Mandodari - 1 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 1

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 1

*****०*****************
मंदोदरी या पुस्तकाविषयी

           मंदोदरी नावाची कादंबरी वाचकाच्या हातात देतांना आनंद होत आहे. ही माझी एकशे बारावी पुस्तक असून त्र्यांशिवी कादंबरी आहे. या कादंबरीतून मी मंदोदरीची त्या काळात झालेली उपेक्षा मांडली आहे. विशेष करुन सांगतो की मंदोदरी ज्या काळात झाली. तो काळ पितृसत्ताक कुटूंबपद्धतीचा काळ होता व त्याही काळात पत्नीला किंवा स्रीजातीला विशेष असा दर्जा नव्हता. त्यामुळंच मंदोदरीची त्याकाळात उपेक्षाच झाली. 
          या कादंबरीचं विशेषण असं की ही कादंबरी पुर्णच बाबतीत सत्यावर आधारीत नाही. काही काल्पनिक भागही यात टाकलेला आहे. ज्यातून मंदोदरी कादंबरी बृहद स्वरुपात साकारता आली. 
          खरं तर मंदोदरी ही एक पतीव्रता स्री होती. ती आपला पती रावणावर अतिशय प्रेम करीत होती. ज्यात तिनं आपला पती रावणाबद्दल पत्नीनिष्ठा बाळगली होती. म्हणतात की तिनं विभीषणाशी विवाह केला. मग ती पतीव्रता कसली? त्याचं उत्तर आहे, तिचं असलेलं प्रेम. तिनं विभीषणाशी जरी विवाह केला असला तरी तिनं शरीरानं विभीषणाशी विवाह केला होता. मनानं ती रावणासोबतच होती अखेरच्या श्वासापर्यंत. म्हणूनच ती पतीव्रता ठरली.
          मंदोदरीला पंचकन्याही म्हणतात. जरी तिचा जन्म राक्षसकुळात झाला असला तरी. कारण तिनं बाळगलेला संयम. तिनं अतिशय वाईट विचारांच्या व्यक्तीमत्वासोबत राहूनही जो संयम बाळगला. त्यामुळंच ती पंचकन्या ठरते. 
           मंदोदरी नावाची ही कादंबरी अतिशय वाचनीय झालेली असून त्या कादंबरीबद्दल मी सांगण्याची गरज नाही. शिवाय त्यात काही असे नवीन भाग आहेत की जे आपण ऐकलेले नसतील कदाचित. ते भाग मी यात लिहिलेले आहेत. काही काल्पनिकही आहेत. त्यामुळंच ते भाग वाचल्यावर त्यावर जास्त विचार वा बाऊ करु नये. त्याची सत्य, असत्य परिभाषा करण्याऐवजी त्याला काल्पनिक भाग समजून सोडून द्यावे. विषय घेवून वाद संवाद करु नये. ज्यातून वाद वाढेल. 
          बऱ्याच दिवसांपासून मला आम्रपाली व मंदोदरी या कादंबऱ्या लिहायच्या होत्या. आम्रपाली बऱ्याच दिवसापुर्वी लिहिली. परंतु मंदोदरी या कादंबरीला काही काळ वाट पाहावं लागलं. अन् जेव्हा साकार झाली. तेव्हा अतुलनीय अशाच स्वरुपाची साकार झाली की प्रत्येक भाग वाचनीय झाला. हे मी सांगून चालणार नाही तर आपण प्रत्यक्षात वाचावं. 
          मंदोदरी कादंबरीतील बरेचसे भाग हे आपणाला माहितच आहेत. यात सीता नेमकी कोण? सुलोचना नेमकी कोण? मंदोदरी नेमकी कोण? धन्यमलिनी व चिरंगी कोण? मंदोदरी कशी मरण पावली? यासारखे बरेचसे विषय आहेत. ते भाग वाचावयास भाग पाडतातच. ज्यात पुढं काय झालं याची उत्कंठा लागून राहते. काही जणांना नक्कीच वाटते की हे भाग कुठून आणले असतील. आता ते कुठून आणले? कसे आणले? हे पडताळून न पाहता केवळ मनोरंजन म्हणून ही कादंबरी वाचा व कळवा की लेखक म्हणून ही कादंबरी मी आपणास फालतू वाचायला लावली की ही कादंबरी सरस झाली. त्याबद्दलचे आपले विचार महत्वाचे आहेत. जर या कादंबरीतून आपले मनोरंजन झाले असेल तर शाबासकी देवू नका आणि नसेल झाले तर रागवूही नका. दोन असे शब्द मांडा की ज्यातून मला प्रेरणा मिळेल व आपणासाठी मी आणखी नवीन कादंबरी लिहू शकेल. 
