Musk fenugreek in Marathi Women Focused by madhugandh khadse books and stories PDF | कस्तुरी मेथी

Featured Books
Categories
Share

कस्तुरी मेथी

आयुष्य...

कधी एक उमलती धग,

कधी निवांत विझणारा चंद्रगोल.

क्षणोक्षणी आपलं रूप पालटणारा एक प्रवाह...

कधी केशरासारखा सुवासित, तर कधी मेथीसारखा कडवट, पण आरोग्यदायी.या दोन्हीच्या सीमारेषेवर, एका स्त्रीचं अस्तित्व सावधपणे ताठ उभं आहे...ही कथा आहे तिची..ती.....

जी उमेदीच्या कड्यावर असूनही, स्वतःच्या आयुष्याच्या रंगमंचावरून निमूटपणे उतरली.ती ....

चेहऱ्यावर अपराजित तेज, डोळ्यांत असंख्य विश्वांची झळाळी, आणि ओठांवर न बोललेले अनुभव.कला तिचं देणं होतं....

ती बोलायची अभिनयात, श्वासायमान होत असलेल्या प्रत्येक भूमिकेतून.तिचं नाव झळकू लागलं होतं; एक ओळख बनू लागली होती.पण प्रसिद्धीच्या या दाहक ऊर्जेत, कुठेतरी अंतर्मन जळू लागलं होतं ...

कुठे न दिसणारं...

कुठे न सांगता येणारं...

वयाच्या अशा एका वळणावर, जिथे इतरांच्या महत्त्वाकांक्षा नुकत्याच आकार घेतात, तिनं घेतला निवृत्तीचा निर्णय..

एक अश्रुपूरित, पण अत्यंत सजग निवड.लोक म्हणाले — "तिनं इतक्या लवकर हार मानली?" 

पण खरंतर, ती स्वतःच्या आतल्या संघर्षांवर विजयी झाली होती.ती एकटी होती होय, पण एकटेपण म्हणजे रिकामीपण नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाशी भिडण्याची, स्वतःला समजून घेण्याची जागा असते.प्रेम?....

होतं तिच्या आयुष्यात...

खोल, उबदार, पण निसटणारं.ते हरवलं, पण तिच्या अंतर्मनात राहिली त्याची एक मंद...

कस्तुरीच!

कस्तूरीसारखी सुगंधी आठवण शिल्लक राहिलेली.

आणि मेथी?

मेथी होती तिच्या जीवनातली कटूता, अप्रिय निर्णय, गमावलेले क्षण, आणि अंतर्गत रिक्तता. पण त्याच मेथीतून तिनं आत्मशक्ती शिजवली.ती कडवट चव, कालांतराने तिनं आत्मसात केली. अगदी आपल्या स्वभावाचा भाग म्हणून.म्हणूनच ही कथा


– कस्तुरी मेथी.

कस्तुरी — अंतर्मनातून उमटणारी सूक्ष्म पण गूढ सुगंध,

आणि मेथी — जीवनाच्या प्रत्येक कटू अनुभवाला स्वीकारण्याची तयारी.कथा तिची आहे पण आरसा....

आपल्या सर्वांचाच आहे. कारण प्रत्येक जीवनात केशराचे क्षण असतात, आणि मेथीच्या आठवणीही.पण कस्तुरी असते फक्त त्याच आत्म्यात —ज्याने स्वतःचा गंध शोधला असतो,एकटेपणाशी मैत्री केली असते,आणि.....

संपूर्ण आयुष्य एका मौनशब्दात उरकून टाकलं असतं.कथा आहे सुरभिची —जिचं अस्तित्व हरवूनही हरवलं नाही,जिच्या आठवणींनी हवेला गंध दिला,ती गेली, हो… 

हळूवार स्पर्शासारखी, न बोललेल्या शब्दांसारखी.प्रेमातली कडवट चव, आणि आत्म्यातली मंद झुळूक...

हाच तिचा वारसा...

हाच तिचा गंध...

मी लिहितोय...

