🌹श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज-चरित्र 🌹 (भाग पहिला)
श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज यांचा जन्म तुंगभद्रकिनारी अंजरपेठ येथे, सन १८४९.मूळ नाव: श्री गोविंद रघुनाथ महाजनगुरू: श्री देव मामलेदार तथा यशवंत महाराजभाषा: संस्कृत आणि प्राकृत (स्वामिना सर्व देशांच्या भाषेंवर प्रभुत्व होते)साहित्यरचना: श्री जातवेद महावाक्यांग ग्रंथ, वेदान्त कौमुदी, हरिपाठ, सुबोध भजन मालिका, त्यांचे कार्य हिंदू धर्म सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञानाचा प्रसार आहे.आणि प्रचार प्रसिद्ध वचन:" जय सच्चिदानंद "होत. त्यांचे वडील: उमाबाई/रघुनाथ स्वामीपत्नी: लक्ष्मीबाईकार्यकाळ: १८४९-१९१२.कार्यक्षेत्र: कोकण व मुंबई.समाधी: २६ जानेवारी १९१२.पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी महाराजपद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी महाराज हे श्रीगुरू नारद अवतार परंपरेतील कलियुगाचे औतारस्थित सत्गुरू आहेत. श्री महामुळ जगत्पित्याच्या बीज बिंदात उद्भवलेल्या चतुर्वर्णमय हिंदू देवगण आपल्या देव धर्माचा विसर पडून व्यसनी भ्रष्टाचारी बनून अधोगतीकडे जाण्याचा मार्ग अवलंब करतात त्यावेळी श्रीजगत्पिता श्रीनारद स्वामीस आदेश देतात,महामुळतात म्हणे नारदासी । तू युगायुगे औतरे निश्चयेसी ।सुमार्गाते बोधुनिया चौवर्णासी । निज्यधर्मासी रक्षीजे ।कृतात कपिल । त्रेतांत याज्ञवल्कमुनी ।द्वापारी दत्तात्री कलीत पद्मनाभ जाणी । प्रथी रोमहरसेन त्रिपदी भृगुमुनी ।द्रौपदांत अंगिरस । कमलायुगी सुत्राचारी ।हि आठ नावे धरुनी शिरी । नारदा तू औतरे निर्धारी । धर्मरक्षणा कारणे ।।अश्याप्रकारे नारद मुनींनी कृतात कपिलमुनी, त्रेती याज्ञवल्क्य,द्वापारी दत्तात्रय महाराज, कलियुगात पद्मनाभाचार्य स्वामी, प्रथा युगात रोमहरशेन मुनी, त्रिपदा युगांत भृगुमुनी, द्रौपदा युगांत अंगिरसमुनी, कमला युगांत सुत्राचार्य स्वामी अश्या प्रकारे औतार धारण केले आहेत.जन्म निरुपणकलियुगांत पहिल्या चरणात अवतरलेल्या सत्गुरू स्वामी विषयी,।। ॐ नमो तत्सत पद्मपादाचार्य स्वमिनाथाय नमोनमः ।।श्लोक काषायवस्त्रं कटीमेखळा ब्रह्मसूत्रं गुरुनाथम Iदंडकमंडलुधरम रुद्राक्षहारभूषणाढ़यमं ।रत्नागरनिलसिंधू लवणसमुद्रतीरवासं । सत्यश्रेष्ठज्ञानदायकम स्वामीराजम पद्मनाभं ।।श्रीगुरू पद्मनाभाचार्य स्वामी उर्फ पद्मपादाचार्य स्वामी हे श्री ईश आज्ञांकित कलियुगाचे औतारस्थित सत्गुरू आहेत. पद्मनाभ स्वामी इच्छा मरणी असल्या कारणाने भूमंडळी किती वर्ष विद्यमान होते हे निश्चित सांगता येत नाही आणि कोणासही कळलेले नाही. पण ते बरेच वृद्धरूपी भासत आणि दीर्घ काळातील निरुपण चतुवर्ण देवगणाना सांगत असत. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे हि स्वामींच्या स्वामींच्या मुखोदगत असून जणू त्यांच्या मुखीच विद्ध्या वास्तव्य करीत असत. अर्थात पद्मपादाचार्य स्वामींच्या जिव्हाग्री सरस्वतीच वास्तव्य करीत असे. पद्मनाभ स्वामींच्या वडिलांचे नाव रघुनाथ स्वामी, आजाचे नाव सदाशिव स्वामी आणि पणजाचे नाव वामन स्वामी अशी होती तर पद्मनाभाचार्य स्वामींच्या आईचे नाव उमाबाई, आजीचे नाव मथुराबाई आणि पणजीचे नाव गंगाबाई अशी होती. श्रीगुरू पद्मपादाचार्य स्वामी हे नारद वंशी, अश्व लायनी शाखेचे, आगम ऋग्वेदी, अत्रीगोत्री, प्रथम प्रवरी, देशस्थ गुरुवर्य ब्राह्मण होते. श्रीगुरू पद्मनाभाचार्य स्वामींचा जन्म श्री मन्म्हांमूळ देवनगरी हिंदू धर्म शकाच्या ३८९२९४९ सवंत्वरी, मार्गशीर्ष मासी कृष्ण पक्ष नवमी तिथीस सावितुवारी उर्फ शनिवारी सूर्य उदयानंतर ५९ व्या घटिकेच्या ५व्या पळांत रत्नागिरी प्रांतातील तारळ नामक गावी झाला होता. जन्मलेले गाव त्यांचे आजवळ होते. त्यांच्या पित्याचे गाव तुंगभद्रा नदीतीरी अंजारपेठ हे होते. पद्मनाभ स्वामींनी भूतलावरील बहुतेक यात्रा तीनतीन चारचार वेळा केल्या आहेत. स्वामी पंढरीची वारी नेमाने करीत असत. पद्मनाभ स्वामींनी चतुर्वर्ण हिंदूदेवगणांपैकी बरेच शिष्य केले आहेत. पद्मनाभ स्वामींनी जातवेद महावाक्य, वेदान्त कौमुदी, सुबोध मालिका, शांतिपाठ, हरिपाठ वैगरे ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. पद्मनाभ स्वामी च्या शीघ्र कवित्व हा गुण अंगभूत होता.कोणत्याही प्रकारची कविता बोलणे झाल्यास शीघ्र कवित्वानेच बोलत असत. कवितेतील तथा श्लोकांतील आणि अभंग, आर्या, भजनातील अयोग्य वाक्य निवडून टाकण्याच्या कामी पटाईत होते. याच पद्मनाभाचार्य स्वामींनी कलियुगातील चतुर्वर्णमय देवगणांस सत्यश्रेष्ठ स्वहितसाधनयुक्त असा श्रीईश आज्ञांकित देवधर्म निरुपण केला आहे. त्या धर्म मार्गाचे आचरण करून कलीयुगातील हिंदूदेवगण सुख संपन्न होत असतात, पद्मनाभ स्वामी हे चतुर्वर्णमय देवगणास अत्यंत प्रिय असून स्वर्ग भुवनात महाप्रसिध्द आहेत. तसेच पद्मनाभाचार्य यांचे नाव सिद्ध विभुतींच्या यादीत उल्लेखनीय आहे. **** **** **** मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.