Kripi Filej - Khari Drashy Bhitichi - Season - 1 - Part 43 in Marathi Horror Stories by jayesh zomate books and stories PDF | क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 43

Featured Books
Categories
Share

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 43

छलावा भाग1

  काळी श्रापित रात्र सुरु झालेली-

तो सरळमार्गी काळा सडसडीत डांबरी हाईवे दूर पर्यंत पसरला जात - पुढे जाऊन कालोखात बुडालेला - तो सडसडीत सुनसान हाईवे, त्या हाईवेवर पसरलेली शांतता एका अपरिचित भीतीची चाहुल लावून देत होती.
जणु ही वादळीपुर्वीची शांतता असून , पुढे काहीतरी भयंकर घडणार होते.

        
        स्त्याच्या दोन्ही बाजुला स्तब्ध उभी हिरवी झाडे होती, हिवाळ्याचा महिना असल्याने पांढरे धुके झाडांच्या अवतीभवताली, रस्त्यावर पडलेले..

        त्याच रस्त्यावर पसरलेल्या धुक्याला चिरत , दोन हेडलाईट वेगान पुढे आल्या - ती एक पिवळ्या रंगाची बस होती..
 
मुंबईशहरातल्या एका शाळेतल्या सातवी ईयत्तेतील मुलांची डिसेंबर महिन्यातील सहल - रायगडला जाऊन आलेली , आता ती बस पुन्हा रायगडहून मुंबईच्या दिशेने निघालेली..  

        ड्राईव्हसीटवर पन्नास वर्षीय ड्रायव्हर चंपकचाचा बसलेले , त्यांच सर्व लक्ष बसच्या पिवळ्या हेडलाईटने उजळलेल्या रस्त्यावर होत . त्यांच्या बाजुच्या सीटवर मैडम राजंदा बसलेली - अंगावर गुलाबी ड्रेस -आणि खाली पायजमा , लाल लिपस्टिकवाले ओठ- टपोरे डोळे जस काय गोरीपान रशियनच ! 

        रात्रीचे बारा वाजलेले - 
सुनसान शांतता पसरलेली- दिवसभर सहलीत दंगा मस्ती केलेली मुल आता थकून -झोपून गेलेली , म्हंणूनच चंपक चाचाने बसची रुफवरची लाईट बंद केलेली- ज्याने बसमध्ये जरा अंधार पसरलेला..

    गाडी त्या सुनसान हाईवेवरुन वेगान धावत चाललेली, बसच्या इंजिनचा घर्रर्र असा चिरकस आवाज घुमत होता , स्पीडोमीटरमध्ये स्पीडकाटा 100 वर दिसत होता. 

        " चंपक चाचा , ह्या रस्त्याबद्दल मी काहीबाही अनापशनाप ऐकलं आहे - ते खरं आहे का हो?" राजंदा मैडमने चंपकचाचांकडे पाहिलं .  
     तसे चंपकचाचांनी गंभीर चेह-यानेच म्हंटलं. 

    " हा मैडम सर्व खर आहे - रात्री हा रस्ता चांगला नसतो म्हंणतात - गेल्या महिन्यातच ह्या रस्त्यावर धाकड कांड झालं होत , बडा एक्सीडंट हूआ था.. !" चंपकचाचा एवढच म्हंणाले. का माहिती ? त्यांना जास्त सांगावस वाटत होत , पण ते गप्प बसले. 

     " पण चंपक चाचा असं काय आहे त्या रस्त्यावर की रात्री एक्सीडंट होतात.. ? " राजंदा मैडमने नजरेत प्रश्ण चिन्ह ठेवत विचारले. 

       राजंदाच्या त्या वाक्यावर चंपकचाचांच्या कपाळावर आठ्या आल्या - त्यांनी राजंदा मैडम कडे पाहिलं - व ते भयबीत काफ-या आवाजात हळूच म्हंटले.  
           " छलावा!"   

          " छलावा ?" राजंदा मैडमने एकवेळ चंपकचाचाकडे मग पुन्हा समोर रस्त्याकडे पाहिलं - तोच राजंदा मैडमचे डोळे विस्फारले व त्या मोठ्याने किंचाळल्या.. 
   
