भाग 1 – आठवणींचा सावट
रात्रीचं वेळ असतो. किरण रोजप्रमाणे काम आटपून घरी निघालेला असतो. पण मध्येच त्याच्या चपलेचा पट्टा तुटतो. म्हणून तो जवळच्याच बसस्टॉपवर बसतो आणि चप्पल दुरुस्त करू लागतो. चप्पल नीट होते, तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू होतो. तो पावसात न निघता तिथेच थांबतो.
अचानक त्याच्या मागून कसला तरी आवाज येतो. तो मागे वळून पाहतो, तर बसस्टॉपच्या मागे एक मुलगी रक्ताने माखलेली बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. तो घाबरतो आणि तिच्या जवळ जातो.
"थांब, मी हॉस्पिटलला फोन करतो," असं म्हणत तो कॉल करतो –
"इथे सिटी ज्वेलर्ससमोरच्या बसस्टॉपवर एक मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आहे. कृपया लवकर या."
ते म्हणतात, "हो, आम्ही १० मिनिटांत पोहोचतो."
तो फोन ठेवून पोलिसांना कॉल करतो, पण फोन उचलण्याआधीच अचानक त्याच्या डोक्यावर कोणीतरी जोरात काहीतरी घालतो... आणि सगळं अंधारात जातं...
किरण शुद्धीत येतो, मागे पाहतो, पण स्पष्ट दिसत नाही.
"कोण होता तो? का मारलं मला?" असं म्हणत तो चाचपडतो...
तेवढ्यात त्याची आई त्याला हलवते –
"किरण! एवढा घाम का आला रे तुला? काय झालं?"
किरण आईला सगळं स्वप्न सांगतो.
आई हसते –
"अरे काही नाही! काल रात्री suspense movie बघितलास ना? म्हणून असली स्वप्नं पडतात!"
ती निघून जाते. पण किरण मात्र विचारात पडलेला असतो...
आई परत येते, तरी तोच विचार करत असतो.
ती म्हणते –
"चल पटकन उठ, आज आपण मुलगी बघायला जायचंय."
किरण म्हणतो, "आई, मला नाही जायचं."
तेवढ्यात वडील येतात आणि रागाने म्हणतात,
"मग काय? आमच्या मेल्यावर करणार का लग्न? मूर्ख! आम्ही एवढी संपत्ती कोणासाठी गोळा केली? आता आम्हाला नातवंडं हवीत!"
ते रागाने निघून जातात.
किरण विचार करत बसतो... आणि शेवटी खालती उतरतो.
आई विचारते,
"कुठे चाललास?"
तो हसत हसत म्हणतो,
"मुलगी बघायला... तू नाही येणार का?"
सगळे हसतात... आणि निघतात.
किरण आणि रीनाची पहिली भेट
किरण हा अतिशय श्रीमंत असतो, पण स्वभावाने अत्यंत साधा, शांत, नम्र.
त्याचे वडील त्याच्यासाठी एक साधी, सुसंस्कृत मुलगी शोधत असतात. त्यांची नजर पडते – एका शाळेत शिक्षिका असलेल्या, रीना नावाच्या मुलीवर. तिचे आई-वडील नसतात, आणि तिची एक लहान बहीण असते – प्राची, जी थोडी special child असते.
किरणचे वडील तिच्याशी भेटायला जातात. रीना एक अट ठेवते –
"माझ्या लग्नानंतर माझी बहीण प्राची पण माझ्याच सोबत राहील."
किरणचे वडील होकार देतात.
सगळे रीनाच्या घरी जातात.
जसा किरण तिला पाहतो, तशीच तो तिच्याकडे पाहतच राहतो.
ती सुंदर असते – मोठ्ठे डोळे, गोड चेहरा, बोलण्यात गावाकडचा गोडवा, पण परिस्थितीमुळे आलेली थोडीशी कटुता.
