Tu Hi re Mitva - 1 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तू हि रे मितवा - गंध रेशीमगाठींचा - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

तू हि रे मितवा - गंध रेशीमगाठींचा - भाग 1

आज सगळे रायजादा फॅमिली मध्ये सगळे खूप आनंदी असतात.... कारण पण तसेच होते... आज अण्णा साहेबांचं जिगरचा तुकडा त्याच लंडाचा नातू इंडिया मध्ये येत होता .. अण्णासाहेब उषा ला आवाज देतात.... म्हणजे त्याच्या धर्मपत्नी ... अंग तू पोहे बनवले आहेस ना मग अजून कसे दिले नाही... मला खायला ... आणा पटकन खूप भूक लागली आहे मला... हो आणते नि त्या अण्णाची पोहे घेऊन आल्या ... तस त्याचा बंगलो खूप मोठा होता.... तिथे कुणाला हि काम करायची गरज नव्हती सगळ्या कामासाठी मांस होती तिथे फक्त ऑर्डर सोडायची .. पण अण्णा ना उषाताईंच्या हातचे पोहे आवडायचे ते पोहे खात उषा ताईंना विचारत ... असतात... काय ग मी सांगितल्या प्रमाणे सगळी तयारी सुरूय ना..? माझा नातू कधीही येऊ शकतो ... मला तर असं झालाय कधी तो येतोय आणि मी त्याला माझ्या मिठीत घेतोय.... उषा ताईंना पण तसाच काहीस झाला होत .... तोच आत मध्ये एक जण सांगत आला संस्कार से आलेत ... दोघे पण आनंदाने उभे राहिले .... अण्णा तुम्ही जा पुढे मी आलेच .. संस्कार आत येणार तोच अण्णा त्याला बाहेरच थांबायला संगतात... संस्कार पण थांबतो तोच उषा ताई पूजेचं ताट घेऊन येतात.... आणि त्याला ओवाळतात... संस्कार आला म्हणून सगळे... घरातील तिथे जमा होतात... त्याच्या कडे प्रेमाने बघत होते सगळे... संस्कार सगळ्याकडे पाहत म्हणतो अरे असे काय बघताय ... उषा ताई त्याला म्हणतात... अरे तू किती वर्षानंतर इंडिया मध्ये आला म्हणून सगळ्यांना आनंद झालाय आणि ते तुझ्याकडे प्रेमाने बघताय ... आजी आता बस झालं ओवाळून मला आत तर येऊ दे .... हो ये ना ... आणि तो आत येतो बघतो... तर पूर्ण बंगलो डेकोरेट केला होता ... तो अण्णा कडे पाहत म्हणतो अण्णा आज काही आहे का म्हणजे बंगलो एवढा का डेकोरेट केला आहे...? अण्णा हसत म्हणाले अरे तुझ्यासाठी ... संस्काराने णनकडे बघून स्माईल केली.... तो आण्णा आणि माईचा आशीर्वाद हेतो... आणि एकेकाला भेटत असतो... संस्कार सागर(संस्कारांच्या मोठे पप्पाच मुलगा ) कडे पाहत म्हणाला तू कसा आहे ... मी मस्त ... तोच रमेश (संस्काराचे मोठे पप्पा ) चेहऱ्या वर उसण हसू आंत म्हणाले आम्ही पण चांगले आहोत.... खार तर संस्कार च्या मोठे पप्पा ना संस्कार घरी आला याचा अजिबात आनंद झाला नव्हता .... पण ते अण्णा साठी त्याच स्वागत करायला तिथे आले होते... कारण त्याच्या मोठे पप्पाना जे पाहिजे त्यांना पण त्याच्या नावावर प्रॉपर्टी पाहिजे होती... कारण त्यांना सतत वाटत होत अण्णाचा लाडका तर संस्कार आहे मग सगळे पैसे त्याला मिळाले तर आमचं काय होईल म्हणून ते शांत पणे त्या घरातील रहात होते ... सगळ्यांसमोर चांगलं