        " चंपक चाचा ssssss..!" 
राजंदा मैडमला असं घाबरलेल पाहून - चंपकचाचांनी सुद्धा गर्रकन वळून समोर पाहिलं 
 तसे त्यांचेही डोळे विस्फारले , कारण बसच्या पिवळ्या उजेडात जरा दूर रस्त्याच्या मधोमध एक हरण उभी होती. - त्या हरणीचे रक्तातळेलेले लाल डोळे चंपकचाचा - राजंदा मैडमकडे पाहत.. होते.

     चंपकचाचांनी अपघात वैगेरे व्हायला नको म्हंणून - पटकन गाडीचा स्पीड कमी करत ब्रेक - मारलं .. 

        गाडीचे टायर रस्त्यावर घासले जात - 
 चुईक असा भलामोठ्ठा भयंकर आवाज झाला- बस रस्त्यावर थांबली, बसच इंजिन गरम झाल्याने फस्स असा आवाज झाला..
      
    त्या आवाजाने बसमधील सर्व मुल जागी झाली - काहीमुलांच अचानक मारलेल्या ब्रेकमुळे डोक पुढच्या सीटवर आदळल होत - पण काही गंभीर हानी झाली नव्हती.

        
बस अचानक थांबली हे पाहून सर्व मुल झोपेतून जागी झाली , आजुबाजुला असलेला अंधारा जंगली भाग , स्मशान शांतता.. - त्या सुनसान भक्कास रस्त्यावर एकली बस उभी दिसत होती.

     " काय झालं मैडम , बस का थांबवली?" 
बसच्या पहिल्या सीटवर दोन मुल बसली होती- एकाच नाव होत - आंडूनाथ उर्फ आंडू आणि त्याच्या बाजुला त्याचा मित्र बसलेला - रंडूनाथ उर्फ रंडू - त्यातल्याच रंडूने विचारलं.. 

      चंफकचाचा - राजंदा मैड़म दोघेही बसच्या पिवळ्या हेडलाईटच्या उजेडात समोर पाहत होते -  

        काहीवेळा अगोदर जी हरण रस्त्यावर उभी होती, ती जागा आता रिकामी होती, त्या हरणीचा कुठेच पत्ता नव्हता. 

     " मला वाटतं ती हरीन घाबरुन पळून गेली मैडम!" चंफकचाचांनी बसच गियर शिफ्ट केलं,  
एक्सीलेटरवर दाब देत बस पून्हा रस्त्याला लावली..  

        बसच्या मागच्या सायलेंसरमधून काळा धुर बाहेर पडला , बस मागची लाल लाईट दाखवत पुढे निघुन गेली- 

        रस्त्याच्या डाव्याबाजूला आता एक लहान माईलस्टोन दिसत होता - त्यावर लिहिलेल मुंबई 90 किलोमीटर - त्याच माईलस्टोनच्या मागे अजुन एक मोठ फळ होत - त्यावर लाल अक्षरांत धोक्याची सुचना लिहिलेली, मध्यरात्री हा रस्ता वापरु नका..!   

   पण त्या फळ्यापासून पुढे पाहता बस तर लाल लाईट दाखवत वेगान पुढे पुढे जातांना दिसत होती..- ह्याचा अर्थ रंडूनाथ - आंडूनाथ , राजंदा मैडम, चंफकचाचा सर्वाँचा जिव धोक्यात होता..

        बसच्या आत : 
 
 " रंडू - चंपकचाचा आणि राजंदा मैडम कसल्यातरी छलावाबद्दल बोलत होते तू ऐकल
 का ?" आंडूनाथने रंडूनाथला विचारलं.

      " छलावा? म्हंणजे ?" 
   रंडूने न समजून विचारलं.      

     " रंडू मला पण माहिती नाही रे? थांब गूगलवर बघू!" आंडूने त्याच स्मार्टफोन बाहेर काढलं- पण हे काय ? सिमला रेंजच नव्हती. 

     " ओ तेरी ह्या रेंजला पण आताच जायचं होत !" आंडूनाथ त्रस्त स्वरात उच्चारला.

        " अरे , आंडू ! फोन सोड आपण चंपकचाचाला विचारु !" रंडूने अस म्हंणतच - चंपकचाचांना आवाज दिला व बोलू लागला. 

