला तरी त्याच्यातील वाईट गुण हा कधीच जात नाही. असं म्हटलं जातं. परंतु ते जरी खरं असलं तरी माणसानं त्याबाबत विचारच करु नये. आपण आपल्या डागावर विचार करावा. विचार करावा की तो डाग कसा धुतला जाईल. जेणेकरुन व्रणही दिसला तरी तो अंधूक झालेला असेल, न दिसण्यासारखा. कारण आपल्याला आम्रपाली व अहिंसकची कहाणी माहीत आहेच. आपण तर तसा प्रयत्न केला तर आपण चांगलेच होतो व आपल्याच जीवनाचं सार्थक होतं. हे तेवढंच खरं. कधीही संगत ही चांगल्यांशी करावी. चांगलं बनण्याचा प्रयत्न करावा. वाईटांशी संगत करु नये व वाईट बनण्याचाही प्रयत्न करु नये. हं, एखाद्यावेळेस परिस्थितीनं आपण वाईट बनलोही कधी एखाद्या जखमेसारखे. तरीही त्याच जखमेवर कातडीचा मुलामा चढवून तो डाग मिटवावा. त्यासाठी चांगल्या माणसांशी संपर्क ठेवावा. चांगले विचार आत्मसात करावेत नव्हे तर चांगले विचार ऐकावेत. जेणेकरुन आपलं वर्तन चांगलं बनेल. त्याचबरोबर आपलं जीवनही चांगलेच बनेल यात शंका नाही. मात्र त्यासाठी आपण आपले प्रयत्न करणे तेवढेच गरजेचे आहे. अगदी अहिंसक, आम्रपालीसारखे. आपल्या भावांसारखे नाही. कारण वाईट मार्ग अवलंबल्यानं व तसेच वागल्यानं त्याची अधोगती वाईटातच होते. चांगल्यात होत नाही हे तेवढंच खरं. हाच विचार तथागतांनीही मांडलेला आहे."            "देवी, मला माझा धर्म मला प्रिय आहे. कारण माझा धर्म आहे युध्द करणं. माझ्या प्रजेला गुलाम होवू न देणं. तेच माझं कर्तव्य असून माझा धर्म मला तेच कर्तव्य कर. अशी आज्ञा देत आहे. त्याचं काय?"           "धर्म...... धर्माबाबत लोकं वाद करायला तयार होतात सहजासहजी. कारण धर्माचा विषय काढल्यावर वाद होत असतात. धर्माबाबत सांगायचं झाल्यास प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो व प्रत्येकजण आपल्या धर्माचा विचार करतो. धर्माबाबत विचार करीत असतांना काही लोकं धर्माला लवचिकतेनं घेतात. प्रसंगी थोडंसं संकट आल्यास आपला धर्म सोडून परधर्माचा स्विकार करतात. असं बरेचवेळा घडलं."         "बरोबर आहे. माझ्या तातश्रींनीही तसंच केलं. जैन धर्म स्विकारला होता त्यांनी."                "महाराज, अशाचप्रकाराने प्राचीन काळातील लोकांनी आपल्यावरील संकट पाहून आपला धर्म वेळोवेळी बदलवला. परंतु आज असं संकट येत नाही. तरी धर्म बदलवला जातो. ज्यात स्वार्थ असतो. परंतु कांगावा केला जातो की आम्ही धर्म हा संकट निस्तारण्यासाठी बदलवला. स्वार्थ, तोही धर्माबाबत स्वार्थ? होय, धर्माबाबत स्वार्थच आहे आज. पहिला स्वार्थ सकारात्मक बाजूने. माझा धर्म वाढायला हवा. म्हणून त्या धर्माला वाढविण्यासाठी केलेले वा घडवून आणलेले कृत्य हा स्वार्थाचा एक भागच आहे. त्यातच माझा धर्म टिकून राहावा म्हणून धर्मासाठी मरण न पत्करणे. हाही एक स्वार्थाचा भागच आहे. यात काही लोकांनी आपला संकटसमयी धर्म बदलवलेला तरी आजच्या काळात दिसून पडत नाही. यावरुन धर्माबाबत विचार केल्यास स्वार्थाचे तीन भाग पडतात. आजचा काळ पाहिल्यास व स्वार्थी दृष्टिकोनातून धर्माबाबत विचार केल्यास आजही लोकं आपला धर्म बदलवीत असून त्याला लोकं अंधश्रद्धेची जोड देतात. म्हटलं जातं  की आमचा धर्म हा अमूक अमूक फायदा करतो. भुतबाधा आमच्या धर्मात छळत नाही. मोठमोठे आजार आमचा धर्म टाळून नेतो. त्यातच कधी असाध्य आजारही दूर होतात. मग असा जर धर्म आपल्या आजाराला दूर पळवतो, तर मग तो मृत्यूलाही दूर पळवीत असेल? असा प्रश्न केल्यास त्यावर उत्तर मिळत नाही. धर्म बदलाबाबत कधी भूतबाधेचा आधार दिला जातो. परंतु कोणताच धर्म मृत्यूवर विजय मिळवून देवू शकत नाही. हं, तथागत  माणसाची मृत्यूपासून सुटका करुन देवू शकत नाहीत. मात्र दुःखापासून सहज मुक्ती मिळवून देवू शकतात."         