वागायचं प्रयत्न करायचे ... संस्कार चे बाहेरून शिक्षण कम्प्लिट झाल्यामुळे आता तो इंडिया मध्ये त्याचा बिझिनेस सांभाळणार होता.... याच जास्त वाईट रमेश आणि सागर ला वाटत होत कारण आता त्यानं त्याच्या मनासारखं जगता येणार नव्हतं... आता संस्कार म्हणेल तीच त्यांना पण करावं लागणार होत.... आणि या दोघांना पण काम केल्याशिवाय काही पर्याय नव्हता कारण पैशासाठी तेवढं तर करावाच लागणार होत... कारण त्याच्या चुईमुळे त्याच्या बिझनेस मध्ये खूप लॉस झाला होता पण आता संस्कार ने काही महिन्यातच संस्कार ने त्याचा बिझनेस कुठल्या कुठे नेऊन ठेवला होता... आता ज्याच्या हि तोंडामध्ये नाव राहायचे ते म्हणजे संस्कार रायजादा ... जानवी तीच आवरून आईला आवाज देत होती आई ब्रेकफास्ट रेडी आहे ना ... मला आज ऑफिसला लवकर जावं लागणार आहे कारण आज पहिला दिवस आहे

उशीर नको व्हायला .... आई तिला आवाज देत हो तयार आहे ये लवकर आणि करून घे ... घाई घाईमध्ये ब्रेक फास्ट केला आणि ती ऑफिस ला जायला निघाली .... जानवी दिसायला खूप सुंदर नाजूक निरागस परी ,तिचे काळेशार सुंदर मोठे डोळे ... तिच्या डोळ्यात कोणी फिल ते पाहताच राहावे असे... मस्तीखोर ,बडबड करणारी ,पण मनाने खूप चांगली सगळ्याने समजून घेणारी आणि आपलस करणारी .. पण तिच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याची अजिबात खैर नसायची अशी आपली जानवी नाईक .. जानवी सीमाची वाट पाहत होती... पण सीमा अजून पण आली नव्हती ... जानवी मनात म्हणते आज मुलीमुळे ओरडा खावा लागतो कि काय... तोच तिला सीमा येताना दिसते... ती सीमाची हात पकडून म्हणते काय कुठे होतीस किती उशीर यायला ... सॉरी ग जण ... तोच बस येते आणि त्या दोघी बस मध्ये चढतात .... बस पूर्ण भरलेली असते ... कशा तरी दोघी पकडून उभ्या राहतात... या दोघीच बोलणं चालूच असत... त्यात गर्दीचा फायदा एक मुलगा घेत असतो आणि जानवी ला मुद्दाम स्पर्श करत असतो... जानवी एक दोनदा इग्नोर करते.... पण त्या मुलानेच तेच चालू असत ... शेवटी जानवी रागाने त्या मुलाकडे पाहते आणि बोलायला लागते मघास पासून पाहतेय तुमचं काय सुरूय मी बोलत नाहीये याचा फायदा घेताय का... त्याला खरी खोटी सुनावत असते... तो मुलगा तिच्याकडे पाहत म्हणतो मॅडम किती गर्दी आहे धक्का लागला म्हणून काय एवढं मनावर घेताय .. जानवी पुन्हा त्याच्या वर ओरडतोय धक्का लागला आहि तुम्ही मुद्दाम करताय .... त्या दोघंच जोरदार भांडण चालू होत ... सीमा जानवी ला शांत करायचा प्रयत्न करते पण जानवी तीच काहीही ऐकत नाही ...... तो मुलगा जानवी ला म्हणाला ये जास्त बोलू नकोस तुला माहितीये का मी कोण आहे... जानवी कोण आहे तू सांग बर तू आणि सन कण त्याच्या कानात वाजते .... त्या मुलाला एवढ्या सगळ्या समोर मारल्याने त्याचा पारा चढतो आणि तो पण जानवी ला मारणार तोच बस मधील काही लोक त्याला ओरडतात ...... या सगळ्या प्रकारात