      " चंपकचाचा , तुम्ही आणि मैडम कोणत्यातरी छलावाबद्दल बोलत होतात ? काय असतं ते ?" रंडूने विचारलं . 

        त्याच्या त्या वाक्यावर चंपकचाचाच्या चेह-यावर गुढ ,भयमय भाव पसरले. 

        राजंदा मैडमने सुद्धा रंडूच्या वाक्याला दुजोरा देत म्हंटलं.

        " हो मी सुद्धा हेच विचारणार होते , काय असतो हा छलावा !" 

        ' व्हऊ sssss..'     
दूर जंगलात कोठेतरी रानटी श्वापदाची विव्हळ फुटली , जणु ते श्वापद सांगत असाव - त्या मनहुसच नाव घेऊ नको. 

तो रानटी श्वापदाच चिरकस आवाज ऐकून - बसमधील काही मुल घाबरली,रंडूनाथ आंडूनाथ मात्र सिग्मा मेल होते - ते कोणालाही घाबरत नव्हते. 

     " मैडम - मुलांनो!" 
चंपकचाचांनी आपल्या डोक्यावर असलेल्या काचेच्या आरश्यातून रंडू-आंडूकडे पाहिलं, व भीतीदायक गुढ स्वरात पुढे सांगू लागले. 

    " छलावा - हा कोणि जिता-जागता माणुस नाही, तो एक पिशाच्छ प्रेत योनीत भटकणारा अभद्र,अघोरी आत्मा आहे - ज्या माणसाच फसवून - छळ,कप्टाने, सुनसान माळरान, जंगल अश्या ठिकाणी खून होतो, त्या मेलेल्या माणसाच आत्मा छलावा पिशाच्छ बनतो!" चंपकचाचा ही विलक्षण हकीकत सांगत होते - राजंदा, मैडम - रंडू-आंडू- बाकीची ती दहा बारा मुल कान देऊन उत्साहीत होऊन ऐकत होते.. 
  बस रस्त्यावरुन हवेला कापत धावत जात होती-  

        " हा छलावा भुत - रात्री रस्त्यावरुन जाणा-या मांणसांना भुलवतो , त्यांना आपल्या जाळ्यात पकडून - एकाच जागेवर रात्रभर फिरवत राहतो, जो पर्यंत तो छलाव्यात अडकलेला माणुस मरत नाही!" चंपकचाचा सांगत म्हंटले. 

       " चंपकचाचा जरा गाडी थांबवता का हो ? " आंडू म्हंटला. 

        " का ?" चंपकचाचांनी विचारलं .

       " काय सांगू चंपकचाचा , मला तुमच्या छलाव्याची गोष्ट ऐकून एक नंबर लागली होहिहिहिहीहीहीही!" आंडू निर्लज्जासारखा दात दाखवत हसला , रंडूनाथ सुद्धा त्याला दुजोरा देत हसू लागला... 

        बाकीची मुले- मुली सुद्धा दात काढत हसू लागली. 

        " सायलेंस , सायलेंस -!" 
राजंदा मैडमने सर्वमुलांना शांत बसायला सांगितलं . 

        " सॉरी, पण मी गाडी थांबू शकत नाही रंडू - हा रस्ता चांगला नाही , आता मुंबईला पोहचल्याशिवाय गाडी थांबनार नाही.!" चंपकचाचा म्हंणाले. 

        " अरे ओ चंपक चाचा गाडी थांबवा , नाहीतर मी ईथंच सीटवर मुत्रविसर्जन करील!" 
आंडू त्रस्त स्वरात म्हंटला. 

        " आंडू फटके देईन नालायक सारख बोलू नकोस!" राजंडा मैडम आंडूला रागात ओरडल्या. राजंदा मैडमने चंपकचाचाकडे पाहीलं. 

        " चंपकचाचा गाडी थांबवा !" 
 राजंदा मैडमच्या वाक्यावर , चंपकचाचांना गाडी थांबवावीच लागली पण त्यांनी एक अट घातली व ते म्हंणाले ..

        " मी गाडी थांबवतो मैडम , पण फक्त पाच मिनिटे , आणी हा रस्त्यावर काहीही पडलेल दिसल तरी ते सोबत घेऊन येऊ नका. " 
 चंपकचाचांच्या अटी सर्वांनी मान्य केल्या.. 

