I am self-absorbed.... - 3 in Marathi Motivational Stories by Shivraj Bhokare books and stories PDF | आत्ममग्न मी... - 3

Featured Books
Categories
Share

आत्ममग्न मी... - 3

( टीप: हा भाग वाचल्या नंतर किंवा वाचण्याच्या आधी या भागाच्या आधीचा भाग नक्की वाचा )

भाग : 3

Happiness is a choice....

आयुष्य किती सुंदर आहे नाही? आयुष्य जगत असतांना किती साऱ्या गोष्टी आपण शिकत असतो, बघत असतो. नात्यांचा अनुभव घेत असतो. नवीन गोष्टीचा सतत अनुभव घेत जाण किती सुखदायक असत. पहिले थोड अवघडल्यासारखं नक्कीच वाटत पण नंतर किती एकरूप होऊन जातो आपण काही गोष्टीशी खुप जास्त समाधानी असल्यासारख वाटत काही वेळा, तो आनंद आपण स्वतः साठी शोधलेला असतो. दुसरं कुणाला सांगताही येनार नाही येवढं काही आपण नवीन गोष्टींशी जुळवून घेण्यावा प्रयत्न करत असतो.


नवीन गोष्टी शिकत जाणं हा खरोबरचं खुप सुखदायी क्षण असतो. तेव्हा आपणच धडपडायचं आणि स्वताला सावरायचे. खुप काही अडीअडचनीचा सामना करायचा प्राणि स्वतःला शाबासकी व्यायची. किती गंमत असते नाही .

एक माणुस म्हणून सतत काहीतरी शिकत राहणं किंवा अनुभव घेणं हे किती गरजेचं आहे. त्याशिवाय तर आपल आयुष्य किती सुनसुन वाटतं जर आपण फक्त एकच गोष्ट करत राहिलो आणि त्यातचं संतुष्ट राहु लागलो तर मग माणसाच्या या चाणाक्ष बुद्धीच, करायच काय? किती निरस वाटायला लागेल सगळे फक्त एकच एक.. आपल्या जर काही आवडी, छंदच नसतील तर मग नवीन गोष्टीचा अनुभव, त्यातून मिळणारा आनंद याला आपण किती पारखे  होऊन जाऊ....

मला असं सतत वाटत असतं कि मला नाही जरी या कोणत्या गोष्टीत परफेक्ट होता आलं तरी काहीच हरकत नाही पण सतत काहीतरी नवीन शिकण सोडायला नको -- कमीत कमी प्रयत्न तरी करायला हवा... हे गरजेच नाहीच आहे कि कोणाला प्रेरणा समजून किंवा उगच करावसं वाटलं म्हणून काहीतरी शिकत आहे... कमीत कमी एक आवड आणि निस्वार्थ निखळ आनंद आणि कर्म म्हणुन आपण त्याकडे बघायला हवं...

इथे ही गोष्ट आपण दुसयाला दाखवायची आहे किंवा कोणाशी स्पर्धा करायची म्हणुन करण्यापेक्षा मला हे सगळ करता यायला हवं' किंवा 'मलाही हे करुन पाहिलं पाहिजे' असं म्हणून काही जर शिकले तर खुप समाधान आपण अनुभवू शकतो, भलेही मनाची निराशा होईल सुरुवातीला पण नंतर जर एकदा जर ती गोष्ट जमायला लागली कि मनातून अगदी अंर्तमनातून ज्या आनंदाच्या उसळ्या फुटतात ना तो आनंद काही वेगळाच असतो...


भाग: ४

सुंदरता या विषयावर काय लिहावं... सौदर्य हे मुळातच किती सुंदर गोष्ट आहे ना...

आणि बाह्यसौंदर्य हेच खर सौदर्य असत कि नाही याबद्‌दल खुप कमी लोकं चर्चा करतील कारण त्याव्यतिखित सौदर्य असतं कि नाही हे कुणाला कळतही नसेल,

एखादी व्यक्ति सुंदर आहे म्हटल्यानंतर ती कशी दिसते आपण एवढंच बघतो, नव्हे तर तेच तर बघायच असतं आपल्याला याशिवाय सौंदर्याची व्याख्यातरी काय करता येणार . असा विचारही येणार नाही कुणाच्या मनात.

सगळेच लोक आपल्याला आपल्या सुंदर दिसनावावरून Jagdge करतात आणि नकळत आपणही आकर्षित होतोच कि गोऱ्या रंगाकडे, सुंदर सुंदर, आणि नाजुक चेहयाकडे, शरिराकडे कदाचित हे नैसर्गिकच असाव आणि मग यानंतर सौंदर्य काही असत का हा प्रश्नही आपल्याला पडत नाही..

पण खरचं याला सुंदरता समजणं योग्य आहे हा प्रश्न मला बऱ्याच वेळा पडतो कारण आपण अशाही लोकांकडे आकर्षित होतो जे दिसाय‌ला खुप कुरुप असतात पण मनाने आणि स्वभावाने खूप जास्त सुंदर... आणि हिच सुंदरता आपण प्रत्येकामध्ये बघत नाही. खरं बघायला गेल तर बाहेरून दिसणारी सुंदरता हि काही काळासाठीच असते. एका ठराविक वयानंतर ती नाहीशी होते पण आपल्या मनात
असणारी सुंदरता, आपल्या चांगल्या विचारांची सुंदरता ही कायम टिकून राहते. आपलं बाहेरुन सुंदर दिसणं हे काही वेळासाठी आपल्याला आनंद देऊ शकतं पण आपला सुंदर स्वभाव, आपलं स्वच्छ आणि प्रामाणिक आंतरिक व्यक्तिमत्व आपण इतरांवर निस्वार्थ भावनेन केलेलं प्रेम आणि दया , आपल्या मनाची शांतता आणि आपला मनमोकळा आणि इतरांना समजून घेणारा गुण हा कितीतरी लोकांच आयुष्य सुंदर करु शकत आपले कर्तृत्व आणि परोपकारीता या सगळ्या गोष्टींपुढे लोक आप‌लं बाह्य सौदर्य बघतही नाहीत. आणि मला सुद्धा हिच खरी सुंदरता वाटते.....

समाप्त...

आवडल्यास फॉलो करायला विसरू नका....
धन्यवाद