सीमा मात्र थरथर करत असते .... तोच त्याच स्टॉप येतो आणि त्या दोघी खाली उतरतात... सीमा घाबरून म्हणते जान तुला शांत नाही राहता येत का..? काय गरज होती का बस मध्ये तमाशा करायची ... जानवी तिच्याकडे रागाने पाहत म्हणते अंग काय करायला पाहिजे होत त्याची आरती करायला पाहिजे होती का ...? आणि किती घाबरतेस तू असं घाबरत राहील तर लोक जास्त घाबरावतात.. आपल्याला ... आणि जशाच तसे वागल्यास आपल्याला काहीही त्रास होत नाही.... अंग पण मुलाच्या नांदी लग्न चांगलं नाही ते कधी बदला घेतील तर सांगता येत नाही.... ये सीमा तुझा असेल तर तो विषय सोड आणि ऑफिस बद्दल काहीतरी सांग तू तर आधी पासून तिथे आहेस माझा तर पहिला दिवस आहे... ऑफिस बद्दल काय सांगायचे ऑफिस मध्ये बॉस कोण आहेत तेच माहिती नाही कारण कधी ऑफिसला आलेच नाही.... पण सागर सर म्हणून एक आहे ते सगळं ऑफिस बघत असतात... पण काहींच्या तोडून ऐकली कि आपले बॉस दिवसायला खूप हँडसम आहेत... अगदी प्रेमात पाडाव असे .... पण ते सागर सर आहेत ना ते ऑफिसमध्ये काम कमी आणि मुलींनाच जस्त पाहत सतत... आणि मी ज्या डिपोर्टमेन्ट ला काम करते ते सिनिअर सर खूप खडूस आहे कुणाचं काही ऐकवून घेत नाही.... पण सीमा आपण एकच ऑफिसला असलो तरी तू वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये आणि मी वेगवेगळ्या ... तोच सीमाच्या लक्षात येत त्यांना लेट झालंय .... ती जानवी चा हात पकडून तिला ओढत घेऊन जात होती.... अग सीमा काय करतेय जरा हळू मी पडेल ना..... जान लेट झालाय चल पटकन नाहीतर माझं काही खरं नाही .... अग तुला जॉइंहोउं इथे पाच सहा महिने झालेत माझा तर पहिलाच दिवस आहे त्यात ते सर किती रागावतील मला... त्या दोघी आत येतात... तोच सीमाच लक्ष समोर जात आणि ती घाबरून तिथेच उभी राहते... जानवी पुढे जात असते पण सीमाने हात पकडल्यामुळे ती का पुढे येत नाहीये म्हणून तिच्या कडे पाहते... सीमा काय झालं केव्हाची तर घाई करत होतीस ना मग आता इथे का थांबलो .... सीमा जानवी कडे पाहत म्हणते समोर बघ .... जानवी पण समोर पाहते ... तर एक सर उभे असतात.. आता जानवी पण शांत उभी राहते.... ते सीमेकडे पाहतात आणि तिला विचारतात.... आज का लेट आलात ... सीमा घाबरत सर बस मुळे लेट झाला सर सीमा कडे रागाने बघून आता सोडतो पण पुढे असल्या फालतू कारणामुळे उशीर झालेला मला चालणार नाही .... जा आणि लागा कामाला ... सीमा जानवी चा हात पकडून जाऊ लागली ... तोच पुन्हा आवाज आला थांबा ... ताशा दोघी थांबल्या सीमा तुझ्या सोबत हि कोण आहे..? जानवी स्वतःच बोलायला लागली सर मी जनवी नाईक न्यू जॉइनिंग माझा पहिला दिवस आहे आज ... ते सर जानवी कडे रागांत पाहत तिला विचारून लागेल तुला का उशीर झाला...? जानवी घाबरू काही बोलणार तोच ते सर बोलतात आज तुला पण सोडतो या पुढे उशिरा यायचं नाही.... जा आणि लागा कामाला ... ताशा दोघी तिथून निघून गेल्या ..

