प्रियाचा मुड खरोखर बदलला होता .समितशी बोलताना तिच्या नजरेत खुप प्रेम दिसत होते .माहेरचे किस्से ,निधी सोबत केलेली मज्जा भरभरून सांगत होती . समितला वाटले बरे झाले ,कदाचित तिकडुन आल्यावर “फ्रेश” झाली असेल.आता आजपासुन जोडीचा खरा “संसार “सुरु झाला .पुढील महिन्यात समितच्या घरी दिल्लीला जायचे पण ठरले . दोन तीन दिवस समित फार बिझी होता सुट्टी झाल्याने कामे पेंडिंग होती .शिवाय परदेशातुन काही डेलिगेट्स पण आले होते .. घरून निघताना प्रियाने केलेंला चविष्ट ब्रेकफास्ट खाऊन समित कारखान्यात जात होता.प्रिया सुगरण होती चांगलीच ..!!घरी जायला पण खुप उशीर होत होता त्यामुळे प्रियाशी एकांतात भेट होत नव्हती . आज मात्र काही झाले तरी प्रियाची कळी खुलवायची असे समितने योजले होते एक मस्त लालभडक गुलाबांचा गुच्छ घेऊन समित घरी गेला .बेडरूम मध्ये जाताच त्याने प्रियाच्या अंगावर गुलाबाच्या फुलांची उधळण केली .प्रिया अगदी मोहरून गेली ..लगेच समितने तिला बाहुपाशात ओढले .काही वेळ उन्मादात गेला ..प्रियाचे पण सहकार्य होते असे वाटत होते .पण नंतर लगेच प्रियाने “नको नको प्लीज सोड मला ..असे म्हणत स्वतःला सोडवून घेतले आणि बाथरूम मध्ये बंद करून घेतले .कपडे घालून बाहेर आल्यावर नेहेमीसारखे तिचे रडणे सुरु झाले . आता मात्र समित खुप रागावला ,हे काय चाललेय त्याला समजेना .नाईलाजाने तो बाहेर जाऊन झोपला .दुसर्या दिवशी त्याने जंग जंग पछाडले पण प्रियाने काहीही उत्तर दिले नाही . समितचा स्वभाव “मवाळ” होता त्यामुळे तो प्रियाला मारू पण शकत नव्हता काहीच बोलत नसल्याने तिच्या असहकाराचे नेमके कारण समजत नव्हते .हिच्यात काही “दोष “ आहे की काय ..हिला सेक्सची इतकी भीती का वाटतेय ..तुला भीती वाटतेय का असे विचारले तर काही बोलत पण नव्हती फक्त डोळे भरून यायचे तिचे ..हीच्या मनाविरुद्ध हे लग्न झाले होते की काय ?बाहेर हीचे आधीच काही “प्रकरण “ होते की काय ?..असे विचार त्याच्या मनात येत होते .ज्याचे कोणतेच उत्तर प्रियाकडून मिळत नव्हते लग्नाला पंधरा दिवस तर झाले होते त्यामुळे याविषयी तो सुदिपकडे मोकळेपणाने बोलु पण शकत नव्हता .दिवस नेहेमीसारखे जात होते .प्रिया आपल्या इतर कर्तव्यात कुठेही चुकत नव्हती .समितशी इतर वेळेस व्यवस्थित बोलत होती.पण रात्री मात्र जास्त जवळ येऊ देत नव्हती .शेवटी कंटाळुन समितने वेगळ्या बेडरूममध्ये झोपणे सुरु केले . खुप विचार करून त्याने ठरवले पुढील महिन्यात दिल्लीला गेल्यावर आईकडुन याचा काही “तोडगा” मिळतो का पहायचे.कींवा लागली तर यासाठी सुदीप आणि रियाची मदत घ्यायची. एके दिवशी समित घरी आला तेव्हा प्रिया खुप आनंदात होती.कारण विचारताच तिने सांगितले की निधी नागपुरला येणार होती खास तिला भेटायला..पुढल्या आठवड्यात आणि राहणार होती एक आठवडाभर .तिच्या सोबत काय काय मजा करायची याचे “प्लान” चालु झाले होते तिचे समितला बरे वाटले आणि त्याने ठरवले की आता या वेळेस निधीशीच या गोष्टीची सल्ला मसलत करायची .प्रियाची ती “खास “मैत्रीण” असल्याने या गोष्टीची ती नक्की “उकल” करू शकेल अखेर तो दिवस उजाडला .प्रिया खुप आनंदात होती .निधीसाठी तिने सकाळपासुन खपून जेवायचे बरेच प्रकार केले होते.घरभर सुगंधी फुले ठेवली होती ..घर छान सजवले होते . सुमित नेहेमीप्रमाणे कारखान्यात निघाला .“प्रिया भेटूया संध्याकाळी सगळी , मग जाऊ कुठेतरी जेवायला ओके ?”प्रियाने हसुन त्याला निरोप दिला . दुपारचे चार वाजले तेव्हा सुमितचे काम आवरत आले होते .मग त्याने ठरवले मस्त मिठाई घेऊन लवकरच घरी जाऊ ..आणि प्रियाला छान “सरप्राईज” देऊया जवळच्या मार्केट मधुन एक संत्रा बर्फीचा खोका त्याने विकत घेतला .घरी पोचला तेव्हा दार बंद होते ..त्याने खिशातुन त्याची किल्ली काढली आणि आवाज न करता दार उधडले .बाहेरच एक मोठी सुटकेस आणि पर्स पडली होती .दोघीही बहुधा त्यांच्या बेडरूम मध्ये गप्पा करीत असाव्यात ..हातातले बर्फीचे खोके टेबलवर ठेऊन तो बेडरूम पाशी गेला आणि हलकेच त्याने दार उघडले ..आतले दृश्य पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली ..आतल्या बेडवर निधी आणि प्रिया पूर्ण नग्नावस्थेत एकमेकींची असोशीने चुंबने घेत होत्या ,त्यांची प्रणय क्रीडा रंगात आली होती .कसातरी भिंतीचा आधार घेऊन समित मटकन खाली बसला ..त्याच्यासाठी हे तर सगळे “अनपेक्षित“ होते समाप्त