Koun? 30 in Marathi Fiction Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 30

Featured Books
Categories
Share

कोण? - 30

भाग – ३०

     आता मात्र सावली त्याच ठिकाणी थांबून इकडे तीकडे बघू लागली होती. तीला कुणीच दिसत नव्हते म्हणून तीला आता फक्त प्रतीक्षा होती ती पियुषचा फोनची. पाच मिनिटांनी पियुषचा फोन पुन्हा आला आणि सावलीने तो उचलला. पियुष म्हणाला, “ सावली त्याने कॉल करून समोरचा व्यक्तीला विचारले कि तू कुठे आहेस. तेव्हा त्याने  म्हटले कि तो तुझा पाठलाग करत आहे. तर समोरील व्यक्तीने त्याला तात्काळ परत फिरण्यास सांगीतले आहे, एवढे बोलून त्याने फोन ठेवला आणि आता तो तुझापासून विरुद्ध दिशेने जात आहे.” मग सावली म्हणाली, “ अरे पियुष वाईट बातमी आहे कि तू सांगीतलेल्या लोकेशनचा फोन मला या निर्जन स्थानी सापडला आहे. यानंतर मी आणि तू त्या अनोळख्या नंबरला ट्रेस करू शकत नाही. मी तुला सांगते मी त्या व्यक्तीला भेटण्यास जात आहे. तर तू माझा फोन ट्रेस कर आणि माझी लोकेशन सुद्धा काही गरज भासली तर तू मला कॉल कर.” असे म्हणून सावलीने फोन ठेवला आणि ती पुढे निघाली. पुढे पुढे चालता चालता सावली अखेर त्या दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. त्यावेळेस सुमारे संद्याकाळचे सव्वा सात वाजले होते आणि सावलीला उशीर झालेला होता. 

   तर सावली तेथे पोहोचली तोच काय बघते कि तेथे दोन चार लोकं आधीच उभी आहेत. तीने बघीतले कि तेथे खाली फरशीवर कुणीतरी पडलेला आहे. मग सावलीने तेथे न जाता तेथेच आडोशाला लपून त्या लोकांचे बोलने ऐकण्याचा प्रयत्न केला. ते लोक बोलत होते, “ अरे याचा तर खून झालेला आहे , कुणीतरी पोलीस स्टेशनला फोन करून सांगा.” एकजण पुढे म्हणाला, “ हा तर येथील रहिवासी वाटत नाही नक्कीच कुणीतरी बाहेरचा व्यक्ती आहे आणि कुणाला तरी भेटण्यास आलेला आहे.” ते सगळ ऐकून सावली फारच घाबरली होती आणि ती तशीच उलट्या पावलांनी परत निघाली होती. तेथून ती सरळ पियुषचा घराकडे जाऊ लागली तोच तीचा मनात विचार आला कि मी तर संकटात अडकण्यापासून वाचले. परंतु याचा तपास करता करता पोलीस माझ्या पर्यंत पोहोचली तर माझ्या बरोबर बिचारा पियुष सुद्धा संकटात पडेल म्हणून तीने त्याचा घरी जाण्याचा बेत टाळला आणीत ती थेट घराकडे निघून गेली. 

    घरी जाऊन तीने गाडी ठेवली आणि घराचा आत जाऊन शिरली. ती घरात जाताच बघते तर शशांक तेथे तीचा घरी बसलेला होता. त्याला बघून सावलीचा पारा चढला होता परंतु त्याचा अवतीभवती तीची आई आणि कोमल बसलेली होती. म्हणून सावली सरळ तीचा बेडरूम मध्ये जाऊन शिरली आणि तीने दार आतून लावून घेतले. सावलीने मग तीचा फोन काढला आणि तीने लावून घेतलेल्या कॅमेराचे फुटेज ती चेक करू लागली होती. तीने बघीतले तर काहीच दिसले नाही तीला कारण कॅमेरा सुरु नव्हते. सावली पुन्हा रूममधून नीघाली आणि थेट बाहेर येऊन कॅमेरा बघू लागली होती. काय बघते तर तेथे कॅमेरा नव्हता तो कुणीतरी काढून टाकला होता. तेवढ्यात शशांक घराचा बाहेर आला आणि सावलीकडे बघत त्याचा गाडीकडे जाऊ लागला. सावलीने त्याचाकडे बघीतले तर तो हसत हसत जात होता. ते बघून सावलीला राग आला होता, ती काही बोलणार तेवढ्यात तीची आई आली आणि म्हणाली, “ सावकाश जा बेटा घरी अंधार झालाय तुझे आई बाबा तुझी वाट बघत असती.” मग तो नीघून गेला आणि सावली आईला म्हणाली, “ आई मी लावलेले कॅमेरा कुणी आणि कशाला काढले?” तेव्हा तीची आई म्हणाली, “ आमचा घराला नाही पाहिजे कॅमेरा वगैरे म्हणून आम्ही काढले आणि तुला जर हे नाटक करायचे असेल तर तू आपले घर घे आणि तेथे लाव सगळ्या घरात कॅमेरा.”

    आता सावलीला कळून चुकले होते कि ते कॅमेरा शशांकने काढले आहेत आणि त्यासाठीच तो माझ्याकडे बघून हसू लागला होता. सावलीला आता मात्र आपल्याच घरी परक्याप्रमाणे वागणूक मिळत होती त्यामुळे ती अधिकच आहत झाली होती. मग ती काहीच न बोलता रडत रडत तीचा बेडरूममध्ये गेली. तीने आतून दार लावून घेतले आणि ती रडू लागली होती. थोड्या वेळाने सावलीने निर्णय घेतला ती येथे नाही राहणार म्हणून तीने तीचा बॉसला फोन केला आणि ती म्हणाली, “सर मला माफ कराल या वेळेस तुम्हाला फोन केल्याबद्दल.” तेव्हा तीचे बॉस म्हणाले, “ काही हरकत नाही सावली, परंतु काही अतीआवश्यक आहे काय? तू अशी अचानक यावेळेस फोन केला म्हणून.” मग सावली उत्तरली, “ सर काय मला राहण्यासाठी आपल्या कंपनीचे क्वार्टर मीळू शकते काय? ते का बर मला काही आता विचारू नका. मी ते तुम्हाला सवीस्तर सांगेन.” मग बॉस म्हणाले, “ हे बघ सावली तू कंपनीची कर्मचारी आहेस तर तुला ते सहज मिळतील. तर उदयाला तू अर्ज कर मी तात्काळ तुला ते मिळवून देतो.” असे म्हणून तीचा बॉसने फोन ठेवला. आता सावलीचा मनाला थोडे समाधान वाटू लागले होते. तीला आता ते घर आणि तेथील व्यक्ती नकोसे वाटू लागले होते. परंतु तीने विचार केला मला माझ्या परिवारचा लोकांना त्याचा तावडीतून बाहेर काढावे लागेल. यासाठी मला येथून लांब राहून माझ्या योजनेला कार्यान्वित करावे लागेल. मग तिने लाईट बंद केला आणि ती झोपली.                                                                       
        शेष पुढील भागात............