सीमाने तिच्या डिपार्टमेंट जायच्या आधी जानवी ला तीच डिपार्टमेंट दाखवलं आणि ती निघून गेली..... जानवी शांत बसून ऑफिसमध्ये इकडे तिकडे नजर फिरवत होती... कारण अजून तिला कुणीच काम सांगितलं नव्हतं .... तोच तिथे तेच सर (चव्हाण ) येतात... जे तिला सीमा ला ओरडले असतात.... तिच्याकडे पाहत म्हणतात.. ऑफिसचं निरीक्षण करून झालं असेल तर चला माझ्या सोबत काय काम करायचे ते सांगतो.... जानवी घाबरून उभी राहते... आणि सॉरी सर म्हणते आणि त्याच्या मागे जाते... चव्हाण तिला सगळं काम समजावतात.... जानवी पण मन लावून सगळं काम समजून घेत असते... कामाच्या गडबडीत लाँच ब्रेक कधी होतो तिला पण कळत नाही.. सीमा तिला बोलवायला येते आणि त्या दोघी कँटिंग मध्ये जातात.... जेवण करत गप्पा मारत असतात... सीमा तिला विचारते काम समजून घेतलं ना .. हो ग सीमा सगळं काम समजून घेतलं मी पण सर खूप डेंजर आहे ग... आपल्याला काही बोलूच देत नाही .... हो सर तसेच आहे.... जेवण करत त्याच्या गप्पा चाली असतात... तोच जाह्नवीच लक्ष समोरच्या टेबल वरती मुलाकडे जाते... ते मुलं तिच्याकडे पाहत असतात... जानवी सीमा ला त्या मुला बद्दल सांगते.. आणि आता तू नको जाऊस त्याच्या वाटेला आधीच सकाळी भांडलीस आहेस... आणि आज ऑफिसचा पहिला दिवस आहे कुठे बॅड इम्प्रेशन पडेल अशी वागतेस का... जेवण झालं असेल तर निघूया ... नाही तर चव्हाण सर येतील आपल्याला शोधत इथे... आणि त्या दोघी निघून त्याच काम करू लागल्या .... कामात बिझी असल्यामुळे ऑफिसचा पहिला दिवस कसा गेला जाणविले ते कळलंच नाही ... काहीवेळाने सीमा आणि ती घरी जायला निघाली... घरी आल्यावर फ्रेश होऊन हॉलमध्ये बसली... आज थकल्यामुळे बसल्या बसल्या तिचे डोळे लागत होते... जानवी ची आई तिच्या जवळ आली आणि तिच्या डोक्यवरून हात फिरवत म्हणाली ... जानु थकलीस बाळा चल मी जेवण बनवलं आहे जेवण करून घे फ्रेश वाटेल तुला ... ती आई ला 
मिठी मारत म्हणते आई तू पण काम करून येतेस घरी युन जेवण पण बनवतेयस माझा तर आज पहिला दिवस होता पण मी बघ किती थकून गेले आहे... आणि आई मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे उद्या पासून तू कुठे हि कमला जायच नाही.. घरी बसून तुझी काळजी घ्यायची आहे अराम करायचा ... अंग घरी बसून कंटाळा येतो ग त्या पेक्षा कामावर गेलं कि बर वाटत .. आई माहितीय मला तुला घरी करमत नाही पण तुझ्या लेकीचं पण ऐकत जा ना ... आणि मी लहान असताना पासून तूच करतेय ना सगळं