धर्म........  धर्माबाबत सांगायचं झाल्यास प्राचीन काळात जे धर्म बदल झाले. ते धर्मांतरण हत्याराच्या व दडपशाहीच्या मार्गानं झाले. प्राचीन काळात धर्मांतरण करतांना ज्या व्यक्तीनं धर्म बदलविण्यास नकार दिला. त्याचे हातपाय बांधून त्यांना अनन्वीत यातना देण्याचे प्रकार घडलेत. ज्या यातना सदृश्य स्वरुपात इतर लोकांना दाखविण्यात आल्यात. उद्देश होता की तो प्रकार पाहून लोकं घाबरतील व असल्या प्रकाराला घाबरुन लोकं आपला धर्म बदलवतील. ज्यातून अपेक्षीत असलेला धर्म वाढेल. अशाच प्रकाराने बरेच धर्म प्राचीन काळात वाढले. परंतु दडपशाहीनं वाढलेले धर्म हे टिकत नाहीत. त्यात अधोगती होते. तसंच घडलं व वाढलेले धर्म ती दडपशाही निघून जाताच स्थिरस्थावर झाले.          डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध धम्म स्विकारला. त्याचं कारण होतं हिंदू धर्मात तमाम एससी प्रवर्गांना मिळत नसलेली योग्य वागणूक. तीच ती पशुगत वागणूक हिंदू धर्मात तमाम एससी प्रवर्गांना मिळत होती. ही वागणूक इतर धर्मात मिळणार नाही. असं डॉक्टर बाबासाहेबांना वाटलं व बाबासाहेबांनी धर्म बदलवला. ज्यातून बौद्ध धम्मात गेलेल्या कुणावरच हिंदू धर्माचं बंधन नव्हतं. विशेष म्हणजे बौद्ध धम्मात गेलेल्या लोकांबद्दल कोणताच हिंदू व्यक्ती विटाळ मानू शकत नव्हता. अन् मानलाही नाही. त्यातच बौद्धमय झालेल्या लोकांवर कुणीच कोणता अत्याचार केला नाही. एका अर्थानं बौद्ध धम्मात गेल्यावर एससी प्रवर्गातील एकमेव महार नावाचा समुदाय सुखी झाला. तसेच इतरही जातीधर्मातील लोकांनी बौद्ध धर्म स्विकारला. ते लोकं सुखी राहिले. त्याचं कारण आहे, बौद्ध धम्मात भेदभावाला थारा नसणं.          आज हिंदू धर्मातही एससी प्रवर्गातील महार नावाचा समुदाय सोडला तर बाकी सर्व समुदाय टिकून आहेत. त्याचं कारण आहे आरक्षण. जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. जर आरक्षण नसतं तर तमाम एससी प्रवर्गातील व इतर जातीतील मंडळी बौद्ध झाली असती. कारण आरक्षण हे जातीच्या आधारावर आहे व जाती आधारावर आज आरक्षण आहे. बौद्ध धम्मात जाती नाहीत. तो एक धम्म आहे. त्यामुळंच तो प्रवर्ग आरक्षणात बसत नाही. हे सध्या सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशानं दिलेल्या निर्णयावरुन सिद्ध होते.          धर्माबाबत आरक्षणाचा विचार केल्यास सध्या बौद्ध धर्मालाही आरक्षण आहे. यात  अल्पसंख्याक आरक्षणाचा मुद्दा लागू होतो. परंतु हे जरी बरोबर असलं तरी लोकं जातीअतंर्गत आरक्षण घेवू पाहतात. जातीविरहित आरक्षण नाही. जे आरक्षण हिंदू धर्मात आहे आणि ते जेव्हापर्यंत असणार. तेव्हापर्यंत लोकं हिंदू असणार. अन् ज्यादिवशी आरक्षण हटवलं जाणार. त्या दिवशी बरीच मंडळी बौद्धमय वा इतर धर्मातील झालेली असणार. त्यातच हिंदू धर्माची संख्या निश्चितच कमी होणार. यात शंका नाही.           डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. कारण हिंदू धर्मानं तमाम आपल्याच हिंदू धर्मीय असलेल्या एससी प्रवर्गांना त्या काळात बरंच छळलं. त्यांचं जगणं हराम केलं होतं. त्यानंतर त्यांनी सर्व जातीसमुदायांना मोलाचा संदेश दिला होता की तुम्ही धर्म बदलवा. परंतु त्यांनी एक तरतूद केली होती आरक्षणाची. जी तरतूद सर्व धर्मात नव्हती. अमूक जात हिंदू व ती जात जर मागासली असेल व हिंदू असेल, त्याच जातींना आरक्षण होतं. तोच स्वार्थी हेतू सांभाळून लोकांनी आपला धर्म हिंदू आणि जात हिंदू धर्मातीलच ठेवली. मात्र अंतर्मनात बौद्ध धम्म ठेवला. आजही तीच वास्तविकता आहे. जर आजही आरक्षण हटवलं जाते आहे तर तमाम एससी प्रवर्ग केवळ विचारसरणीनं बौद्ध धम्म घेतल्याशिवाय उरत नाही. थोडासा फरक पडेलच. परंतु हे जरी खरं असलं तरी काही काही कट्टर जाती या हिंदूच असणार. त्या बौद्ध धम्म घेणार नाही. त्याचं कारण आहे. माझा धर्म मला प्रिय आहे व निःस्वार्थीपणाची भावना. जो आदर्श पुरातन पिढीतील लोकांनी घालून दिला. ज्या आदर्शात संभाजी महाराजांचं बलिदान वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी प्राण दिला धर्मासाठी. परंतु धर्मबदल केला नाही.          बाबर ज्यावेळेस भारतात आला. तेव्हा त्यांनी दंडुकेशाहीच्या आधारावर हिंदू धर्मातील लोकांना मुस्लीम केलं. त्यानंतर अकबरानं येथील तमाम हिंदू स्रियांशी विवाह करुन हिंदूंचं धर्मांतरण करवून घेतलं. तद्नंतर आलेल्या औरंगजेबानंही बाबरचीच भुमिका वापरत येथील तमाम हिंदू धर्मियांना मुस्लीम केलं. त्यानंतर येथे आलेल्या पोर्तुगीजांनीही तीच भुमिका अवलंबून येथील तमाम लोकांना ख्रिश्चन केलं. बाबासाहेबांनीही बौद्ध धम्म घेवून अस्पृश्यांना धर्माबाबत अवगत केलं. परंतु कालप्रवाहात कालपासून अस्तित्वात असलेला हिंदू धर्म आजही टिकून आहे. फरक एवढाच आहे की काल तो वैदिक धर्म नावानं होता. आज तो हिंदू नावानं आहे. काही लोकं म्हणतात की हिंदू ही वैदिक धर्माला दिलेली शिवी आहे. असो, ती शिवी देखील लोकांना मान्य आहे. परंतु धर्म सोडणं मान्य नाही. त्याचं कारण आहे. हिंदू धर्मातील काही दृश्य अदृश्य मुल्ये.           धर्मांतरण हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. ज्या लोकांना ज्या धर्माचा मुद्दा कळला. तो व्यक्ती तो तो धर्म घेतो. ज्यात धर्मपरीवर्तनात स्वार्थ, संकट, भय या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीनही गोष्टी कालही घडल्या. आजही घडत आहेत व धर्म बदल होत आहे. मात्र असा स्वार्थ, असे संकट, अशी भयता निघून जाताच लोकं मूळ धर्मात येतात. तेच घडलं हिंदू धर्माच्या बाबतीत. नेतोजी पालकरांच्या उदाहरणावरुन दिसतं की संकट निघून जाताच लोकं मूळ धर्मात परततात. कारण कोणालाच संभाजी होता येत नाही. आपली सुरक्षा, आपला स्वार्थ महत्वाचा वाटतो.  ज्याला ज्यात स्वार्थ दिसतो. तो तो व्यक्ती, तो तो धर्म घेतो.        