            आपला नम्र 
         अंकुश रा. शिंगाडे ९३७३३५९४५०

************************१*******************

          मंदोदरी (कादंबरी)
                     अंकुश शिंगाडे 

         "महाराणीसाहेबा, आपल्या महाराजानं आणखी एका स्रिचं अपहरण करुन आणलंय." 
           एका दासीनं महाराणी मंदोदरीला सुचना दिली. तसा मंदोदरीला प्रश्न पडला. प्रश्न पडला की महाराज कधीच सुधारायचे नाहीत. कदाचित हेच स्रिचं अपहरण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरु शकते. त्यामुळंच ती विचलीत व्हायची. त्याचं कारण होतं तिचं रावणावर जडलेलं व आता निर्माण झालेलं प्रेम. तसं प्रेम तिच्या मनात विवाह करतांना नव्हतं. 
          रावणावर आता तिचं प्रेम होतं. निरतिशय प्रेम होतं. परंतु अशाच सवतीवरुन कधीकधी त्या दोघांचं भांडण व्हायचं व वाटायचं की आपण मरुन जावं. याच हेतूनं एकदा तिनं साधू संतांच्या हत्येतून गोळा केलेलं व निरपराध पशुपक्षांचं गोळा केलेलं रक्त तिनं प्राशन केलं होतं. वाटलं होतं की आपण मरण पावलेले बरे. परंतु तसं काही घडलं नव्हतं. ती जीवंतच राहिली होती. त्यातच त्यातून दिव्य चमत्कार झाला होता व एक कन्या जन्माला आली होती. हे मंदोदरीला माहीत होतं व हेही माहीत होतं की ती कन्या तिनं एका शेतात पळसाच्या झाडात ठेवली होती. जे राजा जनकाचं जनकपुरी राज्य होतं. शिवाय हेही माहीत होतं की ती कन्या राजा जनकाला मिळालेली आहे व तिचा विवाह अयोध्येच्या रामाशी झालेला आहे. 
          मंदोदरीला प्रश्न पडला. माझ्या पतीनं एका स्रीचं अपहरण केलं. तो मंदोदरीला नेहमीच सतावणारा प्रश्न असायचा. ती नेहमी विचलीतच व्हायची. परंतु आता तिला ती सवय पडली होती. त्यामुळंच ती तेवढी विचलीत झाली नाही. कारण ती त्याची सवयच होती व त्यानं अशाच एक हजार स्रियांना पळवून आणून त्यांना भार्या बनवलं होतं. 
          रावणानं एका स्रीचं अपहरण करणं. हा तिला विचलीत करणाराच प्रश्न असायचा व ती त्या स्रियांना आवर्जून भेटायलाही जायची कधीकधी. तशीच मंदोदरी तिच्या पतीनं आणलेली स्री कोण? याची चौकशीही करायची कधीकधी. त्यात तिनं एका दासीला बोलावून विचारलं,
          "दासी, कोण आहे ती स्री? कोणत्या राज्यातील आहे? जरा चौकशी करुन सांगतेय काय?"
          मंदोदरीची ती आज्ञा नव्हे तर तो आदेशच. ती दासी तरी ती आज्ञा कशी टाळणार. तोच ती ताबडतोब गेली व चौकशी करुन ताबडतोब परतली. तोच ती मंदोदरीच्या कक्षात परतून तिला म्हणाली,
            "महाराणीसाहेबा, ती सीता आहे. अयोध्येतील रामाची पत्नी व जनकपुरीतील राजा जनकची मुलगी. म्हणतात की सुरपंखेचं लक्ष्मणानं नाक कापल्याचा बदला घेण्यासाठी सीतेचं अपहरण करुन आणलंय महाराजांनी. म्हणतात की तिला आपले महाराज पत्नी बनवणार आहेत जबरदस्तीनं." दासीनं माहीती दिली व ती चालती झाली.
           माझ्या पतीनं सीतेचंही अपहरण केलं. दासी सांगतेय. कदाचित दासी खोटं बोलत असेल. ती सीता नसेल. अन् ती सीता तरी कशी असणार? दासीला कोणीतरी चुकीची कल्पना दिली असेल. परंतु असंही होवू शकते की ती सीता असावी! आपण याची चौकशी स्वतः जावून केलेली बरी. 
           तिनं आपल्या मनात त्या स्वरुपाचा विचार केला. विचार केला की आपण स्वतः जावून त्या स्रिची भेट घ्यावी. तसा विचार करताच ती स्वतः तयार होवून एका दासीसोबत सीतेला भेटण्यासाठी निघून गेली. 
