My Lovely Wife in Marathi Love Stories by juhi lidbe books and stories PDF | My Lovely Wife

Featured Books
  • सवाष्ण

    आज जत्रेचा पाचवा दिवस होता आणि त्यात रात्री झालेला पाऊस. सगळ...

  • My Lovely Wife

    अनाथ इशू ला 5 वर्षाची असताना,,शहरातील सर्वात श्रीमंत असणाऱ्य...

  • हेल्लो

    सायली आणि निशात…निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच ए...

  • डेथ स्क्रिप्ट - भाग 3 - अध्याय 4

    अध्याय ४--------------मनातील गडद लढा------------------------...

  • ऑपरेशन मेघदूत

    भारतीय सैन्याच्या इतिहासात १३ एप्रिल १९८४ हा दिवस एक अमर क्ष...

Categories
Share

My Lovely Wife

अनाथ इशू ला 5 वर्षाची असताना,,शहरातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या रायजादा यांच्या घरी दत्तक घेण्यात आलं..त्या परिवारात चांगल पालन पोषण करण्यात आलं.. आणि जशी ती 19 वर्षाची झाली तशी तिच्याकडे एक मागणी करण्यात आली... पाहू समोर काय आणि कोणती गोष्ट होती ती वाचत राहा My Sweet Wife 🥰💞

मुंबई 


आज रायजादा मेन्शन असं वाटत होतं जस की  शहरात ला मोठा मॉलच उघडला आहे.पूर्ण हॉल मध्ये जिकडे तिकडे ब्राईड चे लेहंगे , सॅंडल्स, ज्वेलरी, आणि बरेच सामान जे ब्राईड लग्नात हवं असतं.. ते सर्व एक्सपेन्सिव आणि व्हेरियस वेरायटी मध्ये अव्हेलेबल होतं, तर दुसरीकडे गृम च्या वेगवेगळ्या कलर च्या शेरवाण्या, तसेच जुती, वॉच, गळ्यातील माळा... एक सें बडकर एक......

         तेवढ्यात तिथे चालत एक वायस्क बाई येते, गौतमी रायजादा....वयवर्ष जवळपास 65..आणि आपल्या चाणक्य नजरेने सर्व निरीक्षण करून दमदार आवाजात आलेल्या माणसांना...


"" इथे असतील त्यापैकी सर्वात सुंदर आणि भारी लेहंगा, आणि माझ्या नातवासाठी शेरवानी दाखवा.. 


जे माणसं तिथे सर्व घेउन बसली होती त्यांनी ते दाखवाय ला सुरुवात केली..  एक से बढकर लेहंगे एक से बढकर एक कलर...

         हे सर्व पाहतच होते की तेवढ्यात एक स्त्री तिथे आली जी दिसायला खूप सुंदर साधी आणि सरळ वाटत होती..

तिला काहीतरी बोलायचं होतं तेवढ्यात गौतमी जी म्हणाल्या सुनबाई हे बघ ही शेरवानी आणि लेहंगा कसे आहे ..... ( ही स्त्री म्हणजे आपल्या कथेच्या हिरोची सावत्र आई शितल राय जादा )...

  

ते सर्व पाहून शितलच्या चेहऱ्यावर चमक आली... आणि  शितल जी काही म्हणायला जाणार इतक्यात,  बाहेरून एक आवाज आला.. त्या दिशेने दादी आणि शीतलजीनी पाहिले... त्या माणसाकडे पाहून शितलजींच्या चेहऱ्यावर चमक आली तर दादी जींचा चेहरा कठोर झाला.. आणि म्हणाल्या..



" शैलेश तू इथे काय करत आहे,, तुला माहित आहे ना विराजला तुझं इथे येन अजिबात पसंत नाही....

" विराज म्हणजे कोण तर आपल्या स्टोरी चा हिरो....



द विराज रायजादा सीईओ ऑफ रायजादा इंडस्ट्रीज.

(आणि शैलेश रायदादा जे विराज चे वडील एक आर्मी ऑफिसर आहे..)....



शैलेश जी आपल्या आईचे बोलणे ऐकून नाराज झाले, आणि काही न बोलता सरळ वरती पायऱ्यांवरून आपल्या बेडरूम मध्ये जाऊ लागले...


