(Shadow paladin palace)
माझा मोबाईल वाजला, रात्री चे दोन वाजले होते. मी call उचलला "hello dear, तू ज्या माणसाला शोधत होतास तो माझ्या कडे आहे, जर तो तुला पाहिजे असेल तर लवकर माझ्या mansion वर ये. मी वाट बघतोय " अस बोलून त्याने call कट केला. मी लगेच माझी car काढली आणि इंजिन बूस्ट केला आणि wisteria mansion मध्ये पोहचलो.
(Wisteria Mansion)
तिथे तो माझी वाट बघत बसला होता माझा one and only बेस्ट freind and werewolf king " Alex."
आत गेल्यागेल्या मी Alex त्या पकडलेल्या माणसाबद्दल ची माहिती विचारली. तेव्हा त्याने मला सांगितले की त्या माणसाला पकडता पकडता त्याची माणसं जखमी झाली आणि त्याला ही थोड लागलं. त्याने मला त्याच्या छाती वरची जखम दाखवली.
मी बघून शॉक झालो. अस एवढं powerful कोण आहे की जो Alex ला जखमी करू शकतो. नंतर त्याने मला basement मध्ये असलेल्या कैदखण्यात नेलं तिथे त्या माणसाला चैनिने बांधून ठेवलं होत. मी त्याला विचारलं की याला चैनीने का बांधलय.
तेव्हा त्याने सांगितलं की हा साधारण माणूस नाही आहे. हा hybrid आहे. Half wolf half vampire. आम्ही दोघेही आत गेलो.
" कोण आहेस तू आणि तुला कोणी पाठवलं आहे?" Alex ने त्याची मान पकडली आणि विचारलं. पण तो काहीच सांगायला तयार नव्हता. alex ने त्याला खूप बेदम मारल त्याच्या तोंडातून रक्त येत होत. तो hybrid असला तरी त्याची injury recovery ची प्रोसेस slow झालेली तरीही तो काहीच सांगायला तयार नव्हता.
" आत्ता काय करायचं हा तोंड उघडत नाही". Alex ने mind interlink ने विचारलं."
"थांब मी बघतो. काय करायचं ते". मी त्याच्या जवळ गेलो त्याचा पडलेला चेहरा उचलला आणि त्याच्या डोळ्यात बघितलं आणि माझ्या शक्तींनी त्याचे past event बघितले.
"याला सोडून दे याचा काही उयोग नाही." मी म्हणालो. "
"तू त्याला सोडून का द्यायला सांगितलं ? हा आपला एक मार्ग होता आपल्या दुष्मनापर्यंत पोहोचण्याचा." Alex confuse होऊन म्हणाला
" तू जरा धीर धर. आपल्याला जे हवं आहे ते मिळेल. मी सापळा रचला आहे. तू मला त्याची information सांग."
" त्याच नाव विनोद आहे. माझी माणसं कार्ल ची माहिती काढण्यासाठी त्याच्या मागावर गेलेली होती. तेव्हा त्याने त्यांच्या वर हल्ला केला. मला जस कळलं तस् मी त्याला पकडलं."
"चल आपल्याला निघायचं." मी Alex ला म्हणालो.
" आत्ता कुठे जायचयं ? नक्की तू काय केलंस आहे त्याच्या सोबत?".
" तू चल मग कळेल" मी बोललो.
आम्ही दोघांनी गाडी काढली आणि पाचशे किलोमिटर असलेल्या जंगलात गेलो. तो इथेच कुठे तरी आला असणार.
"Alex तुझा सेंट लपव नाही तर आपण दोघे पकडले जाऊ."
आम्ही जंगलात आत गेलो तेव्हा तिथे एक छोटस घर होत. त्या घरात तो माणूस बसलेला होता. तो आमचा दुश्मन कार्ल च्या राईट hand माणसासोबत बसला होता. आम्ही त्याच बोलणं ऐकत होतो
" तुला त्यांनी पकडलेला तर तू कसा सुटलास आणि इथे कसा आला". कार्लचा Right hand बोलला.