           मंदोदरीच्या मनात निर्माण झालेली शंका. तसा तो मंदोदरीला विचलीत करणारा प्रश्न. तिला माहीत झालं नव्हतं की ती सीताच आहे. तसं पाहिल्यास तिचा पती रावण कधीकधी बळजबरीनं स्रियांचं अपहरण करुन आणत असे व त्यांच्याशी जबरदस्तीनं विवाह करीत असे. याहीवेळेस आणलेली स्री. कदाचित ती सीता असेल की नाही याची शहानिशा करण्यासाठी मंदोदरी सीतेचा शोध घेण्यासाठी तिथं पोहोचली. त्यातच ती चौकशी करु लागली. 
           "कोण आपण? आणि कुठल्या राज्यातील? मी ऐकलं आहे की आपण रामाच्या पत्नी आहात आणि रावणानं आपल्याला अपहरण करुन आणलंय. हे खरं आहे काय?"
            "होय, आईसाहेब. मी सीताच. मला माझ्या पतीपासून आपल्या पतीनं जबरदस्तीनं तोडंलंय. ते शिकारीला गेले असतांना आपले पती साधूच्या वेशात आले व त्यांनी आणलंय मला माझ्या पतीच्या पश्चात. ते घरी नसतांना. म्हणावं की मला लवकरात लवकर माझ्या पतीकडे परत करावं. नाहीतर माझे पती त्यांना सोडणार नाहीत. ते बलवान आहेत अन् तेवढेच शूरही." सीतेनं स्पष्टीकरण दिलं.
         'सीता' सीता शब्द ऐकताच मंदोदरीच्या मनात धस्सं झालं. क्षणभर तिला तिची शुद्धच हरपल्यासारखी वाटली. वाटलं की तिच्या पायाखालची जमीन सरकत आहे. तशी ती काही वेळ मौन झाली. काही वेळानंतर ती मौनातून शुद्धीवर येताच म्हणाली,
           "खरं सांगताय आपण? आपण सीताच आहात म्हणून?"
            "होय, मी सीताच. मी सीताच आहे. त्या बलवान रामाची पत्नी व जनकपुरीतील राजा जनकाची मुलगी. म्हणतात की मी त्यांना नांगराच्या फाळात सापडले." सीता म्हणाली.
            सीतेनं दिलेलं स्पष्टीकरण मंदोदरीच्या काळजाला भेदून गेलं. तसा तिच्या मनात विचार आला. विचार आला की हीच ती सीता. जी माझी मुलगी आहे. अन् माझ्या मुलीवरुन ही माझ्या पतीचीही मुलगीच. अन् माझे पती या सीतेशी विवाह करणार. स्वतःच्या मुलीशीच विवाह करणार? हे शक्य नाही व हे शक्य होवू नये. कारण काळाला हे सत्य माहीत होताच वर्षानुवर्ष काळ रावणाच्या व माझ्या अपराधाबद्दल आम्हा दोघांना कोसत राहिल. म्हणेल की तो वासनांध रावण. त्यांना आपल्या मुलीलाही छळलं. परंतु ते अनभिज्ञच आहेत त्या गोष्टीपासून. त्यांना माहितच नाही की सीता ही त्यांची मुलगी आहे. म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलंय. जर त्यांना माहीत असतं की सीता ही त्यांचीच पुत्री आहे, तर त्यांनी तशा स्वरुपाचा गुन्हाच केला नसता. चुकलं माझंच की मी त्यांना सांगीतलं नाही. अन् कशी सांगणार? त्यांचा संताप फार वाईट. तसं माहीत होताच त्यांनी माझी हत्याच केली असती. विचार केला नसता की ही माझी पट्टराणी आहे. परंतु आता सांगीतलं तर....... नको नको. आताही सांगू नये. नाहीतर ते ओरडतील. आताही ते संताप दाखवतीलच. शिवाय समाज माझ्यावर दुषणंच लावेल. म्हणेल की मंदोदरी अपराधी आहे. ती गेली असेल चरायला. कुठंतरी तोंड मारलं असेल. ज्यातून तिनं तिला झालेली मुलगीही....... स्वतःची मुलगीही लपवून ठेवली. अन् तेच पाप माझ्या डोईवर बसेल. जरी मी तसं पाप केलं नाही तरी. 
          सीता....... माझी मुलगीच आहे. मी माझ्या पोटातून काढलेली मुलगी. माझं उदर फाडून आली आहे ती. मग मी तिची अब्रू कशी जावू देवू? तिचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे. मला तिचं रक्षण करायलाच हवं. प्रसंगी माझे प्राण जाईल तरी चालेल.
          मंदोदरीच्या मनात ती तिचीच मुलगी असल्यानं विचार आला होता. विचार आला होता की तिचं रक्षण करायचं. त्यासाठी ती काहीही करणार होती व काहीही करण्याची तिची तयारीही होती. वाटत होतं की त्यावेळेस तिचं रक्षण न करता तिला सोडून दिलं बेवारस. रानातील हिंस्र श्वापदाची शिकार होण्यासाठी. बरं झालं की ती राजा जनकाला मिळाली व माझी काळजी मिटली. परंतु आता आपण तिचं रक्षण करावं. रक्षण करावं माझ्या पतीपासून. जेव्हापर्यंत ती इथे आहे, तेव्हापर्यंत.