आग आता मी सांगतेय तर कर ना घरी अराम .. बाबा गेल्यावर तूच मला लहानाचं मोठं केलं .... चांगले संस्कार केलेत मला कशाचीही कमी नाही पडू दिली ... पुरे झालं माझं कौतुक मी नाही जाणार कमला मग तर झालं पण आता जेवण अरुण घेऊ .. त्या दोघी जेवण करतात.. आणि लवकरच झोपून जातात... पाहिल्यादिवशी उशीर झाल्यामुळे तिला उद्या ऑफिसला लवकर जायचं होत .... सकाळी लवकर उठून ती आणि सीमा ऑफिसला निघून गेल्या ... आणि त्याच काम करू लागल्या आज त्याच्या ऑफिसमध्ये चव्हाण सर मिटिंग ठेवतात.... कारण आज सागर ऑफिसला आला होता .. सगळे मिटिंग हॉल मध्ये जमा झाले आणि चव्हण सर बोलायला लागले... मिटिंग अचानक घेण्याचं करणं म्हणजे आज आपल्या घेण्याचं कारण म्हणजे आज आपल्या कंपनीचं बॉस येणार आहेत... कारण ते पाच ते सहा वर्षांनी ऑफिस मध्ये येणार आहेत तर मला कुठलीच घबाड नकोय... चव्हाण बोलत होते आणि सागर मुलीवरून नजर फिरवत होता ... तोच त्याच लक्ष एका मुलीकडे जात आणि तो त्या मुली कडे टक लावून पाहत असतो ती मुलगी आपली जानवी असते... काहीवेळाने मिटिंग संपते आणि सगळे त्याच्या कामाला लागतात .. जानवी पण काम करत असते तोच तिला बोलवायला एक पिऊन येतो... आणि सांगतो .... तुम्हाला चव्हाण सरानी त्याच्या केबिन मध्ये बोलावले आहे... जानवी केबिन जवळ जाते आणि दरवाज्याला टक टक करते... आतून आवाज येतो तशी आत जाते ... मिस जानवी काल मी तुम्हाला सगळं काम समजावलं आहे आता तेच काम तुम्ही करायचा आहे त्यासाठी तुला बॉस सोबत जावं लागेल तिथे सगळं चेक करावं लागेल आणि तसे डाक्युमेंट तयार करावे लागतील ... पूर्ण काम मन लावून करा.... चव्हाण सर तिला समजावत असतात.... जानवी पण मान हलवून हो म्हणते... ती सारण विचारते सर ते मघाशी मिटिंग मध्ये होते ते आपले बॉस आहेत का...? चव्हाण तिच्याकडे पाहतात आणि नाही म्हणतात... आपल्या कंपनीचे ऑनर संस्कार रायजादा याच्या सोबत तुम्हाला काम करायचं आहे .... जानवी चा तर तिच्या कानावर विश्वास बसत आणि आणि ती विचार करत तिथेच थांबलेले असते .... तोच चव्हाण सर तिला ओरडतात... तशी ती बाहेर येते आणि तीच काम करायला लागते ... पण कामात लक्ष लागत नाही.... कारण मी बॉस बरोबर काम करावं लागणार याचा तिला अजून पण विश्वास बसत नव्हता... ती वॉशरूम च नाव सांगून सिमला भेटायला जाते.... आणि सिमला चव्हाण सर जे बोलले ते सगळं असते.... सीमा मला तर अजून पण विश्वास होत नाहीये कि मला बॉस बरोबर काम करायचं आहे ...