कथा सुरुभिचीखुप सारं काव्य,

खूप सारे गीतं,

अनेक सुवसाची,

चव कडवट विरहाची,

गंध विसरलेल्या अस्तित्वाची 

कस्तुरी मेथी.

.🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

दृश्य ५ – "लावणीचा सीन"स्टेजवरचा रंगमंच –

मागे पारंपरिक झुंबर, बाजूंना गजऱ्याचे तोरण, पुढे रंगीत लाईट्स, घुंगरांचा आवाज, ढोलकीचे बीट्स.

कलाकार सज्ज आहेत. क्लायमॅक्स स्टेपसाठी तयारी. पण सुरभी एका कोपऱ्यात शांत उभी आहे. कॅमेरामन आणि लाइटमॅन पोजिशन घेत आहेत.

कॅमेरे लावले गेलेत, लाइट्स ट्यून होत आहेत, को-actors आणि डान्सर्स वॉर्म-अप करतायत. हसत-खिदळत प्रॅक्टिस, पण सगळीकडे एक हलकीशी तणावाची लाट.

(लाइटमॅन क्रेनवरून ओरडतो)

"सर, पाच नंबरचा स्पॉट अजून फ्लिकर करतोय! डिमर जळलाय बहुतेक!"

(साउंड टेक्निशियन माईक टेस्ट करत): "Check one-two-one-two... ambience mic चालू ठेवा, गाजराच्या घुंगरांचं खरखर ऐकायला हवं!"

(AD (Assistant Director) सेटवर धावत)"Background डान्सर्स! पोझिशनवर जा! आणि कुणी मेकअपवाल्याला बोलवा, सुरभीच्या बिंदीचा शेप चुकलाय!"

डायरेक्टर (हातात स्क्रिप्ट, चिडलेला, शूट पाहत): "अरे कोण लावलंय हे गजरे? हिरवे का आहेत? मला पांढर्‍या जाईचं म्हटलं होतं!"

(को-actor हसत): "सर, जाई संपली म्हणालेत… मी सेंदूर लावतो का गजऱ्यावर?"

डायरेक्टर (सूतसूतून): "तू मेकअप आर्टिस्ट आहेस का? नाही ना? मग उगाच 'कृतीशील' होऊ नकोस."

हवेत एक विचित्र तणाव आहे. ढगांनी आकाश झाकोळलेलं. सेटवर वाऱ्याचा सुन्न करणारा आवाज आणि फॉग मशीनचा धूर हवेत भरलेला. प्रोडक्शन कंट्रोल रूममधून सतत वॉकी-टॉकीवर सूचना चालू आहेत.

कामगार आणि क्रू सदस्यांचे चेहरे थकलेले.. सीन अजूनही "ओके टेक" मिळालेला नाही.

संपूर्ण सेटवर चिडचिड आणि घाईच वातावरण आहे.

AD (असिस्टंट दिग्दर्शक) – टोकाला उभा, वॉकीवर बोलतोय.Focus Puller – लेन्समध्ये पाहून वैतागलेला.Sound टेक्निशियन – बूम सांभाळताना कानावर हेडफोन घट्ट लावलेला.PA (प्रॉडक्शन असिस्टंट) – काहीं माईक आणि वायर घेऊन धावत पळतोय.

दिग्दर्शक,  (मगध कुलकर्णी, वय ५२) – रंगलेला पण खवखवटलेला, स्वतःच्या सर्जनशीलतेच्या तणावात आंधळा झालेला(कॅमेरा रोल होत नाही तोच... डायरेक्टर जोरात ओरडतो)

डायरेक्टर (चिडून): "अरे कोण आहे त्या लाईटवर? तिसरा स्पॉट अजूनही का लागलेला नाही?? आणि हे काय, डान्स मूव्हज अजूनही सिंक होत नाहीयेत! श्रीकांत! हे काय चाललंय?"

सुरभी पोझिशनवर उभी. पण तिचे डोळे दूर कुठेतरी हरवलेत. कोरिओग्राफर तिला निरखतोय.

नृत्यदिग्दर्शक (नाराज होऊन): "सर, मी सांगितलं होतं कालच... सुरभीचं लक्ष नाहीये. ती मूव्हज विसरतेय, स्टेपमध्ये फीलच नाही!"

डायरेक्टर (डोळ्याला हात लावत वैतागून): "हे बघ, आपण हे गाणं तीन आठवड्यापासून सराव करत आहोत. युनिटचा वेळ जातोय, बजेट वाढतंय, आणि अजूनही "झलक झलक नजरेमधली, झपकन जाई उरात" वर तिचा कटाक्षच चुकतोय!"

(कॅमेऱ्याच्या बाजूला सुरभी, पोझिशनमध्ये, पण डोळ्यांत निराशा. लाईटची झपकन डोळ्यावर येते. सुरभी दचकते.)

सुरभी (हळू आवाजात, स्वतःशी): "...सगळं विसरल्यासारखं वाटतंय. उगाचच आली मी परत सेटवर... भावना नाही तर स्टेप्स काय नाचणार?"

नृत्यदिग्दर्शक (सुरभीकडे चालत येतो): "सुरभी, एक मिनिट... डोळ्यात तो 'जिवंतपणा'; पाहिजे! तू नुसती स्टेप्स करतेस, पण ते 'कटाक्ष' ती 'उरात जाणारी नजर' कुठे आहे?"

सुरभी (हसण्याचा प्रयत्न करत): "हो... मी करते पुन्हा एकदा. Sorry, मला थोडं... जमत नाहीये आज."

डायरेक्टर (थोडा सौम्य होऊन, पण अजूनही तणावात): "सुरभी, हे गाणं फक्त लावणी नाहीये. ही सिनेमाची ओपनिंग सीन आहे. आपण मराठी सृष्टीची "द लिजेंड संध्या", जिने एक नृत्य संस्कृती दिली भारतीय चित्रपट सृष्टीला, तिच्यावर आत्मचरित्र बनवत आहोत. इथेच प्रेक्षक तुझ्यावर प्रेमात पडणार आहेत... तूच जर हरवलेली वाटलीस, तर स्क्रीनवर काही उरणार नाही."

सुरभी (शांतपणे, पण आतून खचलेली): "पडद्यावर रंग असतो... पण मनात जर काळी छाया असेल, तर काहीच रंग खुलत नाही सर."

डायरेक्टर (क्षणभर थांबतो, तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं पाहतो): "...ओके. फाइव्ह मिनिट्स ब्रेक. सगळे थांबा. पाच दहा मिनीट स्क्रिप्ट बघ आणि scene चा Vibe समजून घे"

ब्रेकमध्ये सेटवरचे आवाज येताय. कोणी पंखा बंद करतोय, को-actors पाणी मांगत आहेत.

लावणीची बीट्स हळू आवाजात प्लेबॅकवर चालू

एक AD मोबाइलवर Coproducer शी बोलतोय:  "सर, हिचं काहीतरी बघावं लागेल. पुढचं सीन पोसपोन्ड करावा लागेल कदाचित..."

तिची नजर समोर, पण डोळे कुठेच नाहीत. आत खोल कुठे हरवलेली.....

आठवणमध्ये. एका पंचतारांकित हॉटेल – प्रेस कॉन्फरन्स रूमच्या प्रसंगात.. वेळ: सायंकाळ – प्रकाश आणि क्लिकक्लिकाटसुरभी – खांद्यावर केस, सौम्य शाल पांघरलेली, चेहरा शांत पण नजरेत दबलेला थकवा. पाठीमागे नव्या चित्रपटाचा पोस्टर, तिच्या चेहऱ्यापेक्षा हिरोचं फोटो मोठं. हातात माईक घेऊन पत्रकार विचारतात.