त्यावर विनोद ने उत्तर दिले"त्यांनी मला पकडलं आणि भरपूर मारल त्रास दिला पण त्यांना काही नाही मिळालं तर त्यांनी सोडलं मला."
" अरे मुर्खा त्यांनी तुला सोडलं नाही त्याने माझा शोध घेण्यासाठी कट रचला. मला इथून निघाव लागेन तो बोलला ".
तो तिथून निघणार तितक्यात आम्ही दोघे आत गेलो Alex ne त्याची मान पकडून त्याला खाली आडव पडला आणि पकडून ठेवलं. मी त्याच्या चेहऱ्या जवळ गेलो आणि मी रागाने विचारलं "त्या रात्री काय झालेल. कार्ल कसा वाचला?" ,
"मी नाही सांगणार" तो बोलला
" Alex सोडून दे याला"
" ठीक आहे तुझ्या प्रमाणे चालू" alex ने त्याला सोडलं.
तो उठून दरवाजा उघडणार तितक्यात मी त्याला पकडलं आणि जमिनीवर आपटल. माझा धीर सुटत चाललेला. माझा राग वाढत होत्या रागाने माझे डोळे peach black झालेले. मी त्याला त्याचा गळा पडून उचला आणि हवेत धरलं आणि शेवटचं विचारलं." तुला माहित आहे का मी कोण आहे ते ? "
" Vampire king.."
"आत्ता सरळ सरळ सांग कार्ल कुठे आहे ते आणि तो काय करणार आहे. जर सांगितलं नाहीस तर मी तुझ्या lover ला मारून टाकेन आणि हे दुःख किती मोठ असतं ते मी तुला सांगायला नको".
तो घाबरत घाबरत म्हणाला " भविष्यवाणी प्रमाणे कार्ल ला मारून टाकणाऱ्या मुलीने जन्म घेतला आहे. आणि तो तिला शोधत आहे. त्याला कळलं आहे की ती इथेच आहे."
" अजून काय माहित आहे तुला त्याच्या प्लॅन बद्दल?"मी विचारलं.
" मला कळलं आहे की तो आ.....". मी त्याला सोडलं. बघितलं तर त्याच्या पाठीवर कोणीतरी बान मारला होता. आणि त्याला एक कागद जोडला होतो.
त्यावर असा लिहिलं होतो की "तू मला कधीच शोधू शकणार नाही". हे वाचून माझी खूप चीड चीड झाली माझ्या रागाने आजू बाजूचे समान हलायला लागलं, सगळं vibrate करत होता.
तेव्हा Alex ने माझ्या चेऱ्यावर punch मारला "तुझा anger control कर नाहीतर सगळं उधवस्त होईन. आणि आजूबाजूला लांब राहणाऱ्या गावकऱ्यांना संशय येईन".
मी एका बाजूला बघितलं तर विनोद पण खाली पडलेला होता. कदाचित त्याला ही तोंड बंद करण्यासाठी मारून टाकलं असणार. मी स्वतला शांत केल. आणि तिथून आम्ही देघेही निघालो.
"आपल्याला आपली security tight करालया लागेन. ज्या प्रकारे गोष्टी घडतात, मला वाटतंय की तू तिला अजून काही काळ भेटू नको. तू जर भेटलास तर त्याला संशय येईन. यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होईन."Alex म्हणाला.
" तू बरोबर बोलतो आहेस पण माझा धीर सुटत चालला आहे. मला अस वाटत की मी तिला इथेच माझ्याकडे घेऊन यावं. मी तिच्या शिवाय नाही जगू शकत. हा विरह खूप छळतो आहे मला. Soulmate च bonding काय असतं हे तुझ्या पेक्षा जास्त कोणाला माहिती आहे."
त्यावर तो म्हणाल" तू बरोबर बोलतो आहेस पण कार्लला समजलं तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तू तिला इथे घेऊन आलास तर ती घाबरेन, तिला यातल काही माहित नाही. त्यामुळे आता डोकं शांत ठेव. आपण त्याला नक्की शोधू. काळजी करू नकोस" असा म्हणून आम्ही परत wisteria mansion ला आलो आणि मी त्या रात्री तिथेच राहायचं ठरवलं.