खूप लकी आहेस तू इथे मुली बॉस जवळ जाण्यासाठी काय काय करत असतात... आणि तू काही न करता तुला बॉस सोबत काम करायला मिळणार आहे खूप भारी जान ... सीमा जेवढा आनंद होतोय तेवढी भीती पण वाटत आहे ग... आग घाबरतेयस कशाला पाणी बॉस काही राक्षस नाहीये तुला खायला ... एवढी बाघरतेय तर .... त्या बोलत असतात तोच कुणाचा तरी आवाज येतो बॉस आलेत आणि या दोघी पण उठून उभ्या राहतात... आणि एंट्री दरवाज्याकडे पाहत असतात.... तोच एंट्री होते डॅशिंग पर्सनॅलिटी असलेल्या अनास्कर रायजादा ची ....दिसायला खूप हँडसम .... जेल ने सेट केलेले केस .. चेहऱ्यावर अनोखं तेज ... सूट बूट घातलेला संस्कार त्याला मुली तर पापणी न हलवता पाहत होत्या ...नकळत सीमा आणि जानवी च्या तोडून वॉव येतेच .... तो मात्र कुणाकडे लक्ष न देता... पुढे चालत होता आणि त्याच्या मागे पळत च एक मुलगी पण येत होती ... तिने कपडे तोडके मोडके घातले होते.... सागर सर आणि चव्हाण पण त्याच्या मागे जात होते.... जानवी तर संस्कार ला बघून हरवून गेली होती....जान हेच आपले बॉस आहेत तुला त्याच्या सोबत काम करायचं आहे.. तशी जानवी भानावर येते... जानवी सीमाला म्हणते खर्च त्याच्या बद्दल तास ऐकले होते तसेच आहेत आपले बॉस अगदी हिरो सारखे ... खूप भारी आहे आपले बॉस माझी तर नजरच हटत नव्हती त्याच्यावरून ... ती तिच्या धुंदीत बोलत असते तोच तिला पुन्हा चव्हाण सरानी बोलावलं असत... तिला राग येतो ती मनातच चव्हाण सरांना शिव्या देत असते.... याना पूर्ण ऑफिसमध्ये मीच दिसते का मलाच नेहमी बोलावत असतात.... ती दरवाजाला टक टक करते आतून आवाज येतो कम इन .... ती आत जाते... आणि मोठे डोळे करून पाहत असते कारण समोर चव्हाण सर नसून संस्कार रायजादा असतो.... चव्हाण सर आणि ती मुलगी बाजूला असतात.... चव्हाण सर जानवी कडे बघून बोलतात... सर हि मिस जानवी नाईक हि तुमच्या सोबत काम करेल या प्रोजेक्ट चे सगळे डिकल्स त्या तुम्हाला देतील..... संस्कार चव्हाण च बोलणं ऐकून एक नजर जानवी वरून फिरवतो आणि लॅपटॉप मध्ये त्याच काम करतो ... आणि जानवी या मिस अबोली सरांच्या असिस्टंस ... दोघी पण एकमेकांकडे पाहतात... जाणविले अबोली कडे बघून विचित्र वाटत तर अबोली जनवीकडे बघून मनातच म्हणते ..... या चव्हाण ला दुसरी कुणी मिळाली नव्हती का...? तोच संस्कार उठून उभा आणि बाहेर जाऊ लागला... अबोली पण त्याच्या मागे जात होती... जाणविले तर काहीच कळत नव्हतं म्हणून ती शांत तिथे उभी असते... लाव्हा जाह्नवीवर ओरडतो आणि म्हणतो अंग आता तुला त्याच्या मागे जायचं पण इन्व्हिटेशन द्यावं लागेल का..? ते जाताय ना मग तू का उभी आहेस तू पण जा.... जानवी ला चव्हाणचा राग आला पण ती पटकन पळत जाऊन त्याच्या मागे जाऊ 

लागली... ते दोघे कार मध्ये बसले होते... अबोली तिच्याकडे रागाने पाहत म्हणते ... तू कॅब बुक करून ये... जानवी काहीच बोलत नाही पण संस्कार जानवी कडे पाहत महतो आपण जत तिघे एका ठिकाणी जातोय तर तिला कॅब करून हे सांगण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या कर मध्ये पुढील सीट रिकामी आहे तिथे बायला सांगा ... संस्कार च बोलणं एकूण अबोलीचा पारा चढतो पण ती नॉर्मल होत तिला पुढच्या सीट वर बसायला सांगते... जाणविले पण तिला थँक्यू सर बोलून पुढच्या सीट वर बसते.... 



-------------------------


बघूया पुढील भागात काय होते आणि कथेचा हा भाग कसा वाटलं नक्की सांगा