पत्रकार #3(हसतमुख, पण आवाजात धार) "सुरभी मॅम, सॉरी पण हे विचारावंसं वाटतं...तुमच्यापेक्षा ९-१० वर्षांनी लहान अभिनेत्री आता लीडमध्ये पाहायला मिळत आहेत. तुमचं नाव क्वचित मराठी सृष्टीत ऐकू येतं – त्या काळात तुम्ही काय करत होता? कधी असं वाटत नाही का... की तुम्हाला आता वेगळं स्थान शोधावं लागेल?"

(काही पत्रकार हसतात. काहीजण मोबाईलवर नोंदी घेतात.)

सुरभी(थोडी थांबते. पाणी पिते. नजरेत थोडीशी सुतकी शांतता.) "स्थान शोधणं — हे चालूच असतं, पण कधी कधी, आपलं स्थान आपणच विसरतो. मी गेली काही वर्ष काम करत होते — पण बहुतेक वेळा, स्वतःवर."

(टाळ्यांचा हलकासा आवाज होतो, पण तिला समाधान होत नाही.)

पत्रकार #12(थोडा गंभीर, पण उत्सुक): "हा रोल, म्हणतात, आधी इतर दोन अभिनेत्रींना ऑफर झाला होता – त्यांनी नकार दिल्यावर तो शेवटी तुमच्याकडे आला. तुम्ही तो 'नाकारलेलं' की 'सोडलेलं' उचललं? बरोबर का?"

(खोली काही क्षण गप्प. माईक समोर. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या.)

सुरभी(हसते, पण ओठ घट्ट दाबलेले): "...'कधी कधी'  हेच आपल्यातलं सर्वश्रेष्ठ जागवतं.हो, मी पहिली पसंती नव्हते. माझा पहिला चित्रपट पण हैं  हंसा वाडकर, उषा किरण जयश्री गडकरने आणि अगदी नवोदित अभिनेत्री  मधु कांबीकरने देखील नाकारलेला होता. तो बंपर हिट झाला. नायकप्रदान असूनही माझं जस्त कौतुक झाल. ही भूमिका ही तशीच मिळाली.  पण या भूमिकेला मी स्वतःला प्रथम दिलं."(हळूवार, पण ठाम स्वरात)"हे पात्र मी सादर करत नाही – मी जगतेय."

पत्रकार ७#"हिंदीत चित्रपट सृष्टीत दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक आंतररा्ट्रीय सन्मान मिळालेत... पण सुरभी, मात्र सोडलेल्या भूमिकावरच तुमची कारकिर्दी टिकून आहे, असे तुम्हालाही वाटत असेल, उत्तम अभिनय असूनही तुम्हीं पहिल्या निवड नसतात"

लाईटची झपकन डोळ्यावर येते. फ्लॅशमधल्या आठ्वणचा आवाज थांबतो. क्षणभर शांतता. पण तिच्या चेहऱ्यावर सूक्ष्म वेदना दाटून येते. ती स्विचबोर्ड दिशेने बघते.

स्पॉट बॉय आणि काहीं लोक तिथं उभी आहेत. त्यातून एक स्पॉट बॉय आदर स्वरात, "मॅडम, चाहा कॉफी काहीं आणू का?"

ती मान हलवून नाकार देते आणि स्क्रिप्ट हातात घेते. ..................

थोड्याच वेळात गोंधळ, लाईट्स, टेक्निशियन्स, कोरिओग्राफी… सगळं सुरू झालं, पण आत सुरभीच्या डोळ्यांत संघर्ष आहे.

सीन: लावणी सीनचं महत्त्वाचं टेक – "झुल झुल गजरा झुलतो..." चं क्लायमॅक्स

(साउंड चेक होत आहे)"Mic two, slightly muffled. Boost karo midrange!"

(AD ओरडतो): "सुरभी, पोजिशनवर ये! लास्ट टेक. Final expressions tight पाहिजेत! Close-up चालू होईल."

(डायरेक्टर मगध खुर्चीतून उभा होतो, स्क्रिप्ट हातात): "हे शेवटचं टेक आहे. जर यावेळी नाही जमलं, तर आपल्याला सीन पुन्हा उद्या शूट करावं लागेल!"

