सावंत साहेबांना भेटून सावली तीचा फ्लैट वर परतु लागली होती. तीचा डोक्यात तोच विचार सुरु होता की तो इसम कोण होता ज्याने तीला तेथे बोलावले होते. सावली बेचैन होउन फ्लैट वर पोहचली होती. तीनें फ्लैट चा दार उघडला आणि आत मध्ये गेली. आता ती तीचा बेडवर
बसून पुन्हा त्याच विषयावर चिंतन करत बसली होती. अती विचार करून त्या बिचारीचे डोके दुखू लागले होते. मग तीने तीचा पर्स मधील एक गोळी बाहेर काढली आणि तीने ती खाल्ली. गोळी खाऊन सुद्धा तीचा डोक्याला शांती काही मीळालीच नाही. मग सावलीने तीचा ल्यापटॉप काढ़ला आणि ती त्यात काही तरी शोधू लागली. सावली त्या ल्यापटॉप मध्ये काही फोटोस बघत होती आणि आपल्या जुन्या आठवणीत स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करू लागली होती. परन्तु दुःख आणि चिंता ही तर तीचा नशिबाला लागले होतेच. तर ते फोटो बघता बघता तीचा समोर नीलेशचा फोटो आला. तो फोटो बघून सावलीला तीचावर झालेला अत्याचार हा तीचा डोळ्यांचा समोरून जताना दिसला. त्यानंतर क्षणातच तीला नीलेशचा तो
मृत्यु देह दिसू लागला आणि तीचा डोक्याला जो ताण येऊ लागला होता तो थोड़ा सा कमी झाला. मग क्षणातच सावलीला स्मरण झाले की तीचा आणखी एक शत्रु ज्याने तीचे जगने अशक्य करू टाकले होते तो तर आता संपलेला होता, मग ती कशाला आता सावंत साहेबांनी तीला जे काही म्हटले होते त्याचा विचार करत बसली आहे. मग सावलीने तो ल्यापटॉप बंद केला आणि ती नीवांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागली.
परन्तु झोप ही तीला काही केल्या येत नव्हती. तीला आताही सारखी आई आणि कोमलची अठवण आणि काळजी वाटू लागली होती. तसे त्या दोधींनी सावलीला स्वतः पासून दुरावले होते तरीही सावलीला एक विश्वास होता की ते त्यांनी त्या शशांकचा भड़कावल्याने केलेले आहे. मग सावलीने पुन्हा एक निर्धार केला की त्या दोघींनी जरी तीला स्वत: पासुन लांब केलेले आहे. तर मी एक दिवस पुन्हा त्या दोधींचा हृदयात आपली जागा ही पूर्ववत बनवून दाखवीन आणि शशांक नावाचा शत्रूचा तावडीत्न त्या दोघींना ही मुक्त करेन, मग ती झोपी गेली याच विचारांत गुंग होऊन. दूसरा दिवस उजाडला आणि सावली ही उठून आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाली. सर्वात आधी तीने ब्रश करुन छान आंधोळ केली. मग तीने आपले साहित्य सोबत घेतले आणि ती तीचा कार्यालयात जायला नीघाली. ती आता आपल्या कार्यालयाचा जवळ पोहोचली होती तर तेथे तीला तीचा कार्यालयातील एक कर्मचारी भेटले. ती त्यांचा सोबत बोलून मग कार्यालयाचा आत गेली. तर रोजचा प्रमाणे सगळ्यानी तीचे स्वागत मोठया आनंदी चित्ताने केले. आता सवली तीचा केबिन मध्ये जाऊन बसली होती, तेव्हा तीचा सहाव्या इंद्री ने आपले काम सुरु केले. सावलीला कसले तरी अनिष्ट होण्याचे भास होऊ लागले. सावलीला तीचातील या आगळया वेगळ्या सवयी बद्दल परिकल्पना ही होती. म्हणून ती आता स्वतः:शीच वीचार करत बसली होती. तीने सगळ्यात आधी घरापासून निघतांना काय केले आणि काय घडले याचा आढावा घेतला. मग ती कार्यालयात येऊन पोहोचली तेव्हा काय आणि कसे घडले याचा तीने आढावा घेतला. तेव्हा तीचा लक्षात आले की कुणीतरी पुन्हा तीचा पाठलाग करत असताना तीला भासला.