धर्म टिकतो. कारण असते त्या त्या धर्मातील असलेल्या चांगल्या गोष्टी. प्रसंगी त्या धर्मात जर वाईट गोष्टी असतील. दडपशाही असेल तर तो धर्म टिकत नाही. जसे, काल सुर्योदयापुर्वी व सुर्यास्तानंतर अस्पृश्यांना असलेली गावबंदी आणि विटाळ. स्रियांना नसलेली कोणत्याच बाबतीतील प्राथमिकता. पती मरणानंतर तिच्यावर दबाव आणून तिला जबरदस्तीनं  सती जाण्यास मजबूर करणं, तिचं बुरख्यात असणं. बालविवाह होणं, देवदासी बनवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणं. नगरवधू बनवून तिला नगरवधू म्हणून सन्मान देवून त्याच बुरख्याच्या पाठीमागं लपून तिचा वेश्या म्हणून वापर करणं. एवढंच नाही तर धर्मात असणाऱ्यांना धर्माची म्हणून सारेच बंधनं लावणं. जसे, अमूक धर्मातील व्यक्ती इतर कोणत्याही धर्माच्या प्रथा पाळणार नाही. परंपरा पाळणार नाही. त्यांचे सणं साजरे करणार नाही. त्यांच्या प्रार्थनास्थळी जाणार नाही. अमूक अमूक इतकेच वाजता त्याने उठावे. वैगेरे वैगेरे गोष्टी. ज्यातून कालांतरानं त्या त्या धर्मातील लोकांना असे तत्वज्ञान पटत नाही. मग धर्मांतरण होतं.          धर्म हा टिकतो, जर त्या धर्मात चांगले संस्कार असतील तर, चांगले विचार असतील तर, चांगल्या प्रथा, परंपरा असतील तर प्रत्येक धर्मातीत माणसांना सन्मानानं जगता येत असेल तर..... तर लोकं धर्मासाठी प्रसंगी प्राण देतात. परंतु धर्मांतरण करीत नाही. माझा धर्म मला प्रिय आहे म्हणत.          महत्त्वपूर्ण बाब ही की प्रत्येकाला आपला आपला धर्म प्रिय असून आपला धर्म टिकवायचा असेल तर चांगल्या गोष्टी धर्मात येवू द्याव्यात. कुप्रथा दूर हाकलाव्यात. वास्तविकतेवर भर द्यावा. नाविण्याला प्राधान्य द्यावं. विभत्सता टाळावी. तरच धर्म टिकवता येईल. वाढवता येईल नव्हे तर आनंदानं म्हणता येईल की मला माझाच धर्म प्रिय आहे, इतर धर्म नाही. जर त्यात कुप्रथा येत असतील, दडपशाही येत असेल तर तो धर्म कालांतरानं नष्ट होणारच, हे तेवढंच खरं. याचाच विचार करीत सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म घेतला होता.          देवी व सम्राट अशोक आपापसात चर्चा करीत होते धर्माबाबत. ती तथागताचे विचार मांडून कलिंग युद्धाबाबत त्याचं मन बदलवीत होती तर तो आपला धर्म आपल्याला प्रिय असल्याचा देखावा करीत होता. त्यातच तो युद्धावर जोर देत होता. अशातच सम्राटानं तिचं काहीएक ऐकलं नाही. त्यातच कलिंगचा राजा पद्यनाभनला पाठविलेला शांतीचा संदेश पद्यनाभनने धुडकावून टाकला होता. त्यानंतर सम्राट अशोकाने चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी कलिंगवर युद्ध थोपलं.          ****************६**************         कलिंगचं युद्ध. ते युद्ध इस पुर्व २६२ ते इस पुर्व २६१ मध्ये लढलं गेलं. युद्ध सुरु झालं होतं. सेना लढत होती. तशी दोन्ही बाजूची सेना काही कमजोर नव्हती. त्या सेनेला अनेक डावपेच येत होते.           सम्राट अशोकांना सुरुवातीस वाटलं. वाटलं की कलिंग हे आपल्यापुढं कमजोर राज्य आहे. त्याच विचारातून त्यांनी कमी सैन्यांना युद्धात उतरवलं. परंतु त्याचा परिणाम हा झाला की सुरुवातीस सम्राट अशोकाचे कित्येक सैन्य मारले गेले. त्या सैन्याचा कलिंगच्या सैन्यापुढं टिकाव लागू शकला नाही व सम्राट अशोकाचा पराभव झाला. परंतु युद्ध समाप्त झालं नव्हतं.           तो पराभव. त्यादिवशी सम्राट अशोकांचा पराभव झाला होता. आजचा दिवस त्यांना बेचैन वाटत होता. वाटत होतं की आपण हरलोत. एक चक्रवर्ती सम्राट बनण्याची चिन्हं पाहणारा सम्राट हरला. त्या तुच्छ कलिंगच्या सैन्यापुढं आपण टिकाव धरु शकलो नाही. परंतु आज हरलो. उद्या हरायचं नाही. जास्त सैन्यानिशी उतरायचं मैदानात. चांगले निष्णांत सैन्य उतरवायचे युद्धात. फौजफाटा जर जास्त असेल तर कलिंगचा पराभव होणारच.           