(सुरभी पोझिशनवर येते. पण तिचं मन हरवलेलं आहे. प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडतो. तिथे चमक नाही — फक्त एक शांत बेचैनी.)

(बॅकग्राउंड म्युझिक सुरू होते – ‘झुल झुल गजरा झुलतो...’ ची बीट हळूवार वाजते)

(कॅमेरा हलकेच तिच्या चेहऱ्यावर झूम करतो)

सुरभी (अंतर्मनात): "तू पहिली पसंती नव्हतीस...त्या पत्रकाराचं चेहरा आठवतोय.काळजी करत नव्हता तो.शोधत होता हेडलाइन."

(ती हलकेच पायऱ्यांवर चढते. ढोलकीचा आवाज वाढतो.)

"त्याच्या चेहऱ्यावर हसू... पण प्रश्न अपमानित करत होते....आणि मी काय शोधत होते?"

(ती स्टेजच्या मध्यभागी उभी राहते. हातातल्या गजऱ्याला घट्ट धरते. दोर नव्हे, पण आयुष्याचा शेवटचा आधार.)

सुरभी (अंतर्मनात)

"माझं करिअर – कधी कुणाच्या नकारावर उभं राहिलं,कधी कुणाच्या संधीवर कोसळलं...पण माझं ‘स्वतःवर प्रेम’ –ते तरी माझ्या हातात आहे ना?"

(तिच्या डोळ्यांत अश्रू. पण ओठांवर नाजूक स्मित. तिचं मन स्टेपवर नाही – स्वतःशी संवादात आहे.)

मगध (डायरेक्टर) (आवाजात वैताग): "सुरभी, damn it! ही तुझी कथा आहे! तूच म्हणाली होतीस ना, 'भावनिक खोल उतरणारे दृश्य हवं!'आता काय झालं? प्रॉब्लेम काय आहे? बोल!"

(सगळं युनिट थांबतं. बॅकग्राउंड डान्सर्स एकमेकांकडे पाहतात.)

सुरभी (खाली पाहत, आवाज तुटलेला): "प्रॉब्लेम आहे, दादा...हा सीन मी अभिनय म्हणून करत नाहीये.हा सीन — मी आहे."

मगध (थोडा शांत, पण अजून कडक): "सुरभी... तू कलाकार आहेस. तू तुटलीस तर, सेटचं काय? ही टीम, हे शेड्युल, हे बजेट?"

(अचानक — अर्जुन, तिचा co-actor, घाईत स्टेजकडे येतो. त्याचं चालणं शांत, पण ठाम.)

अर्जुन (को-actor, संयमाने पण ठाम): "दादा, थोडा वेळ थांबा. ती केवळ शॉटसाठी नाही थांबलीय — ती स्वतःशी लढतेय.प्लीज, तिच्याशी आपण माणूस म्हणून बोलू. थोड्या वेळासाठी “एक्ट्रेस” विसरून."

AD (कॅमेरामनकडे): "Hold on. Actors on cool down. Mute ambient."

(स्टेजवर – अर्जुन, सुरभीच्या जवळ येतो.)

अर्जुन (हळुवार): "सुरभी..."

सुरभी (हळू, शब्द तुटक): "माफ कर. आज मला अभिनय जमत नाही.आज मी जे काही बोलतेय, ते संवाद नाही — खरं आहे."

अर्जुन (हसत, पण डोळ्यात गडद भाव): "...कधी कधी 'कट' म्हणण्यापेक्षा 'सत्य' बोलणं अधिक गरजेचं असतं...हे सेट आहे, हो. पण तुझं मन ज्या उंचीवर पोहोचलंय, तिथे कोणतीही स्क्रिप्ट पोचत नाही."

सुरभी (ओठ थरथरत)"माझ्या आत सतत एक आवाज चालू असतो...'तू पुरेशी नाहीस','तू उशीरा आलीस','तू हरवतेयस...'

आज ते आवाज गोंगाटात नाहीत — ते स्पष्ट ऐकू येतात."

अर्जुन (गंभीरपणे): "म्हणूनच, तू या सीनमध्ये खरी आहेस.तू जर चढलीस ना... स्वतःसाठी...तर हा सीन नाही, हे तुझं पुनर्जन्म होईल."

सुरभी (हळू): "मी आज माझ्या ‘भूमिका’मध्ये नाही...मी आज — 'मी' आहे.तुटलेली. पण अजून पूर्णपणे मोडलेली नाही."

अर्जुन"मग त्या तुटलेल्या सुरभीला घेऊन वर चढव.जगाला तीच सुरभी दाखव — जी पडूनही पुन्हा उभी राहू शकते. "संध्या" देखील तुटलेली होती. लक्षांत आहे ना"

मगध (दिग्दर्शक, चेहऱ्यावर गंभीर शांतता): "Roll camera. This is the one. Let her be."

अर्जुन: "मगध, मला वाटतं तीन आठवड्याच्या सरावानंतर हा scene टू scene घेण्या एवजी one टेक मधे scene घ्यावा"

मगध सुरभि कडे पाहताच' सुरभि "मला देखील असाच व्हावं अस वाटतं आहे, ब्रेक्स मध्ये एनर्जी शिफ्ट होतें.. गीतानुसार मध्य पासूनच गती वाढतेय अगदी संपे पर्यंत.. एक टेक प्रयत्न करुन बघू"

"Scene 42B – Take 11 – Sound rolling. Camera rolling."

क्लॅपर: धाडकन्. सीन पुन्हा सुरू

सुरभी हळूहळू स्टेजच्या मध्यभागी येते. स्पॉटलाइट तिच्यावर. ढोलकीचे बीट्स, नजरेत आत्मविश्वास. ओठांवर स्मित.

सुरभी (अंतर्मनात – ठाम स्वरात): "या वेळेस... मी पळत नाही.मी पुढें जातेय. स्वतःलाच गाठायला."

कॅमेरा तिच्या डोळ्यांवर — डोळ्यांत अश्रू आहेत, पण त्या अश्रूंमध्ये भीती नाही.

लावणीच्या ओळी वाजतात:

"झुल झुल गजरा झुलतो,

केसांतून गंध उधळतोहस हस ओठांवरती,

चंद्रचुटूक प्रकाश हसतोसंध्या ग,

संध्या ग,

नजरेत गुंतवणारीकटाक्ष टक टक वाजे,

काळजाशी जपणारी

छम छम छमक पैंजण,

बोलती मंद स्वरांतूननट नट नखरा पाझरे,

गालांवरी त्या रंगतूननथनीला साज वाजे,

कुंतल गझले मुरडलेचाल तशी नाजूक झुलती,

नजरेनं शब्द गुंफले

झुल झुल गजरा झुलतो,

केसांतून गंध उधळतोहस हस ओठांवरती,

चंद्रचुटूक प्रकाश हसतोसंध्या ग,

संध्या ग, नजरेत गुंतवणारीकटाक्ष टक टक वाजे, काळजाशी जपणारी

पदर सरक सरक वारा,

खेळतो गंधभारीलाज लाज ग सांडते,

स्मितात तुझ्या सारीझलक झलक नजरेमधली,

झपकन जाई उरातसंध्येच्या त्या पावलांशी,

सावली जाई थरारात

ठुम ठुम ठुमका वाजे,

वाऱ्यासंगे गंध फिरेगाठ गाठ बघ मनाची,

ओढ तुझ्याच नावासि रेहळू हळू चालते ती,

ओठांवरती हासतरूप तिचं सजणांनो,

चंद्राला ही भुलवत

झुल झुल गजरा झुलतो,

केसांतून गंध उधळतोसंध्या ग,

संध्याग,

साज शृंगारात न्हालेलीहळुवार स्वप्नात मिसते,

रूपात चंद्र फुलवतेली"

क्लायमॅक्स टेक — फक्त चित्रपटासाठी नाही, तर स्वतःसाठी...