सावलीने तीचा केबीनचा खिडकीतुन बाहेर सहज बघीतले तर तीला एक मनुष्य तीकडे रस्त्याचा त्या बाजुला उभा राहुन सलग तीचा केबीनचा दिशेने दूरबीन ने बघताना आढ़ळला. तीतक्यात सावलीचा फोन वर एक मेसेज येऊन धडकला. सावलीने तो मेसेज बघीतला तर त्यात हाय असे लीहीलेले होते. मग सावलीने त्या मनुष्याकड़े बघीतले तर त्याने सावलीला बघून हात हलवीला. आता मात्र सावलीची इंद्री ही जोराने संकेत देऊ लागली होती. मग तो मनुष्य काही वेळेने तेथून नीघुन गेला परन्तु जाता जाता सावलीला आणखी एक आश्वर्यांचा धक्का देऊन गेला होता. सावली आता वीचार करत बसली की, "देवाने माझे नशीब कसे आणि कुठल्या मुड़ मध्ये लीहीले आहे. जराशी माला दुःख आणि त्रासापासून सवळ मीळाली नाही की पुन्हा कुणाचा न कुणाचा रुपात हे सगळ माझ्या वाटयाला येऊन जात. आता कालच त्या एका संकटापासून मला मुक्तीमीळालेली नाही की आज हे एक नवीन संकट माझी आतुरतेने वाट बघत आहे." मग सावली ने वीचार केला की हा मनुष्य कौन असू शकतो. मग सावली ने आपला मोबाइल काढला आणि तो नंबर ती बघू लागली होती ज्या नंबर ने तो मेसेज आलेला होता. यावेळेस मात्र तो नंबर काहीसा नवीन दिसत होता म्हणजे की त्या मनुष्याने काय अशी कृति केलेली होती की तो नंबर बाहेर देशाचा आहे असे जाणवत होते. मग सावली ने तो नंबर पीयूषचा फोनवर पाठवला आणि त्याला फोन करून त्या नंबरचा तपास करण्यासाठी सांगीतले. आता सावली पुन्हा आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त झाली होती. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर सावली घरी जाण्यासाठी नीघाली तेव्हा मात्र तीने आपल्या अवतीभवती आधी नीरखुन बघीतले. जेव्हा तीची संपूर्ण खात्री झाली तेव्हा ती तेथून नीघाली. ती काहीस अंतर गाठून तीचा घराचा जवळजवळ पोहोचली तेव्हा तीचा फोन वाजू लागला. तीने तेव्हा फोन उचलला नाही कारण की ती गाड़ी चालवत होती. मग घरी आल्यानंतर तीने बघीतले तर तोच नंबर होता ज्याने सकाळी तीला मेसेज आलेला होता.
मग तीने पीयूषला फोन लावला, पीयूष ने फोन उचलला आणि बोलला, "हेलो सावली, तू पाठवलेला नंबर मी ट्रेस करून बघीतला परंतु मला त्यात अपयश आले. मला वाटते की त्या मनुष्याने या वेळेस नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून एखादी वेबसाईट हॅक केलेली आहे. म्हणून हा फोन आपल्या देशातून केलेला असताना सुद्वा आपल्याला दुसऱ्या देशाचा दिसून येतो." मग सावली ने म्हटले, "मग पीयूष आपल्याला त्याचा अचूक पत्ता कसा आणि कुठून मिळू शकतो." मग पियूष ने सांगीतले, "सावली तू काही काळजी करू नुकोस मी माझ्या वरीष्ठ अधिकारी मित्रांना अशा केस बद्दल माहिती विचारतो आणि मग यावर काय आणि कसा तोडगा काढ़ायचा या बद्दल तुला सांगतो. परंतु त्या आधी तू सतर्क रहा." असे म्हृणून त्याने फोन कट केला. आता सावली आणखी चींतेने ग्रस्त झालेली होती. तेवढ्यात तीचा फोन पून्हा वाजू लागला. तीने बघीतले तर तोच नंबर पुन्हा होता. सावलीचे धाडस होत नव्हते फोन उचलायचे. मग तीने स्वतःलाच धीर दिला आणि तीने फोन उचलला. समोरून आवाज आला, "हेलो मिस्स सावली, कशी आहेस." तेव्हा सावलीला आणखी धक्का बसला कारण की त्या व्यक्तीने तीचे नाव मिस्स सावली असे घेतले होते. तेव्हा सावली ने घाबरत म्हटले, "क.... कौन बोलत आहे, मी तुम्हाला ओळखले नाही." मग त्या व्यक्तीने म्हटले, "असे कसे चालणार मला वीसरून, अग मी तर तुझा भूतकाळ आहे." आता सावली ने म्हृटले, "कसला भूतकाळ, तुम्ही है काय फ़ालतूचा गोष्टी करत आहात " तेव्हा त्या व्यक्तीने म्हटले, " मिस्स सावली, मी तो साधा सुधा भूतकाळ नाही तर तुझा नसा नसातुन रक्त शोषणारा भूतकाळ आहे." त्या व्यक्तीचा तशा बोलण्याने आता सावलीला सुद्धा राग येऊ लागला होता. मग तीने म्हटले, "तर अशी गोष्ट आहे मग असा फोनवर बोलून किंवा धमकी देऊन तू माझे काहीच अहीत करू शकत नाहीस, यासाठी तुला माझ्या समोर यावे लागेल. आता मला सुद्धा बघायचे आहे की माझा हा रक्त शोषणारा भूतकाळ किती भयंकर आहे." तेव्हा त्या व्यक्तीने म्हटले, "तुझी ही इच्छा सुद्धा मी लवकरच पूर्ण करणार आहे." मग सावली ने म्हृटले, "मला एक गोष्ट सांग तू अचानक असा कसा माझा आयुष्यात जन्माला आला हे मला कळले नाही. " यावर त्याने म्हृटले, "अगं वेडी, मी तर तुझ्या सोबतच वावरत आहे कित्येक दिवसांपासून, तूच मुर्ख आहेस तू मला ओळखु शकली नाहीस आजवर."
शेष पुढील भागात ........