    रसत्याच्या एकेकडेला चंपकचाचांनी बस थांबवली,रंडू-आंडू , अजुन बरीच मुल बस मधून उतरली.. 

        रसत्याच्या दोन्ही तर्फे गारेगार पांढर धुक
साचलं होत , रस्ता दूर दूर पर्यंत सूनसान पडलेला दिसत होता -  

        बसची पुढची हेडलाईट समोरचा रस्ता ऊजळून गेलेली, तर मागच्या दोन्हीसाईडलाईट बंद चालू होत टिक टिक आवाज करत वाजत होती-  

        रंडू-आंडू दोघेही बसपासून जरा दूर अंधारात आले , एक नंबर करुन त्यांनी पेंटची चैन लावून घेतली-  

        आजुबाजुला झाड-झुडपे होती,
     त्याच वाटेतून हे दोघेही बसच्या दिशेने निघाले , तोच रंडूच्या नजरेला एका झाडापाशी एक बाहूला पडलेला दिसला -   

       अंगात एक काळा सुट, आतमध्ये सफेद शर्ट- खाली काळी पेंट, पायांत काळे बुट- चौकोनी चेहरा - जबडा विचकलेला - त्यातून हसतानाचे पांढरे दात दिसत होते - डोक्यावरचे काळे केस मागे चोपून बसवलेले - त्या बाहुल्याचे निळे कचकड्याचे डोळे वर आकाशात पाहत होते. 


    " चल मस्त बाहुला आहे घेऊन जाऊ!"
रंडू म्हंणाला. 

        " अरे पण चंपकचाचाने काय सांगितलं, रस्त्यावरची वस्तु सोबत आणू नका.!" आंडू म्हंटला. 

        " हा मग ही रस्त्यावरची वस्तू नाही आंडू , जंगलातली वस्तु आहे - विचार कर ह्याला चोर बाजारात कचरा शेठला विकुन दिडशे रुपए भेटतील !" रंडू म्हंटला.  

        पैसे भेटतील ह्या लालसेने दोघांचे डोळे चमकले , रंडूने आपल्या खांद्याला असलेल्या बैगमध्ये बाहुला कोंबला व बसमध्ये आपल्या सीटवर येऊन बसले.. 

        पण ह्या दोघांना कद्दापी कल्पना नव्हती , की त्यांनी तो बाहुला नाही, तर बाहुल्याच्या रुपात छलावा सोबत आणला होता. 
    म्हंणजेच मृत्युचा पैगाम.

     चंफकचाचांनी गियर टाकत बस रस्त्याला लावली- दोन्ही हातांनी ते स्टेरिंग फिरवत होते - बसची चाक गरागरा गोल भिंगत होती.. 

  चंफकचाचांनी उजवीकडे काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं - जरा दूर एक मक्याच झाड होत , त्या झाडांच्या मधोमध एका काठीवर एक काला कोट, डोक्यावर काळी टोपी, खाली चौकलेटी पेंट असा खाली मान घालुन उभा बुजगावण लटकत होता , आणि त्या बुजगावण्याच्या खांद्यावर एक काळा कावळा बसलेला.. 

        चंपकचाचा त्या दृश्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत होते - कारण हा रस्ता त्यांच्या ओळखीचा होता , त्यांना ठावूक होत की ह्या रस्त्यावर एकही मक्याच शेत नाही- हे , मग हा शेत आला तर आला कोठून ? हा प्रश्ण त्यांच्या मनात भीती निर्माण करुन गेला होता. 

    शेवटी ते शेत मागे सोडल गेलं..

      " चंपकचाचा - ते शेत बघितलंत तुम्ही - सहलीला जाताना अगोदर का नाही दिसलं आपल्याला ,कमाल आहे!" मागच्या सीटवर बसलेला रंडूनाथ म्हंटला.  

        त्यावर चंपकचाचा काहीही म्हंटले नाहीत - पण त्यांच्या चेह-यावर अस्वस्थ,भय- असे भाव पसरलेले , कपाळावर घाम आलेला..
कारण हे शेत नव्यानेच ईथ आलं होत , किंवा छलाव्याच्या जाळ्यात फसल्याची ही खून होती.

        
    क्रमश: