नेहमी सूर्योदयानंतर उठणारी गौरी आज अगदी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी उठली होती. कारणही तसेच होते. आज दिवाळी होती. आज सर्व घरात लगबग, घाई गडबड चालू होती. आई स्वयंपाक घरात फराळ काढण्यात मग्न होती. आजी आजोबा,बाबा हे सर्व जण स्नान आटोपून पूजेची तयारी करत होती. काही आळसावलेली गौरी आज सणाच्या निमित्ताने उठून तयारी करत होती.तिचा नवा ड्रेस आज ती घालणार होती सकाळचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर घरातील सर्व मंडळी गप्पा करण्यात गुंतली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिची आवडती मावशी मंजू तिला भेटायला आली गौरी जाम खुश झाली. तिच्यासोबत थोडा वेळ व्यतीत केल्यानंतर मावशीने तिला बाजारात तिच्यासोबत येण्यास सांगितले.गौरी देखील आनंदाने तयार झाली दुपारची वेळ असल्याने तिने रुमाल डोक्याभोवती गुंडाळला व दोघीजणी पायी बाजाराकडे निघाल्या. गौरी बाजारात पोहोचल्यानंतर सर्व बाजाराचे शांतपणे निरीक्षण करू लागली एवढ्या उन्हातान्हात लोकांनी आपली दुकाने जमिनीवर थाटली होती त्यांच्यापैकी काहींच्या डोक्यावर साधे रुमाल देखील नव्हते उन्हाने चेहरे थकलेले होते परंतु वस्तूंची विक्री होण्यासाठी घसा ओढून ओरडून वस्तू विकत होते.काही दुकानात तर लहान मुले होती अत्यंत चतुराईने वस्तू विकत होती, त्यांची कपडे देखील साधारण होते एका ठिकाणी तर अगदी सत्तरी गाठलेल्या आजीबाई दुकानात बसलेल्या होत्या त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर थकवा अगदी स्पष्ट दिसत होता बाकी बाजार वस्तूंनी अगदी खचाखच भरलेला होता,मावशीने काही वस्तू विकत घेतल्या व गौरीला घेऊन घराकडे परतत असताना त्यांना नेहमीप्रमाणे बडबड करणारी गौरी खूप शांत वाटली. त्यांनी गौरीला विचारले पण तिने काहीच सांगितले नाही. मावशीला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले मावशीने तिला आईस्क्रीम घेऊन दिले व तिला जवळच्या एका बागेत घेऊन गेली थोड्या वेळ झाल्यानंतर मावशीने गौरीला तिच्या मैत्रिणींविषयी दिवाळीतील सुट्ट्यांच्या नियोजनाविषयी विचारले व हळूहळू तिला बोलते केले, गौरीने मावशीला विचारले, मावशी आज दिवाळी आपण सर्वांनी नवे कपडे घातले,छान छान वस्तु घेतल्या पण..पण काय,मावशीने विचारले गौरीने उदासवाणे होऊन सांगितले,आज मी बाजारात खूप माणसे पाहिली काही वस्तू विकत होती तर कोणी खरेदी करत होते. बर मग,मावशी म्हणाली तेव्हा गौरीने सांगितले मावशी त्या दुकानात ते काका किती तळमळीने ओरडत होते त्यांच्या डोक्यावर तर रुमाल पण नव्हता आणि ती लहान मुले माझ्याच वयाची असतील त्यांच्या अंगावर देखील साधी कपडे होते आणि त्या आजीबाई, किती ग थकलेल्या त्यांना घरी जाऊन शांत झोपावे असे नसेल वाटत का ग?आता मात्र मावशीला गौरीच्या शांत असण्याचे कारण चांगलेच लक्षात आले होते पण तिच्या निरीक्षण शक्तीचे फार कौतुक वाटले तेव्हा मावशीने गौरीला जवळ घेतले व सांगितले अग आपण जिथे राहतो म्हणजे ज्या देशात राहतो तो आपला भारत देश फार श्रीमंत नाही, त्यामुळे दैनंदिन जीवन जगण्यासाठी लोकांना फार कष्ट करावे लागतात त्यामुळे दिवसभर काबाडकष्ट करून मिळालेल्या पैशातून मध्ये दैनंदिन सामान खरेदी करने हीच त्यांची दिनचर्या असते, काही कुटुंबे तर इतके गरीब असतात की त्यांना कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय पर्याय नसतो त्यामुळे लहान मुले म्हातारी माणसे यांना देखील कष्ट करण्यासाठी घराबाहेर पडावे लागते.गौरीच्या बालबुद्धीला या सर्व गोष्टी नवीन होत्या पण ती फार समजूतदार होती तिला आता तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती पण तरीही त्या बालमनात पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होत होते,असे असले तरी तिला आता तिच्याजवळ असणाऱ्या वस्तूंची उपलब्ध गोष्टींची पदार्थांची किंमत कळाली होती. थोड्या वेळाने दोघीजणी घरी आल्या, दुसऱ्या दिवशी गौरी पहाटेच उठली शांतपणे स्वतःची सर्व कामे आटोपली,आईला तर हे नवीनच होते कारण कालपर्यंत गौरीला उठवण्यासाठी आईला किती कसरत करावी लागे,गौरीने नाश्ता निमुटपणे केला कसलीच का कू न करता आणि नंतर अभ्यासाला बसली आता मात्र, आईला राहवेना,गौरीतील हा बदल तिला सुखावून व आश्चर्य देऊन गेला तेवढ्यात आईच्या मोबाईलवर मावशीचा फोन खणखणला आईचे मंजू मावशी सोबत बोलणे झाल्यावर गौरीतील होणारा बदल लक्षात आला आईला गौरीचा फार अभिमान वाटला आईने गौरीला जवळ घेतले व एक लाडू खायला दिला.