          मंदोदरीनं विचार केला व सीतेला आपण तिची आई आहोत. हे न दाखवता ती ताबडतोब तेथून निघाली. त्यातच तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. 
           मंदोदरीला सीता ही तिचीच मुलगी आहे हे माहीत झाल्यानंतर ती सतत राजमहालातून तिची भेट घेण्यासाठी यायची. तिची खुशाली विचारायची. त्यातच तेथे पहारा असणाऱ्या दास्यांना तिला त्रास देवू नये असं सांगायची. परंतु ती तिला राजमहालात आणू शकत नव्हती. वाटत होतं की कदाचित तिला राजमहालात आणल्यास वा तसा प्रयत्न केल्यास आपले पती त्यावर सखोल चौकशी करतील. ज्यातून सत्य बाहेर पडेल. परिणामी त्यातून माझी आणि आता सीतेचीही हत्या करायला माझे पती मागेपुढे पाहणार नाहीत.
          ती पुरुषसत्ताक कुटूंब पद्धती. पुरुषांनाच कोणत्याही स्वरुपाचे निर्णय घेण्याचा अधिकार होता. त्यांना ना गादीवर बसवून राज्यकारभार करता येवू शकत होता. ना कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना प्राधान्य दिलं जात होतं. एक राजा मरण पावताच दुसरा राजा निवडतांना पर्यायी स्वरुपात पुरुषांनाच प्राधान्य दिलं जाई. राजा जनकालाही राजपद मिळालं होतं. परंतु त्याला स्वतःची मुलगी नसल्यानं त्यानं आपलं राजपद सोडलं होतं व त्यानं आपला भाऊ कृशध्वजला राजपद बहाल केलं होतं. 
           मंदोदरीला आठवत होता तो एकदाचा प्रसंग. त्या दिवशी अचानक मंदोदरी सीतेकडे आली होती. तिचं हालहवाल विचारण्यासाठी. त्यातच त्यात तिचं सदोदीत रक्षण व्हावं ही देखील एक भुमिका होती.
          तो दिवस आठवत होता तिला. तिनं पाहिलं की तिचा पती महाराज रावणाच्या हातात तलवार होती व तो ओरडत होता सीतेवर. म्हणत होता की माझ्याशी विवाह कर. नाहीतर या तलवारीनं तुझं मुंडकंच धडाच्या वेगळं करतोय. त्यावर सीतेनं संयमानं नकार देत ती एका वीर पुरुषाची पत्नी आहे, याचा परिचय दिला होता. त्यावेळेस ते दृश्य पाहताच मंदोदरीनं रावणाला म्हटलं की तिचा त्यानं नाद सोडून द्यावा. मी तिला विशेष करुन विवाहासाठी तयार करेल. ती आपल्यासोबत विवाह करण्यास तयार होईपर्यंत आपण आपल्या इतर भार्याशी मनोरंजन करावं. त्याबद्दल तिनं त्याला शपथ घातली होती. त्यानुसार रावणाकडून वचनही घेतलं होतं तिनं.
           ती स्वतःची मंदोदरीची मुलगी. तिच्याबद्दल तसं बोलतांना मंदोदरीलाही बरं वाटत नव्हतं. परंतु तिचं रक्षण करायचं होतं. त्यासाठी तशा स्वरुपाच्या बोलण्यात काही गैर नव्हतं.
            मंदोदरीनं सीतेचं पदोपदी रक्षण केलं होतं. रावणाच्याच नाही तर इतर राक्षसांच्याही अत्याचारापासून तिला वाचवलं होतं. तिला लंकेत असतांना कोणताही त्रास होवू दिला नव्हता. परंतु हे जरी खरं असलं तरी तिच्या पश्चात सीतेला भरपूर त्रास व्हायचा. कधीकधी रावणाची माणसं रावणासोबत तिचा विवाह व्हावा अशी इच्छा बाळगून येत. तिला विवाहासाठी तयार करत. ज्यातून तिला अपमानीत करत. अनन्वीत त्रास देत. 
           इच्छा असूनही मंदोदरी सीता आपलीच मुलगी आहे, हे ना आपल्या पतीला सांगू शकत होती. ना ती सीतेला सांगू शकत होती की ती तिचीच मुलगी आहे. ती पश्चातापाचे घोट पित पित जगत होती. अन् त्या क्षणाची वाट पाहात होती. जो क्षण तिच्या जीवनात उषःकाल म्हणून येणार होता.