Nikki in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | निक्की

Featured Books
Categories
Share

निक्की

त्या लहान गावात माझी बदली झाली तेव्हा माझी आणी निक्कीची गाठ पडली खरे म्हणजे तीचे नाव निकिता आहे पण तीच्या घरचे आणि जवळचे सारे तीला प्रेमाने निक्कीच म्हणतात दोन भावांची एक अत्यंत लाडकी बहीण आणी तिच्या पप्पांची जीव की प्राण असणारी ..लेक !!त्यांचे प्रेम पाहुन मला माझी आणी माझ्या वडिलांची अशीच असलेली जोडी नेहेमीच आठवायची!!आमच्या पहिल्या भेटीतच आमची इतकी  मस्त गट्टी जमली होती की मी तर तीला पहिल्या भेटीतच निक्की म्हणु लागले .मग सुरु झाला आमच्या मैत्रीचा एक प्रवास ....वाचन, स्वयंपाक ,फिरणे, या आमच्या आवडी निवडी अगदी पक्क्या जमल्या .शिवाय माझ्या लेखनाची तर ती एक “पंखा “..होतीच  मला जशी पुर्वी इंग्रजी कादंबरी वाचायची आवड होती (सध्या हे वाचन जमत नाही कारण नोकरीत खुप वेळ जातो ) तसेच तिलाही इंग्रजी साहित्य आवडते या छोट्या तालुका प्लेस गावातील लायब्ररीतील सारी इंग्रजी पुस्तके निक्की वाचते. या इंग्रजी पुस्तकावर काही चर्चा माझ्याशी केल्या खेरीज तीचे वाचन “अपूर्ण “असते तीच्या मागणी नुसार काही इंग्रजी पुस्तके खास तीच्यासाठी लायब्ररीत आणली पण जातात वेगवेगळे पदार्थ करून मित्र मैत्रिणींना खायला घालायची तीला खुप हौस आहे आठवड्यातुन एकदा दोनदा तरी .आमचे खाणे पिणे हमखास तिच्याकडे ठरलेले असते त्यात पण तिची एक स्टाइल आहे बर का !!पदार्थ तयार झाला की तो छान सजवुन वॉट्स अप वरून आधी पाठवला जातो म्हणजे मला समजते आज काय मेनू आहे...माझी रोज ऑफिसातून बाहेर पडायची वेळ साधारण सात वाजता असते .त्या दरम्यान ही डिश तयार असते मग मी अहोना मेसेज पाठवून बोलावून घेते मग ती तिचे,पप्पा, आई ,आमचे अहो, असे आम्ही सारे गप्पात दंग होऊन निक्कीने बनवलेल्या त्या चविष्ट डिशचा आस्वाद घेतो .अधुन मधुन आमच्या घरी पण ही मैफिल जमते खास कोल्हापूरी स्टाइलचे माझ्या हातचे पदार्थ खायला .कारण तीचे आजोळ कोल्हापूरचे असल्याने तीला आमच्याकडील पदार्थ खुप आवडतात .बाईसाहेब शुध्द शाकाहारी आहेत तसे आमच्या वयात खुप अंतर आहे .माझ्या मुलगा सुनेच्या वयाची आहे ती पण हे वयातले अंतर आमच्या मैत्रीत अजिबात आड येत नाही .आम्ही अक्षरशः तासंतास गप्पा करतो कोणताही विषय गप्पात आम्हाला वर्ज्य नाही चार पाच दिवस जर खरेच कामाच्या कारणाने आमची भेट झाली नाही तर लगेच तिचा फोन येतो मॅडम दुपारी चहाला या ना ..मग आमचे सहकारी पण गमतीने म्हणतात मॅडम जा लवकर .तुमचा विरह नाही तीला सहन होत .!!ते  छोटे गाव आहे पण इथे कुठ काय छान मिळते हे तीला माहीत असल्याने अधुन मधुन आमची ही खाद्य मुशाफिरी पण असते ..सध्या स्थळे पहात आहेत तीच्या साठी   तीला पाहायला आलेली मुले.त्यांची पसंती नापसंती हे सारे घरच्या पेक्षा आधी मला सांगणे तीला जास्त आवडते .भांडणे पण होतात आमची कधी कधी भांडणाचे कारण काय.... तर कीती दिवस झाले तुम्ही मला भेटला नाही ..तुम्हाला माझी काही किंमतच नाही अशी त्यावेळी तिची तक्रार असते ..आणी माझे म्हणणे असते ..अग पाहतेस ना तु या कामात मरायला पण फुरसत नसते ..मात्र हा आमच्या दोघींचा राग क्षणिक असतो बर का मग मीच जाऊन  काहीतरी करून तिची समजुत काढते .      नव्या पिढीची असून सुद्धा ती थोडीशी देव देव पण करणारी देवाला मानणारी आहे इतर वेळा कारणाशिवाय कधी घराबाहेर न पडणारी ती शनिवारी मारुती . संकष्टीला गणपती सोमवारी महादेव एकादशीला विठोबा मंदिरात जातेच मग मीच गंमतीने तिची चेष्टा करते निक्की आज मारुतीचे भाग्य उजळले बर का कारण निक्की नटून थटून भेटायला आलीय त्याला ..     नवीन फॅशन चे कपडे.. त्याचे मॅचिंग त्याची टापटीप हे तर तीचे माझे अगदी शंभर टक्के जुळणारे गुण आहेत तीचे शॉपिंग सगळे पुण्यात होते .त्यासाठी दर दोन महिन्याला पुण्याला चक्कर असतेच तिची अगदी खास खास गोष्टी लागतात तीला खुप चुजी स्वभाव आहे तिचा मग अगदी वेगळी वाटणारी कानातली ,..टिकल्या माझ्यासाठी पुण्याहुन आणते माझी आठवण झाली म्हणुन ..!आम्हाला भेटून फक्त सहा महिने झालेत पण असे वाट्ते खुप वर्षे लोटलीत दिवसाला वॉट्स अप वर पाच सहा मेसेज ,,दोन दिवसातून गप्पा साठी फोन आठवड्यातून एकदा काही खाणे पिणे ..तीला जणु माझ्या शिवाय चैनच पडत नाही नोकरी बदलीची असल्याने आता त्या गावातला  माझा मुक्काम कीती आहे हे मलाच माहीत नाही त्यामुळे आमचा सहवास कीती असेल याचा निर्णय देवच जाणे कारण त्यानीच तर आमची गाठ घालून दिलीय ..सध्या तरी आम्ही दोघी येणारा रोजचा दिवस  फक्त एन्जॉय करीत आहोत