सम्राटाचा तो विचार. त्यांनी तेवढ्यात रात्री सेनानायकाची भेट घेतली. सैन्याबाबत व युद्धाबाबत चर्चा केली. विचारलं की आपल्या सैन्याला असं काय कमी पडलं की आपले सैन्य आज मैदानावर हरलेत. परंतु उद्या असं घडायला नको.           तो प्रसंग व त्या प्रसंगानंतर त्याच रात्री व तेवढ्याच रात्री सेनानायकानं सैन्याला आदेश दिला. त्यांचं मनोबल वाढवलं. म्हटलं,          'ही निर्णायक लढाई आहे. आपले महाराज या लढाईनंतर चक्रवर्ती सम्राट बनणार आहेत आणि हे तुमच्या भरवशावर होणार आहे. तुम्ही उद्या या लढाईचे साक्षीदार व्हाल. युगानुयुगे आपले नाव या भुमीत अजरामर होईल. लोकं म्हणतील की सम्राट अशोक सम्राटांचे सम्राट बनले. ते त्यांच्या सेनेमुळे. ती सेना निष्णांत होती व त्यांना खऱ्या रुपानं डावपेच येत होते.'           सेनाप्रमुखाचं बोलणं बंद झालं. त्यातच सेनेत एक प्रकारचा नवा उत्साह दाटला. त्यानंतर प्रत्यक्ष सम्राट अशोक.  एक राजे असूनही व सम्राट असूनही हात जोडून सैनिकांसमोर उभे राहिले. म्हणाले,           "माझ्या सैनिकांनो, आपण माझे केवळ सैनिकच नाही तर माझे मित्र आहात. हा प्रसंग केवळ ऐकण्याचा नाही, तर आपल्या राज्याला वाचविण्याचा आहे. उद्या आपली पिढी आपलं नाव घेईल. नाव घेईल की त्या सम्राट अशोकांनी लगतच्या कलिंग राज्यावर विजय मिळवला म्हणून बरे झाले. नाहीतर कलिंगनं मगधवर विजय प्राप्त केला असता. अन् मगध गुलाम ठरलं असतं कलिंगचं. आपल्याला हे मंजूर आहे काय? असेल तर खुशाल उद्याचं युद्ध लढू नका. आपण लढतोय कलिंगशी. कशासाठी? काय गरज आहे? याचा विचार केल्यास आपणाला जाणवेल की आपण लढतोय आपल्या अस्तित्वासाठी. आज आपण जर कलिंगशी लढलोच नाही तर उद्या कलिंगही आपल्याला घशात घालायला मागंपुढं पाहणार नाही. आपण कलिंगला कमजोर समजू नका. काल जेव्हा तातश्री लढले होते कलिंगशी. तेव्हाही हरलो होतो आपण आणि आजही पाहा. आजही त्या कलिंगच्या मुठभर सैनिकांनी आपल्याला धूळ चारली. बरं झालं की युद्ध समाप्त झालं नाही आणि मी बंदी बनलो नाही. नाहीतर आज चित्र वेगळं राहिलं असतं. तेव्हा लक्षात ठेवा. उद्या त्वेषानं लढा. मनात आधीच विचार करुन ठेवा. आपण मरु. परंतु आपण दोन तरी सैनिकांना मारुन मरु. कलिंग शुरवीर आहे. परंतु मला विश्वास आहे की आपल्या सैनिकांसमोर कलिंगचा निभावही लागणार नाही. प्रत्येकांनी मीच सम्राट आहे. असं समजून लढलं तर..... आता आपण ठरवा. कसं लढायचं आहे ते."          सम्राट अशोकांनी आवंढा गिळला. तसे ते पुन्हा म्हणाले,            "हे बघा, आपण युद्ध लढतोय. जे युद्ध मला देवीनं लढण्यासाठी मनाई केली होती. म्हटलं होतं की कलिंगशी लढणं हा काही आपला धर्म नाही. प्रत्येक ठिकाणी लढायलाच हवं असं धर्म सांगत नाही. शांती व प्रेमानं जर व्यवहार केला तर सारंच मिळतं. कलिंग आजही आपल्याला व्यवहार करु देतो. परंतु तरीही आपण युद्धास सामोरे गेलो. कारण कलिंग आपला शेजारी देश आणि तोही बलाढ्य. शिवाय त्यांच्या सीमा या सागराला लागून आहेत. आपल्याला सागरातून व्यापारच करता येत नाही. सागराकडे जाणारा रस्ता हा कलिंगमधूनच जातोय. यासाठीच लढले आपले तातश्री महाराज चंद्रगुप्त. ते वीर असूनही हरलेत. आपलाच अपमान झाला. आता त्याच अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. आता बोला, जर बदला घ्यायची इच्छा असेल आणि आपल्या तातश्री महाराजांना खरी भेट द्यायची असेल तर हे युद्ध जिंका. आता युद्ध जिंकणं आपल्याच हातात आहे आणि हे युद्ध जर जिंकलं तर आपलं जगात नाव होईल."           