हे बघून दादीजींना खूप राग आला आणि त्या तावातच उठल्या... आणि दादीजींचा राग पाहता शितल मधातच बोलल्या....



आई जाऊ द्या ना,, शेखर इथे विराज च्या लग्नासाठी आले आहे,,, त्यांचा एवढाही अधिकार नाही का स्वतःच्या मुलाच्या लग्नाला यायचा.... आणि लग्न झाल्यावर ते इथून चालले जातील, मी बोलेल त्यांच्याशी की लग्नात त्यांनी कोणताही तमाशा करायचा नाही..



एवढं बोलून शितल वरती जायला निघाल्या तेवढ्यात दादीजी म्हणाल्या,,,,, शैलेश ला नंतर बोलवशील पहिले जा वरती आणि त्या दोन मुलींना पाठवून दे.... त्यांच्यासाठी लेंगा पसंत करतील त्या....

शितल जी हो मान हलवत वरती चालल्या गेल्या...




शितल वरती एका रूम मध्ये आल्या जे रूम एखाद्या लहान मुलांच्या रूम सारखी सजवली होती आणि रूमच्या मध्य भागात मोठा गोल् राऊंड बेडवर त्या दोघीजणी मस्त dharadhur झोपल्या होत्या... त्या एवढ्या गाड झोपेटत  होत्या की त्यांना बाहेर काय सुरू आहे याची कानो कान खबर नव्हती....


त्यांना पाहून शितल जी त्यांना उठवायला आल्या त्यातील एक होती हेमा आणि दुसरी होती इशू...


हेमा इशू उठा लवकर दादीजींनी तुम्हाला खाली लवकर बोलवले आहे,, लहंगा चुस करायला.. जा उठा लवकर आणि कोणाला कोणता कलर आवडतो तो जाऊन सिलेक्ट करा... हे सर्व ऐकून हेमा अगदी पटकन उठली... पण इशू मात्र अजूनही झोपून होती..



हेमा एक्साईटेड होऊन बोलली,,... काय खाली सर्व लेहंगा आणले आहेत.... इशू प्लीज प्लीज उठ ना लवकर आपण जाऊन बघू... ती काही मात्र उठायचं नाव घेत नव्हती 

""" हेमा... मा....झोपु दे ना ग थोडा वेळ अजून,..


हेमानी इशूला जबरदस्ती उठवलं आणि खाली घेऊन गेली...



तर हेमा म्हणजे विराजची सावत्र बहिण, थोडीशी जल्ली आणि डोळ्यांवर भिंगाचा चष्मा असलेली मुलगी सोबतच दोन वेण्या घातलेली ही म्हणजे हेमा .आणि इशू म्हणजे तीच मुलगी जिला पाच वर्षाची असते वेळी रायजादा फॅमिली ने दत्तक घेतले होते... आणि आता वेळ आली होती तिचे उपकार फेडण्याची.....




लहानपणापासून इशू रायजादा फॅमिली ची एक मेंबर म्हणून राहली,. घरातली सगळेजण तिच्यावर खूप प्रेम करत होते आणि सोबतच हेमा सुद्धा तिची खूप लाडकी बहीण तसेच मैत्रीण होती...




    इशू दिसायला एकदम सुंदर नाकी डोळी, गोरा वर्ण तसेच कंबरेच्या खालपर्यंत केस.. तितकीच समंजस मनमिळावू आणि स्वीट . जसं की तिला पहिल्यांदा पहिल्याबरोबरच नजरेत भरेल अशी सौंदर्यवती म्हणजे आपली इशू......




हेमा तिला ओढतच खाली घेऊन आली आणि तिच्या अंगावर एक एक लेहंगा लावून पाहत होती... सर्वच कलर इशू वर खुलून दिसत होते... पण तिचं मन मात्र जागेवर नव्हतं का ते समोर पाहूच आपण.....





दादी.... इशू...बेटा तुला विराज सोबत लग्न मान्य आहे ना... इशू विचारातून बाहेर येत हो,...हो,..दादी.... जिथे मला एवढं प्रेम,माया मिळाली आपुलकीची माणसं मिळाली... त्यांच्यासाठी तर मी एवढं करूच शकते...

मी लग्नाला तयार आहे.......