किरणच्या आईला ती फार आवडते. ती म्हणते –
"रीना, आजपासून आम्हीच तुझे आई-वडील."
पण किरण म्हणतो,
"थांब आई, मला थोडा विचार करू दे."
सगळे परत जातात.
किरण गाडी चालवत असतो. अचानक त्याला एक flashback येतो –
दोन पुरुष एका मुलीचा पाठलाग करत असतात. ती पळत असते. मागून एकजण तिच्या डोक्यात बॅटने मारतो... ती जोरात ओरडते – 'किरण!!'
किरण दचकतो. तो जोरात ब्रेक मारतो.
आई-बाबा घाबरून विचारतात –
"काय झालं रे?"
तो म्हणतो –
"तीच स्वप्न परत दिसली आई… तीच मुलगी... कोणीतरी तिच्या मागे लागलं होतं... तिच्या डोक्यात मारलं..."
ते त्याला हॉस्पिटलला नेतात.
डॉक्टर त्याला तपासतात आणि हसून म्हणतात –
"किरण, झोप पूर्ण झाली नाही, खूप विचार करतोस... काही नाही. पण हो, तुझ्या बाबांनी सांगितलं की तुला मागच्या महिन्यात अॅक्सिडेंट झाला होता ना?"
"हो डॉक्टर, पण का विचारताय?"
डॉक्टर गंभीर होऊन सांगतात –
"त्या अॅक्सिडेंटमध्ये तुझी मैत्रीण, प्रिय गेली होती... आणि तू पूर्ण विसरला आहेस... स्मृती गेलीय तुझी. ही केस माझी आहे म्हणून मला माहिती आहे."
"पण आता लक्षात येतंय – हे सगळं तीचं सावट तर नाही ना? ती स्वप्नं... तिचा चेहरा... आणि आता प्राचीचं विचित्र वागणं..."
डॉक्टर सुचवतात –
"किरणचं लवकर लग्न करा, त्याच्या मानसिक स्थितीसाठी ते गरजेचं आहे."
किरण, आईबाबांसोबत घरी जातो.
किरण आणि रीनाची खरी भेट
आई रीनाला कॉल करते –
"किरण तयार आहे लग्नासाठी."
रीना विचारते –
"पण मी त्याला एकदा भेटू शकते का? मला काळजी वाटते... त्याच्या मनात काय चाललंय ते मला समजून घ्यायचंय."
दुसऱ्या दिवशी ते दोघं आणि प्राची एका कॉफी शॉपमध्ये भेटतात.
प्राची खूप गोंडस असते, पण थोडी घाबरलेली.
गप्पा सुरु असतात, पण अचानक प्राची गायब होते. दोघं घाबरून तिला शोधतात. ती एका मंदिरात सापडते.
रीना तिच्याकडे धावत जाते, पण एक दुचाकी तिच्याशी धडकते. ती जखमी होते.
किरण तिला हॉस्पिटलमध्ये नेतो. तिला हाताला फक्त पट्टी लागते.
बाहेर प्राची रडत बसलेली असते.
किरण तिला समजवतो.
पण अचानक ती हात ओढते आणि एका खोलीत दाखवते –
तिथे एक मुलगी कोमामध्ये असते.
किरण तिचा चेहरा पाहतो... आणि थरथर कापतो.
ती स्वप्नातलीच मुलगी असते!
तो स्तब्ध होतो.
तेवढ्यात रीना येते.
किरण या दोघीना सोडून घरी जातो, पण त्याला एक गोष्ट कळत नसते कि प्राची ला ही मुलगी कशी माहित, ती मुलगी कोणे मला येणारे स्वप्न नाकी कसले संकेत देत आहेत
पुढे काय होतं? प्राची प्राची कशी काय त्या स्वप्नातल्या मुलीला ओळखत असते ? किरणच्या स्वप्नांची आणि प्रियाच्या मृत्यूची सांगड लागते का?
– पुढील भागात…