ते महाराज सम्राट अशोकांचे सैनिकांना निवेदन. तो उत्साह. तो उत्साह सम्राट अशोकांनी सैन्यांमध्ये कुटकूट भरला. ज्या बोलण्यातून सैनिकांचं आत्मबल वाढलं व त्याच आत्मबलाच्या भरवशावर त्यांनी आपल्या मनाची तयारीही तेवढ्याच रात्री केली. तसं आत्मबल कलिंगचा राजा पद्यनाभननं आपल्या सैनिकांचं वाढवलं नाही. तो आजच्या युद्धात विजय मिळवूनही आपल्या सैनिकांचे आभार मानायला प्रत्यक्ष सैनिकांसमोर गेला नाही. ते आपल्या अहंभावातच राहिले. ज्यावेळेस सम्राट अशोक आपल्या सैन्यास तयार करीत होते. त्यावेळेस महाराज पद्यनाभन ऐष करीत होते आपल्या राज्यात. अशातच दुसरा दिवस उजळला.           काल प्रत्यक्ष सम्राट अशोकाचं प्रत्यक्ष सैनिकांना निवेदन. प्रत्यक्ष राजानंच निवेदन केलं होतं सैनिकांना. तेच भावलं सैनिकांना. प्रत्यक्ष राजा आणि तोही हात जोडून सैनिकांसमोर. आपल्या चक्रवर्ती होण्यासाठी हात जोडतोय. त्यांना मालक समजतोय आणि आपण स्वतः नोकर असल्यागत वागतोय, बोलतोय. त्यामुळं तेवढ्याच रात्री त्यांच्या सैनिकांत वीरश्री संचारली व ते दुसऱ्या दिवशी निर्णायक लढाई लढण्यासाठी सज्ज झाले होते.          आज लढाईचा दुसरा दिवस होता. तसे आज सम्राटाचे सैनिक चांगल्या दमानं लढाईसाठी तयार झाले होते. ते त्वेषाने लढत होते व सम्राट अशोकांनी म्हटल्यानुसार प्रत्येक सैनिक निदान दोन तरी सैनिक कापून काढत होता.           तो रक्तपात व ते रक्त जवळच्या धौली गंगा नदीत वाहात जात होतं. आज त्या रक्तानं धौली गंगेचं पाणीही लालभडक झालं होतं. वाटत होतं की त्या नदीतून पाण्याऐवजी रक्तच वाहात आहे की काय? एवढं रक्त सांडवलं होतं सम्राट अशोकांच्या सैन्यानं. कारण जे मनोबल सम्राट अशोकांनी सैन्यात भरलं होतं. त्याच मनोबलाच्या भरवशावर सम्राट अशोकांचे सैन्य लढत होते कलिंगशी.         ते कलिंगचे युद्ध. कलिंग एक स्वतंत्र राज्य. त्या राज्यावर सम्राट अशोकांनी युद्ध थोपलं. अन् ते जिंकलं. त्याचं कारण होतं, सैनिक. सम्राट अशोकांचे सैन्य हे युद्धनीतीत तरबेज होते. त्यातच ते असे असे डावपेच जाणत होते की जे डावपेच कलिंगच्या सैनिकांना येत नव्हते. त्यातच सम्राट अशोक हे असे राजे होते की त्यांना उत्कृष्टपणे युद्धाचं नेतृत्व करता येत होतं. ते बोलण्यात पटाईत होते व ते आपल्या प्रत्यक्ष वाणीनं सैन्याचं मनोबल वाढवायचे. त्यातच सम्राट अशोकांजवळ सैन्य संख्येची काही कमी नव्हती. कारण त्यांची सत्ता ही मगधच नाही तर बऱ्याच देशात होती व बऱ्याच दूरपर्यंत पोहोचलेली होती. सम्राट अशोक आवश्यकता पडल्यास त्याही ठिकाणाहून सैन्य आणू शकत होते. तसं कलिंगला करता येत नव्हतं. तसंच तेवढी सैन्य संख्या कलिंगजवळ नव्हती. कलिंग जरी स्वतंत्र राज्य असलं तरी ते एक लहान राज्य होतं. ज्यातून कलिंग हरलं व मगध जिंकलं. कारण मगधनं सैन्याची संख्या वाढवली होती. त्यातच युद्धविराम झाला.         कलिंग व मगधचं ते युद्ध. युद्धविराम झाला होता. तसा सम्राट अशोक आज प्रत्यक्ष युद्धभूमीवर गेला होता. त्यांनी पाहिलं की संबंध युद्धभूमीवर रक्ताचा सडा पडला आहे. ते रक्त की तेथून चालायलाही जागा नाही. प्रत्यक्ष रक्ताचा चिखलच झालेला आहे. बरेच सैनिक मरण पावले आहेत. जागोजागी सैनिकांची प्रेते पडली आहेत. त्यांच्या जखमा व शरीरं पाहण्यालायक नाहीत. काही सैनिकांजवळ त्यांच्या पत्न्या बसलेल्या असून त्या आक्रंदन फाडत आहेत. काहीजण सम्राट अशोकांनाच साठीशाप देत आहेत. युद्धभुमीवर केविलवाणी अवस्था आहे. शिवाय त्या मृत सैन्यात केवळ कलिंगचेच नाही तर आपलेही बरेच सैनिक आहेत. जे मृत अवस्थेत आहेत.           सम्राट अशोकानं ते दृश्य पाहिलं. तिथं कितीतरी लोकांचा कोलाहल पाहिला. त्यातच त्यांचं ह्रृदय द्रवलं. तशी त्यांच्या मनाची उद्विग्नता जोर पकडू लागली. वाटायला लागलं की आता बस. युद्ध पुरेसं. आपण आता युद्ध करुच नये. कोणाशीच करु नये. कोणाला जीव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण आपण कोणाला जन्म देवू शकत नाही. आता आपण सुधरावं. प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं.          सम्राट युद्धभूमीवरच भटकत होते. तोच साक्षात त्यांच्या मनातून आकार घेवून देवी उपस्थित झाली. म्हणाली,          "महाराज, कलिंगवर आपल्याला विजय मिळाला. चांगलं झालं. आता आपल्याला शांती मिळाली असेल. आनंद वाटत असेल. परंतु महाराज, आपण विचार केला काय? ज्यांचे आधार गेलेत. त्या स्रियांनी आता कोणाकडं पाहावं? ज्यातील काही कलिंगच्याही आहेत. महाराज, आपण युद्ध जिंकलात. आपला तर उद्देशही यशस्वी झाला. परंतु हरलं कलिंग आणि कलिंगच हरलं नाही. हरल्या या स्रिया. ज्यांचे आधार गेलेत. ते आधार आपण स्वतः हिरावलेत. कदाचीत आपल्याला या स्रियाही माफ करतील. परंतु नियती...... नियती आपल्याला माफ करणार नाही. नियती आपल्याला प्रत्यक्ष धडा शिकवेलच."          ती देवी. त्यांची प्रत्यक्ष महाराणी. दृश्य स्वरुपात त्यांना रणमैदानावर दिसली. परंतु क्षणातच ती अंतर्धान पावली. कोणी तिला प्रत्यक्ष देवी म्हटलं असतं. परंतु ती प्रत्यक्ष देवी नव्हती व देवीची अवतार नव्हती तर तो सम्राटांच्या मनातील विचार होता.           सम्राट फिरतच होते रणमैदानावर. तोच एक स्री आपल्या पतीजवळच रडतांना दिसली. त्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तोच ती रडत रडतच म्हणाली,           "महाराज, ज्या कारणानं आपण असा रणसंग्राम घडवून आणलाय ना. आता नियतीही आपल्याशी तसंच एखादं कारण दाखवून आपल्या स्वलेकराचे डोळे फोडेल. ज्याचेवर आपण जास्त प्रेम करता आहात. त्याला आपलीच पत्नी मारुन टाकेल. एवढंच नाही तर आपण ज्या हेतुतून आमचे पती मारलेत ना. ईश्वरही आपल्याला आपल्या पत्नीसुखापासून वंचीत करेल. आपली पत्नीच आपला घात करेल."          ती महिला. त्या महिलेनं आपल्या मनातून बोललेली ती वाणी. त्या वाणीत जोश होता. जोशच नव्हे तर ती स्वतःच्या खिन्न आत्म्यातून शापच काढत होती.            सम्राट अशोकानं ते ऐकलं व त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर पश्चाताप होवू लागला होता. असा पश्चाताप की ते विचार करु लागले होते.           "कशाला युद्धाचा नाद केला मी. विनाकारणचं युद्ध. काय मिळवलं मी. चक्रवर्ती सम्राट बनलो. परंतु हे पद शाश्वत राहील का की कुणी एखादा येवून मलाच हारवून जाईल."           अशोकांचे ते विचार करणे. ते तसेच सुरु होते.           "देवीनं अडवलं होतं मला. म्हणत होती की कलिंगशी युद्ध करु नका. मी ऐकलं नाही तिचं. ऐकलं असतं तर असा रक्तपात झाला नसता. परंतु आता पुरं. आता रक्तपात करायचाच नाही कधी. आता आपण तथागताचे विचार मानायचे. ते सुंदर आहेत. लोभाला स्थान नाही त्यात. अंधश्रद्धा मुळीच नाही. दुःखातून काढण्याचा मार्ग लपला आहे त्यात. आत्मा परमात्म्याचा अभ्यास नाही. अन् पश्चातापालाही स्थान नाही. तिनं सांगीतलेला धर्म भूत मानत नाही. ना दुःखाची सुरुवात व शेवट आहे त्या धर्मात. मी पापच केले आहे. घोर पाप. या पापाला क्षमा नाहीच. बरोबर आहे या स्रीचं म्हणणं. ती शाप देणारच. कारण तिचं मन दुखावलं. तिचा पती हिरावला गेला ना माझ्यामुळं. अन् तिचं बरोबरच. कारण तिचा पती मरण पावताच तिचा आधार गेला. तो आधार. ज्यानुसार ती सुखी होती आपल्या जीवनात. आता पुरेसं झालं युद्ध. आता बंद करायचं युद्ध करणं. आपण आपला धर्म सोडायचा. जो आपला धर्म आत्म्याला मानतो. पश्चातापाला थारा देतो. परंतु पाप ते पापच असतं. जरी पश्चात्ताप केला तरी पापाची चिन्हं मिटत नाहीत. अन् मिटणारही नाहीत. अन् का मिटावीत?"          सम्राटाला कलिंग युद्धानंतर झालेला पश्चाताप. त्या पश्चातापानं त्यांचं पुर्ण मन ढवळून निघालं. तोडणं सोपं आहे व जोडणं फारच अवघड आहे. हे त्यांना कळलं. त्यातच त्यांनी ठरवलं. आपण बौद्ध धम्म सोडायचा. परंतु तो घ्यायचा कसा? त्याचे नियम काय?         सम्राट अशोक विचार करीत होते, बौद्ध धम्म घ्यायचा. परंतु घ्यायचा कसा? त्यासाठी काय करायचं? या गोष्टी त्यांना समजत नव्हत्या. तसं त्यांना आठवलं. आपली पत्नी देवीच तर बौद्ध धम्माची उपासिका आहे. तीच तर आपली तारणहार आहे. तिच्या घरी शेकडो बौद्ध धम्माचे अनुयायी येतात. विचार सांगतात. तशी तिही आपल्याला बौद्ध धम्माचे विचार सांगत होती. आपण मात्र ऐकले नाहीत. आता आपण ऐकायचं. देवीचं ऐकायचं आणि बौद्ध धम्म घ्यायचा. जो धम्म या पापमय कचाट्यातून मला बाहेर काढू शकतो.            ती रणभुमी व त्या रणभूमीवर पडलेला रक्ताचा सडा. आजपर्यंत सम्राटानं अशा अनेक लढाया केल्या होत्या आजपर्यंत. परंतु आजपर्यंत त्यांना असं कधीच जाणवलं नव्हतं की आपण असे निरपराध सैनिक मारुन पाप करतोय. परंतु आज त्यांना कसतंरी वाटत होतं. वाटत होतं की आपल्या हातून बरंच मोठं पाप घडलंय. ज्या पापाचं प्रायश्चित्त नाही. ते पाप कधीच क्षम्य होवू शकत नाही. परंतु पापाची तीव्रता कमी करता येईल. जर आपण चांगले वागलो तर........            त्यांचा तो विचार. तो विचार बरोबर होता. त्यातच सम्राटांना प्रायश्चित्त होत होतं. त्यातच त्यांनी ठरवलं. ठरवलं की आपण देवीला भेटावं. देवीच यातून योग्य तो मार्ग काढू शकेल.          विचारांचा अवकाश. त्यांनी रणमैदानावरील प्रेतांची विल्हेवाट लावली व ते रणमैदानावरुन परत घरी आले. त्यातच त्यांनी आपले राज्यातील सर्व विधी आटोपवले. कारण त्यांना देवीकडे जाण्यासाठी पाटलीपुत्रवरुन प्रस्थान करायचे होते.                        *************************